06-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, आता ही चढत्या कलेची वेळ आहे, भारत गरीबापासून श्रीमंत बनत आहे, तुम्ही
बाबांकडून सतयुगी बादशाहीचा वारसा घ्या”
प्रश्न:-
बाबांचे कोणते
नाव श्रीकृष्णाला देऊ शकत नाही?
उत्तर:-
बाबा गरीब-निवाज आहेत. श्रीकृष्णाला असे म्हणत नाहीत. ते तर फार धनवान आहेत,
त्यांच्या राज्यामध्ये सर्वजण श्रीमंत आहेत. बाबा जेव्हा येतात, तर तेव्हा सर्वात
गरीब भारत आहे. भारतालाच श्रीमंत बनवतात. तुम्ही म्हणता की, आमचा भारत स्वर्ग होता,
आता नाहीये, आता पुन्हा बनणार आहे. गरीब-निवाज बाबाच भारताला स्वर्ग बनवतात.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी हे गाणे ऐकले. जशी आत्मा गुप्त आहे आणि शरीर प्रत्यक्ष आहे.
आत्मा या डोळ्यांनी दिसून येत नाही, इनकॉग्निटो (अदृश्य) आहे. आहे जरूर, परंतु या
शरीरामध्ये झाकलेली आहे, त्यामुळे म्हटले जाते - आत्मा गुप्त आहे. आत्मा स्वतः
म्हणते, ‘मी निराकार आहे, इथे साकारमध्ये येऊन गुप्त बनली आहे’. आत्म्यांची निराकारी
दुनिया आहे. तिथे तर गुप्त असण्याची गोष्टच नाही. परमपिता परमात्मा देखील तिथे
राहतात. त्यांना म्हटले जाते सुप्रीम. उच्च ते उच्च आत्मा, दूर ते दूर राहणारे
परम-आत्मा. बाबा म्हणतात, जसे तुम्ही गुप्त आहात, मला देखील गुप्तपणे यावे लागते.
मी गर्भ-जेलमध्ये येत नाही. माझे एकच नाव ‘शिव’ चालत आले आहे. मी या तनामध्ये येतो,
तरी देखील माझे नाव बदलत नाही. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) आत्म्याचे जे शरीर आहे,
त्यांचे नाव बदलते. मला तर ‘शिव’च म्हणतात, सर्व आत्म्यांचा पिता. तर तुम्ही आत्मे
या शरीरामध्ये गुप्त आहात, या शरीराद्वारे कर्म करता. मी देखील गुप्त आहे. तर
मुलांना हे ज्ञान आता मिळत आहे की, आत्मा या शरीरामध्ये झाकलेली आहे. आत्मा आहे
इनकॉग्निटो (अदृश्य), शरीर आहे कॉग्निटो (दृश्य). मी देखील अशरीरी आहे. अदृश्य बाबा
या शरीराद्वारे सांगत आहेत. तुम्ही देखील अदृश्य आहात, शरीरा द्वारे ऐकत आहात.
तुम्ही जाणता की, बाबा आलेले आहेत, भारताला पुन्हा गरीबापासून श्रीमंत बनविण्याकरिता.
तुम्ही म्हणता - आमचा भारत. प्रत्येक जण आपल्या राज्यासाठी म्हणतात - ‘आमचा गुजरात’,
‘आमचा राजस्थान’, ‘आमचे-आमचे’ म्हटल्याने, त्यामध्ये मोह उत्पन्न होतो. आमचा भारत
गरीब आहे. हे सर्व मानतात, परंतु त्यांना हे ठाऊक नाही आहे की, आपला भारत श्रीमंत
कधी होता, कसा होता. तुम्हा मुलांना फार नशा आहे. आमचा भारत, तर खूप श्रीमंत होता,
दुःखाची गोष्टच नव्हती. सतयुगामध्ये दुसरा कोणताही धर्म नव्हता. एकच देवी-देवता
धर्म होता, हे कोणालाच ठाऊक नाहीये. हा जो जगाचा इतिहास-भूगोल आहे तो कोणीही जाणत
नाहीत. आता तुम्ही चांगल्या रीतीने समजता, आमचा भारत खूप श्रीमंत होता. आता खूप
गरीब आहे. आता पुन्हा बाबा आले आहेत श्रीमंत बनविण्याकरिता. भारत सतयुगामध्ये खूप
श्रीमंत होता. जेव्हा देवी-देवतांचे राज्य होते, मग ते राज्य कुठे गेले. हे कोणीही
जाणत नाही. ऋषी-मुनी इत्यादी देखील म्हणत होते, आम्ही रचता आणि रचनेला जाणत नाही.
