06-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आठवणीमध्ये राहण्याची मेहनत करा तर पावन बनत जाल, आता बाबा तुम्हाला शिकवत आहेत मग सोबत घेऊन जातील”

प्रश्न:-
तुम्हाला कोणता संदेश सर्वांना द्यायचा आहे?

उत्तर:-
‘आता घरी जायचे आहे म्हणून पावन बना. पतित-पावन बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर पावन बनाल’; हा संदेश सर्वांना द्या. बाबांनी आपला परिचय तुम्हा मुलांना दिला आहे, आता तुमचे कर्तव्य आहे बाबांचा शो करणे (बाबांना प्रत्यक्ष करणे). म्हटले देखील जाते - ‘सन शोज फादर’.

गीत:-
मरना तेरी गली में…

ओम शांती।
मुलांनी गाण्याचा अर्थ ऐकला की बाबा, आम्ही तुमच्या रुद्रमाळेमध्ये ओवले जाणारच. ही गाणी तर भक्तीमार्गासाठी बनलेली आहेत, जी काही दुनियेमध्ये सामुग्री आहे, जप-तप, पूजा-पाठ हा सर्व आहे भक्तिमार्ग. भक्ती - रावण राज्य, ज्ञान - राम राज्य. ज्ञानाला म्हटले जाते नॉलेज, शिक्षण. भक्तीला शिक्षण म्हटले जात नाही. त्यामध्ये कोणतेही ध्येय नाही आहे की आपण काय बनणार, भक्ती काही शिक्षण नाहीये. राजयोग शिकणे हे एक प्रकारचे शिक्षण आहे, शिक्षण एका ठिकाणी शाळेमध्ये शिकले जाते. भक्तीमध्ये तर दारोदार धक्के खातात. शिक्षण अर्थात शिक्षण. तर शिक्षण व्यवस्थित शिकले पाहिजे. मुले जाणतात आपण स्टूडंट आहोत. असे खुपजण आहेत जे स्वतःला स्टूडंट समजत नाहीत, कारण शिकतच नाहीत. ना बाबांना पिता मानतात, ना शिवबाबांना सद्गती दाता मानतात. असे देखील आहेत बुद्धीमध्ये काहीच जात नाही, राजधानी स्थापन होत आहे ना. त्यामध्ये सर्व प्रकारचे असतात. बाबा आले आहेत पतितांना पावन बनविण्यासाठी. बाबांना बोलावतात हे - पतित-पावन या. आता बाबा म्हणतात - पावन बना. बाबांची आठवण करा. प्रत्येकाला बाबांचा संदेश द्यायचा आहे. यावेळी भारतच वेश्यालय आहे. भारतच अगोदर शिवालय होता. आता दोन्ही ताज नाही आहेत. हे देखील तुम्ही मुलेच जाणता आता पतित-पावन बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही पतितापासून पावन बनाल. आठवणी मध्येच मेहनत आहे. फार थोडेजण आहेत जे आठवणीमध्ये राहतात. भक्त माळा देखील थोड्याजणांचीच आहे ना. धन्ना भक्त, नारद, मीरा इत्यादींची नावे आहेत. यामध्ये देखील सर्वच काही येऊन शिकणार नाहीत. कल्पापूर्वी जे शिकले आहेत, तेच येतील. म्हणतात देखील - ‘बाबा, आम्ही तुम्हाला शिकण्यासाठी किंवा आठवणीची यात्रा शिकण्यासाठी कल्पापूर्वी सुद्धा भेटलो होतो’. आता बाबा आलेच आहेत तुम्हा मुलांना घेऊन जाण्यासाठी. म्हणतात - तुमची आत्मा पतित आहे म्हणून बोलावता की, येऊन पावन बनवा. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा, पवित्र बना. बाबा शिकवतात आणि मग सोबतही घेऊन जातील. मुलांना आतून खूप आनंद झाला पाहिजे. बाबा शिकवत आहेत, कृष्णाला पिता म्हणणार नाही. कृष्णाला पतित-पावन म्हणता येणार नाही. हे कोणालाच माहित नाही की पिता कोणाला म्हटले जाते आणि मग ते ज्ञान कसे देतात. हे तुम्हीच जाणता. बाबा आपला परिचय मुलांनाच देतात . नवीन जे आहेत त्यांना कोणाला बाबा भेटू शकत नाहीत. बाबा म्हणतात - सन शोज फादर. मुलेच बाबांचा शो करतील (बाबांना प्रत्यक्ष करतील). बाबांची इतर कोणालाही भेटण्याची किंवा बोलण्याची सुद्धा इच्छा नाही. भले इतका वेळ बाबा नवीन असणाऱ्यांना भेटत होते, ड्रामामध्ये होते, पुष्कळ येत होते. मिलेट्री वाल्यांसाठी देखील बाबांनी समजावून सांगितले आहे, त्यांचा उद्धार करायचा आहे, त्यांना देखील धंदा तर करायचाच आहे. नाहीतर शत्रु हल्ला करतील. फक्त बाबांची आठवण करायची आहे. गीतेमध्ये आहे - जे युद्धाच्या मैदानावर शरीर सोडतील, ते स्वर्गामध्ये जातील. परंतु असे तर जाऊ शकत नाहीत. स्वर्ग स्थापन करणारे देखील जेव्हा येतील तेव्हाच जातील. स्वर्ग काय चीज आहे, हे देखील कोणी जाणत नाहीत. आता तुम्ही मुले ५ विकार रुपी रावणा सोबत युद्ध करता, बाबा म्हणतात अशरीरी भव. स्वतःला आत्मा निश्चय करून माझी आठवण करा. दुसरे कोणीही असे म्हणू शकत नाही.

