05-04-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.11.2009  ओम शान्ति   मधुबन


स्वराज्याचा रिझल्ट चेक करून स्वतःला चेंज करा आणि अखंड राज्याचे अधिकारी बना


आज दिलाराम बाबा आपल्या राजदुलाऱ्या मुलांना भेटायला आले आहेत. दुलारे (अत्यंत प्रिय) का आहेत? जाणता की तुम्ही प्रत्येक जण तीन तख्तांचे मालक आहात? एक आहे स्वराज्याचे तख्त, दुसरे आहे बापदादांच्या हृदयाचे तख्त आणि तिसरे आहे भविष्यातील तख्त. तिन्ही तख्तांचे अधिकारी आहात. आपल्या भविष्य तख्ताचा देखील इथेच अभ्यास करत आहात. भविष्याची तयारी किंवा पुरुषार्थ तुम्ही आताच करत आहात. आताचा पुरुषार्थ अनेक जन्मांचे राज्यभाग्य मिळवून देणारा आहे. याच वेळी आपल्या राज्यभाग्याचे संस्कार धारण करत आहात कारण आताचा पुरुषार्थ भविष्यातील राज्याचा अधिकारी बनवतो. तर चेक करा की या वेळी आपला पुरुषार्थ यथार्थ आहे का? जसे भविष्यामध्ये एकच राज्य असेल तर आता चेक करा की मनामध्ये आपले एक राज्य चालते का? पुरुषार्थामध्ये एक राज्य आहे का? की माया राज्यामध्ये विघ्न टाकते? एका राज्याऐवजी मायेचा प्रभाव तर पडत नाही ना? दोन राज्ये तर होत नाहीत ना? भविष्याची विशेषता आहेच मुळी एक राज्याची. तर आताचा अभ्यास भविष्यामध्ये चालतो. तर चेक करा की आता स्वराज्य आहे का? स्वराज्यात कुठे माया हस्तक्षेप तर करत नाही ना? दोन राज्ये तर नाहीत ना? जर दोन राज्ये चालत असतील तर एक राज्याचे संस्कार कधी भरणार? भविष्याची विशेषता हीच आहे - एक राज्य आणि एक धर्म. धर्म कोणता आहे? तुमची विशेष धारणा कोणती आहे? संपूर्ण पवित्रता. तर चेक करा की एक धर्म आहे? मध्येच अपवित्रतेचा दुसरा धर्म हस्तक्षेप तर करत नाही ना? त्याचसोबत हे देखील चेक करा की लॉ अँड ऑर्डर एकाचीच आहे की माया देखील मध्येच हस्तक्षेप करते? एकाचेच राज्य निर्विघ्न चालते का? दुसरी गोष्ट - राज्यामध्ये सदैव सुख आणि शांती नॅचरल राहते. तर आता पाहा आपल्या राज्यामध्ये सदैव सुख-शांती आहे का? काही व्यत्यय तर येत नाही ना? स्वराज्यामध्ये माया आपला हस्तक्षेप करून अशांती तर पसरवत नाही ना? स्वराज्यामध्ये माया कोणते सैलवेशन (आरामदायी गोष्टी), कोणत्या प्रशंसेचा प्रभाव तर टाकत नाही ना? सदैव सुख, शांती, आनंद, प्रेम, अतींद्रिय सुख कायम राहते का? कारण जाणता की भविष्य राज्यामध्ये सर्व प्राप्ती आहे, संपन्नता आहे, या कारणामुळे संतुष्टता देखील आहे. तर आता सुद्धा स्वराज्य संपन्न राहते की काही उणीव राहते? कारण आताच्या पुरुषार्थामध्ये जर उणीव राहिली तर भविष्यातील अखंड राज्याचे अधिकारी कसे बनणार! सर्व आधार आताच्या पुरुषार्थावर आहे. आताची कोणतीही उणीव असणारा भविष्यातील संपूर्ण राज्याचा अधिकारी बनू शकणार नाही. दीर्घकाळाचा हा स्वराज्याचा अभ्यास भविष्य राज्याचा अधिकारी बनवतो. तर हे आपले चेकिंग सदैव असू द्या कारण आता जर दीर्घकाळाचा पुरुषार्थ नसेल तर प्रालब्ध देखील कमी मिळते म्हणूनच बापदादा वेळोवेळी यावर लक्ष वेधून घेत आहेत की यासाठी आता स्वतःला संपन्न आणि संपूर्ण बनवा. जर आता मध्ये-मध्ये म्हणता की पुरुषार्थ सुरू आहे परंतु पुरुषार्थामध्ये ‘तर-तर’ असे काही येत नाही ना! हे तर होऊन जाईल, हे तर करू, हे संस्कार अविनाशी २१ जन्मांच्या, अखंड राज्याचा अधिकारी बनवणार नाहीत.

