04-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - बहीण-भावाच्या भानातून देखील निघून भाऊ-भाऊ समजा तर सिव्हिल आय (दृष्टी पवित्र) बनेल, आत्मा जेव्हा सिव्हिल-आइज् (पवित्र दृष्टीवाली) बनेल तेव्हाच कर्मातीत बनू शकते

प्रश्न:-
आपले अवगुण काढण्यासाठी कोणती युक्ती केली पाहिजे?

उत्तर:-
आपल्या कॅरॅक्टरचे (गुण-स्वभावाचे) रजिस्टर ठेवा. त्यामध्ये रोजचा पोतामेल लिहा. रजिस्टर ठेवल्याने आपल्यातील कमतरता समजतील आणि मग सहजच त्यांना काढू शकाल. अवगुणांना काढत-काढत त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे की एका बाबांव्यतिरिक्त इतर कशाचीही आठवण राहू नये. कोणत्याही जुन्या वस्तूंमध्ये आसक्ती राहू नये. आतमध्ये काहीही मागण्याची इच्छा राहू नये.

ओम शांती।
एक आहे मानव बुद्धी, दुसरी आहे ईश्वरीय बुद्धी, नंतर असेल दैवी बुद्धी. मानव बुद्धी आहे आसुरी बुद्धी. क्रिमिनल-आइज् (विकारी दृष्टीवाले) आहेत ना. एक असतात सिविल-आइज् (पवित्र दृष्टीवाले), दुसरे असतात क्रिमिनल आइज् (विकारी दृष्टीवाले). देवता आहेत व्हाईसलेस, सिव्हिल-आईज् (निर्विकारी, पवित्र दृष्टीवाले) आणि इथे कलियुगी मनुष्य आहेत विशश, क्रिमिनल-आईज् (विकारी, विकारी-दृष्टीवाले). त्यांचे विचारच विकारी असतील. विकारी दृष्टीवाले मनुष्य रावणाच्या जेलमध्येच राहतात. रावण राज्यामध्ये सर्व आहेत विकारी-दृष्टीवाले, एकही पवित्र-दृष्टीवाला नाही. आता तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमयुगावर. आता बाबा तुम्हाला क्रिमिनल-आइज् पासून बदलून सिविल-आइज् बनवत आहेत. विकारी दृष्टीवाल्यांमध्ये देखील अनेक प्रकार असतात - कोणी सेमी, कोणी कसे. जेव्हा सिव्हिल-आईज् (पवित्र दृष्टीवाले) बनाल तेव्हा कर्मातीत अवस्था होईल मग भावा-भावाची दृष्टी बनेल. आत्मा, आत्म्याला पाहते, शरीरे तर राहतच नाहीत तर मग विकारी दृष्टीवाले कसे होतील म्हणूनच बाबा म्हणतात - स्वतःला बहिण-भावाच्या भानातून बाहेर काढत जा. भाऊ-भाऊ समजा. ही देखील अतिशय गूढ गोष्ट आहे. कधीच कोणाच्या बुद्धीमध्ये येऊ शकत नाही. सिव्हिल-आइज् वाला (विकारी दृष्टिवाला) याचा अर्थ कुणाच्याही बुद्धीमध्ये येऊ शकत नाही. तो जर आला तर त्याला उच्च पद मिळेल. बाबा समजावून सांगतात की, स्वतःला आत्मा समजा, शरीराला विसरायचे आहे. हे शरीर सोडायचे देखील आहे बाबांच्या आठवणीमध्ये. मी आत्मा बाबांकडे जात आहे. देहाचा अभिमान सोडून, पवित्र बनविणाऱ्या बाबांच्या आठवणीमध्येच शरीर सोडायचे आहे. विकारी दृष्टीकोन असेल तर आतमध्ये जरूर खात राहील. ध्येय खूप उच्च आहे. भले कोणी चांगली-चांगली मुले आहेत तरीही काही ना काही चुका होतात जरूर कारण माया आहे ना. कर्मातीत तर कोणीही असू शकत नाही. कर्मातीत अवस्थेला शेवटी प्राप्त कराल तेव्हा सिव्हिल-आइज् (निर्विकारी दृष्टीवाले) होऊ शकता; तेव्हा मग ते रुहानी ब्रदर्ली लव (आत्मिक बंधुप्रेम) होते. आत्मिक बंधुप्रेम खूप चांगले असते, आणि मग विकारी दृष्टी नसते, तेव्हाच उच्च पद प्राप्त करू शकाल. बाबा एम ऑब्जेक्ट स्पष्ट करून सांगतात. मुले समजतात की माझ्यामध्ये हा-हा अवगुण आहे. रजिस्टर जेव्हा ठेवाल तेव्हाच आपल्यातील अवगुण देखील लक्षात येतील. होऊ शकते कोणी रजिस्टर न ठेवता देखील सुधारू शकतो. परंतु जे कच्चे आहेत त्यांनी रजिस्टर जरूर ठेवायला हवे. कच्चे तर बरेचजण आहेत, काहीजणांना तर लिहिता देखील येत नाही. तुमची अवस्था अशी असावी की इतर कोणाचीही आठवण येऊ नये. मी आत्मा शरीराशिवाय आले, आता अशरीरी बनून जायचे आहे. यावर एक गोष्ट आहे - तिने म्हटले, तुम्ही काठी सुद्धा घेऊ नका, नाहीतर शेवटी तिची देखील आठवण येईल. कोणत्याही वस्तूमध्ये आसक्ती ठेवायची नाही. बऱ्याचजणांची आसक्ती जुन्या वस्तूंमध्ये असते. बाबांव्यतिरिक्त इतर कशाचीही आठवण येऊ नये. किती उच्च ध्येय आहे. कुठे कवड्या आणि कुठे शिवबाबांची आठवण. मागण्याची इच्छा नसावी. प्रत्येकाने कमीतकमी ६ तास सेवा जरूर केली पाहिजे. तसे तर गव्हर्मेंटची सर्विस ८ तास असते परंतु पांडव गव्हर्मेंटची सर्विस कमीतकमी ५-६ तास अवश्य करा. विकारी मनुष्य कधीही बाबांची आठवण करू शकत नाहीत. सतयुगामध्ये आहे व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकार दुनिया). देवी-देवतांची महिमा गायली जाते - सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण तुम्हा मुलांची अवस्था किती उपराम असली पाहिजे. कोणत्याही खराब वस्तूमध्ये आसक्ती राहू नये. शरीरामध्ये देखील आसक्ती राहू नये, इतके योगी बनायचे आहे. जेव्हा असे खरे-खरे योगी असतील तर ते जसेकाही ताजेतवाने राहतील. जितके तुम्ही सतोप्रधान बनत जाल, तितका खुशीचा पारा चढत जाईल. ५ हजार वर्षांपूर्वी देखील अशी खुशी होती. सतयुगामध्ये देखील तीच खुशी असेल. इथे देखील खुशी राहील तर मग हीच खुशी सोबत घेऊन जाल. अन्त मती सो गति, म्हटले जाते ना. आताचे मत आहे, मग गति सतयुगामध्ये होईल. असे खूप विचार सागर मंथन करायचे असते.

