05-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला जे काही ज्ञान मिळते, त्यावर विचार सागर मंथन करा. ज्ञानाचे
मंथन केल्यानेच अमृत निघेल”
प्रश्न:-
२१ जन्मांसाठी
मालामाल (गर्भश्रीमंत) बनण्याचे साधन कोणते आहे?
उत्तर:-
ज्ञान रत्ने. जितके तुम्ही या पुरुषोत्तम संगमयुगावर ज्ञान रत्ने धारण करता तितके
जास्त श्रीमंत बनता. आत्ताची ज्ञान रत्ने तिथे (सतयुगामध्ये) हिरे-माणके बनतात.
जेव्हा आत्मा ज्ञान रत्ने धारण करते, मुखातून ज्ञान रत्नेच काढते, रत्नच ऐकते आणि
ऐकवते तेव्हा त्यांच्या हर्षित चेहऱ्याद्वारे बाबांचे नाव प्रसिद्ध होईल. आसुरी गुण
निघून जातील तेव्हाच श्रीमंत बनाल.
ओम शांती।
बाबा मुलांना ज्ञान आणि भक्ती विषयी समजावून सांगत आहेत. हे तर मुले समजतात की
सतयुगामध्ये भक्ती नसते. सतयुगामध्ये ज्ञान देखील मिळत नाही. श्रीकृष्ण ना भक्ती
करत, ना ज्ञानाची मुरली वाजवत. मुरली अर्थात ज्ञान देणे. गायन देखील आहे ना -
‘मुरलीमध्ये जादू आहे’. तर जरूर कोणती जादू असेल ना. फक्त मुरली वाजवणे ही सामान्य
गोष्ट आहे. फकीर लोक देखील मुरली वाजवतात. या (बाबांच्या) मुरलीमध्ये तर ज्ञानाची
जादू आहे. अज्ञानाला जादू म्हणणार नाही. मनुष्य समजतात की श्रीकृष्ण मुरली वाजवत असे;
त्याची खूप महिमा करतात. बाबा म्हणतात - ‘श्रीकृष्ण तर देवता होता. मनुष्यापासून
देवता, देवता पासून मनुष्य हे घडतच राहते’. दैवी सृष्टी सुद्धा असते तर मनुष्य
सृष्टी सुद्धा असते. या ज्ञानाद्वारेच मनुष्यापासून देवता बनतात. जेव्हा सतयुग आहे
तेव्हा हा ज्ञानाचा वारसा आहे. सतयुगामध्ये भक्ती नसते. देवता जेव्हा मनुष्य बनतात
तेव्हा भक्ती सुरु होते. मनुष्यांना विकारी, देवतांना निर्विकारी म्हटले जाते.
देवतांच्या सृष्टीला पवित्र दुनिया म्हटले जाते. आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनत
आहात. देवतांमध्ये मग हे ज्ञान असणार नाही. देवता सद्गतीमध्ये आहेत, ज्ञान पाहिजे
दुर्गती वाल्यांना. या ज्ञानातूनच दैवी गुण येतात. ज्ञानाची धारणा असणाऱ्यांची चलन
(वर्तन) देवताई असते. कमी धारणा असणाऱ्यांचे वर्तन मिक्स असते. आसुरी वर्तन तर
म्हणणार नाही. धारणा नसेल तर माझी मुले कसे म्हणणार. मुले जर बाबांना ओळखत नाहीत तर
बाबा देखील मुलांना कसे ओळखणार. किती वाईट-वाईट शिव्या बाबांना देतात. भगवंताला शिवी
देणे किती वाईट आहे. मग ते जेव्हा ब्राह्मण बनतात तेव्हा शिवी देणे बंद होते. तर या
ज्ञानाचे विचार सागर मंथन केले पाहिजे. विद्यार्थी विचार सागर मंथन करून ज्ञानामध्ये
प्रगती करतात. तुम्हाला हे ज्ञान मिळत आहे, त्यावर आपले विचार सागर मंथन केल्याने
अमृत निघेल. विचार सागर मंथन होत नसेल तर मग कोणते मंथन होणार? आसुरी विचारांचे
मंथन, ज्यातून फक्त कचराच बाहेर पडतो. आता तुम्ही ईश्वरीय स्टुडंट आहात. जाणता
मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण बाबा शिकवत आहेत. देवता तर शिकवणार नाहीत.
