06-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आपणच आपल्याशी प्रतिज्ञा करा की, मला खूप-खूप गोड बनायचे आहे, सर्वांकडे सुखाच्या आणि प्रेमाच्या दृष्टीने पाहायचे आहे, कोणाच्याही नावा-रूपामध्ये अडकायचे नाही”

प्रश्न:-
‘योग’ची सिद्धी काय आहे? पक्क्या योगीची लक्षणे सांगा.

उत्तर:-
सर्व कर्मेंद्रिये पूर्णपणे शांत आणि शीतल होणे, ही ‘योग’ची सिद्धी आहे. पक्की योगी मुले ती आहेत, ज्यांची कर्मेंद्रिये जरा सुद्धा चंचल होणार नाहीत. त्यांची दृष्टी कोणत्याही देहधारी मध्ये किंचितही आकर्षित होणार नाही. गोड मुलांनो, आता तुम्ही तरुण नाही आहात, तुमची आता वानप्रस्थ अवस्था आहे.

गीत:-
जाग सजनियाँ जाग…

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले. या गाण्याच्या अर्थाविषयी मनातल्या मनात विचार सागर मंथन करायचे आहे आणि आनंदीत व्हायचे आहे, कारण या नवीन दुनियेसाठी नवीन गोष्टी आहेत. या नवीन गोष्टी आता ऐकायच्या आहेत. मुले आता जाणतात की, नवीन दुनिया स्थापन करणारा कोणी मनुष्य असू शकत नाही. तुम्ही जेव्हा या गोष्टी ऐकता तेव्हा समजता की, या तर ५ हजार वर्षांपूर्वीच्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या पुन्हा नव्याने ऐकवल्या जात आहेत. तर जुने तेच नवीन आणि नवीन तेच जुने होते. आता तुम्ही जाणता की, ५ हजार वर्षांपूर्वीच्या त्याच गोष्टी बाबा नवीन करून ऐकवत आहेत. गोष्टी त्याच आहेत. कशासाठी ऐकवत आहेत? नवीन दुनियेचा वारसा प्राप्त करण्यासाठी. यामध्ये ज्ञानाचा डान्स करायचा असतो. भक्तीमध्ये देखील खूप डान्स करतात. गोल फेऱ्या मारत डान्स करतात. ज्ञानाचा डान्स तर अगदी सोपा आहे. त्यामध्ये (भक्तीमध्ये) कर्मेंद्रिये खूप सक्रिय असतात, त्यासाठी मेहनत करावी लागते. हा तर फक्त अंतर्मनामध्ये ज्ञानाचा डान्स चालतो. सृष्टी चक्र कसे फिरते, त्याचे नॉलेज बुद्धीमध्ये आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये. होय, आठवणीमध्ये राहण्यासाठी मेहनत करावी लागते. बरीच मुले नापास होतात, कुठे ना कुठे घसरतात (अधोगती होते). सर्वात मुख्य गोष्ट आहे - नावा-रूपामध्ये अडकायचे नाही. पती-पत्नी काम विकाराच्या वश होऊन नावा-रूपामध्ये अडकतात ना. क्रोध कधी नावा-रूपामध्ये अडकत नाही. सर्वात पहिली तर याचीच खूप काळजी घ्यायची आहे की, कोणाच्याही नावा-रूपामध्ये अडकायचे नाही. स्वतःला आत्मा समजायचे आहे. मी आत्मा, अशरीरी आले होते, आता अशरीरी होऊन परत जायचे आहे. या शरीराचे भान तोडून टाकायचे आहे. नावा-रूपामध्ये अडकणे हा अतिशय वाईट रोग आहे. बाबा सावध करतात मुलांना. काहीजण या गोष्टीला समजत नाहीत. म्हणतात, बाबा उगाचच असे म्हणतात की, तुम्ही नावा-रूपामध्ये अडकला आहात. परंतु हा गुप्त आजार आहे, म्हणून साजन सजणींना अथवा बाबा मुलांना सजग करत आहेत. मुलांनो, जागे व्हा. आता पुन्हा कलियुगा नंतर सतयुग येणार आहे. बाबा ज्योत जागृत करण्यासाठी येतात. व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासाठी दिवा लावतात. आणि मग तो दिवा विझू नये यासाठी काळजी घेतात, जेणेकरून आत्मा अंधारात राहू नये. वास्तविक पाहता, या सर्व आहेत भक्तिमार्गातील गोष्टी. आत्मा तर सेकंदामध्ये निघून जाते. कित्येक लोक ज्योतीला देखील भगवान मानतात. ‘ब्रह्म’ला मोठी ज्योत म्हणतात. ब्रह्म समाजींचे मंदिर असते, जिथे रात्रं-दिवस ज्योत तेवत असते. किती खर्च होतो. विनाकारण तूप खर्च होते. इथे असे काहीही टाकायचे नाहीये. आठवण तुपाचे काम करते. आठवण रूपी घृत आहे. तर गोड-गोड मुले हे समजतात. नवीन गोष्ट असल्यामुळेच वाद होतो. बाबा म्हणतात - मी येतो स्वीट चिल्ड्रेनकडे (गोड मुलांकडे). भारतामध्येच येतो. आपला जन्म आणि आपला देश सर्वांना प्रिय वाटतो ना. बाबांना तर सर्वजण प्रिय वाटतात. तरी देखील मी आपल्या भारत देशामध्येच येतो. गीतेमध्ये जर श्रीकृष्णाचे नाव नसते, तर सर्व मनुष्यमात्रांनी शिवबाबांना मानले असते. ‘शिव’च्या मंदिरामध्ये कित्येक लोक जातात. सर्वात मोठे मंदिर सोमनाथाचे होते. आता तर असंख्य मंदिरे बनली आहेत. श्रीकृष्णाला इतके सर्व जण मानत नाहीत, जितके बेहदच्या बाबांना मानतात. तर या वेळी तुम्हाला यांच्या सारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीही नाही. यामध्ये काही साकारची महिमा नाहीये. ही तर निराकारची महिमा आहे, जे अभोक्ता आहेत. जेव्हा बेहदचे बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर त्यांच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे ना.

