04-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे, आठवणीनेच तुम्ही गोड बनाल, या आठवणीमध्येच मायेचे युद्ध चालते ”

प्रश्न:-
या ड्रामामध्ये असे कोणते रहस्य खूप विचार करण्याजोगे आहे? ज्याला तुम्ही मुलेच जाणता?

उत्तर:-
तुम्ही जाणता की ड्रामामध्ये एक पार्ट दोन वेळा बजावला जाऊ शकत नाही. साऱ्या दुनियेमध्ये जो काही पार्ट बजावला जातो तो एकमेकांपेक्षा नवीन असतो. तुम्ही विचार करता की सतयुगापासून आतापर्यंतचे दिवस कसे बदलत जातात. सर्व ॲक्टिव्हिटी (गतिविधी) बदलून जाते. आत्म्यामध्ये ५००० वर्षांच्या ॲक्टिव्हिटीचे (घडामोडींचे) रेकॉर्ड भरलेले आहे, जे कधीही बदलू शकत नाही. ही छोटीशी गोष्ट तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये येऊ शकत नाही.

ओम शांती।
रूहानी बाबा रूहानी मुलांना विचारतात - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्ही आपला भविष्यातील पुरुषोत्तम चेहरा, पुरुषोत्तम पोशाख पाहता का? हे पुरुषोत्तम संगमयुग आहे ना. तुम्ही अनुभव करता की, आम्ही पुन्हा नवी दुनिया सतयुगामध्ये यांच्या वंशावळीमध्ये जाणार, ज्याला सुखधाम म्हटले जाते. तिथल्यासाठीच तुम्ही आता पुरुषोत्तम बनत आहात. बसल्या-बसल्या हा विचार आला पाहिजे. विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेत असतात तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये हे जरूर असते - उद्या आम्ही हे बनणार. तसेच तुम्ही देखील जेव्हा इथे बसता तेव्हा देखील जाणता की आम्ही विष्णूच्या डिनायस्टीमध्ये जाणार. तुमची बुद्धी आता अलौकिक आहे. दुसऱ्या कोणत्याही मनुष्याच्या बुद्धीमध्ये या गोष्टी उत्पन्न होत नसतील. हा काही साधारण सत्संग नाही आहे. इथे बसले आहात, समजता सत बाबा, ज्यांना ‘शिव’ म्हणतात आम्ही त्यांच्या सोबत बसलो आहोत. शिवबाबाच रचयिता आहेत, तेच या रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. तेच हे नॉलेज देतात. जणूकाही कालचीच गोष्ट ऐकवत आहेत. इथे बसले आहात, हे तरी लक्षात असेल ना - आम्ही आलो आहोत रिज्युवनेट (पुनर्जीवित) होण्याकरिता अर्थात हे शरीर बदलून दैवी शरीर घेण्याकरिता. आत्मा म्हणते आमचे हे तमोप्रधान जुने शरीर आहे. याला बदलून असे शरीर घ्यायचे आहे. किती सोपे एम ऑब्जेक्ट आहे. शिकवणारा शिक्षक जरूर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा हुशार असेल ना. शिकवतात, सत्कर्म देखील शिकवतात. आता तुम्ही समजता - आम्हाला सर्वश्रेष्ठ भगवान शिकवत आहेत तर जरूर देवी-देवताच बनवतील. हे शिक्षण आहेच मुळी नवीन दुनियेसाठी. इतर कुणालाही नव्या दुनियेबद्दल थोडेसुद्धा माहित नाही आहे. हे लक्ष्मी-नारायण नवीन दुनियेचे मालक होते. देवी-देवता देखील नंबरवार तर असतील ना. सगळेच काही एकसारखे असू देखील शकणार नाहीत कारण राजधानी आहे ना. तुमचे असे विचार चालत राहिले पाहिजेत. आपण आत्मे आता पतिता पासून पावन बनण्यासाठी पावन पित्याची आठवण करतो. आत्मा आठवण करते आपल्या गोड बाबांची. बाबा स्वतः म्हणतात - ‘तुम्ही माझी आठवण कराल तर पावन सतोप्रधान बनाल’. सर्व काही आठवणीच्या यात्रेवर अवलंबून आहे. बाबा जरूर विचारतील - ‘मुलांनो, किती वेळ माझी आठवण करता?’ आठवणीच्या यात्रेमध्येच मायेचे युद्ध चालते. तुम्ही याला युद्ध देखील समजता. ही यात्रा नाही परंतु जसे काही युद्ध चालू आहे, यामध्येच खूप खबरदार रहायचे आहे. नॉलेजमध्ये मायेची वादळे वगैरेचा काही प्रश्नच नाही. मुले म्हणतात देखील - ‘बाबा, आम्ही तुमची आठवण करतो, परंतु मायेचे एकच वादळ खाली पाडून घालते.’ एक नंबरचे वादळ आहे - देह-अभिमानाचे. नंतर आहे काम, क्रोध, लोभ, मोहाचे वादळ. मुले म्हणतात - ‘बाबा, आम्ही आठवणीमध्ये राहण्याचा खूप प्रयत्न करतो, कोणतेही विघ्न येऊ नये परंतु तरीदेखील वादळे येतात. आज क्रोधाचे, कधी लोभाचे वादळ आले. बाबा, आज आमची अवस्था खूप चांगली राहिली, पूर्ण दिवसभरामध्ये कोणतेही वादळ आले नाही. खूप आनंद झाला. बाबांची अतिशय प्रेमाने आठवण केली. प्रेमाचे अश्रू देखील येत राहिले. बाबांच्या आठवणीनेच खूप गोड बनाल.

