05-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, तुम्ही
ज्यांची आजपर्यंत महिमा गात होतात, तेच आता तुमच्या समोर हजर आहेत, त्यामुळे सदैव
आनंदाने नाचत राहा, कोणत्याही गोष्टीचे दुःख वाटू नये”
प्रश्न:-
पुरुषार्थी
मुले स्वतःच्या मनात कोणती तपासणी अवश्य करतील?
उत्तर:-
आत्तापर्यंत
मज आत्म्यामध्ये कोणता छोटा-मोठा काटा (विकार) तर राहिलेला नाही ना? कामविकाराचा
काटा सर्वात जास्त टोकदार आहे. रागाचा काटा देखील खूप वाईट आहे. देवता कधी क्रोधी
नसतात; म्हणून गोड मुलांनो, जर कोणता काटा असेल तर तो काढून टाका. स्वतःचे नुकसान
करून घेऊ नका.
गीत:-
तुम मात पिता...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांनी आपल्या बाबांची महिमा ऐकली. ते गात राहतात, तुम्ही इथे प्रत्यक्षात त्या
बाबांचा वारसा घेत आहात. तुम्ही जाणता बाबा आमच्या द्वारा भारताला स्वर्ग बनवत आहेत.
ज्यांच्याद्वारे बनवत आहेत, ते जरूर सुखधामचे मालक बनतील. मुलांना तर खूप आनंद झाला
पाहिजे. बाबांची महिमा अपरंपार आहे, त्यांच्याकडून आम्ही वारसा घेत आहोत. आता तुम्हा
मुलांवरच नाही तर साऱ्या दुनियेवर बृहस्पतीची दशा आहे. आता हे तुम्ही ब्राह्मणच
जाणता. खास भारतावर आणि आम दुनिया, सर्वांवर बृहस्पतीची दशा बसली आहे कारण आता १६
कलासंपूर्ण बनत आहात. यावेळी तर कोणतीही कला राहिलेली नाहीये. मुलांना खूप आनंद
वाटला पाहिजे. असे नको की, इथे आनंद होतो आणि बाहेर गेल्यावर तो आनंद गायब होईल.
ज्याची महिमा गात असता ते आता तुमच्याकडे उपस्थित आहेत. बाबा समजावून सांगत आहेत
की, ५ हजार वर्षांपूर्वी देखील राज्य देऊन गेलो होतो. आता तुम्ही बघाल हळू-हळू
सगळेच हाका मारू लागतील. तुमची देखील स्लोगन निघत राहतील. जसे कोणी म्हणतात - एक
धर्म असावा, एक राज्य असावे, एक भाषा असावी. ते देखील आत्मे म्हणतात ना. आत्मा जाणते
बरोबर भारतामध्ये देवी-देवतांचे एक राज्य होते. हा सुगंध पसरत जाईल. तुम्ही
ज्ञानरूपी सुगंध टाकत जाता. ड्रामा प्लॅन अनुसार युद्धाची चिन्हे देखील समोर उभी
आहेत. ही काही नवीन गोष्ट नाहीये. भारताला १६ कला संपूर्ण जरूर बनवायचे आहे. तुम्ही
जाणता - आपण या योगबलाद्वारे १६ कलासंपूर्ण बनत आहोत. म्हणतात ना - ‘दे दान तर
सुटेल ग्रहण’. बाबा देखील म्हणतात विकारांचे, अवगुणांचे दान द्या. हे रावण राज्य आहे
ना. बाबा येऊन त्याच्यापासून सोडवतात, त्यात देखील काम विकार खूप मोठा अवगुण आहे.
