05-11-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ही संपूर्ण दुनिया रोग्यांचे मोठे हॉस्पिटल आहे, बाबा आले आहेत संपूर्ण दुनियेला निरोगी बनविण्यासाठी”

प्रश्न:-
कोणती स्मृती राहिली तर कधीही उदासीनतेची अथवा दुःखाची लाट येऊ शकणार नाही?

उत्तर:-
आता आपण या जुन्या दुनियेला, जुन्या शरीराला सोडून घरी जाणार आणि मग नवीन दुनियेमध्ये पुनर्जन्म घेणार. आम्ही आता राजयोग शिकत आहोत - राजाईमध्ये जाण्यासाठी. बाबा आम्हा मुलांसाठी रुहानी राजस्थान स्थापन करत आहेत, हीच स्मृती रहावी म्हणजे मग दुःखाची लाट येऊ शकणार नाही.

गीत:-
तुम्हीं हो माता…

ओम शांती।
गाणी काही तुम्हा मुलांसाठी नाही आहेत, एकदम नवीन असणाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी आहेत. असे देखील नाही की इथे सर्वजण बुद्धिवानच आहेत. नाही, निर्बुद्ध असणाऱ्याला बुद्धिवान बनवले जाते. मुले समजतात आपण किती निर्बुद्ध बनलो होतो, आता बाबा आम्हाला बुद्धिवान बनवतात. जसे शाळेत शिकून मुले किती बुद्धिवान बनतात. प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार बॅरिस्टर, इंजिनिअर इत्यादी बनतात. हे तर आत्म्याला बुद्धिवान बनवायचे आहे. शिकते देखील आत्मा शरीराद्वारे. परंतु बाहेर जे काही शिक्षण मिळते, ते आहे अल्पकाळासाठी शरीर निर्वाह अर्थ. भले काहीजण कन्व्हर्ट देखील करतात, हिंदूंना ख्रिश्चन बनवतात - कशासाठी? थोडे सुख मिळविण्यासाठी. पैसे नोकरी इत्यादी सहज मिळण्यासाठी, आजिविकेसाठी. आता तुम्ही मुले जाणता आम्हाला सर्वप्रथम तर आत्म-अभिमानी बनावे लागेल. ही आहे मुख्य गोष्ट कारण ही आहेच रोगी दुनिया. असा कोणी मनुष्य नाही जो रोगी बनत नसेल. काही ना काही होते जरूर. ही सारी दुनिया मोठ्यात मोठे हॉस्पिटल आहे, ज्यामध्ये सर्व मनुष्य पतित रोगी आहेत. आयुष्य देखील खूप कमी असते. अचानक मृत्युमुखी पडतात. काळाच्या सापळ्यात अडकतात. हे देखील तुम्ही मुले जाणता. तुम्ही मुले फक्त भारताचीच नाही परंतु साऱ्या विश्वाची गुप्त रीतीने सेवा करता. मुख्य गोष्टच ही आहे की, बाबांना कोणीही जाणत नाही. मनुष्य असून पारलौकिक पित्याला जाणत नाहीत, त्यांच्यावर प्रेम करत नाहीत. आता बाबा म्हणतात - माझ्यावर प्रेम करा. माझ्यावर प्रेम करता-करता तुम्हाला माझ्या सोबतच परत जायचे आहे. जोपर्यंत परत जाऊ तोपर्यंत या छी-छी (विकारी) दुनियेमध्ये रहावे लागते. सर्वप्रथम तर देह-अभिमानी पासून देही-अभिमानी बना तेव्हाच तुम्ही धारणा करू शकाल आणि बाबांची आठवण करू शकाल. जर देही-अभिमानी बनत नसाल तर काहीच कामाचे नाही. देह-अभिमानी तर सगळेच आहेत. तुम्ही समजता देखील की आम्ही आत्म-अभिमानी बनत नाही, बाबांची आठवण करत नाही तर आम्ही तेच आहोत जे पहिले होतो. मुख्य गोष्टच आहे देही-अभिमानी बनण्याची. ना की रचनेला जाणण्याची. गायले देखील जाते रचता आणि रचनेचे ज्ञान. असे नाही की पहिले रचना आणि नंतर रचताचे ज्ञान असे म्हणायचे. नाही, पहिले रचता, तेच पिता आहेत. म्हटले देखील जाते - ‘ओ गॉडफादर’. ते येऊन तुम्हा मुलांना आप समान बनवतात. बाबा तर सदैव आत्म-अभिमानीच आहेत म्हणून ते ‘सुप्रीम’ आहेत. बाबा म्हणतात मी तर आत्म-अभिमानी आहे. ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे त्यांना देखील आत्म-अभिमानी बनवतो. यांच्यामध्ये प्रवेश करतो यांना कन्व्हर्ट करण्यासाठी कारण हे देखील देह-अभिमानी होते, यांना देखील सांगतो - स्वतःला आत्मा समजून माझी यथार्थ रीतीने आठवण करा. असे अनेक मनुष्य आहेत जे समजतात आत्मा वेगळी आहे, जीव वेगळा आहे. आत्मा देहातून निघून जाते तर दोन गोष्टी झाल्या ना. बाबा समजावून सांगतात तुम्ही आत्मा आहात. आत्माच पुनर्जन्म घेते. आत्माच शरीर घेऊन पार्ट बजावते. बाबा वारंवार समजावून सांगतात - स्वतःला आत्मा समजा, यासाठी खूप मेहनत पाहिजे. जसे स्टुडंट अभ्यास करण्यासाठी एकांतामध्ये, बगीचा इत्यादी ठिकाणी जाऊन अभ्यास करतात. पादरी लोक सुद्धा फिरायला जातात तर एकदम शांत राहतात. ते काही आत्म-अभिमानी रहात नाहीत. क्राईस्टच्या आठवणीमध्ये राहतात. घरामध्ये राहून देखील आठवण तर करू शकतात परंतु खास एकांतामध्ये जातात क्राईस्टची आठवण करण्यासाठी बाकी कुठेही बघत सुद्धा नाहीत. जे चांगले-चांगले असतात, ते समजतात की, आम्ही क्राइस्टची आठवण करता-करता त्यांच्याकडे निघून जाणार. क्राईस्ट हेवनमध्ये बसला आहे, आम्ही देखील हेवनमध्ये निघून जाणार. हे देखील समजतात की, क्राईस्ट हेवनली गॉडफादर जवळ गेला. आम्ही देखील आठवण करता-करता त्यांच्याकडे जाणार. सर्व ख्रिश्चन त्या एकाची संतान झाली. त्यांच्यामध्ये काही ज्ञान ठीक आहे. परंतु क्राईस्टची आत्मा तर वर गेलेलीच नाहीये. क्राईस्ट नाव तर शरीराचे आहे, ज्याला फाशीवर चढवले. आत्मा तर फाशीवर चढत नाही. आता क्राईस्टची आत्मा गॉडफादरकडे गेली, असे म्हणणे देखील चुकीचे ठरते. परत कोणी कसे जातील? प्रत्येकाला स्थापना मग पालना जरूर करायची असते. घराला रंगरंगोटी इत्यादी केली जाते, ही देखील पालना आहे ना.