बाबा तर आहेतच दुःख हर्ता, सुख कर्ता. तुम्ही जर म्हणता की, आम्ही बाबांची मुले आहोत तर कोणालाही दुःख देता कामा नये. सर्वांना सुखाचा मार्ग सांगितला पाहिजे. जर सुख देत नसाल तर जरूर दुःख द्याल. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, जेव्हा तुम्ही सतोप्रधान बनण्याकरीता पुरुषार्थ करता. पुरुषार्थी देखील नंबरवार असतात. जेव्हा मुले चांगली सेवा करतात तेव्हा बाबा त्यांची महिमा करतात - हा अमुक मुलगा योगी आहे. जी सेवाभावी मुले आहेत ती व्हाईसलेस लाइफ (निर्विकारी जीवनामध्ये) आहेत. ज्यांना जरासुद्धा वाईट असे-तसे विचार येत नाहीत तेच शेवटी कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतील. तुम्ही ब्राह्मणच सिव्हिल-आइज् (पवित्र दृष्टीवाले) बनत आहात. मनुष्याला कधीही देवता म्हटले जाऊ शकत नाही. जो विकारी दृष्टीवाला असेल तो नक्कीच पाप करेल. सतयुगी दुनिया पवित्र दुनिया आहे. ही आहे पतित दुनिया. याचा अर्थ देखील समजत नाहीत. जेव्हा ब्राह्मण बनतील तेव्हा समजतील. म्हणतात - ज्ञान तर खूप चांगले आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येईन. बाबा समजतात, हा तर कधीच येणार नाही. हा तर बाबांचा अपमान झाला. मनुष्या पासून देवता बनता तर तात्काळ केले पाहिजे ना. जर उद्यावर टाकाल तर माया नाकाला पकडून गटारात टाकेल. उद्या-उद्या म्हणत काळ खाऊन टाकेल. शुभ कार्यामध्ये उशीर करता कामा नये. काळ तर डोक्यावर उभा आहे. किती मनुष्य अचानक मरतात. आता बॉम्ब पडले तर किती मनुष्य मरतील! भूकंप होतो ना, तर आधी थोडाच आपल्या लक्षात येतो. ड्रामा अनुसार नैसर्गिक संकटे देखील येणार आहेत, जी कोणालाच कळू शकणार नाहीत. खूप नुकसान होते. मग गव्हर्मेंट रेल्वेचे भाडे इत्यादी देखील वाढवते. लोकांना तर प्रवास करून जावेच लागते. विचार करत राहतात - माणसाने कसे उत्पन्न वाढवावे जे देऊ शकेल. धान्य किती महाग झाले आहे. तर बाबा बसून समजावून सांगत आहेत की, सिव्हिल-आइज् असणाऱ्याला म्हणणार पवित्र आत्मा. ही तर दुनियाच क्रिमिनल-आइज् (विकारी दृष्टीवाली) आहे. तुम्ही आता सिव्हिल आइज् (पवित्र दृष्टीवाले) बनता. मेहनत आहे, उच्च पद प्राप्त करणे काही मावशीचे घर नाहीये (इतके सोपे नाहीये). जे खूप पवित्र दृष्टीवाले बनतील तेच उच्च पद प्राप्त करतील. तुम्ही तर इथे आले आहात नरा पासून नारायण बनण्यासाठी. परंतु जे पवित्र दृष्टीवाले बनत नाहीत, ज्ञान घेऊ शकत नाहीत, ते पद देखील कमी दर्जाचे मिळवतील. यावेळी सर्व मनुष्यांची आहे विकारी दृष्टी. सतयुगामध्ये असते पवित्र दृष्टी.

