05-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ड्रामाचे श्रेष्ठ नॉलेज तुम्हा मुलांपाशीच आहे, तुम्ही जाणता हा ड्रामा हुबेहूब रिपीट होतो”

प्रश्न:-
प्रवृत्तीवाले बाबांना कोणता प्रश्न विचारतात, बाबा त्यांना कोणता सल्ला देतात?

उत्तर:-
बरीच मुले विचारतात - बाबा, आम्ही धंदा करावा का? बाबा म्हणतात - मुलांनो, धंदा जरूर करा परंतु रॉयल धंदा करा. ब्राह्मण मुले दारू, सिगारेट, बिडी इत्यादींचा वाईट धंदा करू शकत नाहीत कारण यामुळे आणखीनच विकार आकर्षित करतात.

ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. आता एक आहे रुहानी बाबांचे श्रीमत, दुसरे आहे रावणाचे आसुरी मत. आसुरी मत बाबांचे म्हटले जाणार नाही. रावणाला काही बाबा तर म्हणणार नाही ना. ते आहे रावणाचे आसुरी मत. आता तुम्हा मुलांना मिळत आहे - ‘ईश्वरीय मत’. किती रात्रं-दिवसाचा फरक आहे. बुद्धीमध्ये येते ईश्वरीय मताने दैवी गुण धारण करत आलो आहोत. हे केवळ तुम्ही मुलेच बाबांकडून ऐकता इतर कोणाला कळत सुद्धा नाही. बाबा भेटतातच संपत्ती देण्याकरिता. रावणामुळे तर आणखीनच संपत्ती कमी होत जाते. ईश्वरीय मत कुठे घेऊन जाते आणि आसुरी मत कुठे घेऊन जाते, हे तुम्हीच जाणता. जेव्हा पासून आसुरी मत मिळते, तेव्हापासून तुम्ही मुले खालीच उतरत येता (पतन होते). नवीन दुनियेमध्ये थोडे-थोडेच खाली येता. खाली येणे कसे असते, पुन्हा चढणे कसे असते - हे देखील तुम्हा मुलांना समजले आहे. आता तुम्हा मुलांना पुन्हा श्रेष्ठ बनण्यासाठी श्रीमत मिळते. तुम्ही इथे आलाच आहात श्रेष्ठ बनण्यासाठी. तुम्ही जाणता - आपल्याला पुन्हा श्रेष्ठ मत कसे प्राप्त होणार. तुम्ही अनेकदा श्रेष्ठ मताने उच्च पद प्राप्त केले आहे आणि मग पुनर्जन्म घेत-घेत खाली उतरत आला आहात. पुन्हा मग एकदाच चढता. नंबरवार पुरुषार्था अनुसार तर असतातच. बाबा सांगतात की, वेळ लागतो. पुरुषोत्तम संगमयुगाचा काळ देखील अतिशय ॲक्युरेट आहे. ड्रामा एकदम ॲक्यूरेट चालतो आणि खूप वंडरफूल आहे. मुलांना समजायला खूप सोपे जाते - बाबांची आठवण करायची आहे आणि वारसा घ्यायचा आहे. बस्स. परंतु पुरुषार्थ करताना तर बऱ्याचजणांना कठीण सुद्धा वाटते. इतके उच्च ते उच्च पद प्राप्त करणे काही इतके सोपे थोडेच असू शकते. बाबांची आठवण करणे खूप सोपे आहे आणि बाबांचा वारसा मिळवणे सोपे आहे. सेकंदाची गोष्ट आहे. मग जेव्हा पुरुषार्थ करु लागतात तेव्हा मायेची विघ्ने देखील येतात. रावणावर विजय मिळवायचा असतो. साऱ्या सृष्टीवर या रावणाचे राज्य आहे. आता तुम्ही समजता आम्ही प्रत्येक कल्पामध्ये योगबलाने रावणावर विजय मिळवत आलो आहोत. आता देखील मिळवत आहोत. शिकविणारे आहेत बेहदचे बाबा. भक्ती मार्गामध्ये देखील तुम्ही ‘बाबा-बाबा’ म्हणत आला आहात. परंतु अगोदर बाबांना जाणत नव्हता. आत्म्याला जाणत होता. म्हणत होता - ‘चमकता है भ्रकुटी के बीच में अजब सितारा….’ आत्म्याला जाणत असून देखील बाबांना जाणत नव्हता. कसा विचित्र ड्रामा आहे. म्हणत देखील होता - ‘हे परमपिता परमात्मा’, आठवण करत होता, तरीही जाणत नव्हता. ना आत्म्याच्या ऑक्युपेशनला, ना परमात्म्याच्या ऑक्युपेशनला पूर्णपणे जाणत होता. बाबाच स्वतः येऊन समजावून सांगतात. बाबांशिवाय इतर कोणीही कधी जाणीव करवून देऊ शकणार नाही. कोणाचा तसा पार्टच नाहीये. गायन देखील आहे ईश्वरीय संप्रदाय, आसुरी संप्रदाय आणि दैवी संप्रदाय. आहे खूप सोपे. परंतु या गोष्टी आठवणीत रहाव्यात - यामध्ये माया विघ्न आणते. विसरायला लावते. बाबा म्हणतात - नंबरवार पुरुषार्थानुसार आठवण करत-करत जेव्हा ड्रामाचा अंत होईल म्हणजेच जुन्या दुनियेचा अंत होईल तेव्हा नंबरवार पुरुषार्था नुसार राजधानी स्थापन होणारच आहे. शास्त्रांवरून या गोष्टी कधी कोणाला समजू शकणार नाहीत. गीता इत्यादी तर यांनी (ब्रह्मा बाबांनी) देखील खूप वाचली आहे ना. आता बाबा म्हणतात - याला काहीच किंमत नाही. परंतु भक्तीमध्ये कनरस खूप मिळतो (ऐकायला छान वाटते) म्हणून सोडत नाहीत.