आज-उद्या करता-करता काळ खाऊन टाकेल. वेळ फार थोडा राहिला आहे. बाबांकडून वारसा तर घ्या. जेव्हा फॉर्म भरतात, तेव्हा त्याच वेळी समजावून देखील सांगायचे आहे - ‘जर का विश्वास करत आहात की, ते बेहदचे पिता आहेत, तर त्या पित्याकडून वारसा घेण्याचा पुरुषार्थ करा, नाहीतर बाहेर गेल्यावर लगेच विसरून जाल’. बाबा तर कल्याणकारी आहेत ना. म्हणतात - या ‘योग’द्वारेच (आठवणीद्वारेच) तुमची सर्व दुःखे २१ जन्मांकरिता दूर होणार आहेत. मुलींनी घरच्यांना देखील सांगत राहायचे आहे की, आता सर्व दुःखे दूर करणाऱ्या बेहदच्या बाबांची आठवण केल्यानेच तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनाल. पवित्र तर जरूर राहावे लागेल. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. जितके-जितके जास्त आठवणीमध्ये राहाल, तितकी कर्मेंद्रिये देखील शांत होतील. जोपर्यंत ‘योग’ची सिद्धी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कर्मेंद्रिये देखील शांत होणार नाहीत. प्रत्येकाने स्वतःची तपासणी करावी - काम विकार मला धोका तर देत नाही ना? जर मी पक्का योगी असेन, तर कोणत्याही प्रकारचा चंचलपणा होता कामा नये. ही जणूकाही वानप्रस्थ अवस्था आहे - फक्त बाबांचीच आठवण करत राहायचे आहे. बाबा सर्व मुलांना समजावून सांगतात. जेव्हा तुम्ही उत्तम योगी बनाल, तुमची दृष्टी कुठेही अडकणार नाही (आकर्षित होणार नाही), तेव्हा तुमची कर्मेंद्रिये शांत होतील. मुख्य डोळेच आहेत, जे सर्वांना धोका देतात. जेव्हा तुमची ‘योग’मध्ये अवस्था चांगल्या प्रकारे स्थिर होईल, तेव्हा मग जाणवेल की आपण जणू तरुणपणीच वानप्रस्थ अवस्थेमध्ये आलो आहोत. बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे. म्हणून स्वतःची तपासणी करत राहा. जितके आठवणीमध्ये राहाल, तितकी कर्मेंद्रिये शांत होतील आणि स्वभाव अतिशय गोड बनेल. जाणवेल की, मी पूर्वी किती कडवट होतो आणि आता किती गोड बनलो आहे. बाबा प्रेमाचा सागर आहेत ना, तर मुलांना देखील तसे बनायचे आहे. तर बाबा म्हणतात - सर्वांप्रती प्रेमाची दृष्टी असावी. जर कोणाला दुःख द्याल, तर दुःखी होऊन मराल, म्हणून अतिशय गोड बनायचे आहे.

