06-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - ब्रह्माबाबा शिवबाबांचा रथ आहे, दोघांचा पार्ट एकत्रित चालतो, यामध्ये
जरा देखील संशय येता कामा नये”
प्रश्न:-
मनुष्य
दुःखातून सुटण्यासाठी कोणती युक्ती करतात, ज्याला महापाप म्हटले जाते?
उत्तर:-
मनुष्य जेव्हा दुःखी होतात तर स्वतःला संपविण्याचे अनेक उपाय काढतात. जीव-घात (आत्महत्या)
करण्याचा विचार करतात, समजतात असे केल्याने आपली दुःखातून सुटका होईल. परंतु यासारखे
महापाप दुसरे कोणतेच नाही. ते अजूनच जास्त दुःखामध्ये अडकतात कारण ही आहेच अपार
दुःखाची दुनिया.
ओम शांती।
मुलांना बाबा विचारत आहेत, आत्म्यांना परमात्मा विचारत आहेत - हे तर तुम्ही जाणता
की, आपण परमपिता परमात्मा यांच्या समोर बसलो आहोत. त्यांना आपला रथ (स्वतःचे शरीर)
तर नाही आहे. हा तर निश्चय आहे ना - या भृकुटीच्या मध्यभागी बाबांचे निवासस्थान आहे.
बाबा स्वतः म्हणतात - मी यांच्या (ब्रह्माबाबांच्या) भृकुटीच्या मध्यभागी बसतो,
यांचे शरीर लोनवर घेतो. आत्मा भृकुटीच्या मध्यभागी आहे तर बाबा देखील तिथेच बसतात.
ब्रह्मा आहेत तर शिवबाबा देखील आहेत. ब्रह्मा नसेल तर शिवबाबा बोलतील कसे?
शिवबाबांना तर नेहमी वरच आठवण करत आले आहेत. आता तुम्हा मुलांना माहित आहे आपण
बाबांजवळ इथे बसलो आहोत. असे नाही की शिवबाबा वरती आहेत, त्यांची प्रतिमा इथे पुजली
जाते. या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत. तुम्ही तर जाणता बाबा ज्ञानाचा सागर
आहेत. ज्ञान कुठून ऐकवत आहेत? वरून ऐकवतात का? इथे खाली आले आहेत. ब्रह्मा तनाद्वारे
ऐकवतात. बरेच जण म्हणतात आम्ही ब्रह्माला मानत नाही. परंतु स्वतः शिवबाबा ब्रह्मा
तनाद्वारे सांगतात की, ‘माझी आठवण करा’. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. परंतु
माया खूप शक्तिशाली आहे. एकदम तोंड फिरवून मागे फेकते. आता तुमची मान शिवबाबांनी
समोर केली आहे. सन्मुख बसले आहात आणि मग जे असे समजतात की, ब्रह्मा तर काहीच नाहीत,
त्यांची काय गती होईल! दुर्गतीला प्राप्त होतात. अजिबात ज्ञान नाहीये. मनुष्य
बोलावतात देखील - ‘ओ गॉड फादर’. मग ते गॉडफादर ऐकतात का? त्यांना म्हणतात ना
‘लिबरेटर या’, की तिथेच बसून लिबरेट करतील? कल्प-कल्प पुरुषोत्तम संगमयुगावरच बाबा
येतात, ज्यांच्यामध्ये येतात त्यांनाच जर वजा केले तर काय म्हणावे! नंबरवन
तमोप्रधान. निश्चय असताना देखील माया एकदम तोंड फिरवते. इतकी तिच्यामध्ये ताकद आहे
जी एकदम वर्थ नॉट ए पेनी बनवते. असे देखील कोणत्या ना कोणत्या सेंटरवर आहेत म्हणून
बाबा म्हणतात सावध राहायचे आहे. भले कोणाला ऐकलेल्या गोष्टी ऐकवत देखील राहतील,
परंतु ते जणू पंडिता सारखे बनतात. जशी बाबा पंडिताची कहाणी सांगतात ना. त्यांनी
