04-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबांचा राईट हँड बनायचे असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये राइटीयस (नीतिमान) बना, सदैव श्रेष्ठ कर्म करा”

प्रश्न:-
कोणता संस्कार सेवेमध्ये खूप विघ्न आणतो?

उत्तर:-
भाव-स्वभावामुळे आपसामध्ये जे द्वैत मतांचे संस्कार (परस्परविरोधी विचार) असतात, ते सेवेमध्ये खूप विघ्न आणतात. दोन मतांमुळे खूप नुकसान होते. क्रोधाचे भूत असे आहे, जे भगवंताशीही सामना करायला वेळ लावणार नाही. म्हणून बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, असा कोणताही संस्कार असेल तर तो काढून टाका’.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ...

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले. रुहानी मुले अर्थात शिवबाबा जे सुप्रीम रूह आहेत, त्यांच्या मुलांनी अर्थात आत्म्यांनी शरीर रूपी कर्मेंद्रियांद्वारे गाणे ऐकले. आता तर मुलांना आत्म-अभिमानी बनायचे आहे. यामध्ये खूप मेहनत देखील आहे. वारंवार स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. ही आहे गुप्त मेहनत. बाबा देखील गुप्त आहेत, तर मेहनत देखील गुप्त करवून घेतात. बाबा स्वतः येऊन सांगतात - मुलांनो, माझी आठवण करा तर कल्पाच्या ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे पुन्हा सतोप्रधान बनाल. मुले समजतात, आपणच सतोप्रधान होतो आणि आपणच आता तमोप्रधान बनलो आहोत. सतोप्रधान जरूर बनायचे आहे. गाण्यामध्ये देखील म्हणतात, भाग्य जे गमावले आहे ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करवून घेणारे एकमेव सर्वशक्तिमान बाबा आहेत, कारण ते सर्वांना पावन बनवतात ना. बाबा, मुलांना समजावून सांगत आहेत - ‘माझ्या रुहानी मुलांनो, आता तुम्ही भाग्य बनविण्यासाठी आला आहात’. स्टुडंट्स शाळेमध्ये भाग्य बनविण्यासाठी जातात ना. ती तर लहान मुले असतात. तुम्ही लहान नाहीत, तुम्ही तर मोठे वयस्कर आहात. भाग्य बनवत आहात. होय, काही जण खूप वृद्ध देखील आहेत. म्हातारपणी शिकण्यापेक्षा तरुणपणी शिक्षण घेणे चांगले असते, तरुणपणी बुद्धी अधिक तीक्ष्ण असते. हे तर सर्वांकरिता अतिशय सोपे आहे. तुमचे शरीर तर मोठे आहे ना. हे लहान बाळ आहे, ते इतके समजू शकणार नाही, कारण ऑर्गन्स लहान आहेत. निंदा-स्तुती, सुख-दुःख या गोष्टींना तुम्ही समजू शकता. आत्मा तर बिंदू आहे. शरीराची वाढ होत राहते. आत्मा तर कायम एकसारखीच असते. ती कधीही लहान-मोठी होत नाही. त्या आत्म्याच्या बुद्धी करिता बाबा कस्तुरी प्रमाणे सौगात देत आहेत, कारण आता तर बुद्धी पूर्णपणे तमोप्रधान बनली आहे. तीच आता स्वच्छ (पावन) देखील बनत आहे. ही चित्रे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी खूप उपयोगी पडतात. भक्तिमार्गामध्ये देवतांसमोर जाऊन डोके टेकवतात, पूजा करतात. पूर्वी तुम्ही देखील अंधश्रद्धेने जात होता. ‘शिव’च्या मंदिरामध्ये जात होता, तुम्हाला हे थोडेच ठाऊक होते की, हे शिवबाबा आहेत. बाबांकडून जरूर वारसा मिळाला आहे, तेव्हाच तर त्यांची महिमा गायली जाते. कोणी चांगले कार्य करून जातात तर त्यांची महिमा गायली जाते. स्टॅम्प तर बनवला पाहिजे शिवबाबांचा. ‘शिवबाबा गीता सर्मोनाइजर....