04-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बंधनमुक्त बनून सेवेमध्ये तत्पर रहा, कारण याच सर्विसमध्ये खूप श्रेष्ठ कमाई आहे, २१ जन्मांसाठी तुम्ही वैकुंठाचे मालक बनता”

प्रश्न:-
प्रत्येक मुलाने कोणती सवय लावली पाहिजे?

उत्तर:-
मुरलीच्या पॉइंटवर समजावून सांगण्याची. ब्राह्मणी (टीचर) जर कुठे गेली तर आपसामध्ये मिळून क्लास चालविला पाहिजे. जर मुरली चालविणे शिकला नाहीत तर आपसमान कसे बनवाल. ब्राह्मणी नसेल तर गोंधळून जाता कामा नये. अभ्यास तर सोपा आहे. क्लास करत रहा, ही देखील प्रॅक्टिस करायची आहे.

गीत:-
मुखड़ा देख ले प्राणी…

ओम शांती।
मुले जेव्हा ऐकतात तर स्वतःला आत्मा निश्चय करून बसावे आणि हा निश्चय करावा की पिता परमात्मा आम्हाला ऐकवत आहेत. हे डायरेक्शन अथवा मत एक बाबाच देतात. त्यालाच श्रीमत म्हटले जाते. श्री अर्थात श्रेष्ठ ते श्रेष्ठ. ते आहेत बेहदचे पिता, ज्यांना सर्वश्रेष्ठ भगवान म्हटले जाते. अशी बरीच माणसे आहेत जी त्या प्रेमाने परमात्म्याला पिता समजत देखील नाहीत. भले शिवाची भक्ती करतात, खूप प्रेमाने आठवण करतात परंतु लोकांनी म्हटले आहे की सर्वांमध्ये परमात्मा आहे, तर ते प्रेम कोणावर करतील त्यामुळे बाबांशी विपरीत-बुद्धी झाले आहेत. भक्तीमध्ये जेव्हा कोणते दुःख किंवा आजार इत्यादी होतो तर प्रेम दर्शवितात. म्हणतात भगवान रक्षा करा. मुले जाणतात गीता आहे श्रीमत भगवंताच्या मुखाद्वारे गायलेली. दुसरे कोणतेही असे शास्त्र नाही ज्यामध्ये भगवंताने राजयोग शिकवला असेल अथवा श्रीमत दिले असेल. एकच भारताची गीता आहे, ज्याचा प्रभाव देखील खूप आहे. केवळ एक गीताच भगवंताद्वारे गायली गेली आहे, भगवान म्हटल्याने एक निराकारकडेच दृष्टी जाते. बोटाने इशारा वरच्या दिशेने करतील. श्रीकृष्णासाठी असे कधी म्हणणार नाहीत कारण तो तर देहधारी आहे ना. तुम्हाला आता त्यांच्याशी (शिवबाबांशी) असलेल्या नात्याविषयी ठाऊक झाले आहे; म्हणून म्हटले जाते बाबांची आठवण करा, त्यांच्याशी प्रीत ठेवा. आत्मा आपल्या पित्याची आठवण करते. आता ते भगवान मुलांना शिकवत आहेत. तर तो नशा खूप चढला पाहिजे आणि तो देखील कायमचा चढला पाहिजे. असे नाही ब्राह्मणी समोर आहे तर नशा चढेल, ब्राह्मणी नसेल तर नशा उडेल. बस्स, ब्राह्मणी असल्या शिवाय आम्ही क्लास करू शकत नाही. काही-काही सेंटर्ससाठी बाबा म्हणतात - जर कुठून ५-६ महिन्यासाठी जरी ब्राह्मणी निघून गेली तरी आपसामध्ये सेंटर सांभाळतात कारण अभ्यास तर सोपा आहे. बरेच जण तर ब्राह्मणी शिवाय जणू काही आंधळे-लुळे होतात. ब्राह्मणी निघून गेली तर सेंटरला जाणे सोडून देतील. अरे, खूप जण बसला आहात, क्लास चालवू शकत नाही. दुनियेमध्ये जेव्हा गुरु बाहेरगावी जातात तर त्यांच्या मागे त्यांचे चेले सांभाळतात ना. मुलांना सेवा करायची आहे. स्टुडंटमध्ये नंबरवार तर असतातच. बापदादा जाणतात फर्स्टक्लास असणाऱ्याला कुठे पाठवायचे आहे. इतकी वर्षे मुले शिकली आहेत, थोडी तरी धारणा झाली असेल जेणेकरून आपसामध्ये मिळून सेंटरला चालवतील. मुरली तर मिळतेच. पॉईंटच्या आधारावरच समजावून सांगतात. ऐकण्याची सवय लागली मग ऐकवण्याची सवय लागत नाही काय?. आठवणीमध्ये राहिले तर धारणा देखील होईल. सेंटरवर असे कोणीतरी असले पाहिजेत जे म्हणतील - ब्राह्मणी जात आहे, ठीक आहे, आम्ही सेंटर सांभाळतो. बाबांनी ब्राह्मणीला सेवेसाठी कुठे चांगल्या सेंटरवर पाठवले आहे. ब्राह्मणी नसेल तर गोंधळून जाता कामा नये. ब्राह्मणी सारखे बनला नाहीत तर बाकीच्यांना आप समान कसे बनवाल, प्रजा कशी बनवाल. मुरली तर सर्वांना मिळते. मुलांना आनंद झाला पाहिजे की आपण संदलीवर बसून मुरली समजावून सांगावी. प्रॅक्टिस केल्याने सेवा योग्य बनू शकता. बाबा विचारतात - सेवायोग्य बनले आहात? तर असे कोणीही निघत नाहीत. सेवेसाठी सुट्टी घेतली पाहिजे. जिथे पण सेवेसाठी बोलावणे येईल तिथे सुट्टी घेऊन गेले पाहिजे. जी बंधनमुक्त मुले आहेत ती अशी सेवा करू शकतात. त्या गव्हर्मेंटपेक्षा तर या गव्हर्मेंटची कमाई अति श्रेष्ठ आहे. भगवान शिकवत आहेत, ज्याद्वारे तुम्ही २१ जन्मांसाठी वैकुंठाचे मालक बनता. किती भारी कमाई आहे, त्या (लौकिक) कमाईतून काय मिळणार? अल्पकाळाचे सुख. इथे तर विश्वाचे मालक बनता. ज्यांना पक्का निश्चय असेल ते तर म्हणतील आम्ही याच सेवेमध्ये लागतो. परंतु पूर्ण नशा पाहिजे. बघायचे आहे आपण कोणाला ज्ञान समजावून सांगू शकतो! आहे खूप सोपे. कलियुगाच्या अंताला इतके करोडो मनुष्य आहेत, सतयुगामध्ये जरूर थोडे असतील. त्याच्या (सतयुगाच्या) स्थापनेसाठी जरूर बाबा संगमावरच येतील. जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. महाभारत लढाई देखील प्रसिद्ध आहे. ही लागतेच तेव्हा जेव्हा की स्वयं भगवान येऊन सतयुगासाठी राजयोग शिकवून राजांचाही राजा बनवतात. कर्मातीत अवस्थेला प्राप्त करवितात. म्हणतात - देहा सहित देहाचे सर्व संबंध सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पापे नष्ट होत जातील. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे - हीच मेहनत आहे. योगाचा अर्थ एकही मनुष्य जाणत नाही.

