06-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - खरे सॅलव्हेशन आर्मी बनून (मुक्ती सेना बनून) सर्वांना या पापाच्या
दुनियेमधून पुण्याच्या दुनियेमध्ये घेऊन जायचे आहे, सर्वांच्या बुडालेल्या बेड्याला
(जीवन रुपी नावेला) पलीकडे न्यायचे आहे”
प्रश्न:-
प्रत्येक
मुलाच्या बुद्धीमध्ये कोणता निश्चय नंबरवार बसतो?
उत्तर:-
पतित-पावन आमचे मोस्ट बिलवेड बाबा, आम्हाला स्वर्गाचा वारसा देत आहेत, हा निश्चय
प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये नंबरवार बसतो. आणि जरी कोणाचा पूर्ण निश्चय बसला तरी माया
समोर उभी आहे. बाबांना विसरून जातात, फेल होतात. ज्यांचा निश्चय बसतो, ते पावन
बनण्याच्या पुरुषार्थाला लागतात. बुद्धीमध्ये राहते की, आता तर घरी जायचे आहे.
ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या मुलांप्रती गुड मॉर्निंग. मुले हे तर जाणतात की सतयुगामध्ये नेहमी
गुडमॉर्निंग, गुड डे, गुड एव्हरीथिंग, गुड नाईट, सर्व काही ‘गुड’ च ‘गुड’ आहे. येथे
तर ना गुड मॉर्निंग आहे, ना गुड नाईट आहे. सर्वात वाईट आहे नाईट (रात्र). तर सर्वात
चांगले काय आहे? पहाट. ज्याला अमृतवेला म्हटले जाते. तुमची प्रत्येक वेळ ‘गुड’च
‘गुड’ आहे. मुले जाणतात की या वेळी आपण योग-योगेश्वर आणि योग-योगेश्वरी आहोत. ईश्वर
जे तुमचे पिता आहेत, ते येऊन योग शिकवत आहेत, अर्थात तुम्हा मुलांचा एका ईश्वरासोबत
योग आहे. तुम्हा मुलांना ‘योगेश्वर’ नंतर ‘ज्ञान-ज्ञानेश्वर’ बाबांबद्दल समजले आहे.
योग लागला की मग बाबा तुम्हाला संपूर्ण चक्राचे नॉलेज समजावून सांगतात, ज्याद्वारे
तुम्ही देखील ज्ञान-ज्ञानेश्वर बनता. ईश्वर पिता, मुलांना येऊन ज्ञान आणि योग
शिकवतात. कोणता ईश्वर? निराकार पिता. आता बुद्धीने काम घ्या (बुद्धीने विचार करा).
गुरु लोकांची तर अनेक मते आहेत. कोणी म्हणेल श्रीकृष्णाशी योग लावा, मग त्यांचे
चित्रही देतील. कोणी सांई बाबा, कोणी महर्षी बाबा, कोणी मुसलमानाचे, कोणी पारसीचे,
सर्वांना बाबा-बाबा म्हणत राहतात. म्हणतील - सर्व भगवानच भगवान आहेत. आता तुम्ही
जाणता की मनुष्य भगवान होऊ शकत नाही. या लक्ष्मी-नारायणाला देखील भगवान-भगवती म्हणू
शकत नाही. भगवान तर एक निराकार आहेत. ते तुम्हा सर्व आत्म्यांचे पिता आहेत, त्यांना
शिवबाबा म्हटले जाते. तुम्हीच जन्म-जन्मांतर सत्संग करत आला आहात. कोणी ना कोणी
संन्यासी, साधू, पंडित इत्यादी नक्कीच असतात. लोक जाणतात की हे आमचे गुरु आहेत,
आम्हाला कथा ऐकवत आहेत. सतयुगामध्ये कथा इत्यादी नसतात. बाबा बसून समजावून सांगत
आहेत - केवळ ‘भगवान’ किंवा ‘ईश्वर’ म्हटल्याने तो गोडवा येत नाही. ते पिता आहेत,
त्यामुळे त्यांना ‘बाबा’ म्हटल्याने स्नेहमयी नाते होते. तुम्ही जाणता की आपण
बाबा-मम्माची मुले बनलो आहोत, ज्यांच्याद्वारे आम्हाला स्वर्गाचे सुख मिळते. असा
कोणताही सत्संग नसेल, जिथे असे समजत असतील की, आपण या सत्संगाने मनुष्यापासून देवता
अथवा नरकवासीपासून स्वर्गवासी बनतो. आता तुमचा सत् बाबांसोबत संग आहे, बाकी सर्वांचा
असत्यासोबत संग आहे असे म्हटले जाते. गायले देखील जाते - ‘सतसंग तारे… जिस्मानी संग
बोरे’ (सत् संगाने उद्धार होतो, देहधारींच्या संगाने अधोगती होते). बाबा म्हणतात -
आत्म-अभिमानी, देही-अभिमानी बना. मी तुम्हा मुलांना, आत्म्यांना शिकवतो. हे रूहानी
नॉलेज आत्म्यांप्रति सुप्रीम रूह (परम-आत्मा) येऊन देतात. बाकी सर्व आहे भक्तिमार्ग.
