05-07-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुम्हाला शिकवत आहेत सुंदर देवी-देवता बनविण्यासाठी, सौंदर्याचा आधार आहे पवित्रता”

प्रश्न:-
रूहानी शमेवर जे परवाने फिदा होतात, त्यांची लक्षणे काय असतील?

उत्तर:-
फिदा होणारे परवाने:- १. शमा जी आहे, जशी आहे त्याला यथार्थ रूपाने जाणतात आणि आठवण करतात, २. फिदा होणे अर्थात बाप समान बनणे, ३. फिदा होणे अर्थात बाबांपेक्षाही उच्च राज्य अधिकारी बनणे.

गीत:-
महफिल में जल उठी शमा…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी या गाण्याची लाईन ऐकली. हे कोण समजावून सांगत आहेत? रूहानी बाबा. ते शमा देखील आहेत. नावे अनेक ठेवली आहेत. बाबांची स्तुती देखील खूप करतात. ही देखील परमपिता परमात्म्याची स्तुती केली आहे ना. बाबा शमा बनून आले आहेत परवान्यांसाठी. परवाने जेव्हा शमेला पाहतात तर त्याच्यावर फिदा होऊन शरीर सोडतात. पुष्कळ परवाने असतात जे शमेवर प्राण देतात. त्यातूनही खास जेव्हा दिवाळी असते, दिवे खूप पेटत असतात तेव्हा रात्रीचे छोटे-छोटे जीव पुष्कळ मरतात. आता तुम्ही मुले जाणता आपले बाबा आहेत सुप्रीम रूह. त्यांना हुसैन देखील म्हटले जाते, अतिशय सुंदर आहेत कारण ते एव्हर प्युअर आहेत (सदा पावन आहेत). आत्मा पवित्र बनते तर तिला शरीर देखील पवित्र, नॅचरली सुंदर मिळते. शांतीधाम मध्ये आत्मे पवित्र असतात. मग जेव्हा पार्ट बजावण्यासाठी इथे येतात तेव्हा सतोप्रधानापासून सतो-रजो-तमोमध्ये येतात. मग सुंदर पासून श्याम अर्थात काळी अपवित्र बनते. आत्मा जेव्हा पवित्र असते तेव्हा तिला गोल्डन एजेड म्हटली जाते. तिला शरीर देखील मग गोल्डन एजेड मिळते. दुनिया देखील जुनी आणि नवीन असते. तेच सुंदर परमपिता परमात्मा, ज्यांना भक्तिमार्गामध्ये बोलावत राहतात - ‘हे शिवबाबा’, ते निराकार परमपिता परमात्मा आलेले आहेत. आत्म्यांना अपवित्र पासून पवित्र सुंदर बनविण्यासाठी. असे नाही की आजकाल जे खूप सुंदर आहेत, त्यांची आत्मा पवित्र आहे. नाही. भले शरीर सुंदर आहे तरी देखील आत्मा तर पतित आहे ना. विलायतमध्ये किती सुंदर असतात. जाणता हे लक्ष्मी-नारायण आहेत सतयुगी सुंदर आणि इथे आहेत नरकातील सुंदर. मनुष्य या गोष्टींना जाणत नाहीत. मुलांनाच समजावून सांगितले जाते हे आहे नरकाचे सौंदर्य. आपण आता स्वर्गासाठी नॅचरल सुंदर बनत आहोत. २१ जन्मांसाठी असे सुंदर बनणार. इथले सौंदर्य तर एका जन्मासाठी आहे. इथे बाबा आलेले आहेत, दुनियेतील सर्व मनुष्य मात्रच काय