05-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सुख-शांतीचे वरदान एका बाबांकडूनच मिळते, कोणत्याही देहधारी कडून नाही. बाबा आले आहेत - तुम्हाला मुक्ती-जीवनमुक्तीचा मार्ग दाखविण्याकरिता”

प्रश्न:-
बाबांसोबत जाणे आणि सतयुगाच्या सुरुवातीला येणे यासाठीचा पुरुषार्थ कोणता आहे?

उत्तर:-
बाबांसोबत जायचे असेल, तर पूर्णतः पवित्र बनायचे आहे. सतयुगाच्या सुरुवातीला येण्यासाठी इतर सर्व संगतीपासून बुद्धियोग तोडून एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. आत्म-अभिमानी जरूर बनायचे आहे. एका बाबांच्या मतानुसार चालाल तर उच्च पदाचा अधिकार मिळेल.

गीत:-
नयन हीन को राह दिखाओ…

ओम शांती।
हे गाणे कोणी गायले? मुलांनी, कारण बाबा तर एकच आहेत, त्यांनाच रचयिता म्हटले जाते. रचना, रचयित्याला बोलावते. बाबांनी समजावून सांगितले आहे - भक्ती मार्गामध्ये तर तुम्हाला दोन पिता आहेत. एक लौकिक, दुसरे आहेत पारलौकिक. सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत. एकच पिता असल्याने सर्व आत्मे स्वतःला ब्रदर्स (बांधव) म्हणतात. त्या पित्याला बोलावतात - ‘ओ गॉड फादर, ओ परमपिता दया करा, क्षमा करा’. भक्तांचा रक्षक एक भगवंतच आहेत. सर्वप्रथम तर हे समजावून सांगायला हवे की, आपल्याला दोन पिता आहेत. आता पारलौकिक पिता तर सर्वांचे एकच आहेत. बाकी लौकिक पिता प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. आता लौकिक पिता मोठे की पारलौकिक पिता मोठे? लौकिक पित्याला काही कधी भगवान अथवा परमपिता म्हणणार नाहीत. आत्म्याचे पिता एक परमपिता परमात्माच आहेत. आत्म्याचे नाव कधीही बदलत नाही. शरीराचे नाव बदलते. आत्मा वेगवेगळी शरीरे घेऊन पार्ट बजावते अर्थात पुनर्जन्म घेते. सरतेशेवटी आपल्याला किती जन्म मिळतात, ते तर बाबाच येऊन समजावून सांगतात. मुलांनो, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही. बाबा येतातच मुळी भारतामध्ये, त्यांचे नाव शिव आहे. समजतात देखील की शिव परमात्मा आहे. शिव जयंती अथवा शिवरात्री देखील साजरी करतात. ते निराकार आहेत. जशी आत्मा देखील निराकार आहे, निराकारमधून साकारामध्ये पार्ट बजावण्यासाठी येतात. आता निराकार शिव तर शरीराशिवाय पार्ट बजावू शकत नाहीत. मनुष्य या गोष्टींना अजिबात समजत नाहीत, ते नयन-हीन आहेत. शरीराचे हे दोन डोळे तर सर्वांना आहेत. तिसरा ज्ञानाचा नेत्र आत्म्याला नाहीये, ज्याला दिव्य-चक्षू असेही म्हणतात. आत्मा आपल्या पित्याला विसरून गेली आहे, म्हणूनच बोलावतात - ‘नयनहीन को राह बताओ’. कुठला मार्ग? शांतीधाम आणि सुखधामचा. सर्वांचे सद्गती दाता, सद्गुरू एकच आहेत. मनुष्य, मनुष्याचा गुरू बनून सद्गती देऊ शकत नाही. ना स्वतः सद्गती प्राप्त करतात, ना इतरांना सद्गती देतात. एक बाबाच सर्वांना सद्गती देतात. त्या अल्फ बाबांचीच आठवण करायची आहे. बाबा समजावून म्हणतात - कोणताही मनुष्यमात्र कायमसाठी मुक्ती-जीवनमुक्ती, शांती आणि सुख देऊ शकत नाही. सुख-शांतीचे वरदान तर एक बाबाच देऊ शकतात. मनुष्य, मनुष्याला देऊ शकत नाही. भारतवासी सतोप्रधान होते तेव्हा सतयुगी स्वर्गवासी होते. आत्मा पवित्र होती. भारताला स्वर्ग म्हटले जाते जेव्हा आत्मे पवित्र, सतोप्रधान होते.

