06-02-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - जुन्या दुनियेच्या काट्यांना नवीन दुनियेचे फूल बनविणे - हे तुम्हा हुशार
माळ्यांचे काम आहे”
प्रश्न:-
संगमयुगावर
तुम्ही मुले कोणते श्रेष्ठ भाग्य बनवता?
उत्तर:-
काट्यापासून सुगंधित फूल बनणे - हे आहे सर्वात श्रेष्ठ भाग्य. जर एखादा जरी कोणता
विकार असेल तर काटा आहे. जेव्हा काट्या पासून फूल बनाल तेव्हा सतोप्रधान देवी-देवता
बनाल. तुम्ही मुले आता २१ पिढीसाठी आपले सूर्यवंशी भाग्य बनविण्यासाठी आला आहात.
गीत:-
तकदीर जगाकर
आई हूँ…
ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. हे तर कॉमन गीत आहे कारण तुम्ही आहात माळी, बाबा आहेत बागवान.
आता माळ्यांना काट्यां पासून फूल बनवायचे आहे. हा शब्द खूप क्लियर आहे. भक्त आले
आहेत भगवंताकडे, या सर्व भक्तीणी आहेत ना. आता ज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी बाबांकडे
आले आहेत. या राजयोगाच्या शिक्षणाद्वारेच नवीन दुनियेचे मालक बनता. तर भक्तीणी
म्हणतात - आम्ही भाग्य बनवून आलो आहोत, हृदयामध्ये नवीन दुनिया सजवून आलो आहोत. बाबा
देखील रोज सांगतात की, स्वीट होम आणि स्वीट राजाईची आठवण करा. आत्म्याने आठवण करायची
आहे. प्रत्येक सेंटरवर काट्या पासून फूल बनत आहेत. फुलांमध्ये देखील नंबरवार असतात
ना. शिवावर फूल वाहतात, कोणी कसले फूल वाहतात, कोणी कसले. गुलाबाचे फूल आणि
धोत्र्याचे फूल यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. हा देखील बगीचा आहे. कोणी मोगऱ्याचे
फूल आहेत, कोणी चंपाचे, कोणी रतनज्योत आहेत. कोणी रुईचे फूल देखील आहेत. मुले
जाणतात यावेळी सर्व आहेत काटे. ही दुनियाच काट्यांचे जंगल आहे, याला नवीन दुनियेचे
फूल बनवायचे आहे. या जुन्या दुनियेमध्ये आहेत काटे, तर गाण्यामध्ये देखील म्हणतात -
आम्ही बाबांकडे आलो आहोत जुन्या दुनियेतील काट्या पासून नवीन दुनियेचे फूल
बनण्यासाठी. जी नवीन दुनिया बाबा स्थापन करत आहेत. काट्या पासून फूल अर्थात
देवी-देवता बनायचे आहे. गाण्याचा अर्थ किती सोपा आहे. आपण आलो आहोत नवीन दुनियेचे
भाग्य जागे करण्यासाठी. नवीन दुनिया सतयुग. कोणाचे सतोप्रधान भाग्य आहे, कोणाचे रजो,
तमो आहे. कोणी सूर्यवंशी राजा बनतात, कोणी प्रजा बनतात, कोणी प्रजेचे देखील
नोकर-चाकर बनतात. ही नवीन दुनियेची राजाई स्थापन होत आहे. शाळेमध्ये भाग्य जागे
करण्यासाठी जातात ना. इथे तर आहे नवीन दुनियेची गोष्ट. या जुन्या दुनियेमध्ये काय
भाग्य बनवणार! तुम्ही भविष्य नवीन दुनियेमध्ये देवता बनण्याचे भाग्य बनवत आहात, ज्या
देवतांना सर्वजण नमन करत आले आहेत. आपणही सो देवता पूज्य होतो मग आपणच पुजारी बनलो
आहोत. २१ जन्मांचा वारसा बाबांकडून मिळतो, ज्याला २१ पिढी म्हटले जाते.
वृद्धावस्थेपर्यंत पिढी म्हटले जाते. बाबा २१ पिढीचा वारसा देतात कारण युवा
अवस्थेमध्ये किंवा बाल्यावस्थेमध्ये, मध्येच अचानक कधी मृत्यू होत नाही म्हणून
त्याला म्हटले जाते - अमरलोक . हा आहे मृत्यूलोक, रावण राज्य. इथे प्रत्येकामध्ये
विकारांची प्रवेशता आहे, ज्याच्यामध्ये कोणता एक जरी विकार असेल तर काटा झाला ना.