सांगितले राम-राम म्हटल्याने नदी पार व्हाल. ही देखील एक कथा बनवलेली आहे. यावेळी
तुम्ही बाबांच्या आठवणीद्वारे विषय सागरातून क्षीरसागरामध्ये जाता ना. त्यांनी
भक्तिमार्गामध्ये अनेक कथा तयार केल्या आहेत. अशा गोष्टी तर घडतच नाहीत. ही एक कथा
बनवलेली आहे. पंडित इतरांना सांगत असे, स्वतः मात्र एकदम घाट्याच्या खात्यामध्ये
होता. स्वतः विकारामध्ये जात राहणे आणि दुसऱ्यांना सांगायचे की, निर्विकारी बना, तर
त्याचा काय प्रभाव पडेल. असे देखील ब्रह्माकुमार-कुमारी आहेत - स्वतःलाच निश्चय नाही,
इतरांना ऐकवत राहतात त्यामुळे काही ठिकाणी सांगणाऱ्या पेक्षाही ऐकणारे वेगाने पुढे
निघून जातात. जे अनेकांची सेवा करतात ते जरूर प्रिय वाटतात ना. पंडित खोटा निघाला
तर त्याच्यावर कोण प्रेम करेल! मग प्रेम त्यांच्यावर करतील जे प्रॅक्टिकलमध्ये आठवण
करतात. चांगल्या-चांगल्या महारथींना देखील माया गिळून टाकते. अनेकांना गिळंकृत केले
गेले. बाबा देखील सांगत आहेत - अजून कर्मातीत अवस्था झालेली नाही. एकीकडे युद्ध चालू
असेल, दुसरी कडे कर्मातीत अवस्था होईल. पूर्ण कनेक्शन आहे. जेव्हा युद्ध पूर्ण होईल
तेव्हा ट्रान्सफर होतील. पहिली रुद्र माळा बनते. या गोष्टी इतर कोणीही जाणत नाहीत.
तुम्ही समजता विनाश समोर उभा आहे. आता तुम्ही फार थोडे आहात, ते आहेत मेजॉरिटी (बहुसंख्य).
तर तुमचे कोण मानेल. जेव्हा तुमची वृद्धी होईल तेव्हा तुमच्या योगबळाने भरपूर जण
आकर्षित होऊन येतील. जितकी तुमच्यातील गंज निघत जाईल, तितकी ताकद भरत जाईल. असे नाही
बाबा जानी-जाननहार आहेत. इथे येऊन सर्वांना पाहतात, सर्वांच्या अवस्थेला जाणतात.
बाबा मुलांच्या अवस्थेला जाणणार नाहीत काय? सर्व काही समजून येते. यामध्ये अंतर्यामी
असण्याचा काही प्रश्नच नाही. अजून तरी कर्मातीत अवस्था झालेली नाहीये. आसुरी बोलणे,
वागणे इत्यादी सर्व प्रसिद्ध होते. तुम्हाला तर दैवी वर्तन बनवायचे आहे. देवता
सर्वगुण संपन्न आहेत ना. आता तुम्हाला असे बनायचे आहे. कुठे ते असुर, कुठे देवता!
परंतु माया कोणालाही सोडत नाही, छुई-मुई (नाजूक) बनवते. एकदम मारून टाकते. ५ शिड्या
(विकार) आहेत ना. देह-अभिमान आल्यानेच वरून एकदम खाली कोसळतात (अधोगती होते). पडला
आणि मेला. आजकाल स्वतःला संपविण्यासाठी काय-काय पद्धतींचा अवलंब करतात. २१ व्या
मजल्यावरून खाली उडी मारतात, जेणेकरून ताबडतोब मरण यावे. असे होऊ नये पुन्हा
हॉस्पिटलमध्ये पडून राहिले, दुःख भोगत राहिले. पाचव्या मजल्या वरून पडले आणि जर मेले
नाहीत तर किती दुःख भोगत राहतील. कोणी तर स्वतःला जाळून घेतात. जर कोणी त्याला
वाचवले तर त्याला किती दुःख सहन करावे लागते. शरीर जळले तर आत्मा तर पळूनच जाईल ना!
