06-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - जेव्हा
तुम्ही संपूर्ण पावन बनाल तेव्हाच बाबा तुमची बलिहारी (समर्पण) स्वीकार करतील,
आपल्या मनाला विचारा की, मी किती पावन बनलो आहे!”
प्रश्न:-
तुम्ही मुले
आता अगदी आनंदाने बाबांवर बळी चढता (समर्पित होता) - असे का?
उत्तर:-
कारण तुम्ही
जाणता, आता आपण बलिहार जातो तर बाबा २१ जन्मांसाठी बलिहार जातात. तुम्हा मुलांना हे
माहित आहे की, आता या अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञामध्ये सर्व मनुष्यमात्रांना स्वाहा
व्हायचेच आहे त्यामुळे तुम्ही अगोदरच आनंदाने आपले तन-मन-धन सर्व काही सफल करता.
गीत:-
मुखड़ा देख ले
प्राणी…
ओम शांती।
शिव भगवानुवाच. जरूर आपल्या मुलांप्रतीच नॉलेज शिकवतात अथवा श्रीमत देतात - ‘माझ्या
मुलांनो अथवा हे प्राणी, शरीरातून प्राण निघून जातात किंवा आत्मा निघून जाते, गोष्ट
एकच आहे. हे प्राणी अथवा माझ्या मुलांनो, तुम्ही पाहिले की आपल्या जीवनामध्ये किती
पाप होते आणि किती पुण्य होते! हिशोब तर सांगितला आहे - तुमच्या जीवनामध्ये अर्धा
कल्प पुण्य असते, अर्धा कल्प पाप असते. पुण्याचा वारसा बाबांकडून मिळतो, ज्याला राम
म्हणतात. राम, निराकारला म्हटले जाते, ना की सीता वाला राम. तर आता तुम्ही मुले जी
येऊन ब्रह्मामुखवंशावळी ब्राह्मण बनला आहात, तुमच्या बुद्धीमध्ये आले आहे की, बरोबर
अर्धा कल्प आपण पुण्य आत्माच होतो; मग अर्धा कल्प पाप आत्मा बनलो. आता पुण्य-आत्मा
बनायचे आहे. किती पुण्य-आत्मा बनलो आहोत, ते तर प्रत्येकाने आपल्या मनालाच विचारावे.
पाप-आत्म्यापासून पुण्य-आत्मा कसे बनायचे आहे… ते देखील बाबांनी समजावून सांगितले
आहे. यज्ञ, तप इत्यादीद्वारे तुम्ही पुण्य-आत्मा बनणार नाही, तो आहे भक्तीमार्ग,
याद्वारे कोणताही मनुष्य पुण्य-आत्मा बनत नाही. आता तुम्ही मुले समजता की, आपण
पुण्य-आत्मा बनत आहोत. आसुरी मताद्वारे पाप-आत्मा बनता-बनता शिडी उतरतच आलो आहोत.
किती काळ आपण पुण्य-आत्मा बनतो अथवा सुखाचा वारसा घेतो - हे कुणालाच ठाऊक नाहीये.
त्या पित्याची आठवण तर सर्व मनुष्य करतात, त्यांनाच परमपिता परमात्मा म्हणतात.
ब्रह्मा-विष्णू-शंकराला परमात्मा म्हणणार नाही, तसेच इतर कोणालाच परमात्मा म्हणू
शकत नाही. यावेळी तुम्ही ‘प्रजापिता ब्रह्मा’ भले म्हणता परंतु प्रजापित्याची
भक्तीमार्गामध्ये कधीच आठवण करत नाहीत. सर्वजण आठवण तरीही निराकार बाबांचीच करतात -
‘ओ गॉड फादर’, ‘ओ भगवान’, हेच शब्द निघतात. एकाचीच आठवण करतात. मनुष्य स्वतःला गॉड
फादर म्हणू शकत नाही. ना ब्रह्मा-विष्णू-शंकर स्वतःला गॉड फादर म्हणू शकतात.
