06-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचा एक-एक शब्द गोड फर्स्ट क्लास असला पाहिजे, जसे बाबा दुःखहर्ता,
सुखकर्ता आहेत; तसे बाबांप्रमाणे सर्वांना सुख द्या”
प्रश्न:-
लौकिक
मित्र-नातेवाईकांना ज्ञान देण्याची कोणती युक्ती आहे?
उत्तर:-
कोणतेही मित्र-नातेवाईक इत्यादी जे आहेत तर त्यांच्याशी अतिशय नम्रतेने, प्रेमभावाने
हसतमुखपणे बोलले पाहिजे. समजावून सांगितले पाहिजे हे तेच महाभारत युद्ध आहे. बाबांनी
रूद्र ज्ञान यज्ञ रचला आहे. मी तुम्हाला खरे सांगतो की भक्ती इत्यादी तर
जन्म-जन्मांतर केली, आता ज्ञान सुरू होत आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा खूप युक्तीने
सांगा. कुटुंब-परिवारामध्ये खूप प्रेमाने रहा. कधीही कोणाला दुःख देऊ नका.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज...
ओम शांती।
जेव्हा कोणते गाणे वाजते तेव्हा मुलांनी आपल्या मनामध्ये त्याचा अर्थ काढला पाहिजे.
सेकंदामध्ये निघू शकतो. हे बेहदच्या ड्रामाचे खूप मोठे घड्याळ आहे ना. भक्ती
मार्गामध्ये देखील मनुष्य बोलावतात. जसा कोर्टात खटला चालू असतो तेव्हा विचारतात -
सुनावणी केव्हा होईल, केव्हा बोलावले जाईल जेणेकरून आमचा खटला पूर्ण होईल. तर
मुलांचा देखील खटला आहे, कोणता खटला? रावणाने तुम्हाला खूप दुःखी केले आहे. तुमचा
खटला मोठ्या कोर्टात दाखल होतो. मनुष्य बोलावत राहतात - ‘बाबा या, येऊन आम्हाला
दुःखांपासून सोडवा’. एक दिवस सुनावणी तर जरूर होते. बाबा ऐकतात देखील, ड्रामा
अनुसार येतात देखील अगदी अचूक आपल्या वेळेवर. त्यामध्ये एका सेकंदाचा देखील फरक पडू
शकत नाही. बेहदचे घड्याळ अगदी अचूक चालते. इथे तुमच्याकडची ही छोटी घड्याळेसुद्धा
इतकी अचूक चालत नाहीत. यज्ञाचे प्रत्येक कार्य अचूक व्हायला पाहिजे. घड्याळ देखील
अचूक असले पाहिजे. बाबा तर एकदम ॲक्युरेट आहेत. सुनावणी अगदी अचूक होते. कल्प-कल्प
कल्पाच्या संगमयुगावर अचूक वेळेवर येतात. तर आता मुलांची सुनावणी झाली, बाबा आलेले
आहेत. आता तुम्ही सर्वांना समजावून सांगता. आधी तुम्हाला देखील समजत नव्हते की दुःख
कोण देतो? आता बाबांनी समजावून सांगितले आहे रावण राज्य सुरू होते द्वापर पासून.
तुम्हा मुलांना माहीत झाले आहे - बाबा कल्प-कल्प संगमयुगावर येतात. ही आहे बेहदची
रात्र. शिवबाबा बेहदच्या रात्री येतात, श्रीकृष्णाची गोष्ट नाही, जेव्हा घोर
अंधारामध्ये अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले असतात तेव्हा ज्ञानसूर्य बाबा मुलांना
दिवसामध्ये घेऊन जाण्यासाठी येतात. म्हणतात - माझी आठवण करा, कारण पतिता पासून पावन
बनायचे आहे. बाबाच पतित-पावन आहेत. ते जेव्हा येतील तेव्हाच सुनावणी होईल. आता तुमची
सुनावणी झाली आहे. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे पतितांना पावन बनविण्याकरिता’. पावन
बनण्याचा तुम्हाला किती सोपा उपाय सांगतो. आजकाल बघा सायन्सचा (विज्ञानाचा) किती
जोर आहे. अणुबाँब इत्यादींचा किती जोरात आवाज होतो. तुम्ही मुले सायलेन्सच्या (शांतीच्या)
शक्तीने सायन्सवर विजय प्राप्त करता. सायलेन्सला योग सुद्धा म्हटले जाते. आत्मा
बाबांची आठवण करते - बाबा, तुम्ही आलात की आम्ही शांती धामला जाऊन निवास करू. तर
तुम्ही मुले या योगबलाने, सायलेन्सच्या बळाने सायन्सवर विजय प्राप्त करता. शांतीचे
बळ प्राप्त करता. सायन्सद्वारेच हा सर्व विनाश होणार आहे. सायलेन्स द्वारे तुम्ही
मुले विजय प्राप्त करता. बाहुबळवाले (शारीरिक शक्तीवाले) कधीही विश्वावर विजय मिळवू
शकत नाहीत. हे मुद्दे देखील तुम्ही प्रदर्शनीमध्ये लिहिले पाहिजेत.