देवतांना कधी ज्ञानाचा सागर म्हटले जात नाही. एक बाबाच ज्ञानाचा सागर आहेत. तर
स्वतःला विचारले पाहिजे - माझ्यामध्ये सर्व दैवी गुण आहेत का? जर आसुरी गुण असतील
तर ते काढून टाकले पाहिजेत तेव्हाच देवता बनाल.
आता तुम्ही आहात
पुरुषोत्तम संगमयुगावर. पुरुषोत्तम बनत आहात तर वातावरण देखील खूप चांगले असले
पाहिजे. घाणेरड्या गोष्टी मुखातून काढता कामा नये. नाहीतर म्हटले जाईल खालच्या
दर्जाचा आहे. वातावरणावरून लगेच समजून येते. मुखावाटे दुःख देणारेच बोल बाहेर पडतात.
तुम्हा मुलांना बाबांचे नाव प्रसिद्ध करायचे आहे. चेहरा सदैव हर्षित राहिला पाहिजे.
मुखातून सदैव रत्नेच निघाली पाहिजेत. हे लक्ष्मी-नारायण किती हर्षितमुख आहेत,
यांच्या आत्म्यांनी ज्ञान रत्ने धारण केली होती. मुखावाटे ज्ञान रत्नेच बोलली जात
होती. रत्नच ऐकत होते आणि ऐकवत होते. किती आनंद वाटायला हवा. आता तुम्ही जी ज्ञान
रत्न ग्रहण करता ती मग खरोखरची हिरे-माणके बनतात. ९ रत्नांची माळा काही कोणत्या
हिरे-माणकांची नाहीये, या चैतन्य रत्नांची माळा आहे. मग मनुष्य त्यांना (स्थूल
हिऱ्यांना) रत्न समजून त्याच्या अंगठ्या इत्यादी घालतात. ज्ञान रत्नांची माळा या
पुरुषोत्तम संगमयुगावरच बनते. ही रत्नेच २१ जन्मांसाठी गर्भश्रीमंत बनवितात, ज्याला
कोणीही लुटू शकत नाही. इथे घालाल तर लगेच कोणीतरी लुटेल. तर स्वतःला अतिशय
बुद्धिवान बनवायचे आहे. आसुरी गुणांना काढून टाकायचे आहे. आसुरी गुण असलेल्यांचा
चेहराच असा होऊन जातो. क्रोधामुळे तर तांब्यासारखे लाल होतात. काम विकारवाले तर
काळ्या तोंडाचे बनतात. श्रीकृष्णाला देखील काळे दाखवतात ना. विकारांमुळेच गोऱ्या
पासून काळा बनला. तुम्हा मुलांनी प्रत्येक गोष्टीवर विचार सागर मंथन केले पाहिजे.
हे शिक्षण आहे अथाह धन प्राप्त करण्यासाठी. तुम्ही मुलांनी ऐकलेले आहे, ‘क्वीन
व्हिक्टोरियाचा वजीर आधी खूप गरीब होता. दिव्याच्या प्रकाशा खाली अभ्यास करायचा’.
परंतु ते शिक्षण काही रत्ने थोडीच आहेत. शिक्षण घेऊन चांगले पद प्राप्त करतात.