(शिवबाबा गीता धर्मोपदेशक)’ असा स्टॅम्प सहज बनू शकतो. ते बाबा सर्वांना सुख देणारे आहेत. बाबा म्हणतात - मी तुम्हाला सुखधामचा मालक बनविणारा आहे. वृद्ध माता देखील एवढे तर समजत असतील की, आपण शिवबाबांकडे आलो आहोत. जे विचित्र आहेत, त्यांनी या चित्रामध्ये (शरीरामध्ये) प्रवेश केला आहे. निराकाराला ‘विचित्र’ म्हटले जाते. बुद्धीमध्ये असते की, आम्ही शिवबाबांकडे जात आहोत, ज्यांनी हे टेम्पररी चित्र (तात्पुरते शरीर) धारण केले आहे. ते पतितांना पावन बनवून मुक्ती-जीवनमुक्ती देतात अथवा शांतीधाम आणि सुखधामचे रहिवासी बनवतात. मनुष्य शांती करिताच खूप प्रयत्न करतात. भगवान भेटले तर शांती मिळेल, सुखा करिता पुरुषार्थ करत नाहीत. बस्स, बाबांकडे घरी जावे, भगवान भेटावेत. या वेळी सर्व जण मुक्तीची इच्छा ठेवणारे आहेत. जीवनमुक्ती प्राप्त करणारे फक्त तुम्ही ब्राह्मणच आहात. बाकी सर्व जण मुक्तीची इच्छा ठेवणारे आहेत. जीवनमुक्तीचा मार्ग सांगणारा कोणीही नाही. संन्यासी इत्यादींकडे जाऊन शांती मागतात. म्हणतात - ‘मनाची शांती कशी मिळेल?’ मार्ग सांगणारे जे काही आहेत, ते आहेतच मुक्तीमध्ये जाणारे. मोक्ष काय असतो, हे देखील त्यांच्या बुद्धीमध्ये येत नाही. वैतागून म्हणतात - ‘मुक्तीमध्ये गेलो तर चांगले होईल’. वास्तविक मुक्तीधाम आहे आत्म्यांच्या राहण्याचे स्थान. इतक्या साऱ्या सेंटर्स वर मुले आहेत, सर्वजण जाणतात की, आपण नवीन दुनिये करिता राज्य-भाग्य घेत आहोत. बाबा आम्हाला नवीन दुनियेचे राज्य देत आहेत. कुठे देतील? नवीन दुनियेमध्ये देतील की जुन्या दुनियेमध्ये देतील? बाबा म्हणतात - मी संगमावर येतो. मी ना सतयुगामध्ये येतो, ना कलियुगामध्ये येतो. दोन युगांच्या मधल्या काळामध्ये येतो. बाबा तर सर्वांना सद्गती देतील ना. असे तर होऊ शकत नाही की, दुर्गतीमध्येच सोडून जातील. सद्गती आणि दुर्गती एकत्र राहू शकत नाहीत. मुले जाणतात, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे, म्हणून तिच्याविषयी प्रेम बाळगायचे नाही. बुद्धी म्हणते, बरोबर आता आपण संगमयुगावर आहोत. ही दुनिया परिवर्तित होणार आहे. आता बाबा आलेले आहेत. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प संगमावर येतो. तुम्हाला दुःखातून सोडवून हरिच्या द्वारी घेऊन जातो. ही ज्ञानाची गोष्ट आहे. हरिद्वार, कृष्णाचे द्वार अर्थात कृष्णपुरीला म्हटले जाते. ठीक आहे, त्याच्या मागे मग लक्ष्मण झुला लावला आहे. अगोदर हरि-द्वार येईल. सतयुगाला हरि-द्वार म्हटले जाते. नंतर मग राम-लक्ष्मण इत्यादी दाखवतात. अशी कोणती गोष्टच नाहीये. ती तर बनवलेली गोष्ट आहे. रामाला किती भाऊ दाखवले आहेत! चार भाऊ तर असतच नाहीत. ४-८ भाऊ तर इथे असतात. एका बाजूला आहे ईश्वरीय संतान, आणि दुसऱ्या बाजूला आहे आसुरी संतान.