परंतु साऱ्या दुनियेला सुद्धा सुंदर बनवतात. सतयुग नवीन दुनियेमध्ये होतेच सुंदर देवी-देवता. ते बनण्यासाठी आता तुम्ही शिकत आहात. बाबांना शमा देखील म्हटले जाते परंतु ते आहेत परम आत्मा. जसे तुम्हाला आत्मा म्हटले जाते तसेच त्यांना परम आत्मा म्हणतात. तुम्ही मुले बाबांची महिमा गाता; बाबा मग मुलांची महिमा करतात - तुम्हाला असे बनवतो की, तुमचा दर्जा माझ्यापेक्षाही मोठा आहे. मी जो आहे, जसा आहे, मी कसा पार्ट बजावतो हे इतर कोणीही जाणत नाहीत. आता तुम्ही मुले जाणता की, कसे आपण आत्मे पार्ट बजावण्यासाठी परमधामाहून येतो. आपण शूद्र कुळामध्ये होतो मग आता ब्राह्मण कुळामध्ये आलो आहोत. हा देखील तुमचा वर्ण आहे इतर कोणत्या धर्मवाल्यांसाठी हा वर्ण नाही आहे. त्यांचे वर्णच नसतात. त्यांचा तर एकच वर्ण आहे, ख्रिश्चनच राहतात. हो, ते देखील सतो-रजो-तमोमध्ये येतात. बाकी हे वर्ण तुमच्यासाठी आहेत. सृष्टी देखील सतो-रजो-तमोमध्ये येते. हे सृष्टी चक्र बेहदचे बाबा बसून समजावून सांगतात. जे बाबा ज्ञानाचा सागर, पवित्रतेचा सागर आहेत, ते स्वतः सांगतात की, ‘मी पुनर्जन्म घेत नाही’. भले शिव जयंती सुद्धा साजरी करतात परंतु मनुष्यांना हे माहित नाहीये की कधी येतात. त्यांच्या जीवन कहाणीला देखील जाणत नाहीत. तुम्हाला बाबा म्हणतात - मी जो आहे, जसा आहे, माझ्यामध्ये कोणता पार्ट आहे, सृष्टी चक्र कसे फिरते - हे सर्व कल्प-कल्प तुम्हा मुलांना मी समजावून सांगतो. तुम्ही जाणता, आपण शिडी उतरता-उतरता तमोप्रधान बनलो आहोत. ८४ जन्म देखील तुम्ही घेता. शेवटी जे येतात त्यांना देखील सतो-रजो-तमोमध्ये यायचेच आहे. तुम्ही तमोप्रधान बनता तर सारी दुनिया तमोप्रधान बनते. आता पुन्हा तुम्हाला तमोप्रधानापासून सतोप्रधान जरूर बनायचे आहे. हे सृष्टी चक्र फिरत राहते. आता आहे कलियुग त्यानंतर मग सतयुग येईल. कलियुगाचा कालावधी पूर्ण झाला. बाबा म्हणतात - तुम्हा मुलांना पुन्हा राजयोग शिकविण्यासाठी मी साधारण तनामध्ये हुबेहूब कल्पापूर्वी प्रमाणे प्रवेश केला आहे. आजकाल योग तर पुष्कळ आहेत. बॅरिस्टरी योग, इंजीनियरिंग योग… बॅरिस्टरी शिकण्यासाठी बॅरिस्टरशी बुद्धीचा योग लावावा लागतो. आपण बॅरिस्टर बनत आहेत तर शिकविणाऱ्याची आठवण करतो. त्यांना (दुनियावाल्यांना) तर त्यांचा आपला पिता वेगळा आहे, गुरु देखील असेल तर त्याला देखील आठवण करतील. तरी देखील बॅरिस्टर सोबत बुद्धीचा योग राहतो. आत्माच शिकते. आत्माच शरीरा द्वारे जज, बॅरिस्टर इत्यादी बनते.

