05-01-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
17.10.2003 ओम शान्ति
मधुबन
“संपूर्ण वर्ष -
संतुष्टमणी बनून सदैव संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा”
आज दिलाराम बापदादा
आपल्या चोहो बाजूच्या, समोर असणाऱ्यांना सुद्धा आणि दूर सो समीप असणाऱ्यांना सुद्धा
प्रत्येक राज दुलारे, अति प्रिय मुलांना पाहून हर्षित होत आहेत. प्रत्येक मुलगा राजा
आहे म्हणून ‘राज-दुलारा’ आहे. हे परमात्म प्रेम, दुलार (लाड) विश्वातील फार थोड्या
आत्म्यांना प्राप्त होते. परंतु तुम्ही सर्व परमात्म प्रेम, परमात्म लाडाचे अधिकारी
आहात. दुनियेतील आत्मे बोलावत आहेत - ‘या, या’, परंतु तुम्ही सर्व परमात्म प्रेम
अनुभव करत आहात. परमात्म पालनेमध्ये संगोपन होत आहे. असे आपले भाग्य अनुभव करता का?
बापदादा सर्व मुलांना डबल राज्य अधिकारी बघत आहेत. आत्ताचे सुद्धा स्व-राज्य अधिकारी
राजे आहात आणि भविष्यामध्ये तर राज्य तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तर डबल राजे आहात.
सर्वजण राजा आहात ना, प्रजा तर नाही ना! राजयोगी आहात कि कोणी-कोणी प्रजा योगी
सुद्धा आहेत? आहेत कोणी प्रजा योगी, मागचे राजयोगी आहात? कोणी प्रजायोगी तर नाही
आहेत ना! पक्के? विचार करून हां म्हणा! राज्य अधिकारी अर्थात सर्व सूक्ष्म आणि
स्थूल कर्मेंद्रियांचे अधिकारी कारण स्वराज्य आहे ना? तर कधी-कधी राजे बनता कि नेहमी
राजा बनून राहता? मुख्य आहे आपल्या मन-बुद्धी-संस्कारांचे देखील अधिकारी आहात? सदैव
अधिकारी आहात कि कधी-कधी असता? स्व राज्य तर सदैव स्वराज्य असते कि एक दिवस असते
दुसऱ्या दिवशी नसते. राज्य तर सदैव असते ना? तर सदैव स्वराज्य अधिकारी अर्थात सदैव
मन-बुद्धी-संस्कारांवर अधिकार. सदैव आहे? सदैव मध्ये ‘होय’ म्हणत नाही आहेत? कधी मन
तुम्हाला चालवते कि तुम्ही मनाला चालवता? कधी मन मालक बनते? बनते ना! तर सदैव
स्वराज्य अधिकारी सो विश्व राज्य अधिकारी.
नेहमी चेक करा - जितका
वेळ आणि जितक्या ताकतीने आपल्या कर्मेंद्रियांवर, मन-बुद्धी-संस्कारांवर आत्ता
अधिकारी बनता तितकाच भविष्यामध्ये राज्य अधिकार मिळतो. जर आत्ता परमात्म पालना,
परमात्म शिक्षण, परमात्म श्रीमताच्या आधारावर हा एक संगमयुगाचा जन्म सदैव अधिकारी
नसाल तर मग २१ जन्म कसे काय राज्य अधिकारी बनणार? हिशोब आहे ना! या वेळचे स्वराज्य,
स्वतःचे राजा बनल्यानेच २१ जन्मांची गॅरंटी आहे. मी कोण आहे आणि काय बनणार आहे, आपले
भविष्य वर्तमानाच्या अधिकाराद्वारे स्वतःच जाणू शकता. विचार करा, तुम्हा विशेष
आत्म्यांची अनादि आदि पर्सनॅलिटी आणि रॉयल्टी किती उच्च आहे! अनादि रूपामध्ये सुद्धा
बघा जेव्हा तुम्ही आत्मे परमधाममध्ये असता तेव्हा किती चमकणारे आत्मे दिसत असता.
