06-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांच्या आठवणीने बुद्धी स्वच्छ बनते, दिव्य गुण येतात त्यामुळे एकांतामध्ये बसून आपणच आपल्याला विचारा की माझ्यामध्ये किती दैवी गुण आले आहेत?”

प्रश्न:-
सर्वात मोठा आसुरी अवगुण कोणता आहे, जो मुलांमध्ये असता कामा नये?

उत्तर:-
सर्वात मोठा आसुरी अवगुण आहे कोणाशीही उद्धटपणे बोलणे अथवा कटू वचन बोलणे, यालाच भूत म्हटले जाते. जेव्हा कोणामध्ये हे भूत प्रवेश करते तर खूप नुकसान करून टाकते म्हणून त्यांना टाळले पाहिजे. जितका शक्य होईल अभ्यास करा की, आता घरी जायचे आहे मग नव्या राजधानीमध्ये यायचे आहे. या दुनियेमध्ये सर्व काही पाहताना देखील काहीही दिसू नये.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत - ‘जायचे तर आहे शरीर सोडून. या दुनियेला देखील विसरून जायचे आहे’. हा देखील एक अभ्यास आहे. जेव्हा शरीराला काही त्रास होतो तर शरीराला देखील प्रयत्न करून विसरायचे असते तर दुनियेला देखील विसरायचे असते. विसरण्याचा अभ्यास करायचा असतो पहाटे. बस, आता परत जायचे आहे. हे ज्ञान तर मुलांना मिळाले आहे की, साऱ्या दुनियेला सोडून आता घरी जायचे आहे. जास्त ज्ञानाची तर आवश्यकताच नसते. प्रयत्नपूर्वक त्याच विचारामध्ये रहायचे आहे. भले शरीराला कितीही वेदना होत असतील, मुलांना समजावून सांगितले जाते की, कसा अभ्यास करायचा आहे - जसे काही तुम्ही नाहीच आहात. हा देखील चांगला अभ्यास आहे. बाकी वेळ फार थोडा आहे. जायचे आहे घरी, मग बाबांची मदत आहे किंवा यांची (ब्रह्मा बाबांची) स्वतःची मदत आहे. मदत मिळते जरूर आणि पुरुषार्थ देखील करायचा असतो. हे जे काही पाहण्यात येते, ते नाहीच आहे. आता घरी जायचे आहे. तिथून परत आपल्या राजधानीमध्ये यायचे आहे. सरते शेवटी या दोन गोष्टी उरतात - ‘जायचे’ आहे आणि मग ‘यायचे’ आहे. पाहिले जाते या आठवणीमध्ये राहिल्याने शरीराचे रोग जे त्रस्त करतात, ते देखील आपोआप थंडावतात. ती खुशी कायम राहते. ‘खुशी जैसी खुराक नहीं’; म्हणून मुलांना देखील हे समजावून सांगावे लागते - ‘मुलांनो, आता घरी जायचे आहे, स्वीट होममध्ये जायचे आहे, या जुन्या दुनियेला विसरायचे आहे.’ याला म्हटले जाते आठवणीची यात्रा. हे आत्ताच मुलांना कळते. बाबा कल्प-कल्प येतात, हेच ऐकवतात - कल्पानंतर पुन्हा भेटू. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आता तुम्ही जे ऐकता, मग कल्पा नंतर देखील हेच ऐकाल’. हे तर मुले जाणतात, बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प येऊन मुलांना मार्ग दाखवतो. त्या मार्गावर चालणे हे मुलांचे काम आहे’. बाबा येऊन मार्ग सांगतात, सोबत घेऊन जातात. फक्त मार्ग सांगत नाहीत परंतु सोबत घेऊन देखील जातात. हे देखील समजावून सांगितले जाते की, ही जी चित्रे इत्यादि आहेत, यांचा शेवटी काहीही उपयोग होणार नाही. बाबांनी आपला परिचय करून दिला आहे. मुलांना समजते बाबांचा वारसा बेहदची बादशाही आहे. जे काल मंदिरामध्ये जात होते, या मुलांची (लक्ष्मी-नारायणाची) महिमा गात होते, बाबा तर यांना देखील मुलांनो-मुलांनो असेच म्हणतील ना, जे त्यांची श्रेष्ठ असल्याची महिमा गात होते, तेच आता पुन्हा असे श्रेष्ठ बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहेत. हि शिवबाबांसाठी काही नवीन गोष्ट नाहीये. तुम्हा मुलांसाठी नवीन गोष्ट आहे. युद्धाच्या मैदानामध्ये तर मुले आहेत. संकल्प-विकल्प देखील यांना (ब्रह्मा बाबांना) त्रस्त करतात. हा खोकला सुद्धा यांच्या कर्मांचा हिशोब आहे, यांना भोगायचा आहे. बाबा तर मजेत आहेत, यांना कर्मातीत बनायचे आहे. बाबा तर आहेतच कायम कर्मातीत अवस्थेमध्ये. तुम्हा आम्हा मुलांना मायेची वादळे इत्यादि कर्मभोग येतील. हे समजावून सांगितले पाहिजे. बाबा तर मार्ग सांगतात, मुलांना सर्व काही समजावून सांगतात. या रथाला (ब्रह्मा बाबांना) काही झाले तर तुम्हाला फिलिंग येईल (जाणवेल) की दादांना काहीतरी झाले आहे. बाबांना काही होत नाही, यांना होते. ज्ञान मार्गामध्ये अंधश्रद्धेची गोष्टच नसते. बाबा समजावून सांगतात की, मी कोणत्या तनामध्ये येतो. अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये पतित तनामध्ये प्रवेश करतो. दादा देखील समजतात जशी इतर मुले आहेत, तसा मी देखील आहे. दादा पुरुषार्थी आहेत, संपूर्ण नाही आहेत. तुम्ही सर्व प्रजापिता ब्रह्माची मुले ब्राह्मण पुरुषार्थ करता विष्णुपद प्राप्त करण्यासाठी. लक्ष्मी-नारायण म्हणा, विष्णू म्हणा गोष्ट तर एकच आहे. बाबांनी समजावून सांगितले देखील आहे की, या आधी काहीच समजत नव्हते. ना ब्रह्मा-विष्णू-शंकराला, ना स्वतःला समजत होता. आता तर बाबांना, ब्रह्मा-विष्णू-शंकराला पाहिल्यावरच बुद्धीमध्ये येते - हे ब्रह्मा तपस्या करत होते. तीच सफेद वस्त्र आहेत. कर्मातीत अवस्था देखील इथे होते. तुम्हाला अगोदरच साक्षात्कार होतो - हे बाबा फरिश्ता बनणार. तुम्ही देखील जाणता आपण कर्मातीत अवस्थेला प्राप्त करून नंबरवार फरिश्ता बनणार. जेव्हा तुम्ही फरिश्ते बनता तेव्हा समजता की आता युद्ध सुरू होईल. ‘मिरुआ मौत…’ ही एक अतिशय उच्च अवस्था आहे. मुलांना धारणा करायची आहे. हा देखील निश्चय आहे की आम्ही चक्कर लावतो. इतर कोणालाही या गोष्टी समजू शकणार नाहीत. नवीन ज्ञान आहे आणि मग पावन बनण्यासाठी बाबा आठवण करायला शिकवतात, हे देखील समजता की बाबांकडून वारसा मिळतो, कल्प-कल्प बाबांची संतान बनतो, ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. कोणालाही तुम्ही समजावून सांगा ‘तुम्ही आत्मा आहात, परमपिता परमात्मा बाबा आहेत, आता बाबांची आठवण करा’. तर त्यांच्या बुद्धीमध्ये येईल दैवी प्रिन्स बनायचे असेल तर इतका पुरुषार्थ करायचा आहे. विकार इत्यादी सर्व सोडायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत - आपल्याला बहीण-भाऊ देखील नाही तर भाऊ-भाऊ समजा आणि बाबांची आठवण करा तेव्हाच विकर्म विनाश होतील बाकी काहीच त्रास नाहीये. शेवटी इतर कोणत्याही गोष्टींची गरज भासणार नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे, आस्तिक बनायचे आहे. असे सर्व गुण संपन्न बनायचे आहे. लक्ष्मी-नारायणाचे चित्र अगदी अचूक आहे. फक्त बाबांना विसरून गेल्याने दैवी गुण धारण करणे देखील विसरून जातात. मुलांनो एकांतामध्ये बसून विचार करा - बाबांची आठवण करून आपल्याला असे बनायचे आहे, हे गुण धारण करायचे आहेत. गोष्ट तर खूप छोटी आहे. मुलांना किती मेहनत करावी लागते. किती देह-अभिमान येतो. बाबा म्हणतात “देही-अभिमानी भव”. बाबांकडूनच वारसा घ्यायचा आहे. बाबांची आठवण कराल तेव्हाच तर कचरा बाहेर येईल.