तो काही ज्ञानमार्ग नाहीये. बाबा म्हणतात - ‘मी सर्व वेदांना, शास्त्रांना,
सृष्टीच्या आदि, मध्य, अंताला जाणणारा आहे; ऑथॉरिटी मी आहे’. ते (साधू-संत) आहेत
भक्तिमार्गाची ऑथॉरिटी असणारे. अनेक शास्त्रे इत्यादी वाचतात तर त्यांना म्हटले जाते
शास्त्रांची ऑथॉरिटी. तुम्हाला बाबा येऊन सत्य ऐकवतात. आता तुम्ही जाणता की, ‘सत्
का संग तारे... झूठ का संग डुबोये’. आता बाबा तुम्हा मुलांद्वारे भारताचे रक्षण करत
आहेत. तुम्ही आहात रूहानी सॅलव्हेशन आर्मी (आत्मिक मुक्ती सेना). सॅल्व्हेज (रक्षण)
करता. बाबा म्हणतात की, भारत जो स्वर्ग होता, तो आता नरक बनला आहे. बुडालेला आहे.
बाकी असा काही समुद्राच्या खाली नाहीये. तुम्ही सतोप्रधानापासून तमोप्रधान बनला
आहात. सतयुग-त्रेतायुग सतोप्रधान आहे. ही खूप मोठी स्टीमर (आगबोट) आहे. तुम्ही
स्टीमरमध्ये बसला आहात. ही पापाची नगरी आहे कारण सर्व पाप-आत्मे आहेत. वास्तविक गुरू
एकच आहेत. त्यांना कोणीही ओळखत नाही. नेहमी म्हणतात - ‘ओ गॉड फादर’. असे म्हणत
नाहीत की, ‘गॉड फादर कम प्रिसेप्टर’ (ईश्वर पिता कम गुरु). नाही, फक्त ‘फादर’
म्हणतात. ते पतित-पावन आहेत, तर गुरू देखील झाले. सर्वांचे पतित-पावन सद्गती दाता
एकच आहेत. या पतित दुनियेमध्ये कोणताही मनुष्य सद्गती दाता अथवा पतित-पावन होऊ शकत
नाही. बाबा म्हणतात - किती एडल्ट्रेशन, करप्शन (भेसळ आणि भ्रष्टाचार) आहे. आता मला
कन्या-मातांद्वारे सर्वांचा उद्धार करायचा आहे.
तुम्ही सर्व
ब्रह्माकुमार-कुमारी भाऊ-बहीणी झाला आहात. नाहीतर डाडेचा (आजोबांचा) वारसा कसा
मिळणार? आजोबांकडून वारसा मिळतो - २१ पिढ्यांचा अर्थात स्वर्गाचे राज्य. कमाई किती
मोठी आहे. ही आहे खरी कमाई, सत्य बाबांद्वारे. बाबा, पिता देखील आहेत, शिक्षक देखील
आहेत, सद्गुरू देखील आहेत. प्रॅक्टिकल मध्ये करून दाखविणारे आहेत. असे नाही की
गुरूचा मृत्यू झाला की शिष्याला गादी मिळेल. ते आहेत देहधारी गुरू. हे आहेत रूहानी
गुरू. ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे, या पूर्णपणे नवीन गोष्टी आहेत.