बाबा म्हणतात - मी रूप-बसंत आहे ना. बाबांकडून किती अमूल्य ज्ञान रत्ने मिळतात, ज्यांनी तुम्ही आपली झोळी भरता. ते लोक मग शंकरासमोर जाऊन म्हणतात - आमची झोळी भरा. त्यांना हेच ठाऊक नाही आहे की, झोळी भरणारा शंकर नाहीये. आता तुम्ही समजता की, ज्ञान सागर बाबा आम्हा मुलांची ज्ञान रत्नांनी झोळी भरत आहेत. तुम्ही देखील रूप-बसंत आहात. प्रत्येकाची आत्मा रूप-बसंत आहे. स्वतःला पाहत राहा की, मी किती ज्ञान रत्न धारण करतो आणि ज्ञानाचा डान्स करतो अथवा रत्नांचे दान करतो. सर्वात उत्तम रत्न आहे - ‘मनमनाभव’. बाबांची आठवण केल्याने बाबांचा वारसा प्राप्त करता. ज्याप्रमाणे बाबांमध्ये ज्ञान भरलेले आहे, अगदी तसेच बाबा बसून मुलांना आप समान बनवतात. गुरू लोक देखील आप समान बनवतात. हे आहेत बेहदचे बाबा, ज्यांचे रूप बिंदू प्रमाणे आहे. तुमचे रूप देखील बिंदू प्रमाणे आहे. ते तुम्हाला आप समान ज्ञानाचा सागर बनवतात. जितकी धारणा कराल आणि करवून घ्याल… त्यांनी असे समजा की आपले पद उच्च आहे. अनेकांचे कल्याणकारी बनाल, तर अनेकांचे आशीर्वाद मिळतील. बाबा देखील रोज सेवा करतात ना. ही गुलजार बच्ची अतिशय गोडपणे ज्ञान समजावून सांगते. सर्वांना खूप आवडते. मनामध्ये येते की, अशी ब्राह्मणी आपल्याला मिळावी. आता एक ब्राह्मणी सर्व ठिकाणी तर जाऊ शकत नाही. तरी देखील बाबा म्हणतात - ज्यांना वाटते की, आपण चांगले समजावून सांगतो, त्यांनी ऑलराउंड सेवा केली पाहिजे. आपणहून आवड निर्माण झाली पाहिजे की, आपण सेंटर्सवर फेरी मारून यावी. ज्यांना-ज्यांना वाटते की, मी अनेकांचे कल्याण करू शकते, माझा चांगला सुगंध पसरतो, तर त्यांना आवड वाटली पाहिजे. १०-१५ दिवस जाऊन सेंटर्सवरून फेरी मारून यावी. एकाला पाहून मग इतरही शिकतील, जो करेल तो प्राप्त करेल. ही सेवा खूप कल्याणकारी आहे. तुम्ही मनुष्यांना जीवनदान देता. हे अतिशय उत्तम ते उत्तम कार्य आहे. व्यवसाय करणारे देखील युक्तीने वेळ काढून सेवेसाठी जाऊ शकतात. सेवेमध्ये तत्पर असणाऱ्यांवर तर बाबा प्रेम देखील करतील आणि त्यांचे पालन-पोषण देखील करतील. ज्यांना सेवेची आवड असेल, ते सेवे शिवाय राहू शकणार नाहीत. बाबा मदत देखील करतात ना. मुलांनी खूप दयाळू बनायचे आहे. बिचाऱ्यांचे जीवन खूप दुःखी आहे. तुम्ही त्यांना जीवनदान देता, कोणाला अविनाशी ज्ञान रत्नांचे दान करणे, यासारखे सर्वोत्तम ज्ञान दान दुसरे कोणतेही नाही. खूप दयाळू बनायचे आहे. ब्राह्मणी कमजोर असल्याकारणाने सेवा मंदावते, म्हणून चांगल्या टीचरची मागणी करतात. जेव्हापण वाटेल, तेव्हा सेवेला निघून गेले पाहिजे. बाबा, कोणते सेंटर थंड पडले आहे, मी जाऊन फेरी मारून येऊ? प्रदर्शनीची चित्रे देखील आहेत. चित्रांवरून जास्त चांगल्या रितीने समजू शकतील. आपण सेवा कशी वाढवावी, याचा विचार चालला पाहिजे. बाबा देखील सर्वांचे जीवन हिऱ्या समान बनवतात. तुम्हा मुलांनी देखील सेवा करायची आहे. ‘वंदे मातरम्’ गायले जाते, परंतु त्याचा अर्थ समजत नाहीत. पतित मनुष्यांना अथवा पृथ्वी इत्यादींना कधीही वंदन केले जात नाही. ही तर ५ तत्त्वे आहेत, त्यांना कसले वंदन करणार? ५ तत्त्वांनी बनलेले शरीर आहे, तर शरीराची पूजा करणे म्हणजे मूर्तीची पूजा करणे झाले. शिवबाबांना तर शरीरच नाहीये. त्यांची पूजा सर्वांत श्रेष्ठ पूजा आहे. बाकीची आहे मध्यम पूजा. आज काल तर मनुष्यांची देखील पूजा करत राहतात, ते तर पतित आहेत. महान आत्मे तर देवता आहेत. संन्याशांपेक्षा ते अधिक पवित्र आहेत.

