05-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो - नेहमी याच नशेमध्ये रहा की आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत, आपण जाणतो ज्या
बाबांना सर्व बोलावत आहेत, ते आपल्या सन्मुख आहेत”
प्रश्न:-
ज्या मुलांचा
बुद्धी योग चांगला असेल, त्यांना कोणता साक्षात्कार होत राहील?
उत्तर:-
सतयुगी नवीन राजधानीमध्ये काय-काय असेल, कसे आपण शाळेमध्ये शिकणार मग राज्य चालवणार.
हे सर्व साक्षात्कार जसे-जसे समीप येत जाल तसे होत राहतील. परंतु ज्यांचा बुद्धियोग
चांगला असेल, जे आपल्या शांतीधाम आणि सुखधामची आठवण करतात, कामधंदा करत असताना
देखील एका बाबांच्या आठवणीमध्ये राहतात, त्यांनाच हे सर्व साक्षात्कार होतील.
गीत:-
ओम नमो शिवाय…
ओम शांती।
भक्तीमार्गांमध्ये बाकीचे जे काही सत्संग असतात, त्यामध्ये तर सर्वजण गेले असतील.
तिथे एक तर असे म्हणतील - सर्वांनी बोला, ‘वाहे गुरु’ किंवा ‘रामा’चे नाव घ्यायला
सांगतील. इथे तर मुलांना काहीही सांगण्याची सुद्धा गरज राहत नाही. एकदाच सांगितले,
पुन्हा-पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. बाबा देखील एकच आहेत, त्यांचे म्हणणे
देखील एकच आहे. काय म्हणतात? ‘मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. आधी शिकून मग
इथे येऊन बसतात. आपण ज्या पित्याची मुले आहोत त्यांची आठवण करायची आहे. हे देखील आता
तुम्ही ब्रह्माद्वारे जाणले आहे की आम्हा सर्व आत्म्यांचे पिता एक आहेत. दुनिया काही
हे जाणत नाही. तुम्ही जाणता आपण सर्व त्या पित्याची मुले आहोत, त्यांना सर्वजण
गॉडफादर म्हणतात. आता फादर सांगत आहेत - मी या साधारण तनामध्ये तुम्हाला
शिकवण्यासाठी येतो. तुम्ही जाणता की, बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) आलेले
आहेत, आपण त्यांचे बनलो आहोत. बाबाच येऊन पतितापासून पावन होण्याचा रस्ता सांगतात.
हे पूर्ण दिवस बुद्धीमध्ये राहते. तसेही शिवबाबांची संतान तर सर्वच आहेत परंतु हे
तुम्हीच जाणता बाकी कोणीही जाणत नाही. तुम्ही मुले समजता आपण आत्मा आहोत, आपल्याला
बाबांनी आदेश दिला आहे की, माझी आठवण करा. मी तुमचा बेहदचा पिता आहे. सर्व ओरडत
राहतात की, पतित पावन या, आम्ही पतित बनलो आहोत. हे काही देह म्हणत नाही. आत्मा या
शरीराद्वारे म्हणते. ८४ जन्म देखील आत्माच घेते ना. हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे
की आपण ॲक्टर्स आहोत. बाबांनी आपल्याला आता त्रिकालदर्शी बनवले आहे. आदि-मध्य-अंताचे
ज्ञान दिले आहे. सर्वजण बाबांनाच बोलावतात ना. आता देखील ते म्हणतील आणि म्हणत
राहतात की, ‘या’ आणि तुम्ही संगमयुगी ब्राह्मण म्हणता - ‘बाबा आलेले आहेत’. या
संगमयुगाला देखील तुम्ही जाणता, हे पुरुषोत्तम युग गायले जाते. पुरुषोत्तम युग
असतेच कलियुगाचा अंत आणि सतयुगाची आदि यांच्या मध्यावर. सतयुगामध्ये सत् पुरुष,
कलियुगामध्ये असत्य पुरुष राहतात. सतयुगामध्ये जे होऊन गेले आहेत त्यांची चित्रे
आहेत. सर्वात जुन्यात जुने हे चित्र आहे, यापेक्षा जुने चित्र कोणते असतही नाही. असे
तर मनुष्य बसून खूप फालतू चित्र बनवतात. हे तुम्ही जाणता कोण-कोण होऊन गेले आहेत.