बापदादा कायमसाठी लक्ष वेधून घेत आहेत की, चेक करा की जर कोणतेही विघ्न आले, वादळ आले, तर तुफान तोहफा बनतो? वादळ, वादळ नाही परंतु भेटवस्तू बनावे. मायेचा कोणताही वार होतो, माया अनुभव करून देते, तर तो अनुभव देखील असा अनुभव असावा की आम्हाला ही अनुभवाची शिडी पुढे घेऊन जाते. यासाठी बापदादा म्हणतात नेहमी आपला चार्ट स्वतःच चेक करा. जितका आपला चार्ट चेक कराल तितकेच चेक करुन चेंज कराल. तर प्रत्येक जण आपल्या चार्टला चेक करता? चेक करता का? जे दररोज करतात त्यांनी हात वर करा. जे दररोज करतात, कधी-कधी करणारे नाही? दररोज चार्ट चेक करा आणि चेंज करा कारण वेळेचा इशारा बापदादांनी बऱ्याच काळापासून दिला आहे. काळाला पाहत देखील आहात, लोकांच्या मनामध्ये चिंता वाढत आहे आणि तुमच्या मनात चिंता नाही परंतु ‘प्रभू चिंतन’ आहे. प्रभू चिंतन असल्या कारणाने तुम्ही नेहमी हे जाणता की आपण निमित्त आहोत, निर्माण आहोत कारण करावनहार बाबा आहेत. या कारणाने तुमच्या मनामध्ये चिंता नाहीये, करावनहार करवून घेत आहे, ही स्मृती सतत पुढे नेत आहे.

आता विशेष प्रत्येकाने हे चेक करायचे आहे की या संगमयुगाचा एक-एक सेकंद, वेळ आणि संकल्प शुभ चालतो का? या वेळेच्या महत्वाला जाणून एक सेकंद, सेकंद नाही परंतु एक सेकंद देखील किंमती आहे, महत्वाचा आहे. कधी-कधी मुले म्हणतात की संकल्प चालला परंतु दोन-चार सेकंद चालला. परंतु संगमातील समयाची व्हॅल्यु आहे, आता एक सेकंद एका तासाच्या बरोबर आहे. इतकी या वेळेची व्हॅल्यु आहे कारण बापदादांनी सांगितले आहे की अचानक कोणत्याही वेळी तुमचा फायनल पेपर होईल. बापदादा देखील सांगणार नाहीत म्हणूनच या वेळेचे अटेन्शन ठेऊन स्वतःला संपूर्ण आणि संपन्न बनवायचे आहे. बापदादांनी जे सर्व खजिने दिले आहेत त्या एक-एक खजिन्याला वेळेवर कार्यामध्ये लावायचे आहे. खजिन्यांचे मालक आहात, मालकाची विशेषता ही आहे की ज्या वेळी ज्या खजिन्याची आवश्यकता आहे त्या वेळी तो खजिना कार्यामध्ये वापरतो. तुम्ही ऑर्डर करा सामावून घेण्याच्या शक्तीला, तर ती सामावून घेण्याची शक्ती कार्यामध्ये वापरली जाते का? कारण मालक त्याला म्हटले जाते जो वेळेवर आपले खजिने कार्यामध्ये वापरू शकतो. तर आता सर्वांनी स्वतःवर इतके लक्ष द्यायचे आहे. सर्वांच्या मनातील खुशीचा खजिना नेहमीच चेहऱ्यावरून आणि वर्तनामधून दिसून यावा. खुशी अविनाशी बाबांची देणगी आहे. तर अविनाशी बाबांच्या देणगीला अविनाशी ठेवा. खुशीसाठी म्हटले जाते - ‘खुशी जैसी कोई खुराक नहीं, खुशी जैसा कोई खजाना नहीं’. तर ज्यांच्यामध्ये सदैव खुशी भरलेली असते, त्यांच्या डोळ्यांमधून, चेहऱ्यावरून, वर्तनामधून ऑटोमॅटिक दिसून येते. बापदादांचे वरदान आहे की सदैव खुश रहा आणि सदैव खुशी वाटा कारण खुशी वाटल्याने ख़ुशी वाढेल, इतर कोणताही खजिना वाटल्याने कमी होतो परंतु खुशीचा खजिना जितका वाटाल तितका वाढेल. तर चेक करा खुशीचा खजिना सदैव कायम आहे का?