आता बेहदच्या बाबांची तुम्ही आठवण करा. हे नॉलेज बेहदच्या बाबांशिवाय कोणीही देऊ शकत नाही. आपलेच कल्याण करायचे आहे. रोगी पासून निरोगी बनायचे आहे. हे रोग्यांचे खूप मोठे हॉस्पिटल आहे. सारे विश्व रोग्यांचे हॉस्पिटल आहे. रोगी जरूर लवकर मरतील, बाबा येऊन या साऱ्या विश्वाला निरोगी बनवतात. असे नाही की इथेच निरोगी बनतील. बाबा म्हणतात - निरोगी असतातच नवीन दुनियेमध्ये. जुन्या दुनियेमध्ये निरोगी असू शकत नाहीत. हे लक्ष्मी-नारायण निरोगी, एव्हर हेल्दी आहेत. तिथे आयुष्य देखील मोठे असते, रोगी विशश (विकारी) असतात. व्हाईसलेस (निर्विकारी) कधी रोगी असत नाहीत. ते आहेतच संपूर्ण निर्विकारी. बाबा स्वतः म्हणतात यावेळी सारे विश्व, खास भारत रोगी आहे. तुम्ही मुले सर्वप्रथम निरोगी दुनियेमध्ये येता, निरोगी बनता आठवणीच्या यात्रेद्वारे. आठवणी द्वारे तुम्ही आपल्या स्वीट होममध्ये निघून जाल. ही देखील एक यात्रा आहे. आत्म्याची यात्रा आहे, पिता परमात्म्याजवळ जाण्याची. ही आहे स्पिरीच्युअल यात्रा (अध्यात्मिक यात्रा). हे शब्द कोणी समजू शकणार नाहीत. तुम्ही देखील नंबरवार जाणता, परंतु विसरून जाता. मूळ गोष्ट ही आहे, समजावून सांगणे देखील खूप सोपे आहे. परंतु सांगेल तो जो स्वतः देखील रूहानी यात्रेवर असेल. स्वतः रुहानी यात्रेवर रहात नसेल आणि दुसऱ्याला सांगेल तर तीर लागणार नाही. खरेपणाचे जोहर पाहिजे (ताकद हवी). आम्ही बाबांची इतकी आठवण करतो की बस्स. पत्नी पतीची किती आठवण करते. हे बाबा आहेत पतींचेही पती, पित्यांचाही पिता, गुरूंचाही गुरु. गुरु लोक देखील त्या पित्याचीच आठवण करतात. क्राईस्ट देखील त्या पित्याचीच आठवण करत होते. परंतु त्यांना कोणी जाणत नाहीत. बाबा जेव्हा येतील तेव्हा येऊन आपली ओळख देतील. भारतवासीयांनाच पित्याचा परिचय नाही आहे तर इतरांना कुठून मिळेल. परदेशातूनही इथे योग शिकण्यासाठी येतात. समजतात प्राचीन योग भगवंताने शिकवला. ही आहे भावना. बाबा समजावून सांगतात की सच्चा-सच्चा योग तर मीच कल्प-कल्प एकदाच येऊन शिकवतो. मुख्य गोष्ट आहे स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, यालाच रुहानी योग म्हटले जाते. बाकी सर्वांचा आहे भौतिक योग. ब्रह्म सोबत योग ठेवतात. ते (ब्रह्म) देखील काही पिता तर नाही आहे. ते तर मह्तत्व आहे, राहण्याचे ठिकाण. तर राईट एक बाबाच आहेत. एका बाबांनाच सत्य म्हटले जाते. हे देखील भारतवासीयांना माहित नाही आहे की बाबाच सत्य कसे आहेत. तेच सचखंडाची स्थापना करतात. सचखंड आणि झूठखंड. तुम्ही जेव्हा सचखंडामध्ये राहता तर तिथे रावणराज्यच नसते. अर्ध्या कल्पानंतर रावण राज्य झूठखंड सुरू होतो. सचखंड पूर्ण सतयुगाला म्हणणार. मग झूठखंड पूर्ण कलियुगाचा अंत. आता तुम्ही संगमावर बसला आहात. ना इथे आहात, ना तिथे आहात. तुम्ही यात्रा करत आहात. आत्मा ट्रॅव्हल करत आहे, शरीर नाही. बाबा येऊन यात्रा करायला शिकवतात. इथून तिथे जायचे आहे. तुम्हाला हे शिकवतात. ते लोक मग चंद्र तारे इत्यादींवर जाण्यासाठी ट्रॅव्हल (यात्रा) करतात. आता तुम्ही जाणता त्यामध्ये काहीच फायदा नाही. या गोष्टींनीच सर्व विनाश होणार