05-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमची प्रतिज्ञा आहे की जोपर्यंत आपण पावन बनत नाही, तोपर्यंत बाबांची आठवण करत राहू, एका बाबांवरच प्रेम करु”

प्रश्न:-
शहाणी मुले काळाला बघत असताना कोणता पुरुषार्थ करतील?

उत्तर:-
शेवटी जेव्हा शरीर सुटेल तर बस्स एका बाबांचीच आठवण रहावी दुसरे काहीही आठवू नये. असा पुरुषार्थ शहाणी मुले आतापासूनच करत राहतील कारण की कर्मातीत बनून जायचे आहे त्यासाठी या जुन्या कातडीतून (शरीरातून) आसक्ती काढून टाकत जा; बस्स, आम्ही बाबांकडे जात आहोत.

गीत:-
न वह हमसे जुदा होंगे…

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, मुले प्रतिज्ञा करतात बेहदच्या बाबांसोबत. बाबा आम्ही तुमचे बनलो आहोत, शेवटपर्यंत जोपर्यंत आम्ही शांतीधाम मध्ये पोहोचू, तुमची आठवण केल्यामुळे आमची जन्म-जन्मांतरीची पापे जी डोक्यावर आहेत, ती जळून जातील. यालाच योग अग्नी म्हटले जाते, दुसरा कोणताही उपाय नाही. पतित-पावन अथवा श्री श्री १०८ जगत गुरु एकालाच म्हटले जाते. तेच जगताचे पिता, जगताचे शिक्षक, जगताचे गुरु आहेत. रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान बाबाच देतात. ही पतित दुनिया आहे, यामध्ये एकही पावन असणे असंभव आहे. पतित-पावन बाबाच सर्वांची सद्गती करतात. तुम्ही देखील त्यांची मुले बनला आहात. तुम्ही शिकत आहात की, जगाला पावन कसे बनवायचे? शिवाच्या समोर त्रिमूर्ति जरूर पाहिजे. हे देखील लिहायचे आहे - डीटी सावरेंटी (दैवी स्वराज्य) तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो देखील आता कल्पाच्या संगमयुगावर. क्लियर लिहिल्याशिवाय मनुष्य काहीच समजू शकणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट फक्त बी.के. नाव जे लिहीता, त्यामध्ये प्रजापिता शब्द जरुरी आहे कारण ब्रह्मा नाव देखील खूप जणांचे आहे. ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय’ लिहायचे आहे. तुम्ही जाणता दगडासारख्या विश्वाला पावन, पारस तर एक बाबाच बनवतील. या वेळी एकही पावन नाही आहे. सर्वजण एकमेकांशी भांडतात, शिव्या देत राहतात. बाबांसाठी देखील म्हणतात - कच्छ-मच्छ अवतार. अवतार कशाला म्हटले जाते हे देखील समजत नाहीत. अवतार तर असतोच एकाचा. ते देखील अलौकिक रीतीने शरीरामध्ये प्रवेश करून विश्वाला पावन बनवतात. इतर आत्मे तर आपले-आपले शरीर घेतात, त्यांना आपले शरीर नाही आहे. परंतु ज्ञानाचा सागर आहेत तर ज्ञान कसे देतील? शरीर पाहिजे ना? या गोष्टींना तुमच्या शिवाय इतर कोणीही जाणत नाहीत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र बनणे - हे बहाद्दूरीचे काम आहे. महावीर अर्थात वीरता दाखवली. ही देखील वीरता आहे जे काम संन्यासी करू शकत नाहीत, ते तुम्ही करू शकता. बाबा श्रीमत देतात तुम्ही असे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बना तेव्हाच उच्च पद प्राप्त करू शकाल. नाही तर विश्वाची बादशाही कशी मिळणार. हे आहेच नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण. ही पाठशाळा आहे. खूपजण शिकतात म्हणून लिहा “ईश्वरीय विश्वविद्यालय”. हा तर एकदम अचूक शब्द आहे. भारतवासी जाणतात की आपण विश्वाचे मालक