06-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला हीच काळजी असली पाहिजे की आपण सर्वांना सुखधामचा मार्ग कसा दाखवायचा, सर्वांना कळावे की हेच पुरुषोत्तम बनण्याचे संगमयुग आहे”

प्रश्न:-
तुम्ही मुले आपसामध्ये एकमेकांना कोणत्या शुभेच्छा देता? मनुष्य शुभेच्छा केव्हा देतात?

उत्तर:-
मनुष्य शुभेच्छा तेव्हा देतात, जेव्हा कोणाचा जन्म होतो, विजयी बनतो अथवा लग्न करतो किंवा कोणता महत्त्वाचा दिवस असतो. परंतु ती काही खरी शुभेच्छा नाहिये. तुम्ही मुले एकमेकांना बाबांचे बनल्याबद्दल शुभेच्छा देता. तुम्ही म्हणता की आम्ही किती भाग्यवान आहोत, की सर्व दुःखांपासून मुक्त होऊन सुखधाम मध्ये जातो. तुम्हाला मनापासून आनंद होतो.

ओम शांती।
बेहदचे बाबा बसून बेहदच्या मुलांना समजावून सांगत आहेत. आता प्रश्न निर्माण होतो बेहदचे पिता कोण? हे तर जाणता की सर्वांचा पिता एकच आहे ज्यांना ‘परमपिता’ म्हटले जाते. लौकिक पित्याला परमपिता म्हटले जात नाही. परमपिता तर एकच आहेत, त्यांना सर्व मुले विसरली आहेत म्हणून परमपिता परमात्मा जे दुःखहर्ता, सुखकर्ता आहेत त्यांना तुम्ही मुले जाणता की बाबा आमची दुःखे कशी दूर करत आहेत आणि मग सुख-शांतीमध्ये निघून जाऊ. सगळेच काही सुखामध्ये जाणार नाहीत. काही सुखामध्ये, काही शांतीमध्ये निघून जातील. कोणी सतयुगामध्ये पार्ट बजावतील, कोणी त्रेतामध्ये, कोणी द्वापरमध्ये. तुम्ही सतयुगामध्ये राहता तेव्हा मग बाकी सर्व मुक्तिधाममध्ये असतात. त्याला म्हणणार ईश्वराचे घर. मुसलमान लोक जेव्हा नमाज पडतात तेव्हा सगळे मिळून खुदातालाची बंदगी करतात (ईश्वराची आराधना करतात). कशाकरता? स्वर्गासाठी की अल्लाकडे जाण्यासाठी? अल्लाच्या घराला स्वर्ग म्हणणार नाही. तिथे तर आत्मे शांतीमध्ये राहतात. शरीरे रहात नाहीत. हे जाणत असतील की अल्लाकडे शरीराने नाही परंतु आपण आत्मे जाणार. आता फक्त अल्लाची आठवण केल्याने काही कोणी पवित्र बनणार नाहीत. अल्लाला तर जाणतच नाहीत. आता ह्या लोकांना कसा सल्ला द्यावा की, बाबा सुख-शांतीचा वारसा देत आहेत. विश्वामध्ये शांती कशी प्रस्थापित होते, विश्वामध्ये शांती कधी होती - हे त्यांना कसे समजावून सांगायचे. जी सेवाभावी मुले आहेत, त्यांचे नंबरवार पुरुषार्थानुसार हे चिंतन चालते. तुम्ही ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मणांनाच बाबांनी आपला परिचय दिला आहे, संपूर्ण दुनियेतील मनुष्यमात्राच्या पार्टचा सुद्धा परिचय दिला आहे. आता आपण सर्व मनुष्यमात्राला बाबांचा आणि रचनेचा परिचय कसा द्यावा? बाबा सर्वांना म्हणतात - स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर खुदाच्या घरी निघून जाल. गोल्डन एज अथवा बहिश्त मध्ये सगळेच काही जाणार नाहीत. तिथे तर असतोच मुळी एक धर्म. बाकी सर्व शांतीधाममध्ये असतात, यामध्ये कोणाला राग येण्याचा प्रश्नच नाही. मनुष्य शांती मागतात, ती मिळतेच अल्ला अथवा गॉडफादरच्या घरी. सर्व आत्मे येतात शांतीधामहून, परंतु तिथे पुन्हा तेव्हाच जातील जेव्हा नाटक पूर्ण होईल. बाबा येतात देखील पतित दुनियेमधून सर्वांना घेऊन जाण्याकरिता.

आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, आपण शांतीधाममध्ये जात आहोत, नंतर मग सुखधाममध्ये येणार. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. पुरुषोत्तम अर्थात उत्तमात उत्तम पुरुष. जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही तोपर्यंत उत्तम पुरुष बनू शकत नाही. आता बाबा तुम्हाला म्हणतात - ‘माझी आठवण करा आणि सृष्टीचक्राला जाणून घ्या आणि त्याच सोबत दैवी गुण सुद्धा धारण करा. यावेळी सर्व मनुष्यांचे कॅरॅक्टर (चारित्र्य) बिघडलेले आहे. नवीन दुनियेमध्ये तर चारित्र्य अतिशय फर्स्टक्लास असते. भारतवासीच श्रेष्ठ चारित्र्यावाले बनतात. अशा उच्च चारित्र्य असणाऱ्यांसमोर नीच चारित्र्यावाले डोके टेकतात. त्यांच्या चारित्र्याचे वर्णन करतात. हे तुम्ही मुलेच समजता. आता इतरांना समजावून सांगायचे कसे? कोणती सोपी युक्ती करावी? हे आहे आत्म्यांचा तिसरा नेत्र उघडणे. बाबांच्या आत्म्यामध्ये ज्ञान आहे. मनुष्य म्हणतात - मला ज्ञान आहे. हा देह-अभिमान आहे, यामध्ये तर आत्म-अभिमानी बनायचे आहे. संन्यासी लोकांकडे शास्त्रांचे ज्ञान आहे. बाबांचे ज्ञान तर जेव्हा बाबा येऊन देतील तेव्हा. युक्तीने समजावून सांगायचे आहे. ते (दुनियेतील) लोक कृष्णाला भगवान समजतात. भगवंताला जाणतच नाहीत, ऋषी-मुनी इत्यादी म्हणत होते - आम्ही जाणत नाही. एवढे मात्र समजतात की मनुष्य भगवान असू शकत नाही. निराकार भगवानच रचयिता आहेत. परंतु ते कसे रचतात, त्यांचे नाव, रूप, देश, काळ काय आहे? म्हणतात नावा-रूपा पासून न्यारा आहे. एवढाही समजूतदारपणा नाही की नावा-रूपा पासून न्यारी वस्तू कशी असू शकेल, अशक्य आहे. जर म्हणतात की दगडा-धोंड्यात कासवात-माशात सर्वांमध्ये आहेत तर ते नाव-रूप होते. कधी काय, कधी काय म्हणत राहतात. मुलांचे दिवस-रात्र खूप चिंतन चालले पाहिजे की लोकांना आपण कसे समजावून सांगावे? हे मनुष्यापासून देवता बनण्याचे पुरुषोत्तम संगमयुग आहे. मनुष्य देवतांना नमस्कार करतात. मनुष्य कधी मनुष्याला नमस्कार करत नाही, मनुष्यांनी भगवंताला आणि देवतांना नमस्कार करायचा असतो. मुसलमान लोक सुद्धा बंदगी (आराधना) करतात, अल्लाची आठवण करतात. तुम्ही जाणता ते लोक काही अल्लाकडे पोहोचू शकणार नाहीत. मुख्य गोष्ट आहे अल्लाकडे कसे पोहोचावे? मग अल्ला नवीन सृष्टी कशी रचतात. या सर्व गोष्टी कशा समजावून सांगाव्यात, यासाठी मुलांना विचार सागर मंथन करावे लागेल. बाबांना काही विचार सागर मंथन करायचे नाहीये. बाबा विचार सागर मंथन करण्याची युक्ती मुलांना शिकवतात. यावेळी सर्वजण आयर्न एजमध्ये तमोप्रधान आहेत. जरूर कधी काळी गोल्डन एज सुद्धा असेल. गोल्डन एजला प्युअर (पवित्र) म्हटले जाते. पवित्रता आणि अपवित्रता. सोन्यामध्ये भेसळ घातली जाते ना. आत्मा देखील आधी पवित्र सतोप्रधान असते नंतर मग तिच्यामध्ये भेसळ पडते. जेव्हा तमोप्रधान बनते तेव्हा बाबांना यायचे असते, बाबाच येऊन सतोप्रधान, सुखधाम बनवतात. सुखधाममध्ये केवळ भारतवासीच असतात. बाकीचे सर्व शांतीधाम मध्ये जातात. शांतीधाममध्ये सर्व पवित्र असतात मग इथे येऊन हळू-हळू