तुम्ही देह-अभिमानी बनला आहात. आता देही-अभिमानी बनावे लागेल. शरीराचे देखील भान
सोडावे लागेल. या गोष्टी तुम्ही मुलेच समजता, दुनिया जाणत नाही. जो भारत १६ कला
संपूर्ण होता, संपूर्ण देवतांचे राज्य होते. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. भारत
स्वर्ग होता. आता ५ विकारांचे ग्रहण लागले आहे, म्हणून बाबा म्हणतात - ‘दे दान तर
सुटेल ग्रहण’. हा काम विकारच खाली पाडणारा आहे, म्हणून बाबा म्हणतात - हे दान द्या,
तर १६ कला संपन्न बनाल. जर दिले नाहीत तर बनणार नाही. आत्म्यांना आपला-आपला पार्ट
मिळालेला आहे ना. हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुमच्या आत्म्यामध्ये किती
पार्ट भरलेला आहे. तुम्ही विश्वाचे राज्यभाग्य घेता. हा बेहदचा ड्रामा आहे, असंख्य
ॲक्टर्स आहेत. यांच्यामध्ये फर्स्टक्लास ॲक्टर्स हे लक्ष्मी-नारायण आहेत, त्यांचा
नंबरवन पार्ट आहे. विष्णू सो ब्रह्मा-सरस्वती, मग ब्रह्मा-सरस्वती सो विष्णू बनतात.
हे ८४ जन्मांचे चक्र कसे फिरतात ते सर्व बुद्धीत येते. व्यापारी लोक खाते पुस्तक
ठेवतात तर त्याच्यावर स्वस्तिक काढतात. गणेशाची पूजा करतात. हे आहे बेहदचे खाते
पुस्तक. स्वस्तिकामध्ये चार भाग असतात. जसे जगन्नाथपुरीमध्ये तांदळाचा हंडा ठेवतात.
तो शिजला की ४ भाग होतात. तिथे भाताचाच भोग (नैवेद्य) दाखवतात. आता तुम्हा मुलांना
कोण शिकवत आहेत? मोस्ट बिलवेड बाबा येऊन तुमचा सेवक बनले आहेत, तुमची सेवा करत आहेत.
मनुष्य तर म्हणतात आत्मा निर्लेप आहे. आता तुम्ही जाणता - आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा
पार्ट भरलेलाच आहे. त्याला मग निर्लेप म्हणणे म्हणजे किती दिवस-रात्री इतका फरक होतो.
जेव्हा हे कोणी चांगल्या प्रकारे महिना-दीड महिना बसून समजून घेतील तेव्हाच पॉईंट्स
बुद्धीमध्ये पक्के होतील. दिवसेंदिवस अनेक पॉइंट्स निघत राहतात. ही जणू काही कस्तुरी
आहे. शास्त्रांमध्ये तर काहीही सार नाहीये. बाबा म्हणतात - ते आता बुद्धीतून काढून
टाका. ज्ञान-सागर केवळ एक मीच आहे. जेव्हा पूर्ण निश्चय बसतो तेव्हा समजतात, खरोखर,
ही सर्व शास्त्रे भक्तिमार्गासाठी आहेत. परमपिता परमात्माच येऊन दुर्गती पासून
सद्गती करतात. शिडीच्या चित्रामध्ये देखील स्पष्ट दाखवायचे आहे. भक्तिमार्ग सुरू
होतो तेव्हा रावण राज्य सुरू होते. आता गीतेचा एपिसोड रिपीट होत आहे. बाबा म्हणतात
- ‘मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येतो’. त्यांनी (दुनियावाल्यांनी) मग भगवान
कच्छ, मत्स्य अवतार घेतात असे म्हटले आहे. २४ अवतार म्हणतात. बाबा म्हणतात - आता
तुमच्यावर बृहस्पतीची दशा आहे. मी तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवले होते. आता रावणाने
राहूची दशा बसवली आहे. आता पुन्हा बाबा, तुम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता आले
आहेत. तर स्वतःला घाट्यात घालायचे नाही. व्यापारी लोक आपले खाते नेहमी चांगले
ठेवतात. घाटा करणाऱ्याला अडाणी म्हटले जाते. आता हे (बाबा) तर सर्वात मोठे व्यापारी
आहेत. कोणी विरळाच व्यापारी व्यापार करेल. हाच एक अविनाशी व्यापार आहे, बाकीचे
व्यापार तर सर्व मातीत मिसळून जाणार आहे. आता तुमचा खरा व्यापार चालू आहे. बाबा
बेहदचे सौदागर, रत्नाकर आहेत, तसेच त्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते.