सर्वशक्तिमान एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणालाही म्हणू शकत नाही. ब्रह्मा-विष्णू-शंकराला ‘श्री’ म्हणू शकत नाही. ऑलमाइटी (सर्वशक्तिमान) एक बाबाच आहेत. वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी, ज्ञानाचा सागर एका बाबांनाच म्हटले जाते. हे जे साधु-संत इत्यादी आहेत ते आहेत शास्त्रांची ऑथॉरिटी. भक्तीची देखील ऑथॉरिटी म्हणता येणार नाही. शास्त्रांची ऑथॉरिटी जे आहेत, त्यांचे सर्वकाही शास्त्रांवर अवलंबून आहे. समजतात - भक्तीचे फळ भगवंतालाच द्यायचे आहे. भक्ती कधी सुरू झाली, कधी पूर्ण होणार आहे, हेच ठाऊक नाहीये. भक्त समजतात की, भक्तीने भगवान राजी होईल (संतुष्ट होईल). भगवंताला भेटण्याची इच्छा असते, परंतु तो कोणाच्या भक्तीने राजी होईल का? जरूर त्याचीच भक्ती कराल तेव्हाच तर राजी होईल ना. तुम्ही शंकराची भक्ती कराल तर मग पिता राजी कसे होतील, काय हनुमानाची भक्ती कराल आणि पिता राजी होईल काय? साक्षात्कार होतो, बाकी मिळत काहीच नाही. बाबा म्हणतात - भले मी साक्षात्कार घडवतो, परंतु असे नाही की मला येऊन भेटाल; असे नाही. तुम्ही मला भेटता. भक्त भक्ती करतात भगवंताला भेटण्यासाठी. म्हणतात - माहित नाही भगवान कोणत्या रूपामध्ये येऊन भेटतील, म्हणून त्याला म्हटले जाते ब्लाइंड-फेथ. आता तुम्ही बाबांना भेटला आहात. तुम्ही जाणता ते निराकार बाबा जेव्हा शरीर धारण करतील तेव्हाच आपला परिचय देतील की, ‘मी तुमचा पिता आहे’. ५ हजार वर्षांपूर्वी देखील तुम्हाला राज्य-भाग्य दिले होते मग तुम्हाला ८४ जन्म घ्यावे लागले. हे सृष्टी चक्र फिरत राहते. द्वापर नंतरच इतर धर्म येतात, येऊन आपला-आपला धर्म स्थापन करतात. यामध्ये काही बढाई करण्याची गोष्ट नाहीये. बढाई तर कोणाचीच नाहीये. ब्रह्माची बढाई तेव्हा आहे जेव्हा बाबा येऊन प्रवेश करतात. नाही तर हे सोनाराचा धंदा करत होते, यांना देखील थोडेच माहीत होते की, आपल्यामध्ये भगवान येतील. बाबांनी प्रवेश करून सांगितले आहे की कसा मी यांच्यामध्ये प्रवेश केला. कसे यांना (ब्रह्मा बाबांना) दाखवले की, ‘माझे ते तुझे, तुझे ते माझे, पाहून घे. तू आपल्या तन-मन-धनाने माझा मदतगार बनतोस, तर त्याच्या बदल्यात तुला हे मिळेल’. बाबा म्हणतात - मी साधारण तनामध्ये प्रवेश करतो, जो आपल्या जन्मांना जाणत नाही. परंतु मी केव्हा येतो, कसा येतो, हे कोणालाच माहीत नाही आहे. आता तुम्ही बघत आहात साधारण तनामध्ये बाबा आले आहेत. यांच्याद्वारे आपल्याला ज्ञान आणि योग शिकवत आहेत. ज्ञान तर खूप सोपे आहे. नरकाचे फाटक बंद होऊन, स्वर्गाचे फाटक कसे उघडते - हे देखील तुम्ही जाणता. द्वापरमध्ये रावण राज्य सुरू होते अर्थात नरकाचे द्वार उघडते. नवीन आणि जुन्या दुनियेला अर्ध्या-अर्ध्या भागात विभागले जाते. तर आता बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांना पतितापासून पावन होण्याची युक्ती सांगतो. बाबांची आठवण करा तर जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील. या जन्मामध्ये देखील पापे करतात. लक्षात तर राहतात ना - काय पापे केली आहेत? काय-काय दान-पुण्य केले आहे? याला (ब्रह्मा बाबांना) आपल्या बालपणीचे सर्व माहित आहे ना. श्रीकृष्णाचेच नाव आहे सावळा आणि गोरा, श्याम-सुंदर. त्याचा अर्थ कधीच कोणाच्या बुद्धीमध्ये येणार नाही. नाव श्याम-सुंदर आहे त्यामुळे चित्रांमध्ये काळा बनवला आहे. रघुनाथाच्या मंदिरामध्ये पहाल - तिथे देखील काळाच; हनुमानाचे मंदिर पाहा, तर सर्वांना काळे बनवतात. ही आहेच पतित दुनिया. आता तुम्हा मुलांना चिंता आहे की आपण सावळ्या पासून सुंदर बनावे. त्यासाठी तुम्ही बाबांच्या आठवणी मध्ये राहता. बाबा म्हणतात - हा अंतिम जन्म आहे. माझी आठवण करा तर पापे भस्म होतील. तुम्ही जाणता बाबा आले आहेत घेऊन जाण्यासाठी. तर जरूर शरीर इथेच सोडाल. शरीरासह थोडेच घेऊन जातील. पतित आत्मे देखील जाऊ शकत नाहीत. जरूर बाबा पावन बनण्याची युक्ती सांगतील. तर बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. भक्ती मार्गामध्ये आहे अंधश्रद्धा. ‘शिव-काशी’, म्हणतात आणि मग म्हणतात - शिवाने गंगा आणली, भागीरथामधून गंगा प्रकट झाली. आता डोक्यातून (जटांमधून) पाणी कसे येईल. भागीरथ काही वर पर्वतावर बसला आहे काय, ज्याच्या जटांमधून गंगा येईल! पाऊस जो पडतो, ते पाणी सागरामधून शोषले जाते, जे साऱ्या दुनियेला पाणी जाते. नद्या तर सर्वत्र आहेत. पर्वतांवर बर्फ जमा होतो, ते देखील पाणी वाहून येत राहते. पर्वतांवर गुहांमध्ये जे पाणी असते, ते मग विहिरींमध्ये येत राहते. ते देखील पावसाच्या आधारावर आहे. पाऊस पडला नाही तर विहिरी देखील सुकून जातात.