मुले जाणतात आता बाबा आलेले आहेत. ब्रह्मा द्वारे नव्या दुनियेची स्थापना करतात. तुम्ही मुले जाणता स्थापना होत आहे. एवढी साधी गोष्ट देखील तुमच्याकडून निसटते. एक अल्फ (शिवबाबा) आहेत, बेहदच्या बाबांकडून बादशाही मिळते. बाबांची आठवण केल्याने नवी दुनिया आठवते. अबला-कुब्जा देखील खूप चांगले पद मिळवू शकतात. फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबांनी रस्ता सांगितला आहे. म्हणतात - ‘स्वतःला आत्मा निश्चय करा’. बाबांचा परिचय तर मिळाला. बुद्धीमध्ये पक्के होते की आता ८४ जन्म पूर्ण झाले, घरी जाणार आणि परत येऊन स्वर्गामध्ये पार्ट बजावणार. हा प्रश्नच उद्भवत नाही की कुठे आठवण करू? कशी करू? बुद्धीमध्ये आहे की बाबांची आठवण करायची आहे. बाबा (ब्रह्मा बाबा) कुठेही गेले तरी, तुम्ही तर त्याचीच मुले आहात ना. बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे. इथे बसले आहात तर तुम्हाला आनंद वाटतो. बाबांना सन्मुख भेटता. मनुष्य गोंधळून जातात की शिवबाबांची जयंती कशी असेल! हे देखील समजत नाहीत की ‘शिवरात्री’ कशासाठी म्हटले जाते? श्रीकृष्णासाठी समजतात ना रात्री जयंती असते परंतु या रात्रीची गोष्ट नाहीये. ती अर्ध्याकल्पाची रात्र पूर्ण होते त्या नंतर बाबांना यावे लागते नव्या दुनियेची स्थापना करण्यासाठी, आहे खूप सोपे. मुले स्वतः समजतात - सोपे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. नाहीतर शंभर पटीने पाप होते. माझी निंदा करणारे उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. बाबांची निंदा कराल तर पद भ्रष्ट होईल. अतिशय गोड बनले पाहिजे. उद्धटपणे बोलणे - हा दैवी गुण नाहीये. समजले पाहिजे हा आसुरी अवगुण आहे. प्रेमाने समजावून सांगायचे असते - हा तुमचा दैवी गुण नाहीये. हे देखील मुले जाणतात की, आता कलियुग पूर्ण होत आहे, हे आहे संगमयुग. लोकांना तर काहीच माहित नाहीये. कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपून पडले आहेत. समजतात ४० हजार वर्षे बाकी आहेत. आम्ही जगत राहू, सुख भोगत राहू. हे समजत नाहीत की आपण दिवसेंदिवस अजूनच तमोप्रधान बनतो. तुम्ही मुलांनी विनाशाचा साक्षात्कार देखील केला आहे! पुढे जाऊन ब्रह्माचा, श्रीकृष्णाचा देखील साक्षात्कार करत रहाल. ब्रह्माकडे गेल्याने तुम्ही स्वर्गाचा असा प्रिन्स बनाल म्हणूनच अनेकदा ब्रह्मा आणि श्रीकृष्ण दोघांचाही साक्षात्कार होतो. कोणाला विष्णूचा होतो. परंतु त्यांच्या साक्षात्काराने तितकेसे समजू शकणार नाही. नारायणाचा साक्षात्कार झाल्याने समजू शकतील. इथे आपण जातोच देवता बनण्यासाठी. तर तुम्ही आता सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा धडा शिकता. धडा शिकवला जातो आठवणीसाठी. धडा आत्मा शिकते. देहाचे भान उतरते. आत्माच सर्व काही करते. चांगले अथवा वाईट संस्कार आत्म्यामध्येच असतात.

