05-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - आठवणीनेच बॅटरी चार्ज होईल, शक्ती मिळेल, आत्मा सतोप्रधान बनेल म्हणून आठवणीच्या यात्रेवर विशेष अटेंशन द्या

प्रश्न:-
ज्या मुलांचे प्रेम एका बाबांवरच आहे, त्यांचे लक्षण काय असेल?

उत्तर:-
१) जर एका बाबांवरच प्रेम असेल तर बाबांची नजर त्यांना निहाल (मालामाल) करेल. २) ते पूर्णत: नष्टोमोहा असतील. ३) ज्यांना बेहदच्या बाबांचे प्रेम पसंत पडले, ते दुसऱ्या कुणाच्याही प्रेमामध्ये फसू शकत नाहीत. ४) त्यांची बुद्धी असत्यखंडातील असत्य मनुष्यांपासून दूर जाते. बाबा तुम्हाला आता असे प्रेम देतात जे अविनाशी बनते. सतयुगामध्ये देखील तुम्ही आपसामध्ये खूप प्रेमाने राहता.

ओम शांती।
बेहदच्या बाबांचे प्रेम आता एकदाच तुम्हा मुलांना मिळते. ज्या प्रेमाची भक्तीमध्ये देखील खूप आठवण करतात. बाबा, बस्स तुमचेच प्रेम पाहिजे. तुम मात पिता तुम्हीच सर्व काही आहात. एकाकडूनच अर्ध्या कल्पासाठी प्रेम मिळते. तुमच्या या रूहानी प्रेमाची महिमा अपरंपार आहे. बाबाच तुम्हा मुलांना शांतीधामचा मालक बनवितात. आता तुम्ही दुःखधाममध्ये आहात. अशांती आणि दुःखामध्ये सर्वजण ओरडत असतात. कोणालाही धनी धोणी (मालक) नाही आहे म्हणून भक्तिमार्गामध्ये आठवण करतात. परंतु नियमा नुसार भक्तीचा देखील कालावधी अर्धा कल्प असतो.

