06-07-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.01.2006  ओम शान्ति   मधुबन


“संकल्प, वेळ आणि बोल (शब्द) यांच्या बचतीच्या स्कीम द्वारे सफलतेची सेरीमनी साजरी करा, निराश आत्म्यांमध्ये आशेचे दीप जागवा”


आज स्नेहाचा दिवस आहे. चोहो बाजूंची सर्व मुले स्नेहाच्या सागरामध्ये सामावून गेली आहेत. हा स्नेह सहजयोगी बनवणारा आहे. स्नेह सर्व अन्य आकर्षणापासून दूर करणारा आहे. स्नेहाचे वरदान तुम्हा सर्व मुलांना जन्माचे वरदान आहे. स्नेहामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती आहे. तर आजच्या दिवशी दोन प्रकारची मुले चोहो बाजूंना दिसली. लवली मुले (प्रेमळ मुले) तर सर्व आहेत परंतु एक आहेत लवली मुले, दुसरी आहेत लवलीन मुले. लवलीन मुले प्रत्येक संकल्प, प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक बोल, प्रत्येक कर्मामध्ये आपोआपच बाप समान सहज राहतात, असे का? मुलांना बाबांनी समर्थ भव चे वरदान दिलेले आहे. आजच्या दिवसाला स्मृति सो समर्थ दिवस म्हणता, ते कशासाठी? बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) आजच्या दिवशी स्वतःला बॅकबोन बनवले आणि लवलीन मुलांना विश्वाच्या स्टेजवर प्रत्यक्ष केले. व्यक्तमध्ये (साकार रूपामध्ये) मुलांना प्रत्यक्ष केले आणि स्वतः अव्यक्त रुपामध्ये साथी बनले.

आजच्या या स्मृति सो समर्थ दिवशी बापदादांनी मुलांना बालक सो मालक बनवून सर्वशक्तिवान बाबांना मास्टर सर्वशक्तिवान बनून प्रत्यक्ष करण्याचे कार्य दिले आणि बाबा हे पाहून खुश आहेत की यथा योग तथा शक्ति सर्व मुले बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी अर्थात विश्वकल्याण करून विश्व परिवर्तन करण्याच्या कार्यामध्ये लागलेली आहेत. बाबांद्वारे सर्वशक्तींचा वारसा जो मिळालेला आहे तो स्वयंप्रती आणि विश्वातील आत्म्यांप्रति कार्यामध्ये लावत आहेत. बापदादा देखील असे मास्टर सर्वशक्तिवान बाप समान उमंग-उत्साहामध्ये राहणारे ऑलराउंड सेवाधारी, निःस्वार्थ सेवाधारी, बेहदच्या सेवाधारी मुलांना पद्म-पद्मपटीने हृदयापासून मुबारक देत आहेत. मुबारक असो, मुबारक असो. देशातील मुले देखील कमी नाहीत आणि विदेशातील मुले देखील कमी नाही आहेत. बापदादा अशा मुलांची मनातल्या मनात महिमा देखील करतात आणि गीत देखील गातात - ‘वाह! मुलांनो वाह!’ तुम्ही सर्व ‘वाह! वाह!’ मुले आहात ना! हात हलवत आहेत, खूप छान. बाप-दादांना मुलांचा खूप अभिमान आहे - साऱ्या कल्पामध्ये असा कोणी पिता नाही आहे ज्याचा प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी राजा आहे. तुम्ही सर्वजण तर स्वराज्य अधिकारी राजा आहात ना! प्रजा तर नाही ना! बरीच मुले जेव्हा रुहरिहान करतात तेव्हा म्हणतात - ‘आम्ही भविष्यामध्ये कोण बनणार, त्याचे चित्र आम्हाला दाखवा’. बापदादा काय म्हणतात? जुनी मुले तर म्हणतात की, जगत अंबा माँ प्रत्येकाला चित्र देत होती, तर आम्हाला सुद्धा चित्र द्या. बापदादा म्हणतात - प्रत्येक मुलाला बाबांनी विचित्र आरसा दिलेला आहे, त्या आरशामध्ये आपल्या भविष्याचे चित्र बघू शकता की, मी कोण! जाणता ना, तो आरसा तुमच्या जवळ आहे? जाणता का कोणता आरसा? पहिली लाइनवाले तर जाणत असतील ना! जाणता का? तो आरसा आहे - वर्तमान काळातील स्वराज्य स्थितीचा आरसा. वर्तमान समयी जितके स्वराज्य अधिकारी आहात त्या अनुसार विश्वाचे राज्य अधिकारी बनाल. आता आपणच आपल्याला आरशामध्ये बघा, मी स्वराज्य अधिकारी सदैव आहे? की कधी अधीन, कधी अधिकारी असतो? जर कधी अधीन, कधी अधिकारी बनता, कधी डोळे धोका देतात, कधी मन धोका देते, कधी वाणी धोका देते, कधी कान सुद्धा धोका देतात. व्यर्थ गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण होते. जर कोणतेही कर्मेंद्रिय धोका देते, परवश करते (परावलंबी करते), तर यावरून सिद्ध आहे की बाबांद्वारे ज्या सर्व शक्ति वरदानामध्ये मिळाल्या आहेत, अथवा वारशामध्ये मिळाल्या आहेत त्या कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवरमध्ये नाही आहेत. तर विचार करा - जे स्वतःवर शासन करु शकत नाहीत ते विश्वावर राज्य कसे करतील! आपल्या वर्तमान स्थितीच्या स्वराज्य अधिकारीच्या आरशामध्ये चेक करा. आरसा तर सर्वांना मिळालेला आहे ना? आरसा मिळाला असेल तर हात वर करा. आरशावर कोणता डाग तर झालेला नाही आहे? आरसा स्वच्छ आहे?