हे देखील समजतात की, आम्ही मायेकडून हार खात-खात कुठवर येऊन पोहोचलो आहोत. हे कोणी समजतात थोडेच. मनुष्य तर लाखो वर्षे म्हणतात किंवा परंपरा म्हणतात. तुम्ही म्हणाल आम्ही आता पुन्हा असे मनुष्यापासून देवता बनत आहोत. हे नॉलेज बाबाच येऊन देतात. विचित्र बाबाच विचित्र नॉलेज देतात. ‘विचित्र’, निराकाराला म्हटले जाते. निराकार हे नॉलेज कसे देतात. बाबा स्वतः समजावून सांगतात की, मी कसा या शरीरामध्ये येतो. तरीही मनुष्य गोंधळतात. या एकाच शरीरामध्ये कसे काय येतील! परंतु ड्रामामध्ये हेच तन (ब्रह्माबाबांचेच शरीर) निमित्त बनते. जराही बदल होऊ शकत नाही. या गोष्टी तुम्हीच समजून घेऊन मग इतरांनाही समजावून सांगता. आत्माच शिकते. आत्माच शिकते आणि शिकवते. आत्मा अतिशय मौल्यवान आहे. आत्मा अविनाशी आहे, फक्त शरीर नष्ट होते. आपण आत्मे आपल्या परमपिता परमात्म्याकडून रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ८४ जन्मांचे नॉलेज घेत आहोत. नॉलेज कोण घेत आहेत? आपण आत्मे. तुम्ही आत्म्यांनीच नॉलेजफुल बाबांकडून मूलवतन, सूक्ष्म वतनला जाणले आहे. मनुष्यांना तर आपण स्वतःला आत्मा समजायचे आहे हेच माहीत नाही आहे. मनुष्य तर स्वतःला शरीर समजून उलटे लटकून पडले आहेत. गायन आहे - आत्मा सत् चित् आनंद स्वरूप आहे. परमात्म्याची सर्वात जास्त महिमा आहे. एका बाबांची किती महिमा आहे. तेच दुःखहर्ता, सुखकर्ता आहेत. मच्छर इत्यादींची काही इतकी महिमा करणार नाही की ते दुःखहर्ता, सुखकर्ता, ज्ञानाचा सागर आहेत. नाही, ही आहे बाबांची महिमा. तुम्ही मुले देखील मास्टर दुःख हर्ता, सुखकर्ता आहात. तुम्हा मुलांना देखील हे नॉलेज नव्हते, जणू बालबुद्धी होता. छोट्या मुलांमध्ये नॉलेज नसते आणि कोणता अवगुणही नसतो, म्हणून त्याला महात्मा म्हटले जाते कारण पवित्र आहे. जितके लहान मूल तितके नंबर वन फूल. बिलकुल जशी कर्मातीत अवस्था आहे. कर्म-अकर्म-विकर्म कशालाच जाणत नाहीत, म्हणून ते फूल आहेत. सर्वांना आकर्षित करतात. जसे एक बाबा सर्वांना आकर्षित करतात. बाबा आलेच आहेत सर्वांना आकर्षित करून सुगंधित फूल बनविण्यासाठी. बरेचजण तर काटे ते काटेच राहतात. ५ विकारांच्या वशिभूत होणाऱ्यांना काटा म्हटले जाते. पहिल्या नंबरचा काटा आहे - देह-अभिमानाचा, ज्यातून इतर काट्यांचा जन्म होतो. काट्यांचे जंगल खूप दुःख देते. विविध प्रकारचे काटे जंगलामध्ये असतात ना म्हणून याला दुःखधाम म्हटले जाते. नवीन दुनियेमध्ये काटे असत नाहीत म्हणून त्याला सुखधाम म्हटले जाते. शिवबाबा फुलांची बाग तयार करतात आणि रावण काट्यांचे जंगल बनवतो म्हणून रावणाला काटेरी झुडपांनी जाळतात आणि बाबांवर फुले वाहतात. या गोष्टींना बाबा जाणतात आणि मुले जाणतात इतर कोणीही जाणत नाहीत.