त्यांच्या शरीराची नावे तर आहेत ना. एकच गॉड फादर आहेत, त्यांना आपले स्वतःचे शरीर
नाही. भक्तीमार्गामध्ये देखील शिवाची (शिवलिंगाची) खूप पूजा करतात. आता तुम्ही मुले
जाणता - शिवबाबा या शरीराद्वारे आमच्याशी बोलत आहेत - ‘माझ्या मुलांनो’, किती
प्रेमाने सांगतात, समजावून सांगतात, मी सर्वांचा पतित-पावन, सद्गती दाता आहे.
मनुष्य बाबांची महिमा करतात ना परंतु त्यांना हे माहित नाही की ५००० वर्षानंतर
येतात. जरूर जेव्हा कलियुगाचा अंत असेल तेव्हाच तर येतील. आता कलियुगाचा अंत आहे तर
जरूर आता आलेले आहेत. तुम्हाला श्रीमत मिळते, श्रीमत काही श्रीकृष्णाचे नाहीये.
श्रीकृष्णाची आत्मा देखील श्रीमताद्वारे सो देवता बनली होती आणि मग ८४ जन्म घेत आता
तुम्ही आसुरी मताचे बनले आहात. बाबा म्हणतात - मी येतोच तेव्हा जेव्हा तुमचे चक्र
पूर्ण होते. तुम्ही जे सुरुवातीला आला होता, ते तुम्ही आता जडजडीभूत अवस्थेमध्ये
आहात. झाड जुने जडजडीभूत होते तेव्हा पूर्ण झाडच असे होते. बाबा समजावून सांगत आहेत
- तुम्ही तमोप्रधान बनल्यावर सगळेच तमोप्रधान बनले आहेत. हे मनुष्य सृष्टीचे,
व्हरायटी धर्मांचे झाड आहे, याला उलटे झाड म्हणतात, याचे बीज वर आहे. त्या बिजातूनच
पूर्ण झाड तयार होते. मनुष्य म्हणतात देखील - ‘गॉड फादर’. आत्मा म्हणते, आत्म्याचे
नाव आत्माच आहे. आत्मा शरीरामध्ये येते तेव्हा शरीराचे नाव ठेवले जाते, असा खेळ
चालतो. आत्म्यांच्या दुनियेमध्ये खेळ चालत नाही. खेळाची जागाच मुळी ही आहे.
नाटकामध्ये प्रकाश इत्यादी सर्व असते. बाकी जिथे आत्मे राहतात, तिथे सूर्य-चंद्र
नसतात, ड्रामाचा खेळ तिथे चालत नाही. दिवस आणि रात्र इथे होते. सूक्ष्मवतन अथवा
मूलवतनमध्ये दिवस आणि रात्र असत नाही; कर्मक्षेत्र हे आहे. यामध्ये मनुष्य चांगले
कर्म देखील करतात, वाईट कर्म देखील करतात. सतयुग-त्रेतामध्ये चांगली कर्म असतात
कारण तिथे ५ विकार रुपी रावणाचे राज्यच नाहीये. बाबा बसून कर्म, अकर्म, विकर्माचे
रहस्य सांगत आहेत. कर्म तर करायचेच आहे, हे कर्मक्षेत्र आहे. सतयुगामध्ये मनुष्य जे
कर्म करतात ते अकर्म होते. तिथे रावण राज्यच नाही, त्याला हेवन (स्वर्ग) म्हटले जाते.
यावेळी स्वर्गच नाहीये. सतयुगामध्ये एक भारतच होता इतर कोणताही खंड नव्हता. ‘हेवनली
गॉडफादर’ म्हटले जाते, तर बाबा जरूर हेवनच रचतील. हे सर्व देशातील जाणतात की भारत
प्राचीन देश आहे. सुरुवातीला फक्त भारतच होता, हे कोणीही जाणत नाही. आता तर तो भारत
नाही आहे ना. ही आहेच ५ हजार वर्षांची गोष्ट. म्हणतात देखील - क्राईस्टच्या ३ हजार
वर्षांपूर्वी भारत हेवन होता. रचयिता जरूर रचना रचतील. तमोप्रधान बुद्धी
असल्याकारणाने एवढे सुद्धा समजत नाही. भारत तर सर्वात श्रेष्ठ खंड आहे. मनुष्य
सृष्टीचे पहिले कुळ आहे. हा देखील ड्रामा बनलेला आहे. श्रीमंत गरिबांना मदत करतात,
हे देखील चालत आले आहे. भक्तीमार्गामध्ये देखील श्रीमंत लोक गरिबांना दान करतात.
