04-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही बेहदच्या बाबांकडे विकारी पासून निर्विकारी बनण्यासाठी आला आहात,
त्यामुळे तुमच्यामध्ये कोणतेही भूत (विकार) असता कामा नये”
प्रश्न:-
बाबा आत्ता
तुम्हाला कोणते शिक्षण शिकवतात जे साऱ्या कल्पामध्ये शिकवले जात नाही?
उत्तर:-
नविन राजधानी स्थापन करण्याचे शिक्षण, मनुष्याला राज्यपद देण्याचे शिक्षण या वेळेला
सुप्रीम बाबाच शिकवतात. हे नविन शिक्षण साऱ्या कल्पामध्ये शिकवले जात नाही. या
शिक्षणामुळे सतयुगी राजधानी स्थापन होत आहे.
ओम शांती।
हे तर मुले जाणतात - आपण आत्मा आहोत, शरीर नाही. याला म्हटले जाते देही-अभिमानी.
सर्व मनुष्य आहेत देह-अभिमानी. ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया अथवा विकारी दुनिया.
रावण राज्य आहे. सतयुग होऊन गेले आहे. तिथे सर्व निर्विकारी राहत होते. मुले जाणतात
- आपणच पवित्र देवी-देवता होतो, जे ८४ जन्मा नंतर पुन्हा पतित बनलो आहोत. सर्वच काही
८४ जन्म घेत नाहीत. भारतवासीच देवी-देवता होते, ज्यांनी ८२, ८३, ८४ जन्म घेतले आहेत.
तेच पतित बनले आहेत. भारतच ‘अविनाशी खंड’ म्हणून गायला जातो. जेव्हा भारतामध्ये
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा याला नवीन दुनिया, नवीन भारत म्हटले जात होते.
आता आहे जुनी दुनिया, जुना भारत. ते तर संपूर्ण निर्विकार होते, कोणतेही विकार
नव्हते. ते देवताच ८४ जन्म घेऊन आता पतित बनले आहेत. कामविकाराचे भूत, क्रोधाचे भूत,
लोभाचे भूत - ही सर्व क्रूर भूते आहेत. यामध्ये मुख्य आहे देह-अभिमानाचे भूत.
रावणाचे राज्य आहे ना. हा रावण आहे भारताचा अर्ध्या कल्पाचा शत्रू, जेव्हा
मनुष्यामध्ये ५ विकार प्रवेश करतात. या देवतांमध्ये ही भूते नव्हती. मग पुनर्जन्म
घेत-घेत यांची आत्मा देखील विकारांमध्ये आली. तुम्ही जाणता - आपण जेव्हा देवी-देवता
होतो तेव्हा कोणत्याही विकाराचे भूत नव्हते. सतयुग-त्रेताला म्हटलेच जाते - राम
राज्य, द्वापर-कलियुगाला म्हटले जाते - रावण राज्य. इथे प्रत्येक नर-नारीमध्ये ५
विकार आहेत. द्वापर पासून कलियुगापर्यंत ५ विकार सुरु होतात. आता तुम्ही पुरुषोत्तम
संगमयुगावर बसले आहात. बेहदच्या बाबांकडे आले आहात विकारी पासून निर्विकारी
बनण्यासाठी. निर्विकारी बनून जर कोणी विकारामध्ये जातात तर त्यांना बाबा लिहितात -
‘तू तोंड काळे केलेस, आता गोरे तोंड होणे अवघड आहे’. ५ व्या मजल्यावरून पडण्यासारखे
आहे. हाडे तुटून जातात. गीतेमध्ये देखील आहे भगवानुवाच - ‘काम महाशत्रू आहे’.
वास्तविक भारताचे धर्मशास्त्र आहेच गीता. प्रत्येक धर्माचे एकच शास्त्र आहे.