तुम्ही जाणता की आम्हाला कोणी मनुष्य शिकवत नाहीये, आम्हाला शिवबाबा ज्ञानाचे सागर,
पतित-पावन या शरीराद्वारे शिकवत आहेत. तुमची बुद्धी शिवबाबांकडे आहे. त्या
सतसंगांमध्ये मनुष्याकडे बुद्धी जाईल. ते सर्व आहेत भक्तिमार्ग. आता तुम्ही गाता -
‘तुम मात-पिता हम बालक तेरे…’ हे तर एकच आहेत ना. परंतु बाबा म्हणतात की, मी कशा
प्रकारे येऊन तुम्हाला आपले बनवू. मी तुमचा पिता आहे, तर यांच्या (ब्रह्मा बाबांच्या)
तनाचा आधार घेतो. तर हे माझी पत्नी देखील आहेत, तर मुलगा देखील आहे. यांच्याद्वारे
शिवबाबा मुलांना ॲडॉप्ट करतात तर ही मोठी मम्मा झाली. यांची कोणी आई नाही. सरस्वतीला
जगत अंबा म्हटले जाते. तिला तुमचा सांभाळ करण्यासाठी नियुक्त केले आहे. सरस्वती आहे
ज्ञान-ज्ञानेश्वरी, ही आहे छोटी मम्मा. या खूप गूढ गोष्टी आहेत. तुम्ही आता हा गूढ
अभ्यास शिकत आहात, तुम्हाला विथ रिस्पेक्ट (सन्मानाने) पास व्हायचे आहे. हे
लक्ष्मी-नारायण विथ रिस्पेक्ट (सन्मानाने) पास झाले आहेत. त्यांना सर्वात मोठी
स्कॉलरशिप मिळाली आहे. कोणतीही सजा भोगावी लागली नाही. बाबा म्हणतात - जितके शक्य
होईल तितकी आठवण करा. याला भारताचा प्राचीन योग म्हटले जाते. बाबा म्हणतात -
तुम्हाला सर्व वेद-शास्त्रांचे सार ऐकवतो. मी तुम्हाला राजयोग शिकवला, ज्याद्वारे
तुम्ही प्रारब्ध मिळवले. मग ज्ञान नष्ट झाले, तर परंपरेने कसे काय चालू शकेल. तिथे
काही शास्त्रे इत्यादी नसतात; बाकीच्या धर्माचे इस्लामी, बौद्ध इत्यादी जे आहेत
त्यांचे ज्ञान नष्ट होत नाही. त्यांचे ज्ञान परंपरेने चालत येते. सर्वांना माहित आहे.
परंतु बाबा म्हणतात की, ‘मी तुम्हाला जे ज्ञान सांगतो ते कोणीही जाणत नाही’. भारत
दुःखी बनतो, त्याला येऊन कायमचा सुखी बनवितो. बाबा म्हणतात - मी साधारण तनामध्ये
बसलो आहे. तुमचा बुद्धियोग बाबांसोबत असावा. आत्म्यांचे पिता आहेत - परमपिता
परमात्मा. सर्व मुलांचे ते पिता आहेत, तर सर्व मुले त्यांची झाली ना. सर्व आत्मे
यावेळी पतित आहेत. बाबा म्हणतात - मी प्रॅक्टिकलमध्ये (प्रत्यक्षात) आलो आहे. विनाश
समोर उभा आहे. जाणता की आग लागेल. सर्वांची शरीरे नष्ट होतील. सर्व आत्म्यांना परत
घरी जायचे आहे. असे नाही की ब्रह्ममध्ये लीन होतील किंवा ज्योतीमध्ये सामावून जातील.
ब्रह्म समाजाचे लोक मग ज्योत पेटवून ठेवतात. त्याला ब्रह्म मंदिर म्हणतात. वास्तविक
आहे ब्रह्म महतत्व, जिथे सर्व आत्मे राहतात. आमचे पहिले मंदिर ते आहे. पवित्र आत्मे
तिथे राहतात. या गोष्टी कोणताही मनुष्य समजत नाही. ज्ञानाचे सागर बाबा बसून तुम्हा
मुलांना समजावून सांगत आहेत की आता तुम्ही ज्ञान-ज्ञानेश्वर आहात नंतर मग बनता
राज-राजेश्वर. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की पतित-पावन मोस्ट बिलवेड बाबा येऊन आम्हाला
स्वर्गाचा वारसा देत आहेत. कित्येकांच्या बुद्धीमध्ये हे देखील बसत नाही. इतके जण
इथे बसले आहेत, यांच्यापैकी काहीजण १०० टक्के निश्चयबुद्धी नाही आहे. कोणी ८० टक्के
आहेत, कोणी ५० टक्के आहेत, कोणी तेवढे सुद्धा नाही आहेत. ते तर पूर्णपणे फेल्युअर (अपयशी)
झाले. नंबरवार जरूर आहेत. असे बरेच आहेत ज्यांना निश्चय नाही आहे. प्रयत्न करतात की
निश्चय व्हावा. चांगला निश्चय झाला जरी तरी माया प्रबळ आहे. बाबांना विसरून जातात.