तुम्ही जाणता सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. धंदा इत्यादी सुद्धा काहींचा रॉयल असतो, काहींचा खराब असतो. दारू, बिडी, सिगारेट इत्यादी विकतात - हा धंदा तर अतिशय वाईट आहे. दारू सर्व विकारांना आकर्षित करते. कोणाला दारुडा बनवणे - हा धंदा चांगला नाही. बाबा मत देतील युक्तीने हा धंदा चेंज करा. नाहीतर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. बाबा समजावून सांगतात की, फक्त अविनाशी ज्ञान रत्नांचा धंदा सोडून बाकीचे सर्व धंदे नुकसान करणारे आहेत. भले काहीजण दागिन्यांचा व्यापार करत होते परंतु फायदा तर झाला नाही ना. फार तर लखपती झाले. हा धंदा (अविनाशी ज्ञान रत्नांचा धंदा) केल्याने काय बनतात? बाबा पत्रांमध्ये देखील नेहमी लिहितात - ‘पद्मा-पदम भाग्यशाली’. ते देखील २१ जन्मांसाठी बनता. तुम्ही देखील समजता बाबा एकदम बरोबर सांगत आहेत. आम्हीच हे देवी-देवता होतो, मग चक्र फिरत-फिरत खाली येतो. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला देखील जाणले आहे. नॉलेज तर बाबांकडून मिळाले आहे परंतु मग दैवी गुण सुद्धा धारण करायचे आहेत. आपले परीक्षण करायचे आहे - आपल्यामध्ये कोणते आसुरी गुण तर नाहीत ना? हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील जाणतात - मी आपले हे शरीर रुपी घर भाड्याने दिले आहे. हे घर आहे ना. यामध्ये आत्मा राहते. मला खूप अभिमान वाटतो की मी भगवंताला भाड्याने घर (शरीर) दिले आहे! ड्रामा प्लॅन नुसार इतर कोणतेही घर (दुसऱ्या कुणाचेही शरीर) त्यांना घ्यायचेच नाहीये. कल्प-कल्प हेच घर घ्यावे लागते. यांना तर आनंद होतो ना. परंतु त्यानंतर गदारोळ देखील किती माजला. हे बाबा (ब्रह्मा बाबा) कधी गमतीने बाबांना म्हणतात - ‘बाबा, तुमचा रथ बनलो तर मला किती शिव्या खाव्या लागतात’. बाबा म्हणतात - ‘सर्वात जास्त शिव्या तर मला मिळाल्या आहेत. आता तुझी पाळी आहे’. ब्रह्माला कधी शिव्या खाव्या लागल्या नाहीत. आता पाळी आली आहे. रथ दिला आहे हे तर समजतात ना तर जरूर बाबांकडून मदत सुद्धा मिळणार. तरी देखील बाबा म्हणतात - बाबांची निरंतर आठवण करा, यामध्ये तुम्ही मुले यांच्यापेक्षा (ब्रह्मा बाबांपेक्षा) वेगाने पुढे जाऊ शकता कारण यांच्यावर तर खूप जबाबदारी आहे. भले ड्रामा म्हणून सोडून देतात तरी देखील त्याचा काहीतरी प्रभाव पडतोच. हे बिचारे खूप चांगली सेवा करत होते. हे संगदोषामध्ये येऊन बिघडले. किती डिससर्व्हिस होते. अशी काही कामे करतात त्यामुळे त्याचा परिणाम तर होतोच. त्यावेळी हे समजत नाहीत की हा देखील ड्रामा बनलेला आहे. हा नंतर विचार येतो. हे तर ड्रामामध्ये नोंदलेलेच आहे ना. माया अवस्थेला बिघडवते त्यामुळे खूप डिससर्व्हिस होते. किती अबला इत्यादींवर अत्याचार होतात. इथे तर आपलीच मुले किती डिससर्व्हिस करतात. उलटे-सुलटे बोलू लागतात.