म्हणजेच शिक्षण कामी आले, पैसा नाही. शिक्षणच धन आहे. ते आहे हदचे धन, हे आहे बेहदचे
धन. आता तुम्ही समजता, बाबा आम्हाला शिकवून विश्वाचा मालक बनवतात. तिथे (सतयुगामध्ये)
काही धन कमावण्याकरिता शिकणार नाहीत. तिथे तर आताच्या पुरुषार्था नुसार अथाह धन
मिळते. धन अविनाशी बनते. देवतांकडे भरपूर धन होते आणि जेव्हा वाम मार्ग, रावण
राज्यामध्ये येतात तेव्हा देखील किती धन होते. कितीतरी मंदिरे बांधली. नंतर मग
मुसलमानांनी ती लुटली. किती श्रीमंत होते. आजकालच्या शिक्षणाने इतके श्रीमंत बनू
शकत नाही. तर या शिक्षणाने बघा मनुष्य काय बनतात! गरिबापासून श्रीमंत. आता भारत पहा
किती गरीब आहे! ज्या काही प्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांना तर फुरसतच नाही.
आपल्या धनाचा, पोझिशनचा किती अहंकार असतो. या शिक्षणामध्ये अहंकार इत्यादी नष्ट झाला
पाहिजे. ‘मी आत्मा आहे, आत्म्याकडे धन-दौलत, हिरे-माणके इत्यादी काहीही नाही’.
बाबा म्हणतात - ‘गोड
मुलांनो, देहासहित देहाचे सर्व संबंध सोडा’. आत्मा शरीर सोडते तेव्हा मग श्रीमंती
इत्यादी सर्व नष्ट होते. मग पुन्हा जेव्हा नव्याने शिकतील, धन कमावतील तेव्हाच
श्रीमंत बनतील किंवा खूप दान-पुण्य केले असेल तर श्रीमंताच्या घरी जन्म घेतील. मग
म्हणतात - ‘हे पूर्व जन्मातील कर्मांचे फळ आहे’. ज्ञानदान केले असेल किंवा कॉलेज,
धर्मशाळा इत्यादी बांधली असेल, तर त्याचे फळ मिळते परंतु अल्पकाळासाठी. हे
दान-पुण्य इत्यादी इथे देखील केले जाते. सतयुगामध्ये केले जात नाही. सतयुगामध्ये
चांगलीच कर्मे होतात कारण आताचा वारसा मिळाला आहे. तिथे कोणतेही कर्म विकर्म बनत
नाही कारण रावणच नाहीये. विकारामध्ये गेल्यानेच विकारी कर्म होतात. विकारामुळे
विकर्म बनतात. स्वर्गामध्ये कोणतेही विकर्म होत नाही. सर्व काही कर्मांवर अवलंबून
आहे. हा माया रावण अवगुणी बनवतो. बाबा येऊन सर्वगुणसंपन्न बनवतात. राम वंशी आणि
रावण वंशींचे युद्ध चालते. तुम्ही रामाची मुले आहात, किती चांगली-चांगली मुले
मायेकडून पराभूत होतात. बाबा नाव सांगत नाहीत, तरीही आशा ठेवतात. अगदी नीच ते नीच
असणाऱ्यांचा उद्धार करावा लागतो. बाबांना संपूर्ण विश्वाचा उद्धार करायचा आहे.
रावणाच्या राज्यामध्ये सर्वांचेच अधःपतन झाले आहे. बाबा तर वाचण्याच्या आणि
वाचविण्याच्या युक्त्या दररोज समजावून सांगत असतात तरीसुद्धा कोसळतात त्यामुळे नीच
ते नीच बनतात. ते मग इतके चढू शकत नाहीत. तो नीचपणा आतल्या आत खात राहील. जसे म्हणता
- ‘अन्तकाल जो…’ त्यांच्या बुद्धीमध्ये ते नीचपणाचेच कृत्य आठवत राहील.