दिल्लीमध्ये खूप सेवा
होऊ शकते कारण दिल्ली सर्वांची राजधानी आहे. तुमची देखील राजधानी दिल्लीच असणार.
दिल्लीलाच परिस्तान म्हटले जाते. पांडवांचे किल्ले तर नाहीत. किल्ला तेव्हा बांधला
जातो जेव्हा शत्रू आक्रमण करतो. तुम्हाला तर किल्ला इत्यादीची गरजच नसते. तुम्ही
जाणता आम्ही सायलेन्सच्या शक्तीने आपले राज्य स्थापन करत आहोत, त्यांचा आहे कृत्रिम
सायलेन्स. तुमचा आहे खरा सायलेन्स. ज्ञानाची शक्ती, शांतीची शक्ती म्हटले जाते.
ज्ञान आहे शिक्षण. शिक्षणानेच शक्ती मिळते. पोलिस अधिक्षक बनतात, तर किती ताकद असते.
त्या सर्व आहेत भौतिक गोष्टी दुःख देणाऱ्या. तुमची प्रत्येक गोष्ट रूहानी (आत्मिक)
आहे. तुमच्या तोंडातून जे काही शब्द निघतात तो एक-एक शब्द असा फर्स्ट क्लास गोड
असावा जेणेकरून ऐकणारा आनंदित होईल. जसे बाबा दुःखहर्ता सुखकर्ता आहेत, तसे तुम्हा
मुलांनी देखील सर्वांना सुख द्यायचे आहे. कुटुंब परिवाराला देखील दुःख इत्यादी होऊ
नये. सर्वांसोबत नियमानुसार (रितीनुसार) वागायचे आहे. मोठ्यांशी प्रेमाने वागायचे
आहे. तोंडातून शब्द असे गोड फर्स्ट क्लास निघावे की सर्व खूष होतील. बोला, ‘शिवबाबा
म्हणतात - मनमनाभव. उच्च ते उच्च मी आहे. माझी आठवण केल्यानेच तुमची विकर्मं नष्ट
होतील’. खूप प्रेमाने बोलले पाहिजे. समजा कोणी मोठा भाऊ असेल तर बोला - आजोबा,
शिवबाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. शिवबाबा, ज्यांना रूद्र देखील म्हणतात, तेच
ज्ञान यज्ञ रचतात. ‘श्रीकृष्ण ज्ञान यज्ञ’ म्हटलेले ऐकणार नाहीत. ‘रूद्र ज्ञान यज्ञ’
म्हणतात तर रूद्र शिवबाबांनी हा यज्ञ रचला आहे . राजेपद (राज्य) प्राप्त करण्यासाठी
ज्ञान आणि योग शिकवत आहेत. बाबा म्हणतात - भगवानुवाच मामेकम् (मज एकाची) आठवण करा
कारण आता सर्वांची अंतिम घडी आहे, वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वांना परत जायचे आहे.
मरताना मनुष्याला सांगतात ना ईश्वराची आठवण करा. इथे स्वतः ईश्वर म्हणतात मृत्यू
समोर उभा आहे, याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही. शेवटीच बाबा येऊन म्हणतात की,
मुलांनो माझी आठवण करा तर तुमची सर्व पापे भस्म होतील, याला आठवणीचा अग्नी म्हटले
जाते. बाबा हमी देतात की, यामुळे तुमची पापे भस्म होतील. विकर्म विनाश होण्याचा,
पावन बनण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही. पापांचे ओझे डोक्यावर वाढत-वाढत, अशुद्धता
पडत-पडत सोने ९ कॅरेटचे झाले आहे. ९ कॅरेटनंतर भेसळ म्हटले जाते. आता पुन्हा २४
कॅरेट कसे बनणार, आत्मा शुद्ध कशी बनेल? शुद्ध आत्म्याला शरीर देखील शुद्ध मिळेल.