बाबा समजावून सांगत आहेत - भक्तीमार्ग देखील ड्रामामध्ये नोंदलेला आहे. भक्तीमार्ग चालणारच आहे. खेळ बनलेला आहे - ज्ञान, भक्ती, वैराग्य. वैराग्य देखील दोन प्रकारचे असते. एक आहे हदचे वैराग्य, दुसरे आहे हे बेहदचे वैराग्य. आता तुम्ही मुले साऱ्या जुन्या दुनियेला विसरण्याचा पुरुषार्थ करता कारण तुम्ही जाणता आपण आता शिवालय, पावन दुनियेमध्ये जात आहोत. तुम्ही सर्व ब्रह्माकुमार-कुमारी भाऊ-बहीणी आहात. विकारी दृष्टी जाऊ शकत नाही. आजकाल तर सर्वांची दृष्टी क्रिमिनल (विकारी) झाली आहे. तमोप्रधान आहेत ना. याचे नावच आहे नरक परंतु स्वतःला नरकवासी थोडेच समजतात. स्वतःचा परिचयच नाही तर म्हणतात - स्वर्ग-नरक इथेच आहे. ज्याच्या मनामध्ये जे आले ते बोलून टाकले. हा काही स्वर्ग नाहीये. स्वर्गामध्ये तर किंगडम (राजाई) होती. रिलीजस, राइटियस (धार्मिक आणि नीतिमान) होते. किती ताकद होती. आता पुन्हा तुम्ही पुरुषार्थ करत आहात. विश्वाचे मालक बनाल. इथे तुम्ही येताच मुळी विश्वाचे मालक बनण्यासाठी. हेवनली गॉड फादर ज्यांना शिव परमात्मा म्हटले जाते, ते तुम्हाला शिकवत आहेत. मुलांना किती अभिमान वाटला पाहिजे. एकदम सोपे नॉलेज आहे. तुम्हा मुलांमध्ये ज्या पण जुन्या सवयी आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत. इर्षेची सवय देखील खूप नुकसान करते. तुमचे सर्व काही मुरलीवर आधारित आहे, तुम्ही कोणालाही मुरलीवर समजावून सांगू शकता. परंतु आतून इर्षा असते - ही काही ब्राह्मणी थोडीच आहे, हीला काय माहिती. बस्स, दुसऱ्या दिवशी येणारच नाहीत. अशा काही जुन्या सवयी लागलेल्या आहेत, ज्यामुळे डिससर्व्हीस देखील होते. नॉलेज तर खूप सोपे आहे. कुमारींना तर काही धंदा इत्यादी सुद्धा करायचा नाहीये. त्यांना विचारले जाते - ते शिक्षण चांगले की हे शिक्षण चांगले? तर म्हणतात - हे शिक्षण खूप चांगले आहे. बाबा, आता आम्ही ते शिक्षण शिकणार नाही. मन लागत नाही. लौकिक पिता ज्ञानामध्ये नसेल तर ती मार खाईल. मग काही मुली कमजोर देखील असतात. समजावून सांगितले पाहिजे ना - या शिक्षणाने आम्ही महाराणी बनणार. त्या शिक्षणाने काय पाई-पैशाची नोकरी करू. हे शिक्षण तर भविष्य २१ जन्मांसाठी स्वर्गाचा मालक बनवते. प्रजा देखील स्वर्गवासी तर बनते ना. आता सर्व आहेत नरकवासी.