तर बाबा बसून मुलांना
समजावून सांगत आहेत - कल्प-कल्प तुम्हीच हे ऐकता, सृष्टीचे चक्र कसे फिरते, पशू तर
समजून घेणार नाहीत. तुम्हीच ऐकता आणि समजता. मनुष्य तर मनुष्यच आहेत, या
लक्ष्मी-नारायणाला देखील नाक-कान इत्यादी सर्व आहे तरी देखील मनुष्य आहेत ना. परंतु
दैवी गुण आहेत म्हणून त्यांना ‘देवता’ म्हटले जाते. हे असे देवता कसे बनतात आणि
पुन्हा कसे कोसळतात (अधोगती होते), या चक्राविषयी तुम्हालाच माहिती आहे. जे ज्ञानाचे
विचार सागर मंथन करत राहतील, त्यांनाच धारणा होईल. जे विचार सागर मंथन करत नाहीत
त्यांना बुद्धू म्हणणार. मुरली चालवणाऱ्याचे विचार सागर मंथन चालत राहील की, या
टॉपिकवर हे-हे समजावून सांगायचे आहे. आशा केली जाते, आता समजणार नाहीत परंतु पुढे
जाऊन जरूर समजतील. आशा बाळगली जाते अर्थात सेवेची आवड आहे, थकायचे नाही. भले कोणी
प्रगती करुन मग अधम (नीच) बनला आहे, आणि असा जर कोणी आला तर प्रेमाने बसवाल ना की
निघून जा म्हणून सांगाल! चौकशी करायला हवी - ‘इतके दिवस कुठे होता? का आला नाही?’
तर सांगतील ना - मायेकडून हार पत्करली. समजतात सुद्धा ज्ञान खूप चांगले आहे. लक्षात
तर राहते ना. भक्तीमध्ये तर हार-जीत होण्याचा प्रश्नच नाही. हे ज्ञान आहे, हे धारण
करायचे आहे. तुम्ही जोपर्यंत ब्राह्मण बनत नाहीत तोपर्यंत देवता बनू शकत नाही.
ख्रिश्चन, बौद्धी, पारसी इत्यादींमध्ये ब्राह्मण थोडेच असतात? ब्राह्मणाची मुले
ब्राह्मण असतात. या गोष्टी आता तुम्हाला समजत आहेत. तुम्ही जाणता ‘अल्फ’ची (बाबांची)
आठवण करायची आहे. ‘अल्फ’ची आठवण केल्यानेच ‘बे’ बादशाही मिळते. जेव्हा कोणी भेटेल
तर सांगा - ‘अल्फ अल्लाह’ची आठवण करा. ‘अल्फ’लाच श्रेष्ठ म्हटले जाते. बोटाने
‘अल्फ’कडे (बाबांच्या दिशेने) इशारा करतात. ‘अल्फ’चा अर्थ एकदम सरळ आहे. ‘अल्फ’ला
एक देखील म्हटले जाते. ईश्वर एकच आहे, बाकी सर्व आहेत त्यांची मुले. बाबांना ‘अल्फ’
म्हटले जाते. बाबा ज्ञान सुद्धा देतात, आणि आपली मुले देखील बनवतात. तर मग तुम्हा
मुलांनी किती आनंदात राहिले पाहिजे. बाबा आमची किती सेवा करतात, आम्हाला विश्वाचा
मालक बनवतात. आणि मग स्वतः मात्र त्या पवित्र दुनियेमध्ये (सतयुगामध्ये) येत सुद्धा
नाहीत. पावन दुनियेमध्ये त्यांना कोणी बोलावत देखील नाहीत, पतित दुनियेमध्येच
बोलावतात. ते (बाबा) पावन दुनियेमध्ये येऊन काय करणार. त्यांचे नावच आहे पतित-पावन.
तर जुन्या दुनियेला पावन दुनिया बनविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. बाबांचे नावच आहे -
‘शिव’. मुलांना म्हटले जाते - ‘शाळीग्राम’. दोघांचीही पूजा होते. परंतु पूजा
करणाऱ्याला काहीही माहित नाही आहे, बस्स फक्त पूजेचा एक रिवाज बनवून ठेवला आहे.
देवींचे देखील हिऱ्या-मोत्यांचे फर्स्टक्लास महाल इत्यादी बनवतात, पूजा करतात. ते (शिवबाबांचे)
तर मातीचे लिंग बनवले आणि तोडून टाकले. बनवण्यासाठी काही मेहनत घ्यावी लागत नाही.
