06-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - जसे तुम्हा आत्म्यांना हे शरीर रूपी सिंहासन मिळाले आहे, असेच बाबा देखील
या दादाच्या (ब्रह्माच्या) सिंहासनावर विराजमान आहेत, त्यांना स्वतःचे सिंहासन
नाही”
प्रश्न:-
ज्या मुलांना
आपण ईश्वरीय संतान असल्याची स्मृती राहते त्यांची निशाणी काय असेल?
उत्तर:-
त्यांचे खरे प्रेम फक्त एका बाबांवर असेल. ईश्वरीय संतान कधीही भांडण-तंटे करणार
नाही. त्यांची कधीही कु-दृष्टी होऊ शकत नाही. जेव्हा ब्रह्माकुमार कुमारी अर्थात
बहिण-भाऊ बनले तर मग घाणेरडी दृष्टी जाऊ शकत नाही.
गीत:-
छोड़ भी दे
आकाश सिंहासन...
ओम शांती।
आता मुले जाणतात बाबांनी आकाश सिंहासन सोडून आता दादाच्या तनाला (ब्रह्मा तनाला)
आपले सिंहासन बनवले आहे, ते सोडून इथे येऊन बसले आहेत. हे आकाश तत्त्व तर आहे जीव
आत्म्यांचे सिंहासन. आत्म्यांचे सिंहासन आहे ते महतत्त्व, जिथे तुम्ही आत्मे
शरीराशिवाय रहात होता. जसे आकाशामध्ये तारे आहेत, तसे तुम्ही आत्मे देखील खूप
छोटे-छोटे तिथे राहता. आत्म्याला दिव्य दृष्टीशिवाय पाहू शकत नाही. तुम्हा मुलांना
आता हे ज्ञान आहे, जसे तारा किती छोटा आहे, तसे आत्मे देखील बिंदूसारखे आहेत. आता
बाबांनी सिंहासन तर सोडले आहे. बाबा म्हणतात तुम्ही आत्मे देखील सिंहासन सोडून इथे
या शरीराला आपले सिंहासन बनविता. मला देखील जरूर शरीर पाहिजे. मला बोलवतातच जुन्या
दुनियेमध्ये. गीत आहे ना - ‘दूरदेश का रहने वाला…’ तुम्ही आत्मे जिथे राहता तो आहे
तुम्हा आत्म्यांचा आणि बाबांचा देश. नंतर मग तुम्ही स्वर्गामध्ये जाता, ज्याची बाबा
स्थापना करवून घेत आहेत. बाबा स्वतः त्या स्वर्गामध्ये येत नाहीत. स्वतः तर
वाणीपासून परे वानप्रस्थमध्ये जाऊन राहतात. स्वर्गामध्ये त्यांची आवश्यकता नाही. ते
तर सुख-दुःखापासून न्यारे आहेत ना. तुम्ही तर सुखामध्ये येता, तसेच दुःखामध्ये
सुद्धा येता.
आता तुम्ही जाणता,
आपण ब्रह्माकुमार-कुमारी भाऊ-बहिणी आहोत. एकमेकांबद्दल कु-दृष्टीचा विचार सुद्धा
येता कामा नये. तिथे तर तुम्ही बाबांच्या सन्मुख बसले आहात, आपसामध्ये भाऊ-बहिणी
आहात. पवित्र राहण्याची युक्ती बघा कशी आहे. या गोष्टी काही शास्त्रांमध्ये नाही
आहेत. सर्वांचे पिता एकच आहेत, तर सर्वजण मुले झाली ना. मुलांनी आपसामध्ये
भांडण-तंटे करता कामा नयेत. या वेळेस तुम्ही जाणता आपण ईश्वरीय संतान आहोत, आधी
आसुरी संतान होतो, आणि आता संगमावर ईश्वरीय संतान बनलो आहोत, आणि नंतर सतयुगामध्ये
दैवी संतान असणार. हे चक्र मुलांना माहिती झाले आहे. तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी
आहात तर कधीही कु-दृष्टि जाणार नाही. सतयुगामध्ये कु-दृष्टी असत नाही. कु-दृष्टी
रावण राज्यामध्ये असते. तुम्हा मुलांना बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण राहता कामा नये.
