05-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही साहेबजादे सो शहजादे बनणार आहात, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची इच्छा ठेवायची नाहीये, कोणाकडूनही काहीही मागायचे नाही”

प्रश्न:-
आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहता कामा नये?

उत्तर:-
बरीच मुले असे समजतात कि सुखसोयींच्या आधारावर तब्येत चांगली राहील. परंतु बाबा म्हणतात - ‘मुलांनो, इथे तुम्हाला सुखसोयींची इच्छा ठेवायची नाहीये. सुखसोयींमुळे तुमची तब्येत ठीक होणार नाही. तब्येत चांगली ठेवण्यासाठी तर आठवणीची यात्रा पाहिजे’. म्हटले जाते - ‘खुशी जैसी खुराक नहीं’. तुम्ही आनंदात रहा, शुद्ध नशेमध्ये रहा. यज्ञामध्ये दधीचिऋषीप्रमाणे हाडे स्वाहा करा तर तुमचे आरोग्य चांगले राहील.

ओम शांती।
बाबांना म्हटले जाते - करनकरावनहार. तुम्ही साहेबजादे (ईश्वराची मुले) आहात. तुमचे या सृष्टीवर खूप उच्च स्थान आहे. तुम्हा मुलांना हा नशा असला पाहिजे की आम्ही ईश्वराची मुले, ईश्वराच्या मतानुसार आता पुन्हा आपले राज्य-भाग्य स्थापन करत आहोत. हे देखील कोणाच्या बुद्धीमध्ये लक्षात राहत नाही. बाबा, हे सर्व सेंटर्सच्या मुलांसाठी सांगत आहेत. खूप सेंटर्स आहेत, भरपूर मुले येतात. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये सदैव हे लक्षात राहिले पाहिजे की, आम्ही बाबांच्या श्रीमतावर पुन्हा विश्वामध्ये शांती आणि सुखाचे राज्य स्थापन करत आहोत. ‘सुख’ आणि ‘शांती’ हे दोनच शब्द लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हा मुलांना किती ज्ञान मिळते, तुमची बुद्धी किती विशाल असली पाहिजे. यामध्ये मंदबुद्धी काम करू शकत नाही. स्वतःला ईश्वराची मुले समजा तर पापे नष्ट होतील. असे बरेच आहेत ज्यांना पूर्ण दिवस बाबांची आठवणच राहत नाही. बाबा म्हणतात तुमची बुद्धी मंद का होते? सेंटर्सवर अशी देखील मुले येतात, ज्यांच्या बुद्धीतच नाहीये की, आपण श्रीमतावर विश्वामध्ये आपले दैवी राज्य स्थापन करत आहोत. आतमधे तो शुद्ध नशा, शुद्ध गर्व असला पाहिजे. मुरली ऐकून रोमांच उभे राहिले पाहिजेत. इथे तर बाबा बघतात मुलांमध्ये रोमांच तर अजूनच मृतावस्थेमध्ये असतात; अशी पुष्कळ मुले आहेत ज्यांच्या बुद्धीमध्ये ही आठवणच राहत नाही की, आपण श्रीमतावर बाबांच्या आठवणीने विकर्म विनाश करून आपली राजधानी स्थापन करत आहोत. बाबा रोज समजावून सांगत असतात - ‘मुलांनो, तुम्ही योद्धे आहात, रावणावर विजय प्राप्त करणारे आहात’. बाबा तुम्हाला मंदिर लायक बनवत आहेत परंतु तेवढा नशा आणि आनंद मुलांना रहातो थोडाच, कोणती वस्तू मिळाली नाही की बस लगेच अस्वस्थ होतात. बाबांना तर मुलांच्या अवस्थेबद्दल आश्चर्य वाटते. मायेच्या बेडीत अडकून पडतात. तुमचा मान, तुमचा व्यवसाय, तुमचा आनंद तर अद्भुत असला पाहिजे. जे मित्र-नातेवाईकांना विसरत नाहीत ते कधीही बाबांची आठवण करू शकणार नाहीत. मग पद काय मिळणार! आश्चर्य वाटते.