बाबा समजतील माळी रॉयल सुगंधित फूल बनविणे जाणत नाही. माळी चांगला असेल तर
चांगली-चांगली फुले तयार करेल. विजयी माळेमध्ये ओवण्यालायक फूल पाहिजे. देवतांकडे
चांगली-चांगली फुले घेऊन जातात ना. समजा क्वीन एलिझाबेथ येते तर एकदम फर्स्ट क्लास
फूलांची माळा बनवून घेऊन जातील. इथले मनुष्य तर आहेत तमोप्रधान. शिवाच्या मंदिरात
सुद्धा जातात, समजतात हे भगवान आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकराला तर देवता म्हणतात.
शिवाला भगवान म्हटले तर ते सर्वात श्रेष्ठ झाले ना. आता शिवासाठी म्हणतात धोत्रा
खात होते, भांग पीत होते; किती ग्लानी करतात. फूल देखील धोत्र्याचे घेऊन जातात. आता
असे परमपिता परमात्मा त्यांच्यासाठी काय घेऊन जातात! तमोप्रधान काट्यांसाठी तर
फर्स्ट क्लास फूल घेऊन जातात आणि शिवाच्या मंदिरामध्ये काय घेऊन जातात! दूध देखील
कसे वाहतात. ५ टक्के दूध बाकी ९५ टक्के पाणी. भगवंताला दूध कसे वाहिले पाहिजे -
जाणत तर काहीच नाहीत. आता तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. तुमच्यामध्ये देखील
नंबरवार आहेत, ज्यांना चांगले समजते त्यांना सेंटरचे हेड बनवले जाते. सर्वच काही
एकसारखे नसतात. भले शिक्षण एकच आहे, मनुष्या पासून देवता बनण्याचेच एम ऑब्जेक्ट आहे
परंतु टीचर तर नंबरवार आहेत ना. विजयी माळेमध्ये येण्याचा मुख्य आधार आहे अभ्यास.
शिक्षण तर एकच असते, त्यामध्ये पास तर नंबरवार होतात ना. सर्व काही अभ्यास करण्यावर
अवलंबून आहे. कोणी तर विजयी माळेमध्ये ८ मण्यांमध्ये येतात, कोणी १०८ मध्ये, कोणी
१६१०८ मध्ये वंशावळी बनवतात ना. ज्याप्रमाणे झाडाची देखील वंशावळी तयार होते, पहिले
एक पान, दोन पाने मग वाढत जातात. हे देखील झाड आहे. कुळ असते ना. जसे कृपलानी कुळ
इत्यादी-इत्यादींचे कुळ. हे आहे बेहदचे कुळ. या कुळातील सर्वात पहिले कोण आहेत?
प्रजापिता ब्रह्मा. त्यांना म्हणणार ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. परंतु हे कोणालाच
माहित नाहीये. मनुष्य-मात्र जरा सुद्धा जाणत नाहीत की सृष्टीचे रचयिता कोण आहेत?
एकदम अहिल्ये सारखे पत्थर-बुद्धी आहेत. आणि जेव्हा असे पत्थर-बुद्धी बनतात तेव्हाच
बाबा येतात.
तुम्ही इथे आले आहात
अहिल्या-बुद्धी पासून पारस-बुद्धी बनण्यासाठी. तर नॉलेज देखील धारण केले पाहिजे ना.
बाबांना ओळखायला हवे आणि अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. समजा, आज आला आहात, उद्या
अचानक शरीर सुटले तर मग काय पद प्राप्त करू शकाल. नॉलेज तर काहीच घेतले नाही, काहीच
शिकला नाहीत तर काय प्राप्त कराल! दिवसें-दिवस जे उशिराने शरीर सोडतात, त्यांना थोडा
तरी वेळ मिळतो कारण वेळ तर कमी होत जातो, त्यामध्ये जन्म घेऊन काय करू शकणार. हो,
तुमच्या पैकी जे जातील ते मग कोणत्या चांगल्या घरामध्ये जन्म घेतील. संस्कार घेऊन
जातात तर ती आत्मा लगेच जागी होईल, शिवबाबांची आठवण करू लागेल. संस्कारच जर रुजलेले
नसतील तर काहीच होणार नाही. याला खूप बारकाईने समजून घेतले पाहिजे. माळी
चांगल्या-चांगल्या फूलांना घेऊन येतात तर त्यांची महिमा देखील गायली जाते, फूल
बनविणे तर माळ्याचे काम आहे ना. अशी बरीच मुले आहेत, ज्यांना बाबांची आठवण सुद्धा
करता येत नाही. भाग्याच्या बाहेर आहे ना. भाग्यामध्येच नसेल तर काहीच समजणार नाहीत.