बापदादांनी प्रत्येक मुलाला ‘स्वराज्य अधिकारी’चा स्वमान दिला आहे. ‘मास्टर सर्वशक्तीवान’चे टायटल सर्व मुलांना बाबांद्वारे मिळालेले आहे. ‘मास्टर शक्तिवान’ नाही, ‘सर्वशक्तिवान’. बरीच मुले रुहरिहानमध्ये हे देखील सांगतात - ‘बाबा, तुम्ही तर सर्व शक्ति दिल्या आहेत परंतु या शक्ति कधी-कधी वेळेवर काम करत नाहीत’. रिपोर्ट करतात - वेळेवर इमर्ज होत नाहीत, वेळ निघून जाते नंतर इमर्ज होतात. कारण काय होते? ज्या वेळी ज्या शक्तिचे आवाहन करता त्या वेळी चेक करा की मी मालकाच्या (अधिकारीपणाच्या) सीटवर सेट आहे? जर कोणी सीटवर सेट नसतो तर सीट नसणाऱ्याची कोणीही ऑर्डर मानत नाही. स्वराज्य अधिकारी आहे, मास्टर सर्वशक्तिवान आहे, बाबांद्वारे वारसा आणि वरदानाचा अधिकारी आहे, या सीटवर सेट होऊन मग ऑर्डर करा. काय करू, कसे करू, होत नाही, सीटवरून खाली बसून, सीटवरून उतरून ऑर्डर करता, तर कसे काय मानेल! आजकालच्या जमान्यामध्ये सुद्धा जर कोणी प्राईममिनिस्टर आहे, सीटवर असेल तर सर्व मानतील आणि सीटवरून उतरला की नंतर मग कोणी मानेल? तर चेक करा - मी सीटवर सेट आहे? अधिकारी होऊन ऑर्डर करतो का? बाबांनी प्रत्येक मुलाला ऑथॉरिटी दिलेली आहे, परमात्म ऑथॉरिटी आहे, कोणा आत्म्याकडून ऑथॉरिटी मिळालेली नाहीये, महात्म्याकडून ऑथॉरिटी मिळालेली नाहीये, परमात्म ऑथॉरिटी (स्वयं परमात्म्याकडून ऑथॉरिटी मिळालेली) आहे, तर ऑथॉरिटी आणि अधिकार या स्थितीमध्ये स्थित होऊन कोणत्याही शक्तिला ऑर्डर करा, ती जी हजूर, जी हजूर करेल. सर्व शक्तींच्या समोर ही माया, प्रकृति, संस्कार, स्वभाव सर्व दासी बनतील. तुम्हा मालकाची वाट पाहतील, मालक काही ऑर्डर करा.

