06-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - अमृतवेलेची वेळ खूप चांगली आहे, म्हणून पहाटे उठून एकांतामध्ये बसून बाबांशी गोड-गोड गोष्टी करा”

प्रश्न:-
कोणते नॉलेज निरंतर योगी बनण्यामध्ये खूप मदत करते?

उत्तर:-
ड्रामाचे नॉलेज.
जे काही झाले, ड्रामाची भावी. स्थिती जरा सुद्धा डगमगू नये. भले कशीही परिस्थिती असेल, भूकंप येवो, धंद्यामध्ये नुकसान होवो परंतु मनामध्ये जरासुद्धा संशय उत्पन्न होऊ नये - यालाच म्हणतात महावीर. जर ड्रामाचे यथार्थ नॉलेज नसेल तर अश्रू ढाळत राहाल. निरंतर योगी बनण्यासाठी ड्रामाचे नॉलेज खूप मदत करते.

गीत:-
ओम् नमो शिवाए…

ओम शांती।
मुले आता चांगल्या रीतीने समजतात की, या पतित दुनियेचा आता अंत होत आहे. पावन दुनियेची सुरुवात होत आहे. हे केवळ तुम्ही मुलेच जाणता. मुलांनाच हे डायरेक्शन अथवा श्रीमत मिळते. कोण देतात? उच्च ते उच्च भगवान. समजावून सांगत राहतात की, पतितापासून पावन बनायचे आहे. हे नॉलेज तुमच्याकरिता आहे, बाकीचे तर सर्व पतित आहेत. ही पतित दुनिया जरूर नष्ट होणार आहे. पतित म्हटले जाते विकारीला
. बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्ही जन्म-जन्मांतर एकमेकांना दुःख देत आला आहात, म्हणून तुम्ही आदि-मध्य-अंत दुःख भोगता. एकमेकांना पतित बनवता. बोलावतात देखील की, आम्ही पतित आहोत, परंतु बुद्धीमध्ये नीटसे बसत नाही. म्हणतात देखील - ‘पतित-पावन या’, परंतु पतितपणा सोडत नाहीत. आता तुम्ही समजता मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची. हे समजावून सांगणारे देखील कोणीतरी पाहिजे. समजावून सांगणारे आहेतच एक. बाकी हे जे गुरुलोक आहेत, हे कोणाला पावन बनवू शकत नाहीत. पावन देखील केवळ एका जन्मा करिताच नाही परंतु जन्म-जन्मांतरीसाठी बनायचे आहे. तुमच्यामध्ये देखील जे ज्ञानवान आहेत ते हुशार असतात. ड्रामानुसार ते नोंदलेले आहे. तुमच्यामध्ये देखील महावीरपणा (प्रचंड धैर्य) पाहिजे. ते येईल बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने. बाबा खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात. जसे बाबा सांगतात की, पहाटे लवकर उठून आठवण करा. ती वेळ आठवण करण्यासाठी खूप सुंदर आहे, ज्याला प्रभात म्हटले जाते. भक्तिमार्गामध्ये देखील म्हणतात - ‘राम सिमर प्रभात मोरे मन’. बाबा देखील म्हणतात - पहाटे उठून बाबांची आठवण करा तर खूप मजा येईल. बाबांच्या आठवणीमध्ये बसून हाच विचार केला पाहिजे की कसे कोणाला हे ज्ञान समजावून सांगावे? अमृतवेलेचे वायूमंडळ अतिशय शुद्ध असते. दिवसा काम-धंद्याचा व्याप असतो. रात्री १२ वाजेपर्यंत विकारी वायुमंडळ असते. साधू-संत, भक्त इत्यादी सर्व भक्ती देखील पहाटे करतात. असे तर आठवण दिवसभरामध्ये देखील करू शकतात. धंद्यामध्ये भले असतील परंतु बुद्धीचा योग, ज्या देवतांचा पुजारी असेल त्याच्याकडे असेल. परंतु असा कोणाचा राहत नाही. भक्तिमार्गामध्ये फक्त दर्शन घेण्यासाठी मेहनत करतात. मिळत काहीच नाही. त्यांना देखील भक्ती करता-करता तमोप्रधान बनायचेच आहे. भक्तिमार्गामध्ये देखील शिवावर बळी चढतात, ज्याला ‘काशी-कलवट’ म्हणतात. शिवाची आठवण करत-करत विहिरीमध्ये उडी घेतात. शिवावर बळी चढतात, तो आहे भक्तिमार्गाचा बळी. हा आहे ज्ञानमार्गातील बळी. ते देखील कठीण आहे, हे देखील कठीण आहे. याने भक्तिमार्गामध्ये काहीच फायदा नाही. हा जणू आत्मा आपल्या शरीराचा घात करते. हे काही ज्ञान नाही आहे. ते (दुनियावाले) देखील म्हणतात - आत्मा सो परमात्मा. आत्म-अभिमानी तर एक बाबाच आहेत, जे मुलांना समजावून सांगत आहेत की, परमात्मा तर मी एकच आहे. आपण आत्मा सो परमात्मा म्हणणे - ही सर्वात मोठ्यात मोठी चूक आहे. असे होऊ शकत नाही.