भाग्यवान मुले तर बाबांना खऱ्या अर्थाने ओळखून त्यांची चांगल्या रीतीने आठवण करतील.
बाबांसोबतच नवीन दुनियेची देखील आठवण करत राहतील. गाण्यामध्ये देखील म्हणतात ना -
आम्ही नवीन दुनियेसाठी नवीन भाग्य बनविण्यासाठी आलो आहोत. २१ जन्मांकरिता बाबांकडून
राज्य-भाग्य घ्यायचे आहे. या नशेमध्ये आणि आनंदामध्ये रहाल तर अशा गाण्याचा अर्थ
इशाऱ्याने समजून जाल. स्कूलमध्ये देखील कोणाच्या भाग्यात नसते तर नापास होतात. ही
तर खूप मोठी परीक्षा आहे. स्वयं भगवान बसून शिकवतात. हे नॉलेज सर्व धर्मवाल्यांकरिता
आहे. बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. तुम्ही जाणता
कोणत्याही देहधारी मनुष्याला भगवान म्हणता येणार नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकराला
देखील भगवान म्हणता येणार नाही. ते देखील सूक्ष्म वतनवासी देवता आहेत. इथे आहेत
मनुष्य. इथे देवता नाहीत. हा आहे मनुष्य लोक. हे लक्ष्मी-नारायण इत्यादी दैवी
गुणवाले मनुष्य आहेत, ज्याला देवी-देवता धर्म म्हटले जाते. सतयुगामध्ये सर्व
देवी-देवता आहेत, सूक्ष्मवतनमध्ये आहेतच ब्रह्मा, विष्णू, शंकर. गातात देखील ब्रह्मा
देवताए नमः, विष्णु देवताए नमः… मग म्हणतील शिव परमात्माए नमः. शिवाला देवता म्हणता
येणार नाही. आणि मनुष्याला मग भगवान म्हणू शकत नाही. तीन फ्लोर आहेत ना. आपण आहोत
थर्ड फ्लोर वर. सतयुगातील जे दैवी गुणवाले मनुष्य आहेत तेच मग आसुरी गुणवाले बनतात.
मायेचे ग्रहण लागल्याने काळे होतात. जसे चंद्राला देखील ग्रहण लागते ना. त्या आहेत
हदच्या गोष्टी, या आहेत बेहदच्या गोष्टी. बेहदचा दिवस आणि बेहदची रात्र आहे. गातात
देखील ब्रह्माचा दिवस आणि रात्र. तुम्हाला आता एका बाबांकडूनच शिकायचे आहे बाकीचे
सर्व काही विसरून जायचे आहे.
बाबांद्वारे शिकल्याने
तुम्ही नवीन दुनियेचे मालक बनता. ही खरी-खरी गीता पाठशाळा आहे. पाठशाळेमध्ये काही
कोणी नेहमी रहात नाहीत. मनुष्य समजतात भक्तीमार्ग भगवंताला भेटण्याचा मार्ग आहे,
जितकी जास्त भक्ती कराल तितके भगवान प्रसन्न होईल आणि येऊन फळ देईल. या सर्व गोष्टी
आता तुम्हीच समजता. भगवान एकच आहेत जे आता फळ देत आहेत. जे सर्वात पहिले सूर्यवंशी
पूज्य होते, त्यांनीच सर्वात जास्त भक्ती केली आहे, तेच इथे येतील. सर्वात पहिले
तुम्हीच शिवबाबांची अव्यभिचारी भक्ती सुरु केली आहे तर जरूर तुम्हीच सर्वात पहिले
भक्त आहात. मग अधोगती होत-होत तमोप्रधान बनता. अर्धाकल्प तुम्ही भक्ती केली आहे,
त्यामुळे तुम्हालाच पहिले ज्ञान देतात. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. तुमच्या
या शिक्षणामध्ये हा बहाणा चालू शकत नाहीत की, आम्ही दूर राहतो त्यामुळे रोज क्लासला
येऊ शकत नाही. कोणी म्हणतात आम्ही १० मैल दूर राहतो. अरे, बाबांच्या आठवणीमध्ये
तुम्ही १० मैल देखील पायी चालून जाल तरीही कधी थकवा येणार नाही. किती मोठा खजिना
घेण्यासाठी जाता. तीर्थक्षेत्रावर लोकं दर्शन करण्यासाठी पायी जातात, किती त्रास
सहन करतात. ही तर एकाच शहराची गोष्ट आहे. बाबा म्हणतात - ‘मी इतक्या दुरून आलो आहे
आणि तुम्ही म्हणता घर ५ मैल दूर आहे… व्वा! खजिना घेण्यासाठी तर धावत आले पाहिजे.