हे तर मुलांना समजावून सांगितले आहे, असे नाही की बाबा अंतर्यामी आहेत. बाबांना सर्वांच्या मनातील जाणण्याची गरजच नाही. ते तर थॉट रीडर्स (दुसऱ्याच्या मनातील विचारांना जाणणारे) असतात. ते देखील ही विद्या शिकतात. इथे अशी गोष्टच नाही. बाबा येतात, बाबा आणि मुलेच हा सर्व पार्ट बजावतात. बाबा जाणतात सृष्टीचे चक्र कसे फिरते, त्यामध्ये मुले कसा पार्ट बजावतात. असे नाही की ते प्रत्येकाच्या मनातले जाणतात. हे तर रात्री देखील समजावून सांगितले आहे की, प्रत्येकामध्ये विकारच आहेत. मनुष्य अतिशय घाणेरडे आहेत. बाबा येऊन गुल-गुल (फुल) बनवितात. हे बाबांचे प्रेम तुम्हा मुलांना एकदाच मिळते जे मग अविनाशी बनते. तिथे (सतयुगामध्ये) तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता. आता तुम्ही मोहजीत बनत आहात. सतयुगी राज्याला मोहजीत राजा, राणी तथा प्रजेचे राज्य म्हटले जाते. तिथे कधी कोणी रडत नाहीत. दुःखाचे नावच नाही. तुम्ही मुले जाणता बरोबर भारतामध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस (आरोग्य, समृद्धी, आनंद) होता, आता नाही आहे कारण आता रावणाचे राज्य आहे. यामध्ये सर्वजण दुःख भोगतात, आणि मग बाबांची आठवण करतात की येऊन सुख-शांती द्या, दया करा. बेहदचे बाबा आहेत दयाळू. रावण आहे निर्दयी, दुःखाचा रस्ता सांगणारा. सर्व मनुष्य दुःखाच्या रस्त्यावर चालतात. सर्वात मोठ्यात मोठा दुःख देणारा आहे काम विकार म्हणून बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो, काम विकारावर विजय प्राप्त करा तर जगतजीत बनाल. या लक्ष्मी-नारायणाला जगतजीत म्हणणार ना. तुमच्यासमोर एम ऑब्जेक्ट उभा आहे. मंदिरांमध्ये भले जातात परंतु त्यांची बायोग्राफी (जीवन चरित्र) काहीच जाणत नाहीत. जसे बाहुल्यांची पूजा होते. देवींची पूजा करतात, मुर्त्या बनवून, खूप शृंगार करून भोग इत्यादी लावतात. परंतु त्या देवी तर काहीच खात नाहीत. ब्राह्मण लोक खाऊन टाकतात. निर्माण करून जोपासना करून मग विसर्जित करतात, याला म्हटले जाते अंधश्रद्धा. सतयुगामध्ये या गोष्टी असत नाहीत. हे सर्व रीतिरिवाज येतात कलियुगामध्ये. तुम्ही सर्वप्रथम एका शिवबाबांची पूजा करता, ज्याला अव्यभिचारी खरी पूजा म्हटले जाते. नंतर मग होते व्यभिचारी पूजा. बाबा शब्द उच्चारताच परिवाराचा सुगंध येतो. तुम्ही देखील म्हणता ना - तुम मात पिता तुमच्या या ज्ञान देण्याच्या कृपेमुळे आम्हाला भरभरून सुख मिळते. बुद्धीमध्ये आठवण आहे की आम्ही सर्वप्रथम मूलवतनमध्ये होतो. तिथून इथे येतो शरीर घेऊन पार्ट बजावण्यासाठी. सर्वप्रथम आम्ही दैवी शरीर धारण करतो अर्थात आपल्याला देवता म्हणतात. नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्णांमध्ये येत भिन्न-भिन्न पार्ट बजावतो. या गोष्टी तुम्ही आधी जाणत नव्हता. आता बाबांनी येऊन आदि-मध्य-अंताचे नॉलेज तुम्हा मुलांना दिले आहे. स्वतःचे देखील नॉलेज दिले की, मी या तनामध्ये (ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये) प्रवेश करतो. हे आपल्या ८४ जन्मांना जाणत नव्हते. तुम्ही देखील जाणत नव्हता. श्याम-सुंदरचे रहस्य तर समजावून सांगितले आहे. हा श्रीकृष्ण आहे नवीन दुनियेचा पहिला प्रिन्स आणि राधा दुसऱ्या नंबरवर आहे. थोड्या वर्षांचा फरक असतो. सृष्टीच्या सुरुवातीला यांना (श्रीकृष्णाला) पहिल्या नंबरचे म्हटले जाते म्हणूनच श्रीकृष्णावर सर्वजण प्रेम करतात, यांनाच श्याम आणि सुंदर म्हटले जाते. स्वर्गामध्ये तर सर्व सुंदरच होते. आता स्वर्ग कुठे आहे! चक्र फिरतच राहते. असे नाही की समुद्राच्या खाली गेले. जसे म्हणतात लंका, द्वारका खाली गेली. नाही, हे चक्र फिरत राहते. या चक्राला जाणल्याने तुम्ही चक्रवर्ती महाराजा-महाराणी विश्वाचे मालक बनता. प्रजा सुद्धा स्वतःला मालक समजते ना; म्हणतील, आमचे राज्य आहे. भारतवासी म्हणतील, आमचे राज्य आहे. भारत नाव आहे. हिंदुस्तान नाव चुकीचे आहे. खरेतर आदि सनातन देवी-देवता धर्मच आहे. परंतु धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट झाल्यामुळे स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. नाहीतर बाबा येऊन पुन्हा कसे देवी-देवता धर्माची स्थापना करतील. आधी तुम्हाला देखील या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या, आता बाबांनी समजावून सांगितल्या आहेत.