जसे खाली अंबेचे चित्र बनवले आहे किंवा कालीचे चित्र आहे, तर अशी भुजावाली थोडीच असू
शकते. अंबेला देखील दोन भुजा असतील ना. मनुष्य तर जाऊन हात जोडून पूजा करतात.
भक्तीमार्गामध्ये अनेक प्रकारची चित्रे बनवली आहेत. एकाच व्यक्तीला विविध प्रकारची
सजावट केली तर रूप बदलते. ही चित्रे इत्यादी वास्तवामध्ये काहीच नाही आहेत. हा सर्व
आहे भक्तिमार्ग. इथे तर मनुष्य लुळे-पांगळे जन्माला येतात. सतयुगामध्ये असे असत
नाहीत. सतयुगाला देखील तुम्ही जाणता आदि सनातन देवी-देवता धर्म होता. इथे ड्रेस तर
बघा प्रत्येकाचा आपला-आपला किती व्हरायटी आहे. तिथे तर यथा राजा-राणी तथा प्रजा
असतात. तुम्ही जितके नजदिक जाल तितके तुम्हाला तुमच्या राजधानीचा ड्रेस इत्यादीचा
देखील साक्षात्कार होत राहील. बघत रहाल आपण असे शाळेमध्ये शिकतो, असे करतो. बघतील
देखील तेच ज्यांचा बुद्धियोग चांगला असेल. आपल्या शांतीधाम-सुखधामाची आठवण करतात.
काम-धंदा तर करायचाच आहे. भक्तीमार्गामध्ये देखील काम-धंदा इत्यादी तर करतातच ना.
ज्ञान काहीच नव्हते. ही सर्व आहे भक्ती. त्याला म्हणणार भक्तीचे ज्ञान. ते (भक्तीवाले)
हे ज्ञान देऊ शकणार नाहीत की, तुम्ही विश्वाचे मालक कसे बनाल. तुम्ही आता इथे शिकून
भविष्य विश्वाचे मालक बनता. तुम्ही जाणता हे शिक्षण आहेच नवीन दुनिया, अमरलोक करिता.
बाकी काही अमरनाथला शंकराने पार्वतीला अमर कथा ऐकवलेली नाही. ते तर शिव आणि शंकराला
एकत्र करतात.
आता तुम्हा मुलांना
बाबा समजावून सांगत आहेत, हे देखील (ब्रह्मा बाबा) ऐकतात. बाबांशिवाय सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताचे रहस्य कोण समजावून सांगू शकेल. हे काही कोणी साधुसंत इत्यादी नाही
आहेत. जसे तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये रहात होता, तसे हे देखील रहात होते. ड्रेस
इत्यादी सर्व तसाच आहे. जसे घरामध्ये आई-वडील आणि मुले असतात, काहीच फरक नाही. बाप
या रथावर स्वार होऊन मुलांकडे येतात. हा भाग्यशाली रथ गायला जातो. कधी बैलावर देखील
स्वारी दाखवतात. मनुष्य तर उलटेच समजले आहेत. मंदिरामध्ये कधी बैल असू शकतो का?
