06-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांकडे जी वखार (ज्ञानाचे कोठार) आहे, ते संपूर्ण तुम्हाला मिळाले आहे, त्याला तुम्ही धारण करा आणि इतरांकडूनही करवून घ्या”

प्रश्न:-
त्रिकालदर्शी बाबा ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणत असून सुद्धा उद्याची गोष्ट आज सांगत नाहीत - असे का?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मुलांनो, जर मी आधीच सांगितले तर ड्रामातील मजाच निघून जाईल. तसा कायदा सांगत नाही. सर्व काही जाणत असताना सुद्धा मी ड्रामाच्या वश आहे. अगोदर सांगू शकत नाही, त्यामुळे ‘काय होईल’, ह्याची तुम्ही चिंता सोडून द्या.

गीत:-
मरना तेरी गली में…

ओम शांती।
हे आहेत पारलौकिक आत्म्यांचे पिता. आत्म्यांशीच बोलतात. त्यांना ‘बाळांनो-बाळांनो’ असे म्हणण्याची सवय होते. भले शरीर मुलीचे आहे परंतु आत्मे तर सर्व मुलेच आहेत. प्रत्येक आत्मा वारसदार आहे, अर्थात वारसा घेण्याचे अधिकारी आहेत. बाबा येऊन म्हणतात - ‘मुलांनो, तुम्हा प्रत्येकाला वारसा घेण्याचा अधिकार आहे’. बेहदच्या बाबांची खूप आठवण करायची आहे यातच मेहनत आहे. बाबा परमधामहून आम्हाला शिकविण्याकरिता आले आहेत. साधू-संत तर आपल्या घरून येतात किंवा कोणत्यातरी गावातून येतात. बाबा तर परमधामहून आम्हाला शिकविण्याकरिता येतात. हे कोणालाच माहिती नाही. बेहदचे बाबा तेच पतित-पावन, गॉडफादर आहेत. त्यांना ज्ञानाचा सागर, (ओशन ऑफ नॉलेज सुद्धा) म्हणतात, ऑथॉरिटी आहेत ना. कोणते नॉलेज आहे? ईश्वरीय नॉलेज आहे. बाबा आहेत मनुष्य सृष्टीचे बीज रूप. सत्-चित्-आनंद स्वरूप. त्यांची खूप मोठी महिमा आहे त्यांच्यापाशी ही खूप वखार (ज्ञानाचे कोठार)