आता बाबा म्हणतात - तुम्ही सर्व गुण संपन्न होता. आता तुम्हीच किती तमोप्रधान बनले आहात. शिडी उतरत आला आहात. भारत ज्याला सोन्याची चिडिया म्हणत होते, आता तर दगडाची देखील राहिलेली नाहीये. भारत शंभर टक्के सॉल्व्हेंट (पवित्र) होता. आता शंभर टक्के इनसॉल्व्हेंट (अपवित्र) आहे. तुम्ही जाणता - आपण विश्वाचे मालक पारसनाथ होतो. मग ८४ जन्म घेत-घेत आता पत्थरनाथ बनलो आहोत. आहोत तर मनुष्यच परंतु ‘पारसनाथ’ आणि ‘पत्थरनाथ’ म्हटले जाते. गाणे देखील ऐकले - स्वतः(हा)मध्ये डोकावून पहा आपण कितपत लायक आहोत. नारदाचे उदाहरण आहे ना. दिवसें-दिवस अधोगती होतच जाते. अधोगती होत-होत एकदम दलदलीमध्ये गळ्यापर्यंत अडकले आहेत. आता तुम्ही ब्राह्मण सर्वांना शेंडीला पकडून दलदली मधून बाहेर काढता. पकडण्यासाठी दुसरी कोणती जागा पण नाहीये. तर शेंडीला पकडणे सोपे आहे. दलदली मधून बाहेर काढण्यासाठी शेंडीला पकडावे लागते. दलदलीमध्ये असे काही अडकले आहेत काही विचारूच नका. भक्तीचे राज्य आहे ना. आता तुम्ही म्हणता - ‘बाबा, कल्पापूर्वी देखील आम्ही तुमच्याकडे राज्यभाग्य प्राप्त करण्यासाठी आलो होतो’. लक्ष्मी-नारायणाची मंदिरे भले बनवत राहतात परंतु त्यांना हे माहित नाहीये की हे विश्वाचे मालक कसे बनले. आता तुम्ही किती हुशार बनले आहात. तुम्ही जाणता यांनी राज्यभाग्य कसे प्राप्त केले. मग ८४ जन्म कसे घेतले. बिर्ला किती मंदिरे बांधतात. जणू काही बाहुल्या बनवतात. त्या (खेळण्यातल्या) छोट्या-छोट्या बाहुल्या आणि या (मंदिरातील मुर्त्या) मग मोठ्या बाहुल्या बनवतात. मुर्त्या बनवून पूजा करतात. त्यांचे ऑक्युपेशन (जीवन-चरित्र) न जाणणे म्हणजे तर बाहुल्यांची पूजा झाली ना. आता तुम्ही जाणता बाबांनी आपल्याला किती श्रीमंत बनवले होते, आता किती गरीब बनलो आहोत. जे पूज्य होते, ते आता पुजारी बनले आहेत. भक्त लोक भगवंतासाठी म्हणतात - ‘आपेही पूज्य आपेही पुजारी’. तुम्हीच सुख देता, तुम्हीच दुःख देता. सर्व काही तुम्हीच करता. बस्स, यामध्येच हरवून जातात. म्हणतात आत्मा निर्लेप आहे, काहीही खा-प्या, मजा करा, शरीराला लेप-छेप लागतो, तो गंगा स्नान केल्याने शुद्ध होईल. जे पाहिजे ते खा, काय-काय फॅशन आहे. बस्स, ज्याने जो पायंडा घातला तोच चालू लागतो. आता बाबा समजावून सांगतात विषय सागरामधून शिवालयामध्ये चला. सतयुगाला क्षीरसागर म्हटले जाते. हा आहे विषय सागर. तुम्ही जाणता आपण ८४ जन्म घेत पतित बनलो आहोत, तेव्हाच तर पतित-पावन बाबांना बोलावतो. चित्रांद्वारे समजावून सांगितले जाते जेणेकरून लोकांना सहज समजेल. शिडीच्या चित्रामध्ये पूर्ण ८४ जन्मांचा वृत्तांत आहे. इतकी सोपी गोष्ट देखील कोणाला समजावू शकत नसाल तर बाबा समजतील नीट अभ्यास करत नाहीत. उन्नती करत नाहीत.

