04-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - संगम युगावर तुम्हाला प्रेमाचे सागर बाबा प्रेमाचाच वारसा देतात,
त्यामुळे तुम्ही देखील सर्वांना प्रेम द्या, क्रोध करू नका”
प्रश्न:-
आपले रजिस्टर
ठीक ठेवण्याकरिता बाबांनी तुम्हाला कोणता रस्ता सांगितला आहे?
उत्तर:-
प्रेमाचाच रस्ता बाबा तुम्हाला सांगतात, श्रीमत देतात - ‘मुलांनो, प्रत्येकाशी
प्रेमाने राहा. कोणालाही दुःख देऊ नका. कर्मेंद्रियांद्वारे कधीही कोणते उलटे कर्म
करू नका’. नेहमी हीच तपासणी करा की माझ्यामध्ये कोणता आसूरी गुण तर नाही ना? मुडी
तर नाही आहे? कोणत्याही गोष्टीमुळे नाराज तर नाही ना?
गीत:-
यह वक्त जा रहा
है…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले. दिवसेंदिवस आपले घर अथवा लक्ष्य जवळ येत जात आहे.
आता जे काही श्रीमत सांगते, त्यामध्ये चूक करू नका. बाबांचे डायरेक्शन मिळते की,
सर्वांपर्यंत मेसेज पोचवा. मुले जाणतात लाखो-करोडोंना हा मेसेज द्यायचा आहे. मग काही
वेळाने येतील देखील. जेव्हा पुष्कळ होतील तेव्हा अनेकांना मेसेज देतील. बाबांचा
मेसेज मिळणार तर सर्वांनाच आहे. मेसेज आहे खूप सोपा. फक्त एवढेच बोला - ‘स्वतःला
आत्मा समजून बाबांची आठवण करा आणि कोणत्याही कर्मेंद्रियांद्वारे मनसा-वाचा-कर्मणा
कोणतेही वाईट काम करु नका’. पहिले मनसा मध्ये येते तेव्हा वाचे मध्ये येते. आता
तुम्हाला योग्य-अयोग्य समजण्याची बुद्धी पाहिजे, हे पुण्याचे काम आहे, हे केले
पाहिजे. मनामध्ये संकल्प येतो क्रोध करावा, आता बुद्धी तर मिळाली आहे - जर क्रोध
कराल तर पाप बनेल. बाबांची आठवण केल्याने पुण्य आत्मा बनाल. असे नाही - ठीक आहे, आता
झाले पुन्हा नाही करणार. असे पुन्हा-पुन्हा म्हणत राहिल्याने सवय पडेल. मनुष्य
जेव्हा असे कृत्य करतात तेव्हा समजतात की, हे काही पाप नाही आहे. विकाराला पाप समजत
नाहीत. आता बाबांनी सांगितले आहे - हे मोठ्यात मोठे पाप आहे, याच्यावर विजय प्राप्त
करायचा आहे आणि सर्वांना बाबांचा मेसेज द्यायचा आहे की, ‘बाबा म्हणतात - माझी आठवण
करा, मृत्यू समोर उभा आहे’. जेव्हा कोणी मरणासन्न असतो तेव्हा त्याला सांगतात -
गॉडफादरची आठवण कर. रिमेम्बर गॉड फादर. ते समजतात की हे गॉडफादर कडे जातात. परंतु
ते लोक हे काही जाणत नाहीत की गॉड फादरची आठवण केल्याने काय होईल? कुठे जातील? आत्मा
एक शरीर सोडून दुसरे घेते. गॉडफादरकडे तर कोणीही जाऊ शकत नाही. तर आता तुम्हा
मुलांना अविनाशी बाबांची अविनाशी आठवण पाहिजे. जेव्हा तमोप्रधान दुःखी होतात
तेव्हाच तर एकमेकांना सांगतात गॉडफादरची आठवण करा, सर्व आत्मे एकमेकांना सांगतात,
सांगते तर आत्माच ना. असे नाही की परमात्मा सांगतात. आत्मा, आत्म्याला सांगते -
बाबांची आठवण करा. हा एक कॉमन रिवाज आहे. मरताना ईश्वराची आठवण करतात. ईश्वराबद्दलची
भीती असते. समजतात चांगल्या अथवा वाईट कर्मांचे फळ ईश्वरच देतात, वाईट कर्म कराल तर
ईश्वर धर्मराजाद्वारे खूप सजा देतील म्हणून भीती असते, खरोखर कर्मांचे भोग भोगावे
तर लागतातच ना. तुम्ही मुले आता कर्म-अकर्म-विकर्माच्या गतीला समजता. जाणता हे कर्म
अकर्म झाले. आठवणीमध्ये राहून जे कर्म करता ते चांगले करता. रावण राज्यामध्ये
मनुष्य वाईट कर्मच करतात. राम राज्यामध्ये कधी वाईट कर्म होत नाही. आता श्रीमत तर
मिळत राहते. कुठे कोणाचे बोलावणे येते, तर हे करायचे की नाही करायचे - प्रत्येक
गोष्टीमध्ये विचारत रहा. समजा, कोणी पोलिसाची नोकरी करतात तर त्यांना देखील सांगितले
जाते - तुम्ही आधी प्रेमाने समजावून सांगा. जर खरे सांगत नसेल तर नंतर मग मार.