म्हणतात देखील - बाबा, आम्हाला पावन बनवून स्वर्गामध्ये घेऊन जा. आशाच मुळी स्वर्ग, कृष्णपुरीची आहे. विष्णुपुरी विषयी कोणालाच माहीत नाही आहे. श्रीकृष्णाचे भक्त म्हणतील - ‘जिथे बघतो कृष्णच कृष्ण आहे’. अरे, जर का परमात्मा सर्वव्यापी आहे तर तुम्ही असे का म्हणत नाही की, जिकडे पाहतो परमात्माच परमात्मा आहे. परमात्म्याचे भक्त मग असे म्हणतात की, ही सर्व त्यांचीच रूपे आहेत. या सर्व लीला तेच करत आहेत. भगवंताने अवतार घेतले आहेत, लीला करण्यासाठी. तर जरूर आता लीला करतील ना. परमात्म्याची दुनिया स्वर्गामध्ये पहा, तिथे घाणीची काही गोष्टच नसते. इथे तर घाणच घाण आहे आणि मग इथे म्हणतात परमात्मा सर्वव्यापी आहे. परमात्माच सुख देतात. बाळ जन्माला आले आनंद झाला, मेला तर दुःख होईल. अरे, भगवंताने तुम्हाला कोणती चीज दिली आणि मग घेतली तर यामध्ये तुम्हाला रडण्याची काय गरज आहे! सतयुगामध्ये हे रडणे इत्यादी सारखे दुःख असत नाही. मोहजीत राजाचा दृष्टांत दाखवलेला आहे. हे सर्व आहेत खोटे दृष्टांत. त्यामध्ये काहीच सार नाही. सतयुगामध्ये ऋषी-मुनी असत नाहीत. आणि इथे देखील अशी गोष्ट असू शकत नाही. असा कोणी मोहजीत राजा असू शकत नाही. भगवानुवाच - ‘यादव, कौरव, पांडव क्या करत भये?’ तुमचा बाबांसोबत योग आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांद्वारे भारताला स्वर्ग बनवतो. आता जे पवित्र बनतात तेच पवित्र दुनियेचे मालक बनतील. कोणीही भेटले तर त्यांना हेच सांगा - भगवान म्हणतात मामेकम् (मज एकाची) आठवण करा. माझ्यावर प्रेम करा, दुसऱ्या कोणाचीही आठवण करू नका. ही आहे अव्यभिचारी आठवण. इथे काही जल इत्यादीचा अभिषेक करायचा नाहीये. भक्तिमार्गामध्ये हा (ब्रह्मा बाबा) धंदा इत्यादी करत असताना, आठवण करत होता ना. गुरु लोक सुद्धा म्हणतात - ‘माझी आठवण करा, आपल्या पतीची आठवण करू नका’. तुम्हा मुलांना किती गोष्टी समजावून सांगतात. मूळ गोष्ट आहे - सर्वांना संदेश द्या - बाबा म्हणतात मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबा म्हणजेच भगवान. भगवान तर निराकार आहेत. श्रीकृष्णाला सगळेच काही भगवान म्हणणार नाहीत. कृष्ण तर लहान मुलगा आहे. शिवबाबा यांच्यामध्ये नसते तर तुम्ही असता काय? शिवबाबांनी यांच्या द्वारे तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे, आपले बनवले आहे. हे माता देखील आहेत, पिता देखील आहेत. माता तर साकारमध्ये पाहिजे ना. ते तर आहेतच पिता. तर अशा गोष्टी चांगल्या रीतीने धारण करा.