कोणी मित्र-नातेवाईक
इत्यादी असतील तर त्यांच्याशी अतिशय नम्रतेने, प्रेमभावाने हसतमुखाने बोलले पाहिजे.
समजावून सांगितले पाहिजे - हे तर तेच महाभारत युद्ध आहे. हा रूद्र ज्ञान यज्ञ सुद्धा
आहे. बाबांकडून आम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान मिळत आहे. इतर कुठेही हे
ज्ञान मिळू शकत नाही. मी तुम्हाला सत्य सांगतो ही भक्ती इत्यादी तर जन्म-जन्मांतरीची
आहे, आता ज्ञान सुरू होते. भक्ती आहे रात्र, ज्ञान आहे दिवस. सतयुगामध्ये भक्ती असत
नाही. अशा प्रकारे जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा युक्तीने सांगितले पाहिजे. जसे
जेव्हा बाण मारायचा असतो तेव्हा वेळ आणि संधी बघितली जाते. ज्ञान देण्याची सुद्धा
चांगली युक्ती पाहिजे. बाबा युक्त्या तर सर्वांसाठी सांगत राहतात. पवित्रता तर खूप
चांगली आहे, हे आमचे लक्ष्मी-नारायण खूप पूज्य आहेत ना. पूज्य पावन बनले आणि मग
पुजारी पतित बनले. पावन असलेल्यांची पतित बसून पूजा करतील - हे तर शोभत नाही.
कोणी-कोणी तर पतितांपासून दूर पळतात. वल्लभाचारी कधी पायाला स्पर्श करू देत नाहीत.
समजतात हे घाणेरडे मनुष्य आहेत. मंदिरामध्ये सुद्धा नेहमी ब्राह्मणांनाच मूर्तीला
स्पर्श करण्याची परवानगी असते. शूद्र मनुष्य आत जाऊन स्पर्श करू शकत नाहीत. तिथे
ब्राह्मण लोकच मूर्तींना स्नान इत्यादी घालतात, दुसऱ्या कोणालाही जाऊ देत नाहीत.
फरक तर आहे ना. आता ते तर आहेत कुखवंशावली ब्राह्मण, तुम्ही आहात मुखवंशावली
ब्राह्मण. तुम्ही त्या ब्राह्मणांना व्यवस्थित समजावून सांगू शकता की, ब्राह्मण दोन
प्रकारचे असतात - एक तर आहेत प्रजापिता ब्रह्माची मुखवंशावली, दुसरे आहेत कुखवंशावली.
ब्रह्माची मुखवंशावली ब्राह्मण सर्वश्रेष्ठ शिखा आहेत. यज्ञ रचतात तेव्हा देखील
ब्राह्मणांना नियुक्त केले जाते. हा मग आहे ज्ञान यज्ञ. ब्राह्मणांना ज्ञान मिळते
ज्याद्वारे मग देवता बनतात. वर्ण देखील समजावून सांगितले गेले आहेत. जी सेवाभावी
मुले असतील त्यांना सेवेची सदैव आवड असेल. कुठे प्रदर्शनी असेल तर लगेच सेवेसाठी
पळतील - आपण जाऊन असे-असे पॉइंट्स समजावून सांगावे. प्रदर्शनीमधून तर प्रजा बनण्याचा
विहंग मार्ग आहे, आपण होऊन लोकांचे लोंढेच्या लोंढे येतात. तर समजावून सांगणारे
सुद्धा चांगले असले पाहिजेत. जर कोणी नीट समजावून सांगितले नाही तर म्हणतील बी.
कें. कडे एवढेच ज्ञान आहे. डिस-सर्व्हिस होते. प्रदर्शनीमध्ये कोणीतरी एक असा चपळ
असायला हवा की समजावून सांगणाऱ्या सर्व गाईडकडे लक्ष ठेवेल. कोणी मोठी व्यक्ती
असेल तर त्यांना समजावून सांगणारा देखील असा चांगला हुशार दिला पाहिजे. थोडीशीच
माहिती सांगणाऱ्यांना काढून टाकायला हवे. एक चांगला सुपरवाईज करणारा असला पाहिजे.