बाबा म्हणतात - मी येतोच पतितांना पावन बनविण्याकरिता, तर आता पावन बनवत आहे. बाकी तर ड्रामामध्ये जे घडणार असेल ते घडेलच. समजा भूकंप होतो, घराचे छत कोसळले, म्हणतील भावी, कल्पापूर्वी देखील असेच झाले होते. यामध्ये जरा देखील घाबरण्याची गरज नाही. ड्रामावर ठामपणे उभे राहायचे आहे. यालाच महावीर म्हटले जाते. अपघात इत्यादी तर अनेक होत राहतात. मग कोणाची रक्षा करतात का? हे तर ड्रामामध्ये नोंदलेले आहे. असाच ड्रामामध्ये पार्ट आहे. जे ड्रामाला जाणत नाहीत ते देहाची आठवण करून अश्रू ढाळतात. ते कधीही शिवबाबांची आठवण करू शकत नाहीत कारण शिवबाबांवर प्रेम नाही आहे. खरे प्रेम नाही आहे. बाबांवर तर परिपूर्ण प्रेम असले पाहिजे. शिवबाबांशी तुम्ही कल्प-कल्प प्रीत-बुद्धी बनता. असे म्हणता येणार नाही की, देवतांची बाबांशी प्रीत-बुद्धी होती. त्यांनी या प्रेमा द्वारे ते देवता पद प्राप्त केले. तिथे तर ठाऊक देखील नसेल - साऱ्या कल्पामध्ये तुम्हाला शिवबाबांविषयी माहीत सुद्धा नसते ज्यामुळे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकाल. आता बाबांनी त्यांचा परिचय दिला आहे. आता बाबा म्हणतात की, इतर संग तोडून माझ्या एकाशी जोडा. हा तर जरूर विनाश काळ आहे. हे देखील तुम्ही मुलेच जाणता. मनुष्य तर एकदमच घोर अंधारामध्ये आहेत. तुम्ही आता समजता की आपल्याला तर बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. आठवणी शिवाय तुम्ही सतोप्रधान बनू शकणार नाही. सर्जन बनून आपल्या आजाराला पाहायचे आहे. श्रीमतानुसार पाहायचे आहे की, माझे बाबांवर किती प्रेम आहे? अमृतवेलेलाच बाबांची आठवण करणे चांगले आहे. पहाटेची वेळ खूप चांगली आहे. त्यावेळी मायेची वादळे येत नाहीत. रात्री १२ वाजेपर्यंत तपस्या करण्यात काहीच फायदा नाही कारण वेळच घाणेरडा असतो. वायुमंडळ खराब असते, त्यामुळे एक वाजेपर्यंत सोडून दिले पाहिजे. एकच्या नंतर वायुमंडळ चांगले असते. बाबा म्हणतात - आपला तर आहेच सहज राजयोग, भले आरामात बसा. बाबा (ब्रह्मा बाबा) आपला अनुभव देखील ऐकवतात की, कसा बाबांशी गप्पा मारतो - ‘बाबा, हा ड्रामा कसा वंडरफुल आहे! तुम्ही कसे येऊन पतितापासून पावन बनवत आहात! साऱ्या दुनियेला कसे परिवर्तित करून टाकता! खूप अद्भुत आहे!’ जसे बाबांना विचार येतात तसेच मुलांना देखील आले पाहिजेत. कसा मनुष्यांचा बेडा पार करावा किंवा कशी नाव पार करावी. बाबा म्हणतात, तुम्ही बोलावत राहता - ‘हे पतित-पावन या’. आता मी आलो आहे, तर आता तुम्ही पतित बनू नका. पतित बनून सभेमध्ये येऊन बसू नका, नाहीतर वायुमंडळ अशुद्ध करता. बाबांना ठाऊक तर होतेच ना. दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये असे विकारामध्ये जाणारे येऊन बसत होते. गायले गेले आहे - ‘असुर येऊन विघ्न टाकण्याकरिता बसत होते’. विकारामध्ये जाणाऱ्यांना असुर म्हटले जाते. वायुमंडळाला खराब करतात. त्यांच्यासाठी खूप कडक सजा आहे. बाबा सगळ्या गोष्टी समजावून सांगतात तर खरे, परंतु तरीही आपले नुकसान केल्याशिवाय राहत नाहीत. खोटे देखील बोलतात; नाहीतर लगेच लिहून दिले पाहिजे - ‘बाबा, माझ्याकडून ही चूक झाली, क्षमा करा’. आपले पाप लिहून द्या. नाहीतर वृद्धी होत राहील आणि रसातळाला जाल. येतात काही घेण्यासाठी आणि अजूनच कान कापून घेतात. असा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. असे असुर कल्पा पूर्वी देखील होते, आता देखील आहेत. अमृत सोडून विष पितात. आपलाच घात करतात आणि इतरांनाही नुकसान पोहोचवतात. वायूमंडळ खराब करतात. सर्वच ब्राह्मणी काही एक सारख्या नाहीत. महारथी, घोडेस्वार, प्यादी सर्वजण आहेत.