अपवित्र बनत जातात. प्रत्येक मनुष्य सतो, रजो, तमो जरूर बनतो. आता त्यांना कसे सांगणार की तुम्ही सर्व अल्लाच्या घरी पोहोचू शकता. देहाची सर्व नाती सोडून स्वतःला आत्मा समजा. भगवानुवाच तर आहेच. माझी आठवण केल्यामुळे ही जी ५ भुते आहेत, ती निघून जातील. तुम्हा मुलांना दिवस-रात्र ही काळजी लागून राहिली पाहिजे. बाबांनाही चिंता वाटली म्हणून तर विचार आला की जावे, जाऊन सर्वांना सुखी बनवावे. सोबत मुलांनी सुद्धा मदतगार बनायचे आहे. एकटे बाबा काय करतील? तर हे विचार सागर मंथन करा. असा कोणता उपाय शोधावा ज्यामुळे मनुष्य लगेच समजतील की हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. या वेळीच मनुष्य पुरुषोत्तम बनू शकतात. आधी उच्च असतात मग खाली घसरतात. अगदी सुरुवातीलाच तर घसरणार नाहीत ना. आल्यावर लगेचच काही तमोप्रधान होणार नाहीत. प्रत्येक गोष्ट आधी सतोप्रधान मग सतो, रजो, तमो होते. मुले इतकी प्रदर्शनी इत्यादी करतात, तरी सुद्धा माणसे काहीच समजत नाहीत तर अजून काय उपाय करावा? वेगवेगळे उपाय तर करावे लागतात ना. त्याच्यासाठी वेळही मिळालेला आहे. झटक्यात काही कोणी संपूर्ण बनू शकत नाही. चंद्र थोडा-थोडा करत शेवटी संपूर्ण बनतो. आम्हीही तमोप्रधान बनलो आहोत, मग सतोप्रधान बनण्यासाठी वेळ लागतो. ते तर आहेत जड आणि हे आहेत चैतन्य. तर आपण कसे समजावून सांगावे. मुसलमानांच्या मौलवीला (आचार्यांना) समजावून सांगा की तुम्ही हे नमाज का पडता, कोणाच्या आठवणीमध्ये पडता? हे विचार सागर मंथन करायचे आहे. महत्त्वाच्या दिवशी राष्ट्रपती इत्यादी देखील मशिदीमध्ये जातात. मोठ्यांना भेटतात. सर्व मशिदींची मग एक मोठी मशीद असते - तिथे ईद मुबारक (ईदच्या शुभेच्छा) देण्यासाठी जातात. आता मुबारक तर हे आहे जेव्हा आपण सर्व दुःखांमधून सुटून सुखधामला जाऊ, तेव्हा म्हटले पाहिजे मुबारक असो. आम्ही आनंदाची बातमी सांगतो. कोणी विजयी होतात तेव्हा देखील मुबारक (शुभेच्छा) देतात. कोणी लग्न करतात तरी सुध्दा शुभेच्छा देतात. सदा सुखी रहा. आता तुम्हाला तर बाबांनी समजावून सांगितले आहे, आपण एकमेकांना शुभेच्छा कशा द्याव्यात. यावेळी आपण बेहदच्या बाबांकडून मुक्ती, जीवनमुक्तीचा वारसा घेत आहोत. तुम्हाला तर शुभेच्छा मिळू शकतात. बाबा समजावून सांगतात, तुम्हाला मुबारक असो. तुम्ही २१ जन्मांसाठी पद्मपती बनत आहात. आता सर्व माणसे बाबांकडून कसा वारसा कसा घेतील, सर्वांना शुभेच्छा द्याव्या. तुम्हाला आता ठाऊक झाले आहे, परंतु तुम्हाला लोक शुभेच्छा देऊ शकत नाहीत. तुम्हाला ओळखतच नाहीत. जर शुभेच्छा देतील तर स्वतः देखील शुभेच्छा प्राप्त करण्यासाठी जरूर लायक बनतील. तुम्ही तर गुप्त आहात ना. एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. मुबारक असो, आपण बेहदच्या बाबांचे बनलो आहोत. तुम्ही किती भाग्यवान आहात, कोणती लॉटरी लागली किंवा बाळ जन्माला आले तर म्हणतात - मुबारक असो. मुले पास होतात तेव्हा देखील अभिनंदन करतात. तुम्हाला मनापासून आनंद होतो, स्वतःला शुभेच्छा देता, आम्हाला बाबा मिळाले आहेत, ज्यांच्याकडून आम्ही वारसा घेत आहोत.