तुम्हाला तर महात्म्यांना देखील बोलवायचे आहे. तुम्ही फक्त एवढेच सांगता की, बाबा
असे म्हणतात, ते सर्वश्रेष्ठ भगवान आहेत, तेच रचयिता बाबा आहेत. बाकी सर्व त्यांची
रचना आहे. वारसा बाबांकडून मिळतो, भाऊ भावाला वारसा काय देणार! कोणीही सुखधामचा
वारसा देऊ शकत नाही. वारसा देतातच मुळी बाबा. सर्वांची सद्गती करणारे एक बाबाच आहेत,
त्यांचीच आठवण करायची आहे. बाबा स्वतः येऊन गोल्डन-एज (सुवर्णयुग) बनवतात. ब्रह्मा
तनाद्वारे स्वर्ग स्थापन करतात. शिवजयंती साजरीसुद्धा करतात, परंतु ते शिवबाबा काय
करतात, ते मात्र सर्व मनुष्य विसरले आहेत. शिवबाबाच येऊन राजयोग शिकवून वारसा देतात.
५००० वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता, लाखो वर्षांची तर गोष्टच नाही. तिथी-तारीख
सर्व आहे, याला कोणीही नाकारू शकत नाही. नवीन दुनिया आणि जुनी दुनिया अर्धी-अर्धी
पाहिजे. ते (दुनियावाले) सतयुगाचे आयुर्मान लाखो वर्षे सांगतात तर काहीच हिशोब लागू
शकत नाही. स्वस्तिकामध्ये देखील समान ४ भाग आहेत. १२५० वर्षे प्रत्येक युगामध्ये
विभागली गेली आहेत. हिशोब केला जातो ना. ते लोक तर हिशोब अजिबात जाणत नाहीत म्हणून
कौडी तुल्य म्हटले जाते. आता बाबा हीरे तुल्य बनवतात. सर्व पतित आहेत, भगवंताची
आठवण करतात. भगवान येऊन त्यांना ज्ञानाद्वारे गुल-गुल (सुगंधीत फूल) बनवतात. तुम्हा
मुलांना ज्ञान रत्नांनी सजवत राहतात. आणि मग बघा तुम्ही काय बनता, तुमचे एम
ऑब्जेक्ट काय आहे? भारत किती सिरताज (सर्वश्रेष्ठ) होता, सर्व विसरले आहेत. मुसलमान
इत्यादींनी सुद्धा सोमनाथ मंदिरातून किती लुटून नेऊन आपल्या मशिदी इत्यादीमध्ये हिरे
जडवले आहेत. आता तर त्यांची कोणी किंमत सुद्धा ठरवू शकत नाही. राजांच्या मुकुटामध्ये
किती मोठ-मोठे हिरे जडवलेले असायचे. काही तर करोड रूपयांचे, काही ५ करोडचे. आजकाल
तर सर्व नकली निघाले आहे. या दुनियेमध्ये सर्व आहे कृत्रिम सुख. बाकी आहे दुःख
म्हणून संन्यासी देखील म्हणतात - सुख काग-विष्ठेसमान आहे त्यामुळे घर-दार सोडून
जातात परंतु आता तर ते सुद्धा तमोप्रधान बनले आहेत. शहरांमध्ये घुसून बसले आहेत.
परंतु आता कोणाला सांगणार, आता राजा-राणी तर नाही आहेत. कोणीही ऐकणार नाही. म्हणतील
सर्वांचे आपले-आपले मत आहे, ज्याला जे पाहिजे ते करेल. संकल्पाची सृष्टी आहे. आता
तुम्हा मुलांकडून बाबा गुप्त रितीने पुरुषार्थ करवून घेत राहतात. तुम्ही किती सुख
भोगता. अखेरीला जेव्हा इतर धर्मांची सुद्धा वृद्धी होते तेव्हा युद्ध इत्यादी कलह
सुरु होतात. पाऊण काळ तर सुखात राहता म्हणून बाबा म्हणतात तुमचा देवी-देवता धर्म
खूप सुख देणारा आहे. मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. बाकीचे धर्मस्थापक काही कोणते
राज्य स्थापन करत नाहीत. ते सद्गती करत नाहीत, फक्त आपला धर्म स्थापन करण्याकरिता
येतात. ते देखील जेव्हा शेवटी तमोप्रधान बनतात तेव्हा मग सतोप्रधान बनविण्यासाठी
बाबांना यावे लागते.