सर्वात जास्त प्रेम एका बाबांवर असावे. ‘मेरा तो एक शिवबाबा दूसरा न कोई’. बाबा
म्हणतात - मुलांनो, आता तुम्हाला शिवालयामध्ये जायचे आहे. शिवबाबा स्वर्गाची स्थापना
करत आहेत. अर्धाकल्प रावण राज्य चालले, ज्यामुळे दुर्गतीच झाली आहे. रावण काय आहे,
त्याला का जाळतात, हे सुद्धा कोणीही जाणत नाही. शिवबाबांना देखील जाणत नाहीत. जसे
देवींना सजवून, पूजा करून विसर्जित करतात, शिवबाबांचे सुद्धा मातीचे लिंग बनवून पूजा
इत्यादी करून मग माती, मातीमध्ये मिसळून टाकतात, तसा मग रावणाचा सुद्धा पुतळा बनवून
मग जाळून टाकतात. समजत काहीच नाहीत. म्हणतात देखील - आता रावण राज्य आहे, रामराज्य
स्थापन होणार आहे. गांधीजींना देखील रामराज्य हवे होते, तर याचा अर्थ रावण राज्य आहे
ना. जी मुले या रावण राज्यामध्ये काम चितेवर बसून जळाले होते, बाबा येऊन
त्यांच्यावर पुन्हा ज्ञान वर्षा करतात, सर्वांचे कल्याण करतात. जसे कोरड्या जमिनीवर
पाऊस पडल्यामुळे गवत उगवते, तुमच्यावर देखील ज्ञानाची वर्षा न झाल्यामुळे किती गरीब
बनला होता. आता पुन्हा ज्ञान वर्षा होते ज्यामुळे तुम्ही विश्वाचे मालक बनाल. भले
तुम्ही मुले गृहस्थ व्यवहारामध्ये राहता परंतु आतून खूप आनंद झाला पाहिजे. जसे
एखाद्या गरीबाची मुले शिकतात तर शिकून बॅरिस्टर इत्यादी बनतात तर ते देखील मग
मोठ्या-मोठ्या हस्तींसोबत बसतात, खातात-पितात. भिल्लीणीची गोष्ट देखील
शास्त्रांमध्ये आहे ना.
तुम्ही मुले जाणता
ज्यांनी सर्वात जास्त भक्ती केली आहे तेच येऊन सर्वात जास्त ज्ञान घेतील. सर्वात
जास्त सुरुवातीपासून तर आपण भक्ती केली आहे. मग बाबा स्वर्गामध्ये आपल्यालाच सर्वात
आधी पाठवतात. ही आहे ज्ञानयुक्त यथार्थ गोष्ट. खरोखर आपणच सो पुज्य होतो आणि मग सो
पुजारी बनतो. खाली उतरत जातो. मुलांना सर्व ज्ञान समजावून सांगितले जाते. यावेळेस
ही सर्व दुनिया नास्तिक आहे, बाबांना जाणत नाहीत. नेती-नेती म्हणतात. पुढे चालून हे
संन्यासी इत्यादी सर्व येऊन आस्तिक जरूर बनतील. कोणी एक संन्यासी आला तरीही
त्याच्यावर सगळेच काही विश्वास थोडाच करतील. ते तर म्हणतील याच्यावर बी.के. नी जादू
केली आहे. त्याच्या शिष्याला गादीवर बसवून त्याला काढूनच टाकतील. असे बरेच संन्यासी
तुमच्याकडे आले आहेत, परंतु मग येईनासे होतात. हा अतिशय वंडरफुल ड्रामा आहे. आता
तुम्ही मुले आदिपासून अंतापर्यंत सर्वकाही जाणता. तुमच्यामध्ये देखील नंबरवार
पुरुषार्थानुसार धारण करू शकतात. बाबांकडे सर्व ज्ञान आहे, तुमच्याकडे देखील असले
पाहिजे. दिवसेंदिवस किती सेंटर्स उघडली जातात. मुलांना खूप दयाळू बनायचे आहे. बाबा
म्हणतात स्वतःवर देखील दया करा. निष्ठूर बनू नका. स्वतःवर दया करायची आहे. ती कशी?