आता तुम्ही जाणता की, शिवबाबा ब्रह्माच्या तनामध्ये आले आहेत. शिव आहेत - ‘बाबा’, ब्रह्मा आहेत - ‘दादा’, प्रजापिता आहेत. त्या आत्म्यांचे अस्तित्व तर अनादि आहे, या वेळी ते ब्राह्मणांना रचतात. असे नाही की, शिवबाबा शाळीग्रामांना रचतात. नाही, शाळीग्राम तर अविनाशी आहेतच. फक्त बाबा येऊन पवित्र बनवतात. जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही, तोपर्यंत शरीर पवित्र कसे बरे बनू शकेल? आपण आत्मे जेव्हा पवित्र होतो, तेव्हा सतोप्रधान होतो. आता अपवित्र तमोप्रधान आहोत, तर पुन्हा सतोप्रधान कसे बनायचे? ही गोष्ट तर सहज समजण्यासारखी आहे. तुम्ही या वेळी भेसळ पडल्यामुळे पतित तमोप्रधान बनला आहात. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. हिशोब चुकता करून सर्वजण शांतीधाम अथवा सुखधाममध्ये येतील. निराकारी घरामधून आत्मे कसे येतात, त्याची आठवण म्हणून ख्रिश्चन लोक झाडाला छोटे बल्ब लावून साजरे करतात. तुम्ही जाणता, या सर्व धर्मांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. तिथून आत्मे नंबरवार कसे खाली उतरतात, हे नॉलेज तुम्हाला मिळाले आहे. आम्हा आत्म्यांचे घर शांतीधाम आहे. आता संगम आहे. तिथून सर्व आत्मे येतील आणि नंतर सर्वजण परत जातील. प्रलय काही होणार नाहीये. तुम्ही जाणता, आम्ही बाबांकडून भाग्य घडविण्यासाठी, पुन्हा स्वराज्य घेण्यासाठी आलो आहोत. हे काही फक्त म्हणण्यापुरते नाहीये. आठवणी द्वारेच वारसा मिळेल. बाबा म्हणतात - देहासहित देहाचे जे काही मित्र-नातलग इत्यादी आहेत, त्या सर्वांना विसरून जा. चित्र आणि विचित्र आहेत ना. ‘विचित्र’ त्यांना म्हटले जाते ज्यांना या डोळ्यांनी पाहू शकत नाही. या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. आत्मा किती सूक्ष्म आहे. तिला वारंवार पार्ट बजावावा लागतो; इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये अशा गोष्टीच नाहीत. सर्वप्रथम तर बुद्धीमध्ये हे पक्के करायचे आहे की, आपण आत्मा आहोत आणि ते आपले बाबा आहेत. त्यांचीच ‘पतित-पावन’, ‘हे भगवान’ असे म्हणून आठवण करतात. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. तर आठवण देखील एकाचीच केली पाहिजे ना. भगवंताची आठवण करतात, तर जरूर त्यांच्याकडून काही तरी मिळणार असेल. मग दारोदार धक्के का खात आहात! भगवंताला तर परमधाम मधून यावे लागेल ना. आपण तर जाऊ शकत नाही, कारण आपण पतित आहोत. पतित तिथे जाऊ शकत नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटते. भक्तिमार्गाचा पार्ट किती वंडरफुल आहे. एका भगवंताचीच आठवण करतात - ‘हे ईश्वरा, हे परमपिता, ओ गॉड फादर.’ जर का ते एकच आहेत, तर मग दुसरीकडे धक्के का खात आहात! ते एकच, वर (परमधाममध्ये) राहतात. परंतु हे सर्व नोंदलेले आहे, ड्रामा अनुसार बेहद-निर्बुद्धपणे भक्ती करतात. आता तुम्ही मग बेहद-बुद्धिमान बनत आहात. श्रीमतावर चालणारेच समजदार (बुद्धिमान) बनतात. ते मग लपून राहू शकत नाहीत, ते सदैव श्रेष्ठाचारी कर्मच करतील. बाबा म्हणतात - आम्ही दुःख हर्ता, सुख कर्ता आहोत, तर मुलांनी देखील किती गोड बनायला हवे. बाबांचा राईट हँड बनले पाहिजे. अशी मुलेच बाबांना प्रिय वाटतात. राईट हँड असतो ना. तुम्हाला माहीत आहे, लेफ्ट हँडने इतके काम करू शकत नाही, कारण राईट हँड राइटीयस (श्रेष्ठ कार्य) करत असल्यामुळेच शुभ कार्यामध्ये या राईट हँडचाच वापर केला जातो. पूजा नेहमी राईट हँडने करतात. बाबा म्हणतात - प्रत्येक गोष्टीमध्ये राइटीयस (श्रेष्ठाचारी) बना. बाबा भेटले आहेत, तर आनंद झाला पाहिजे. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, तर मग ‘अंत मति सो गति’ होईल. मत आणि गत अथवा गति करण्याची मत एकच आहे. गायले देखील जाते - ‘ईश्वराची गत-मत ईश्वरच जाणे’. पतित-पावन तेच आहेत. ते जाणतात की, मी मनुष्यांना पावन बनवून दुर्गती मधून सद्गतीकडे कसे घेऊन जाईन. भक्तिमार्गामध्ये किती मेहनत करतात, परंतु सद्गती काही होत नाही. काहीही फळ मिळत नाही. सद्गती देणारे तर एक बाबाच आहेत. भक्तीमध्ये जो ज्या भावनेने पूजा करतो, त्याला फळ देणारा मीच आहे. ते देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे, त्यांना आपल्या पुरुषार्थाने आपोआप मिळते. आता पवित्र देखील मुलांना आपल्या पुरुषार्थानेच बनायचे आहे. बाबा म्हणतात - ‘गोड-गोड बाबांची आठवण करा. तेच सर्वशक्तिमान, ऑलमाइटी ऑथॉरिटी तुम्हाला किती चांगले बनवतात. तुम्ही सर्व काही जाणले आहे आणि आता बाबांकडून वारसा घेत आहात. रचयिता आणि रचनेचे नॉलेज तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही जाणता, हे नॉलेज पूर्वी आपल्यामध्ये नव्हते. यज्ञ-तप इत्यादी करणे, शास्त्रे इत्यादी ऐकणे - हे आहे शास्त्रांमधील नॉलेज. त्याला भक्ती म्हटले जाते. त्यामध्ये (भक्तीमध्ये) कोणतेही एम-ऑब्जेक्ट नाही. शिक्षणामध्ये एम-ऑब्जेक्ट असते. कोणत्या ना कोणत्या प्रकारचे नॉलेज असते. आपल्याला पतितापासून पावन बनण्याचे नॉलेज पतित-पावन बाबांनी दिले आहे. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज बाबांनी दिले आहे. हे सृष्टी चक्र कसे फिरते, यामध्ये सर्व ॲक्टर्स पार्टधारी आहेत. हे अनादि नाटक पूर्व-नियोजित आहे. हे बेहदचे नॉलेज तर जरूर असले पाहिजे.