म्हणून जीव-घात (आत्महत्या) करतात, शरीराला नष्ट करतात. समजतात शरीर सोडल्याने
दुःखातून सुटका होईल. परंतु हे देखील महापाप आहे, अजूनच जास्त दुःख भोगावी लागतात
कारण ही आहेच अपार दुःखाची दुनिया, तिथे आहे अपार सुख. तुम्ही मुले समजता की, आता
आपण परतून घरी जात आहोत, दुःख-धामातून सुख-धाममध्ये जातो. आता बाबा जे आपल्याला
सुखधामचा मालक बनवत आहेत त्यांची आठवण करायची आहे. यांच्या द्वारे (ब्रह्मा
बाबांद्वारे) बाबा समजावून सांगतात, चित्र देखील आहेत ना. ब्रह्मा द्वारा स्वर्गाची
स्थापना. तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्ही अनेकदा तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा
घेण्यासाठी आलो आहोत’. बाबा देखील संगमावरच येतात जेव्हा की दुनियेला परिवर्तित
व्हायचे आहे. तर बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हा मुलांना दुःखातून सोडवून सुखी
पावन दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरिता. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन…’ असे थोडेच
समजतात की आम्ही महाकाळाला बोलवत आहोत की आम्हाला या छी-छी (विकारी) दुनियेमधून घरी
घेऊन जा. बाबा जरूर येतील. आपण मेल्यावरच शांती होईल ना. शांती-शांती करत राहतात.
शांती तर आहे परमधाममध्ये. परंतु या दुनियेमध्ये शांती कशी असेल - जोपर्यंत इतकी
प्रचंड लोकसंख्या आहे! सतयुगामध्ये सुख-शांती होती. आता कलियुगामध्ये अनेक धर्म
आहेत.
ते जेव्हा नष्ट होतील
जेव्हा एका धर्माची स्थापना होईल, तेव्हाच तर सुख-शांती असेल ना! हाहाकारानंतरच मग
जय-जयकार होईल. पुढे चालून पहा मृत्यूचा बाजार किती गरम होईल! विनाश तर जरूर होणार
आहे. एका धर्माची स्थापना बाबाच येऊन करतात. राजयोग देखील शिकवतात. इतर अनेक धर्म
सर्व नष्ट होतील. गीतेमध्ये काहीच दाखवलेले नाहीये. ५ पांडव आणि कुत्रा हिमालयावर
वितळून गेले. मग निष्पन्न काय झाले? प्रलय दाखवला आहे. जलमई भले होते परंतु सगळीच
दुनिया जलमई होऊ शकत नाही. भारत तर अविनाशी पवित्र खंड आहे. त्यामध्ये देखील आबू
सर्वात पवित्र तीर्थस्थान आहे, जिथे बाबा येऊन तुम्हा मुलांद्वारे सर्वांची सद्गती
करतात. दिलवाडा मंदिरामध्ये किती सुंदर यादगार आहे. किती अर्थसहित आहे. परंतु
ज्यांनी बनवले आहे तेच यामागील सत्य जाणत नाहीत. तरी देखील चांगले बुद्धिमान तर होते
ना. द्वापरमध्ये जरूर खूप हुशार असतील. कलियुगामध्ये असतात तमोप्रधान. द्वापरमध्ये
देखील तुम्ही तमो-बुद्धी असणार. सगळ्या मंदिरांपेक्षा हे श्रेष्ठ आहे, जिथे तुम्ही
बसले आहात.
आता तुम्ही बघत रहाल
विनाशामध्ये होलसेल मृत्यू होतील. होलसेल महाभारी लढाई लागेल. सर्वजण नष्ट होतील.
फक्त एकच खंड शिल्लक राहील. भारत खूप छोटा खंड असेल, बाकी सर्वजण नष्ट होतील.
स्वर्ग किती छोटासा असेल. आता हे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. कोणालाही समजावून
सांगण्यासाठी देखील वेळ लागतो. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. इथे किती असंख्य मनुष्य
आहेत आणि तिथे किती थोडे मनुष्य असतील, हे सर्व नष्ट होतील. जगाचा इतिहास-भूगोल
जरूर सुरुवातीपासून रिपीट होईल. जरूर स्वर्गापासून रिपीट करणार. उलटे मागे तर येणार
नाही. हे ड्रामाचे चक्र अनादि आहे, जे फिरतच राहते. या बाजूला आहे कलियुग, त्या
बाजूला आहे सतयुग. आपण संगमावर आहोत. हे देखील तुम्हीच समजता. बाबा येतात तर बाबांना
जरूर रथ तर पाहिजे ना. तर बाबा समजावून सांगत आहेत, आता तुम्ही परत घरी जात आहात.
आणि मग हे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे, तर दैवी गुण देखील धारण करायचे आहेत.
