04-10-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही बाबांची जितकी प्रेमाने आठवण कराल तितके आशीर्वाद मिळतील, पापे भस्म होत जातील”

प्रश्न:-
बाबा मुलांना कोणत्या धर्मामध्ये स्थित राहण्याचे मत (सल्ला) देतात?

उत्तर:-
बाबा म्हणतात मुलांनो - तुम्ही आपल्या विचित्रतेच्या धर्मामध्ये (बिंदुरुपामध्ये) स्थित व्हा, चित्राच्या धर्मामध्ये (देहाच्या धर्मामध्ये) नाही. जसे बाबा विदेही, विचित्र आहेत अशीच मुले देखील विचित्र आहेत मग इथे चित्रामध्ये (शरीरामध्ये) येतात. आता बाबा मुलांना म्हणतात - ‘मुलांनो, विचित्र बना, आपल्या स्वधर्मामध्ये स्थित व्हा. देह-अभिमानामध्ये येऊ नका.

प्रश्न:-
ड्रामा अनुसार स्वयं भगवान देखील कोणत्या गोष्टीकरिता बांधील आहे?

उत्तर:-
ड्रामा अनुसार मुलांना पतिता पासून पावन बनविण्यासाठी भगवान देखील बांधील आहेत. त्यांना यायचेच आहे पुरुषोत्तम संगमयुगावर.