ते देखील समजावून सांगत राहतात. बाबांची आठवण करून पतितापासून पावन बनायचे आहे. परत
कधी पतित बनण्याचा पुरुषार्थ करायचा नाही. दृष्टी खूप चांगली पाहिजे. आपण ब्राह्मण
ईश्वरीय संतान आहोत. ईश्वराने आपल्याला ॲडॉप्ट केले आहे. आता मनुष्यापासून देवता
बनायचे आहे. आधी सूक्ष्मवतनवासी फरिश्ता बनणार. आता तुम्ही फरिश्ते बनत आहात.
सूक्ष्म-वतनचे देखील रहस्य मुलांना समजावून सांगितले आहे. इथे आहे टॉकी (वाणीची भाषा),
सूक्ष्मवतनमध्ये आहे मूवी (संकल्पाची भाषा), मूलवतनमध्ये आहे सायलेन्स. सूक्ष्मवतन
आहे फरिश्त्यांचे. जसे भुताला सावलीचे शरीर असते ना. आत्म्याला शरीर मिळत नाही तर
ती भटकत राहते, त्याला भूत म्हटले जाते. त्यांना या डोळ्यांनी सुद्धा पाहू शकता. हे
मग आहेत सूक्ष्मवतनवासी फरिश्ते. या सर्व गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत. मूलवतन,
सूक्ष्मवतन, स्थूलवतन - याचे तुम्हाला ज्ञान आहे. चालता-फिरता बुद्धीमध्ये हे सर्व
ज्ञान राहिले पाहिजे. खरे तर आपण मूलवतनचे रहिवासी आहोत. आता आपण तिथे व्हाया
सूक्ष्मवतन जाणार. बाबा सूक्ष्मवतन यावेळीच रचतात. आधी सूक्ष्म हवे नंतर स्थूल
पाहिजे. आता हे आहे संगमयुग. याला ईश्वरीय युग म्हटले जाईल, त्याला दैवीयुग म्हटले
जाईल. तुम्हा मुलांना किती आंनद झाला पाहिजे. कु-दृष्टी गेली तर मग उच्च पद प्राप्त
करू शकणार नाही. आता तुम्ही ब्राह्मण-ब्राह्मणी आहात ना, मग घरी गेल्यावर विसरता
कामा नये. तुम्ही संगदोषामध्ये येऊन विसरता. तुम्ही हंस ईश्वरीय संतान आहात.
तुम्हाला कोणाविषयी आंतरिक मोह वाटता कामा नये. जर मोह वाटत असेल तर मोहाची माकडिण
म्हटले जाईल.
तुमचा धंदाच आहे
सर्वांना पावन बनविणे. तुम्ही आहात विश्वाला स्वर्ग बनविणारे. कुठे ती रावणाची आसुरी
संतान, कुठे तुम्ही ईश्वरीय संतान. तुम्हा मुलांना आपली अवस्था एकरस बनविण्यासाठी
सर्वकाही बघत असताना जसे काही दिसतच नाही आहे, हा अभ्यास करायचा आहे. यामध्ये
बुद्धीला एकरस ठेवणे यासाठी धैर्य लागते. परफेक्ट होण्यासाठी मेहनत करावी लागते.
संपूर्ण बनण्यासाठी वेळ पाहिजे. जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा ती दृष्टी तयार
होते, तोपर्यंत कशा ना कशाविषयी ओढ वाटत राहील. यामध्ये पूर्णतः उपराम व्हावे लागते.
लाईन क्लिअर पाहिजे. बघत असताना जसे की तुम्ही बघतच नाही आहात, असा अभ्यास ज्यांचा
असेल तेच उच्च पद प्राप्त करतील. आता ती अवस्था थोडीच आहे. संन्यासी तर या गोष्टींना
समजत देखील नाहीत. इथे तर खूप मेहनत करावी लागते. तुम्ही जाणता - आपण देखील या
जुन्या दुनियेचा संन्यास घेऊन बसलो आहोत. बस्स, आपल्याला तर आता स्वीट सायलेन्स
होममध्ये जायचे आहे. दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये हे नाही आहे जितके तुमच्या
बुद्धीमध्ये आहे. तुम्हीच जाणता आता परत जायचे आहे. शिव भगवानुवाच देखील आहे - ते
पतित-पावन, लिब्रेटर (मुक्ती दाता), गाईड आहेत. कृष्ण काही गाईड नाहीये. यावेळी
तुम्ही देखील सर्वांना रस्ता दाखवायला शिकता, म्हणून तुमचे नाव पांडव ठेवले आहे.