तुम्हा मुलांना तर खूप नशा असला पाहिजे. स्वतःला साहेबजादे (ईश्वराची मुले) समजा तर काहीही मागण्याची गरज भासणार नाही. ‘बाबा तर आम्हाला इतका अथाह खजिना देतात जो २१ जन्मांपर्यंत काहीही मागण्याची गरजच नाही’, इतका नशा असला पाहिजे. परंतु अगदीच मंद बुद्धी, छोटी बुद्धी आहे. तुम्हा मुलांची बुद्धी तर ७ फूट लांब असली पाहिजे. मनुष्याची उंची जास्तीत जास्त ६-७ फूट असते. बाबा मुलांना किती उत्साहामध्ये आणतात - तुम्ही साहेबजादे (ईश्वराची मुले) आहात, या दुनियेतील लोकांना तर काहीच समजत नाही. त्यांना तुम्ही समजावून सांगता की, फक्त तुम्ही असे समजा की, आम्ही बाबांसमोर बसलो आहोत, बाबांची आठवण करत राहिलो तर विकर्म नष्ट होतील. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, माया तुमचा खूप कट्टर शत्रू आहे, बाकीच्यांचा इतका शत्रू नाहीये, जितका तुमचा आहे. मनुष्य तर जाणतही नाहीत, तुच्छ बुद्धी आहेत. बाबा रोज-रोज तुम्हा मुलांना सांगतात, ‘तुम्ही ईश्वराची मुले आहात, बाबांची आठवण करा आणि इतरांना आप-समान बनवत रहा. तुम्ही सर्वांना हे सुद्धा समजावून सांगू शकता की, भगवान तर सच्चा साहेब आहे ना. तर आम्ही त्यांची मुले साहेबजादे (ईश्वराची संतान) झालो, तुम्हा मुलांना चालता-फिरता बुद्धीमध्ये हीच आठवण ठेवायची आहे. सेवेमध्ये दधीचिऋषी प्रमाणे हाडेसुद्धा दिली पाहिजेत (इतकी अथक सेवा केली पाहिजे). इथे हाडे देणे तर काय अजूनच भरपूर सुख ऐषोआराम पाहिजे असतो. शारीरिक स्वास्थ्य काही या गोष्टींनी थोडेच चांगले होते? शारीरिक स्वास्थ्याकरिता पाहिजे आठवणीची यात्रा. तो आनंद वाटला पाहिजे. अरे, आपण कल्प-कल्प मायेकडून पराभूत होत आलो आहोत, आता मायेवर विजय प्राप्त करतो. बाबा येऊन विजय प्राप्त करून देतात. आता भारतामध्ये किती दुःख आहे, अतोनात दुःख देणारा आहे रावण. ते लोक असे समजतात की, आपल्याकडे विमान आहे, गाड्या-बंगला आहे, बस्स, हाच स्वर्ग आहे. ते हेच समजत नाहीत की ही दुनियाच तर नष्ट होणार आहे. लाखो, करोडोंनी पैसा खर्च करतात, धरणे इत्यादी बांधतात, युद्धाचे सामान देखील किती गोळा करत आहेत. हे एकमेकांना संपवणार आहेत, अनाथ आहेत ना. किती लढाई-झगडे करतात, काही विचारू नका. किती गलिच्छपणा भरून राहिला आहे. याला म्हटले जाते नरक. स्वर्गाची तर खूप महिमा आहे. बडोद्याच्या महाराणीला विचारा, ‘महाराज कुठे गेले?’ तर म्हणतील, ‘स्वर्गवासी झाले’. स्वर्ग कशाला म्हटले जाते - हे कोणीच जाणत नाही, किती घोर अंधःकार आहे. तुम्ही देखील घोर अंधारात होता. आता बाबा म्हणतात - मी तुम्हाला ईश्वरीय बुद्धी देतो. स्वतःला ईश्वराची संतान, साहेब-जादे (राजाची मुले) समजा. साहेब तुम्हाला शिकवतात राजकुमार बनवण्यासाठी. बाबा एक म्हण सांगतात ना - ‘रिढ़ छा जाने…’ (मेंढीला काय समजणार…) आता तुम्ही समजता - मनुष्यसुद्धा सर्व मेंढ्या-बकऱ्यांसारखे आहेत, काहीही समजत नाहीत. कसल्या-कसल्या उपमा देतात. तुमच्या बुद्धीमध्ये आदि-मध्य-अंताचे रहस्य आहे. नीट आठवा की, आम्ही विश्वामध्ये सुख-शांती स्थापन करत आहोत. जे मदतगार बनतील तेच श्रेष्ठ पद प्राप्त करतील. ते देखील तुम्ही बघता की कोण-कोण मदतगार बनतात. आपल्या मनाला प्रत्येकाने विचारा की, आपण काय करत आहोत? आम्ही मेंढ्या-बकऱ्या तर नाही आहोत? माणसामध्ये अहंकार बघा किती आहे, लगेच गुरगुरायला लागतात. तुम्हाला तर बाबांची आठवण असली पाहिजे. सेवेमध्ये हाडे द्यायची आहेत, कोणालाही नाराज करायचे नाही आणि कोणावर नाराज व्हायचे देखील नाही. अहंकार सुद्धा येता कामा नये. मी हे करतो, मी इतका हुशार आहे, असा विचार येणे हा सुद्धा देह-अभिमान आहे. त्याचे वर्तनच असे होते की लाज वाटेल. नाही तर तुमच्यासारखे सुख आणखी कोणालाही मिळत नाही. जर याची बुद्धीमध्ये आठवण राहिली तर तुम्ही चमकत रहाल. सेंटरवर कोणी तर चांगले महारथी आहेत, कोणी घोडेस्वार, प्यादीसुद्धा आहेत. यामध्ये अति विशाल बुद्धी असायला हवी. कशा-कशा ब्राह्मणी आहेत, काही तर खूप मदतगार आहेत, सेवेमध्ये किती आनंद होत असतो. तुम्हाला नशा चढला पाहिजे. सेवेशिवाय कसले पद मिळवणार. आई-वडिलांना तर मुलांबद्दल आदर असतो. परंतु ते आपणच आपला आदर ठेवत नाहीत तर बाबा तरी काय म्हणणार?