प्रेमाने समजावून सांगितल्याने हाती येऊ शकतात परंतु त्या प्रेमामध्ये देखील योगबल
भरलेले असेल तर त्या प्रेमाच्या ताकदीने कोणालाही समजावून सांगितल्याने त्यांना
वाटेल की, हे तर जणू ईश्वरच समजावून सांगत आहेत. तुम्ही ईश्वराची मुले योगी आहात
ना. तुमच्यामध्ये देखील ईश्वरीय ताकद आहे. ईश्वर प्रेमाचा सागर आहेत, त्यांच्यामध्ये
ताकद आहे ना. सर्वांना वारसा देतात. तुम्ही जाणता स्वर्गामध्ये प्रेम भरपूर असते.
आता तुम्ही प्रेमाचा पूर्ण वारसा घेत आहात. घेत-घेत नंबरवार पुरुषार्थ करत-करत
प्रेमळ बनाल.
बाबा म्हणतात -
कोणालाही दुःख द्यायचे नाही, नाही तर दुःखी होऊन मराल. बाबा प्रेमाचा रस्ता सांगतात.
मनसामध्ये आल्याने ते चेहऱ्यावर देखील येते. कर्मेंद्रियांद्वारे केले तर रजिस्टर
खराब होईल. देवतांच्या आचरणाचे गायन करतात ना; म्हणून बाबा म्हणतात - देवतांच्या
पुजाऱ्यांना समजावून सांगा. ते महिमा गातात - तुम्ही सर्व गुण संपन्न, १६ कला
संपूर्ण आहात आणि मग आपले आचरण देखील ऐकवतात. तर त्यांना समजावून सांगा की, तुम्ही
असे होता, आता नाही आहात, पुन्हा जरूर बनाल. तुम्हाला असे देवता बनायचे असेल तर आपले
वर्तन असे ठेवा, तर तुम्ही असे बनाल. आपली तपासणी करायची आहे - आपण संपूर्ण
निर्विकारी आहोत? आपल्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही आहे? कोणत्या गोष्टीमुळे
नाराज तर नाही ना, मुडी तर बनत नाही ना? तुम्ही अनेकदा पुरुषार्थ केला आहे. बाबा
म्हणतात - तुम्हाला असे बनायचे आहे. बनविणाऱे देखील उपस्थित आहेत. म्हणतात
कल्प-कल्प तुम्हाला असे बनवतो. कल्पापूर्वी ज्यांनी ज्ञान घेतले आहे ते जरूर येऊन
घेतील. पुरुषार्थ देखील करवून घेतला जातो आणि निश्चिंत देखील राहतात. ड्रामामध्ये
नोंदच अशी आहे. कोणी म्हणतात - ड्रामामध्ये नोंद असेल तर जरूर करणार. चांगला चार्ट
असेल तर ड्रामा करून घेईल. समजून येते - त्यांच्या भाग्यामध्ये नाही आहे. यापूर्वी
देखील असा एक चिडला होता, भाग्यामध्ये नव्हते; म्हणाला - ‘ड्रामामध्ये असेल तर
ड्रामा माझ्याकडून पुरुषार्थ करवून घेईल’. बस्स, सोडून दिले. असे तुम्हाला देखील
खूप भेटतात. तुमचे एम ऑब्जेक्ट तर हे उभे आहे, बॅज तर तुमच्या जवळ आहे, जसा आपला
पोतामेल बघता तसे बॅजला देखील पहा, आपल्या वर्तनाला देखील पहा. कधीही क्रिमिनल
दृष्टी होऊ नये. मुखावाटे कोणती ईविल गोष्ट (वाईट गोष्ट) निघू नये. कोणी ईविल
बोलणाराच जर नसेल तर कान ऐकतीलच कसे? सतयुगामध्ये सर्व दैवी गुणवाले असतात. कोणतीही
ईविल गोष्ट नसते. यांनी देखील बाबांकडूनच प्रारब्ध मिळवले आहे. हे तर सर्वांना सांगा
- ‘बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. यामध्ये नुकसानाची काही कोणती गोष्टच
नाहीये. संस्कार आत्मा घेऊन जाते. संन्यासी असेल तर मग संन्यास धर्मामध्ये येईल.