तुम्ही मुले जाणता - ड्रामामध्ये एक पार्ट दोन वेळा बजावला जाऊ शकत नाही. बुद्धीमध्ये आहे दुनियेमध्ये जो पार्ट बजावला जातो तो एकमेकांपेक्षा नवीन असतो. तुम्ही विचार करा सतयुगापासून आत्तापर्यंत कसे दिवस बदलत जातात संपूर्ण ॲक्टिव्हिटीच (सर्व घडामोडीच) बदलून जातात. ५००० वर्षांच्या ॲक्टिव्हिटीचे (घडामोडींचे) रेकॉर्ड आत्म्यामध्ये भरलेले आहे. ते कधीही बदलू शकत नाही. प्रत्येक आत्म्यामध्ये आपापला पार्ट भरलेला आहे. ही छोटीशी गोष्ट देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येऊ शकत नाही. या ड्रामाच्या भूत, वर्तमान आणि भविष्याला तुम्ही जाणता. ही शाळा आहे ना. पवित्र बनून बाबांची आठवण करण्याचा अभ्यास बाबा शिकवतात. या गोष्टींचा कधी विचार केला होता की बाबा येऊन असे पतिता पासून पावन बनविण्याचे शिक्षण देतील! या शिक्षणानेच आपण विश्वाचे मालक बनू! भक्ती मार्गाची पुस्तकेच वेगळी आहेत, त्याला काही शिक्षण म्हटले जात नाही. ज्ञाना विना सद्गती होईल तरी कशी? पित्या विना ज्ञान तरी कुठून येईल ज्याने सद्गती होईल. सद्गतीमध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा भक्ती कराल का? नाही, तिथे आहेच अपार सुख, मग भक्ती कशासाठी करायची? हे ज्ञान आत्ताच तुम्हाला मिळते. संपूर्ण ज्ञान आत्म्यामध्ये असते. आत्म्याचा कोणता धर्म असत नाही. आत्मा जेव्हा शरीर धारण करते तेव्हा मग म्हणतात - अमका या या धर्माचा आहे. आत्म्याचा धर्म कोणता आहे? एक तर आत्मा बिंदू प्रमाणे आहे आणि शांत स्वरूप आहे, शांतीधाम मध्ये राहते.