बाबा समजावून सांगत आहेत - गोड मुलांनो, तुम्ही देवी-देवता स्वर्गाचे मालक बनू इच्छिता तर खूप-खूप सिव्हिल-आइज् (पवित्र दृष्टीवाले) बना. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तेव्हा १०० टक्के सोल कॉन्शिअस (आत्म-अभिमानी) बनू शकाल. कोणालाही अर्थ समजावून सांगायचा आहे. सतयुगामध्ये पापाची कोणती गोष्टच असत नाही. ते आहेतच सर्वगुण संपन्न, संपूर्ण पवित्र दृष्टीवाले. चंद्रवंशीच्या देखील दोन कला कमी असतात. चंद्राची कला देखील शेवटी बारीक रेघ उरते. एकदम नाहीशी होत नाही. त्याला म्हणतील प्रायः लोप झाला. ढगांमध्ये दिसत नाही. तर बाबा म्हणतात - तुमची ज्योत देखील काही पूर्णच विझत नाही, काही ना काही प्रकाश उरतो. सुप्रीम बॅटरीकडून मग तुम्ही पॉवर घेता. स्वतः येऊन शिकवतात की, माझ्यासोबत तुम्ही कसे योग ठेवू शकता. टीचर शिकवतात तर बुद्धियोग टीचर सोबत असतो ना. टीचर जे मत देतील ते शिकतील. आपण देखील शिकून टीचर अथवा बॅरिस्टर बनणार, यामध्ये कृपा किंवा आशीर्वाद इत्यादीची गोष्टच असत नाही. डोके टेकविण्याची देखील गरज नाही. हो, जेव्हा कोणी हरी ॐ किंवा राम-राम करतात तर त्याला प्रतिसाद म्हणून तसे म्हणावे लागते. हा एक प्रकारे आदर द्यायचा असतो. अहंकार दाखवायचा नाही. तुम्ही जाणता आपल्याला तर एका बाबांचीच आठवण करायची आहे. कोणी भक्ती सोडतात तरी देखील हंगामा होतो. भक्ती सोडणाऱ्याला नास्तिक समजतात. त्यांच्या नास्तिक म्हणण्यामध्ये आणि तुमच्या म्हणण्यामध्ये किती फरक आहे. तुम्ही म्हणता, ते बाबांना जाणत नाहीत म्हणून नास्तिक, अनाथ आहेत, म्हणून सर्वजण भांडण-तंटा करत राहतात. घरा-घरामध्ये भांडण-अशांती आहे. क्रोधाची निशाणी आहे - अशांती. तिथे किती अपार शांती आहे. मनुष्य म्हणतात, भक्तीमध्ये खूप शांती मिळते, परंतु ती आहे अल्पकाळासाठी. सदाकाळासाठी शांती पाहिजे ना. तुम्ही मालका पासून अनाथ बनता तेव्हा मग शांतीमधून अशांतीमध्ये येता. बेहदचे बाबा बेहद सुखाचा वारसा देतात. हदच्या पित्याकडून हदचा सुखाचा वारसा मिळतो. तो वास्तविक आहे दुःखाचा, काम कटारीचा वारसा, ज्यामध्ये दुःखच दुःख आहे म्हणूनच बाबा म्हणतात - तुम्ही आदि-मध्य-अंत दुःख प्राप्त करता.