तुम्ही पांडवांची सेना आहात. आता तुम्ही देही-अभिमानी बनले आहात. जाणता आता परत
जायचे आहे, हे जुने शरीर सोडायचे आहे. सर्पाचे उदाहरण, भ्रमरीचे उदाहरण, ही सर्व
उदाहरणे आहेत तुमची यावेळची. तुम्ही आता प्रॅक्टिकलमध्ये आहात. ते तर हा धंदा करू
शकणार नाहीत. तुम्ही जाणता हे कब्रस्तान आहे, आता पुन्हा परिस्तान बनणार आहे.
तुमच्यासाठी सर्वच
दिवस लकी आहेत. तुम्ही मुले सदैव लकी आहात. गुरूवारच्या दिवशी नवीन मुलांना शाळेत
नेऊन बसवतात. हा रिवाज चालत आला आहे. तुम्हाला आता वृक्षपती शिकवत आहेत. ही
बृहस्पतीची दशा तुमची जन्म-जन्मांतर चालते. ही आहे बेहदची दशा. भक्तिमार्गामध्ये
हदच्या दशा चालतात, आता आहे बेहदची दशा. तर पूर्णत: मेहनत केली पाहिजे.
लक्ष्मी-नारायण काही कोणी एकच तर नाहीत ना. त्यांची तर डीनायस्टी (घराणे) असेल ना.
तर नक्कीच दीर्घकाळ राज्य करत असतील. लक्ष्मी-नारायणाच्या सूर्यवंशी घराण्याचे
राज्य झाले आहे, या गोष्टी देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. तुम्हा मुलांना हा
देखील साक्षात्कार झाला आहे की कसे राजतिलक देतात. सूर्यवंशी नंतर चंद्रवंशीला कसे
राज्य देतात. आई-वडील मुलाचे पाय धुऊन राज्य-तिलक देतात, राज्य-भाग्य देतात. हे
साक्षात्कार इत्यादी सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहेत, यामध्ये तुम्हा मुलांना
गोंधळून जाण्याची गरज नाही. तुम्ही बाबांची आठवण करा, स्वदर्शन चक्रधारी बना आणि
इतरांनाही बनवा. तुम्ही आहात ब्रह्मामुखवंशावली स्वदर्शन चक्रधारी सच्चे ब्राह्मण,
शास्त्रांमध्ये स्वदर्शन चक्राने किती हिंसा केलेली दाखवली आहे. आता बाबा तुम्हा
मुलांना खरी गीता ऐकवत आहेत. ही तर तोंडपाठ केली पाहिजे. किती सोपी आहे. तुमचे सर्व
कनेक्शन आहेच गीतेसोबत. गीतेमध्ये ज्ञान देखील आहे तर योग देखील आहे. तुम्हाला
सुद्धा एकच पुस्तक बनवले पाहिजे. योगाचे वेगळे पुस्तक कशासाठी बनवायचे. परंतु आजकाल
योगाचा खूप बोलबाला आहे म्हणून असे नाव ठेवतात जेणेकरून लोक येऊन समजून घेतील.
सरतेशेवटी ते सुद्धा (बाकी सर्व धर्मांचेसुद्धा) समजतील की योग एका बाबांसोबतच
लावायचा आहे. जे ऐकतील ते मग आपल्या धर्मामध्ये येऊन उच्च पद प्राप्त करतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपणच
आपल्यावर दया करायची आहे, आपली दृष्टी अतिशय चांगली पवित्र ठेवायची आहे. ईश्वराने
मनुष्यापासून देवता बनविण्यासाठी अडॉप्ट केले आहे त्यामुळे कधीही पतित बनण्याचा
विचारसुद्धा येता कामा नये.
२) संपूर्ण कर्मातीत
अवस्थेला प्राप्त करण्यासाठी सदैव उपराम राहण्याचा अभ्यास करायचा आहे. या
दुनियेमध्ये सर्वकाही दिसत असताना देखील बघायचे नाही. याच अभ्यासाद्वारे एकरस अवस्था
बनवायची आहे.