आता सर्व मुलांना भले मग ते देशातील असोत नाहीतर विदेशातील, सर्व मुलांना बापदादा एका गोष्टीसाठी विशेष मुबारक देत आहेत. कोणती गोष्ट? सर्वांनी जो, मग ते देशामध्ये, अथवा परदेशामध्ये आपल्या उमंग-उत्साहाने आत्म्यांना बाबांचा संदेश दिला. सर्वांनी आपल्या खुशीने जे कार्य केले त्या कार्यामध्ये प्रोग्राम एक केला, प्रत्येक ठिकाणी एक प्रोग्राम केला परंतु त्याचे फळ हजार पटीने प्राप्त केले आहे. बापदादांचा हाच संकल्प आहे की आताच्या समयानुसार ज्या परिस्थिती आहेत त्या पुढे-पुढे नाजूक होत जातील, म्हणून मग ते गाव असो, किंवा कोणताही कानाकोपरा असो, अशी तक्रार राहू नये की, ‘आमचा पिता आला आणि तुम्ही आम्हाला संदेश दिला नाहीत’; त्यामुळे सर्वांनी जे उमंग-उत्साहाने कार्य केले आहे त्यावर बापदादा खुश आहेत आणि अशाच प्रकारे आपसात एकत्र येऊन असे प्रोग्राम आखत रहा. बापदादांनी पाहिले की उमंग-उत्साह आणि हिंमत सर्वांनी आपापल्या पद्धतीने कार्यामध्ये लावली आहे परंतु आता तर सर्वांनी खूप चांगले केले आहे, पुढे देखील समयानुसार हेच लक्ष्य ठेवा की कोणताही कोपरा संदेश दिल्या शिवाय राहू नये. यामध्ये आपला स्वतःचा पुरुषार्थ देखील चांगला होतो आणि आत्म्यांचे देखील कल्याण होते. सर्वांना हे कार्यक्रम आवडले ना! आवडले! तर बापदादा सर्व मुलांना हेच वारंवार सांगत आहेत की आत्म्यांप्रती दयाळू बना. आजकाल दुःख अशांतीमुळे सर्वजण मनापासून म्हणतात की, ‘रहम करा, दया करा’. तर बाबांचे साथीदार तुम्ही मुले आहात, तर बाबा मुलांद्वारे आता प्रत्येक मुलाचा ‘दयाळूपणा’ चा पार्ट पाहू इच्छित आहेत. तुमचा उमंग आहे की दुःखमय संसार बदलून सुखमय संसार येणारच आहे. तर सुखमय संसार येण्यासाठी या दुःख-अशांतीचा विनाश होण्यासाठी परिस्थिती बदलत आहे. तर आजचा बाबांचा हाच संदेश लक्षात ठेवा की, आता भले मनसा, अथवा वाचा, किंवा चेहरा आणि वर्तनाद्वारे सेवेची गती वाढवत जा. आपले राज्य समीप आणत चला. अच्छा.

यावेळी बापदादांना भेटायला जे पहिल्यांदा आले आहेत, त्यांनी हात वर करा. छान, पुष्कळ आहेत. सर्वजण उठा. मुबारक असो! तरी देखील समाप्तीच्या पूर्वी पोहोचला आहात. नवीन जन्म घेतला आहे, त्याबद्दल सर्वांच्या वतीने आता येणाऱ्या मुलांना बापदादांकडून आणि चोहो बाजूंच्या मुलांतर्फे मुबारक असो, मुबारक असो! ब्राह्मण परिवाराला पाहून आनंद होतो ना! परंतु जे आता आले आहेत त्यांना बापदादा हेच सांगत आहेत की आता खूप काळ सरला आहे, फार थोडा वेळ उरला आहे, त्यामुळे पुरुषार्थ तीव्र वेगाने करायचा आहे. तीव्र पुरुषार्थी पुढे जातील, चालायचे नाही उडायचे. उडत्या कलेचा पुरुषार्थ कराल तर बाबांचा वारसा उशिरा येऊन देखील आपला पूर्ण हक्क मिळवू शकता. प्रत्येक सेकंद खुश रहा आणि सर्वांना पैगाम द्या, संदेश द्या. अच्छा.

आज जे बापदादांनी सांगितले की, स्वराज्य अधिकारी बनून स्वराज्याचा रिझल्ट चेक करा, रिझल्ट चेक केल्यामुळे दीर्घकाळापासून राहिलेल्या कोणत्याही कमजोरीला चेंज करायचे आहे, कारण अखंड राज्य दीर्घकाळ चालावे याची आवश्यकता आहे, दीर्घकाळच्या पुरुषार्थाने दीर्घकाळच्या प्रारब्धाचे स्वतःच अधिकारी बनतात म्हणूनच ‘दीर्घकाळाचा पुरुषार्थ असावा’ यावर अंडरलाईन करा. चेकिंग करा आणि चेंज करा.