आता तुम्ही मुले जाणता की, बाबा काय ऐकवत आहेत? कोणतेही शास्त्र इत्यादी ऐकवत नाहीत. आता आपण श्रीमतावर किती श्रेष्ठ बनतो. आसुरी मताने किती भ्रष्ट बनलो आहोत. वेळ लागतो ना. मायेचे युद्ध चालत राहील. आता तुमचा विजय तर जरूर होणार आहे. हे तुम्ही समजता शांतीधाम-सुखधामवर आपलाच विजय आहे. कल्प-कल्प आम्ही विजय मिळवत आलो आहोत. या पुरुषोत्तम संगमायुगावरच स्थापना आणि विनाश होतो. हे सारे तपशीलवार तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. खरोखर बाबा आमच्या द्वारे स्थापना करत आहेत. आणि मग आम्हीच राज्य करणार. बाबांना थँक्स सुद्धा करणार नाही! बाबा म्हणतात - ‘हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. मी देखील या ड्रामामध्ये पार्टधारी आहे’. ड्रामामध्ये सर्वांचा पार्ट नोंदलेला आहे. शिवबाबांचा सुद्धा पार्ट आहे. आपला देखील पार्ट आहे. थँक्स देण्याचा प्रश्नच नाही. शिवबाबा म्हणतात मी तुम्हाला श्रीमत देऊन मार्ग सांगतो दुसरा कोणीही सांगू शकणार नाही. जो कोणी येईल त्याला तुम्ही बोला - ‘सतोप्रधान नवीन दुनिया स्वर्ग होता ना. या जुन्या दुनियेला तमोप्रधान म्हटले जाते. पुन्हा सतोप्रधान बनण्यासाठी दैवी गुण धारण करायचे आहेत. बाबांची आठवण करायची आहे. मंत्र देखील हाच आहे - मनमनाभव, मध्याजी भव. बस्स, आणि हे देखील सांगतात की, मी सुप्रीम गुरु आहे’.