तुम्हा मुलांना कधीही कोणत्या गोष्टींमध्ये गोंधळून जायचे नाहीये. शिक्षणाला कधीही सोडायचे नाही. कितीतरी मुले संगदोषामध्ये येऊन रागावून मग आपली पाठशाळा उघडतात. जर आपसामध्ये भांडण-तंटा करून आपली पाठशाळा उघडाल तर हा मूर्खपणा आहे, रागावतात तर पाठशाळा उघडण्याच्या लायकच नाही आहेत. तो तुमचा देह-अभिमान चालणारच नाही कारण मनामध्ये जर शत्रुत्व आहे तर त्याचीच आठवण येत राहील. कोणालाच काहीही समजावून सांगू शकणार नाहीत. असे देखील होते, ज्यांना ज्ञान देता ते वेगाने पुढे निघून जातात, स्वतः मात्र कोसळतात (पतन होते). स्वतः देखील समजतात माझ्यापेक्षा त्यांची अवस्था चांगली आहे. शिकणारा राजा बनतो आणि शिकवणारे दास-दासी बनतात, असे देखील आहेत. पुरुषार्थ करून बाबांच्या गळ्यातील हार बनायचे आहे. बाबा जिवंतपणी मी तुमचा बनलो आहे. बाबांच्या आठवणीनेच बेडा पार होणार आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कधीही कोणत्या गोष्टीमध्ये गोंधळून जायचे नाही. आपसामध्ये रागावून शिक्षण सोडायचे नाही. दुश्मनी करणे हा देखील देह-अभिमान आहे. संगदोषापासून आपली खूप-खूप काळजी घ्यायची आहे. पावन बनायचे आहे, आपल्या वर्तनाद्वारे बाबांचा शो करायचा आहे (बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे).