होतो, कालची गोष्ट आहे. अजूनपर्यंत राधे-कृष्ण अथवा लक्ष्मी-नारायणाची मंदिरे बनत राहतात. कित्येक मंदिरे तर पतित मनुष्यांची सुद्धा बनवतात. द्वापर पासून तर आहेतच पतित मनुष्य. कुठे शिवाचे, कुठे देवतांचे मंदिर बनवणे, आणि कुठे या पतित मनुष्यांचे. हे काही देवता थोडेच आहेत. तर बाबा समजावून सांगतात या गोष्टींवर योग्य रीतीने विचार सागर मंथन करायचे आहे. बाबा तर समजावून सांगत राहतात की, दिवसेंदिवस लिखाणामध्ये बदल होत राहतील, असे नाही की, अगोदर असे का बनवले नाही. आपण असे म्हणणार नाही की, ‘मनमनाभव’चा असा अर्थ अगोदर का नाही समजावून सांगितला. अरे, सुरुवातीलाच अशा आठवणीमध्ये थोडेच राहू शकाल. फार थोडी मुले आहेत जी प्रत्येक गोष्टीचा रिस्पाँड पूर्ण रीतीने करू शकतात. नशिबामध्ये उच्च पद नसेल, तर टीचर तरी काय करणार. असे तर नाही की आशीर्वादाने उच्च बनवतील. स्वतःला पहायचे आहे आपण कशी सेवा करतो. विचार सागर मंथन चालले पाहिजे. गीतेचा भगवान कोण, हे चित्र सर्वात मुख्य आहे. भगवान आहेत निराकार, ते ब्रह्माच्या शरीराशिवाय तर ऐकवू शकणार नाहीत. ते येतातच ब्रह्माच्या तनामध्ये संगमावर. नाही तर ब्रह्मा-विष्णू-शंकर कशासाठी आहेत. बायोग्राफी (जीवन चरित्र) पाहिजे ना. कोणीही जाणत नाहीत. ब्रह्मासाठी म्हणतात १०० भुजा असणाऱ्या ब्रह्मापाशी जा, १००० भुजा असणाऱ्यापाशी जा. यावर देखील एक कहाणी बनलेली आहे. प्रजापिता ब्रह्माची इतकी असंख्य मुले आहेत ना. इथे येतातच पवित्र बनण्यासाठी. जन्म-जन्मांतर अपवित्र बनत आले आहेत. आता पूर्ण पवित्र बनायचे आहे. श्रीमत मिळते मामेकम् (मज एकाची) आठवण करा. कोणा-कोणाला तर अजूनही समजत नाही की आपण आठवण कशी करावी. गोंधळून जातात. बाबांचे बनून अजून विकर्माजीत बनले नाहीत, पापे नष्ट झाली नाहीत, आठवणीच्या यात्रेमध्ये राहत नाहीत तर ते काय पद प्राप्त करतील. भले सरेंडर आहेत परंतु त्यापासून फायदा काय. जोपर्यंत पुण्य आत्मा बनून इतरांना बनवत नाहीत तोपर्यंत उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. माझी जितकी कमी आठवण करतील, तितके कमी पद प्राप्त करतील. डबल ताजधारी कसे बनणार, मग नंबरवार पुरुषार्थानुसार उशिराने येतील. असे नाही की, आम्ही सर्वकाही सरेंडर केले आहे म्हणून डबल सिरताज बनू. नाही. अगोदर दास-दासी बनत-बनत मग शेवटी थोडा काळ ताज मिळेल. खूपजणांना हा अहंकार असतो आम्ही तर सरेंडर आहोत. अरे आठवणी शिवाय तुम्ही काय बनू शकणार. दास-दासी बनण्यापेक्षा श्रीमंत प्रजा बनणे चांगले आहे. दास-दासीसुद्धा काही श्रीकृष्णा सोबत थोडेच झोके घेऊ शकतील. या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, यासाठी खूप मेहनत करावी लागेल. थोड्यामध्ये खुश व्हायचे नाही. आम्ही सुद्धा राजा बनणार. असे तर मग खूप राजे बनतील. बाबा म्हणतात पहिली मुख्य आहे आठवणीची यात्रा. जे चांगल्या रीतीने आठवणीमध्ये राहतात, ते आनंदी राहतात. बाबा समजावून सांगत आहेत - आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. सतयुगामध्ये आनंदाने एक शरीर सोडून दुसरे घेतात. इथे तर रडायला लागतात, सतयुगाच्या गोष्टीच विसरून गेले आहेत. तिथे तर शरीर असे सोडतात, जसे सापाचे उदाहरण आहे ना.