तुम्ही मुले जाणता, आता आपण घोर अंधारातून निघून लख्ख प्रकाशामध्ये जात आहोत. तुम्ही आता देवता बनत आहात. हे देखील समजावून सांगायचे आहे की, आदि सनातन तर देवी-देवता धर्म आहे, ज्याला ‘हिंदू धर्म’ असे म्हटले आहे. हळूहळू ही गोष्ट देखील समजतील. मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे. याकरिता तर भरपूर मुले पाहिजेत. दिल्लीमध्ये कॉन्फरन्स करावी लागेल. परिस्तान देखील दिल्लीला म्हटले जाते. हाच यमुनेचा तीर होता, दिल्ली राजधानी आहे. ती अनेकांच्या हाती आली आहे (अनेकांनी तिथे राज्य केले आहे) देवतांची राजधानी देखील हीच होती. दिल्लीमध्ये खूप मोठी कॉन्फरन्स झाली पाहिजे, परंतु माया अशी आहे, जी करू देत नाही. खूप विघ्ने आणते. आजकाल भाव-स्वभाव देखील खूप झाले आहेत ना. मुलांनी आपसामध्ये एकत्र येऊन सेवेला लागायचे आहे. ते (दुनियावाले) लोक देखील आपसामध्ये एकत्र येऊन भेटत राहत नाहीत, त्यामुळे राजाईच नष्ट होते; दोन गट होतात, तर मग राष्ट्रपतीला देखील पदावरून दूर करतात. द्वैत-मत खूप नुकसान करते. मग भगवंताचाही सामना करायला वेळ लावत नाही. खूप नुकसान देखील होते. क्रोधाचे भूत आले मग तर काही विचारूच नका, म्हणून बाबा म्हणतात - ‘गुड़ जाने गुड़ की गोथरी जाने’ (गूळ जाणे आणि गुळाची गोणी जाणे). बाबा मुलांना सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज सांगत आहेत. आता कोणी धारणा करो अथवा न करो, ते पुरुषार्थावर अवलंबून आहे. असे नाही की, बाबा काही आशीर्वाद अथवा कृपा करतील. यामध्ये कृपा इत्यादी मागण्याचा प्रश्नच नाही. प्रेरणेद्वारे जर योग आणि ज्ञान शिकवायचे असते, तर मग बाबा म्हणतात, ‘मी या घाणेरड्या दुनियेमध्ये आलोच कशाला असतो?’ ‘प्रेरणा’, ‘आशीर्वाद’ हे सर्व भक्तिमार्गातील शब्द आहेत. इथे पुरुषार्थ करावा लागतो, प्रेरणेची गोष्ट नाहीये. तुम्हाला तीन इंजिने एकत्र मिळाली आहेत. तिथे तर पिता वेगळा, शिक्षक वेगळा मिळतो आणि गुरू शेवटी मिळतो. इथे तर हे तिघेही एकत्र आहेत. बाबा म्हणतात - मी तुम्हाला पूज्य बनवतो, तुम्ही पुन्हा पुजारी बनाल. खूप युक्तीने समजावून सांगायचे आहे. असे होऊ नये की, कोणी बेशुद्ध होईल. सर्वप्रथम मुख्य आहे दोन पित्यांची गोष्ट. भगवान, पिता आहेत. त्यांचा जन्म, शिवजयंती देखील इथेच साजरी करतात. जरूर ते स्वर्गाचा मालक बनवत असतील. भारतामध्येच स्वर्ग होता. आता नरकाच्या विनाशा करिता महाभारत युद्ध समोर उभे आहे. जरूर बाबाच नवीन दुनियेची स्थापना करणारे देखील आहेत. बाबांच्या श्रीमतावरच आम्ही म्हणतो की, ‘भारताला आम्ही पावन बनवूनच सोडू’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जसे बाबा दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत, तसे पित्यासमान बनायचे आहे. अतिशय गोड बनायचे आहे. सदैव शुभ कर्म करून राईट हँड बनायचे आहे.