बाबा म्हणतात, सतयुगामध्ये देखील देवी-देवतांना रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे
ज्ञान नव्हते. जर त्यांना देखील ज्ञान असते की, आपण शिडी उतरत कलियुगामध्ये जाऊ, तर
बादशाहीचे सुखच राहणार नाही, चिंता वाटू लागेल. आता तुम्हाला चिंता लागून राहिली आहे
की, आपण सतोप्रधान होतो, आता पुन्हा आपण सतोप्रधान कसे बनावे! आपण आत्मे जे निराकारी
दुनियेमध्ये राहत होतो, तिथून पुन्हा सुखधाममध्ये कसे यायचे आहे, हे देखील ज्ञान आहे.
आता आपण चढत्या कलेमध्ये आहोत. ही ८४ जन्मांची शिडी आहे. ड्रामा अनुसार प्रत्येक ॲक्टर
क्रमवार आपापल्या वेळेवर येऊन पार्ट बजावतील. आता तुम्ही मुले जाणता की, गरीब-निवाज
कोणाला म्हटले जाते, हे दुनिया जाणत नाही. गाण्यामध्ये देखील ऐकले - शेवटी तो दिवस
आज आला आहे, ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो…, सर्व भक्त आहेत. भगवान कधी येऊन
आम्हा भक्तांना या भक्तिमार्गातून सोडवून सद्गतीमध्ये घेऊन जातील, हे आता समजले आहे.
बाबा पुन्हा या शरीरामध्ये आले आहेत. शिवजयंती देखील साजरी करतात, तर जरूर येत
असतील. असे देखील म्हणत नाहीत की, मी कृष्णाच्या तनामध्ये येतो. नाही. बाबा म्हणतात,
कृष्णाच्या आत्म्याने ८४ जन्म घेतले आहेत, त्यांच्या अनेक जन्मांतील अंताचा, हा
अंतिम जन्म आहे. जो पहिल्या क्रमांकामध्ये होता, तो आता अंत मध्ये आहे, तत् त्वम्.
मी तर साधारण तनामध्ये येतो. येऊन तुम्हाला सांगतो की, तुम्ही कसे ८४ जन्म भोगले
आहेत. सरदार लोक देखील समजतात की, एक ओंकार, परमपिता परमात्मा बाबा आहेत. ते खरोखर
मनुष्यापासून देवता बनविणारे आहेत. तर का नाही आपण देखील देवता बनावे. जे देवता बनले
होते, ते एकदम चिकटतील. कोणीही आपल्याला देवी-देवता धर्माचा समजत नाही. इतर धर्मांचा
इतिहास फार लहान आहे. कोणाचा ५०० वर्षांचा, कोणाचा १२५० वर्षांचा, तुमचा इतिहास आहे
५ हजार वर्षांचा. देवता धर्माचेच स्वर्गामध्ये येतील. इतर धर्म तर येतातच मागाहून.
देवता धर्माचे देखील आता ड्रामानुसार इतर धर्मामध्ये कनव्हर्ट झाले आहेत. तरीही
असेच कनव्हर्ट होतील, पुन्हा मग आपापल्या धर्मामध्ये परत येतील.
बाबा म्हणतात -
मुलांनो, तुम्ही तर विश्वाचे मालक होता. तुम्ही देखील समजता - बाबा स्वर्गाची
स्थापना करणारे आहेत, तर का नाही आपण स्वर्गामध्ये जाणार, आम्ही बाबांकडून वारसा
जरूर घेणार. तर यावरून सिद्ध होते की, हे आमच्या धर्माचे आहेत. जो नसेल तो येणारच
नाही. ते म्हणतील दुसऱ्या धर्मामध्ये आपण का जावे. तुम्ही मुले जाणता, सतयुग नवीन
दुनियेमध्ये देवतांना भरपूर सुख होते, सोन्याचे महाल होते. सोमनाथाच्या मंदिरामध्ये
किती सोने होते. असा दुसरा धर्म कोणता असतच नाही. सोमनाथाच्या मंदिरासारखे एवढे भारी
मंदिर दुसरे कोणते असणार नाही. भरपूर हिरे-माणके होती. बुद्ध इत्यादींचे महाल काही
हिरे-माणकांचे थोडेच असतील. तुम्हा मुलांना, ज्या बाबांनी एवढे श्रेष्ठ बनवले आहे,
त्यांचा तुम्ही किती आदर ठेवला आहे! आदर ठेवला जातो ना. समजतात की, चांगले कर्म
करून गेले आहेत. आता तुम्ही जाणता, सर्वात चांगली कर्म पतित-पावन बाबाच करून जातात.