हे ब्रह्मा स्वतः म्हणतात की, ‘मी पूर्ण भक्त होतो. ६३ जन्म भक्ती केली आहे,
ततत्त्वम्’. तुम्ही देखील ६३ जन्म भक्ती केली आहे. २१ जन्म सुख उपभोगले आणि नंतर मग
भक्त बनला आहात. भक्ती नंतर आहे वैराग्य. संन्यासी लोक देखील हे सर्व शब्द बोलतात
की - ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. त्यांना वैराग्य येते घरादाराचे. त्याला हदचे
वैराग्य म्हटले जाते आणि तुमचे आहे बेहदचे वैराग्य. संन्यासी घरदार सोडून जंगलामध्ये
निघून जात असत. आता तर जंगलात कोणीच नाहीये. सर्व कुटिया रिकाम्या पडल्या आहेत कारण
पूर्वी सतोप्रधान होते, आता ते तमोप्रधान झाले आहेत. आता त्यांच्यामध्ये कोणतीही
ताकद नाहीये. लक्ष्मी-नारायणाच्या राजधानीत जी ताकद होती, ती पुनर्जन्म घेता-घेता
आता पहा ते कुठे येऊन पोहोचले आहेत. काहीच ताकद उरलेली नाही. इथले (जुन्या
दुनियेतील) गव्हर्नमेंट देखील म्हणते की आम्ही धर्माला मानत नाही. धर्मातच खूप
नुकसान आहे, भांडण-तंटे, कॉन्फरन्स करत राहतात की सर्व धर्माचे एकत्र येऊन एकमत
व्हावे. परंतु विचारा की एक कसे होऊ शकतील. आता तर सर्व परत जाणार आहेत. बाबा आले
आहेत, ही दुनिया आता कब्रस्तान बनणार आहे. बाकी हे तर व्हरायटी झाड आहे. ते मग एक
कसे होणार, काहीच समजत नाहीत. भारतामध्ये एकच धर्म होता, त्यांना म्हटले जाते -
अद्वैत मत वाले देवता. द्वैत अर्थात दैत्य. बाबा म्हणतात - तुमचा हा धर्म खूप सुख
देणारा आहे.
तुम्ही जाणता की
पुनर्जन्म घेऊन आपल्याला पुन्हा ८४ जन्म भोगायचे आहेत. निश्चय असावा की आम्हीच ८४
जन्म भोगले आहेत. आम्हालाच जायचे आहे आणि परत यायचे आहे. भारतवासियांनाच समजावून
सांगतात की, तुम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता तुमचा हा अनेक जन्मांतील शेवटचा
जन्म आहे. फक्त एकालाच सांगत नाहीत, पांडव सेनेला समजावून सांगतात की तुम्ही पंडे (मार्गदर्शक)
आहात. तुम्ही रूहानी यात्रा शिकवता म्हणूनच ‘पांडव सेना’ म्हटले जाते. आता ना
कौरवांचे राज्य आहे, ना पांडवांचे राज्य आहे. ते देखील प्रजा तुम्ही देखील प्रजा
आहात. म्हणतात कौरव-पांडव भाऊ-भाऊ, पांडवांच्या बाजूने परमपिता परमात्मा आहेत.
बाबाच येऊन मायेवर विजय प्राप्त करायला शिकवतात. तुम्ही आदि सनातन देवी-देवता
धर्माचे अहिंसक आहात. अहिंसा परमो धर्म. मुख्य गोष्ट आहे - काम-कटारी चालवायची नाही.
भारतवासी समजतात की गाईची हत्या न करणे - हीच अहिंसा आहे; परंतु बाबा म्हणतात - काम
कटारी चालवू नका, यालाच मोठ्यात मोठी हिंसा म्हटले जाते. सतयुगामध्ये ना काम-कटारी
चालते, ना भांडण-तंटा चालतो. इथे तर दोन्ही आहेत. काम-कटारीच आदि-मध्य-अंत दुःख देते.