आहे. कोणाचे दुकान असेल तर ते म्हणतील आमच्या दुकानामध्ये ही-ही व्हरायटी आहे. बाबा देखील म्हणतात - मी ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर, शांतीचा सागर आहे. माझ्याकडे ही सर्व सामग्री आहे. मी संगमावर डिलेव्हरी करण्यासाठी येतो, जे काही माझ्याकडे आहे ते सर्व डिलेव्हरी करतो; मग जो जितके धारण करेल अथवा जितका पुरुषार्थ करेल! मुले जाणतात की, बाबांकडे काय-काय आहे आणि हे अचूक जाणतात. आजकाल कोणी कोणाला आपल्याकडे नेमके काय आणि किती आहेत ते सांगत नाहीत. गायले गेले आहे - ‘किनकी दबी रही धूल में…’ या सर्व आत्ताच्या गोष्टी आहेत. आग लागेल आणि सगळेच भस्म होतील. राजांकडे महालाच्या तळाशी खूप मोठी मजबूत तळघरें असतात. भले भूकंप होऊ देत, मोठी आग लागू देत, तरीसुद्धा आतून सुरक्षित बाहेर पडतात. तुम्ही मुले जाणता इथली कोणतीही गोष्ट तिथे उपयोगाला येत नाही. सर्व खाणी देखील नव्याने भरून जातात. सायन्स देखील रिफाईन होऊन (प्रगत होऊन) तुमच्या उपयोगाला येते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आता ज्ञान आहे. मुले जाणतात आम्ही सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतो. शेवटचा छोटासा भाग आहे, त्याला देखील जाणतील. बाबा अगोदरच सगळे कसे बरे सांगतील; बाबा म्हणतात - मी देखील ड्रामाच्या वश आहे, जे ज्ञान आत्तापर्यंत मिळाले आहे तेच ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जो सेकंद निघून गेला, त्याला ड्रामा समजायचे आहे. बाकी जे उद्या होईल ते बघता येईल. उद्याची गोष्ट आज सांगणार नाहीत. या ड्रामाच्या रहस्याला माणसे समजत नाहीत. कल्पाचा कालावधीच किती प्रदीर्घ लिहिला आहे. या ड्रामाला समजून घेण्यासाठी देखील हिंमत पाहिजे. आई मेली तरीसुद्धा हलवा खा... समजतात मेले आणि जाऊन दुसरा जन्म घेतला. आम्ही का रडायचे? बाबांनी समजावले आहे की वर्तमानपत्रामध्ये तुम्ही लिहू शकता, ही प्रदर्शनी आजपासून ५००० वर्षांपूर्वी याच तारखेला, याच ठिकाणी, अशाच पद्धतीने झाली होती. हे लिहिले पाहिजे की, या दुनियेचा इतिहास-भूगोल रिपीट होत आहे. हे तर जाणता - ही दुनिया थोडे दिवस बाकी आहे, हे सर्व नष्ट होतील. आम्ही तर पुरुषार्थ करून विकर्माजीत बनू, मग द्वापरपासून विक्रम संवत सुरू होते अर्थात विकर्म होण्याचे संवत! या वेळी तुम्ही विकर्मांवर विजय प्राप्त करता तर विकर्माजीत बनता. पाप-कर्मांना श्रीमताने जिंकून विकर्माजीत बनता. तिथे तुम्ही आत्म-अभिमानी असता. तिथे देह-अभिमान असत नाही. कलियुगामध्ये देह-अभिमान आहे. संगमावर तुम्ही देही-अभिमानी बनता. परमपिता परमात्म्याला सुद्धा जाणता. हा आहे शुद्ध अभिमान. तुम्ही ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहात. तुम्ही सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण आहात. हे नॉलेज फक्त तुम्हाला मिळते, दुसऱ्या कोणालाच मिळत नाही. तुमचे हे सर्वोत्तम कुळ आहे. गायले देखील जाते अतींद्रिय सुख गोपी वल्लभच्या मुलांना विचारा. तुम्हाला आता लॉटरी मिळाली आहे. एखादी वस्तू मिळते, तेव्हा त्याचा इतका आनंद होत नाही. परंतु जेव्हा गरीबा पासून श्रीमंत बनतात तेव्हा अत्यानंद होतो. तुम्ही देखील जाणता जितका आपण पुरुषार्थ करू तितका बाबांकडून राज्याचा वारसा घेऊ. जो जितका पुरुषार्थ करेल तितके मिळवेल. मुख्य गोष्ट बाबा म्हणतात - मुलांनो, आपल्या मोस्ट बिलवेड (अतिप्रिय) बाबांची आठवण करा. ते सर्वांचे अतिप्रिय बाबा आहेत.

तेच येऊन सर्वांना सुख, शांती देतात. आता देवी-देवतांची राजधानी स्थापन होत आहे. तिथे राजा-राणी असत नाहीत. तिथे म्हणणार महाराजा-महाराणी. जर भगवान-भगवती म्हटले तर मग यथा राजा-राणी तथा प्रजा, सर्व भगवान-भगवती होतील म्हणून भगवान-भगवती म्हटले जात नाही. भगवान एक आहेत. मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. सूक्ष्म वतनवासी ब्रम्हा, विष्णू, शंकराला देखील देवता म्हणतात. स्थूलवतनवासी असणाऱ्याला आपण भगवान-भगवती कसे म्हणणार. उच्च ते उच्च आहे मूलवतन नंतर मग सूक्ष्मवतन, हे साकारवतन आहे तिसऱ्या नंबरवर. हे तुमच्या बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. आम्हा आत्म्यांचे पिता शिवबाबाच आहेत आणि मग शिक्षक देखील आहेत, गुरु देखील आहेत. सोनार, बॅरिस्टर इत्यादी सर्व काही आहेत. सर्वांना रावणाच्या जेलमधून सोडवतात. शिवबाबा किती मोठे बॅरिस्टर आहेत. तर अशा बाबांना विसरायचे कशाला. असे का म्हणता की, बाबा आम्ही विसरून जातो. मायेची खूप वादळे येतात. बाबा म्हणतात हे तर होणारच. काहीतरी मेहनत करावी लागेल. हे आहे माये सोबत युद्ध. तुम्हा पांडवांचे काही कौरवांसोबत युद्ध नाही आहे. पांडव कसे युद्ध करतील. मग तर हिंसक युद्ध होईल. बाबा कधी हिंसा शिकवत नाहीत. काहीही समजू शकत नाहीत. वास्तविक आपले कोणते युद्ध नाहीये. बाबा फक्त युक्ती सांगतात की माझी आठवण करा, मायेचा वार होणार नाही. यावर देखील एक कहाणी आहे, विचारले - आधी सुख हवे की दुःख? तर बोललात सुख. सतयुगामध्ये दुःख होऊ शकत नाही.