तुम्हा मुलांना बाबांचा संदेश थोडक्यात द्यायचा आहे. तुम्ही सांगा, ‘बाबा म्हणतात - मनमनाभव’. गीतेमध्ये काही शब्द आहेत परंतु पिठात मीठा प्रमाणे. ही विशाल दुनिया किती मोठ्ठी आहे, हे डोक्यात आले पाहिजे. किती मोठे जग आहे, किती मनुष्य आहेत, हे मग काहीही राहणार नाहीये. कोणत्याही खंडाचे नामोनिशाण सुद्धा राहणार नाही. आपण स्वर्गाचे मालक बनत आहोत याचा आनंद रात्रं-दिवस राहिला पाहिजे. ज्ञान तर खूप सोपे आहे, समजावून सांगणारे अतिशय रमजबाज (चतुर) पाहिजेत. अनेक प्रकारच्या युक्त्या आहेत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला खूप धूर्त बनवितो’. ते लोक, राजदूताला धूर्त म्हणतात. तर मुलांच्या बुद्धीमध्ये आठवण राहिली पाहिजे. ओहो! बेहदचे बाबा आम्हाला मार्गदर्शन करतात, तुम्ही हे धारण करून इतरांना सुद्धा बाबांचा परिचय देता. तुमच्याशिवाय बाकी सारी दुनिया नास्तिक आहे. तुमच्यामधे देखील नंबरवार आहेत. कोणी तर नास्तिक सुद्धा आहेत ना. बाबांची आठवणच करत नाहीत. आपणच सांगतात - ‘बाबा, आम्ही आठवण विसरून जातो’, तर नास्तिक झाले ना. असे बाबा, जे आपल्याला साहेबजादा (राजकुमार) बनवतात, त्यांची आठवण सुद्धा येत नाही! हे समजण्यासाठी देखील खूप विशाल बुद्धी पाहिजे. बाबा म्हणतात - ‘मी दर ५ हजार वर्षानंतर येतो. तुमच्याकडून कार्य करून घेतो. तुम्ही किती चांगले योद्धे आहात. ‘वन्दे मातरम्’ म्हणून तुमचे गायन आहे. तुम्हीच पूज्य होता आणि मग पुजारी बनले आहात. आता श्रीमतावर पुन्हा पूज्य बनत आहात. तर तुम्हा मुलांना अतिशय शांतीने सेवा करायची आहे. तुम्ही अशांत होता कामा नये. ज्यांच्या नसा-नसांमध्ये भुते (विकार) भरलेले आहेत, ते काय पद मिळवणार. लोभ देखील एक मोठे भूत आहे. बाबा सर्व बघत असतात की प्रत्येकाची वर्तणूक कशी आहे. बाबा किती नशा चढवतात, कोणी सेवा करत नाहीत, फक्त खात-पीत राहतात तर मग २१ जन्म सेवा करावी लागेल. दास-दासी सुद्धा बनतील ना. शेवटी सर्वांना साक्षात्कार होईल. सेवाभावी मुलेच बाबांचे मन जिंकतात. तुमची सेवाच ही आहे कि, कोणालाही अमरलोकचा वासी बनविणे. बाबा हिम्मत तर खूप भरतात, धारणा करा; देह-अभिमानी असणाऱ्यांना धारणा होऊ शकत नाही. तुम्ही जाणता बाबांची आठवण करून आपण वेश्यालयातून शिवालयामध्ये जात आहोत, तर मग तसे बनून देखील दाखवायचे आहे.