तुम्ही शिडी उतरता. ८४ जन्म तुम्ही भारतवासियांनी घेतले आहेत. या लक्ष्मी-नारायणाचे
राज्य होते, मग तुम्ही पुनर्जन्म घेता. एक-एक जन्म म्हणजे एक-एक पायरी आहे. येथून
तुम्ही एकदम वरती उडी मारता. ८४ पायऱ्या उतरण्यासाठी तुम्हाला ५ हजार वर्षे लागतात
आणि येथून पुन्हा तुम्ही सेकंदामध्ये वर चढता. सेकंदामध्ये जीवनमुक्ती कोण देतात?
बाबा. आता सर्वजण एकदम जमिनदोस्त झाले आहेत. आता बाबा म्हणतात - फक्त माझी आठवण करा.
हे बुद्धीमध्ये लक्षात ठेवायचे आहे की, आता नाटक पूर्ण झाले आहे, आपल्याला परत घरी
जायचे आहे. आपल्याला आपल्या बाबांची आणि घराची आठवण करायची आहे. आधी बाबांची आठवण
करा, तेच तुम्हाला घराचा रस्ता दाखवतात. बाबांच्या आठवणीने विकर्म विनाश होतील.
ब्रह्माची आठवण केल्याने एकही पाप नष्ट होणार नाही. पतित-पावन परमात्माच आहेत. ते
कसे पावन बनवतात - हे दुनियेतील कोणीही समजू शकत नाही. बाबांना येऊन स्वर्गाची
स्थापना जरूर करायची आहे. बाबा आले आहेत तर तुम्ही मुले जयंती साजरी करता. कधी आले,
ते मात्र सांगू शकत नाही की याच वेळी, याच तिथी-तारखेला आले. शिवबाबा कधी आले, हे
कसे सांगू शकणार. साक्षात्कार खूप होतात. पूर्वी आम्ही सर्वव्यापी समजत होतो किंवा
म्हणायचो की, आत्मा सो परमात्मा आहे. आता यथार्थ रित्या समजले आहे. बाबा दिवसेंदिवस
गूढ गोष्टी ऐकवत राहतात. तुम्ही साधारण मुले किती मोठे नॉलेज शिकत आहात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) विथ
रिस्पेक्ट (सन्मानपूर्वक) पास होण्यासाठी सजेपासून सुटका होण्याचा पुरुषार्थ करायचा
आहे. आठवणीमध्ये राहिल्यानेच स्कॉलरशिप घेण्याचे अधिकारी बनू शकाल.
२) सच्चे-सच्चे पांडव
बनून सर्वांना रूहानी यात्रा घडवायची आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही.
वरदान:-
लाईट हाऊसच्या
स्थितीद्वारे पाप कर्मांना समाप्त करणारे पुण्य आत्मा भव जिथे लाईट असतो तिथे
कोणतेही पाप कर्म होत नाही. तर सदैव लाईट हाऊसच्या स्थितीमध्ये राहिल्यामुळे माया
कोणतेही पाप कर्म करून घेऊ शकणार नाही, सदैव पुण्य-आत्मा बनाल. पुण्य-आत्मा
संकल्पामध्ये देखील कोणतेही पाप कर्म करू शकत नाही. जिथे पाप होते तिथे बाबांची
आठवण नसते. तर दृढ संकल्प करा की, मी पुण्य-आत्मा आहे, पाप माझ्यासमोर येऊ शकत नाही.
स्वप्न अथवा संकल्पामध्ये सुद्धा पापाला थारा देऊ नका.
बोधवाक्य:-
जे प्रत्येक
दृश्याला साक्षी होऊन पाहतात तेच सदैव हर्षित राहतात.
े अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा” निश्चयबुद्धी
मुले सदैव हर्षित आणि निश्चिंत राहतात. चिंता खुशीला नष्ट करते आणि निश्चिंत असाल
तर सदैव खुशी राहील, जेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये - ‘का झाले’, ‘कसे झाले’, ‘काय
होईल!’... हे प्रश्न येतात तेव्हाच चिंता होते. ‘काय’, ‘का’, ‘कसे’ - या चिंतेच्या
लाटा आहेत. बरेचजण मग म्हणतात की, माझ्या सोबतच असे का होते?, माझ्याच मागे हे बंधन
का आहे! माझ्याच मागे माया का येते! माझाच हिशोब कडक आहे, असे का?, तर ‘का’ येणे
अर्थात चिंतेची लाट. जे या चिंतांपासून दूर आहेत तेच निश्चिंत आहेत.