त्या तेजाची रॉयल्टी, पर्सनॅलिटी किती मोठी आहे. दिसून येते का? आणि बाबांसोबतच
आत्मा रूपामध्ये देखील राहता, जवळ राहता. जसे आकाशामध्ये काही-काही तारे खूप जास्त
चमकणारे असतात ना! तसे तुम्ही आत्मे सुद्धा विशेष बाबांच्या सोबत आणि विशेष चमकणारे
तारे असता. परमधाममध्ये सुद्धा तुम्ही बाबांच्या जवळ आहात आणि नंतर आदि सतयुगामध्ये
देखील तुम्हा देव आत्म्यांची पर्सनॅलिटी, रॉयल्टी किती उच्च आहे. साऱ्या कल्पामध्ये
फेरी मारा, धर्म आत्मे झाले, महात्मा झाले, धर्म पिता झाले, नेता झाले, अभिनेता झाले,
अशी पर्सनॅलिटी कोणाची आहे, जी तुम्हा देव आत्म्यांची सतयुगामध्ये आहे? आपले देव
स्वरूप समोर येत आहे ना? येत आहे कि माहिती नाही आम्ही बनणार कि नाही? पक्के आहे
ना! आपले देव रूप समोर आणा आणि बघा, पर्सनॅलिटी समोर आली? किती रॉयल्टी आहे, प्रकृति
देखील पर्सनॅलिटी वाली होते. पक्षी, वृक्ष, फळं, फुलं सर्व पर्सनॅलिटी वाले, रॉयल.
अच्छा, आता खाली या, तर आपले पूज्य रूप बघितले आहे? तुमची पूजा होते! डबल फॉरेनर्स
पूज्य बनणार कि इंडियावाले बनणार? तुम्ही लोक देवी, देवता बनले आहात? सोंडवाले नाही,
शेपटी वाले नाही. देवी सुद्धा ती काली रूपातील नाही, परंतु देवतांच्या मंदिरामध्ये
बघा, तुमच्या पूज्य स्वरूपाची किती रॉयल्टी आहे? किती पर्सनॅलिटी आहे? मूर्ती असेल,
४ फुट, ५ फुटाची आणि मंदिर किती मोठे बनवतात. ही रॉयल्टी आणि पर्सनॅलिटी आहे.
आजकालचे भले प्राईम मिनिस्टर असोत, नाहीतर राजा असेल परंतु बिचाऱ्याचा उन्हामध्ये
पुतळा बनवून ठेवतात, काहीही होत असले तरीही. आणि तुमच्या पूज्य स्वरूपाची पर्सनॅलिटी
किती मोठी आहे. आहे ना उत्कृष्ट! कुमारी बसलेल्या आहेत ना! रॉयल्टी आहे ना तुमची?
मग अंताला संगमयुगामध्ये देखील तुम्हा सर्वांची रॉयल्टी किती उच्च आहे. ब्राह्मण
जीवनाची पर्सनॅलिटी किती मोठी आहे! डायरेक्ट ईश्वराने तुमच्या ब्राह्मण जीवनामध्ये
पर्सनॅलिटी आणि रॉयल्टी प्रदान केली आहे. ब्राह्मण जीवनाचा चित्रकार कोण? स्वयं बाबा.
ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी रॉयल्टी कोणती आहे? प्युरिटी (पवित्रता). प्युरिटीच
रॉयल्टी आहे. आहे ना! सर्व ब्राह्मण आत्मे जे कोणी बसले आहात तर प्युरिटीची रॉयल्टी
आहे ना! होय, मान हलवा. मागे बसलेले हात वर करत आहेत. तुम्ही मागे नाही आहात, समोर
आहात. बघा नजर मागे जाते, पुढे तर असे बघावे लागते मागे नजर आपोआप जाते.
