06-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचे हे शिक्षण सोर्स ऑफ इन्कम (उत्पन्नाचे साधन) आहे. या शिक्षणाने २१
जन्मांसाठी कमाईचा प्रबंध केला जातो”
प्रश्न:-
मुक्तिधाम
मध्ये जाणे ही कमाई आहे की तोटा आहे?
उत्तर:-
भक्तांसाठी ही देखील कमाईच आहे कारण अर्ध्या कल्पा पासून शांतीच मागत आले आहेत.
पुष्कळ मेहनती नंतर सुद्धा शांती मिळालेली नाही. आता बाबांद्वारे शांती मिळत आहे
अर्थात मुक्तिधाम मध्ये जातात तर हे देखील अर्ध्याकल्पाच्या मेहनतीचे फळ झाले;
त्यामुळे याला देखील कमाई म्हणता येईल, तोटा नाही. तुम्ही मुले तर जीवन-मुक्तीमध्ये
जाण्याचा पुरुषार्थ करता. तुमच्या बुद्धीमध्ये आता साऱ्या जगाचा इतिहास-भूगोल नाचत
आहे.
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांना रुहानी बाबांनी हे तर समजावून सांगितले आहे की, सर्वकाही
आत्माच समजते. या समयी तुम्हा मुलांना बाबा आत्मिक दुनियेमध्ये घेऊन जातात. त्याला
म्हटले जाते - रूहानी दैवी दुनिया, याला म्हटले जाते - भौतिक दुनिया, मनुष्यांची
दुनिया. मुलांना समजते की, दैवी दुनिया होती, ती दैवी मनुष्यांची पवित्र दुनिया होती.
आता मनुष्य अपवित्र आहेत म्हणून त्या देवतांचे गायन-पूजन करतात. ही स्मृती आहे की
खरोखर सुरुवातीला झाडामध्ये (मनुष्य सृष्टी रुपी झाडामध्ये) एकच धर्म असणार. विराट
रूपामध्ये झाडावर देखील समजावून सांगायचे आहे. या झाडाचे बीजरूप वरती आहे. झाडाचे
बीज आहेत बाबा, मग जसे बीज तसेच फळ अर्थात पाने (इतर धर्म) निघतात. हे देखील एक
आश्चर्य आहे ना. इतकी छोटीशी चीज किती फळ देते. त्याचे रूप किती बदलत जाते. या
मनुष्य सृष्टीरुपी झाडाला कोणीही जाणत नाही, याला म्हटले जाते - ‘कल्प वृक्ष’, याचे
फक्त गीतेमध्येच वर्णन आहे. हे तर सर्वजण जाणतात की, गीताच एक नंबरचे धर्मशास्त्र
आहे. शास्त्रे देखील नंबरवार तर असतात ना. नंबरवार धर्मांची स्थापना कशी होते, हे
देखील फक्त तुम्हीच समजू शकता, दुसऱ्या कोणामध्येही हे ज्ञान नसते. तुमच्या
बुद्धीमध्ये आहे सर्वप्रथम कोणत्या धर्माचे झाड असते नंतर मग त्यामध्ये इतर धर्मांची
वृद्धी कशी होते. यालाच म्हटले जाते विराट नाटक. मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण झाड
आहे. झाडाची उत्पत्ती कशी होते, हीच मुख्य गोष्ट आहे. देवी-देवतांचे झाड आता नाही
आहे बाकी सर्व शाखा-उपशाखा (बाकीचे धर्म) अस्तित्वात आहेत. परंतु आदि सनातन
देवी-देवता धर्माचे फाउंडेशन नाही आहे. हे देखील गायन आहे - एका आदि सनातन
देवी-देवता धर्माची स्थापना करतात, बाकी इतर सर्व धर्म विनाश होतात. आता तुम्ही
जाणता किती छोटेसे दैवी झाड असेल. मग बाकीचे इतके सर्व धर्म असणारही नाहीत.
सुरुवातीला झाड छोटे असते मग त्याचा विस्तार होत जातो. वाढत-वाढत आता किती मोठे झाले
आहे. आता याचे आयुष्य पूर्ण झाले आहे, याच्यावरून वडाच्या झाडाचे उदाहरण खूप चांगले
समजावून सांगतात. हे देखील गीतेचे ज्ञान आहे जे बाबा तुम्हाला सन्मुख बसून ऐकवत
आहेत, ज्याद्वारे तुम्ही राजांचेही राजा बनता. मग भक्तिमार्गामध्ये याची गीता
शास्त्र इत्यादी बनतील. हा अनादि ड्रामा पूर्वनियोजित आहे. तरीही पुन्हा असेच होणार.