चोहो बाजूंच्या बापदादांच्या दिलतख्तनशीन (हृदयसिंहासनावर विराजमान) प्रत्येक मुलाला बापदादा दररोज अमृतवेलेला विशेष शक्ती वाटतात. अमृतवेलेला विशेष वरदान, शक्ती वाटतात. जे अमृतवेलेची शक्ती विशेष वरदान स्वीकार करतात ते विशेष तीव्र पुरुषार्थी बनतात. अमृतवेलेचे महत्त्व ठेवणे अर्थात बापदादांचे सदैव तख्तनशीन बनणे. तर बऱ्याच मुलांचे अटेन्शन आहे आणि बापदादा दररोज त्यांना खास सर्टिफिकेट देतात - वाह बच्चे वाह!

चोहो बाजूंच्या तीव्र पुरुषार्थी, प्रत्येक क्षणी बापदादांना आपला सोबती बनवून कंबाइंड राहण्याच्या अभ्यासी मुलांना बापदादा विशेष वरदान देत आहेत की - सदैव उडत राहा आणि इतरांना देखील उडण्यासाठी सहयोग देऊन उडवत राहा. सर्वजण विजयी आहेत आणि विजयाचे फळ बापदादांचे निरंतर आशीर्वाद प्राप्त होतात. तर अमर बनून सर्वांना अमृत पाजत राहा. चोहो बाजूंची मुले बापदादांच्या समोर आहेत. प्रत्येक मुलावर बापदादांचे मनापासून प्रेम आहे कारण प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेषता आहे. आता सर्व विशेषतांनी स्वतःला विशेष आत्मा बनवून पुढे चालत राहा. बापदादांचे प्रत्येक मुलाला पर्सनल पद्मपटीने प्रेमपूर्वक आठवण स्वीकार असो. अच्छा, आता तर भेटतच राहू. नमस्ते.

(आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते)

दादींसोबत संवाद:- सर्वजणी खूप फिरला आहात. आजकाल अशांती वाढत चालली आहे तर दिवसभर त्रस्त राहतात आणि शांतीचे व्हायब्रेशन शांती देते, तेव्हा खुश होतात. जसे एखादा थकलेला असेल आणि त्याला अर्धा तास जरी आरामाचा मिळाला तरी तो खुश होतो. चांगले केले. सर्व ठिकाणी, भले लहान असो वा मोठे सर्वांनी चांगले केले. जिथे उमंग आहे तिथे खर्चाची पर्वा नसते. निदान इतक्या आत्म्यांना संदेश तर मिळाला. तुमच्याविरुद्धची आता तक्रार तर संपली. चांगले आहे. असे मधूनमधून प्रोग्राम बनवत रहा. प्रत्येक शहर आपल्या सोयीनुसार जे काही करेल ते ठीक आहे.

डबल विदेशी मोठ्या बहिणींसोबत संवाद:- बापदादांना ग्रुप-ग्रुपला बोलावून रिफ्रेश करणे आवडते कारण तिथे खूप लांब-लांब राहतात. जवळ आल्यामुळे एकमेकांचे गुण दिसून येतात. लांब असताना कळत नाही. तर एकमेकांना पाहून उमंग देखील येतो. तर आबूमध्ये हा प्रोग्राम चांगला वाटतो आणि एकमेकांमध्ये उत्साह भरून संघटन पक्के करता हे चांगले आहे. ठीक आहे. ठीक चालले आहे ना!

एकमेकांना सहयोग दिल्याने पुढे जातो. वेळ देता ना, आपली सेवा सोडून मनापासून वेळ देता. आपले कार्य पूर्ण केले, सफलता मिळाली, आता भले जाऊ शकता. सर्वांनी चांगली मदत केली. फॉरेनसाठी देखील केला आणि भारतासाठी देखील प्रोग्राम केला. छान झाले.