आहे. बाकी जी काही इतकी मेहनत करतात सर्व व्यर्थ आहे. तुम्ही जाणता या सर्व गोष्टी ज्या विज्ञानाद्वारे बनत आहेत त्या भविष्यामध्ये तुमच्याच कामी येतील. हा ड्रामा बनलेला आहे. बेहदचे बाबा येऊन शिकवतात तर किती रिगार्ड (आदर) ठेवला पाहिजे. टीचरचा तसाही खूप आदर करतात. टीचर आदेश देतात - चांगल्या रीतीने शिकून पास व्हा. जर आदेशाचे पालन केले नाहीत तर नापास व्हाल. बाबा देखील म्हणतात - तुम्हाला विश्वाचा मालक बनण्यासाठी शिकवितो. हे लक्ष्मी-नारायण मालक आहेत. भले प्रजा देखील मालक आहे, परंतु पदे तर खूप आहेत ना. सर्व भारतवासी देखील म्हणतात ना - आम्ही मालक आहोत. गरीब देखील स्वतःला भारताचा मालक समजेल. परंतु राजा आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे. नॉलेज मुळे पदामध्ये फरक होतो. नॉलेजमध्ये देखील हुशारी पाहिजे. पवित्रता देखील जरुरी आहे, तर हेल्थ-वेल्थ सुद्धा पाहिजे. स्वर्गामध्ये सर्व आहेत ना. बाबा एम ऑब्जेक्ट समजावून सांगतात. दुनियेमध्ये इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये हे एम ऑब्जेक्ट नसेल. तुम्ही पटकन म्हणाल - आम्ही हे बनत आहोत. साऱ्या विश्वामध्ये आपली राजधानी असेल. हे तर आता पंचायती राज्य आहे. पहिले होते डबल ताजधारी मग एक ताज, आता नो ताज. बाबांनी मुरलीमध्ये म्हटले होते, हे देखील चित्र असावे - डबल मुकुटधारी राजासमोर सिंगल मुकुट वाले माथा झुकवतात. आता बाबा म्हणतात - मी तुम्हाला राजांचाही राजा डबल मुकुटधारी बनवतो. ते आहेत अल्पकाळासाठी, ही आहे २१ जन्मांची गोष्ट. पहिली मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची. बोलावतात देखील की, येऊन पतितापासून पावन बनवा. असे म्हणत नाहीत की राजा बनवा. आता तुम्हा मुलांचा आहे बेहदचा संन्यास. या दुनियेतूनच निघून आपल्या घरी जातील. मग स्वर्गामध्ये येतील. आतून आनंद झाला पाहिजे, जर का समजावतात की आपण घरी जाणार आणि मग राजाई मध्ये येणार तर मग उदासी, दुःख इत्यादी हे सर्व का झाले पाहिजे. मी आत्मा घरी जाणार मग पुनर्जन्म नवीन दुनियेमध्ये घेणार. मुलांना स्थायी खुशी का राहत नाही? मायेचा विरोध खूप आहे म्हणून खुशी कमी होते. पतित-पावन स्वतःच म्हणतात - माझी आठवण करा तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होऊन जातील. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनता. जाणता मग आपण आपल्या राजस्थानमध्ये निघून जाणार. इथे विविध प्रकारचे राजे होऊन गेले आहेत, आता पुन्हा रूहानी राजस्थान बनणार आहे. स्वर्गाचे मालक बनणार. ख्रिश्चन लोक हेवनचा अर्थच समजत नाहीत. ते मुक्तिधामला हेवन म्हणतात. असे नाही की हेवनली गॉडफादर काही हेवनमध्ये राहतात. ते तर राहतातच शांतीधाममध्ये. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात पॅराडाईज मध्ये (स्वर्गामध्ये) जाण्यासाठी. हा फरक सांगायचा आहे - गॉडफादर आहेत मुक्तिधाम मध्ये राहणारे. हेवन नव्या दुनियेला म्हटले जाते. बाबाच येऊन पॅराडाईज स्थापन करतात. तुम्ही ज्याला शांतीधाम म्हणता त्याला ते लोक हेवन समजतात. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.