परंतु ही आहेच पतित दुनिया. तर जे मनुष्य, जे काही दान-पुण्य करतात ते पतितच करतात,
आणि ज्यांना दान करतात ते देखील पतितच आहेत. पतित, पतिताला दान करतील, त्याचे फळ ते
काय मिळवतील. भले कितीही दान-पुण्य करत आले आहेत, तरी देखील घसरतच आले आहेत (पतन
होत आले आहेत). भारतासारखा दानी खंड आणखी दुसरा कोणताच नाही. यावेळी तुमचे जे काही
तन, मन, धन आहे, सर्व यामध्ये स्वाहा करता. याला म्हटले जाते - ‘राजस्व अश्वमेध
अविनाशी ज्ञान यज्ञ’. आत्मा म्हणते - हे जे जुने शरीर आहे, याला देखील इथे स्वाहा
करायचे आहे कारण तुम्ही जाणता - साऱ्या दुनियेतील मनुष्य-मात्र यामध्ये स्वाहा
होतात, तर मग का नाही आपण आनंदाने बाबांवर बळी चढावे. आत्मा जाणते - मी बाबांची
आठवण करते. म्हणत देखील आले आहेत - बाबा, तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही बलिहार
जाऊ कारण आता आमच्या बलिहार जाण्याने तुम्ही मग २१ जन्मांसाठी बलिहार जाल. हा
व्यापार आहे. आम्ही तुमच्यावर बलिहार जातो तर तुम्ही देखील २१ वेळा बलिहार जाता.
बाबा म्हणतात - जोपर्यंत तुमची आत्मा पवित्र बनत नाही तोपर्यंत मी बलिहारी स्वीकार
करत नाही.
बाबा म्हणतात -
मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर आत्मा प्युअर बनेल. बाबांना विसरल्यामुळे तुम्ही
किती पतित, दुःखी झाला आहात. मनुष्य दुःखी होतात तेव्हा मग शरणागती पत्करतात. आता
तुम्ही ६३ जन्म रावणामुळे खूप दुःखी झाला आहात. काही एका सीतेची गोष्ट नाहीये, जे
पण मनुष्य-मात्र आहेत, सर्व सीता आहेत. रामायणामध्ये तर कहाणी लिहिली आहे. सीतेला
रावणाने शोक-वाटिकेमध्ये ठेवले. वास्तविक ही सारी गोष्ट या वेळची आहे. सर्व जण
रावणाच्या जेलमध्ये अर्थात ५ विकारांच्या जेलमध्ये आहेत म्हणून दुःखी होऊन बोलावत
आहेत - आम्हाला यांच्यापासून सोडवा. काही एकाचीच गोष्ट नाहीये. बाबा समजावून सांगत
आहेत सारी दुनिया रावणाच्या जेलमध्ये आहे. रावण राज्य आहे ना. म्हणतात देखील -
रामराज्य पाहिजे. गांधींनी देखील म्हटले; परंतु संन्यासी कधी असे म्हणणार नाहीत की,
रामराज्य पाहिजे. भारतवासीच म्हणतील. यावेळी आदि सनातन देवी-देवता धर्मच राहिलेला
नाहीये, बाकीच्या ब्रांचेस आहेत, सतयुग होते. एकच आदि सनातन देवी-देवता धर्म होता.
आता ते नावच बदलले आहे. आपल्या धर्माला विसरून मग बाकी इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट
होतात. मुसलमान आले आणि कित्येक हिंदूंना आपल्या धर्मामध्ये कन्व्हर्ट केले.
ख्रिश्चन धर्मामध्ये देखील पुष्कळ कन्व्हर्ट झाले आहेत. म्हणून भारतवासीयांची
लोकसंख्या कमी झाली आहे. नाहीतर भारतवासियांची जनसंख्या सर्वात जास्त असली पाहिजे.