मग जे-जे धर्म स्थापन होतील त्यांचे आपापले शास्त्र (धर्मग्रंथ) असेल. सिख धर्माचे
आपले शास्त्र, ख्रिश्चन आणि बौद्धांचे आपले शास्त्र असेल. आता तुमच्या बुद्धीमध्ये
संपूर्ण जगाचा इतिहास-भूगोल अगदी फेर धरत आहे. बुद्धी ज्ञान-डान्स करत आहे. तुम्ही
साऱ्या झाडाला जाणले आहे. कसे-कसे धर्म येतात, कशी वृद्धी होत जाते. पुन्हा मग आपला
एक धर्म स्थापन होतो, बाकी सर्व धर्म नष्ट होतात. गातात ना - ‘ज्ञान सूर्य प्रगटा…’.
आता तर घोर अंधःकार आहे. किती प्रचंड लोकसंख्या आहे, नंतर मग हे इतके सर्व नसणार.
या लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये हे नव्हतेच मुळी. पुन्हा एक धर्म स्थापन होणारच
आहे. हे ज्ञान बाबाच येऊन देतात. तुम्ही मुले इथे येऊन कमाईसाठी किती शिक्षण घेता.
बाबा टीचर बनून येतात तर अर्ध्या कल्पासाठी तुमच्या कमाईचा प्रबंध होतो. तुम्ही खूप
श्रीमंत बनता. तुम्ही जाणता आता आपण शिकत आहोत. हा आहे अविनाशी ज्ञान रत्नांचा
अभ्यास. भक्तीला अविनाशी ज्ञान रत्न म्हणता येणार नाही. भक्तीमध्ये मनुष्य जे काही
शिकतात, त्याने तर तोटाच होतो. रत्न बनत नाहीत. ज्ञान रत्नांचा सागर तर एका
बाबांनाच म्हटले जाते. बाकी ती आहे भक्ती. त्यामध्ये कुठलेही ध्येय उद्दिष्टच नाही.
कमाईच नाही. कमाई करण्यासाठीच तर शाळेमध्ये शिकतात; आणि भक्ती करण्यासाठी मग गुरुकडे
जातात. कोणी तरुणपणीच गुरु करतात, कोणी वृद्धपणी गुरु करतात. कोणी बालपणातच संन्यास
घेतात. कुंभमेळ्यामध्ये कितीतरी येतात. सतयुगामध्ये तर असे काहीही असणार नाही.
तुम्हा मुलांच्या स्मृतीमध्ये सर्व गोष्टी आल्या आहेत. रचता आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणले आहे. त्यांनी (दुनियावाल्यांनी) तर कल्पाचे आयुष्यच
प्रदीर्घ केले आहे. ईश्वराला सर्वव्यापी म्हटले आहे. ज्ञानाचा तर पत्ताच नाहीये.
बाबा येऊन अज्ञान निद्रेमधून जागे करतात. आता तुम्हाला ज्ञानाची धारणा होत आहे.
बॅटरी भरत जात आहे. ज्ञानामध्ये आहे कमाई, भक्तीमुळे आहे तोटा. जेव्हा तोट्याची वेळ
पूर्ण होते तेव्हा मग बाबा कमाई करून देण्यासाठी येतात. मुक्तीमध्ये जाणे - ती
देखील एक कमाई आहे. शांती तर सगळेच मागत राहतात. ‘शांती देवा’ म्हटल्याने बुद्धी
बाबांकडे जाते. म्हणतात - विश्वामध्ये शांती व्हावी, परंतु ती कशी होणार हे मात्र
कोणालाही माहित नाही आहे. शांतीधाम, सुखधाम वेगवेगळी आहेत - हे देखील जाणत नाहीत.