अमरनाथला केवळ दर्शनासाठी कुठून-कुठून जातात. इथे तर अमरनाथ बाबा स्वतः शिकवण्यासाठी
आले आहेत. तुम्हाला विश्वाचा मालक बनवण्यासाठी आलो आहे. तुम्ही बहाणे करत राहता.
पहाटे अमृतवेलेला तर कोणीही येऊ शकते. त्यावेळी काही भीती नसते. तुम्हाला कोणी
लुटणार देखील नाही. जर काही दागिने इत्यादी असतील तर हिसकावून घेतील. चोरांना हवाच
असतो पैसा, वस्तू. परंतु कोणाच्या भाग्यामध्ये नसेल तर मग खूप बहाणे करतात. अभ्यास
करत नाहीत तर मग आपले पद गमावतात. बाबा येतात देखील भारतामध्ये. भारतालाच स्वर्ग
बनवतात. सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा रास्ता सांगतात. परंतु कोणी पुरुषार्थ देखील करावा
ना. पाऊलच उचलले नाहीत तर मग पोहोचू तरी कसे शकणार.
तुम्ही मुले समजता की
हा आहे आत्मा आणि परमात्म्याचा मेळावा. बाबांकडे आलो आहोत स्वर्गाचा वारसा
घेण्यासाठी, नवीन दुनियेची स्थापना होत आहे. स्थापना पूर्ण झाली की मग विनाश सुरू
होईल. ही तीच महाभारताची लढाई आहे ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबा जो
ज्ञानाचा खजिना देत आहेत, तो घेण्यासाठी धावत-पळत आला आहात, यामध्ये कोणत्याही
प्रकारचा बहाणा करायचा नाही. बाबांच्या आठवणीमध्ये १० मैल पायी चालूनही तुम्ही
थकणार नाही.
२) विजयी माळेमध्ये
येण्याचा आधार अभ्यास आहे. अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे. काट्यांना फूल
बनविण्याची सेवा करायची आहे. स्वीट होम आणि स्वीट राजाईची आठवण करायची आहे.
वरदान:-
संगमयुगाच्या
महत्त्वाला जाणून एकाचे अगणित वेळा रिटर्न प्राप्त करणारे सर्व प्राप्ती संपन्न भव
संगमयुगावर बापदादांचा
वायदा आहे - ‘एक द्या लाख घ्या’. जसे सर्वश्रेष्ठ काळ, सर्वश्रेष्ठ जन्म,
सर्वश्रेष्ठ टायटल या काळातील आहेत तसेच सर्व प्राप्तींचा अनुभव आताच होतो. आता
एकाचे फक्त लाख पटीनेच मिळतात असे नाही परंतु जेव्हा पाहिजे, जसे पाहिजे, जे पाहिजे
बाबा सेवाधारीच्या रूपामध्ये बांधील आहेत. एकाचे अगणित वेळा रिटर्न मिळते कारण
वर्तमान काळात वरदाताच तुमचे आहेत. जेव्हा बीज तुमच्या हातामध्ये आहे तर बीजाद्वारे
जे पाहिजे ते सेकंदामध्ये घेऊन सर्व प्राप्तींनी संपन्न बनू शकता.
बोधवाक्य:-
कशीही
परिस्थिती असेल, परिस्थिती निघून जाईल परंतु खुशी जाऊ नये.
अव्यक्त इशारे -
एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-
“एकता आणि एकाग्रता”
या कार्य सफल करणाऱ्या दोन श्रेष्ठ भुजा आहेत. एकाग्रता अर्थात नेहमी निरव्यर्थ
संकल्प, निर्विकल्प. जिथे एकता आणि एकाग्रता आहे, तिथे सफलता गळ्यातील हार आहे.
वरदात्याला एक शब्द प्रिय आहे - ‘एकव्रता’, एक बल एक भरवसा; त्याच सोबत ‘एकमत’, ना
मनमत ना परमत, केवळ एकरस, ना दुसरी कोणती व्यक्ती, ना वैभवाचा रस. अशी एकता,
एकांतप्रिय.