तुमच्याकडे शेकडो
मनुष्य येत असतात परंतु काहीही समजत नाहीत. बाबांना लिहितात अमक्याला खूप चांगले
समजत आहे, खूप चांगला आहे. बाबा म्हणतात - काहीही समजलेले नाहीये. जर समजले असेल
बाबा आलेले आहेत, विश्वाचा मालक बनवत आहेत, तर बस्स त्याच क्षणी नशा चढेल. लगेच
तिकीट काढून धावत येईल. परंतु बाबांना भेटण्यासाठी ब्राह्मणीची चिट्ठी तर जरूर आणावी
लागेल. बाबांना ओळखले तर भेटल्याशिवाय राहू शकणार नाहीत, एकदम नशा चढेल. ज्यांना नशा
चढलेला असेल त्यांना आतमध्ये खूप आनंद होईल. त्यांची बुद्धी मित्र-नातेवाईकांमध्ये
भटकणार नाही. परंतु अनेकांची भटकत राहते. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान
पवित्र बनायचे आहे आणि बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. आहे खूप सोपे. जितके होऊ
शकते बाबांची आठवण करत रहा. जसे ऑफिस मधून सुट्टी घेता, तसे धंद्यामधून सुट्टी घेऊन
एक-दोन दिवस आठवणीच्या यात्रेमध्ये बसा. सतत आठवणीमध्ये बसण्यासाठी ठीक आहे बाबांची
आठवण करण्याचे संपूर्ण दिवस व्रत घेतो. किती जमा होईल. विकर्म देखील विनाश होतील.
बाबांच्या आठवणीनेच सतोप्रधान बनायचे आहे. संपूर्ण दिवस पूर्ण योग तर कोणाचा लागणार
सुद्धा नाही. माया जरूर विघ्न आणते तरीही पुरुषार्थ करत-करत विजय प्राप्त कराल.
बस्स, आजचा संपूर्ण दिवस बागेमध्ये बसून बाबांची आठवण करतो. जेवताना सुद्धा बस्स
आठवणीमध्ये बसतो. ही आहे मेहनत. आम्हाला पावन जरूर बनायचे आहे. मेहनत करायची आहे,
इतरांना देखील मार्ग सांगायचा आहे. बॅज तर खूप चांगली वस्तू आहे. रस्त्यामध्ये
आपसात चर्चा करत रहाल तरी भरपूर येऊन ऐकतील. बाबा म्हणतात माझी आठवण करा, बस्स,
मेसेज मिळाला मग आम्ही जबाबदारीतून सुटलो. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) धंदा
इत्यादी मधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आठवणीमध्ये राहण्याचे व्रत घ्यायचे आहे.
मायेवर विजय प्राप्त करण्यासाठी आठवण करण्याची मेहनत करायची आहे.
२) अतिशय नम्रतेने आणि
प्रेमभावाने हसतमुख राहून मित्र-नातेवाईकांची सेवा करायची आहे. त्यांच्यामध्ये
बुद्धीला भरकटू द्यायचे नाही. प्रेमाने बाबांचा परिचय द्यायचा आहे.
वरदान:-
चालता-फिरता
फरिश्ता स्वरूपाचा साक्षात्कार घडविणारे साक्षात्कार मूर्त भव
जसे सुरुवातीला
चालता-फिरता ब्रह्मा अदृश्य होऊन श्रीकृष्ण दिसत असे, याच साक्षात्काराने सर्व काही
सोडवले. अशी साक्षात्काराद्वारे आता देखील सेवा व्हावी. जेव्हा साक्षात्काराने
प्राप्ती होईल तर बनल्याशिवाय राहू शकणार नाहीत म्हणून चालता-फिरता फरिश्ता
स्वरूपाचा साक्षात्कार घडवा. भाषण करणारे पुष्कळ आहेत परंतु तुम्ही भासना देणारे (अनुभूती
करविणारे) बना - तेव्हा समजतील हे अल्लाह लोक आहेत.
बोधवाक्य:-
सदैव रुहानी (आत्मिक)
सुखाचा अनुभव करत रहा तर कधीही गोंधळून जाणार नाही.
आपल्या शक्तीशाली मनसा
द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
आता आपल्या मनातील
शुभ भावना इतर आत्म्यांपर्यंत पोहोचवा. सायलेन्सच्या शक्तीला प्रत्यक्ष करा.
प्रत्येक ब्राह्मण मुलामध्ये ही सायलेन्सची शक्ती आहे. फक्त या शक्तीला मनाने, तनाने
इमर्ज करा. एका सेकंदामध्ये मनाच्या संकल्पांना एकाग्र करा तर वायुमंडळामध्ये
सायलेन्सच्या शक्तीची प्रकंपने आपोआप पसरत राहतील.