तुम्हा मुलांना तर अपार आनंद झाला पाहिजे की, बाबा मिळाले अजून बाकी काय पाहिजे. हो, आपली मुले इत्यादींना जरूर सांभाळायचे आहे. असे नाही की, ‘बाबा, हे सगळेजण तुमचे आहेत, आता तुम्हीच सांभाळा. मी तर तुमचा बनलो आहे’. बाबा समजावून सांगतात की, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान पवित्र बना. कोणतेही पतित काम करू नका. बस्स, सर्वात पहिली गोष्ट आहे - काम विकाराची. द्रौपदीने देखील यासाठीच बोलावले होते की, मला हे विवस्त्र करत आहेत. बोलावले देखील तेव्हा होते जेव्हा ऐकणारे बाबा आलेले होते. बाबांच्या येण्यापूर्वी कोणीही त्यांना बोलावत नाही. कोणाला बोलावतील? बाबा आले आहेत तेव्हाच तर बोलावत आहेत. पतितापासून पावन बनवून मग कुठे जातील? परत घरी जायचे आहे, तो तर हाच काळ आहे. सर्वांचे सद्गती दाता, लिबरेटर एकच आहेत. इथे तर दुःख आहे. साधू-संत इत्यादी कोणीही सुखी असू शकत नाही. सर्वांना काही ना काही दुःख, आजार इत्यादी असतोच असतो. कोणता गुरु आंधळा-लंगडा देखील असतो. जरूर कोणते असे कर्म केले आहे तेव्हाच तर आंधळा-लंगडा इत्यादी बनतात. सतयुगामध्ये कोणी आंधळा-लंगडा इत्यादी थोडाच असेल. मनुष्य थोडेच समजतात, बाबाच येऊन समजावून सांगतात. बाबाच ज्ञानाचे सागर पतित-पावन आहेत. बाकी तर सर्व आहे भक्ती. तो भक्तिमार्गच वेगळा आहे. तो आहे शिडी उतरण्याचा मार्ग. खाली उतरण्याकरिता, जीवनबंधनमध्ये येण्याकरिता ८४ जन्म लागतात आणि मग जीवनमुक्त बनण्याकरिता एक सेकंद लागतो; जर त्यांच्या मतावर चालून बाबांची आठवण कराल तर. नंबरवार तर आहेत ना. म्हणतात - आम्हाला अमकी टीचर मिळेल तर चांगले आहे. तर जरूर स्वतः कमजोर आहेत तेव्हाच तर म्हणतात अमकीला २-४ महिन्यांकरिता पाठवून द्या. बाबा म्हणतात - हे देखील चुकीचे आहे. तुम्ही ब्राह्मणीची आठवण का करता जेव्हा की बाबा सोपी गोष्ट सांगत आहेत - फक्त बाबांची आठवण करा आणि स्वदर्शन चक्र फिरवा, इतरांनाही समजावून सांगा. यामध्ये ब्राह्मणी येऊन काय करेल? ही तर सेकंदाची गोष्ट आहे. तुम्ही काम-धंद्यामध्ये हे विसरून जाता, ब्राह्मणी देखील तरीही हेच सांगेल - मनमनाभव. बरेच बुद्धू लोक समजत नाहीत, फक्त म्हणतात ब्राह्मणी चांगली पाहिजे. तुम्हाला ज्ञान तर मिळाले आहे ना. बाबांची आणि वारशाची आठवण करा. देह-अभिमानाला सोडा. ‘हे आमचे सेंटर आहे, हे त्यांचे सेंटर आहे. हा जिज्ञासू तिथे का जातो…’, हा सर्व देह-अभिमान आहे. सर्व शिवबाबांची सेंटर्स आहेत, आमचे सेंटर थोडेच आहे. तुम्हाला असे का वाटते की, अमका आपल्या सेंटरवर का येत नाही. तो कुठेही जाईल. बाबा नेहमी सांगतात कोणाकडूनही काही मागू नका. हे समजू शकतात की, बीजच पेरले नाही तर मिळणार तरी काय? भक्तिमार्गामध्ये देखील दान-पुण्य केले जाते. तुम्ही सर्व भक्तिमार्गामध्ये ईश्वर अर्थ इनडायरेक्ट करत होता. तसेच संन्याशांना देखील भरपूर देतात. नाहीतर गरिबांनाच दान दिले जाते, श्रीमंतांना दिले जात नाही. यामध्ये धान्याचे दान सर्वात चांगले आहे. इथे देखील बाबा समजावून सांगत आहेत - दान केल्याने दुसऱ्या जन्मामध्ये त्याचे फळ मिळते. ईश्वरच सर्वांना फळ देतो. साधू-संत इत्यादी कोणीही रिटर्न देऊ शकत नाहीत. देणारे एक बाबाच आहेत. कोणाच्याही द्वारे देतील. बाबा म्हणतात की, तुम्ही ईश्वर अर्थ देत होता तरी देखील दुसऱ्या जन्मामध्ये तुम्हाला त्याचे फळ देत होतो. आता तर मी डायरेक्ट आलो आहे. आता तुम्हाला २१ जन्मांकरिता रिटर्न मिळेल. मग तर मृत्यू समोर उभा आहे. भक्तिमार्गामध्ये तुम्हाला असे सांगत नव्हते की, मृत्यू समोर उभा आहे म्हणून आपले सर्व काही सफल करा. नाही. तर आता बाबा समजावून सांगत आहेत - ज्यांना पण कोणाला हवे त्यांनी हे रूहानी हॉस्पिटल उघडा. कोणी म्हणतात - घर बांधून, त्यामध्ये हे हॉस्पिटल उघडतो. बाबा म्हणतात - आज घर बांधाल आणि उद्या मरून जाल तर हे सर्व काही नष्ट होईल. शरीराचा काहीच भरवसा नाही. जे आहे त्यामध्येच तोपर्यंत एक खोली ठेवा, ज्यामध्ये रूहानी हॉस्पिटल, रुहानी कॉलेज बनवा. अनेकांचे कल्याण कराल तर खूप उच्च पद प्राप्त कराल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) श्रीमतावर आपणच स्वतःला पाहायचे आहे की या विनाशाच्या वेळी माझे एका बाबांवरच खरे प्रेम आहे? मी इतर सर्व संग तोडून एकच संग जोडला आहे? मी कधी कोणते विकर्म करून असुर तर बनत नाही ना? अशी चेकिंग करून स्वतःमध्ये परिवर्तन करायचे आहे.