जे पहिल्या नंबरचे (ब्रह्मा बाबा) आहेत, त्यांना देखील काही माहीत नव्हते. आता
तुम्हाला सर्व नॉलेज आहे. तुम्ही जाणता - आपण या कर्मक्षेत्रावर कर्माचा पार्ट
बजावण्यासाठी आलो आहोत. कुठून आलो आहोत? ब्रह्मलोक मधून. निराकारी दुनियेमधून या
साकारी दुनियेमध्ये पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत. आपण आत्मे दुसऱ्या ठिकाणचे रहिवासी
आहोत. इथे हे ५ तत्वांचे शरीर असते. शरीर आहे तेव्हाच तर आपण बोलू शकतो. आपण चैतन्य
पार्टधारी आहोत. आता तुम्ही असे म्हणणार नाही की, ‘या ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला
आम्ही जाणत नाही’. पूर्वी जाणत नव्हतो. आपल्या पित्याला, आपल्या घराला, आपल्या
रुपाला यथार्थ रीती जाणत नव्हतो. आता जाणतो की, आत्मा कसा पार्ट बजावत राहते. स्मृती
आली आहे. आधी ती स्मृती नव्हती.
तुम्ही जाणता सत्य
बाबाच सत्य ऐकवतात, ज्याद्वारे आपण सचखंडाचे मालक बनतो. सत्याच्या देखील वर
सुखमणीमध्ये आहोत. सत्य म्हटले जाते - सचखंडला. सर्व देवता सत्यच बोलणारे असतात.
सत्य शिकविणारे आहेत बाबा. त्यांची महिमा पहा किती आहे. त्यांच्या महिमेचे गायन
तुम्हाला उपयोगी पडते. शिवबाबांची महिमा (गुणगान) करतात. तेच झाडाच्या (मनुष्यसृष्टी
रुपी झाडाच्या) आदि-मध्य-अंताला जाणतात. सच्चे बाबा ऐकवतात तर तुम्ही मुले देखील
सच्चे बनता. सचखंड देखील बनतो. भारत सचखंड होता. नंबरवन उच्च ते उच्च तीर्थ देखील
हेच आहे कारण सर्वांची सद्गती करणारे बाबा भारतामध्येच येतात. एका धर्माची स्थापना
होते, बाकी सर्वांचा विनाश होतो. बाबांनी समजावून सांगितले आहे - सूक्ष्मवतनमध्ये
काहीही नाही आहे. हे सर्व साक्षात्कार होतात. भक्तीमार्गामध्ये देखील साक्षात्कार
होतो. जर साक्षात्कार झाले नसते तर इतकी मंदिरे इत्यादी कशी बनली असती! पूजा का झाली
असती. साक्षात्कार होतो तेव्हा, अनुभव करतात की हे चैतन्यमध्ये होते. बाबा समजावून
सांगत आहेत - भक्तीमार्गामध्ये जी काही मंदिरे वगैरे बनतात, जे तुम्ही पाहिले, ऐकले
आहे, ते सर्व रिपीट होणार. चक्र फिरतच राहते. ज्ञान आणि भक्तीचा खेळ पूर्वनियोजित
आहे. नेहमी म्हणतात ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. परंतु सविस्तर काहीच जाणत नाहीत. बाबा
बसून समजावून सांगत आहेत - ‘ज्ञान आहे - दिवस, आणि भक्ती आहे - रात्र. वैराग्य आहे
रात्रीचे. मग दिवस होतो’. भक्तीमध्ये दुःख आहे म्हणून त्यापासून वैराग्य. सुखाचे तर
वैराग्य म्हणणार नाही. संन्यास इत्यादी देखील दुःखामुळेच घेतात. समजतात की,
पवित्रतेमध्ये सुख आहे त्यामुळे पत्नीचा त्याग करून निघून जातात. आजकाल तर हे
संन्यासी खूप श्रीमंत देखील झाले आहेत कारण संपत्ती शिवाय सुख तर मिळू शकत नाही.
माया वार करून जंगलामधून मग शहरामध्ये घेऊन येते. विवेकानंद आणि रामकृष्ण देखील दोन
मोठे संन्यासी होऊन गेले. संन्यासाची (त्यागाची) ताकद रामकृष्णमध्ये होती. बाकी
भक्ति विषयी समजावून सांगण्याची जबाबदारी विवेकानंदांची होती. दोघांचीही पुस्तके
आहेत. पुस्तक जेव्हा लिहितात तेव्हा एकाग्रचित्त होऊन बसतात आणि लिहितात. जेव्हा
रामकृष्ण आपले आत्मचरित्र बसून लिहायचे तेव्हा शिष्याला देखील सांगितले - ‘तू दूर
जाऊन बैस’. होते खूप कडक संन्यासी, नाव देखील खूप प्रसिद्ध आहे. बाबा असे म्हणत
नाहीत की पत्नीला आई म्हणा. बाबा तर सांगतात - त्यांना देखील आत्मा समजा. आत्मे तर
सर्व भाऊ-भाऊ आहेत. संन्याशांची गोष्ट वेगळी आहे, ते पत्नीला माता समजले आहेत.