देवींना बनविण्यासाठी मेहनत करावी लागते, त्यांच्या (शिवबाबांच्या) पूजेसाठी मेहनत
करावी लागत नाही. फुकटात मिळतो. दगड पाण्यामध्ये घासून-घासून गोल बनतो. पूर्ण
अंडाकृती बनवतात. म्हणतात देखील आत्मा अंड्याप्रमाणे आहे, जी ब्रह्म तत्वामध्ये
राहते, म्हणूनच त्याला ‘ब्रह्मांड’ म्हणतात. तुम्ही ब्रह्मांडाचे आणि विश्वाचे
देखील मालक बनता.
तर सर्वप्रथम एका
बाबांविषयी स्पष्ट करून सांगायचे आहे. शिवची, सर्वजण ‘बाबा’ असे म्हणून आठवण करतात.
दुसरे म्हणजे ब्रह्माला देखील ‘बाबा’ म्हणतात. प्रजा-पिता आहेत तर साऱ्या प्रजेचे
पिता झाले ना. ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. हे सर्व ज्ञान आता तुम्हा मुलांनाच आहे.
‘प्रजापिता ब्रह्मा’, असे म्हणतात तर पुष्कळजण परंतु यथार्थ रित्या कोणीही जाणत
नाहीत. ब्रह्मा कोणाचा मुलगा आहे? तुम्ही म्हणाल परमपिता परमात्म्याचा. शिवबाबांनी
यांना दत्तक घेतले आहे तर हे शरीरधारी झाले ना. सर्व आत्मे ईश्वराची मुले आहेत.
परंतु जेव्हा शरीर मिळते तेव्हा प्रजापिता ब्रह्माला दत्तक घेतले असे म्हणतात. तसे
दत्तक नाही. काय सर्व आत्म्यांना परमपिता परमात्म्याने दत्तक घेतले आहे का? नाही,
तुम्हाला दत्तक घेतले आहे. आता तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आहात. शिवबाबा तुम्हाला
दत्तक घेत नाहीत. सर्व आत्मे अनादि अविनाशी आहेत. सर्व आत्म्यांना आपापले स्वतःचे
शरीर, आपापला पार्ट मिळालेला आहे, जो बजावायचाच आहे. तोच पार्ट अनादि अविनाशी असून
परंपरेने चालत येतो. त्याचा आदि अंत सांगू शकत नाही अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपली
श्रीमंती, पोझिशन इत्यादीचा अहंकार नष्ट करायचा आहे. अविनाशी ज्ञान धनाने स्वतःला
श्रीमंत बनवायचे आहे. सेवेमध्ये कधीही थकायचे नाही.
२) वातावरण चांगले
ठेवण्यासाठी मुखातून सदैव रत्नेच काढायची आहेत, दुःख देणारे बोल निघणार नाहीत याची
काळजी घ्यायची आहे. हर्षितमुख रहायचे आहे.
वरदान:-
कोणत्याही
प्रकारच्या वातावरणामध्ये मन-बुद्धीला सेकंदामध्ये एकाग्र करणारे सर्वशक्ती संपन्न
भव
बापदादांनी सर्व
मुलांना सर्व शक्ती वारशामध्ये दिल्या आहेत. आठवणीच्या शक्तीचा अर्थ आहे -
मन-बुद्धीला जिथे लावू इच्छिता तिथे लागेल. कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये
आपल्या मन-बुद्धीला सेकंदामध्ये एकाग्र करा. परिस्थिती प्रतिकूल असो, वातावरण
तमोगुणी असो, माया आपले बनविण्याच्या प्रयत्नात असेल तरी देखील सेकंदामध्ये एकाग्र
व्हा - अशी कंट्रोलिंग पॉवर असेल तेव्हाच म्हणणार सर्वशक्ती संपन्न.
बोधवाक्य:-
विश्वकल्याणाची
जबाबदारी आणि पवित्रतेचा लाईटचा ताज घालणारेच डबल ताजधारी बनतात.