इतके गोड बाबा, त्यांना देखील तुम्ही विसरून जाता! सर्वात गोड बाबा आहेत ना. बाकी रावण राज्यामध्ये तुम्हाला सर्वजण दुःखच देतात ना, म्हणूनच बेहदच्या बाबांची आठवण करता. त्यांच्या आठवणीमध्ये प्रेमाचे अश्रू ढाळता - अहो साजन, केव्हा येऊन सजणींना भेटणार? कारण तुम्ही सर्व आहात भक्तिणी. भक्तिणींचा पती असतो भगवान. भगवान येऊन भक्तीचे फळ देतात, रस्ता सांगतात आणि समजावून सांगतात - हा ५००० वर्षांचा खेळ आहे. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला कोणताही मनुष्य जाणत नाही. रूहानी बाबा आणि रूहानी मुलेच जाणतात. कोणीही मनुष्य जाणत नाहीत, देवता देखील जाणत नाहीत. हे स्पिरिच्युअल फादरच (अध्यात्मिक पिताच) जाणतात. ते बसून आपल्या मुलांना समजावून सांगतात. आणखी कोणत्याही देहधारीकडे हे रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज असू शकत नाही. हे नॉलेज असतेच रूहानी बाबांकडे. त्यांनाच ज्ञान-ज्ञानेश्वरी म्हटले जाते. ज्ञान-ज्ञानेश्वरी तुम्हाला ज्ञान देतात, राज-राजेश्वरी बनण्यासाठी म्हणूनच याला राजयोग म्हटले जाते. बाकी ते सर्व आहेत हठयोग. हठयोगींची देखील खूप चित्रे आहेत. संन्यासी जेव्हा येतात, ते येऊन नंतर हठयोग शिकवतात. जेव्हा खूप वृद्धी होते तेव्हा हठयोग वगैरे शिकवतात. बाबांनी समजावून सांगितले आहे कि, मी येतोच संगमावर, येऊन राजधानी स्थापन करतो. स्थापना इथे करतात, सतयुगामध्ये नाही. सतयुग इत्यादी ठिकाणी तर राजाई असते तर जरूर संगमावर स्थापना होते. इथे कलियुगामध्ये आहेत सगळे पुजारी, सतयुगामध्ये आहेत पूज्य. तर बाबा पूज्य बनविण्यासाठी येतात. पुजारी बनवणार आहे रावण. हे सर्व जाणून घेतले पाहिजे ना. हे आहे उच्च ते उच्च शिक्षण. या टीचरला कोणीही जाणत नाही. ते सुप्रीम पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. हे कोणीही जाणत नाही. बाबाच येऊन स्वतःचा पूर्ण परिचय देतात. मुलांना स्वतः शिकवून मग सोबत घेऊन जातात. बेहदच्या बाबांचे प्रेम मिळते तर मग आणखी कोणतेही प्रेम पसंत पडत नाही. यावेळी आहेच झूठखंड. झूठी माया, झूठी काया भारत आता झूठखंड आहे नंतर सतयुगामध्ये होईल सत्य खंड. भारताचा कधी विनाश होत नाही. हे आहे सर्वात मोठ्यात मोठे तीर्थ. जिथे बेहदचे बाबा बसून मुलांना सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात आणि सर्वांची सद्गती करतात. हे खूप मोठे तीर्थ आहे. भारताची महिमा अपरंपार आहे. परंतु हे देखील तुम्हीच समजू शकता - भारत आहे वंडर ऑफ वर्ल्ड. ती आहेत मायेची सात वंडर्स (आश्चर्य). ईश्वराचे वंडर एकच आहे. बाबा एक, त्यांचा वंडरफुल स्वर्ग देखील एकच आहे. त्यालाच हेवन, पॅराडाईज म्हटले जाते. खरे-खरे नाव एकच आहे - स्वर्ग, हा आहे - नरक. ऑल राऊंड चक्र तुम्ही ब्राह्मणच लावता. हम सो ब्राह्मण, सो देवता चढती कला, उतरती कला. चढती कला तेरे भाने सर्व का भला. भारतवासींचीच इच्छा आहे की विश्वामध्ये शांती देखील असावी, सुख देखील असावे. स्वर्गामध्ये तर आहेच सुख, दुःखाचे तर नाव सुद्धा नाही. त्याला म्हटले जाते ईश्वरीय राज्य. सतयुगामध्ये सूर्यवंशी आणि मग सेकंड ग्रेडमध्ये आहेत चंद्रवंशी. तुम्ही आहात आस्तिक, ते आहेत नास्तिक. तुम्ही धनीचे बनून बाबांकडून वारसा घेण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुमचे माये सोबत गुप्तपणे युद्ध चालते. बाबा येतात रात्रीचे. शिवरात्री आहे ना. परंतु शिवच्या रात्रीचा देखील अर्थ समजत नाहीत. ब्रह्माची रात्र पूर्ण होते, दिवस सुरू होतो. ते म्हणतात श्रीकृष्ण भगवानुवाच, हे तर आहे शिव भगवानुवाच. आता बरोबर कोण? श्रीकृष्ण तर पूर्ण ८४ जन्म घेतात. बाबा म्हणतात - मी येतोच साधारण वृद्ध तनामध्ये. हे (ब्रह्मा) देखील आपल्या जन्मांना जाणत नाहीत. अनेक जन्मांच्या अंतामध्ये जेव्हा पतित बनतात तेव्हा मी पतित सृष्टी, पतित राज्यामध्ये येतो. पतित दुनियेमध्ये अनेक राज्य, पावन दुनियेमध्ये असते एक राज्य. हिशोब आहे ना. भक्ती मार्गामध्ये जेव्हा खूप नवधा भक्ती करतात, डोके छाटून घ्यायला देखील तयार होतात तेव्हा त्यांची मनोकामना पूर्ण होते. बाकी त्यामध्ये तसे काहीच नाही आहे, त्याला म्हटले जाते नवधा भक्ती. जेव्हापासून रावण राज्याची सुरुवात होते तेव्हापासून भक्तीतील कर्मकांडाच्या गोष्टी शिकता-शिकता मनुष्य खालीच येतात (पतन होते). म्हणतात कि शास्त्र व्यास भगवानाने बनविले, काय-काय बसून लिहिले आहे? भक्ती आणि ज्ञानाचे रहस्य आता तुम्हा मुलांना समजले आहे. शिडी आणि आणि झाडाच्या चित्रामध्ये हे सर्व स्पष्टीकरण आहे. त्यामध्ये ८४ जन्म देखील दाखविले आहेत. सर्वच काही ८४ जन्म घेत नाहीत. जे सुरुवातीला आले असतील तेच पूर्ण ८४ जन्म घेतील. हे नॉलेज तुम्हाला आत्ताच मिळते आणि मग सोर्स ऑफ इन्कम होते. २१ जन्म कोणतीही वस्तू अप्राप्त राहत नाही, जिच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ करावा लागेल. बाबांचा एकच स्वर्ग आहे, त्याला म्हटले जाते - वंडर ऑफ द वर्ल्ड. नावच आहे पॅराडाईज. बाबा आम्हाला त्याचा मालक बनवतात. ते (दुनियावाले) तर फक्त वंडर्स दाखवतात, परंतु तुम्हाला तर बाबा त्याचा मालक बनवितात; म्हणून आता बाबा म्हणतात निरंतर माझी आठवण करा. सिमर-सिमर सुख पाओ, कलह कलेष मिटे सब तन के, जीवनमुक्तीचे पद प्राप्त करा. पवित्र बनण्यासाठी आठवणीची यात्रा देखील खूप जरुरी आहे. मनमनाभव (मज एकाची आठवण करा), तर मग अंत मती सो गति होईल. गति म्हटले जाते शांतीधामला. सद्गती इथेच होते. सद्गतीच्या विरुद्ध असते दुर्गती.