प्रदर्शनीमध्ये बघा किती माणसे येतात! सेंटरवर कोणी क्वचितच येतात. भारत देश तर खूप
मोठा आहे ना. सर्व ठिकाणी तुम्हाला जायचे आहे. भारतामध्ये सर्वच ठिकाणी काही
पाण्याच्या गंगा नाहीत. हे देखील तुम्हाला समजावून सांगावे लागेल की, पाण्याची गंगा
काही पतित-पावनी नाहीये. तुम्हा ज्ञान-गंगांना जावे लागेल. चारी दिशांना प्रदर्शनी,
मेळावे करत राहाल. दिवसेंदिवस चित्रे देखील चांगली-चांगली बनत राहतील. चित्रे अशी
शोभिवंत असावीत की बघताच क्षणी आनंद वाटावा की, हे तर बरोबर सांगत आहेत. आता
लक्ष्मी-नारायणाचे राज्य स्थापन होत आहे. आता ब्राह्मण धर्माची स्थापना होत आहे. हे
ब्राह्मणच देवी-देवता बनतात.
आता तुम्ही पुरुषार्थ
करत आहात. तर मनामध्ये स्वतःला विचारत राहा की, माझ्यामध्ये कोणता छोटा-मोठा काटा
तर राहिलेला नाही ना! काम विकाराचा काटा तर राहिलेला नाही ना! क्रोधाचा छोटासा काटा
देखील खूप वाईट आहे. देवता क्रोधी नसतात. दाखवतात की शंकराचा तिसरा नेत्र
उघडल्यामुळे विनाश होतो. हा देखील एक कलंक लावला आहे. विनाश तर होणारच आहे.
सूक्ष्मवतनामध्ये शंकराकडे साप इत्यादी थोडेच असू शकतात. तिथे जमीनच कुठे आहे,
ज्यामुळे साप इत्यादी येतील. आकाशामध्ये थोडेच साप फिरतील. सूक्ष्मवतन आणि
मूलवतनामध्ये बाग-बगीचे, साप इत्यादी काहीही नसते. ते सर्व इथे असते. स्वर्ग देखील
इथेच असतो. यावेळी मनुष्य काट्याप्रमाणे आहेत, म्हणून याला काट्यांचे जंगल म्हटले
जाते. सतयुग आहे फुलांचा बगीचा. तुम्ही बघता - बाबा कसा बगीचा बनवत आहेत. सर्वात
सुंदर बनवतात. आम्हाला सुंदर बनवतात. स्वतः तर एव्हर हसीन (नेहमीच सुंदर) आहेत.
सर्व सजणींना अर्थात मुलांना सुंदर बनवतात. रावणाने एकदम काळे बनवले आहे. आता तुम्हा
मुलांना आनंद झाला पाहिजे की, आमच्यावर बृहस्पतीची दशा बसली आहे. कल्पातील अर्धा
वेळ दुःख, अर्धा वेळ सुख असेल तर याने फायदाच काय? नाही, ३ भाग सुख आहे. हा ड्रामा
बनलेला आहे. खूप लोक विचारतात की ड्रामा असा का बनवला आहे? अरे हा तर अनादि आहे ना.