हे देखील तुम्हा
मुलांना समजावून सांगितले जाते की, राम राज्य आणि रावण राज्य कशाला म्हटले जाते.
पतितापासून पावन, आणि मग पावन पासून पतित कसे बनतात! हे खेळाचे रहस्य बाबा बसून
सांगत आहेत. बाबा नॉलेजफुल, बीजरूप आहेत ना! चैतन्य आहेत. तेच येऊन समजावून सांगतात.
असे फक्त बाबाच म्हणतील - साऱ्या कल्पवृक्षाचे रहस्य समजले का? यामध्ये काय-काय होते?
तुम्ही यामध्ये किती पार्ट बजावला आहे? अर्धा कल्प आहे दैवी स्वराज्य. अर्धा कल्प
आहे आसुरी राज्य. चांगली-चांगली मुले जी आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये नॉलेज राहते.
बाबा आम्हाला आप समान बनवत आहेत ना! टीचर्समध्ये देखील नंबरवार असतात. बरेचजण तर
टीचर असूनही बिघडतात (पतित बनतात). अनेकांना शिकवून मग स्वतः नष्ट होतात. लहान
मुलांमध्ये भिन्न-भिन्न संस्कारवाले असतातच. कोणी तर पहा नंबरवार सैतान, कोणी तर
परिस्तानमध्ये जाण्यालायक. असे कितीतरी आहेत जे ना ज्ञान धारण करत, ना आपले वर्तन
सुधारत, सर्वांना दुःखच देत राहतात. हे देखील शास्त्रांमध्ये दाखवले आहे की असूर
येऊन लपून बसत होते. असूर बनून किती त्रास देतात. हे सर्व होत राहते. उच्च ते उच्च
बाबांनाच स्वर्गाची स्थापना करण्याकरिता यावे लागते. माया देखील खूप शक्तिशाली आहे.
दान देतात तरी देखील माया बुद्धी फिरवते. अर्धवट असणाऱ्याला जरूर माया खाईल,
तेव्हाच तर म्हणतात - माया खूप दुष्ट आहे. अर्धाकल्प माया राज्य करते तर जरूर इतकी
पैलवान असेल ना. मायेकडून हरणाऱ्याची काय हालत होते! अच्छा.
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कधीही
छुई-मुई (नाजूक) बनायचे नाही. दैवी गुण धारण करून आपले वर्तन सुधारायचे आहे.
२) बाबांचे प्रेम
प्राप्त करण्यासाठी सेवा करायची आहे, परंतु जे इतरांना ऐकवता, ते स्वतः देखील धारण
करायचे आहे. कर्मातीत अवस्थेमध्ये जाण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
साकार
रूपामध्ये बापदादांना सन्मुख अनुभव करणारे कंबाइंड रूपधारी भव
जशा शिवशक्ती कंबाइंड
आहेत, तसेच पांडवपती आणि पांडव कंबाइंड आहेत. जे असे कंबाइंड रुपामध्ये राहतात
त्यांच्यासमोर बापदादा साकारमध्ये सर्व नात्यांनी उपस्थित असतात. आता दिवसेंदिवस
जास्तच अनुभव कराल की जसे बापदादा समोर आले, हात पकडला, बुद्धीने नाही डोळ्यांनी
पहाल, अनुभव होईल. परंतु फक्त ‘एक बाप दुसरा न कोई’, हा पाठ पक्का असावा मग तर जशी
सावली फिरते ना, तसे बापदादा डोळ्यांसमोरून हटणार नाहीत, सदैव सन्मुख असल्याची
अनुभूती होईल.
बोधवाक्य:-
मायाजीत,
प्रकृतीजीत बनणारी श्रेष्ठ आत्माच स्व-कल्याणी अथवा विश्व कल्याणी आहे.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
जेव्हा तुम्ही
जीवनमुक्त बनाल तेव्हाच तुमच्या जीवनमुक्त स्थितीचा प्रभाव जीवनबंधमध्ये असणाऱ्या
आत्म्यांचे बंधन नष्ट करेल. तर ती डेट कधी असेल जेव्हा सर्वजण जीवनमुक्त व्हाल?
कोणतेही बंधन नाही. सर्व बंधनांमध्ये एक पहिले बंधन आहे - देह भानाचे बंधन,
त्यापासून मुक्त बना. देहच नसेल तर बाकीची बंधने स्वतःच नष्ट होतील.