आता तुम्ही बाबांना आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. तुम्हाला बाबांचे प्रेम मिळते. बाप नजरेने निहाल (मालामाल) करतात. सन्मुख येऊनच नॉलेज ऐकवतील ना. यामध्ये प्रेरणेची तर काही गोष्टच नाही. बाबा डायरेक्शन देतात की, अशी आठवण केल्याने शक्ती मिळेल. जसे बॅटरी चार्ज होते ना. ही मोटार आहे, याची बॅटरी डल झाली आहे. आता सर्वशक्तीमान बाबांसोबत बुद्धीचा योग लावल्यामुळे पुन्हा तुम्ही तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनाल. बॅटरी चार्ज होईल. बाबाच येऊन सर्वांची बॅटरी चार्ज करतात. सर्वशक्तिमान बाबाच आहेत. या गोड-गोड गोष्टी बाबाच बसून समजावून सांगतात. ती भक्तीची शास्त्र तर जन्म-जन्मांतर शिकत आले आहात. आता बाबा सर्व धर्मवाल्यांसाठी एकच गोष्ट सांगतात. असे म्हणतात - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. आता आठवण करणे तुम्हा मुलांचे काम आहे, यामध्ये गोंधळून जाण्याची तर गोष्टच नाही. पतित पावन एक बाबाच आहेत. मग पावन बनून सर्वजण घरी निघून जाणार. सर्वांसाठी हे नॉलेज आहे. हा आहे सहज राजयोग आणि सहज ज्ञान!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सर्व शक्तिमान बाबांसोबत आपला बुद्धी योग लावून बॅटरी चार्ज करायची आहे. आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये कधी गोंधळून जायचे नाही.

२) शिक्षण शिकून स्वतःच स्वतःवर कृपा करायची आहे. बाबांसारखे प्रेमाचा सागर बनायचे आहे. जसे बाबांचे प्रेम अविनाशी आहे, तसे तुमचे देखील सर्वांसोबत अविनाशी खरे प्रेम असले पाहिजे, मोहजीत बनायचे आहे.

वरदान:-
अनुभूतीच्या शक्तीद्वारे गोड अनुभव करणारे सदा शक्तिशाली आत्मा भव

ही अनुभूतीची शक्ती खूप गोड अनुभव करविते - कधी स्वतःला बाबांची नुरे रत्न आत्मा अर्थात नयनांमध्ये सामावलेली श्रेष्ठ बिंदू असल्याचा अनुभव करा, कधी मस्तकावर चमकणारा मस्तक मणी, कधी स्वतःला ब्रह्मा बाबांची सहयोगी राईट हॅंड, ब्रह्माच्या भुजा असल्याचा अनुभव करा, कधी अव्यक्त फरिश्ता स्वरूपाचा अनुभव करा या अनुभवाच्या शक्तीला वाढवा तेव्हाच शक्तिशाली बनाल. मग छोटासा डाग देखील स्पष्ट दिसेल आणि त्याला परिवर्तित कराल.

बोधवाक्य:-
सर्वांकडून मनापासूनचे आशीर्वाद घेत चला तर तुमचा पुरुषार्थ सहज होईल.