तर चेक करा -
प्युरिटीची पर्सनॅलिटी सदैव राहते? मनसा-वाचा-कर्मणा, वृत्ती, दृष्टी आणि कृती
सगळ्यामध्ये प्युरीटी आहे? मनसा प्युरिटी अर्थात सदैव आणि सर्वांप्रती शुभ भावना,
शुभ कामना - सर्वांप्रती. ती आत्मा कशीही असो परंतु प्युरीटीच्या रॉयल्टीची मनसा आहे
- सर्वांप्रती शुभ भावना, शुभ कामना, कल्याणाची भावना, दयेची भावना, दाता पणाची
भावना. आणि दृष्टी मध्ये एक तर सदैव प्रत्येकाचे आत्मिक स्वरूप दिसावे किंवा फरिश्ता
रूप दिसावे. जरी तो फरिश्ता बनलेला नाही आहे, परंतु माझ्या दृष्टी मध्ये फरिश्ता
रूप आणि आत्मिक रूपच असावे आणि कृती अर्थात संबंध संपर्कामध्ये, कर्मामध्ये येणे,
त्यामध्ये नेहमीच सर्वांना स्नेह देणे, सुख देणे. मग जरी दुसरा स्नेह देईल, किंवा
देणार नाही परंतु माझे कर्तव्य आहे स्नेह देऊन स्नेही बनविणे. सुख देणे. स्लोगन आहे
ना - ‘ना दुःख दो, ना दुःख लो’. द्यायचे पण नाही, घ्यायचे पण नाही. देणारे तुम्हाला
दुःख सुद्धा देतील परंतु तुम्ही त्याला सुखाच्या स्मृतीने पहा. पडलेल्याला पाडले
जात नाही, पडलेल्याला नेहमी वर उठवले जाते. तो परवश होऊन दुःख देत आहे. पडला ना! तर
त्याला पाडायचे नाहीये आणखीनच त्या बिचाऱ्याला एक लाथ मारा, असे नाही. त्याला
स्नेहाने वर उठवा. त्यामध्ये सुद्धा चॅरिटी बिगिन्स ऍट होम. पहिल्यांदा तर चॅरिटी
बिगिन्स होम आहे ना, आपले सर्व साथीदार, सेवेचे सोबती, ब्राह्मण परिवारातील साथी
प्रत्येकाला वर उठवा. ते आपले वाईट दाखवतील सुद्धा परंतु तुम्ही त्यांची विशेषता पहा.
नंबरवार तर आहेत ना! बघा, माळा तुमची यादगार आहे. तर सर्वच एक नंबर तर नाही आहेत
ना! १०८ नंबर आहेत ना! तर नंबरवार आहेत आणि असणार परंतु माझे कर्तव्य काय आहे? असा
विचार करू नका - ठीक आहे, मी ८ मध्ये तर नाहीच आहे, १०८ मध्ये कदाचित येईन. तर १०८
मध्ये लास्ट सुद्धा असू शकतो तर माझ्या मध्ये देखील काही संस्कार तर असणार ना, परंतु
नाही. दुसऱ्यांना सुख देता-देता, स्नेह देता-देता तुमचे संस्कार सुद्धा स्नेही, सुखी
बनणारच आहेत. ही सेवा आहे आणि ही सेवा फर्स्ट चॅरिटी बिगिन्स ऍट होम.
बापदादांना आज एका
गोष्टीवर हसू येत होते, सांगू. बघा तुम्हाला सुद्धा हसू येईल. बापदादा तर मुलांचा
खेळ बघत असतात ना! बापदादा एका सेकंदामध्ये कधी कोणत्या सेंटरचा टी.व्ही. लावतात,
कधी कोणत्या सेंटरचा, कधी फॉरेनचा, कधी इंडियाचा स्विच ऑन करतात, समजते, काय करत
आहेत कारण बाबांचे मुलांवर प्रेम आहे ना. मुले देखील म्हणतात समान बनायचेच आहे.
पक्के आहे ना, समान बनायचेच आहे! विचार करून हात वर करा. हां, जे समजतात, मरावे
लागेल, झुकावे लागेल, सहन करावे लागेल, ऐकावे लागेल, परंतु समान बनूनच दाखवणार!