बाबा म्हणतात - नॉलेज तर खूप सोपे आहे. हे आहे पवित्र बनण्याचे नॉलेज, मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये जाण्याचे नॉलेज, जे बाबाच देऊ शकतात. जेव्हा कोणाला फाशी दिली जाते तर आतून हेच वाटत असते की, मी भगवंताकडे जात आहे. फाशी देणारे देखील म्हणतात - गॉडची आठवण कर. गॉडला तर दोघेही जाणत नाहीत. त्यांना तर त्यावेळी मित्र-नातेवाईक इत्यादींची आठवण येते. गायन देखील आहे - ‘अन्तकाल जो स्त्री सिमरे…’ काही ना काही आठवण जरूर राहते. सतयुगामध्येच मोहजीत राहतात. तिथे जाणतात एक कातडी (शरीर) सोडून दुसरी घेणार. तिथे आठवण करण्याची गरजच नाही म्हणून म्हणतात - ‘दुःख में सिमरण सब करें…’ इथे दुःख आहे म्हणून आठवण करतात भगवंताकडून काही मिळावे. तिथे तर सर्व काही मिळालेलेच आहे. तुम्ही सांगू शकता - आमचा उद्देश आहे मनुष्याला आस्तिक बनविणे, धनीचे (बाबांचे) बनवणे. आता सर्व निधनके (बिना धनीचे) आहेत. आम्ही धणका बनवतो (भगवंताचे बनवतो). सुख, शांती, संपत्तीचा वारसा देणारे बाबाच आहेत. हे लक्ष्मी-नारायण किती दीर्घायुषी होते. हे देखील जाणतात - भारतवासी सुरुवातीला खूप दीर्घायुषी होते. आता अल्पायुषी आहेत. आयुष्य कमी का झाले हे कोणीही जाणत नाही. तुमच्यासाठी तर समजणे आणि समजावून सांगणे खूप सोपे झाले आहे. ते देखील नंबरवार आहेत. स्पष्ट करून सांगण्याची पद्धती प्रत्येकाची आपापली आहे, जे जशी धारणा करतात, तसे समजावून सांगतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जसे बाबा सदैव आत्म-अभिमानी आहेत, तसे आत्म-अभिमानी होऊन राहण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. एका बाबांवर मनापासून प्रेम करत-करत बाबांसोबत घरी जायचे आहे.

