04-11-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता तुम्ही सत्य बाबांद्वारे सत्य देवता बनत आहात, म्हणून सतयुगामध्ये सत्संग करण्याची आवश्यकता नाही”

प्रश्न:-
सतयुगामध्ये देवतांकडून कोणतेही विकर्म होऊ शकत नाही, असे का?

उत्तर:-
कारण त्यांना सत्य बाबांकडून वरदान मिळालेले आहे. विकर्म तेव्हा होते जेव्हा रावणाचा शाप मिळायला सुरुवात होते. सतयुग-त्रेतामध्ये आहेच मुळी सद्गती, त्या वेळी दुर्गतीचे नावही नसते. विकारच नाहीत ज्यामुळे विकर्म होतील. द्वापर-कलियुगामध्ये सर्वांची दुर्गती होते, त्यामुळे विकर्म होत राहतात. या देखील समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांना बाबा बसून समजावून सांगतात - हे सुप्रीम पिता देखील आहेत, सुप्रीम टीचर सुद्धा आहेत, सुप्रीम सद्गुरू सुद्धा आहेत. बाबांची अशी महिमा सांगितल्यामुळे आपोआप सिद्ध होते की श्रीकृष्ण कोणाचा पिता असू शकत नाही. तो तर छोटा मुलगा, सतयुगाचा राजकुमार आहे. तो टीचर सुद्धा होऊ शकत नाही. तो स्वतःच बसून टीचर कडून शिकत आहे. गुरू काही तिथे असत नाही, कारण तिथे सर्व सद्गतीमध्ये आहेत. अर्धे कल्प आहे सद्गती, अर्धे कल्प आहे दुर्गती. तर तिथे आहे सद्गती, त्यामुळे तिथे ज्ञानाची गरज भासत नाही. नाव सुद्धा नाहीये कारण ज्ञानामुळे २१ जन्मांसाठी सद्गती मिळते मग द्वापरपासून कलियुगाच्या अंतापर्यंत आहे दुर्गती. तर मग श्रीकृष्ण द्वापरमध्ये कसा येऊ शकेल? हे देखील कोणाच्या लक्षात येत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये खूपच गूढ रहस्य भरलेले आहे, जे समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. ते सुप्रीम पिता, सुप्रीम टीचर आहेत. इंग्रजीमध्ये सुप्रीमच म्हटले जाते. काही इंग्रजी शब्द चांगले असतात. जसा ‘ड्रामा’ शब्द आहे. ड्रामाला नाटक म्हणणार नाही, नाटकामध्ये तर अदला-बदली होते. हे सृष्टीचे चक्र फिरते - असे म्हणतात देखील, परंतु कसे फिरते, हुबेहूब फिरते की बदल होतो, हे कोणालाही ठाऊक नाही आहे. म्हणतात देखील - ‘बनी-बनाई बन रही…’ जरूर कोणता तरी खेळ आहे जो पुन्हा फिरत राहतो. या चक्रामध्ये मनुष्यांनाच चक्कर लावावी लागते. अच्छा, या चक्राचे आयुर्मान किती आहे? कशी पुनरावृत्ती होते? याला फिरण्यासाठी किती वेळ लागतो? हे कोणीही जाणत नाहीत. इस्लामी-बौद्ध इत्यादी ही सर्व आहेत घराणी, ज्यांचा ड्रामामध्ये पार्ट आहे.