तुम्ही गोड-गोड मुले ५ हजार वर्षानंतर येऊन भेटले आहात. तुम्ही तेच आहात. फीचर्स देखील तिच आहेत, ५ हजार वर्षांपूर्वी देखील तुम्हीच होता. तुम्ही देखील म्हणता - ५ हजार वर्षानंतर तुम्ही तिथेच येऊन भेटले आहात, जे आम्हाला मनुष्यापासून देवता बनवत आहात. आम्ही देवता होतो पुन्हा असुर बनलो आहोत. देवतांचे गुण गात आलो, आमचे अवगुण वर्णन करत आलो. आता परत देवता बनायचे आहे कारण दैवी दुनियेमध्ये जायचे आहे. तर आता चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून उच्च पद मिळवा. टीचर तर सर्वांना म्हणतील ना, शिका. चांगल्या मार्कांनी पास झालात तर आमचे देखील नाव मोठे होईल आणि तुमचे नाव देखील मोठे होईल. असे बरेचजण म्हणतात - बाबा, तुमच्याकडे आल्याने काहीच बाकी राहत नाही. सर्वकाही विसरून जातो. येता क्षणीच गप्प होतील. जणू काही हि दुनिया नष्ट झाल्यात जमा आहे. मग तुम्ही याल नवीन दुनियेमध्ये. ती तर अतिशय सुंदर नवीन दुनिया असेल. कोणी शांतीधाममध्ये विश्राम घेतात. काहींना तर विश्राम मिळत नाही. ऑलराऊंड पार्ट आहे. परंतु तमोप्रधान दुःखातून मुक्त होतात. तिथे शांती, सुख सर्व मिळते. तर असा चांगल्या रीतीने पुरुषार्थ केला पाहिजे. असे नाही की, जे नशिबात असेल ते. नाही, पुरुषार्थ केला पाहिजे. समजते की राजधानी स्थापन होत आहे. आम्ही श्रीमतावर आमच्यासाठी राजधानी स्थापन करत आहोत. बाबा जे श्रीमत देणारे आहेत ते स्वतः राजा इत्यादि बनले नाहीत. त्यांच्या श्रीमतावर आपण बनतो. नवी गोष्ट आहे ना. कधी कोणी ना ऐकली, ना पाहिली. आता तुम्ही मुले समजता श्रीमतावर आम्ही वैकुंठाची बादशाही स्थापन करतो. आम्ही अगणित वेळा राजाई स्थापन केली आहे. करतो आणि गमावतो. हे चक्र फिरतच राहते. पादरी लोक जेव्हा फेरी मारायला निघतात तेव्हा इतर कुणालाही पाहणे देखील पसंत करत नाहीत. फक्त क्राईस्टच्याच आठवणीत राहतात. शांतपणे फेरी मारतात. समज आहे ना. क्राईस्टच्या आठवणीत किती राहतात. जरूर क्राईस्टचा साक्षात्कार झाला असेल. सर्व पादरी असे थोडेच असतात. कोटींमध्ये कोणी, तुमच्यात देखील नंबरवार आहेत. कोटींमध्ये कोणी असे बाबांच्या आठवणीमध्ये राहत असतील. प्रयत्न करून बघा. इतर कोणालाही पाहू नका. बाबांची आठवण करत स्वदर्शन चक्र फिरवत रहा. तुम्हाला अपार ख़ुशी होईल. श्रेष्ठाचारी देवतांना म्हटले जाते, मनुष्यांना भ्रष्टाचारी म्हटले जाते. यावेळी तर देवता कोणीच नाहीत. अर्धा कल्प दिवस, अर्धा कल्प रात्र - हि भारताचीच गोष्ट आहे. बाबा म्हणतात मी येऊन सर्वांची सद्गती करतो, बाकी जे इतर धर्माचे आहेत, ते आपल्या-आपल्या वेळेवर आपल्या धर्माची स्थापना करतात. सर्व येऊन हा मंत्र घेऊन जातात. बाबांची आठवण करायची आहे, जे आठवण करतील ते आपल्या धर्मामध्ये उच्च पद प्राप्त करतील.