आता तुम्ही मुले आत्म-अभिमानी बनण्याचे संस्कार स्वतःमध्ये भरता. अर्धे कल्प देह-अभिमानामध्ये राहिलात. आता बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना. आत्म्यामध्येच शिक्षणाचे संस्कार आहेत. मनुष्य आत्माच जज बनते, आता आपण विश्वाचे मालक देवता बनत आहोत, शिकवणारे आहेत शिवबाबा, परम आत्मा. तेच ज्ञानाचे सागर, शांती, संपत्तीचे सागर आहेत. असे दाखवतात देखील की, सागरातून रत्नांच्या थाळ्या निघतात. या आहेत भक्तीमार्गाच्या गोष्टी. बाबांना रेफर करावे लागते (संदर्भ द्यावा लागतो). बाबा म्हणतात - ही आहेत अविनाशी ज्ञान रत्ने. या ज्ञान रत्नांनीच तुम्ही खूप श्रीमंत बनता आणि मग हिरे-माणके देखील तुम्हाला खूप मिळतात. हे एक-एक रत्न लाखो रुपयांचे आहे, जी तुम्हाला इतके श्रीमंत बनवतात. तुम्ही जाणता भारतच व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया) होता. त्यामध्ये पवित्र देवता राहत होते. आता सावळे अपवित्र बनले आहेत. आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा असतो. आत्मा शरीरामध्ये आहे तेव्हाच ऐकू शकते. परमात्मा देखील शरीरामध्ये येतात. आत्म्यांचे आणि परमात्म्याचे घर शांतीधाम आहे. तिथे अजिबात चुरपुर नसते. इथे परमात्मा बाबा येऊन मुलांना भेटतात. शरीरा सहित भेटतात. तिथे तर घर आहे, तिथेच विश्राम करतात. आता तुम्ही मुले पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. बाकीची दुनिया कलियुगामध्ये आहे. बाबा बसून समजावून सांगत आहेत - भक्तीमार्गामध्ये खर्च खूप करतात, मुर्त्या देखील खूप बनवतात. मोठ-मोठी मंदिरे बनवतात. नाहीतर श्रीकृष्णाचे चित्र घरामध्ये देखील ठेवू शकतात. खूप स्वस्त चित्र असतात तरी देखील इतके दूर-दूर मंदिरांमध्ये का गेले असते. हा आहे भक्तिमार्ग. सतयुगामध्ये ही मंदिरे इत्यादी असत नाहीत. तिथे आहेतच पूज्य. कलियुगामध्ये आहेत पुजारी. तुम्ही आता संगमयुगावर पूज्य देवता बनत आहात. आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात. यावेळी तुमचे हे अंतिम पुरुषार्थी शरीर अतिशय किमती आहे. याद्वारे तुम्ही खूप कमाई करता. बेहदच्या पित्या सोबत तुम्ही खाता-पिता. बोलावतात देखील त्यांनाच. असे म्हणत नाहीत की, ‘श्रीकृष्णा सोबत खाऊ’. बाबांची आठवण करतात - ‘तुम मात-पिता…’ मुले तर आपल्या वडीलांसोबत खेळत राहतात. आपण सर्व बालके श्रीकृष्णाची आहोत, असे म्हणणार नाही. सर्व आत्मे परमपिता परमात्म्याची मुले आहेत. आत्मा शरीरा द्वारे म्हणते - तुम्ही याल तर आम्ही तुमच्या सोबत खेळणार, खाणार सर्व काही करणार. तुम्ही म्हणताच मुळी - ‘बापदादा’. तर जसे घर झाले. बापदादा आणि मुले. हे ब्रह्मा आहेत बेहदचे रचयिता. बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून यांना ॲडॉप्ट करतात. यांना म्हणतात - ‘तू माझा आहेस’. हे आहेत मुखवंशावळी. जसे पत्नीला देखील ॲडॉप्ट करतात ना. ती देखील मुखवंशावळी झाली. म्हणतील - ‘तू माझी आहेस’. मग तिच्या द्वारे कुखवंशावळी मुले जन्म घेतात. हा रिवाज कुठून सुरु झाला? बाबा म्हणतात - मी यांना ॲडॉप्ट केले आहे ना. यांच्या द्वारे तुम्हाला ॲडॉप्ट करतो. तुम्ही माझी मुले आहात. परंतु हे आहेत पुरुष. तुम्हा सर्वांना सांभाळण्यासाठी मग सरस्वतीला देखील ॲडॉप्ट केले आहे. त्यांना मातेचे टायटल मिळाले. सरस्वती नदी. ही नदी माता झाली ना. बाबा सागर आहेत. ही देखील सागरातून निघालेली आहे. ब्रह्मपुत्रा नदी आणि सागराचा खूप मोठा मेळावा भरतो. असा मेळा इतर कुठेही भरत नाही. तो आहे नद्यांचा मेळा. हा आहे आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा. ते देखील जेव्हा शरीरामध्ये येतात तेव्हा मेळावा भरतो. बाबा म्हणतात - मी हुसैन आहे. मी यांच्यामध्ये कल्प-कल्प प्रवेश करतो. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण सृष्टीचे चक्र आहे, याचा कालावधी ५ हजार वर्षे आहे. या बेहदच्या फिल्म वरून हदची फिल्म बनवतात. जे काही भूतकाळामध्ये घडले आहे ते वर्तमान बनते. प्रेझेंट मग फ्युचर बनते (वर्तमान नंतर भविष्य बनते), ज्याला नंतर भूतकाळ म्हटले जाईल. भूतकाळ होण्यामध्ये किती वेळ लागला? नवीन दुनियेमध्ये येऊन किती काळ लोटला? ५ हजार वर्षे. तुम्ही आता प्रत्येकजण स्वदर्शनचक्रधारी आहात. तुम्ही समजावून सांगता - आपण पहिले ब्राह्मण होतो नंतर देवता बनलो. तुम्हा मुलांना आता बाबांद्वारे शांतीधाम सुखधामचा वारसा मिळतो आहे. बाबा येऊन तीन धर्म एकत्र स्थापन करतात. बाकी सर्वांचा विनाश करतात. परत घेऊन जाणारे तुम्हाला सद्गुरु पिता मिळाले आहेत. बोलावतात देखील आम्हाला सद्गतीमध्ये घेऊन जा. शरीराला संपवून टाका. अशी युक्ती सांगा जेणेकरून आम्ही शरीर सोडून शांतिधाममध्ये निघून जाऊ. गुरुकडे देखील मनुष्य यासाठीच जातात. परंतु ते गुरु काही शरीरापासून सोडवून सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. पतित-पावन आहेतच एक बाबा. तर ते जेव्हा येतात तर पावन जरूर बनावे लागेल. बाबांनाच म्हटले जाते काळांचा काळ, महाकाळ. सर्वांना शरीरापासून सोडवून सोबत घेऊन जातात. हे आहेत सुप्रीम गाईड. सर्व आत्म्यांना परत घेऊन जातात. हे छी-छी शरीर आहे, याच्या बंधनामधून सुटू इच्छितात. कधी एकदा शरीर सुटेल तर बंधन सुटेल. आता तुम्हाला या सर्व आसुरी बंधनांमधून सोडवून सुखाच्या दैवी संबंधामध्ये घेऊन जातात. तुम्ही जाणता आपण सुखधाममध्ये येणार व्हाया शांतीधाम. मग दुःखधामामध्ये कसे येता हे देखील तुम्ही जाणता. बाबा येतातच श्याम पासून सुंदर बनविण्यासाठी. बाबा म्हणतात - मी तुमचा खरा ओबीडियंट (आज्ञाधारक) पिता देखील आहे. ते पिता (जुन्या दुनियेतील पिता) नेहमी ओबीडियंट असतो. सेवा खूप करतात. खर्च करून शिकवून मग सर्व धन-संपत्ती मुलांना देऊन आपण जाऊन साधूंचा संग करतात. आपल्या पेक्षाही मुलांना मोठे बनवतात. हे बाबा (शिवबाबा) देखील म्हणतात - मी तुम्हाला डबल मालक बनवतो. तुम्ही विश्वाचे देखील मालक आहात तर ब्रह्मांडाचे देखील मालक आहात. तुमची पूजा देखील डबल होते. आत्म्यांची देखील पूजा होते. देवता वर्णामध्ये देखील पूजा होते. माझी तर सिंगल केवळ शिवलिंगाच्या रूपामध्ये पूजा होते. मी राजा तर बनत नाही. तुमची किती सेवा करतो. अशा बाबांना मग तुम्ही विसरता का! हे आत्मा, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. तुम्ही कोणाकडे आला आहात? आधी बाबा मग दादा. आता फादर नंतर मग ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर आदि देव ॲडम कारण खूप कुळे तयार होतात ना. शिवबाबांना कोणी ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हणेल का? प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला खूप उच्च बनवतात. असे बाबा भेटतात मग त्यांना तुम्ही विसरता कसे? विसरलात तर पावन कसे बनाल! बाबा पावन बनण्याची युक्ती सांगतात. या आठवणीनेच भेसळ निघेल. बाबा म्हणतात - गोड-गोड लाडक्या मुलांनो, देह-अभिमान सोडून आत्म-अभिमानी बनायचे आहे, पवित्र सुद्धा बनायचे आहे. काम महाशत्रू आहे. हा एक जन्म माझ्यासाठी पवित्र बना. लौकिक पिता देखील म्हणतात ना - कोणते वाईट काम करू नका. माझ्या दाढीची लाज राखा. पारलौकिक पिता देखील म्हणतात - मी पावन बनविण्यासाठी आलो आहे, आता काळे तोंड करू नका. नाही तर इज्जत गमवाल. सर्व ब्राह्मणांची आणि बाबांची देखील इज्जत गमवाल. लिहितात - ‘बाबा, मी घसरलो. तोंड काळे केले’. बाबा म्हणतात - मी तुम्हाला सुंदर बनविण्यासाठी आलो आहे, आणि तुम्ही काळे तोंड करता. तुम्हाला तर सदैव सुंदर बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हे अंतिम पुरुषार्थी शरीर अतिशय किमती आहे, याद्वारे खूप कमाई करायची आहे. बेहदच्या बाबांसोबत खाता-पिता सर्व नात्यांची अनुभूती करायची आहे.