का बनला, हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. हा अनादि अविनाशी पूर्व नियोजित ड्रामा
आहे. ‘बनी बनाई बन रही…’ कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. ही तर अनादि सृष्टी चालत आली
आहे, चालत राहील. प्रलय होत नाही. बाबा नवीन दुनिया बनवतात, परंतु याच्यामध्ये
शक्यता किती आहे. जेव्हा मनुष्य पतित दुःखी होतात तेव्हाच बोलावतात. बाबा येऊन
सर्वांची काया कल्पवृक्षा समान बनवतात. तुमची आत्मा पवित्र बनेल तेव्हा मग शरीर
देखील पवित्र मिळेल. तर बाबा तुमची काया कल्पतरू बनवतात. अर्धाकल्प तुमचा कधीही
अकाली मृत्यू होणार नाही. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. तुम्हा मुलांना खूप
पुरुषार्थ केला पाहिजे. जितके उच्च पद मिळवाल तितके चांगले आहे. प्रत्येक जण
पुरुषार्थ तर जास्त कमाईसाठी करतात. लाकूडवाला देखील म्हणेल की, मी जास्ती लाकडे
नेली तर जास्त कमाई होईल. कोणी तर फसवणूक करून देखील कमाई करतात. तिथे अशी कोणती
दुःखाची गोष्ट नसते. आता तुम्ही बाबांकडून केवढा वारसा घेत आहात. स्वतःची तपासणी
केली पाहिजे की, मी स्वर्गामध्ये जाण्याच्या लायक आहे का? (नारदाचे उदाहरण आहे ना)
शास्त्रांमध्ये तर भरपूर गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. या तीर्थयात्रा इत्यादी सर्व
सोडा. एक गाणे देखील आहे ना - ‘चारों तरफ लगाये फेरे फिर भी…’ आता बाबा तुम्हाला
किती सुंदर यात्रा शिकवत आहेत, यामध्ये कोणताही त्रास नाही. बाबा फक्त एवढेच
सांगतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. तुम्हाला खूप
चांगली युक्ती सांगतो. मुलांनो ऐकत आहात! हा माझा उधार घेतलेला रथ आहे. या बाबांना
(ब्रह्मा बाबांना) किती आनंद होतो की, मी बाबांना माझे शरीर उधार दिले आहे. बाबा मला
विश्वाचा मालक बनवत आहेत. नाव देखील आहे - भागीरथ. तुम्ही जाणता बॉम्बस् इत्यादी
तयार होत आहेत. आग लागणार आहे. रावणाचा पुतळा देखील मारण्यासाठी बनवतात. इथे मारणे
इत्यादीची काही गोष्ट नाहीये. कुठे मारणे इत्यादीची गोष्ट, आणि कुठे ही रावणपुरी
संपुष्टात येत आहे. तुम्ही मुले रामपुरीमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तर
पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे, काटा बनायचे नाही.
तुम्ही
ब्राह्मण-ब्राह्मणी आहात. सर्व काही मुरलीवर अवलंबून आहे. तुम्हाला मुरली मिळाली
नाही तर तुम्ही काय कराल. असे नाही की फक्त एकाच ब्राह्मणीने मुरली ऐकवायची आहे.
कोणीही मुरली वाचून ऐकवू शकतात. बोलले पाहिजे - आज तुम्ही मुरली ऐकवा. आता तर
समजावून सांगण्यासाठी चित्रे देखील खूप सुंदर बनली आहेत. हे मुख्य चित्र तर आपल्या
दुकानामध्ये ठेवून अनेकांचे कल्याण करा. त्या सौद्यासोबत हा सौदा देखील करा. हे
बाबांचे अविनाशी ज्ञान-रत्नांचे दुकान आहे. बाबा काही मना करत नाहीत की, घर इत्यादी
बांधू नका. भले बांधा. पैसा तर मातीत मिसळून जाणार आहेत. त्यापेक्षा का नाही घर
बांधून आरामात राहावे. पैसे वापरले पाहिजेत. घर देखील बांधा, खाण्यासाठी देखील ठेवा,
दान-पुण्य देखील करा. काश्मीरच्या राजाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याने आपली जी
प्रायव्हेट प्रॉपर्टी होती ती सर्व आर्य समाजाच्या लोकांना दान देऊन गेला. आपल्या
धर्मासाठी करतात ना. इथे काही तशी कोणती गोष्ट नाहीये. सर्व मुले आहेत, दान
इत्यादीची गोष्टच नाही. ते आहे - हदचे दान. मी तर तुम्हाला विश्वाची बादशाही देतो.