तुमची आत्मा म्हणते - सर्वात उत्तम ते उत्तम सेवा बेहदचे बाबा येऊन करतात. आम्हाला
रंका पासून राव, बेगर पासून प्रिन्स बनवतात. जे भारताला स्वर्ग बनवतात, त्यांचा आता
कोणीही आदर ठेवत नाही. तुम्ही जाणता - उच्च ते उच्च मंदिर म्हणून ज्याचे गायन आहे,
त्या मंदिराला लुटून घेऊन गेले. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिराला कधी कोणी लुटले नाही.
सोमनाथच्या मंदिराला लुटले आहे. भक्तीमार्गामध्ये देखील भरपूर श्रीमंत असतात.
राजांमध्ये देखील नंबरवार असतात ना. जे उच्च पद वाले असतात, त्यांचा लहान पद वाले
मान ठेवतात. दरबारामध्ये देखील नंबरवार बसतात. बाबा तर अनुभवी आहेत ना. इथला (जुन्या
दुनियेतील) दरबार आहे पतित राजांचा. पावन राजांचा दरबार कसा असेल. जेव्हा त्यांच्या
जवळ एवढे धन आहे, तर त्यांची घरे देखील तेवढीच चांगली असतील. आता तुम्ही जाणता की,
बाबा आम्हाला शिकवत आहेत, स्वर्गाची स्थापना करत आहेत. आम्ही स्वर्गाचे
महाराणी-महाराजा बनतो आणि मग आम्ही खाली उतरत-उतरत भक्त बनणार तेव्हा मग सर्वप्रथम
शिवबाबांचे पुजारी बनणार. ज्यांनी स्वर्गाचा मालक बनवले, त्यांचीच पूजा करणार. ते
आपल्याला भरपूर श्रीमंत बनवतात. आता भारत किती गरीब आहे, जी जमीन ५०० रुपयाला घेतली
होती, त्याची किंमत आज ५००० पेक्षाही अधिक झाली आहे. हे सर्व आहेत कृत्रिम दाम. तिथे
(स्वर्गामध्ये) तर जमिनीचे काहीच मूल्य नसते, ज्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यावी.
पुष्कळ जमीन पडलेली असेल. गोड्या नदीच्या काठावर तुमचे महाल असतील. फार थोडे मनुष्य
असतील. प्रकृती दासी असेल. अतिशय उत्तम प्रतीची फळे-फुले उपलब्ध होत राहतात. आता तर
किती मेहनत करावी लागते, तरी देखील अन्न मिळत नाही. पुष्कळ मनुष्य अन्न-पाण्याविना
मरतात. तर हे गाणे ऐकल्याने तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत. बाबांना
गरीब-निवाज म्हणतात. गरीब-निवाज याचा अर्थ समजला ना! कोणाला श्रीमंत बनवतात? जरूर
इथे येतील, त्यांना श्रीमंत बनवतील ना. तुम्ही मुले जाणता - आपल्याला पावन पासून
पतित बनण्यासाठी ५००० वर्षे लागतात. आता परत झटक्यात बाबा पतितापासून पावन बनवत
आहेत. उच्च ते उच्च बनवतात, एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते. म्हणतात - ‘बाबा, मी
तुमचा आहे’. बाबा म्हणतात - ‘बाळा, तू विश्वाचा मालक आहेस’. मुलगा जन्माला आला आणि
वारसदार बनला. मुलगा झाल्याचे पाहून किती आनंद होतो. मुलीला पाहून चेहराच उतरतो. इथे
तर सर्व आत्मे मुले आहेत. आता माहीत झाले आहे की, आपण ५ हजार वर्षांपूर्वी स्वर्गाचे
मालक होतो. बाबांनी असे बनवले होते. शिवजयंती देखील साजरी करतात, परंतु हे जाणत
नाहीत की, ते कधी आले होते. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, हे देखील कोणी जाणत