तुम्ही जाणता - आपण आत्मा आहोत, हे तर जुने शरीर आता सोडायचेच आहे. शहाणी मुले जी बाबांच्या आठवणीमध्ये राहतात, ती तर म्हणतात - बाबांच्या आठवणीमध्येच शरीर सोडावे आणि जाऊन बाबांना भेटावे. कोणत्याही मनुष्यमात्राला हे माहित नाही आहे की, कसे भेटू शकतो. तुम्हा मुलांना मार्ग मिळाला आहे. आता पुरुषार्थ करत आहात, जिवंतपणी मेला तर आहात परंतु जेव्हा आत्मा देखील पवित्र बनेल तेव्हा ना. पवित्र बनून मग हे जुने शरीर सोडून जायचे आहे. समजतात कधी कर्मातीत अवस्था होईल आणि हे शरीर सुटेल; परंतु कर्मातीत अवस्था झाली तर आपोआपच शरीर सुटेल. बस्स, आपण बाबांकडे जाऊन रहावे. या जुन्या शरीराची जणू घृणा येते. सापाला जुन्या कातड्याची घृणा येत असेल ना. तुमची नवीन कात (शरीर) तयार होत आहे. परंतु जेव्हा कर्मातीत अवस्था होईल, शेवटी तुमची अशी अवस्था होईल. बस्स, आता आपण जात आहोत. युद्धाची सुद्धा संपूर्ण तयारी होईल. विनाश तर तुमच्या कर्मातीत अवस्था होण्यावर अवलंबून आहे. शेवटी कर्मातीत अवस्थेला नंबरवार सगळे पोहोचतील. किती फायदा आहे. तुम्ही विश्वाचे मालक बनता तर बाबांची किती आठवण केली पाहिजे. तुम्ही बघाल कितीतरी असे देखील निघतील जे बस्स उठता-बसता बाबांची आठवण करत राहतील. मृत्यू समोर उभा आहे. वर्तमानपत्रांमध्ये असे दाखवतात, जणूकाही आत्ताच युद्ध छेडले जाणार आहे. मोठे युद्ध सुरु होईल तेव्हा बॉम्ब्स टाकले जातील. वेळ लागणार नाही. हुशार मुले समजतात, जी अडाणी आहेत ती काहीच समजत नाहीत. जरासुद्धा धारणा होत नाही. भले हो-हो करत असतात, समजत काहीच नाहीत. आठवणीमध्ये राहात नाहीत. जे देह-अभिमानामध्ये राहतात, या दुनियेची आठवण राहते, ते काय समजू शकणार. आता बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना. देहाला विसरून जायचे आहे. शेवटी तुम्ही खूप प्रयत्न करू लागाल, आता तुम्हाला समजत नाही आहे. शेवटी खूप-खूप पश्चाताप कराल. बाबा साक्षात्कार देखील घडवतील. ही-ही पापे केली आहेत. आता भोगा सजा. पद देखील बघा. सुरुवातीला देखील असे साक्षात्कार होत होते पुन्हा अखेरीला देखील साक्षात्कार होतील.