तुम्हा मुलांना पुरुषार्थ करून रुहानी म्युझिअम अथवा कॉलेज उघडायला हवे. लिहा - विश्वाची किंवा स्वर्गाची राजाई सेकंदात कशी मिळू शकते, येऊन समजून घ्या. बाबांची आठवण करा तर वैकुंठाची बादशाही मिळेल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) चालता-फिरता एका बाबांचीच आठवण रहावी इतर काहीही दिसत असताना देखील दिसू नये - असा अभ्यास करायचा आहे. एकांतामध्ये स्वतःला तपासायचे आहे कि माझ्यामध्ये दैवी गुण कितपत आले आहेत?

२) असे कोणतेही कर्तव्य करायचे नाही, ज्याने बाबांची निंदा होईल, दैवी गुण धारण करायचे आहेत. बुद्धीमध्ये रहावे कि आता घरी जायचे आहे आणि मग आपल्या राजधानीमध्ये यायचे आहे.

वरदान:-
सेवेमध्ये शुभ भावनेच्या ॲडिशनद्वारे शक्तिशाली फळ प्राप्त करणारे सफलतामूर्त भव

जी कोणती सेवा करता त्यामध्ये सर्व आत्म्यांच्या सहयोगाची भावना असावी, खुशीची भावना आणि सद्भावना असावी तेव्हाच प्रत्येक कार्य सहज सफल होईल. जसे पूर्वीच्या काळी कोणते कार्य करायला जात असत तर साऱ्या परिवाराचे आशीर्वाद घेऊन जात होते. तर वर्तमान सेवेमध्ये हे ॲडिशन हवे. कोणतेही कार्य सुरु करण्यापूर्वी सर्वांच्या शुभ भावना, शुभ कामना घ्या. सर्वांच्या संतुष्टतेचे बळ भरा तेव्हा शक्तिशाली फळ निघेल.

बोधवाक्य:-
जसे बाबा जी-हाजिर करतात तसे तुम्ही देखील सेवेमध्ये जी हाजिर, जी हजूर करा तर पुण्य जमा होईल.