२) या शरीराचा काहीच भरवसा नाही त्यामुळे आपले सर्व काही सफल करायचे आहे. आपली स्थिती एकरस अचल बनविण्याकरिता ड्रामाच्या रहस्याला बुद्धीमध्ये ठेवून चालायचे आहे.

वरदान:-
पुन्हा-पुन्हा हार खाण्याऐवजी बलिहार जाणारे मास्टर सर्वशक्तिमान विजयी भव

स्वतःला नेहमी विजयी रत्न समजून प्रत्येक संकल्प आणि कर्म करा म्हणजे मग कधीही हार होऊ शकत नाही. मास्टर सर्वशक्तिमान कधीही हार खाऊ शकत नाहीत. जर वारंवार हार होत असेल तर धर्मराजाचा मार खावा लागेल आणि हार खाणाऱ्यांना भविष्यामध्ये हार बनवावे लागतील; द्वापर पासून अनेक मूर्त्यांना हार घालावे लागतील. त्यामुळे हार खाण्याऐवजी बलिहार व्हा, आपल्या संपूर्ण स्वरूपाला धारण करण्याची प्रतिज्ञा करा तेव्हाच विजयी बनाल.

बोधवाक्य:-
‘कधी’ हा शब्द कमजोरी दर्शवितो त्यामुळे ‘कधी’ असे म्हणायचे नाही, तर ‘आत्ता’ करायचे आहे.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

या बेहदच्या स्टेजवर, ‘मी खेळाडू आहे’. ही खेळाडूची स्टेज नेहमी हर्षित राहण्याचा अनुभव करविते. कोणत्याही प्रकारची कोणतीही गोष्ट, ज्याला दुनियावाले संकट समजतात. परंतु खेळाडू बनून खेळ करणारे आणि साक्षी होऊन खेळाला पाहणारेच अशा संकटाच्या रूपाला खेळ समजून, सहनशीलतेच्या शक्तीद्वारे मनोरंजनाचा अनुभव करतात.