मातेचे खूप गुणगान केले आहे. हा ज्ञान-मार्ग आहे, वैराग्याची गोष्ट वेगळी आहे.
वैराग्यामध्ये येऊन पत्नीला आई समजले. आई या शब्दामुळे विकारी दृष्टी होणार नाही.
बहीणीमध्ये देखील विकारी दृष्टी जाऊ शकते, आईसाठी कधीही विकृत विचार येणार नाहीत.
पित्याची मुलीवर देखील विकारी दृष्टी जाऊ शकते, आईवर कधी जाणार नाही. संन्यासी
पत्नीला आई समजू लागला. त्यांच्यासाठी मग असे म्हणत नाहीत की दुनिया कशी चालणार,
वृद्धी कशी होणार? हे तर एकाला वैराग्य आले, आणि आई म्हटले. त्यांची महिमा बघा किती
आहे. इथे भाऊ-बहीण म्हटले तरी देखील बऱ्याचजणांची वाईट दृष्टी जाते म्हणून बाबा
म्हणतात - ‘भाऊ-भाऊ समजा’. ही आहे ज्ञानाची गोष्ट. ती आहे एकाची गोष्ट, इथे तर
प्रजापिता ब्रह्माची मुले भरपूर भाऊ-बहीणी आहेत ना. बाबा बसून सर्व गोष्टी समजावून
सांगत आहेत. यांनी (ब्रह्मा बाबांनी) सुद्धा शास्त्रे इत्यादी वाचलेली आहेत. तो
धर्मच वेगळा आहे निवृत्ती मार्गाचा, फक्त पुरुषांसाठी आहे. ते आहे हदचे वैराग्य,
तुम्हाला तर संपूर्ण बेहदच्या दुनियेपासून वैराग्य येते. संगमावरच बाबा येऊन
तुम्हाला बेहदच्या गोष्टी समजावून सांगतात. आता या जुन्या दुनियेपासून वैराग्य आले
पाहिजे. ही अतिशय पतित घाणेरडी दुनिया आहे. इथे शरीर पावन असू शकत नाही. आत्म्याला
नवीन शरीर सतयुगामध्येच मिळू शकते. भले आत्मा इथे पवित्र बनते, परंतु जोपर्यंत
कर्मातीत अवस्था होईल तोपर्यंत शरीर तरी देखील अपवित्र असते. सोन्यामध्ये धातूची
भेसळ होते तेव्हा दागिना देखील भेसळयुक्त बनतो. भेसळ निघून जाईल तेव्हा दागिना
देखील खराखुरा बनेल. या लक्ष्मी-नारायणाची आत्मा आणि शरीर दोन्ही सतोप्रधान आहेत.
तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही तमोप्रधान काळे आहेत. आत्मा काम चितेवर बसून काळी झाली
आहे. बाबा म्हणतात - मग मी येऊन काळ्यापासून गोरा बनवतो. या सर्व ज्ञानाच्या गोष्टी
आहेत. बाकी पाणी इत्यादीची काही गोष्ट नाहीये. सर्वजण काम-चितेवर बसून पतित बनले
आहेत म्हणूनच राखी बांधली जाते की, पावन बनण्याची प्रतिज्ञा करा.
बाबा म्हणतात - ‘मी
आत्म्यांसोबत बोलतो’. मी आत्म्यांचा पिता आहे, ज्यांची तुम्ही आठवण करत आले आहात -
‘बाबा या, आम्हाला सुखधाममध्ये घेऊन चला. दुःख दूर करा, कलियुगामध्ये अपार दुःख
आहेत’. बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुम्ही काम-चितेवर बसून काळे तमोप्रधान बनले
आहात. आता मी आलो आहे, काम-चितेवरून उतरवून ज्ञान-चितेवर बसविण्यासाठी’. आता पवित्र
बनून स्वर्गामध्ये जायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे. बाबा कशिश (आकर्षित) करतात.
बाबांकडे जी युगल येतात तर एकाला आकर्षण असते, दुसऱ्याला नाही. जरी पुरुषाने पटकन
म्हटले की, ‘आम्ही या अंतिम जन्मामध्ये पवित्र राहणार, काम-चितेवर चढणार नाही’.