आज समर्थ दिवस आहे ना, तर कोणकोणत्या समर्थि (शक्ती) आहेत त्या बापदादा मुलांकडून उजळणी करून घेत आहेत. अंडरलाईन करत आहेत. गरजेच्या वेळी शक्तिहीन का होता? बापदादांनी बघितले आहे, मेजॉरिटी मुलांमध्ये लिकेज आहे, शक्ति लिकेज झाल्या कारणाने कमी होतात आणि लीकेज विशेष दोन गोष्टींचे आहे - त्या दोन गोष्टी आहेत - संकल्प आणि वेळ वेस्ट जातो. खराब होत नाही परंतु व्यर्थ, वेळेवर वाईट कार्य करत नाहीत परंतु जमा सुद्धा करत नाहीत. फक्त एवढंच बघतात - आज वाईट काही झाले नाही परंतु चांगले काय जमा केले? गमावले नाही परंतु कमावले का? दुःख दिले नाही परंतु सुख किती जणांना दिले? कोणाला अशांत केले नाही, परंतु शांतीचे व्हायब्रेशन किती पसरवले? शांतिदूत बनून वायुमंडळाद्वारे, मुखाद्वारे, अथवा व्हायब्रेशन द्वारे किती जणांना शांती दिली? कारण तुम्ही जाणता की, हाच थोडासा काळ आहे पुरुषोत्तम कल्याणकारी, जमा करण्याचा काळ आहे. आत्ता नाही तर कधीच नाही, हे प्रत्येक क्षणाला लक्षात रहावे. ‘होऊन जाईल, करू…’ आत्ता नाही तर कधीच नाही. ब्रह्मा बाबांचा हाच तीव्रगतीचा पुरुषार्थ होता तेव्हाच तर नंबर वनच्या टप्प्यावर पोहोचले. तर ज्या बाबांनी ज्या समर्थि (शक्ती) दिलेल्या आहेत, त्या आज समर्थ दिवसा निमित्त आठवल्या ना! बचतीची स्कीम बनवा. संकल्पाची बचत, वेळेची बचत, वाणीची बचत, जे यथार्थ बोल नाहीत, अयथार्थ आणि व्यर्थ बोलाची बचत.