आता तुम्ही मुले जाणता की, आपण देवता बनत आहोत. बाबा आम्हाला या अविनाशी ज्ञान रत्नांचे दान करायला शिकवत आहेत. यासारखे श्रेष्ठ दान दुसरे कोणतेही नाही. एका बाबांचीच आठवण करायची आहे. शिव आणि लक्ष्मी-नारायणाची चित्रे तर आहेत. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावली, तर आठवण राहील. शिवबाबा आम्हाला असे लक्ष्मी-नारायण बनवत आहेत. या वेळी तुम्ही बनत आहात. स्वर्गाचे रचयिता आहेतच शिवबाबा. वारसा काही सतयुगामध्ये तर देणार नाहीत. या अंतिम जन्मामध्ये शिवबाबा म्हणतात - माझी आठवण करा, तर तुम्ही हे (लक्ष्मी-नारायण) बनाल. इतर सर्व गोष्टी सोडून फक्त सेवा आणि सेवा करा. बाबांची आठवण करता, ही देखील खूप मोठी सेवा करता. तत्व इत्यादी सर्व पावन बनतात. योगाची महिमा खूप मोठी आहे. दुनियेमध्ये योग-आश्रम तर पुष्कळ आहेत, परंतु ते सर्व आहेत भौतिक हठयोग. तुमचा हा आहे राजयोग, ज्याद्वारे तुमचा बेडा पार होतो. त्या विविध प्रकारच्या हठयोग इत्यादीने शिडी उतरतच आला आहात. मुख्य गोष्ट आहे आठवणीची. पाहायचे आहे की, आपले मन विकाराकडे तर जात नाही ना? विकारीलाच पतित म्हटले जाते अर्थात कवडी समान. विकारामध्ये पडल्याने स्वतःचेच नुकसान कराल. जो करेल तो प्राप्त करेल. बाबा पाहोत अथवा न पाहोत. स्वतःला तपासायचे आहे - मी बाबांची सेवा करतो का? माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना? असेल तर तो काढून टाकला पाहिजे. आपल्यामधील अवगुण काढून टाकण्यासाठी बाबा खूप काही सांगत असतात. ‘निर्गुण’ याचा अर्थ देखील कोणाला समजत नाही. ‘निर्गुण बालक’ संस्थेची माणसे तरी काय करू शकणार, ज्यांच्यामध्ये कोणतेही गुण नाहीत. अर्थ न समजता जे मनात येईल ते बोलतात. अनेक मते आहेत ना. तुम्हाला एक मत मिळते, ज्याचा तुम्हाला अथाह आनंद झाला पाहिजे. बाबा केवळ एवढेच सांगतात - माझी आठवण करा आणि कमलपुष्प समान बना. मनसा-वाचा-कर्मणा पवित्र बना. तुम्ही मुले जाणता की, आपण ब्राह्मण श्रीमतावर आपल्या तन-मन-धना द्वारे आपली आणि साऱ्या विश्वाची सेवा करत आहोत. बाबा येतील तर भारतामध्येच ना. तुम्ही पांडव भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा करत आहात. तुम्ही आपले कार्य करत आहात. शेवटी विजय तर पांडवांचाच होणार आहे. यामध्ये युद्धाचा प्रश्नच नाही. तुम्ही आहात डबल नॉनव्हायोलन्स (डबल अहिंसक). ना विकारामध्ये जाता, ना गोळी चालवता. व्हायोलन्स द्वारे (हिंसेने) कोणीही विश्वावर बादशाही प्राप्त करू शकत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे - ते दोघे (अमेरिका आणि रशिया), जर आपसामध्ये एकत्र आले तर विश्वावर राज्य करू शकतात. परंतु ड्रामामध्ये असे नाही. ख्रिश्चन लोकांनीच कृष्णपुरीला गिळंकृत केले आहे. वास्तविक भारत श्रीकृष्णाचीच पुरी (नगरी) होती ना. युद्ध करून राज्य बळकावले, प्रचंड प्रमाणात धन लुटून घेऊन गेले. आता तेच धन पुन्हा परत येत आहे आणि मग तुम्ही विश्वाचे मालक बनता. बाबा किती युक्त्या सांगतात. त्यांनीच तुमचे राज्य हिरावून घेतले आहे, मग ते आपसामध्ये युद्ध करतात आणि विश्वाचे मालक तुम्ही बनता. किती मोठी बादशाही आहे! मेहनत फक्त यामध्ये आहे - आठवण करत रहा आणि आपला वारसा प्राप्त करा. यामध्ये कंटाळा करता कामा नये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) इतर सर्व गोष्टी सोडून ज्ञान दान करायचे आहे. रूप-बसंत बनायचे आहे. आपल्या अवगुणांना काढून टाकण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. इतरांकडे पाहायचे नाही.