भारतवासीयांची मात्र अनेक शास्त्रे आहेत. त्याला म्हटले जाते भक्ती. नविन दुनिया
सतोप्रधान गोल्डन एज आहे, तिथे कोणतेही भांडण-तंटे नव्हते. दीर्घायुषी होते,
एव्हरहेल्दी-वेल्दी होते. तुम्हाला स्मृति आली आहे - आपण देवता खूप सुखी होतो. तिथे
अकाली मृत्यु होत नाही. काळाची भीती वाटत नाही. तिथे हेल्थ, वेल्थ, हॅप्पीनेस सर्व
असते. नरकामध्ये हॅप्पीनेस असत नाही. काही ना काही शरीराचा रोग होतच असतो. हि आहे
अपार दुःखांची दुनिया. ती आहे अपार सुखांची दुनिया. बेहदचे बाबा दुःखाची दुनिया
थोडीच रचतील. बाबांनी तर सुखाची दुनिया रचली होती. मग रावण राज्य आले तर
त्याच्याकडून दुःख-अशांती मिळाली. सतयुग आहे - सुखधाम, कलियुग आहे - दु:खधाम.
विकारामध्ये जाणे म्हणजे एकमेकांवर काम कटारी चालविणे आहे. मनुष्य म्हणतात - ही तर
भगवंताची रचना आहे ना. परंतु नाही, ही भगवंताची रचना नाही, हि रावणाची रचना आहे.
भगवंताने तर स्वर्ग रचला. तिथे काम-कटारी असत नाही. असे नाही दुःख-सुख भगवान देतात.
अरे, भगवान बेहदचे बाबा मुलांना दुःख कसे देतील. ते तर म्हणतात, मी सुखाचा वारसा
देतो; मग अर्ध्या कल्पानंतर रावण शाप देतो. सतयुगामध्ये तर अथाह सुख होते, संपत्ती
होती. सोमनाथच्या एकाच मंदिरामध्ये किती हिरे-माणके होती. भारत किती पवित्र होता.
आता तर अपवित्र आहे. सतयुगामध्ये १०० टक्के पवित्र, कलियुगामध्ये १०० टक्के अपवित्र
- हा खेळ बनलेला आहे. आता आहे आयर्न एज, अशुद्ध होत-होत एकदम तमोप्रधान बनले आहेत.
किती दुःख आहे. हि विमाने इत्यादी सुद्धा १०० वर्षांमध्ये बनली आहेत. याला म्हटले
जाते मायेचा भपका. तर मनुष्य समजतात विज्ञानाने तर स्वर्गच बनवला आहे. परंतु हा आहे
रावणाचा स्वर्ग. कलियुगामध्ये मायेचा भपका पाहून तुमच्याकडे फार मुश्किलीने येतात.
समजतात, आमच्याजवळ तर गाड्या-बंगले इत्यादी आहेत. बाबा म्हणतात - स्वर्ग तर सतयुगाला
म्हटले जाते, जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आता या लक्ष्मी-नारायणाचे
राज्य थोडेच आहे. आता कलियुगा नंतर पुन्हा यांचे राज्य येणार. सुरुवातीला भारत खूप
छोटा होता. नवीन दुनियेमध्ये असतातच ९ लाख देवता. बस. नंतर वृद्धी होत राहते. साऱ्या
सृष्टीची वृद्धी होते ना. सर्वात पहिले फक्त देवी-देवता होते. तर बेहदचे बाबा जगाचा
इतिहास-भूगोल बसून समजावून सांगत आहेत. बाबांशिवाय इतर कोणीही सांगू शकणार नाही.
त्यांना म्हटले जाते नॉलेजफुल गॉडफादर. सर्व आत्म्यांचे फादर. सर्व आत्मे भाऊ-भाऊ
आहेत नंतर भाऊ आणि बहिणी बनतात. तुम्ही सर्व आहात एका प्रजापिता ब्रह्माची दत्तक
मुले. सर्व आत्मे त्यांची (शिव बाबांची) संतान तर आहातच. त्यांना म्हटले जाते
परमपिता, त्यांचे नाव आहे - ‘शिव’. बस. बाबा समजावून सांगत आहेत - ‘माझे नाव एकच
शिव आहे’. मग भक्तिमार्गामध्ये मनुष्यांनी अनेक मंदिरे बनविली त्यामुळे मग अनेक नावे
ठेवली आहेत. भक्तिची सामग्री किती पुष्कळ आहे. त्याला शिक्षण म्हणता येणार नाही.