बापदादा सर्व मुलांचे सदैव ऑथॉरिटीच्या सीटवर सेट असलेले स्वराज्य अधिकारी राजा रूप पाहू इच्छितात. पसंत आहे? हे रूप पसंत आहे ना! कधीही बापदादा कोणत्याही मुलाला टी. व्ही. मध्ये बघतील, तर याच रूपामध्ये बघू देत. बापदादांची नॅचरल टी. व्ही. आहे, स्विच दाबावा लागत नाही. एकाच वेळी चोहो बाजूंचे पाहू शकतात. प्रत्येक मुलाला, कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये असणाऱ्याला पाहू शकतात. तर होऊ शकते का? उद्यापासून टी. व्ही. चालू केला तर काय दिसून येईल? फरिश्त्याच्या ड्रेसमध्ये, फरिश्त्याचा ड्रेस आहे चमकणारा लाईटचा ड्रेस, या शरीरभानाच्या मातीचा ड्रेस घालायचा नाही. चमकणारा ड्रेस असावा, सफलतेचा सितारा असावा, बापदादा प्रत्येकाची अशी मूर्ती पाहू इच्छितात. पसंत आहे ना! मातीचा ड्रेस घालाल तर मातीचे व्हाल ना! जसे बाबा अशरीरी आहेत, ब्रह्मा बाबा चमकणाऱ्या ड्रेसमध्ये आहेत, फरिश्ता आहेत. तर फॉलो फादर. स्थूलमध्ये बघा तुमच्या कोणत्या कपड्याला माती लागली, डाग लागला तर काय करता? बदलता ना! असेच चेक करा की सदैव चमकणाऱ्या फरिश्त्याचा ड्रेस आहे का? जो बाबांना अभिमान आहे की, प्रत्येक मुलगा राजा मुलगा आहे, त्याच स्वरूपामध्ये रहा. राजा बनून रहा. मग ही माया तुमची दासी बनेल आणि निरोप घेण्यासाठी येईल, अर्ध्या कल्पासाठी निरोप घेण्यासाठी येईल, वार करणार नाही. बापदादा नेहमी म्हणतात - बाबांवर बलिहार जाणारे कधीही हार खाऊ शकत नाहीत. जर हार असेल तर बलिहार नाही आहात.

आता तुम्हा सर्वांची मिटिंग होणार आहे ना, मिटींगची डेट फिक्स असते ना. तर या वेळी फक्त सेवेच्या प्लॅनची मिटींग बापदादा पाहू इच्छित नाहीत, भले सेवेचे प्लॅन बनवा परंतु मिटींगमध्ये सफलतेच्या सेरीमनीचा प्लॅन बनवा. खूप सेरीमनी केल्यात आता सफलतेच्या सेरीमनीची डेट फिक्स करा. चला विचार करूया की, सर्वजण कसे होतील! बापदादा म्हणतात कमीतकमी १०८ रत्न तरी सफलतामूर्तची सेरीमनी साजरी करु देत. उदाहरण बनू देत. हे होऊ शकते काय? बोला, पहिली लाईनवाले बोला, होऊ शकते? उत्तर देण्याची हिंमत ठेवत नाहीत. विचार करतात माहिती नाही करतील, नाही करतील? हिंमतीने सर्व काही होऊ शकते. दादीने सांगावे - १०८ सफलतामूर्त बनू शकतात? (दादी म्हणाल्या - हां, जरूर बनू शकतात, सफलतेची सेरीमनी होऊ शकते) बघा, दादीमध्ये हिंमत आहे. तुम्हा सर्वांच्या वतीने हिंमत ठेवत आहे. तर सहयोगी बना. तर ही जी मिटींग होईल ना, त्यामध्ये बापदादा रिपोर्ट घेतील. पांडव तुम्ही बोला ना, गप्प का आहात? का गप्प आहात? ही हिंमत का ठेवत नाही आहात? करून दाखवणार? असे आहे? ठीक आहे, हिंमत तर ठेवू शकता ना? जे समजतात आम्ही तर हिंमत ठेवून करून दाखवणार, त्यांनी हात वर करा. करणार? कोणता संस्कार नाही राहणार? कोणती कमजोरी नाही राहणार? अच्छा, मधुबनवाले देखील हात वर करत आहेत. वाह! मुबारक असो, मुबारक असो. ठीक आहे, १०८ तर मग सहजच होऊन जातील. इतक्या जणांनी हात वर केला तर १०८ काय मोठी गोष्ट आहे. डबल फॉरेनर्स काय करणार? हां, दादी जानकी ऐकत आहेत, त्यांना उमंग येत आहे - मी बोलू. फॉरेनची माळा देखील बघणार, ठीक आहे? हात वर करा, ठीक आहे? अच्छा, आज हे (डबल फॉरेनर) किती बसले आहेत? (२००) यामधले १०८ तर तयार होतील! ठीक आहे ना! यामध्ये करायचे - पहिला मी. यामध्ये दुसऱ्याला बघायचे नाही, पहिला मी. तो दुसरा ‘मी-मी’ करायचा नाही, हा ‘मी’ जरूर करा. बापदादा आणखी दुसरी कामे देखील देत आहेत.