तुम्ही जाणता - यावेळी सर्व सीता रावणाच्या शोकवाटीकेमध्ये आहेत. ही सारी दुनिया सागराच्या मध्यभागी एक लंका आहे. आता सर्व रावणाच्या जेलमध्ये पडले आहेत. सर्वांची सद्गती करण्यासाठी बाबा आले आहेत. सर्व शोक वाटिकेमध्ये आहेत. स्वर्गामध्ये आहे सुख, नरकामध्ये आहे दुःख. याला शोक वाटिका म्हणू. तो आहे अशोक, स्वर्ग. खूप मोठे अंतर आहे. तुम्हा मुलांना प्रयत्न करून बाबांची आठवण करायला हवी तर आनंदाचा पारा चढेल. बाबांच्या मतावर चालला नाहीत तर सावत्र झालात. मग प्रजेमध्ये निघून जाल. सख्खे असाल तर राजधानीमध्ये याल. राजधानीमध्ये यायची इच्छा असेल तर श्रीमतावर चालावे लागेल. श्रीकृष्णाचे मत मिळत नाही. मत आहेतच दोन. आता तुम्ही श्रीमत घेता मग सतयुगामध्ये त्याचे फळ भोगता. मग द्वापरमध्ये रावणाचे मत मिळते. सर्व रावणाच्या मतावर असुर बनतात. तुम्हाला मिळते ईश्वरीय मत. मत देणारे एक बाबाच आहेत. ते आहेत ईश्वर. तुम्ही ईश्वरीय मताद्वारे किती पवित्र बनता. पहिले पाप आहे - विषय सागरामध्ये गटांगळ्या खाणे. देवता विषय सागरामध्ये गटांगळ्या खाणार नाहीत. म्हणतील तिथे मुले होत नाहीत काय? मुले का नाही होत! परंतु ती आहेच व्हाईसलेस दुनिया, संपूर्ण निर्विकारी. तिथे हे काही विकार असत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे - देवता फक्त आत्म-अभिमानी आहेत, परमात्म-अभिमानी नाहीत. तुम्ही आत्म-अभिमानी देखील आहात, परमात्म-अभिमानी देखील आहात.