तुम्हा ब्राह्मणांचे कर्तव्य आहे - भ्रामरीप्रमाणे किड्यांना भूं-भूं करून आप समान बनविणे. आणि तुमचा पुरुषार्थ आहे - सापाप्रमाणे जुने शरीर सोडून नवीन घेण्याचा. तुम्ही जाणता हे जुने सडलेले शरीर आहे, याला सोडायचे आहे. ही दुनिया देखील जुनी आहे. शरीर देखील जुने आहे. हे सोडून आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. तुमचे हे शिक्षण आहेच नवीन दुनियेकरिता. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. समुद्राच्या एकाच लाटेने सर्व काही उध्वस्त होईल. विनाश तर होणारच आहे ना. नैसर्गिक आपत्ती कोणालाही सोडत नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आतमध्ये ईर्षा इत्यादीची जी जुनी सवय आहे, त्याला सोडून आपसामध्ये खूप प्रेमाने मिळून मिसळून रहायचे आहे. इर्षे पायी शिक्षण सोडायचे नाही.

२) या जुन्या सडलेल्या शरीराचे भान सोडायचे आहे. भ्रामरीप्रमाणे ज्ञानाची भू-भू करून किड्यांना आप समान बनविण्याची सेवा करायची आहे. याच रूहानी धंद्यामध्ये लागायचे आहे.

वरदान:-
मन्सा बंधनांपासून मुक्त, अतींद्रिय सुखाची अनुभूती करणारे मुक्ती दाता भव अतींद्रिय सुखामध्ये झोके घेणे - ही संगमयुगी ब्राह्मणांची विशेषता आहे. परंतु मन्सा संकल्पांचे बंधन आंतरिक खुशी आणि अतींद्रिय सुखाचा अनुभव करू देत नाही. व्यर्थ संकल्प, ईर्षा, निष्काळजीपणा अथवा आळशीपणा अशा संकल्पांच्या बंधनामध्ये अडकणे हेच मनसा बंधन आहे, अशी आत्मा देह-अभिमानाच्या अधीन होऊन दुसऱ्यांच्याच दोषाबद्दल विचार करत राहते, तिची महसूसतेची (जाणीव करण्याची) शक्ती नष्ट होते, त्यामुळे या सूक्ष्म बंधनातून मुक्त व्हा तेव्हाच मुक्ती दाता बनू शकाल.

बोधवाक्य:-
आनंदाच्या खाणीने असे संपन्न रहा जेणेकरून तुमच्याकडे दुःखाची लाट सुद्धा येणार नाही.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:- कोणत्याही श्रेष्ठ संकल्प रुपी बिजाला फलीभूत करण्याचे एकच सोपे साधन आहे ते आहे - नेहमी बीजरूप बाबांकडून प्रत्येक वेळी सर्व शक्तींचे बळ त्या बिजामध्ये भरत राहणे. बिजरूप द्वारा तुमचे संकल्प रुपी बीज सहजच आणि स्वतः वृद्धीला प्राप्त होत फलीभूत होईल. संकल्प शक्ती जमा होईल.