अनेक धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत. बाबा म्हणतात - तुमचा जो आदि सनातन
देवी-देवता धर्म आहे, तो सर्वात उच्च आहे (महान आहे). सतोप्रधान होते, आता तेच
बदलून मग तमोप्रधान बनले आहेत. आता तुम्ही मुले समजता - ज्ञान सागर, पतित-पावन
ज्यांना बोलावता,
तेच सन्मुख शिकवत
आहेत. ते ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर आहेत. क्राइस्टची अशी महिमा करणार नाही.
श्रीकृष्णाला ज्ञानाचा सागर, पतित-पावन म्हटले जात नाही. सागर एकच असतो. चारही
बाजूंनी सर्वत्र सागरच सागर आहे. दोन सागर असत नाहीत. हे मनुष्य सृष्टीचे नाटक आहे,
यामध्ये सर्वांचा वेग-वेगळा पार्ट आहे. बाबा म्हणतात - माझे कर्तव्य सर्वात वेगळे
आहे, मी ज्ञानाचा सागर आहे. मलाच तुम्ही बोलावता की, ‘हे पतित-पावन’, आणि मग म्हणता
लिबरेटर. कशापासून लिबरेट करतात? हे कोणीच जाणत नाही. तुम्ही जाणता, आपण
सतयुग-त्रेतामध्ये खूप सुखी होतो, त्याला स्वर्ग म्हटले जाते. आता तर आहे नरक
म्हणून बोलावतात - दुःखातून लिबरेट करून सुखधाम मध्ये घेऊन चला. संन्यासी कधी असे
म्हणणार नाहीत की, अमका स्वर्गवासी झाला, ते तर म्हणतात - पार निर्वाण गेला.
परदेशामध्ये देखील म्हणतात - लेफ्ट फॉर हेवनली अबोड (स्वर्गीय निवासस्थानी निघून
गेले). असे समजतात, गॉड फादरकडे गेले. हेवनली गॉडफादर म्हणतात - खरोखर हेवन होता.
आता नाही आहे. हेल नंतर हेवन पाहिजे. गॉड फादरला इथे येऊन हेवन स्थापन करायचा आहे.
सूक्ष्मवतन, मूलवतन मध्ये काही हेवन असत नाही. जरूर बाबांना यावेच लागते.
बाबा म्हणतात - मी
येऊन प्रकृतीचा आधार घेतो, माझा जन्म मनुष्यांसारखा होत नाही. मी गर्भामध्ये येत
नाही, तुम्ही सर्व गर्भामध्ये येता. सतयुगामध्ये गर्भ-महाल असतो कारण तिथे कोणतेही
विकर्म होत नाही ज्याची सजा भोगतील म्हणून त्याला गर्भ-महाल म्हटले जाते. इथे
विकर्म करतात, ज्याची सजा भोगावी लागते, म्हणून गर्भ-जेल म्हटले जाते. इथे रावण
राज्यामध्ये मनुष्य पाप करत राहतात. ही आहेच पाप-आत्म्यांची दुनिया. ती आहे पुण्य
आत्म्यांची दुनिया - स्वर्ग; म्हणून असे म्हणतात - पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण आला.
ही श्रीकृष्णाची महिमा दाखवतात. सतयुगामध्ये गर्भामध्ये दुःख असत नाही. बाबा
कर्म-अकर्म-विकर्माची गती समजावून सांगतात ज्याचे मग शास्त्र - गीता बनविली आहे.
परंतु त्यामध्ये ‘शिव-भगवानुवाच’ च्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. आता तुम्ही
जाणता, आपण बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेतो. आता भारत रावणामुळे शापित
झाला आहे म्हणून दुर्गती झाली आहे. हा खूप मोठा शाप देखील ड्रामामध्ये नोंदलेला आहे.
बाबा येऊन वर देतात - ‘आयुष्यमान भव’, ‘पुत्रवान भव’, ‘संपत्तीवान भव’… सर्व सुखाचा
वारसा देतात. येऊन तुम्हाला शिकवतात, ज्या शिक्षणाद्वारे तुम्ही देवता बनता. ही
नवीन रचना रचली जात आहे. ब्रह्माद्वारे तुम्हाला बाबा आपले बनवितात. गायले देखील
जाते - प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही त्यांची मुले ब्रह्माकुमार-कुमारी बनले आहात.