तुम्ही मुले आता आठवणीच्या यात्रेद्वारे साऱ्या सृष्टीला सद्गतीमध्ये घेऊन जाता. जगद्गुरू एक शिवबाबाच आहेत जे तुम्हाला देखील श्रीमत देतात. तुम्ही जाणता दर ५ हजार वर्षानंतर आम्हाला हे श्रीमत मिळते. चक्र फिरत राहते. आज जुनी दुनिया आहे, उद्या नवीन दुनिया असणार. या चक्राला समजून घेणे देखील खूप सोपे आहे. परंतु हे सुद्धा लक्षात राहिले तर कोणालाही समजावून सांगू शकाल. हे सुद्धा विसरून जातात. कोणी खालच्या पातळीवर येतात तर मग त्याचे ज्ञान इत्यादी सर्व संपुष्टात येते. कला-काया (गुण आणि शरीर) जणू माया घेऊनच जाते. सर्व कला नाहीशा करून कला रहित करून टाकते. विकारामध्ये असे अडकतात की काही विचारू नका. आता तुम्हाला संपूर्ण चक्र लक्षात आहे. तुम्ही जन्म-जन्मांतर वेश्यालयामध्ये राहिला आहात, हजारो पापे करत आला आहात. सर्वांसमोर म्हणता - जन्मो-जन्मीचे आम्ही पापी आहोत. आम्हीच आधी पुण्य आत्मा होतो, नंतर पाप आत्मा बनलो. आता पुन्हा पुण्य आत्मा बनतो. तुम्हा मुलांना हे नॉलेज मिळत आहे. मग तुम्ही इतरांना देऊन त्यांना आप समान बनवता. गृहस्थ व्यवहारामध्ये राहिल्याने फरक तर पडतोच ना. ते इतके समजावून सांगू शकत नाहीत जितके तुम्ही सांगू शकता. परंतु सगळेच काही घरदार सोडू शकत नाहीत. बाबा स्वतः म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमळ फुलासारखे बना. सगळे सोडून येतील तर इतके सर्व बसणार कुठे. बाबा नॉलेजफूल आहेत. ते कुठलेही शास्त्र इत्यादी वाचत नाहीत. यांनी (ब्रह्मा बाबांनी) शास्त्र इत्यादी वाचली होती. माझ्यासाठी तर म्हणतात - ‘गॉडफादर इज नॉलेजफुल’. मनुष्य हे देखील जाणत नाहीत की बाबांमध्ये कोणते नॉलेज आहे. आता तुम्हाला साऱ्या सृष्टीच्या आदि, मध्य, अंताचे नॉलेज आहे. तुम्ही जाणता ही भक्तिमार्गाची शास्त्रे देखील अनादि आहेत. भक्ती मार्गामध्ये ही शास्त्रे देखील जरूर बनतात. म्हणतात - पहाड तुटला तर पुन्हा बनणार कसा! परंतु हा तर ड्रामा आहे ना. शास्त्रे इत्यादी सर्व नष्ट होतात, पुन्हा आपल्या ठरलेल्या वेळेवर तिच बनतात. आपण पहिल्यांदा शिवाची पूजा करतो - हे देखील शास्त्रांमध्ये असणार ना. शिवाची भक्ती कशी केली जाते. किती श्लोक इत्यादी गातात. तुम्ही केवळ आठवण करता - शिवबाबा ज्ञानाचे सागर आहेत. ते आता आम्हाला ज्ञान देत आहेत. बाबांनी तुम्हाला समजावून सांगितले आहे - हे सृष्टीचे चक्र कसे फिरते. शास्त्रांमध्ये इतक्या लांबलचक बाता मारल्या आहेत, ज्या कधी डोक्यात येऊ सुद्धा शकणार नाहीत. तर मुलांना आतून किती आनंद झाला पाहिजे - बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत! गायले देखील जाते - ‘स्टुडंट लाईफ इज द बेस्ट’. भगवानुवाच - मी तुम्हाला असा राजांचाही राजा बनवतो. दुसऱ्या कोणत्याही शास्त्रांमध्ये या गोष्टीच नाहीत. उच्च ते उच्च प्राप्ती आहेच मुळी ही. वास्तविक गुरु तर एकच आहेत जे सर्वांची सद्गती करतात. भले स्थापना करणाऱ्याला देखील गुरु म्हणू शकता, परंतु गुरु तोच जो सद्गती देतो. हे (धर्मगुरू) तर आपल्या मागून सर्वांना पार्टमध्ये घेऊन येतात. परत जाण्याचा मार्ग काही सांगत नाहीत. वरात तर शिवाचीच गायली गेली आहे, इतर कोणत्या गुरुची नाही. मनुष्यांनी मग शिव आणि शंकर यांना एकत्र केले आहे. कुठे ते सूक्ष्म वतनवासी, कुठे ते मूल वतनवासी. दोघे एकच कसे असू शकतील. हे भक्ती मार्गामध्ये लिहिले आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर तीन मुले झाली ना. ब्रह्मा विषयी देखील तुम्ही समजावून सांगू शकता. यांना (ब्रह्मा बाबांना) ॲडॉप्ट केले आहे तर हा शिवबाबांचा मुलगा झाला ना. उच्च ते उच्च आहेत बाबा. बाकी ही आहे त्यांची रचना. या किती समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अविनाशी ज्ञान रत्नांचा धंदा करून २१ जन्मांसाठी पद्मा-पदम भाग्यशाली बनायचे आहे. आपले परीक्षण करायचे आहे - आपल्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही ना? आपण असा कोणता धंदा तर करत नाही ना ज्यामुळे विकारांची उत्पत्ती होईल?

२) आठवणीच्या यात्रेमध्ये राहून संपूर्ण सृष्टीला सद्गतीमध्ये पोहोचवायचे आहे. एक सद्गुरु बाबांच्या श्रीमतावर चालून आप समान बनविण्याची सेवा करायची आहे. मायेने कधी कलाहीन बनवू नये यासाठी सावध रहा.

वरदान:-
वाईटामध्ये देखील चांगल्याचा अनुभव करणारे निश्चय बुद्धी निश्चिंत बादशहा भव

सदैव हे स्लोगन लक्षात राहावे की, जे झाले ते चांगले झाले, चांगले आहे आणि चांगलेच होणार आहे. वाईटाला वाईटाच्या रूपामध्ये पाहू नका. परंतु वाईटामध्ये देखील चांगल्याचा अनुभव करा, वाईटामधून देखील स्वतःला धडा घ्या. कोणतीही गोष्ट आली तर “काय होणार” हा संकल्प येऊ नये परंतु त्वरित असा संकल्प यावा की, “चांगलेच होणार”. होऊन गेले चांगले झाले. जिथे ‘चांगले’ आहे तिथे सदैव निश्चिंत बादशहा आहे. निश्चय बुद्धीचा अर्थच आहे निश्चिंत बादशहा.

बोधवाक्य:-
जे स्वतःला किंवा इतरांना रिगार्ड देतात त्यांचे रेकॉर्ड नेहमीच चांगले राहते.