बाबा तर पत्रांमध्ये लिहितात - ‘लाडक्या रुहानी ईश्वरीय मुलांनो, आता श्रीमतावर चालाल, महारथी बनाल तर राजकुमार नक्कीच बनाल’. एम ऑब्जेक्टच हे आहे. एकच सत्य बाबा तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजावून सांगत आहेत. सेवा करून इतरांचे कल्याण देखील करत रहा. योगबल नसेल तर इच्छा उत्पन्न होतात - ‘हे पाहिजे, ते पाहिजे’. तो आनंद राहत नाही, म्हटले जाते - ‘खुशी जैसी खुराक नहीं’. ईश्वराच्या मुलांना तर अतिशय आनंद झाला पाहिजे. जर तो नसेल तर मग अनेक प्रकारच्या गोष्टी येतात. अरे, बाबा विश्वाची बादशाही देत आहेत, आणखी अजून काय पाहिजे! प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा की, आम्ही, इतक्या गोड बाबांची काय सेवा करतो? बाबा म्हणतात, सर्वांना संदेश देत जा - साहेब (बाबा) आलेले आहेत. खरेतर तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात. भले म्हणतात - आपल्याला सर्व भावा-भावांना मदत केली पाहिजे. या विचाराने भाऊ म्हणतात. इथे तर बाबा म्हणतात - ‘तुम्ही एका पित्याची मुले भाऊ-भाऊ आहात’. बाबाच स्वर्गाची स्थापना करणारे आहेत. स्वर्ग बनवितात मुलांद्वारे. सेवेच्या युक्त्या तर खूप सांगतात. मित्र-नातेवाईकांना सुद्धा समजावून सांगायचे आहे. बघा, परदेशात मुले आहेत ती देखील सेवा करत आहेत. दिवसेंदिवस लोक आपत्ती बघून समजतील - मरण्याच्या आधी वारसा तर घेऊ. मुले आपल्या मित्र-नातेवाईकांना सुद्धा ज्ञान देत आहेत. पवित्र देखील राहतात. बाकी, निरंतर भावा-भावाची अवस्था असली पाहिजे, ते अवघड आहे. बाबांनी तर मुलांना ‘साहेबजादे (ईश्वराची मुले)’ ही किती छान उपाधि दिली आहे. स्वतःला पाहिले पाहिजे. जर सेवा केली नाही तर आपण काय बनू? जर एखाद्याने काही जमा केले आणि मग ते खाता-खाता संपून गेले तर अजूनच त्यांच्या खात्यावर ओझे चढते. सेवा करणाऱ्यांना कधीही हा विचार येऊ नये की, आम्ही एवढे दिले, त्यातून सर्वांचे पालन-पोषण होते म्हणून मदत करणाऱ्यांचे आदरातिथ्यसुद्धा केले जाते, समजावून सांगितले पाहिजे की, खायला घालणारे ते आहेत. आत्मिक मुले तुम्हाला खाऊ घालतात. तुम्ही त्यांची सेवा करता, हा मोठा हिशोब आहे. मन्सा, वाचा, कर्मणा त्यांची सेवाच केली नाहीत तर तो आनंद कसा मिळणार. शिवबाबांची आठवण करत जेवण बनवाल तर त्यातून शक्ती मिळेल. आपल्या मनाला विचारायचे आहे की, ‘मी सर्वांना संतुष्ट करतो?’ महारथी मुले किती सेवा करत आहेत. बाबा रेग्झिनवर चित्र बनवून घेतात, ही चित्रे कधीही तुटणार-फुटणार नाहीत. बाबांची मुले बसली आहेत, आपण होऊन पाठवतील. नाहीतर बाबा पैसे कुठून आणतील. ही सर्व सेंटर्स कशी चालतात? मुलेच चालवतात ना. शिवबाबा म्हणतात माझ्याजवळ तर एक कवडी सुद्धा नाहीये. पुढे जाऊन आपणच येऊन तुम्हाला म्हणतील आमच्या घराचा तुम्ही उपयोग करा. तुम्ही म्हणाल - ‘टू लेट (आता फार उशीर झाला आहे)’. बाबा आहेतच गरीब निवाज (गरिबांचे कैवारी). गरीबांकडे कुठून येणार. कोणी तर करोडपती, पद्मपती सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी इथेच स्वर्ग आहे. हा आहे मायेचा भपका. तिचे आता पतन होत आहे. बाबा म्हणतात - ‘तुम्ही आधी साहेबजादे (ईश्वराची मुले) बनले आहात मग जाऊन राजकुमार बनाल. परंतु तेवढी सेवासुद्धा करून दाखवा ना… खूप आनंदात राहिले पाहिजे. आम्ही ईश्वराची मुले आहोत आणि मग राजकुमार बनणार आहोत. राजकुमार तेव्हा बनाल जेव्हा अनेकांची सेवा कराल. आनंदाचा पारा किती चढला पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ना कधी कोणाला नाराज करायचे आहे आणि ना आपण नाराज व्हायचे आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा किंवा करत असलेल्या सेवेच्या बाबतीत अहंकार बाळगायचा नाही. जसे बाबा मुलांचा आदर ठेवतात तसा आपला आदर आपणच ठेवायचा आहे.