त्यांनी हात वर करा. कुमारींनो विचार करून हात वर करा. यांचा फोटो काढा. कुमारी खूप
आहेत. मरावे लागेल? झुकावे लागेल? पांडव हात वर करा. ऐकले, समान बनायचे आहे. समान
नाही बनलात तर मजा येणार नाही. आणि परमधाममध्ये सुद्धा समीप राहणार नाही. पूज्य
मध्ये सुद्धा फरक पडेल, सतयुगाच्या राज्य भाग्यामध्ये देखील फरक पडेल.
ब्रह्मा बाबांवर तुमचे
प्रेम आहे ना, डबल विदेशींचे सर्वात जास्ती प्रेम आहे. ज्यांचे ब्रह्मा बाबांवर
जिगरी, मनापासून प्रेम आहे त्यांनी हात वर करा. अच्छा, पक्के प्रेम आहे ना? आता
प्रश्न विचारणार, ज्याच्यावर प्रेम असते, तर प्रेमाची निशाणी आहे जे त्याला प्रिय
वाटते, ते प्रेम करणाऱ्याला सुद्धा चांगले वाटते, दोघांचे संस्कार, संकल्प, स्वभाव
जुळतात तेव्हाच ते प्रिय वाटतात. तर ब्रह्मा बाबांवर प्रेम आहे तर पूर्ण २१ जन्म,
पहिल्या जन्मापासून, दुसऱ्या-तिसऱ्यामध्ये आले तर चांगले नाहीये परंतु पहिल्या
जन्मापासून लास्ट जन्मापर्यंत सोबत राहणार, भिन्न-भिन्न रूपामध्ये सोबत राहणार. तर
सोबत कोण राहू शकतो? जो समान असेल. ते (ब्रह्मा बाबा) नंबर वन आत्मा आहेत. तर सोबत
कसे रहाणार? नंबर वन बनाल तेव्हा तर सोबत रहाल, सर्व गोष्टींमध्ये नंबर वन,
मन्सामध्ये, वाणीमध्ये, कर्मणामध्ये, वृत्तिमध्ये, दृष्टीमध्ये, कृतीमध्ये,
सर्वांमध्ये. तर नंबर वन आहात कि नंबरवार आहात? तर जर प्रेम आहे तर प्रेमासाठी
काहीही कुर्बान करणे कठीण वाटत नाही. लास्ट जन्म कलियुगाच्या शेवटी सुद्धा बॉडी
कॉन्सेसवाले प्रेमी प्राण सुद्धा देतात. तर तुम्ही जर ब्रह्मा बाबांच्या प्रेमामध्ये
आपले संस्कार परिवर्तन केलेत तर काय मोठी गोष्ट आहे! मोठी गोष्ट आहे काय? नाही आहे.
तर आजपासून सर्वांचे संस्कार चेंज झाले! पक्के? रिपोर्ट येईल, तुमचे सोबती लिहितील,
पक्के? दादी ऐकत आहात, म्हणतात संस्कार बदलले. कि वेळ लागेल? काय? मोहिनी (न्यूयॉर्क)
सांगा, बदलणार ना! हे सर्व बदलतील ना? अमेरिकावाले तर बदलतील. हसण्याची गोष्ट तर
राहून गेली.
हसण्याची गोष्ट ही आहे
- तर सर्वजण म्हणतात की, पुरुषार्थ तर खूप करतो, आणि बापदादांना हे बघून दया देखील
येते पुरुषार्थ खूप करतात, कधी-कधी मेहनत खूप करतात आणि म्हणतात काय - ‘काय करू,
माझे संस्कार असे आहेत’! संस्कारांवर ढकलून स्वतःला हलके करतात (सोडवून घेतात).