त्यामध्ये कोणताही एम ऑब्जेक्ट नाही. खालीच उतरायचे आहे. खाली उतरत-उतरत तमोप्रधान
बनतात मग पुन्हा सर्वांनाच सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही सतोप्रधान बनून
स्वर्गामध्ये येणार, बाकी सर्व सतोप्रधान बनून शांतीधाममध्ये राहतील. हे व्यवस्थित
लक्षात ठेवा. बाबा म्हणतात - ‘तुम्ही मला बोलावले आहे - ‘बाबा, आम्हा पतितांना येऊन
पावन बनवा’, तर आता मी साऱ्या दुनियेला पावन बनविण्यासाठी आलो आहे’. मनुष्य समजतात
गंगा-स्नान केल्याने पावन बनू. गंगेला ‘पतित-पावनी’ समजतात. विहिरीतून पाणी आले, तर
त्याला देखील गंगेचे पाणी समजून स्नान करतात. गुप्त गंगा समजतात. तीर्थयात्रेला अथवा
कुठल्या डोंगरावर गेले, त्यालाही गुप्त गंगा म्हणतील. याला म्हटले जाते असत्य. गॉड
इज ट्रूथ म्हटले जाते. बाकी रावण राज्यामध्ये सर्व आहेत खोटे बोलणारे. गॉडफादरच
सचखंड स्थापन करतात. तिथे कधी असत्य गोष्टी केल्या जात नाहीत. देवतांना भोग देखील
शुद्ध लावतात. आता तर आहे आसुरी राज्य, सतयुग-त्रेतामध्ये आहे ईश्वरीय राज्य, जे आता
स्थापन होत आहे. ईश्वरच येऊन सर्वांना पावन बनवतात. देवतांमध्ये कोणताही विकार असत
नाही. यथा राजा-राणी तथा प्रजा, सर्व पवित्र असतात. इथे सर्वच पापी, कामी, क्रोधी
आहेत. नवीन दुनियेला ‘स्वर्ग’ आणि याला ‘नरक’ म्हटले जाते. नरकाला स्वर्ग
बाबांशिवाय इतर कोणीही बनवू शकणार नाही. इथे सर्व आहेत नरकवासी पतित. सतयुगामध्ये
आहेत पावन. तिथे असे म्हणणार नाहीत कि, आम्ही पतिता पासून पावन होण्यासाठी स्नान
करायला जात आहोत.
हे व्हरायटी मनुष्य
सृष्टी रुपी झाड आहे. बीजरूप आहेत भगवान. तेच रचना रचतात. सर्व प्रथम रचतात
देवी-देवतांना. मग वृद्धी होत-होत इतके धर्म होतात. सर्वप्रथम एक धर्म, एक राज्य
होते. सुखच सुख होते. मनुष्यांना वाटते देखील विश्वामध्ये शांति व्हावी. ती आता
तुम्ही स्थापन करत आहात. बाकी सर्व नष्ट होणार आहे. थोडे शिल्लक राहतील. हे चक्र
फिरत राहते. आता आहे कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात यांच्या मधील पुरुषोत्तम
संगमयुग. याला म्हटले जाते ‘कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग’. कलियुगानंतर सतयुग
स्थापन होत आहे. तुम्ही संगमावर शिकता त्याचे फळ सतयुगामध्ये मिळणार. इथे जितके
पवित्र बनाल आणि शिकाल तितके उच्च पद प्राप्त कराल. असे शिक्षण कुठे असत नाही.