नाहीत. जयंती साजरी करून फक्त शिवलिंगाची मोठ-मोठे मंदिरे बनवतात. परंतु ते कसे आले,
येऊन काय केले, काहीही जाणत नाहीत; याला म्हटले जाते - अंधश्रद्धा. त्यांना हे
ठाऊकच नाहीये की, आपला धर्म कोणता होता, केव्हा स्थापन झाला. बाकीच्या धर्मवाल्यांना
तर माहित आहे की, बुद्ध कधी आले, तिथी-तारीख देखील आहे. शिवबाबांची,
लक्ष्मी-नारायणाची कोणतीही तिथी-तारीख नाहीये. ५००० वर्षांच्या गोष्टीला, लाखो वर्षे
लिहिली आहेत. लाखो वर्षांची गोष्ट कोणाला आठवू शकेल काय? भारतामध्ये देवी-देवता
धर्म कधी होता, हेच समजत नाहीत. लाखो वर्षांच्या हिशोबाने तर भारताची लोकसंख्या तर
सर्वात जास्त असली पाहिजे. भारताची जमीन देखील सर्वात मोठी असली पाहिजे. लाखो
वर्षांमध्ये किती मनुष्य जन्म घेतील, बेसुमार मनुष्य होतील. इतके तर नाही आहेत, उलट
अजूनच कमी झाले आहेत, या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगत आहेत. मनुष्य ऐकतात
तर म्हणतात, या गोष्टी तर कधी ऐकल्या नाहीत आणि ना कोणत्या शास्त्रामध्ये वाचले आहे.
या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये साऱ्या चक्राचे
नॉलेज आहे. हे (ब्रह्मा बाबा) अनेक जन्मांतील अंतिम जन्मा मधील अंतामध्ये आता पतित
आत्मा आहेत; जे सतोप्रधान होते, ते आता तमोप्रधान आहेत, आता पुन्हा सतोप्रधान बनायचे
आहे. तुम्हा आत्म्यांना आता शिक्षण मिळत आहे. आत्मा कानाद्वारे ऐकते तेव्हा शरीर
डोलते कारण आत्मा ऐकत आहे ना. खरोखर, आपण आत्मे ८४ जन्म घेतो. ८४ जन्मांमध्ये ८४
आई-वडील जरूर मिळाले असतील. हा देखील हिशोब आहे ना. बुद्धीमध्ये येते - आपण ८४ जन्म
घेतो आणि मग कमी जन्म घेणारे देखील असतील. असे थोडेच आहे की, सगळेच ८४ जन्म घेतील.
बाबा बसून शास्त्रांमध्ये काय-काय लिहिले आहे ते समजावून सांगत आहेत. तुमच्यासाठी
तरी देखील ८४ जन्म म्हणतात, माझ्यासाठी तर अगणित, बेसुमार जन्म घेतले असे म्हणतात.
कणा-कणामध्ये, दगड-धोंड्यामध्ये मला ठोकले आहे. बस्स, जिकडे बघतो तिकडे तूच तू आहेस.
कृष्णच कृष्ण आहे. मथुरा, वृंदावन मध्ये असे म्हणत राहतात. कृष्णच सर्वव्यापी आहे.
राधेपंथ वाले मग म्हणतात, राधे च राधे. तुम्ही देखील राधे आम्ही देखील राधे.
तर एक बाबाच बरोबर
गरीब-निवाज आहेत. भारत जो सर्वात श्रीमंत होता, आता सर्वात गरीब बनला आहे, त्यामुळे
मला भारतामध्येच यावे लागते. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे, यामध्ये जरा देखील फरक पडू
शकत नाही. ड्रामा जो शूट झाला तो हुबेहूब रिपीट होईल, यामध्ये आण्याचा देखील फरक
होऊ शकत नाही. ड्रामा विषयी देखील माहिती असले पाहिजे. ड्रामा अर्थात ड्रामा. ते
असतात हदचे ड्रामा, हा आहे बेहदचा ड्रामा. या बेहदच्या ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला
कोणीही जाणत नाही. तर गरीब-निवाज, निराकार भगवंतालाच मानणार, कृष्णाला मानणार नाही.