२) आपला स्वभाव अतिशय गोड बनवायचा आहे. सर्वांप्रती प्रेमाची दृष्टी ठेवायची आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही. कर्मेंद्रिय-जीत बनायचे आहे.

वरदान:-
संपूर्ण समर्पणाच्या विधीद्वारे सर्वगुण संपन्न बनण्याच्या पुरुषार्था मध्ये सदा विजयी भव

‘संपूर्ण समर्पण’, त्याला म्हटले जाते, ज्याच्या संकल्पामध्ये देखील बॉडी-कॉन्शसनेस (देहभान) नसेल. आपल्या देहाचे भान देखील अर्पण करा; ‘मी अमकी आहे’ - हा संकल्प देखील अर्पण करुन संपूर्ण समर्पित होणारे सर्वगुणांनी संपन्न बनतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही गुणाची उणीव राहत नाही. जे सर्व काही समर्पण करून सर्वगुण संपन्न अथवा संपूर्ण बनण्याचे लक्ष्य ठेवतात, अशा पुरुषार्थींना बापदादा सदैव ‘विजयी भव’चे वरदान देतात.

बोधवाक्य:-
मनाला वशमध्ये करणारेच (नियंत्रित करू शकणारेच) मनमनाभव राहू शकतात.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

पवित्रता आणि अपवित्रता याचे कारण आहे ‘स्मृती’. जेव्हा ही स्मृती असते की, ‘ही देवी आहे’, तर ती स्मृती, दृष्टी आणि वृत्तीला पवित्र बनवते. आणि जेव्हा ही स्मृती असते की, ‘ही स्त्री आहे’, तर ती स्मृती, वृत्ती आणि दृष्टीला अपवित्रतेकडे खेचून नेते. तिथे रूपाला पाहाल आणि इथे रुहानियतला पाहाल.