२) कधीही दोन मते निर्माण करायची नाहीत. भाव-स्वभावामध्ये येऊन एकमेकांचा सामना करायचा नाही. क्रोधाचे भूत काढून टाकायचे आहे.

वरदान:-
स्वतःच्या स्मृतीमध्ये राहून आपल्या प्रत्येक कर्माला संयम (नियम) बनविणारे ऑथॉरिटी स्वरूप भव

ज्याप्रमाणे साकारमध्ये स्वतःच्या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे जे कर्म केले, तेच ब्राह्मण परिवाराचा संयम बनले. स्वतःच्या नशेमध्ये राहिल्या मुळे ऑथॉरिटीने (अधिकाराने) सांगू शकत होते की, साकारद्वारे एखादे उलटे कर्म जरी झाले, तरी ते सरळ करू. स्वतःच्या स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे हा नशा राहतो की, कोणतेही कर्म उलटे होऊच शकत नाही. तुम्ही मुले देखील जेव्हा स्वतःच्या स्थितीमध्ये स्थित राहाल, तर जो संकल्प कराल, जे बोल बोलाल अथवा जे कर्म कराल, तेच संयम (नियम) बनेल.

बोधवाक्य:-
पवित्रतेचा पिलर मजबूत करा, तर हा पिलर लाईट हाऊसचे कार्य करत राहील.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्ध ा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

जर बुद्धीमध्ये अशुद्ध संकल्प अथवा जुने संस्कार संकल्प रूपामध्ये जरी स्पर्श करत असतील, तरी देखील संपूर्ण वैष्णव म्हणता येणार नाही. जसे एखादे अयोग्य कृत्य पाहिले जरी असेल, तरीही पाहण्याचा प्रभाव मनावर पडतोच आणि त्याचा देखील हिशेब बनतो. या हिशेबाने विचार केला, तर जुने संस्कार अथवा अशुद्ध संकल्प बुद्धीला स्पर्श करत असतील, तरी देखील संपूर्ण वैष्णव अथवा संपूर्ण पवित्र कसे म्हणता येईल?