बाबा म्हणतात - आपली इज्जत घालवू नका. अभ्यास करण्याचा पुरुषार्थ करा. स्वतःला आत्मा समजून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. तेच पतित-पावन आहेत. दुनियेमध्ये कोणीही पतित-पावन नाही आहे. शिव भगवानुवाच, जेव्हा की म्हणतात - सर्वांचा सद्गतीदाता पतित-पावन एक. त्यांचीच सर्वजण आठवण करतात. परंतु जेव्हा स्वतःला आत्मा बिंदू समजतील तेव्हा बाबांची आठवण येईल. तुम्ही जाणता - आपल्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे, तो कधीही विनाश होणारा नाही आहे. हे समजावून सांगणे काही मावशीचे घर नाहीये (काही इतके सोपे नाहीये), विसरून जातात म्हणून कोणाला समजावून सांगू शकत नाहीत. देह-अभिमानाने सर्वांना अगदी मारून टाकले आहे. हा तर मृत्युलोक बनला आहे. सर्व अकाली मरत असतात. जसे पशू-पक्षी इत्यादी मरतात तसे मनुष्य देखील मरतात, काहीच फरक नाही. लक्ष्मी-नारायण तर अमरलोकचे मालक आहेत ना. तिथे अकाली मृत्यू होत नाही. दुःखच नाहीये. इथे तर दुःख होते तर जाऊन आत्महत्या करतात. आपणच अकाली मृत्यू ओढवून घेतात, हे ध्येय खूप उच्च आहे. कधीही क्रिमिनल आय बनू नयेत, यामध्ये मेहनत आहे. इतके उच्च पद प्राप्त करणे काही मावशीचे घर नाहीये. धाडस हवे. नाहीतर छोट्या गोष्टीमध्येच घाबरून जातात. कोणी बदमाश आत घुसला, हात लावला तर दांडक्याने मारून पळवून लावले पाहिजे. भ्याड थोडेच बनायचे आहे. ‘शिव शक्ती पांडव सेना’ गायली गेली आहे ना. जी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. नाव प्रसिद्ध आहे तर मग तसे धाडस देखील पाहिजे. जेव्हा सर्वशक्तिमान बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तेव्हाच तर ती शक्ती प्रवेश करेल. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे, या योग अग्नीद्वारेच विकर्म विनाश होतील आणि मग विकर्माजीत राजा बनाल. मेहनत आहे आठवणीची, जो करेल तो मिळवेल. दुसऱ्याला सुद्धा सावध करायचे आहे. आठवणीच्या यात्रेनेच बेडा पार होईल. शिक्षणाला यात्रा म्हटले जात नाही. ती आहे शारीरिक यात्रा, ही आहे रुहानी (आत्मिक) यात्रा. सरळ शांतीधाम आपल्या घरी निघून जाल. बाबा देखील घरात राहतात. माझी आठवण करता-करता तुम्ही घरी पोहोचाल. इथे सर्वांना पार्ट बजावायचा आहे. ड्रामा तर अविनाशी चालतच राहतो. मुलांना समजावून सांगत राहतात - एक तर बाबांच्या आठवणीमध्ये रहा आणि पवित्र बना, दैवीगुण धारण करा आणि जितकी सेवा कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. कल्याणकारी जरूर बनायचे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव लक्षात रहावे की सर्वशक्तिमान बाबा आमच्या सोबत आहेत, या स्मृतीने शक्ती प्रवेश करेल, विकर्म भस्म होतील. ‘शिव शक्ती पांडव सेना’ नाव आहे, तर बहाद्दुरी दाखवायची आहे, भ्याड बनायचे नाही.

२) जिवंतपणी मेल्यानंतर हा अहंकार येता कामा नये की मी तर सरेंडर आहे. सरेंडर होऊन पुण्य आत्मा बनून इतरांना बनवायचे आहे, यामध्येच फायदा आहे.

वरदान:-
निर्विघ्न स्थिति द्वारे स्वतःच्या फाऊंडेशनला मजबूत बनविणारे पास विद ऑनर भव

जी मुले खूप काळापासून निर्विघ्न स्थितीचे अनुभवी आहेत त्यांचे फाऊंडेशन पक्के असल्या कारणाने स्वतः सुद्धा शक्तिशाली राहतात आणि दुसऱ्यांना देखील शक्तिशाली बनवतात. खूप काळाची शक्तिशाली, निर्विघ्न आत्मा शेवटी सुद्धा निर्विघ्न बनून पास विद ऑनर बनते किंवा फर्स्ट डिव्हिजनमध्ये येते. तर सदैव हेच लक्ष्य असावे की, जास्तीत जास्त काळ निर्विघ्न स्थितीचा अनुभव अवश्य करायचा आहे.

बोधवाक्य:-
प्रत्येक आत्म्याप्रती सदैव उपकार अर्थात शुभ कामना ठेवा तर आपोआपच आशीर्वाद मिळतील.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

योग अर्थात शांतीची शक्ती. ही शांतीची शक्ती खूप सहज स्वतःला आणि दुसऱ्यांना परिवर्तित करते, याने व्यक्ती देखील बदलतील तर प्रकृती सुद्धा बदलेल. व्यक्तींसाठी तर तोंडी कोर्स घेता परंतु प्रकृतीला बदलण्यासाठी शांतीची शक्ती अर्थात योगबळच पाहिजे.