श्रीकृष्ण तर आहे प्रिन्स, तो थोडाच बैलावर बसणार. भक्तीमार्गामध्ये मनुष्य खूप
गोंधळून गेलेले आहेत. लोकांना आहे भक्तीमार्गाचा नशा. तुम्हाला आहे ज्ञानमार्गाचा
नशा. तुम्ही म्हणता या संगमावर बाबा आम्हाला शिकवत आहेत. तुम्ही आहात या दुनियेमध्ये
परंतु बुद्धीने जाणता आपण ब्राह्मण, संगम युगावर आहोत. बाकी सर्व मनुष्य
कलियुगामध्ये आहेत. या अनुभवाच्या गोष्टी आहेत. बुद्धी म्हणते आपण कलियुगातून आता
बाहेर पडलो आहोत. बाबा आलेले आहेत. ही जुनी दुनियाच बदलणार आहे. हे तुमच्या
बुद्धीमध्ये आहे, दुसरे कोणीही जाणत नाहीत. भले एकाच घरामध्ये राहणारे आहेत, एकाच
कुटुंबातील आहेत, तरीही त्यांच्यामधे सुद्धा वडील म्हणतील - ‘आपण संगमयुगी आहोत’ आणि
मुलगा म्हणेल - ‘नाही, आपण कलियुगामध्ये आहोत’. भले एकाच घरात रहाणारे आहेत, एकाच
कुटुंबातील आहेत, आश्चर्य आहे ना. मुले जाणतात - आपले शिक्षण पूर्ण झाले की मग
विनाश होईल. विनाश होणे जरूरी आहे. तुमच्यामध्ये देखील काहीजण जाणतात, जर हे समजत
असतील की, दुनियेचा विनाश होणार आहे तर नवीन दुनियेसाठी तयारीला लागावे. बॅग-बॅगेज
तयारीत ठेवावे. थोडा वेळ उरला आहे, बाबांचे तर बनूया. उपाशी मरण्याची वेळ आली तरीही
अगोदर बाबा नंतर मुले. हा तर बाबांचा भंडारा आहे. तुम्ही शिवबाबांच्या भंडाऱ्यातून
खाता. ब्राह्मण भोजन बनवतात म्हणून ब्रह्मा भोजन म्हटले जाते. जे पवित्र ब्राह्मण
आहेत, बाबांच्या आठवणीत राहून बनवतात; ब्राह्मणांशिवाय इतर कोणीही शिवबाबांच्या
आठवणीमध्ये राहू शकत नाही. ते (या दुनियेतील) ब्राह्मण थोडेच शिवबाबांच्या आठवणी
मध्ये राहतात? शिवबाबांचा भंडारा हा आहे, जिथे ब्राह्मण भोजन बनवतात. ब्राह्मण
योगामध्ये (बाबांच्या आठवणीमध्ये) राहतात. पवित्र तर आहेतच. बाकी आहे योगाची गोष्ट.
यामध्येच मेहनत करावी लागते. थापा चालू शकणार नाहीत. असे कोणी म्हणू शकत नाही की मी
संपूर्ण योगामध्ये आहे किंवा ८० टक्के योगामध्ये आहे. कोणीही म्हणू शकत नाही. ज्ञान
देखील पाहिजे. तुम्हा मुलांमध्ये योगी ते आहेत जे आपल्या दृष्टीने कोणालाही शांत करू
शकतात. ही देखील शक्ती आहे. एकदम शांतता पसरेल, जेव्हा तुम्ही अशरीरी बनून मग
बाबांच्या आठवणीमध्ये राहता तर हीच खरी आठवण आहे. ही प्रॅक्टिस पुन्हा करायची आहे.
जसे तुम्ही इथे आठवणीमध्ये बसता, अशी प्रॅक्टिस करून घेतली जाते. तरी देखील सगळेच
काही आठवणीत रहात नाहीत. कुठे ना कुठे बुद्धी पळत राहते. तर ते मग नुकसान करतात. इथे
संदलीवर त्यांना बसवले पाहिजे जे समजतात की आपण ड्रिल टीचर आहोत. बाबांच्या
आठवणीमध्ये समोर बसलो आहोत. दुसरीकडे कुठेही बुद्धियोग जावू नये. सन्नाटा होईल.
तुम्ही अशरीरी बनता आणि बाबांच्या आठवणीमध्ये रहाता. ही आहे खरी आठवण. संन्यासी
देखील शांतीमध्ये बसतात, ते कोणाच्या आठवणीमध्ये राहतात? ती काही खरी आठवण नाहिये.