झाड तर त्यांचे वाढत राहते ना. या वेळी तुम्ही बदलत आहात. मनुष्यच देवता बनतात.
सगळेच काही एकत्र थोडेच येतील. येतील मग नंबरवार, ड्रामामध्ये कोणताही ॲक्टर वेळे
अगोदर थोडाच स्टेजवर येईल. आतमध्ये बसून राहतात. जेव्हा वेळ येते तेव्हा बाहेर
स्टेजवर पार्ट बजावण्यासाठी येतात. ते आहे हदचे नाटक, हे आहे बेहदचे. बुद्धीमध्ये
आहे मज ॲक्टरला ठरलेल्या वेळेवर येऊन आपला पार्ट बजावायचा आहे. हे बेहदचे मोठे झाड
आहे. नंबरवार येत जातात. सर्वप्रथम एकच धर्म होता; सगळ्याच धर्माचे काही सर्वप्रथम
येऊ शकत नाहीत.
पहिले तर देवी-देवता
धर्माचेच पार्ट बजावण्यासाठी येतील, तेही नंबरवार. झाडाच्या रहस्याला देखील समजून
घ्यायचे आहे. बाबाच येऊन संपूर्ण कल्पवृक्षाचे ज्ञान ऐकवतात. याची तुलना मग निराकारी
झाडाशी होते. एक बाबाच असे म्हणतात - ‘मनुष्यसृष्टी रुपी झाडाचे बीज मी आहे’.
बीजामध्ये झाड सामावलेले नाहीये परंतु झाडाचे ज्ञान सामावलेले आहे. प्रत्येकाचा
आपापला पार्ट आहे. चैतन्य झाड आहे ना. झाडाची पाने देखील नंबरवार येतील. या झाडाला
कोणीही समजत नाहीत, याचे बीज वरती आहे म्हणून याला उलटा वृक्ष म्हटले जाते. रचयिता
बाबा आहेत वरती. तुम्ही जाणता आपल्याला जायचे आहे घरी, जिथे आत्मे राहतात. आता
आपल्याला पवित्र बनून जायचे आहे. तुमच्याद्वारेच योगबलाने संपूर्ण विश्व पवित्र होते.
तुमच्या करिता तर पवित्र सृष्टी पाहिजे ना. तुम्ही पवित्र बनता तर दुनिया देखील
पवित्र बनवावी लागेल. सगळे पवित्र होतात. तुमच्या बुद्धीमध्ये आहे, आत्म्यामध्येच
मन-बुद्धी आहे ना. चैतन्य आहे. आत्माच ज्ञानाला धारण करू शकते. तर गोड-गोड मुलांच्या
बुद्धीमध्ये हे संपूर्ण रहस्य असले पाहिजे की, कसे आपण पुनर्जन्म घेतो. ८४ चे चक्र
तुमचे पूर्ण होते तर सर्वांचेच पूर्ण होते. सर्व पावन बनतात. हा अनादि बनलेला ड्रामा
आहे. एक सेकंद देखील थांबत नाही. सेकंदा-सेकंदाला जे काही होते, ते मग कल्पानंतर
होईल. प्रत्येक आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. ते ॲक्टर्स तर २-४ तासांचा
पार्ट बजावतात. हा तर आत्म्याला नैसर्गिक पार्ट मिळालेला आहे तर मुलांना किती आनंद
झाला पाहिजे. अतींद्रिय सुख आता संगमातीलच गायले गेले आहे. बाबा येतात, २१
जन्मांसाठी आपण कायमचे सुखी बनतो. आनंदाची गोष्ट आहे ना. जे चांगल्या रीतीने समजतात
आणि समजावून सांगतात ते सेवेमध्ये तत्पर राहतात. काही मुले स्वतः जर क्रोधी असतील
तर इतरांमध्ये देखील प्रवेशता होते. टाळी दोन हातांनी वाजते. तिथे असे होत नाही. इथे
तुम्हा मुलांना शिकवण मिळते - कोणी क्रोध केला तर तुम्ही त्यांच्यावर फुले वहा.