२) प्रीत-बुद्धी बनून एका बाबांच्या अव्यभिचारी आठवणीमध्ये रहायचे आहे. तन-मन-धनाने बाबांच्या कार्यामध्ये मदतगार बनायचे आहे.

वरदान:-
न्यारे आणि प्यारे बनण्याच्या रहस्याला जाणून राजी राहणारे राजयुक्त भव

जी मुले प्रवृत्तीमध्ये राहत असताना न्यारे आणि प्यारे बनण्याच्या रहस्याला जाणतात ते नेहमी आपण स्वतः देखील आपल्यावर राजी (संतुष्ट) राहतात आणि प्रवृत्तीला देखील संतुष्ट ठेवतात. त्याच सोबत शुद्ध अंत:करण असल्या कारणाने साहेब देखील सदैव त्यांच्यावर राजी (संतुष्ट) राहतात. असे संतुष्ट राहणाऱ्या राजयुक्त मुलांना आपल्या प्रति किंवा अन्य कोणा प्रती कोणाला काजी बनविण्याची गरज राहत नाही कारण ते आपला निर्णय आपणच घेतात म्हणून त्यांना कोणाला काजी, वकील किंवा जज बनविण्याची गरजच नसते.

बोधवाक्य:-
सेवेद्वारे जे आशीर्वाद मिळतात ते आशीर्वादच तंदुरुस्तीचा आधार आहे.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-

ज्याप्रमाणे स्थूल शरीरामध्ये विशेष श्वास चालणे आवश्यक आहे. श्वास नाही तर जीवन नाही, तसा ब्राह्मण जीवनाचा श्वास आहे - पवित्रता. २१ जन्मांच्या प्रारब्धाचा आधार पवित्रता आहे. आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा आधार पवित्र-बुद्धी आहे. संगमयुगी प्राप्तींचा आधार आणि भविष्यामध्ये पूज्य-पद प्राप्त करण्याचा आधार पवित्रता आहे म्हणून पवित्रतेच्या पर्सनॅलिटीला वरदानाच्या रूपामध्ये धारण करा.