वरदान:-
प्रत्येक
पावलामध्ये पद्मांची कमाई जमा करणारे सर्व खजिन्यांनी संपन्न आणि तृप्त आत्मा भव
जी मुले बाबांच्या
आठवणीमध्ये राहून प्रत्येक पाऊल उचलतात ते पावलागणिक पद्मांची कमाई जमा करतात. या
संगमावरच पदमांच्या कमाईची खाण मिळते. संगमयुग आहे जमा करण्याचे युग. आता जितके जमा
करू इच्छिता तितके करू शकता. एक पाऊल अर्थात एक सेकंद सुद्धा जमा केल्याशिवाय जाऊ
नये अर्थात व्यर्थ जाऊ नये. सदैव भंडारा भरपूर असावा. ‘अप्राप्त नही कोई वस्तू….’
असे संस्कार असावेत. जेव्हा आता अशी तृप्त आणि संपन्न आत्मा बनाल तेव्हा
भविष्यामध्ये अक्षय खजिन्याचे मालक बनाल.
बोधवाक्य:-
कोणत्याही
गोष्टीने अपसेट होण्याऐवजी नॉलेजफुलच्या सीटवर सेट रहा (मजबूत रहा).
मातेश्वरीजींची अनमोल
महावाक्ये:-
“अर्धा कल्प ज्ञान -
ब्रह्माचा दिवस आणि अर्धा कल्प भक्तीमार्ग - ब्रह्माची रात्र”
अर्धा कल्प आहे
ब्रह्माचा दिवस, अर्धा कल्प आहे ब्रह्माची रात्र, आता रात्र पूर्ण होऊन पहाट येणार
आहे. आता परमात्मा येऊन अंधाराचा अंत करून पहाटेची आदि करतात (सुरुवात करतात),
ज्ञानाने होतो - प्रकाश, भक्तीने होतो - अंधार. गाण्यामध्ये देखील म्हणतात - ‘इस
पाप की दुनिया से दूर कहीं ले चल, चित चैन जहाँ पावे…’ ही आहे बेचैन दुनिया (दुःखाची
दुनिया), जिथे चैन (सुख) नाही आहे. मुक्तीमध्ये ना चैन आहे, ना बेचैन आहे (ना सुख
आहे ना दुःख आहे). सतयुग, त्रेता आहे चैनची (सुखाची) दुनिया, ज्या सुखधामाची सर्व
आठवण करतात. आता तुम्ही चैनच्या दुनियेमध्ये जात आहात, तिथे कोणती अपवित्र आत्मा
जाऊ शकत नाही, ते अंतामध्ये धर्मराजाचे फटके खाऊन कर्म-बंधनातून मुक्त होऊन शुद्ध
संस्कार घेऊन जातात कारण तिथे ना अशुद्ध संस्कार असतात, ना पाप असते. जेव्हा आत्मा
आपल्या खऱ्या पित्याला विसरून जाते तेव्हा हा भूल-भुलय्याचा हार-जीतचा अनादि खेळ
बनलेला आहे त्यामुळे आम्ही या सर्व शक्तीमान परमात्म्याकडून शक्ती घेऊन विकारांवर
विजय प्राप्त करून २१ जन्मांसाठी राज्यभाग्य घेत आहोत. अच्छा. ओम् शांती.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-
तुमच्या बोलमध्ये
स्नेह देखील असावा, मधुरता आणि महानता देखील असावी, सत्यता देखील असावी परंतु
स्वरूपाची नम्रता देखील असावी. निर्भय होऊन ऑथॉरिटीने बोला परंतु बोल मर्यादेच्या
आत असावेत - दोन्ही गोष्टींचा बॅलन्स असावा, जिथे बॅलन्स असतो तिथे चमत्कार दिसून
येतो आणि मग असे शब्द कठोर नाहीत परंतु गोड वाटतात; तर ऑथॉरिटी आणि नम्रता दोघांच्या
बॅलन्सचा चमत्कार दाखवा. हेच आहे बाबांच्या प्रत्यक्षतेचे साधन.