आता बाबा समजावून सांगत आहेत - सर्व मुलांचा बाबांवर हक्क आहे. अशी बरीच मुले आहेत जी दुसऱ्या इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाली आहेत. ती मग निघून आपल्या खऱ्या धर्मामध्ये येतील. जे देवी-देवता धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये गेले आहेत ती सर्व पाने परत आपल्या जागेवर येतील. तुम्हाला सुरुवातीला तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. या गोष्टींमध्येच सर्वजण गोंधळून गेले आहेत. तुम्ही मुले समजता आता आपल्याला कोण शिकवत आहेत? बेहदचे बाबा. श्रीकृष्ण तर देहधारी आहे, यांना (ब्रह्मा बाबांना) देखील दादा म्हणणार. तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात ना. नंतर मग आहे पदावरती. भावाचे शरीर कसे आहे, बहिणीचे शरीर कसे आहे. आत्मा तर एक छोटा तारा आहे. एवढे सर्व नॉलेज एका छोट्याशा ताऱ्यामध्ये आहे. तारा शरीरा शिवाय बोलू देखील शकत नाही. ताऱ्याला पार्ट बजावण्यासाठी इतके अनेक ऑर्गन्स (कर्मेंद्रिये) मिळाले आहेत. तुम्हा तार्यांची दुनियाच वेगळी आहे. आत्मा इथे येऊन मग शरीर धारण करते. शरीर लहान-मोठे होते. आत्माच आपल्या पित्याची आठवण करते. ते देखील जोपर्यंत शरीरामध्ये आहे. घरी (परमधाम मध्ये) आत्मा बाबांची आठवण करेल? नाही. तिथे काहीच समजून येत नाही की आपण कुठे आहोत! आत्मा आणि परमात्मा दोन्ही जेव्हा शरीरामध्ये असतात तेव्हा आत्म्यांचे आणि परमात्म्याचे मिलन म्हटले जाते. गायन देखील आहे - ‘आत्मा और परमात्मा अलग रहे बहुकाल…’ किती काळ वेगळे राहिलात? आठवते का - किती काळ वेगळे राहिलात ते? सेकंद-सेकंद पास होत ५ हजार वर्षे निघून गेली. पुन्हा एक नंबर पासून सुरू करायचे आहे, अचूक हिशोब आहे. आता तुम्हाला कोणी विचारले की याने (श्रीकृष्णाने) केव्हा जन्म घेतला होता? तर तुम्ही अचूक सांगू शकता. श्रीकृष्णच पहिला जन्म घेतो. शिवबाबांची तर मिनिटे, सेकंद काहीही काढू शकत नाही. श्रीकृष्णाची तिथी तारीख, मिनिट, सेकंद काढू शकता. मानवी घड्याळामध्ये फरक पडू शकतो. शिवबाबांच्या अवतरणामध्ये तर बिलकुल फरक पडू शकत नाही. कळतही नाही की कधी आले? असेही नाही की, साक्षात्कार झाला तेव्हा आले, नाही. अंदाज लावू शकत नाही. मिनिटे, सेकंदाचा हिशोब सांगू शकत नाहीत. त्यांचे अवतरण देखील अलौकिक आहे, ते येतातच बेहदच्या रात्रीच्या वेळी. बाकी इतरही जे अवतार इत्यादी होतात, त्यांच्याविषयी समजून येते. आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते. लहान वस्त्र (शरीर) धारण करते. मग हळू-हळू मोठे होते. शरीरासोबत आत्मा बाहेर येते. या सर्व गोष्टींचे विचार सागर मंथन करून मग इतरांनाही समजावून सांगायचे असते. किती खंडीभर मनुष्य आहेत, एक दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही; किती मोठा मंडप आहे. जणूकाही मोठा हॉल आहे, ज्यामध्ये बेहदचे नाटक चालू आहे.