आजोबांकडून वारसा बाबांद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) घेता. या पूर्वी देखील घेतला
होता. आता पुन्हा बाबा आले आहेत. बाबांची मुले तर मग बाबांकडेच गेली पाहिजेत ना.
परंतु गायले गेले आहे, प्रजापिता ब्रह्मा द्वारा मनुष्य सृष्टीची स्थापना होते. तर
ती इथेच होईल ना. आत्म्याच्या नात्याने म्हणणार आम्ही भाऊ-भाऊ आहोत. प्रजापिता
ब्रह्माची संतान बनल्यामुळे तुम्ही भाऊ-बहिणी बनता. यावेळी तुम्ही सर्व भाऊ-बहिणी
आहात, तुम्ही बाबांकडून वारसा घेतला होता. आता देखील बाबांकडून वारसा घेत आहात.
शिवबाबा म्हणतात - माझी आठवण करा. तुम्हा आत्म्यांना शिवबाबांची आठवण करायची आहे.
आठवण केल्याने तुम्ही पावन बनाल, दुसरा कोणताही उपाय नाही. पावन बनल्या शिवाय तुम्ही
मुक्तिधाम मध्ये जाऊ शकत नाही. जीवनमुक्तीधाम मध्ये सर्वात पहिले आदि सनातन
देवी-देवता धर्म होता मग नंबरवार दुसरे-दुसरे धर्म आले. बाबा अंतामध्ये येऊन
सर्वांना दुःखांमधून मुक्त करतात. त्यांना म्हटले देखील जाते - लिबरेटर (मुक्ती दाता).
बाबा म्हणतात - तुम्ही फक्त माझी आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील. बोलावता देखील
- बाबा या, आम्हाला पतिता पासून पावन बनवा. टीचर तर शिकवतात, परंतु ते त्यातून
चरित्र घडवतात का? हे देखील शिक्षण आहे. बाबा ज्ञानाचे सागरच येऊन ज्ञान देतात.
अच्छा
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कर्म,
अकर्म आणि विकर्माच्या गतीला जाणून आता कोणतेही विकर्म करायचे नाही. कर्मक्षेत्रावर
कर्म करत असताना विकारांचा त्याग करणेच विकर्मापासून वाचणे आहे.
२) असे पावन बनायचे
आहे जेणेकरून आपली बलिहारी बाबा स्वीकार करतील. पावन बनून पावन दुनियेमध्ये जायचे
आहे. तन-मन-धन या यज्ञामध्ये स्वाहा करून सफल करायचे आहे.
वरदान:-
नॉलेजच्या
लाईट-माईट द्वारे विघ्नविनाशक बनणारे मास्टर नॉलेजफुल भव
भक्तिमार्गामध्ये
गणेशाला विघ्नविनाशक असे म्हणून त्याची पूजा करतात, त्याच सोबत गणेशाला मास्टर
नॉलेजफुल अर्थात विद्यापती देखील मानतात. तर जी मुले मास्टर नॉलेजफुल बनतात ती कधीही
विघ्नांसमोर हार खाऊ शकत नाहीत. कारण नॉलेजला लाईट-माईट म्हटले जाते, ज्यामुळे
ध्येयापर्यंत पोहोचणे सोपे होते. असे जे विघ्न-विनाशक आहेत, बाबांसोबत सदैव कंबाइंड
राहून नॉलेजचे सिमरण करत राहतात ते कधीही विघ्नांसमोर हार खाऊ शकत नाहीत.
बोधवाक्य:-
आत-बाहेर
ज्याकाही त्रुटी आहेत त्यांना पूर्णपणे विल करा (देऊन टाका) तेव्हाच विल पॉवर येईल.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
आता अनुभवी बनून
इतरांना देखील अचल अडोल बनविण्याची, अनुभव करविण्याची वेळ आहे. आता खेळ करण्याचा
वेळ निघून गेला आहे. आता सदा समर्थ बनून निर्बल आत्म्यांना समर्थ बनवत चला. तुम्हा
लोकांमध्ये जर निर्बलतेचे संस्कार असतील तर दुसऱ्यांना देखील निर्बल बनवाल.
ज्ञानाच्या प्रत्येक पॉईंटचे अनुभवी बनण्यासाठी एकांतप्रिय बना, एकाग्रतेचा अभ्यास
वाढवा.