परंतु असे नाही की निश्चय झाला आहे. जर निश्चय असता तर बेहदच्या बाबांना पत्र लिहिले
असते, संपर्कात राहिले असते. असे ऐकले आहे की, पवित्र राहतात, आपल्या कामधंद्यामध्ये
व्यस्त राहतात. परंतु बाबांची आठवणच कुठे आहे. अशा बाबांची तर खूप आठवण करायला हवी.
पती-पत्नीचे आपसामध्ये किती प्रेम असते, पतीची किती आठवण करत असते. बेहदच्या बाबांची
तर सर्वात जास्त आठवण करायला हवी. गायन देखील आहे ना - ‘प्यार करो चाहे ठुकराओ, हम
हाथ कभी नहीं छोड़ेंगे’. असे नाही, की इथे येऊन रहायचे आहे; घरदार सोडून इथे येऊन
रहायचे, तो तर मग संन्यास झाला. तुम्हाला तर सांगितले जाते, गृहस्थ-व्यवहारामध्ये
राहून पवित्र बना. ही तर सुरुवातीला भट्टी बनणार होती, ज्यामधून इतके तयार होऊन
निघाले. त्याचा देखील खूप छान वृत्तांत आहे. जे बाबांचे बनून यज्ञामध्ये राहून
रूहानी सेवा करत नाहीत ते जाऊन दास-दासी बनतात नंतर मागाहून नंबरवार
पुरुषार्थानुसार त्यांना मुकुट मिळतो. त्यांचे देखील घराणे असते, प्रजेमध्ये येऊ
शकत नाहीत. कोणी बाहेरचा येऊन डायरेक्ट आतला बनू शकत नाही. वल्लभाचारी बाहेरील
लोकांना कधी आत येऊ देत नाहीत. या सर्व समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्ञान आहे
सेकंदाचे, मग बाबांना ज्ञानाचा सागर का म्हटले जाते? बाबा समजावून सांगत राहतात आणि
शेवटपर्यंत सांगतच राहतील. जेव्हा राजधानी स्थापन होईल, तुम्ही कर्मातीत अवस्थेमध्ये
याल तेव्हा ज्ञान पूर्ण होईल. आहे सेकंदाची गोष्ट. परंतु समजावून सांगावे तर लागते.
हदच्या बाबांकडून हदचा वारसा, बेहदचे बाबा विश्वाचा मालक बनवतात. तुम्ही सुखधाममध्ये
जाल तेव्हा बाकीचे सर्व शांतीधाममध्ये निघून जातील. तिथे तर आहेच मुळी सुखच सुख. ही
तर खातिरदारी आहे की, बाबा आले आहेत. आपण नवीन दुनियेचे मालक बनत आहोत - राजयोगाच्या
शिक्षणाने. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या पतित
घाणेरड्या दुनियेबद्दल बेहदचे वैराग्य बाळगून आत्म्याला पावन बनविण्याचा पूर्णतः
पुरुषार्थ करायचा आहे. एका बाबांच्याच आकर्षणामध्ये रहायचे आहे.
२) ज्ञानाच्या धारणेने
आपली बॅटरी भरायची आहे. ज्ञान रत्नांनी स्वतःला श्रीमंत बनवायचे आहे. आता कमाई
करण्याची वेळ आहे त्यामुळे तोटा होण्यापासून आपला बचाव करायचा आहे.
वरदान:-
ज्ञान-रत्नांना
धारण करून व्यर्थला समाप्त करणारे होली हंस भव
होली हंसाच्या दोन
विशेषता आहेत - एक आहे ज्ञान रत्न वेचणे आणि दुसरी निर्णय शक्तीद्वारे दूध आणि
पाण्याला वेगवेगळे करणे. दूध आणि पाण्याचा अर्थ आहे - ‘समर्थ’ आणि ‘व्यर्थ’चा
निर्णय. व्यर्थला पाण्यासमान म्हटले जाते आणि समर्थला दूध समान. तर व्यर्थला समाप्त
करणे अर्थात होली हंस बनणे. बुद्धीमध्ये कायम ज्ञान-रत्नेच घोळत रहावीत, मनन चालत
रहावे तेव्हाच रत्नांनी भरपूर व्हाल.
बोधवाक्य:-
सदैव आपल्या
श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित राहून अपोजिशनला (निगेटिव्हला) समाप्त करणारेच विजयी
आत्मा आहेत.