परंतु बाबांनी आज बघितले की, हे जे तुम्ही म्हणता की माझे संस्कार आहेत, तर काय
तुमचे हे संस्कार आहेत? तुम्ही आत्मा आहात, आत्मा आहात ना! बॉडी तर नाही ना! तर
आत्म्याचे संस्कार कोणते आहेत? आणि ओरिजिनल तुमचे संस्कार कोणते आहेत? ज्याला आज
तुम्ही ‘माझे’ म्हणता ते माझे आहेत कि रावणाचे आहेत? कोणाचे आहेत? तुमचे आहेत? नाही
आहेत? तर माझे का म्हणता! म्हणता तर असेच ना की, माझा संस्कार असा आहे? तर आजपासून
असे म्हणू नका, ‘माझा संस्कार’. नाही. कधी इथून-तिथून कचरा उडून येतो ना! तर ही
रावणाची वस्तू आली तर त्याला माझी कसे म्हणता! आहे माझे? नाही ना? तर आता कधीही असे
म्हणायचे नाही, जेव्हा ‘माझे’ शब्द बोलाल तेव्हा आठवा मी कोण आणि माझे संस्कार कोणते
आहेत? बॉडी कॉन्ससमध्ये ‘माझे संस्कार’ आहेत, परंतु आत्म-अभिमानीमध्ये हे संस्कार
नसतात. तर आता ही भाषा देखील परिवर्तन करा. ‘माझा संस्कार’ म्हणून निष्काळजी होता.
म्हणाल भाव नाही आहे, संस्कार आहेत. अच्छा, दुसरा शब्द काय म्हणता? माझा स्वभाव. आता
स्वभाव शब्द किती चांगला आहे. स्व तर नेहमी चांगला असतो. माझा स्वभाव, स्व चा भाव
चांगला असतो, खराब नसतो. तर हा जो शब्द यूज करता ना, ‘माझा स्वभाव’ आहे, ‘माझा
संस्कार’ आहे, आता या भाषेला चेंज करा, जेव्हा म्हणून ‘माझा’ शब्द येईल, तेव्हा आठवा
माझा ओरिजिनल संस्कार कोणता आहे? हे कोण बोलते? आत्मा बोलते हा माझा संस्कार आहे?
तर जेव्हा हा विचार कराल ना तेव्हा स्वतःचेच हसू येईल, येईल ना हसू? हसू आले तर ही
जी तक्रार करता ना ती नाहीशी होईल. याला म्हटले जाते भाषेचे परिवर्तन करणे अर्थात
प्रत्येक आत्म्याप्रति स्वमान आणि सन्माना मध्ये रहाणे. स्वतः देखील सदैव
स्वमानामध्ये रहा, इतरांना देखील स्वमानाने पहा. स्वमानाने बघाल ना तर मग ज्या
कोणत्याही गोष्टी होतात, ज्या तुम्हाला देखील आवडत नाहीत, कधीही काही संघर्ष होतो
तर तुम्हाला आवडतो का? नाही आवडत ना? तर एकमेकांना बघायचेच मुळी स्वमानाने. ही
विशेष आत्मा आहे, ही बाबांची पालना घेणारी ब्राह्मण आत्मा आहे. ही कोटीमध्ये कोणी,
कोणी मध्ये ही कोणी आत्मा आहे. फक्त एक गोष्ट करा - आपल्या डोळ्यांमध्ये बिंदुला
सामावून घ्या, बस. एका बिंदूने तर पाहता, दुसऱ्या बिंदुला देखील सामावून घ्या तर
काहीही होणार नाही, मेहनत करावी लागणार नाही. जसे काही आत्मा, आत्म्याला बघत आहे.
आत्मा, आत्म्याशी बोलत आहे. आत्मिक वृत्ती, आत्मिक दृष्टी बनवा. समजले - काय करायचे
आहे? आता ‘माझा संस्कार’ असे कधीही बोलू नका, स्वभाव म्हणाल तर स्व च्या भावामध्ये
राहणे. ठीक आहे ना. बापदादा हेच इच्छितात की हे पूर्ण वर्ष, सीझन जरी ६ महिने चालत
असला परंतु संपूर्ण वर्षभर सर्वांना जेव्हा म्हणून भेटाल, ज्यांना कुणाला भेटाल, मग
आपसात असेल, किंवा इतर आत्म्यांना भेटाल परंतु जेव्हापण भेटाल, ज्यांना कुणाला
भेटाल त्यांना संतुष्टतेचा सहयोग द्या. स्वतः देखील संतुष्ट रहा आणि दुसऱ्यांना
देखील संतुष्ट करा. या सीझनचा स्वमान आहे - संतुष्टमणी. सदैव संतुष्टमणी. भाऊ देखील
‘मणी’ आहे, ‘मणा’ नसतो, ‘मणी’ असतो. प्रत्येक आत्मा निरंतर ‘संतुष्टमणी’ आहे. आणि
स्वतः संतुष्ट असाल तर इतरांना देखील संतुष्ट कराल. संतुष्ट रहायचे आणि संतुष्ट
करायचे. ठीक आहे, पसंत आहे? (सर्वांनी हात वर केला) खूप छान, मुबारक असो, मुबारक असो.