कोणालाही फायदा करून देऊ शकणार नाहीत. ते सृष्टीला शांत करू शकत नाहीत. बाबांना
जाणतच नाहीत. ‘ब्रह्म’लाच भगवान समजत राहतात. तसे तर काही नाही आहे. आता तुम्हाला
श्रीमत मिळते - मामेकम् याद करो. तुम्ही जाणता आपण ८४ जन्म घेतो. प्रत्येक
जन्मामध्ये थोडी-थोडी कला कमी होत जाते, जशी चंद्राची कला कमी होत जाते. बघून थोडेच
इतके माहीत होते? अजून कोणीही संपूर्ण बनलेला नाही. पुढे जाऊन तुम्हाला साक्षात्कार
होतील. आत्मा किती छोटी आहे! तिचा सुद्धा साक्षात्कार होऊ शकतो. नाही तर मुली कशा
सांगतात की यांच्यामध्ये लाईट कमी आहे, यांच्यामध्ये जास्त आहे. दिव्यदृष्टीनेच
आत्म्याला बघतात. हे देखील सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. माझ्या हातात काहीच
नाहीये. ड्रामा माझ्याकडून करून घेतो, हे सर्व ड्रामा अनुसार घडत रहाते. भोग वगैरे
सुद्धा ड्रामामध्ये नोंदलेला आहे. सेकंद बाय सेकंद ॲक्ट चालू असतो.
आता बाबा शिकवण देतात
की पावन कसे बनायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे. किती छोटी आत्मा आहे जी पतित बनली
आहे आता परत पावन बनणार आहे. अद्भुत गोष्ट आहे ना. कुदरत (प्रकृतीचा चमत्कार) म्हटले
जाते ना. बाबांकडून तुम्ही सर्व कुदरती गोष्टी (प्रकृतीच्या चमत्कारिक गोष्टी) ऐकता.
सर्वात चमत्कारिक गोष्ट आहे - आत्मा आणि परमात्म्याची जी कोणीही जाणत नाहीत.
ऋषी-मुनी इत्यादी सुद्धा कोणीही जाणत नाहीत. इतकी छोटी आत्माच पत्थर-बुद्धी मग
पारस-बुद्धी बनते. बुद्धीमध्ये हेच चिंतन चालत रहावे की, मी आत्मा पत्थर-बुद्धी बनली
होती, आता पुन्हा बाबांची आठवण करून पारस-बुद्धी बनत आहे. लौकिकदृष्ट्या तर पिता
देखील मोठा (नामीग्रामी) असेल तर मग टीचर, गुरू सुद्धा मोठे मिळतात. हे तर एकच बिंदू,
बाबा देखील आहेत, टीचर सुद्धा आहेत, गुरू सुद्धा आहेत. सारे कल्प देहधारींची आठवण
केली आहे. आता बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. तुमच्या बुद्धीला किती
सूक्ष्म बनवतात. विश्वाचे मालक बनणे - काही छोटी गोष्ट आहे का! हा सुद्धा विचार कोणी
करत नाहीत की हे लक्ष्मी-नारायण सतयुगाचे मालक कसे बनले. तुम्ही सुद्धा नंबरवार
पुरुषार्थानुसार जाणता. नवीन कोणी या गोष्टी समजू शकणार नाही. सुरुवातीला ढोबळ
मानाने समजले मग आता सूक्ष्मतेने समजावून सांगितले जाते. बाबा बिंदू आहेत, ते (दुनियावाले)
मग इतके मोठे-मोठे लिंग रूप बनवतात. मनुष्यांची सुद्धा खूप मोठ-मोठी चित्रे बनवतात.
परंतु ते तसे नाहीत. मनुष्यांची शरीरे तर हीच असतात. भक्तीमार्गामध्ये काय-काय बसून
बनवले आहे. मनुष्य किती गोंधळलेले आहेत. बाबा म्हणतात - जे पास्ट झाले (होऊन गेले)
ते पुन्हा होणार. आता तुम्ही बाबांच्या श्रीमतानुसार चाला. यांना (ब्रह्माबाबांना
देखील) बाबांनी श्रीमत दिले, साक्षात्कार घडवला ना. ‘तुला मी बादशाही देतो, आता या
सेवेला लाग. आपला वारसा घेण्याचा पुरुषार्थ कर. हे सर्व सोडून दे’. तर हे देखील
निमित्त बनले. सर्वच काही असे निमित्त बनू शकत नाहीत, ज्यांना नशा चढला ते येऊन बसले.