तुम्हाला या शिक्षणाचे सुख नवीन दुनियेमध्ये मिळणार. जर कोणतेही भूत असेल तर मग एक
म्हणजे सजा भोगावी लागेल, दुसरे मग तिथे पद कमी दर्जाचे मिळेल. जे संपूर्ण बनून
इतरांना देखील शिकवतील तर उच्च पद सुद्धा प्राप्त करतील. किती सेंटर्स आहेत, लाखो
सेंटर्स होतील. साऱ्या विश्वामध्ये सेंटर्स निघतील. पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा
बनायचेच आहे. तुमचे एम ऑब्जेक्ट सुद्धा आहे. शिकवणारे एक शिवबाबा आहेत. ते आहेत
ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर. बाबाच येऊन शिकवतात. हे (ब्रह्मा बाबा) शिकवत नाहीत,
यांच्याद्वारे ते (शिवबाबा) शिकवतात. यांना (ब्रह्मा बाबांना) म्हटले जाते भगवंताचा
रथ, भाग्यशाली रथ. तुम्हाला किती पद्मा-पदम भाग्यशाली बनवतात. तुम्ही खूप श्रीमंत
बनता. कधीही आजारी पडत नाही. हेल्थ, वेल्थ, हॅप्पीनेस (आरोग्य, संपदा, आनंद)
सर्वकाही मिळते. इथे भले धन आहे परंतु आजार इत्यादी आहेत. तो आनंद राहू शकत नाही.
काही ना काही दुःख राहते. त्याचे तर नावच आहे सुखधाम, स्वर्ग, पॅराडाईज. या
लक्ष्मी-नारायणाला हे राज्य कोणी दिले? हे कोणीही जाणत नाहीत. हे भारतामध्ये राहत
होते. विश्वाचे मालक होते. कोणते पार्टीशन इत्यादी नव्हते. आता तर किती पार्टीशन
आहेत. रावण राज्य आहे. किती तुकडे-तुकडे झाले आहेत. भांडत राहतात. तिथे (सतयुगामध्ये)
तर पूर्ण भारतामध्ये या देवी-देवतांचे राज्य होते. तिथे वजीर इत्यादी नसतात. इथे तर
वजीर बघा किती आहेत कारण बेअक्कल आहेत. तर वजीर सुद्धा असेच तमोप्रधान पतित आहेत.
‘पतित को पतित मिले, कर-कर लम्बे हाथ…’. कंगाल बनत जातात, कर्ज घेत राहतात.
सतयुगामध्ये तर धान्य, फळे इत्यादी अतिशय स्वादिष्ट असतात. तुम्ही तिथे जाऊन सगळा
अनुभव करून येता. सूक्ष्मवतनमध्ये जाता तर स्वर्गामध्ये देखील जाता. बाबा सांगतात
सृष्टिचक्र कसे फिरते. सुरुवातीला भारतामध्ये एकच देवी-देवता धर्म होता. दुसरा
कोणताही धर्म नव्हता. नंतर द्वापरमध्ये रावण राज्य सुरु होते. आता आहे विकारी दुनिया
मग तुम्ही पवित्र बनून निर्विकारी देवता बनता. हे स्कुल आहे. भगवानुवाच - ‘मी तुम्हा
मुलांना राजयोग शिकवतो. तुम्ही भविष्यामध्ये हे बनणार आहात’. राजाईचे शिक्षण इतर
कुठेही मिळत नाही. बाबाच शिकवून नवीन दुनियेची राजधानी देतात. सुप्रीम फादर, टीचर,
सद्गुरु एक शिवबाबाच आहेत. बाबा अर्थात जरूर वारसा मिळाला पाहिजे. भगवान जरूर
स्वर्गाचाच वारसा देणार. रावण ज्याला दरवर्षी जाळतात, हा भारताचा एक नंबरचा शत्रू
आहे. रावणाने कसे असुर बनवले आहे. याचे राज्य २५०० वर्षे चालते. तुम्हाला बाबा
म्हणतात - ‘मी तुम्हाला सुखधामचा मालक बनवतो. रावण तुम्हाला दुःखधाममध्ये घेऊन जातो’.