तुम्हा ब्राह्मणांची डिनायस्टी (घराणे) नाहीये, हे आहे ब्राह्मण कूळ. सर्वोत्तम ब्राह्मण कुळ म्हटले जाते. देव-देवींचे देखील कुळ आहे. हे तर समजावून सांगणे खूप सोपे आहे. सूक्ष्मवतनमध्ये फरिश्ते राहतात. तिथे हड्डी-मांस असत नाही. देवतांना तर हड्डी-मांस आहे ना. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. विष्णूच्या नाभी-कमळातून ब्रह्मा का दाखवला आहे? सूक्ष्मवतनमध्ये तर या गोष्टी असत नाहीत. ना हिरे-माणके इत्यादी असू शकतात, म्हणून ब्रह्माला सफेद वस्त्रधारी ब्राह्मण दाखवला आहे. ब्रह्मा सामान्य मनुष्य अनेक जन्मांच्या शेवटी गरीब झाला ना. या वेळी आहेतच खादीचे कपडे. ते बिचारे समजत नाहीत की, सूक्ष्म शरीर काय असते. तुम्हाला बाबा समजावून सांगतात - तिथे आहेतच फरिश्ते, ज्यांना हड्डी-मांस काही असत नाही. सूक्ष्मवतनमध्ये तर हा शृंगार इत्यादी असता कामा नये. परंतु चित्रांमध्ये दाखवला आहे तर बाबा त्याचाच साक्षात्कार करवून मग अर्थ समजावून सांगतात. जसा हनुमानाचा साक्षात्कार करवतात. आता हनुमानासारखा मनुष्य तर कोणी असत नाही. भक्तीमार्गामध्ये अनेक प्रकारची चित्रे बनवली आहेत, ज्यांच्यावर विश्वास बसला आहे; त्यांना असे काही सांगितले तर रागावतात. देवी इत्यादींची किती पूजा करतात मग बुडवून टाकतात (विसर्जित करतात). हा सर्व आहे भक्तिमार्ग. भक्तिमार्गाच्या दलदलीमध्ये गळ्यापर्यंत बुडालेले आहेत तर मग त्यांना काढू कसे शकणार? काढणेच अवघड होते. काहीजण तर दुसऱ्यांना दलदलीतून बाहेर काढण्याच्या निमित्त बनून स्वतःच बुडून जातात (विकारात जातात). स्वतः दलदलीमध्ये गळ्यापर्यंत अडकतात अर्थात काम विकारामध्ये कोसळतात. ही आहे सर्वात मोठी दलदल. सतयुगात अशा गोष्टी नसतात. आता तुम्ही सत्य बाबांद्वारे सत्य देवता बनत आहात. मग तिथे सत्संग असत नाहीत. सत्संग इथे भक्तीमार्गामध्ये करत राहतात, समजतात सर्व ईश्वराची रूपे आहेत. काहीही समजत नाहीत. बाबा बसून समजावून सांगतात - कलियुगामध्ये आहेत सर्व पाप-आत्मे, सतयुगामध्ये असतात पुण्य-आत्मे. रात्रं-दिवसाचा फरक आहे. तुम्ही आता संगमावर आहात. कलियुग आणि सतयुग दोन्हीला जाणता. मूळ गोष्ट आहे - या तीरावरून त्या तीरावर जाण्याची. क्षीरसागर आणि विषय-सागर यांचे गायन देखील आहे परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. आता बाबा बसून कर्म-अकर्माचे रहस्य समजावून सांगतात. कर्म तर मनुष्य करतातच मग काही कर्म अकर्म बनतात तर काही विकर्म बनतात. रावणराज्यामध्ये सारी कर्म ही विकर्म बनतात, सतयुगामध्ये विकर्म होत नाही कारण तिथे आहे रामराज्य. बाबांकडून वरदाने मिळालेली आहेत. रावण देतो शाप. हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे ना. दुःखामध्ये सर्वजण बाबांची आठवण करतात. सुखामध्ये कोणी आठवण काढत नाहीत. तिथे विकार असत नाहीत. मुलांना समजावून सांगितले आहे - सॅपलिंग (कलम) लावत आहेत. ही कलम लावण्याची परंपरा सुध्दा आत्ता सुरू झाली आहे. बाबांनी सॅपलिंग (कलम) लावणे सुरू केले आहे. पूर्वी जेव्हा ब्रिटिश गव्हर्मेंट होते तेव्हा कधी वर्तमानपत्रामध्ये छापून येत नव्हते की झाडांची कलमे लावतात. आता बाबा बसून देवी-देवता धर्माचे कलम लावत आहेत, दुसरे कोणते (इतर कोणत्याही धर्माचे) कलम लावत नाहीत. अनेक धर्म आहेत, देवी-देवता धर्म प्राय: लोप झाला आहे. धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट झाल्यामुळे नांवच उलटे-सुलटे ठेवले आहे. जे