अच्छा. काहीही होवो, आपल्या स्वमानाच्या सीटवर एकाग्र रहा, भटकू नका, कधी कोणत्या
सीटवर, कधी कोणत्या सीटवर, नाही. आपल्या स्वमानाच्या सीट वर एकाग्र रहा. आणि
एकाग्रतेच्या सीटवर सेट होऊन जर कोणती गोष्ट आली ना तर एक कार्टून शो प्रमाणे पहा,
कार्टून पहायला आवडते ना, तर ही समस्या नाहीये, कार्टून शो चालू आहे. कोणी सिंह येतो,
कोणी बकरी येते, कोणी विंचू येतो, कोणी पाल येते; घाणेरडा कार्टून शो आहे. परंतु
आपल्या सीटवरून अपसेट होऊ नका, तर मजा येईल. अच्छा!
चोहो बाजूच्या राज
दुलाऱ्या मुलांना, सर्व स्नेही, सहयोगी, समान बनणाऱ्या मुलांना, सदैव आपल्या
श्रेष्ठ स्व भाव आणि संस्काराला स्वरूपामध्ये इमर्ज करणाऱ्या मुलांना, सदैव सुख
देणाऱ्या, सर्वांना स्नेह देणाऱ्या मुलांना, सदैव संतुष्टमणी बनून संतुष्टतेची किरणे
पसरविणाऱ्या मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
शुभचिंतन आणि
शुभचिंतक स्थितीच्या अनुभवाद्वारे ब्रह्मा बाप समान मास्टर दाता भव ब्रह्मा बाप
समान मास्टर दाता बनण्यासाठी ईर्ष्या, घृणा, आणि क्रिटिसाइज करणे (टीका करणे) - या
तीन गोष्टींपासून मुक्त राहून सर्वांप्रती शुभचिंतक बना आणि शुभचिंतन स्थितीचा
अनुभव करा. कारण ज्यांच्यामध्ये ईर्षेचा अग्नी असतो ते स्वतः जळत असतात, दुसऱ्यांना
त्रास देतात, घृणावाले स्वतः देखील खाली पडतात आणि दुसऱ्यांना देखील पाडतात आणि टीका
करणारे मस्करी मध्ये आत्म्याला हिंमत हीन बनवून दुःखी करतात म्हणून या तिन्ही
गोष्टींपासून मुक्त राहून शुभचिंतक स्थितीच्या अनुभवाद्वारे दात्याची मुले मास्टर
दाता बना.
सुविचार:-
मन-बुद्धी आणि
संस्कारांवर संपूर्ण राज्य करणारे स्वराज्य अधिकारी बना.
आपल्या शक्तिशाली
मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा:- तुम्ही ब्राह्मण मुले खोड आहात. खोडा द्वारेच
संपूर्ण वृक्षाला सकाश मिळते. तर आता विश्वाला सकाश देणारे बना. जर २० सेंटर्स, ३०
सेंटर्स किंवा दोन-अडीचशे सेंटर्स किंवा झोन, हेच बुद्धीमध्ये राहीले तर बेहदमध्ये
सकाश देऊ शकणार नाही म्हणून हद मधून निघून आता बेहदच्या सेवेचा पार्ट आरंभ करा.
बेहदमध्ये गेल्याने हदच्या गोष्टी आपोआपच सुटतात. बेहदच्या सकाशद्वारे परिवर्तन होणे
- हा आहे वेगवान सेवेचा रिझल्ट.