ड्रामा अनुसार भारतवासीच राज्य-भाग्य घेतील. भक्तिमार्गामध्ये व्यापारी लोक काही ना
काही धर्माऊ म्हणून जरूर बाजूला काढतात. त्याचे देखील फळ दुसऱ्या जन्मामध्ये
अल्पकाळासाठी मिळते. आता तर मी डायरेक्ट आलो आहे तर तुम्ही या कार्यामध्ये लावा. मला
तर काहीही नको आहे. शिवबाबांना स्वतःसाठी घर बांधायचे आहे काय! हे सर्व ब्राह्मणांचे
आहे. गरीब, श्रीमंत सर्व एकत्र राहतात. तर हे सर्व मुलांचेच आहे. जेव्हा बघतात की,
घरामध्ये हे सगळे कसे गुण्यागोविंदाने राहतात, तर ती सुविधा द्यावी लागेल, म्हणून
बाबा म्हणतात - सर्वांचे आदरातिथ्य करा. कोणती वस्तू नसेल तर मिळू शकते. बाबांचे तर
मुलांवर प्रेम आहे. इतके प्रेम दुसरा कोणीही करू शकणार नाही. मुलांना किती समजावून
सांगतात की, पुरुषार्थ करा आणि इतरांसाठी देखील युक्ती रचा. यासाठी फक्त तीन पावले
पृथ्वी पाहिजे, ज्या ठिकाणी मुली हे ज्ञान समजावून सांगत राहतील. एखाद्या मोठ्या
व्यक्तीचा हॉल असेल, तर त्यांना बोला - आम्ही गरजेची चित्रे इथे ठेवतो. आणि मग
एक-दोन तास सकाळी आणि संध्याकाळी क्लास करून निघून जाऊ. सर्व खर्च आमचा, नाव तुमचे
होईल. भरपूर जण येऊन कवडी पासून हिऱ्या समान बनतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अविनाशी
बाबांसोबत खरा-खरा अविनाशी व्यापार करायचा आहे. त्या सौद्यासोबत या सौद्याला देखील
वेळ द्यायचा आहे. ज्ञानगंगा बनून सर्वांना पावन बनवायचे आहे.
२) ब्राह्मण जीवनाचा
आधार मुरली आहे, जी प्रेमाने ऐकायची आहे आणि ऐकवायची आहे. आतमध्ये कोणताही काटा
असेल तर त्याला काढून टाकायचे आहे. अवगुणांचे दान करायचे आहे.
वरदान:-
दयाळूपणाच्या
भावनेद्वारे अपकारीवर देखील उपकार करणारे शुभचिंतक भव
कोणतीही आत्मा कशीही
असो, भले सतोगुणी, नाहीतर तमोगुणी आत्मा संपर्कामध्ये येवो परंतु सर्वांप्रती
शुभचिंतक अर्थात अपकारीवर देखील उपकार करणारे. कधीही कोणत्याही आत्म्याप्रती घृणेची
दृष्टी नसावी कारण तुम्ही जाणता की हे अज्ञानाच्या वशीभूत आहेत, बुद्धिहीन आहेत.
त्यांच्याविषयी दया अथवा प्रेम वाटावे, घृणा वाटू नये. शुभचिंतक आत्मा कधी असा
विचार करणार नाही की, ‘याने असे का केले’, परंतु ‘या आत्म्याचे कल्याण कसे होईल’
यासाठी विचार करेल - हीच आहे शुभचिंतक स्टेज.
बोधवाक्य:-
तपस्येच्या
बळाद्वारे असंभवला संभव करून सफलता मूर्त बना.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
त्रिकालदर्शी असणारा,
कोणत्याही
आत्म्याला संपूर्ण सहयोग देण्याची भावना समोर ठेवून, प्रत्येक आत्म्याच्या कमजोरीला
ओळखत असूनही त्याची कमजोरी स्वतःमध्ये धारण करणार नाही आणि वर्णनही करणार नाही;
परंतु अन्य आत्म्यांच्या कमजोरीचा काटा कल्याणकारी स्वरूपाद्वारे नष्ट करेल.
काट्याला काट्या ऐवजी, काट्याला देखील फूल बनवेल.