आम्हाला तर बादशाही मिळत आहे. मग या पै-पैशाचे काय करायचे? तर बाबा आता मुलांकडून
पुरुषार्थ करून घेतात, राजधानी स्थापन होत आहे; म्हणतात देखील - ‘मी
लक्ष्मी-नारायणापेक्षा कमी बनणार नाही’. तर मग श्रीमतावर चालून दाखवा. हू की चू
करायचे नाही (सर्व काही चुपचाप सहन करायचे आहे). बाबांनी थोडेच सांगितले -
मुला-बाळांचे काय हाल होतील. अपघातात कोणी अचानक मरतात तर कोणी उपाशी रहातात का?
कोणी ना कोणी मित्र-संबंधी इत्यादी खायला देतात. इथे बघा बाबा जुन्या झोपडीमध्ये
रहातात. तुम्ही मुले येऊन महालामध्ये रहाता. बाबा म्हणतील - मुलांनी चांगल्या
प्रकारे रहावे, खावे, प्यावे. जे काहीच घेऊन आलेले नाहीत त्यांना देखील सर्व काही
चांगल्या प्रकारे मिळते. या बाबांपेक्षाही चांगल्या प्रकारे राहतात. शिवबाबा
म्हणतात - मी तर आहेच रमता योगी! कोणाचेही कल्याण करण्यासाठी जाऊ शकतो. जी ज्ञानी
मुले आहेत ती कधीही साक्षात्कार इत्यादी गोष्टींनी खुश होणार नाहीत. योगा शिवाय
दुसरे काहीच नाही. या साक्षात्काराच्या गोष्टींनी खुश व्हायचे नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) योगाची अशी
स्थिती बनवायची आहे जेणेकरून दृष्टीनेच कोणालाही शांत कराल. एकदम सन्नाटा होईल.
याकरिता अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे.
२) ज्ञानाच्या खऱ्या
नशेमध्ये राहण्यासाठी लक्षात रहावे की आपण संगमयुगी आहोत, आता ही जुनी दुनिया
बदलणार आहे, आपण आपल्या घरी जात आहोत. कायम श्रीमतावर चालत रहायचे आहे, हू की चू
करायचे नाही.
वरदान:-
परमात्म मिलन
द्वारे रुहरिहानचा योग्य प्रतिसाद प्राप्त करणारे बाप समान बहुरूपी भव जसे बाबा
बहुरूपी आहेत - सेकंदामध्ये निराकारापासून आकारी वस्त्र धारण करतात, तसे तुम्ही
देखील या मातीच्या ड्रेसला (देहाला) सोडून आकारी फरिश्ता ड्रेस, चमकणारा ड्रेस घाला
तर सहजच भेट देखील होईल आणि रुहरिहानचा क्लियर प्रतिसाद समजून येईल कारण हा ड्रेस
जुन्या दुनियेची वृत्ती आणि व्हायब्रेशन पासून, माया पाण्यापासून किंवा आगीपासून
सुरक्षित आहे. यामध्ये माया हस्तक्षेप करू शकत नाही.
बोधवाक्य:-
दृढता असंभवला
देखील संभव बनवते.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- ब्रह्माकुमार याचा अर्थच आहे
- कायम प्युरिटीची पर्सनॅलिटी आणि रॉयल्टीमध्ये रहाणे. हीच प्युरिटीची पर्सनॅलिटी
विश्वातील आत्म्यांना आपल्याकडे आकर्षित करेल, आणि हीच प्युरिटीची रॉयल्टी
धर्मराजपुरीमध्ये रॉयल्टी देण्यापासून सोडवेल. याच रॉयल्टीच्या आधारे भविष्य रॉयल
फ़ॅमीलीमध्ये येऊ शकाल. जशी शारीरिक पर्सनॅलिटी देह-भानामध्ये आणते, तशी प्युरिटीची
पर्सनॅलिटी देही-अभिमानी बनवून बाबांच्या समीप घेऊन येते.