देवता धर्माचे आहेत त्यांना पुन्हा त्याच देवी-देवता धर्मामध्ये यायचे आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्मातच जायचे आहे. ख्रिश्चन धर्माचा निघून मग देवी-देवता धर्मामध्ये येऊ शकणार नाही. मुक्ती काही होऊ शकत नाही. हां, कोणी देवी-देवता धर्माचा कन्व्हर्ट होऊन ख्रिश्चन धर्मामध्ये गेला असेल तर तो पुन्हा आपल्या देवी-देवता धर्मामध्ये परत येईल. त्यांना हे ज्ञान आणि योग खूप चांगला वाटेल, यावरून हे सिद्ध होते की हा आपल्या धर्माचा आहे. यामध्ये हे समजण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठीही खूप विशाल-बुद्धी पाहिजे. धारणा करायची आहे, पुस्तक वाचून ऐकवायचे नाहीये. जसे कोणी गीता ऐकवतात, मनुष्य बसून ऐकतात. कोणी तर गीतेचे श्लोक एकदम तोंडपाठ करतात. बाकी तर त्याचा अर्थ प्रत्येक जण आपल्या-आपल्या परीने काढत बसतात. सर्व श्लोक संस्कृतमध्ये आहेत. इथे तर गायन आहे की, सागराला शाई बनवा, साऱ्या जंगलाला पेन बनवा तरी देखील ज्ञानाचा अंत होणार नाही. गीता तर खूप छोटी आहे. १८ अध्याय आहेत. एवढीशी छोटी गीता बनवून गळ्यामध्ये घालतात. खूप बारीक अक्षरे असतात. गळ्यामध्ये घालण्याची देखील सवय असते. किती छोटे लॉकेट बनते. वास्तविक आहे तर सेकंदाची गोष्ट. बाबांचा बनला जसा काही विश्वाचा मालक बनला. बाबा मी तुमचा एका दिवसाचा मुलगा आहे, असे देखील लिहायला सुरुवात करतील. एका दिवसामध्ये निश्चय झाला आणि एका झटक्यात पत्र लिहितील. मुलगा बनला तर विश्वाचा मालक झाला. हे देखील कोणाच्या बुद्धीमध्ये मुश्किलीने बसते. तुम्ही विश्वाचे मालक बनता ना. तिथे दुसरा कोणताही खंड असत नाही, नामो-निशाण गायब होते. कोणाला कळतही नाही की, हे खंड होते. जर असते तर जरूर त्यांची हिस्ट्री-जिओग्राफी पाहिजे. तिथे हे असतच नाहीत म्हणून म्हटले जाते - तुम्ही विश्वाचे मालक बनणार आहात. बाबांनी समजावून सांगितले आहे - मी तुमचा पिता देखील आहे, ज्ञानाचा सागर देखील आहे. हे तर खूप उच्च ते उच्च ज्ञान आहे ज्याद्वारे आपण विश्वाचे मालक बनतो. आपले पिता सुप्रीम आहेत, सत्य पिता, सत्य टिचर, सत्य ऐकवितात. बेहदची शिकवण देतात. बेहदचे गुरु आहेत, सर्वांची सद्गती करतात. एकाची महिमा केली तर तीच महिमा दुसऱ्याची असू शकत नाही. मग जेव्हा ते आप समान बनवतील तेव्हा होऊ शकते. तर मग तुम्ही देखील पतित-पावन झालात. सत् नाव लिहितात. पतित-पावनी गंगा या माता आहेत. शिव-शक्ती म्हणा शिव-वंशी म्हणा. शिव-वंशी ब्रह्माकुमार-कुमारी. शिव-वंशी तर सर्वजण आहेत. बाकी ब्रह्मा द्वारा रचना रचतात तर संगमावरच ब्रह्माकुमार-कुमारी असतात. ब्रह्मा द्वारे ॲडॉप्ट करतात. सर्वप्रथम असतात ब्रह्माकुमार-कुमारी. कोणीही जर आक्षेप घेतला तर त्यांना बोला, हे प्रजापिता आहेत, यांच्यामध्ये प्रवेश करतात. बाबा म्हणतात - अनेक जन्मांच्या अंतामध्ये मी प्रवेश करतो. दाखवतात की, विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाला. अच्छा, विष्णू मग कोणाच्या नाभीतून निघाला? यामध्ये बाणाचे चिन्ह काढून दाखवू शकता की, दोघेही ओत-प्रोत आहेत (एकमेकांशी जोडलेले आहेत). ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. हे त्यांच्यातून, ते यांच्यातून जन्मले आहेत. यांना (ब्रह्माला) लागतो एक सेकंद, त्यांना (विष्णूला) लागतात ५००० वर्षे. या वंडरफुल गोष्टी आहेत. तुम्ही बसून समजावून सांगाल. बाबा म्हणतात - लक्ष्मी-नारायण ८४ जन्म घेतात मग त्यांच्याच अनेक जन्मांच्या अंताला मी प्रवेश करून हे (ब्रह्मा) बनवितो. समजून घेण्याची गोष्ट आहे ना. बसाल तर समजावून सांगू की यांना ब्रह्मा का म्हणतात. साऱ्या दुनियेला दाखविण्याकरिता ही चित्रे बनवली आहेत. आम्ही समजावून सांगू शकतो, समजणारेच समजतील. न समजणाऱ्यासाठी म्हणणार - हा आमच्या कुळाचा नाहीये. बिचारा भले तिथे (सतयुगात) येईल परंतु प्रजेमध्ये. आपल्यासाठी तर सर्वजण बिचारे आहेत ना - गरिबाला बिचारा म्हटले जाते. किती पॉईंट्स मुलांना धारण करायचे आहेत. भाषण करायचे असते टॉपिक्सवर. हा टॉपिक काही कमी आहे काय. प्रजापिता ब्रह्मा आणि सरस्वती, ४ भुजा दाखवतात. तर २ भुजा मुलीच्या असतात. युगल काही नाहीये. युगल तर वास्तविक फक्त विष्णूच आहेत. ब्रह्माची मुलगी आहे - सरस्वती. शंकरला देखील युगल नाहीये, त्यामुळे शिव-शंकर म्हणतात. आता शंकर काय करतात? विनाश तर अणुबॉम्ब द्वारे होतो. आता पिता मुलांचा मृत्यू कसा बरें घडवून आणू शकतील, हे तर पाप होईल. बाबा तर अजूनच बिना मेहनत सर्वाना शांतीधामला परत घेऊन जातात. हिशोब चुकता करून सर्वजण घरी जातात कारण महाविनाशाची वेळ आहे. बाबा येतातच मुळी सेवेवर. सर्वांना सद्गती देतात. तुम्ही देखील आधी गतिमध्ये आणि नंतर सद्गतीमध्ये येणार. या गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. या गोष्टींना जरा देखील कोणी जाणत नाही. तुम्ही बघता कोणी तर खूप डोके खातात, अजिबात समजत नाहीत. जे कोणी चांगले समजणारे असतील, ते येऊन समजून घेतील. बोला, प्रत्येक गोष्टी विषयी समजून घ्यायचे असेल तर वेळ द्या. इथे तर फक्त आदेश आहे की, सर्वांना बाबांचा परिचय द्या. हे आहेच काट्यांचे जंगल कारण एकमेकांना दुःख देत राहतात, याला दुःखधाम म्हटले जाते. सतयुग आहे सुखधाम. दु:खधामापासून सुखधाम कसे बनते हे तुम्हाला समजावून सांगतो. लक्ष्मी-नारायण सुखधाममध्ये होते मग ते ८४ जन्म घेऊन दु:खधाममध्ये येतात. हे ब्रह्माचे नाव देखील कसे ठेवले. बाबा म्हणतात - मी यांच्यामध्ये (ब्रह्मामध्ये) प्रवेश करून बेहदचा संन्यास करवितो. एका झटक्यात संन्यास करवितात कारण बाबांना सेवा करून घ्यायची आहे, तेच करवून घेतात. ज्यांचे बसून नाव ठेवले त्यांच्या मागोमाग खूप जण आले. ते लोक मग मांजरीची पिल्ले दाखवतात. या सर्व आहेत दंत कथा. मांजरीची पिल्ले कशी असू शकतात. मांजर थोडीच बसून ज्ञान ऐकणार. बाबा खूप युक्त्या सांगत राहतात. एखादी गोष्ट कोणाला नाही समजली तर त्यांना बोला - तुम्ही जोपर्यंत अल्फ (बाबांना) समजत नाही तोपर्यंत दुसरे काहीही समजू शकणार नाही. एक गोष्ट पक्की करा आणि लिहा, नाहीतर विसरून जाल. माया विसरायला लावेल. मुख्य गोष्ट आहे - बाबांच्या परिचयाची. आमचे बाबा सुप्रीम पिता, सुप्रीम टीचर आहेत जे साऱ्या विश्वाच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात, ज्या विषयी कोणालाच माहिती नाही आहे. हे समजावून सांगण्यासाठी वेळ पाहिजे. जोपर्यंत बाबांना समजून घेतले नाही तोपर्यंत प्रश्नच उत्पन्न होत राहतील. जर तुम्हाला अल्फ (बाबांविषयी) समजले नाही तर बे (बादशाही विषयी) देखील अजिबात समजणार नाही. विनाकारण शंका उत्पन्न करत रहाल - ‘असे का, शास्त्रांमध्ये तर असे म्हणतात…’ म्हणून सर्वात आधी बाबांचा परिचय द्या. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कर्म, अकर्म आणि विकर्माच्या गुह्य गतीला बुद्धीमध्ये ठेऊन आता कोणतीही विकर्म करायची नाहीत, ज्ञान आणि योगाची धारणा करून इतरांना सांगायचे आहे.