२) योगबलाने आपल्या इच्छा समाप्त करायच्या आहेत. सदैव या आनंदामध्ये आणि नशेमध्ये रहायचे आहे की, आम्ही ईश्वराची मुले तर राजकुमार बनणार आहोत. नेहमी शांतीमध्ये राहून सेवा करायची आहे. नसा-नसांमध्ये जी भुते (विकार) भरलेली आहेत, त्यांना काढून टाकायचे आहे.

वरदान:-
ब्राह्मण जीवनामध्ये बाबांकडून लाईटचा मुकुट प्राप्त करणारे महान भाग्यशाली आत्मा भव

संगमयुगी ब्राह्मण जीवनाचे वैशिष्ट्य ‘पवित्रता’ आहे. पवित्रतेचे चिन्ह - लाईटचा मुकुट आहे जो प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला बाबांकडून प्राप्त होतो. पवित्रतेच्या लाईटचा हा मुकुट त्या रत्नजडित मुकुटापेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. महान आत्मा, परमात्म भाग्यवान आत्मा, अत्यंत श्रेष्ठ आत्म्याचा हा मुकुट हि एक निशाणी आहे. बापदादा प्रत्येक मुलाला जन्मापासून ‘पवित्र भव’ चे वरदान देतात, ज्याचे सूचक लाईटचा मुकुट आहे.

बोधवाक्य:-
बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे इच्छांच्या आहारी जाऊन चिंताग्रस्त झालेल्या आत्म्यांची चिंता दूर करा.