बाबा म्हणतात - मज पतित-पावन बाबांची आठवण करा; याला म्हटले जाते सहज आठवण आणि सहज ज्ञान, सृष्टी चक्राचे. तुम्ही स्वतःला आदि सनातन देवी-देवता धर्माचे समजाल तर जरूर स्वर्गामध्ये याल. स्वर्गामध्ये सर्व पवित्र दृष्टीवाले होते, देह-अभिमानी असणाऱ्याला विकारी दृष्टीवाला म्हटले जाते. पवित्र दृष्टीवाल्यांमध्ये कोणताही विकार नसतो. बाबा किती सोपे करून समजावून सांगतात परंतु मुलांना हे देखील लक्षात राहत नाही कारण विकारी दृष्टीवाले आहेत. त्यामुळे त्यांना मग खराब दुनियाच आठवत राहते. बाबा म्हणतात - या दुनियेला विसरून जा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) असे योगी बनायचे आहे जेणे करून शरीरामध्ये जरा देखील आसक्ती राहू नये. कोणत्याही खराब वस्तूमध्ये आसक्ती जाऊ नये, अशी उपराम अवस्था असावी. खुशीचा पारा चढलेला असावा.

२) काळ डोक्यावर उभा आहे त्यामुळे शुभ कार्यामध्ये उशीर करायचा नाही. उद्यावर टाकायचे नाही.

वरदान:-
चतुरसुजाण बाबांशी चतुराई करण्या ऐवजी जाणिवेच्या शक्तीद्वारे सर्व पापांपासून मुक्त भव

काही मुले चतुरसुजाण बाबांशी देखील चतुराई करतात - आपले काम सिद्ध करण्यासाठी, आपले नाव चांगले होण्यासाठी तेवढ्या वेळेपुरते जाणीव करतात परंतु त्या जाणिवेमध्ये शक्ती नसते त्यामुळे परिवर्तन होत नाही. बरेचजण असे आहेत जे समजतात की हे योग्य नाही आहे परंतु विचार करतात कुठे आपले नाव खराब होऊ नये म्हणून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा खून करतात, हे देखील पापाच्या खात्यामध्ये जमा होते म्हणून हुशारी सोडून अंतःकरणापासून खऱ्या जाणिवेद्वारे स्वतःला परिवर्तन करून पापांपासून मुक्त बना.

बोधवाक्य:-
जीवन जगत असताना विविध बंधनांपासून मुक्त राहणे हिच जीवनमुक्त स्थिती आहे.