२) कोणतेही असे कर्म करायचे नाही ज्यामुळे ब्राह्मण परिवाराची किंवा बाबांची इज्जत जाईल. आत्म-अभिमानी बनून संपूर्ण पवित्र बनायचे आहे. आठवणीने जुनी भेसळ काढून टाकायची आहे.

वरदान:-
ऐकण्या सोबतच स्वरूप बनून मनाच्या मनोरंजना द्वारे सदैव शक्तिशाली आत्मा भव

रोज मनामध्ये स्वयं प्रति अथवा इतरांप्रती उमंग-उत्साहाचे संकल्प करा. स्वतः देखील त्याच संकल्पांचे स्वरूप बना आणि इतरांच्या सेवेमध्ये सुद्धा वापरा तर आपले देखील जीवन कायमसाठी उत्साहवाले होईल आणि इतरांना देखील उत्साह देणारे बनू शकाल. जसे मनोरंजनाचा कार्यक्रम असतो तसे रोज मनाच्या मनोरंजनाचा कार्यक्रम बनवा, जे ऐकता त्याचे स्वरूप बना म्हणजे शक्तिशाली बनाल.

बोधवाक्य:-
दुसऱ्यांना बदलण्या अगोदर स्वतःला बदला, हेच शहाणपण आहे.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

सर्वात तीव्र गतीने सेवा करण्याचे साधन आहे - शुभ आणि श्रेष्ठ संकल्पांची शक्ती. जसे ब्रह्मा बाबा श्रेष्ठ संकल्पाच्या विधी द्वारे सेवेच्या वृद्धी मध्ये नेहमी सहयोगी आहेत. विधी जर तीव्र (शक्तिशाली) असेल तर वृद्धी देखील तीव्र (जलद) होते. असेच तुम्ही मुले देखील श्रेष्ठ शुभ संकल्पांमध्ये संपन्न बना.