ओम शांती।
बाबा बसून रुहानी मुलांना (आत्मिक मुलांना) समजावून सांगत आहेत - जेव्हा ‘ओम् शांती’ म्हटले जाते तर जसेकी आपल्या आत्म्याला स्वधर्माचा परिचय दिला जातो. तर जरूर मग बाबांची देखील आपोआपच आठवण येते कारण प्रत्येक मनुष्य भगवंताचीच आठवण करत असतो. फक्त भगवंताचा संपूर्ण परिचय नाही आहे. भगवान आपला स्वतःचा आणि आत्म्यांचा परिचय देण्यासाठीच येतात. पतित-पावन म्हटलेच जाते भगवंताला. पतिता पासून पावन बनविण्यासाठी स्वयं भगवान देखील ड्रामा अनुसार बांधील आहेत. त्यांना यायचे देखील आहे पुरुषोत्तम संगमयुगावर, संगमयुगाचे स्पष्टीकरण सुद्धा देतात. जुनी दुनिया आणि नवीन दुनियेच्या मधल्या काळामध्ये बाबा येतात. जुन्या दुनियेला मृत्यूलोक, नवीन दुनियेला अमरलोक म्हटले जाते. हे देखील तुम्ही समजता, मृत्यू लोकमध्ये आयुष्य कमी असते. अकाली मृत्यू होत राहतात. तो मग आहे अमरलोक, जिथे अकाली मृत्यू होत नाहीत कारण पवित्र आहेत. अपवित्रतेमुळे व्यभिचारी बनतात आणि आयुष्य देखील कमी होते. ताकद देखील कमी होते. सतयुगामध्ये पवित्र असल्यामुळे अव्यभिचारी आहेत. ताकदही जास्त असते. ताकदी शिवाय राज्य असे मिळवले? जरूर बाबांकडून त्यांनी आशीर्वाद घेतले असणार. बाबा आहेत सर्वशक्तिमान. आशीर्वाद कसे घेतले असणार? बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. तर ज्यांनी जास्त आठवण केली असेल त्यांनीच आशीर्वाद घेतले असणार. आशीर्वाद ही काही मागण्याची गोष्ट नाहीये. ही तर मेहनत करून मिळवण्याची गोष्ट आहे. जितकी जास्त आठवण कराल तितके जास्त आशीर्वाद मिळतील अर्थात उच्च पद प्राप्त होईल. आठवणच केली नाहीत तर आशीर्वाद सुद्धा मिळणार नाहीत. लौकिक पिता मुलांना कधीही असे म्हणत नाही की माझी आठवण करा. मुले बालपणापासून आपणहूनच ‘आई-बाबा’ म्हणत राहतात. ऑर्गन्स छोटे आहेत, मोठी मुले कधी असे ‘बाबा-बाबा’, ‘आई-आई’ म्हणणार नाहीत. त्यांच्या बुद्धीमध्ये असते - हे आमचे आई-बाबा आहेत, ज्यांच्याकडून वारसा मिळणार आहे. सांगण्याची अथवा आठवण करण्याची गोष्टच नाही. इथे तर बाबा म्हणतात - ‘माझी आणि वारशाची आठवण करा. हदची नाती सोडून आता बेहदच्या नात्याची आठवण करायची आहे. सर्व मनुष्यांची इच्छा असते की आपल्याला गती प्राप्त व्हावी. गती म्हटले जाते - मुक्ती-धामला. सद्गती म्हटले जाते - परत सुखधाममध्ये येण्याला. कोणीही येईल तो सुरुवातीला जरूर सुखच प्राप्त करेल. बाबा सुख देण्यासाठीच येतात. जरूर कोणती गोष्ट अवघड आहे त्यामुळे याला उच्च शिक्षण म्हटले जाते. जितके उच्च शिक्षण तितकेच कठीण देखील असणार. सगळेच काही पास होऊ शकत नाहीत. मोठ्यात मोठी परीक्षा फार थोडे विद्यार्थी पास होतात कारण मोठी परीक्षा पास केल्याने मग सरकारला पगार सुद्धा जास्त द्यावा लागेल ना. कित्येक विद्यार्थी मोठ्या परीक्षा उत्तीर्ण होऊनही असेच बसून राहतात. सरकारजवळ इतका पैसा नाही आहे जे भरपूर पगार देतील. इथे तर बाबा म्हणतात जितके जास्त शिकाल तितके उच्च पद प्राप्त कराल. असेही नाही की सर्वच काही राजा किंवा श्रीमंत बनतील. सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे. भक्तीला शिक्षण म्हटले जात नाही. हे तर रूहानी ज्ञान आहे जे रूहानी बाबा शिकवतात. किती उच्च शिक्षण आहे. मुलांना कठीण वाटते कारण बाबांची आठवण करत नाहीत त्यामुळे कॅरॅक्टर (चलन) सुद्धा सुधारत नाहीत. जे चांगल्या रीतीने आठवण करतात त्यांचे कॅरॅक्टर देखील चांगले होत जाते. अतिशय गोड सेवाभावी बनत जातात. कॅरॅक्टर चांगले नसेल तर कोणाला आवडतसुद्धा नाहीत. जे नापास होतात तर नक्कीच कॅरॅक्टर्समध्ये गडबड आहे. श्री लक्ष्मी-नारायणाचे कॅरॅक्टर्स खूप चांगले आहेत. रामाला दोन कला कमी म्हणणार. भारत, रावण राज्यामध्ये झूठ-खंड बनतो. सचखंडामध्ये (सतयुग-त्रेतामध्ये) तर जरा देखील खोटे असू शकत नाही. रावण राज्यामध्ये आहे खोटेच खोटे. खोट्या माणसांना दैवी गुणवाले म्हणू शकत नाही. ही बेहदची गोष्ट आहे. आता बाबा म्हणतात - ‘अशा कोणाच्याही खोट्या गोष्टी ना ऐकायच्या आहेत, ना कोणाला ऐकवायच्या आहेत’. एका ईश्वराच्या मतालाच कायदेशीर मत म्हटले जाते. मनुष्य मताला बेकायदेशीर मत म्हटले जाते. कायदेशीर मतानेच तुम्ही श्रेष्ठ बनता. परंतु सर्वजण त्यावर चालू शकत नाहीत त्यामुळे बेकायदेशीर बनतात. बरेचजण बाबांसोबत प्रतिज्ञा देखील करतात - ‘बाबा, आयुष्यभर आम्ही बेकायदेशीर काम केले आहे, आता करणार नाही’. सर्वात बेकायदेशीर आहे काम विकाराचे भूत. देह-अभिमानाचे भूत तर सर्वांमध्येच आहे. मायावी पुरुषामध्ये देह-अभिमानच असतो. बाबा तर आहेतच विदेही, विचित्र. तर मुले देखील विचित्र आहेत. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आपण आत्मे विचित्र (निराकारी) आहोत मग इथे चित्रामध्ये (शरीरामध्ये) येतो. आता बाबा पुन्हा म्हणतात विचित्र बना. आपल्या स्वधर्मामध्ये टीका. चित्राच्या धर्मामध्ये (देहाच्या धर्मामध्ये) टिकू नका. विचित्रतेच्या धर्मामध्ये स्थित व्हा. देह-अभिमानामध्ये येऊ नका. बाबा किती समजावून सांगतात - यासाठी आठवणीची खूप आवश्यकता आहे. बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान, पावन बनाल. विकारामध्ये गेल्याने पुष्कळ शिक्षा भोगावी लागते. बाबांचे बनल्यानंतर जर कोणती चूक होते तर मग गायन आहे - ‘सतगुरू के निंदक ठौर न पायें’. जर तुम्ही माझ्या मतावर चालून पवित्र बनला नाहीत तर शंभर पटीने दंड भोगावा लागेल. विवेकाने चालायचे आहे. जर आपण आठवण करू शकत नाही तर इतके पद सुद्धा प्राप्त करू शकणार नाही. पुरुषार्थासाठी वेळ देखील देतात. तुम्हाला लोकं विचारतात, ‘काय पुरावा आहे?’ तुम्ही सांगा, ‘ज्या तनामध्ये येतात ते प्रजापिता ब्रह्मा तर मनुष्य आहेत ना. मनुष्याचे नाव शरीरावरून पडते. शिवबाबा तर ना मनुष्य आहेत, ना देवता आहेत. त्यांना सुप्रीम आत्मा म्हटले जाते. ते काही पतित अथवा पावन बनत नाहीत, ते तर म्हणतात - ‘माझी आठवण केल्याने तुमची पापे भस्म होतील’. बाबाच बसून समजावून सांगतात, ‘तुम्ही सतोप्रधान होता, आता तमोप्रधान बनले आहात. पुन्हा सतोप्रधान बनण्यासाठी माझी आठवण करा’. या देवतांची क्वालिफिकेशन (योग्यता) पहा कशी आहे आणि त्यांच्याकडून दया मागणाऱ्यांना सुद्धा पहा आश्चर्य वाटते - आपण कोण होतो! मग ८४ जन्मांमध्ये किती घसरण होत एकदम अधोगती झाली आहे.

बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो, तुम्ही दैवी घराण्याचे होता. आता आपले वर्तन पहा असे देवी-देवता बनू शकता का? असे नाही, सगळेच लक्ष्मी-नारायण बनतील. मग तर संपूर्ण बगीचा फूलांचा होईल. शिवबाबांना फक्त गुलाबाची फूलेच वाहतात का, परंतु नाही, अकची फूले देखील वाहतात. बाबांची मुले कोणी फूल देखील बनतात, कोणी अक सुद्धा बनतात. पास-नापास होणारे तर असतातच. स्वतः देखील समजतात की, मी राजा बनू शकणार नाही. आप समान बनवतच नाहीत; श्रीमंत कसे आणि कोण बनणार ते तर बाबाच जाणतात. पुढे जाऊन तुम्हा मुलांना देखील समजून येईल की, हा अमका बाबांचा कसा मदतगार आहे. कल्प-कल्प ज्यांनी जे काही केले आहे तेच करणार. यामध्ये बदल होऊ शकत नाही. बाबा पॉईंट्स तर देत असतात - अशी-अशी बाबांची आठवण करायची आहे आणि ट्रान्सफर सुद्धा करायचे आहे. भक्ती मार्गामध्ये तुम्ही ईश्वर अर्थ करता. परंतु ईश्वराला जाणत नाही. एवढे तर समजता की सर्वश्रेष्ठ भगवान आहेत. असे नाही की सर्वश्रेष्ठ नाव-रूपवाले आहेत. ते आहेतच निराकार. मग सर्वश्रेष्ठ साकार इथे असतात. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देवता म्हटले जाते. ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः मग म्हणतात शिव परमात्माए नमः. तर परमात्मा मोठे झाले ना. ब्रह्मा, विष्णू, शंकराला परमात्मा म्हणणार नाही. तोंडाने म्हणतात देखील शिव परमात्माए नमः तर जरूर परमात्मा एकच आहेत ना. देवतांना नमन करतात. मनुष्यलोकमध्ये मनुष्याला मनुष्यच म्हणणार. त्यांना मग परमात्माए नमः म्हणणे - हे तर पूर्णत: अज्ञान आहे. सर्वांच्या बुद्धीमध्ये हेच आहे की, ईश्वर सर्वव्यापी आहे. आता तुम्ही मुले समजता भगवान तर एकच आहेत, त्यांनाच पतित-पावन म्हटले जाते. सर्वांना पावन बनविणे हे भगवंताचेच काम आहे. जगत् गुरु कोणी मनुष्य असू शकत नाही. गुरु पवित्र असतात ना. इथे तर सर्व आहेत विकारातून जन्म घेणारे. ज्ञानाला अमृत म्हटले जाते. भक्तीला अमृत म्हटले जात नाही. भक्ती मार्गामध्ये भक्तीच चालते. सर्व मनुष्य भक्तीमध्ये आहेत. ज्ञानसागर, जगत् गुरु एकालाच म्हटले जाते. आता तुम्ही जाणता बाबा येऊन काय करतात. तत्वांना देखील पवित्र बनवतात. ड्रामामध्ये त्यांचा पार्ट आहे. बाबा निमित्त बनतात सर्वांचे सद्गती दाता आहेत. आता हे समजावून सांगणार कसे. येतात तर खूप. उद्घाटन करण्यासाठी येतात तर तार पाठवली जाते की, ‘आगामी विनाशाच्या अगोदर बेहदच्या बाबांना जाणून त्यांच्याकडूनच वारसा घ्या’. हे आहेत रुहानी बाबा. जे कोणी मनुष्यमात्र आहेत सर्वजण त्यांना ‘फादर’ म्हणतात. क्रियेटर आहेत तर जरूर क्रिएशनला (मुलांना) वारसा मिळणार. बेहदच्या बाबांना कोणीही जाणत नाहीत. बाबांना विसरणे - हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बेहदचे बाबा उच्च ते उच्च आहेत, ते काही हदचा वारसा तर देणार नाहीत ना. लौकिक पिता असताना देखील सर्वजण बेहदच्या पित्याची आठवण करतात. सतयुगामध्ये त्यांची कोणीही आठवण करत नाहीत कारण बेहद सुखाचा वारसा मिळालेला असतो. आता तुम्ही बाबांची आठवण करता. आत्माच आठवण करते नंतर मग आत्मेच स्वतःला आणि आपल्या पित्याला, ड्रामाला विसरून जातात. मायेची सावली पडते. सतोप्रधान बुद्धीला पुन्हा तमोप्रधान जरूर बनायचे आहे. लक्षात येते, नवीन दुनियेमध्ये देवी-देवता सतोप्रधान होते, हे कोणीही जाणत नाही. दुनियाच सतोप्रधान गोल्डन एजड बनते. त्याला म्हटले जाते - नवीन दुनिया. हे आहे आयरन एजड वर्ल्ड (कलियुगी दुनिया). या सर्व गोष्टी बाबाच येऊन मुलांना समजावून सांगतात. कल्प-कल्प जो वारसा तुम्ही घेता, पुरुषार्था अनुसार तोच मिळणार आहे. तुम्हाला देखील आता माहीत झाले आहे की आम्ही हे देवी-देवता होतो मग असे खाली आलो आहोत. बाबाच सांगतात की, असे-असे होणार. काहीजण म्हणतात की प्रयत्न तर खूप करतो परंतु आठवण टिकत नाही. यामध्ये बाबा अथवा टीचर काय करणार, कोणी अभ्यास करणार नसेल तर टीचर तरी काय करणार. टीचर आशीर्वाद देतील तर मग सगळेच पास होतील. अभ्यास करण्यामध्ये फरक तर खूप असतो. हे आहे पूर्णपणे नवीन शिक्षण (ज्ञान). येथे तुमच्याकडे जास्त करून गरीब दुःखीच येतील. श्रीमंत येणार नाहीत. दुःखी आहेत तेव्हाच येतात. श्रीमंत समजतात की आम्ही तर स्वर्गामध्ये बसलो आहोत. नशिबात नाही, ज्यांच्या नशिबात आहे त्यांचा लगेच विश्वास बसतो. निश्चय होणे आणि संशय येणे यासाठी वेळ लागत नाही. माया ताबडतोब विसरायला लावते. वेळ तर लागतो ना. यामध्ये गोंधळून जाण्याचे कारण नाही. आपल्या स्वतःवर दया करायची आहे. श्रीमत तर मिळत असते. बाबा, किती सोपी गोष्ट सांगतात फक्त स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा.