तुम्ही जाणता की, बरोबर आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग, सतोप्रधान होता. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आता कलियुगाचा देखील अंतिम काळ आहे, याला नरक म्हटले जाते. हाच भारत जेव्हा स्वर्ग होता तेव्हा अतिशय श्रीमंत होता. हिरे-माणकांचे महाल होते. बाबा मुलांना आठवण करून देत आहेत. सतयुगाच्या सुरुवातीला या लक्ष्मी-नारायणाची राजधानी होती. त्याला स्वर्ग, वैकुंठ म्हटले जाते. आता काही स्वर्ग नाहीये, हे बाबा समजावून सांगत आहेत. बाबा भारतातच येतात. निराकार शिवाची जयंती देखील साजरी करतात, परंतु ते काय करतात, हे मात्र कोणीही जाणत नाहीत. आम्हा आत्म्यांचा पिता शिव आहे, त्यांची आपण जयंती साजरी करतो. बाबांच्या

बायोग्राफीला (जीवनचरित्राला) देखील जाणत नाहीत. गायले देखील जाते - ‘दुःख में सिमरण सब करें (दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात)’. बोलावतात - ‘ओ गॉड फादर दया करा. आम्ही खूप दुःखी आहोत कारण हे रावण राज्य आहे’. वर्षानुवर्षे रावणाला जाळतात ना. परंतु हे कोणालाच ठाऊक नाहीये की, १० डोकी असलेला रावण हा काय प्रकार आहे. आपण त्याला का जाळतो, हा असा कोणता शत्रू आहे ज्यामुळे त्याचा पुतळा बनवून जाळतात? भारतवासी हे अजिबात जाणत नाहीत कारण ज्ञानाचा तिसरा नेत्र नाहीये, म्हणूनच तर रामराज्याची मागणी करतात. ५ विकार स्त्रीमध्ये, ५ विकार पुरुषामध्ये आहेत म्हणून यांना रावण संप्रदाय म्हटले जाते. हे रावणरूपी ५ विकारच मोठ्यात मोठे शत्रू आहेत, ज्यांचा पुतळा बनवून जाळतात. भारतवासीयांना हे लक्षात येत नाही की, रावण आहे तरी कोण, ज्याला जाळतात. हे रावण राज्य कधीपासून सुरू झाले, हे देखील कोणाला माहित नाही. बाबा समजावून सांगतात - रामराज्य आहे - सतयुग, त्रेता. रावण राज्य आहे - द्वापर, कलियुग. सतयुगामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, यांना हे राज्य कुठून आणि कसे मिळाले हे कोणीही जाणत नाही. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. यामध्ये अटेन्शन द्यावे लागते. मोस्ट बिलवेड (अतिशय प्रिय) बाबा आहेत, म्हणूनच तर त्यांना भक्तिमार्गातही बोलावतात. भारतामध्ये जेव्हा यांचे (लक्ष्मी-नारायणाचे) राज्य होते तेव्हा दुःखाचे नाव सुद्धा नव्हते. आता दुःखधाम आहे, कितीतरी अनेक धर्म आहेत. सतयुगामध्ये एकच धर्म होता, इतके सर्व आत्मे कुठे जातील, कोणालाच ठाऊक नाही कारण नयनहीन आहेत. शास्त्रांद्वारे ज्ञानाचा तिसरा नेत्र कोणालाच मिळत नाही. ज्ञानचक्षू ज्ञानसागर परमपिता परमात्माच देतात. आत्म्याला तिसरा नेत्र मिळतो. आत्मा विसरून गेली आहे की आपण किती जन्म घेतले आहेत. सतयुगामध्ये जे देवी-देवतांचे राज्य होते, ते कुठे गेले? गातात देखील - मनुष्य ८४ जन्म घेतात. ८४ चा फेरा असे म्हणतात. परंतु कोणती आत्मा ८४ जन्म घेते? जे सर्वात आधी भारतामध्ये येतात ते होते देवी-देवता. मग ८४ जन्म भोगून अंताला पतित बनतात. गातात देखील - ‘हे पतित-पावन’, तर हे सिद्ध करतात की, आम्ही पतित आहोत म्हणूनच बोलावतात - ‘हे पतित-पावन आम्हाला पावन बनविण्यासाठी या’. जे स्वतःच पतित आहेत ते मग इतरांना पावन कसे काय बनवतील.

बाबा समजावून सांगत आहेत अर्धा कल्प भक्तिमार्गामध्ये रावण राज्य, ५ विकार असल्याकारणाने भारताने इतके दुःख भोगले आहे.