यु. पी. झोनच्या सेवाधाऱ्यांसोबत संवाद:- बापदादा सर्व झोनला सांगत आहेत की प्रत्येकाने आपल्या झोनमध्ये असा एक ग्रुप तयार करा ज्या ग्रुपमध्ये सर्व वर्गांचे (क्षेत्रातील) असतील. सेवेसाठी तुमच्या ज्या विंग्ज बनलेल्या आहेत, आणि प्रत्येक झोन आपल्या एरियामध्ये प्रत्येक वर्गाची (विंग्जची) सेवा करत आहात, करत देखील रहाल परंतु प्रत्येक झोनमध्ये सेवेचा असा ग्रुप असावा ज्यामध्ये प्रत्येक वर्गाचा (प्रत्येक क्षेत्रातील) एक-एकतरी असावा. आणि जिथेपण प्रोग्राम कराल तिथे त्या ग्रुपने आपल्या वर्गाला (आपल्या क्षेत्रातील व्यक्तींना) विशेष निमंत्रण द्यावे. कोणत्याही वर्गाने तक्रार करू नये की, ‘आम्हाला तर संदेशच मिळाला नाही’. आणि जे व्हरायटी ग्रुप बनले आहेत त्या प्रत्येकाने आपल्या वर्गाची सेवा देखील वाढवावी, आणि त्याच सोबत प्रत्येकाने आपला-आपला अनुभव ऐकवावा की आम्हाला या नॉलेजमुळे काय मिळाले आणि काय अनुभव करत आहोत. तर प्रत्येक झोनमध्ये असा सेवेचा ग्रुप तयार करा. भले भाषण करण्यासाठी इतका वेळ जरी मिळाला नाही तरी त्यांना फंक्शनच्या वेळी मागच्या लाईनमध्ये बसवून स्टेज सेक्रेटरीने त्यांचा परिचय द्यावा. एक-दोन जणांचा अनुभव देखील ठेवू शकता आणि कुटुंबात राहून आपले कार्य करत असताना आमचे जीवन कसे व्यतीत झाले, कसे बदलले, तो अनुभव चान्स घेऊन टाइम मिळाल्यास ऐकवावा. तर असे विशेष माईक तयार करा जे सेवा करत राहतील.

चांगले आहे यु.पी. ने विशेष ब्रह्मा बाबांची पालना घेण्याचा अधिकार प्राप्त केला आहे. यु.पी. मध्ये ब्रह्मा बाबांच्या नावाने यादगार देखील आहे. तर यु.पी. चे भाग्य आहे, जे जगत अंबा आणि ब्रह्मा बाबांची पालना घेतली आहे. तर पालनेची धरणी आहे. भाग्याचा तारा ब्रह्मा बाबा आणि जगत अंबा यांनी यु.पी. ला वरदानामध्ये दिला आहे. चांगले आहे. आता दिवसेंदिवस बाबांनी पाहिले की सेवास्थान आणि जीकाही उपसेवाकेंद्र अथवा गीता पाठशाळा आहेत त्यांची पूर्वीपेक्षाही आता चांगली वृद्धी झाली आहे म्हणूनच बापदादा विशेष मुबारक देत आहेत की, पुढे जात रहा आणि संख्या वाढवण्यामध्ये, संदेश देण्यामध्ये नंबर वन बना. चांगले आहे, बापदादा खुश आहेत आणि वृद्धी करीत रहा. टीचर्सना मुबारक आहे! वृद्धी करत आहात आणि यापेक्षा देखील जास्तीत जास्त वृद्धी करत राहा. अच्छा.

वरदान:-
संघटनमध्ये सहयोगाच्या शक्तीद्वारे विजयी बनणारे सर्वांचे शुभचिंतक भव

जर संघटनमध्ये प्रत्येक जण, एकमेकांचे मदतगार, शुभचिंतक बनून रहा म्हणजे मग सहयोगाच्या शक्तीचा घेराव खूप मोठा चमत्कार करू शकतो. आपसात एकमेकांचे शुभचिंतक सहयोगी बनून राहा म्हणजे मग मायेची या घेरावाच्या (वलयाच्या) आत येण्याची हिंमत होणार नाही. परंतु संघटनमध्ये सहयोगाची शक्ती तेव्हाच येईल जेव्हा हा दृढ संकल्प कराल की - भले कितीही गोष्टी सहन कराव्या लागल्या तरीही सामना करून दाखवू, विजयी होऊन दाखवू.

सुविचार:-
कोणतीही इच्छा, चांगले बनू देणार नाही, म्हणून इच्छा मात्रम् अविद्या बना.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

जसे गोड खाल्ल्याने आणि खाऊ घातल्याने थोड्या वेळासाठी तोंड गोड होते, खुश होतात. तसे तुम्ही स्वतःच गोड बना म्हणजे मग नेहमीच मुखामध्ये मधुर बोल राहतील. असे मधुर बोल स्वतःला देखील खुश करतील, इतरांना देखील खुश करतील. याच विधीने नेहमी सर्वांचे मुख गोड करत राहा; सदैव गोड दृष्टी, गोड बोल, गोड कर्म असावे.