आज समर्थ दिवस आहे ना तर समर्थि आहे. बापदादा एक विचित्र दिवाळी साजरी करु इच्छितात. तुम्ही तर दिवाळी कित्येकदा साजरी केली आहे परंतु बापदादा विचित्र दिवाळी साजरी करु इच्छितात, ऐकवू? अच्छा. वर्तमान वेळेला तर पाहतच आहात, दिवसेंदिवस चोहो बाजूंना मनुष्य आत्म्यांमध्ये निराशा खूप वाढत आहे. तर भले मनसा सेवा करा, भले वाचा सेवा करा, भले संबंध-संपर्काची करा, परंतु बाप-दादा निराश मनुष्यांमध्ये आशेचा दीपक जागवू इच्छितात. चोहो बाजूंच्या मनुष्य आत्म्यांच्या मनामध्ये आशेचा दीपक जागृत व्हावा. ही आशेच्या दीपकांची दिवाळी बापदादा बघू इच्छित आहेत. हे होऊ शकते का? कमीतकमी वायुमंडळामध्ये हा आशेचा दीपक जागृत झाला तर आता विश्व परिवर्तन झाले की झाले, सोनेरी पहाट आली की आली. ही निराशा नष्ट व्हावी - काहीही होणार नाही, काहीही होणार नाही. आशेचे दिवे जागृत व्हावेत. करु शकता ना, हे तर सोपे आहे ना की मुश्किल आहे? सोपे आहे? जे करणार त्यांनी हात वर करा. करणार? इतके सर्वजण दीपक जागृत करणार तर दीपमाळा तर होईल ना! व्हायब्रेशन इतके पावरफुल करा, ठीक आहे, समोर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नसाल परंतु लाईट हाऊस, माइट हाऊस बनून दूर पर्यंत व्हायब्रेशन पसरवा. विज्ञान जर लाइट हाऊस द्वारे दूर पर्यंत लाइट देऊ शकते तर काय तुम्ही व्हायब्रेशन पसरवू शकत नाही! फक्त दृढ संकल्प करा - करायचेच आहे. बिझी व्हा. मनाला बिझी ठेवाल तर स्वतःला सुद्धा फायदा आणि आत्म्यांना देखील फायदा. चालता-फिरता हेच वृत्तीमध्ये ठेवा की विश्वाचे कल्याण करायचेच आहे. ही वृत्ति वायुमंडळ पसरवेल कारण की वेळ अचानक येणार आहे. असे व्हायला नको की तुमचे भाऊ-बहिणी उल्हना देतील की तुम्ही आम्हाला सांगितले का नाही! बरीच मुले विचार करतात की, शेवटपर्यंत करु परंतु शेवटपर्यंत केलात तरी देखील तुम्हाला उल्हना देतील. हीच उल्हना देतील - आम्हाला काही काळ अगोदर सांगितले असते, काही तरी बनू शकलो असतो म्हणून प्रत्येक संकल्पामध्ये बापदादांच्या आठवणीने लाईट घेत चला, लाईट हाऊस होऊन लाईट देत जा. टाइम वेस्ट करु नका, बापदादा जेव्हा पहातात खूप युद्ध करतात, तर बापदादांना चांगले वाटत नाही. मास्टर सर्वशक्तिवान आणि युद्ध करत आहे! तर राजा बना, सफलतामूर्त बना, निराशेला नष्ट करून आशेचा दीपक लावा. अच्छा.