८४ जन्म तर घेतातच. त्याचा देखील हिशोब समजावून सांगितला पाहिजे. सर्वात आधी सतयुगामध्ये आहेत सतोप्रधान, मग त्रेतामध्ये आहेत सतो... आत्म्यामध्ये भेसळ पडते. बाबा येतातच भारतामध्ये. शिवजयंती आहे ना. इतर सर्व आत्मे तर गर्भातून जन्म घेतात. बाबा म्हणतात - मी साधारण वृद्ध तनामध्ये प्रवेश करतो, ज्यांचा हा अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे. हे स्पष्टीकरण काही एकालाच दिले जात नाही. ही गीता पाठशाला आहे. मनुष्याला देवता बनवण्यासाठी हा राजयोग शिकवला जातो. तुम्ही इथे आला आहात स्वर्गाची बादशाही प्राप्त करण्यासाठी जी बाबाच देऊ शकतात. गीता पठण केल्याने कोणी राजा बनत नाही, आणखीनच रंक बनत जातात. बाबा गीतेचे ज्ञान ऐकवून राजा बनवतात, इतरांकडून गीता ऐकून रंक बनले आहेत. भारतामध्ये जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा प्युरिटी-पीस-प्रॉस्पेरिटी (पवित्रता-शांती-समृद्धी) होती, पवित्र गृहस्थ आश्रम होता. तिथे हिंसेचे नाव नव्हते, मग द्वापरपासून हिंसा सुरू झाली आहे. काम-कटारी चालवता-चालवता तुमची ही अवस्था झाली आहे. सतयुगामध्ये १०० टक्के ‘सॉलवेन्ट’ (पवित्र) होते, सतोप्रधान होते. हे रहस्य कोणताही मनुष्य अथवा साधू-संत इत्यादी जाणत नाहीत. बाबा जे ज्ञानाचे सागर, पतित-पावन आहेत, तेच येऊन सतोप्रधान बनण्याची युक्ती सांगतात. रावणाच्या मतावर मनुष्यांची बघा काय हालत झाली आहे. राजे लोक सुद्धा, जे पवित्र राजे होऊन गेले आहेत त्यांच्या चरणी जाऊन पडतात आणि महिमा गातात - तुम्ही सर्वगुण संपन्न, आम्ही नीच पापी आहोत. आमच्यामध्ये कोणतेही गुण नाहीत मग म्हणतात - आपेही तरस परोई (तुम्हीच माझ्यावर दया करा). आम्हाला येऊन मंदिर लायक बनवा. कोणालाही समजून येत नाही की बाबा कशा प्रकारे येऊन पुन्हा देवी-देवता धर्माची स्थापना करतात. आता तुम्हाला समजते की आपण सो देवी-देवता धर्माचे होतो. आम्हीच क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो, इतके जन्म घेतले, आता ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. आता दुनियेचे चक्र पुन्हा फिरले पाहिजे म्हणून मग तुम्हाला इथेच पावन बनायचे आहे. पतित काही सुखधाम, शांतीधाममध्ये जाऊ शकत नाहीत. बाबा समजावून सांगतात तुम्ही जे सतोप्रधान होता ते आता तमोप्रधान बनले आहात. गोल्डन एज्ड मधून (सुवर्णयुगा मधून) मग आयरन एज्ड मध्ये (कलियुगामध्ये) आला आहात; आता पुन्हा गोल्डन एज्ड बनायचे आहे तेव्हाच मुक्तिधाम, सुखधाममध्ये जाऊ शकाल. भारत सुखधाम होता. आता दुःखधाम आहे. गाण्यातही ऐकले - ‘आम्हा आंधळ्यांना मार्ग दाखवा… आम्ही आमच्या शांतीधाममध्ये कसे जाऊ शकतो’. ते लोक तर म्हणतात - परमात्मा सर्वव्यापी आहे, अमका अवतार आहे, परशुराम अवतार आहे. आता बाबा परशुराम बनून कोणाची हत्या करतील का? हे शक्य नाही. बाबा समजावून सांगतात की तुम्ही या चक्रामध्ये कसे ८४ जन्म घेतले आहेत. आता मज अल्फची आठवण करा. हे आत्म्यांनो, देही-अभिमानी बना. देह-अभिमानी बनून तुम्ही पूर्णपणे दुःखी, गरीब, नरकवासी बनला आहात. जर स्वर्गवासी बनायचे असेल तर आत्म-अभिमानी जरूर बनायचे आहे. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. आता ८४ जन्म पूर्ण झाले आहेत पुन्हा सतयुगाच्या सुरुवातीला जायचे आहे. आता माझी आठवण करा आणि इतर सर्व संगतींपासून बुद्धियोग तोडा. गृहस्थ व्यवहारामध्ये भले रहा, स्वतःला आत्मा निश्चय करा. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. आता देही-अभिमानी बनायचे आहे, माझी आठवण करा म्हणजे सर्व भेसळ खाक होईल. तुम्ही पवित्र बनाल मग मी सर्व मुलांना घेऊन जाईन. जर माझ्या मतानुसार चालला नाहीत तर इतके उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. या लक्ष्मी-नारायणाचे उच्च पद आहे. जेव्हा यांचे राज्य होते तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. द्वापरपासून मग इतर धर्म येतात. सतयुगामध्ये मनुष्य देखील फार थोडे असतात. आता तर अनेक धर्म असल्याकारणाने किती दुःखी झाले आहेत. तेच देवता धर्मवाले आता पतित झाल्यामुळे स्वतःला देवता म्हणत नाहीत. हिंदू नाव ठेवले आहे. बाबा समजावून सांगतात की जेव्हा तुम्ही लायक देवी-देवता होता तेव्हा संपूर्ण विश्वावर राज्य होते, सर्व सुखी होते. आता दुःखी बनले आहेत. भारत हेवन (स्वर्ग) होता तो आता हेल (नरक) बनला आहे; आता पुन्हा नरकाला स्वर्ग बाबांशिवाय कोणीही बनवू शकत नाही. देवतांना संपूर्ण निर्विकारी म्हटले जाते. इथले मनुष्य तर संपूर्ण विकारी आहेत, यांना म्हटले जाते पतित. भारत शिवालय होता, शिवबाबांद्वारे स्थापना झाली होती. बाबा स्वर्ग बनवतात मग रावण नरक बनवतो. रावण शाप देतो, बाबा २१ जन्मांसाठी वारसा देतात. आता तुम्ही प्रत्येकाने एका बाबांचीच आठवण करा, कोणत्याही देहधारीची नाही. देहधारीला भगवान म्हटले जात नाही. भगवान तर एकच आहेत. बाबा तर बेहदचा वारसा देतात आणि मग रावण शापित बनवतो. या वेळी भारत शापित आहे, खूप दुःखी आहे. आता या रावणावर विजय मिळवायचा आहे. गायले देखील जाते - दे दान तो छूटे ग्रहण’. ते जे ग्रहण लागते ती तर पृथ्वीची सावली असते. आता बाबा म्हणतात तुमच्यावर ५ विकार रूपी रावणाचे ग्रहण लागलेले आहे. हे ५ विकार दान करायचे आहेत. पहिले तर हे दान द्या की आम्ही कधीही विकारामध्ये जाणार नाही. ही काम-कटारीच मनुष्याला पतित बनविते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबा जे नॉलेज देत आहेत, ते नीट लक्षपूर्वक शिकायचे आहे. ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे आपल्या ८४ जन्मांना जाणून आता या अंतिम जन्मामध्ये पावन बनायचे आहे.