२) सत्य बाबांचे सत्य नॉलेज देऊन मनुष्यांना देवता बनविण्याची सेवा करायची आहे. विकारांच्या दलदली मधून सर्वांना बाहेर काढायचे आहे.

वरदान:-
अलौकिक नशेच्या अनुभूती द्वारे निश्चयाचा पुरावा देणारे सदा विजयी भव

अलौकिक रुहानी नशा निश्चयाचा आरसा आहे. निश्चयाचा पुरावा आहे नशा आणि नशेचा पुरावा आहे आनंद. जे सदैव नशेमध्ये आणि आनंदामध्ये राहतात त्यांच्यासमोर मायेची कोणतीही चाल चालू शकत नाही. निश्चिंत बादशहाच्या बादशाहीमध्ये (राज्यामध्ये) माया येऊ शकत नाही. अलौकिक नशा सहजच जुन्या संसाराला अथवा जुन्या संस्कारांना विसरायला लावते म्हणून सदैव आत्मिक स्वरूपाच्या नशेमध्ये, अलौकिक जीवनाच्या नशेमध्ये, फरिश्तेपणाच्या नशेमध्ये अथवा भविष्याच्या नशेमध्ये रहा तर विजयी बनाल.

बोधवाक्य:-
मधुरतेचा गुणच ब्राह्मण जीवनाची महानता आहे, म्हणून मधुर बना आणि मधुर बनवा.

अव्यक्त इशारे:- अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.

जसे मुलांना विदेही बनविण्याकरिता विदेही बापदादांना देहाचा आधार घ्यावा लागतो. अगदी तसेच तुम्ही देखील जीवन जगत असताना, देहामध्ये राहून, विदेही आत्म्याच्या स्थितीमध्ये स्थित होऊन या देहाद्वारे करावनहार बनून कर्म करवून घ्या. हा देह करनहार आहे, तुम्ही देही करावनहार आहात, याच स्थितीला “विदेही स्थिती” म्हणतात. यालाच फॉलो फादर म्हटले जाते. बाबांना फॉलो करण्याची स्थिती आहे सदा अशरिरी भव, विदेही भव, निराकारी भव!