तुम्ही जाणता हा आहेच मृत्यूलोक, तो आहे अमरलोक. तिथे अकाली मृत्यू होत नाही. क्लासमध्ये विद्यार्थी नंबरवार बसतात ना. ही देखील शाळा आहे ना. ब्राह्मणीला विचारले जाते तुमच्याकडे नंबरवार हुशार मुले कोणती आहेत? जे चांगला अभ्यास करतात, ते राईट साईडला असले पाहिजेत. राईट हँडचे महत्त्व असते ना. पूजा इत्यादी देखील राईट हँडने केली जाते. मुलांनो, विचार करत रहा - सतयुगामध्ये काय असेल. सतयुगाची आठवण येईल तर सत् बाबांची देखील आठवण येईल. बाबा आम्हाला सतयुगाचा मालक बनवतात. तिथे हे माहीत नसते की आपल्याला ही बादशाही कशी मिळाली; म्हणून बाबा म्हणतात या लक्ष्मी-नारायणाला देखील हे ज्ञान नाही आहे. बाबा प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजावून सांगत राहतात; पूर्वीच्या कल्पात ज्यांना समजले आहे तेच जरूर समजतील. तरीही पुरुषार्थ करावाच लागतो ना. बाबा येतातच शिकविण्यासाठी. हे शिक्षण आहे, यासाठी चांगले हुशार असले पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हे रूहानी शिक्षण खूप उच्च आणि कठीण आहे, यामध्ये पास होण्यासाठी बाबांच्या आठवणीने आशीर्वाद घ्यायचा आहे. आपले कॅरॅक्टर (वर्तन) सुधारायचे आहे.