कृष्ण तर श्रीमंत सतयुगाचा राजकुमार बनतो. भगवंताला तर स्वतःचे शरीरच नाहीये. ते
येऊन तुम्हा मुलांना श्रीमंत बनवतात, तुम्हाला राजयोगाचे शिक्षण देतात. शिक्षण घेऊन
बॅरिस्टर इत्यादी बनून मग कमाई करतात. बाबा देखील तुम्हाला आता शिकवत आहेत. तुम्ही
भविष्यामध्ये नरापासून नारायण बनता. तुमचा जन्म तर होईल ना. असे तर नाही, स्वर्ग
काही समुद्रातून बाहेर येईल. कृष्णाने देखील जन्म घेतला ना. कंस-पुरी इत्यादी तर
त्यावेळी अस्तित्वातच नव्हती. कृष्णाचे नाव किती गायले जाते. त्यांच्या पित्याचे
काहीच गायन नाहीये. त्यांचे पिता कुठे आहेत? जरूर श्रीकृष्ण कोणाचा मुलगा असेल ना.
श्रीकृष्ण जेव्हा जन्म घेतात, तेव्हा थोडे-फार पतित मनुष्य देखील अस्तित्वात असतात.
जेव्हा पतित मनुष्य पूर्णतः नष्ट होतात, तेव्हा श्रीकृष्ण गादीवर बसतात. आपले राज्य
घेतात, तेव्हापासूनच त्यांचे संवत सुरू होते. लक्ष्मी-नारायणापासूनच संवत सुरू होते.
तुम्ही पूर्ण हिशोब लिहिता. यांचे राज्य एवढा वेळ, मग त्यांचे एवढा वेळ, त्यामुळे
मनुष्य समजतील की, या कल्पाचे आयुष्य जास्त मोठे असू शकत नाही. ५ हजार वर्षांचा
पूर्ण हिशोब आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये येते ना. काल आपण स्वर्गाचे मालक
होतो. बाबांनी बनवले होते त्यामुळे आपण त्यांची शिवजयंती साजरी करत आहोत. तुम्ही
सर्वांना जाणता. क्राईस्ट, गुरुनानक इत्यादी पुन्हा कधी येतील, याचे तुम्हाला ज्ञान
आहे. जगाचा इतिहास-भूगोल हुबेहुब रिपीट होतो. हे शिक्षण किती सोपे आहे. तुम्ही
स्वर्गाला जाणता, बरोबर भारत स्वर्ग होता. भारत अविनाशी खंड आहे. भारता सारखी महिमा
आणखीन कोणाची असू शकत नाही. सर्वांना पतितापासून पावन बनविणारे एक बाबाच आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ड्रामाच्या
आदि-मध्य-अंताचे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून सर्व चिंता सोडून द्यायच्या आहेत. फक्त एक
सतोप्रधान बनण्याची चिंता करायची आहे.
२) गरीब-निवाज बाबा
भारताला गरिबापासून श्रीमंत बनविण्यासाठी आले आहेत, त्यांचे पूर्णपणे मदतगार बनायचे
आहे. आपल्या नवीन दुनियेची आठवण करत नेहमी आनंदामध्ये राहायचे आहे.
वरदान:-
हृदयामध्ये
सदैव एका रामाला बसवून खरी सेवा करणारे मायाजीत, विजयी भव
हनुमानाची विशेषता
दाखवतात की तो नेहमी सेवाधारी, महावीर होता, त्यामुळे स्वतः जळला नाही परंतु शेपटा
द्वारे लंका जाळली. तर इथे देखील जे सदैव सेवाधारी आहेत तेच मायेच्या अधिकाराला
नष्ट करू शकतात. जे सेवाधारी नाहीत ते मायेच्या राज्याला जाळू शकत नाहीत.
हनुमानाच्या हृदयामध्ये नेहमी फक्त एक राम वसत होता. तर बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही
हृदयामध्ये नसावे; आपल्या देहाची स्मृती देखील नसावी तेव्हाच मायाजीत, विजयी बनाल.
बोधवाक्य:-
जसे आत्मा आणि
शरीर कंबाइंड आहे तसे तुम्ही बाबांसोबत कंबाइंड रहा.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.
संघटनमध्ये
प्रत्येकाच्या विशेषतेला पाहणे, विशेषतेलाच ग्रहण करणे आणि कमजोरींना नष्ट करण्याचा
प्रयत्न करणे - हीच विधी आहे, एकतेचे संघटन मजबूत करण्याची. जसे तुम्हा सर्वांचे
उठणे, बोलणे, चालणे एक सारखे आहे किंवा सर्वांचे एक सारखे बोलणे, एकच गती, एकच रीती,
एकच नीती आहे, असेच संस्कार देखील एकसारखे दिसून यावेत. भिन्नता असताना देखील
एकमेकांवर विश्वास ठेवून सर्वांच्या विचारांना सन्मान द्या, हाच एकतेचा आधार आहे.