प्रेमाने समजावून सांगा. हे देखील एक भूत आहे, खूप नुकसान करतील. कधीही क्रोध करता
कामा नये. शिकविणाऱ्या मध्ये तर अजिबात क्रोध असता कामा नये. नंबरवार पुरुषार्थ करत
राहतात. कोणाचा तीव्र पुरुषार्थ असतो, कोणाचा थंड. थंड पुरुषार्थावाले जरूर आपली
बदनामी करतील. जर कोणामध्ये क्रोध असेल तर ते जिथे जातात तिथून काढून टाकतात.
गैरवर्तन असणारे कोणीही थांबू शकत नाहीत. परीक्षा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सर्वांना
माहीत होईल. कोण-कोण काय बनतात, सर्व साक्षात्कार होईल. जे जसे काम करतात, त्यांची
तशी महिमा होते.
तुम्ही मुले
ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणता. तुम्ही सर्व अंतर्यामी आहात. आत्मा आतल्याआत
जाणते - हे सृष्टी चक्र कसे फिरते. संपूर्ण सृष्टीतील मनुष्यांच्या आचरणाविषयीचे,
सर्व धर्मांचे तुम्हाला ज्ञान आहे. त्यांना म्हटले जाईल - अंतर्यामी. आत्म्याला
सर्व माहीत झाले आहे. असे नाही, भगवान घटा-घटामध्ये (प्रत्येक व्यक्तीमध्ये) आहेत,
त्यांना जाणण्याची काय गरज आहे? ते तर आता देखील म्हणतात - जे जसा पुरुषार्थ करतील
तसेच फळ प्राप्त करतील. मला जाणून घेण्याची काय गरज आहे. जे करतात त्याची सजा देखील
स्वतःच प्राप्त करतील. असेच वर्तन चालू राहीले तर अधम गतीला प्राप्त व्हाल. खूप कमी
पद होईल. त्या स्कूलमध्ये तर नापास होतात तर पुन्हा दुसऱ्या वर्षी शिकतात. हे
शिक्षण तर असते कल्प-कल्पांतरासाठी. आता शिकला नाहीत तर कल्प-कल्पांतर शिकणार नाही.
ईश्वरीय लॉटरी तर पूर्ण घेतली पाहिजे ना. या गोष्टी तुम्ही मुलेच समजू शकता. जेव्हा
भारत सुखधाम असेल तेव्हा बाकी सर्व शांतीधाममध्ये असतील. मुलांना आनंद झाला पाहिजे
- आता आमचे सुखाचे दिवस येत आहेत. दिवाळीचे दिवस जवळ येतात तर म्हणतात ना आता इतके
दिवस बाकी आहेत; मग नवीन कपडे घालणार. तुम्ही देखील म्हणता - स्वर्ग येत आहे, आपण
आपला श्रृंगार करावा तेव्हा मग स्वर्गामध्ये चांगले सुख मिळेल. श्रीमंतांना तर
श्रीमंतीचा नशा असतो. मनुष्य एकदम घोर निद्रेमध्ये आहेत, मग अचानक माहित होईल - हे
तर खरे सांगत होते. सत्याला तेव्हा समजतील जेव्हा सत्याचा संग असेल. तुम्ही आता
सत्याच्या संगामध्ये आहात. तुम्ही खरे बनता खऱ्या बाबांद्वारे. ते सर्व असत्य बनतात,
असत्याद्वारे. आता कॉन्ट्रास्ट (विरोधाभास) देखील छापत आहेत की भगवान काय म्हणतात
आणि मनुष्य काय म्हणतात. मासिकामध्ये देखील टाकू शकता. सरतेशेवटी विजय तर तुमचाच आहे,
ज्यांनी कल्पापूर्वी पद प्राप्त केले आहे ते जरूर घेतील. हे निश्चित आहे. तिथे अकाली
मृत्यू होत नाही. आयुष्य देखील जास्त आहे. जेव्हा पवित्रता होती तेव्हा आयुष्य
जास्त होते. पतित-पावन परमात्मा बाबा आहेत तर जरूर त्यांनीच पावन बनविले असेल.