२) रावणाच्या शापातून वाचण्याकरिता एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. ५ विकारांचे दान द्यायचे आहे. एका बाबांच्या मतानुसार चालायचे आहे.

वरदान:-
ताज आणि तिलक धारण करून बापदादांचे मदतगार बनणारे दिलतख्तनशीन भव

जेव्हा कोणी सिंहासनावर बसतात तेव्हा तिलक आणि ताज ही त्यांची निशाणी असते. अगदी तसेच जे दिलतख्तनशीन आहेत त्यांच्या मस्तकावर सदैव अविनाशी आत्म्याच्या स्थितीचा तिलक दुरूनच चमकताना दिसून येतो. सर्व आत्म्यांच्या कल्याणाची शुभ भावना त्यांच्या डोळ्यांमधून अथवा चेहऱ्यावरून दिसून येते. त्यांचा प्रत्येक संकल्प, वचन आणि कर्म पित्या समान असतो.

बोधवाक्य:-
सरळ आठवणी करिता सरळपणाचा गुण धारण करा, संस्कारांना सरळ बनवा.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

ज्यांनी ड्रामाच्या ज्ञानाची शक्ती प्रॅक्टिकल जीवनामध्ये धारण केली आहे, ते कधीही डगमगत नाहीत. सदैव एकरस, अचल-अडोल बनण्याची आणि बनविण्याची विशेष शक्ती म्हणजे हा ड्रामाचा पॉईंट आहे. याला शक्तीच्या रूपामध्ये धारण करणारे कधीही हार खाऊ शकत नाहीत. या कल्याणकारी ड्रामाच्या प्रत्येक सीनमध्ये काही ना काही कल्याण दडलेले आहे, धैर्यवान बनून साक्षी होऊन पाहण्याचा सराव करा तेव्हाच अचल-अडोल रहाल.