तुमचे आयुष्य देखील कमी होते. अचानक अकाली मृत्यू होतो. अनेक आजार होत राहतात. तिथे
अशी कोणती गोष्ट होत नाही. नावच आहे स्वर्ग. आता स्वतःला हिंदू म्हणवून घेतात कारण
पतित आहेत. त्यामुळे देवता म्हणवून घेण्याच्या लायक नाही आहेत. बाबा या रथाद्वारे
बसून समजावून सांगतात, यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) बाजूला येऊन बसतात तुम्हाला
शिकवण्यासाठी. तर हे सुद्धा शिकतात. आपण सर्व स्टुडंट आहोत. एक बाबाच टीचर आहेत. आता
बाबा शिकवत आहेत. पुन्हा ५००० वर्षांनंतर येऊन शिकवतील. हे ज्ञान, हे शिक्षण मग
नाहीसे होईल. शिकून तुम्ही देवता बनलात, २५०० वर्ष सुखाचा वारसा घेतलात नंतर मग आहे
दुःख, रावणाचा शाप. आता भारत खूप दु:खी आहे. हे आहे दुःखधाम. बोलावतात देखील -
‘पतित-पावन या, येऊन पावन बनवा’. आता तुमच्यामध्ये कोणताही विकार असता कामा नये
परंतु अर्ध्या कल्पाचा आजार काही लगेच थोडाच जाणार आहे. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये
देखील जे नीट शिकत नाहीत ते फेल होतात. जे पास विद् ऑनर होतात ते तर स्कॉलरशिप
घेतात. तुमच्यामध्ये देखील जे चांगल्या प्रकारे पवित्र बनतात आणि नंतर दुसऱ्यांना
बनवतात, तर हे प्राईज घेतात. माळा असते ८ ची. ते आहेत पास विद् ऑनर. मग १०८ ची माळा
सुद्धा असते, त्या माळेचा सुद्धा जप केला जातो. मनुष्य याचे रहस्य थोडेच समजतात.
माळेमध्ये वरती आहे फुल मग असतो डबल मणी मेरू. पती-पत्नी दोघेही पवित्र राहतात. हे
पवित्र होते ना. स्वर्गवासी म्हटले जात होते. हीच आत्मा मग पुनर्जन्म घेत-घेत आता
पतित बनली आहे. मग इथून पवित्र बनून पावन दुनियेमध्ये जातील. जगाचा इतिहास-भूगोल
रिपीट होतो ना. विकारी राजे निर्विकारी राजांची मंदिरे बांधून त्यांची पूजा करतात.
तेच मग पूज्य पासून पुजारी बनतात. विकारी बनल्याने मग तो लाईटचा ताज देखील राहत नाही.
हा खेळ बनलेला आहे. हा आहे बेहदचा वंडरफुल ड्रामा. सर्व प्रथम एकच धर्म असतो, ज्याला
राम राज्य म्हटले जाते नंतर इतर धर्मवाले येतात. हे सृष्टीचक्र कसे फिरत राहते ते
एक बाबाच सांगू शकतात. भगवान तर एकच आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) आपल्यामध्ये
जी काही काम, क्रोध इत्यादीची भूते आहेत, त्यांना काढून टाकायचे आहे. एम ऑब्जेक्टला
समोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
मायेच्या
छायेमधून निघून आठवणीच्या छत्रछायेमध्ये राहणारे बेफिक्र बादशहा भव जे सदैव
बाबांच्या आठवणीच्या छत्रछायेमध्ये राहतात ते स्वतःला नेहमी सेफ अनुभव करतात.
मायेच्या छाये पासून वाचण्याचे साधन आहे बाबांची छत्रछाया. छत्रछायेमध्ये राहणारे
सदैव बेफिक्र बादशाह (निश्चिंत बादशहा) असणार. जर कोणती चिंता असेल तर आनंद हरवून
जातो. आनंद हरवला, कमजोर झालात तर मायेच्या छायेचा प्रभाव पडणार कारण कमजोरीच मायेचे
आवाहन करते. मायेची छाया स्वप्नामध्ये जरी पडली तरी देखील खूप हैराण करेल त्यामुळे
नेहमी छत्रछायेखाली रहा.
बोधवाक्य:-
‘समजूतदारपणा’च्या स्क्रू ड्रायव्हरने निष्काळजीपणाच्या लूज स्क्रू ला टाईट करून
नेहमी अलर्ट रहा.