सर्व बाजूंच्या मुलांच्या स्नेहाच्या आठवणीच्या माळा तर खूप पोहोचल्या आहेत. बापदादा आठवण पाठवणाऱ्यांना सन्मुख पहात आठवणीचा प्रतिसाद देत हृदयापासून आशीर्वाद आणि हृदयापासून प्रेम देत आहेत. अच्छा.

जे पहिल्यांदाच आले आहेत त्यांनी उभे रहा. चांगले आहे, प्रत्येक टर्नमध्ये बघितले आहे मेजॉरिटी नविन असतात. तर सेवा वाढवली आहे ना, इतक्यांना संदेश दिला आहे. जसा तुम्हा लोकांना संदेश मिळाला तसे तुम्ही देखील आणखी दुप्पट, दुप्पट संदेश द्या. योग्य बनवा. छान आहे. प्रत्येक सब्जेक्टमध्ये अजून उमंग-उत्साहाने पुढे जा. छान आहे.

अच्छा, आता लक्ष्य ठेवा, चालता-फिरता भले मनसा, भले वाचा, भले कर्मणा सेवेशिवाय देखील रहायचे नाही आणि आठवणीशिवाय देखील रहायचे नाही. आठवण आणि सेवा कायम एकत्रच आहेत. इतके स्वतःला बिझी ठेवा, आठवणीमध्ये देखील आणि सेवेमध्ये देखील. रिकामे राहता त्यामुळे मायेला येण्याचा चान्स मिळतो. इतके बिझी रहा जेणेकरून माया चुकूनही येण्याची हिंमत करणार नाही. आणि मग बाप समान बनण्याचे जे लक्ष्य ठेवले आहे, ते सहज साध्य होईल. मेहनत करावी लागणार नाही, स्नेही स्वरूप बनून रहाल. अच्छा.

बापदादांच्या नयनांमध्ये सामावलेली नुरे रत्न मुले, बाबांच्या सर्व प्रॉपर्टीचे अधिकारी श्रेष्ठ आत्मिक मुले, सदैव उमंग-उत्साहाच्या पंखानी उडणारे आणि उडविणारे महावीर महावीरणी मुले, एक बाबाच संसार आहे या प्रेमामध्ये मग्न राहणाऱ्या लवलीन मुलांना, लवलीन बनणे अर्थात बाप समान सहज बनणे. तर लवली आणि लवलीन दोन्ही मुलांना खूप-खूप पद्म-पद्मगुणा प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
आपल्या प्रत्येक कर्म अथवा विशेषतेद्वारे दात्याच्या दिशेने इशारा करणारे सच्चे सेवाधारी भव

सच्चे सेवाधारी कोणत्याही आत्म्याला सहयोग देऊन आपल्यामध्ये अडकवणार नाहीत. ते सर्वांचे कनेक्शन बाबांशी करून देतील. त्यांचा प्रत्येक बोल बाबांची स्मृति देणारा असेल. त्यांच्या प्रत्येक कर्मामधून बाबा दिसून येतील. त्यांना हा संकल्प देखील येणार नाही की माझ्या विशेषतेमुळे हे माझे सहयोगी आहेत. जर तुम्हाला बघितले, बाबांना नाही तर ही काही सेवा केली नाहीत, परंतु बाबांना विसरायला लावलेत. सच्चे सेवाधारी सत्याच्या बाजूने सर्वांचा संबंध जोडतील, स्वतःशी नाही.

सुविचार:-
कोणत्याही प्रकारचा विनंती अर्ज देण्याऐवजी सदैव संतुष्ट रहा.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-

श्रेष्ठ भाग्याची रेषा ओढण्याचा आधार आहे - “श्रेष्ठ संकल्प आणि श्रेष्ठ कर्म”. भले ट्रस्टी आत्मा आहात, भले सेवाधारी आत्मा आहात, दोघेही याच आधारे नंबर घेऊ शकतात. दोघांनाही भाग्य बनविण्याचा पूर्ण चान्स आहे, जो जितके भाग्य बनवू इच्छितो तेवढे बनवू शकतो.