तुम्ही मुले इथे येता नरापासून नारायण बनण्यासाठी. बाबा जी नवीन सृष्टी रचतात त्यामध्ये उच्च पद घेण्यासाठी. बाकी ही जी जुनी दुनिया आहे ती तर विनाश होणार आहे. बाबांद्वारे नवीन दुनियेची स्थापना होत आहे. बाबांना मग पालना देखील करायची आहे. तर जरूर जेव्हा हे शरीर सोडतील तेव्हा मग सतयुगामध्ये नवीन शरीर घेऊन पालना करतील. तत्पूर्वी या जुन्या दुनियेचा विनाशही होणार आहे. भंभोरला (जुन्या दुनियेला) आग लागेल. मागे हा भारतच राहील बाकी तर नष्ट होऊन जातील. भारतातही फार थोडे वाचतील. तुम्ही आता मेहनत करत आहात की विनाशा नंतर मग शिक्षा भोगावी लागू नये. जर विकर्म विनाश झाली नाहीत तर मग सजा देखील खाल आणि पद सुद्धा मिळणार नाही. तुम्हाला जेव्हा कोणी विचारतात की, तुम्ही कोणाकडे जाता? तर बोला, शिव बाबांकडे, जे ब्रह्माच्या तनामध्ये आलेले आहेत. हे ब्रह्मा काही शिव नाही आहेत. जितके बाबांना ओळखाल तितके तुम्ही बाबांवर प्रेमही कराल. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही इतर कोणावरही प्रेम करू नका, बाकीच्यांवरील प्रेम तोडून टाकून एका सोबत जोडा. जसे आशिक-माशुक असतात ना. हे देखील असेच आहे. १०८ खरे आशिक बनतात, त्यातही ८ खरेखुरे बनतात. ८ ची देखील माळा असते ना. ९ रत्न गायले गेले आहेत. ८ मणी, ९ वे बाबा. मुख्य आहेत ८ देवता, नंतर मग त्रेताच्या अंतापर्यंत १६,१०८ राजकुमार-राजकुमारींचे कुटुंब बनते. बाबा तर तळहातावर स्वर्ग दाखवतात. तुम्हा मुलांना नशा आहे की आपण तर सृष्टीचे मालक बनतो. बाबांसोबत असा सौदा करायचा आहे. म्हणतात - कोणी विरळाच व्यापारी हा सौदा करेल. असा कोणी व्यापारी आहे थोडाच. तर मुलांनो अशा उत्साहामध्ये रहा की, आम्ही चाललो बाबांकडे. वरचे बाबा. दुनियेला माहित नाही आहे, ते म्हणतील की ते तर शेवटी येतात. आता तोच कलियुगाचा अंत आहे. तोच गीता, महाभारताचा काळ आहे, तेच यादव जे मुसळ (मिसाईल) काढत आहेत. तेच कौरवांचे राज्य आणि तेच तुम्ही पांडव उभे आहात. तुम्ही मुले आता घर बसल्या आपली कमाई करत आहात. ईश्वर घरबसल्या आलेले आहेत म्हणून बाबा म्हणतात की, ‘आपली कमाई करून घ्या’. हाच हिऱ्यासमान जन्म अमूल्य गायलेला आहे. आता याला कवडीच्या बदल्यात गमावायचे नाहीये. आता तुम्ही या साऱ्या दुनियेला रामराज्य बनवता. तुम्हाला शिवाकडून शक्ती मिळत आहे. बाकी आजकाल अनेकांचा अकाली मृत्यू देखील होतो. बाबा बुद्धीचे कुलूप उघडतात आणि माया बुद्धीचे कुलूप बंद करते. आता तुम्हा मातांनाच ज्ञानाचा कलश मिळाला आहे. अबलांना बळ देणारे ते (शिवबाबा) आहेत. हेच ज्ञान अमृत आहे. शास्त्रांच्या ज्ञानाला काही अमृत म्हटले जात नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांच्या आकर्षणामध्ये राहून सुगंधित फूल बनायचे आहे. आपल्या गोड बाबांची आठवण करून देह-अभिमानाचे काटे जाळून टाकायचे आहेत.

२) या हिरेतुल्य जन्मामध्ये अविनाशी कमाई जमा करायची आहे, कवड्यांच्या बदल्यात याला गमावायचे नाही आहे. एका बाबांवर खरे प्रेम करायचे आहे, एकाच्या संगती मध्ये रहायचे आहे.

वरदान:-
ब्राह्मण जीवनामध्ये कायम खुशीचा खुराक खाणारे आणि खुशी वाटणारे खुशनसीब भव

या दुनियेमध्ये तुम्हा ब्राह्मणांसारखे खुशनसीब (भाग्यशाली) कोणीही असू शकत नाही कारण या जीवनामध्येच तुम्हा सर्वांना बापदादांचे दिल तख्त (हृदय सिंहासन) मिळते. कायम खुशीचा खुराक खाता आणि खुशी वाटता. यावेळी निश्चिंत बादशहा आहात. असे निश्चिंत जीवन साऱ्याकल्पामध्ये अजून कोणत्याही युगामध्ये नाही. सतयुगामध्ये निश्चिंत असाल परंतु तिथे ज्ञान नसेल, आता तुम्हाला ज्ञान आहे म्हणून मनापासून निघते - ‘माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही’.

बोधवाक्य:-
संगम युगातील स्वराज्य अधिकारीच भविष्यातील विश्वराज्य अधिकारी बनतात.