श्रीकृष्णाची गोष्ट शोभत नाही. पुरुषोत्तम संगमयुगावर श्रीकृष्ण मग कुठून येईल.
त्याच सेम फीचर्सवाला मनुष्य तर पुन्हा होत नाही. ८४ जन्म, ८४ फीचर्स, ८४ ॲक्टिविटी
- हा पूर्व नियोजित खेळ आहे. त्यामध्ये फरक पडू शकत नाही. ड्रामा कसा वंडरफुल बनलेला
आहे. आत्मा छोटा बिंदू आहे, त्यामध्ये अनादी पार्ट भरलेला आहे - याला कुदरत (प्रकृतीचा
चमत्कार) म्हटले जाते. मनुष्य ऐकून आश्चर्यचकित होतील. परंतु पहिले तर हा संदेश
द्यायचा आहे की, बाबांची आठवण करा. तेच पतित-पावन आहेत, सर्वांचे सद्गती दाता आहेत.
सतयुगामध्ये दुःखाची गोष्ट असत नाही. कलियुगामध्ये तर किती दुःख आहे. परंतु या
गोष्टी समजणारे नंबरवार आहेत. बाबा तर दररोज समजावून सांगत राहतात. तुम्ही मुले
जाणता शिवबाबा आलेले आहेत आपल्याला शिकविण्याकरिता, मग सोबत घेऊन जातील. सोबत
राहणाऱ्यांपेक्षाही बंधनात असणाऱ्या जास्त आठवण करतात. त्या उच्च पद प्राप्त करू
शकतात. ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे ना. बाबांच्या आठवणीमध्ये खूप तळमळतात.
बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये राहा, दैवी गुण देखील धारण करा तर
बंधने नष्ट होत जातील. पापाचा घडा खाली होईल’. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपले आचरण
देवतांप्रमाणे बनवायचे आहे. कोणतेही ईविल शब्द मुखावाटे बोलायचे नाहीत. हे डोळे
कधीही क्रिमिनल होऊ नयेत.
२) क्रोधाचे भूत खूप
नुकसान करते. टाळी दोन हाताने वाजते त्यामुळे कोणी क्रोध केला तर दूर व्हायचे आहे,
त्यांना प्रेमाने समजावून सांगायचे आहे.
वरदान:-
त्याग, तपस्या
आणि सेवाभाव या विधीद्वारे सदा सफलता स्वरूप भव
त्याग आणि तपस्या
सफलतेचा आधार आहे. त्यागाची भावना असणारेच खरे सेवाधारी बनू शकतात. त्यागानेच
स्वतःचे आणि इतरांचे भाग्य बनते आणि दृढ संकल्प करणे - हीच तपस्या आहे. तर त्याग,
तपस्या आणि सेवाभाव या द्वारेच अनेक हदचे भाव समाप्त होतात. संगठन शक्तीशाली बनते.
एकाने म्हटले दुसऱ्याने केले, कधीही ‘तू-मी’, ‘माझे-तुझे’ येऊ नये तर सफलता स्वरूप
निर्विघ्न बनाल.
बोधवाक्य:-
संकल्पाद्वारे
देखील कोणालाही दुःख न देणे - हीच संपूर्ण अहिंसा आहे.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
योगाला ज्वाला रूप
बनविण्याकरिता सेकंदामध्ये बिंदू स्वरूप बनून मन-बुद्धीला एकाग्र करण्याचा अभ्यास
वारंवार करा. स्टॉप म्हटले आणि सेकंदामध्ये व्यर्थ देह-भानापासून मन-बुद्धी एकाग्र
व्हावी. अशी कंट्रोलिंग पॉवर संपूर्ण दिवसभरामध्ये युज करा. पॉवरफुल ब्रेक द्वारे
मन-बुद्धीला कंट्रोल करा, मन-बुद्धीला जिथे टिकवू इच्छिता तिथे सेकंदामध्ये टिकावी.