या अगोदर दोन्ही नव्हता. सतयुगामध्ये परमात्म्याला जाणत नाहीत. आत्म्याला जाणतात की, मी आत्मा हे जुने शरीर सोडून मग जाऊन नवीन शरीर घेणार. अगोदरच माहित होते, आता जुने सोडून नवीन घ्यायचे आहे. मूल होते तेव्हा देखील पहिले साक्षात्कार होतो. योगबलाद्वारे तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता. तर मग योगबलाने मुले होऊ शकत नाहीत काय! योगबलाने तुम्ही कोणतीही गोष्ट पावन बनवू शकता. परंतु तुम्ही आठवण विसरून जाता. तर कोणाचा अभ्यास होऊन जातो. बरेच असे संन्यासी लोक देखील असतात ज्यांना भोजनाची कदर असते, तर त्यावेळी अनेक मंत्र वाचून मग जेवण जेवतात. तुम्हाला देखील पथ्य तर सांगितले आहे. मांस-मदिरा काहीही सेवन करायचे नाही. तुम्ही देवता बनत आहात ना. देवता कधी कचरापट्टी (अशुद्ध भोजन) खात नाहीत. तर असे पवित्र बनायचे आहे. बाबा म्हणतात - माझ्या द्वारे तुम्ही मला जाणल्याने सर्व काही जाणाल. मग जाणण्याचे बाकी काहीही राहणार नाही. सतयुगामध्ये मग शिक्षण देखील वेगळे असते. या मृत्यू लोकाच्या शिक्षणाचा आता अंत आहे. मृत्यूलोकातील हा सर्व कारभार संपून मग अमरलोकचा कारभार सुरु होईल. इतका मुलांना नशा चढला पाहिजे. तुम्ही अमर लोकचे मालक होता, तुम्हा मुलांना अतींद्रिय सुख, परम सुखामध्ये राहिले पाहिजे. परमपिता परमात्म्याची आम्ही मुले आहोत अथवा स्टुडंट आहोत. परमपिता परमात्मा आम्हाला आता घरी घेऊन जातील, यालाच परमानंद म्हटले जाते. सतयुगामध्ये या गोष्टी असत नाहीत. हे तुम्ही आताच ऐकता, यावेळी ईश्वरीय फॅमिलीचे आहात. आताचेच गायन आहे - ‘अतिंद्रीय सुख गोप-गोपींना विचारा’. परमधामचे राहणारे बाबा येऊन आमचे पिता, शिक्षक, गुरु बनतात. तिघेही सर्व्हंट झाले. कोणताही अभिमान बाळगत नाहीत. म्हणतात - मी तुमची सेवा करून तुम्हाला सर्व काही देऊन निर्माणधाममध्ये जाऊन बसेन, तर सर्व्हंट झालो ना. व्हाईसरॉय इत्यादी नेहमी सही करतात तेव्हा ‘ओबिडियंट सर्व्हंट’ असे लिहितात. बाबा देखील निराकार, निरहंकारी आहेत. कसे बसून शिकवत आहेत. इतके उच्च शिक्षण इतर कोणीही शिकवू शकणार नाही. इतके पॉईंट्स कोणी देऊ शकणार नाही. मनुष्य तर जाणूच शकणार नाहीत, यांना कोणत्या गुरूने शिकवलेले नाहीये. गुरु असता तर अनेकांचा असला असता. एकाचाच असतो का? हे बाबाच पतितांना पावन बनवतात. आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहेत. बाबा म्हणतात मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येतो. म्हणतात ना - ‘बाबा, आम्ही कल्पापूर्वी देखील भेटलो होतो’. बाबाच येऊन पतितांना पावन बनवतील. २१ जन्मांसाठी तुम्हा मुलांना पावन बनवितो. तर या सर्वांची धारणा केली पाहिजेत आणि मग सांगितल्या पाहिजेत - बाबांनी काय समजावून सांगितले आहे. बाबांकडून आपण भविष्य २१ जन्मांचा वारसा घेतो. याची आठवण राहिल्यामुळे मग आनंदामध्ये रहाल. हा परम-आनंद आहे. ‘मास्टर नॉलेजफुल’, ‘ब्लिसफुल’ ही सर्व वरदाने तुम्हाला आता बाबांकडून मिळत आहेत. सतयुगामध्ये तर बुद्धू असणार. या लक्ष्मी-नारायणाला तर अजिबात नॉलेज नाहीये. यांना नॉलेज असले असते तर ते परंपरेने चालत आले असते. तुमच्या सारखा परम-आनंद देवतांना देखील होत नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) देवता बनण्यासाठी खाण्या-पिण्याची खूप शुद्धता ठेवायची आहे. खूपच पथ्यानुसार चालायचे आहेत. योगबलाद्वारे भोजनाला दृष्टी देऊन शुद्ध बनवून स्वीकार करायचे आहे.

२) परमपिता परमात्म्याची आपण मुले अथवा स्टुडंट आहोत, ते आता आपल्याला आपल्या घरी घेऊन जातील, याच नशेमध्ये राहून परम सुख, परमानंदाचा अनुभव करायचा आहे.

वरदान:-
सेवेच्या ध्यासाद्वारे लौकिकला अलौकिक प्रवृत्तीमध्ये परिवर्तन करणारे निरंतर सेवाधारी भव

सेवाधारीचे कर्तव्य आहे निरंतर सेवेमध्ये राहणे - भले मनसा सेवा असो, अथवा वाचा असो नाहीतर कर्मणा सेवा असो. सेवाधारी कधीही सेवेला स्वतःपासून वेगळे समजत नाहीत. ज्यांच्या बुद्धीमध्ये सदैव सेवेचा ध्यास असतो त्यांची लौकिक प्रवृत्ती बदलून ईश्वरीय प्रवृत्ती होते. सेवाधारी घराला घर समजत नाहीत परंतु सेवा स्थान समजून चालतात. सेवाधारीचा मुख्य गुण आहे - त्याग. त्याग वृत्ती असणारे प्रवृत्तीमध्ये तपस्वीमूर्त बनून राहतात ज्यामुळे स्वतः सेवा होते.

बोधवाक्य:-
आपल्या संस्कारांना दिव्य बनवायचे असेल तर मन-बुद्धीला बाबांसमोर समर्पित करा.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

कोणत्याही आत्म्याला दोन क्षण गोड दृष्टी द्या, गोड शब्द बोला तर त्या आत्म्याला कायमसाठी भरपूर कराल. ही दोन क्षणांची मधुर दृष्टी, मधुर बोल त्या आत्म्याची सृष्टी बदलेल. दोन मधुर शब्द कायमसाठी बदलण्याच्या निमित्त बनतील.