२) आता कोणतेही बेकायदेशीर काम करायचे नाही. विचित्र (बिंदुरूप) बनून आपल्या स्वधर्मामध्ये स्थित व्हायचे आहे आणि विचित्र बाबांच्या कायदेशीर मतावर चालायचे आहे.

वरदान:-
बाबांच्या साथीने पवित्रता रुपी स्वधर्माचे सहज पालन करणारे मास्टर सर्वशक्तिमान भव

आत्म्याचा स्वधर्म पवित्रता आहे, अपवित्रता परधर्म आहे. जेव्हा स्वधर्माचा निश्चय होतो तेव्हा परधर्म तुम्हाला विचलित करू शकत नाही. बाबा जे आहेत, जसे आहेत, जर त्यांना यथार्थपणे ओळखून सोबत ठेवता तेव्हा पवित्रता रुपी स्वधर्माला धारण करणे (अंगिकारणे) खूप सोपे होते, कारण स्वयं सर्वशक्तिमान साथी आहे. सर्वशक्तीमानची मुले मास्टर सर्वशक्तिमानच्या समोर अपवित्रता येऊ शकत नाही. संकल्पामध्ये जरी माया येत असेल तर जरूर कुठले तरी गेट उघडे आहे किंवा निश्चयामध्ये उणीव आहे.

बोधवाक्य:-
त्रिकालदर्शी कोणत्याही गोष्टीला एका काळाच्या दृष्टीने पाहत नाहीत, ते प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण समजतात.