२) बेहदच्या बाबांचा पूर्णपणे रिगार्ड (आदर) ठेवायचा आहे अर्थात बाबांच्या आदेशानुसार चालायचे आहे. बाबांचा पहिला आदेश आहे - ‘मुलांनो, चांगल्या रीतीने अभ्यास करून पास व्हा’. या आदेशाचे पालन करायचे आहे.

वरदान:-
शक्तिशाली सेवेद्वारा निर्बलामध्ये बळ भरणारे सच्चे सेवाधारी भव

खऱ्या सेवाधारीची वास्तविक विशेषता आहे - निर्बलामध्ये बळ भरण्यासाठी निमित्त बनणे. सेवा तर सर्वच करतात परंतु सफलतेमध्ये जे अंतर दिसून येते त्याचे कारण आहे सेवेच्या साधनांमध्ये शक्तीची कमी. जसे तलवारीला जर धार नसेल तर ती तलवारीचे काम करत नाही, असे सेवेच्या साधनांमध्ये जर आठवणीच्या शक्तीची ताकद नसेल तर सफलता नाही म्हणून शक्तिशाली सेवाधारी बना, निर्बलांमध्ये बळ भरून क्वालिटी वाले आत्मे काढा तेव्हा म्हणणार सच्चे सेवाधारी.

बोधवाक्य:-
प्रत्येक परिस्थितीला उडत्या कलेचे साधन समजून कायम उडत रहा.

अव्यक्त इशारे:- अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.

तसे तर अशरीरी होणे सोपे आहे परंतु ज्यावेळी कोणती गोष्ट समोर असेल, कोणती सेवेची अडचण समोर असेल, कोणती अशांतीमध्ये आणणारी परिस्थिती असेल, अशावेळी विचार केला आणि अशरीरी झाले, यासाठी दीर्घ काळाचा अभ्यास हवा. विचार करणे आणि कृती करणे एकत्र सोबतच व्हावे तेव्हा अंतिम पेपर मध्ये पास होऊ शकाल.