बाबा समजावून सांगतात - तुम्ही आत्मे जे दुर्गतीला प्राप्त झालेले आहात ते आता सद्गतीला प्राप्त करता. शुभेच्छा तर सर्वांना एकच मिळते. शेवटी सर्वांना माहीत होईल, जे श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनतील त्यांना खालचे म्हणतील मुबारक असो. तुम्ही सूर्यवंशी कुळामध्ये महाराजा-महाराणी बनता. नीच कुळातील शुभेच्छा त्यांना देतील जे विजयी माळेचे मणी बनतात. जे पास होतील त्यांना शुभेच्छा मिळतील, त्यांचीच पूजा होते. आत्म्याला देखील मुबारक असो, जी उच्च पद प्राप्त करते. मग भक्तीमार्गामध्ये त्यांचीच पूजा होते. लोकांना हे ठाऊक नाही आहे की पूजा का करतात. तर मुलांना हीच काळजी असते की कसे समजावून सांगावे? आपण पवित्र बनलो आहोत, दुसऱ्यांना पवित्र कसे बनवावे? दुनिया तर खूप मोठी आहे ना. काय करावे ज्यामुळे घरा-घरात संदेश पोहोचेल. पत्रके टाकल्याने काही सर्वांनाच मिळत नाहीत. हा तर प्रत्येकाच्या हातामध्ये संदेश दिला पाहिजे कारण त्यांना अजिबात माहिती नाही आहे की बाबांकडे कसे पोहोचायचे. म्हणतात - सर्व मार्ग परमात्म्याला भेटण्याचे आहेत. परंतु बाबा म्हणतात - ही भक्ती, दान-पुण्य तर जन्म-जन्मांतर करत आला आहात परंतु रस्ता कुठे सापडला? म्हणतात - हे सर्व अनादि चालत आले आहे, परंतु कधीपासून सुरू झाले? अनादिचा अर्थ समजत नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजतात. ज्ञानाचे प्रारब्ध २१ जन्म, ते आहे सुख, नंतर आहे दुःख. तुम्हा मुलांना हिशोब समजावून सांगितला जातो की कोणी खूप भक्ती केली आहे! या सर्व विस्ताराच्या गोष्टी एका-एकाला तर समजावून सांगू शकत नाही. काय करावे, कोणत्या वर्तमानपत्रामध्ये द्यावे, वेळ तर लागेल. सर्वांना संदेश इतक्या लवकर तर मिळू शकत नाही. सगळेच पुरुषार्थ करू लागले तर मग स्वर्गात येतील. हे होऊच शकत नाही. आता तुम्ही पुरुषार्थ करता स्वर्गाकरिता. आता आपल्या धर्माचे जे आहेत, त्यांना कसे काढायचे? कसे समजणार कोण-कोण ट्रान्सफर झाले आहेत? हिंदू धर्मवाले खरे तर देवी-देवता धर्माचे आहेत, हे देखील कोणी जाणत नाही. पक्के हिंदू असतील तर आपल्या आदि सनातन देवी-देवता धर्माला मानतील. या वेळी तर सर्व पतित आहेत. बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. निराकारचीच आठवण करतात की येऊन आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन चला. यांनी इतके मोठे राज्य कसे मिळवले? भारतामध्ये यावेळी कोणतीही राजेशाही नाहीये, जी जिंकून राज्य घेतले असेल. ते काही युद्ध करून तर राज्य मिळवत नाहीत. मनुष्यापासून देवता कसे बनवले जाते, कोणालाच माहित नाही आहे. तुम्हाला देखील आत्ता बाबांकडून कळले आहे. इतरांना कसे सांगायचे ज्यामुळे त्यांना मुक्ती-जीवनमुक्ती मिळेल. पुरुषार्थ करवून घेणारा पाहिजे ना. ज्यामुळे स्वतःला जाणून अल्लाची आठवण करेल. विचारा, ‘तुम्ही ईद ची मुबारक कोणाला देता! तुम्ही अल्लाकडे जात आहात, पक्का निश्चय आहे? ज्यासाठी तुम्हाला इतका आनंद होतो. हे तर तुम्ही कित्येक वर्षांपासून करत आला आहात. कधी खुदाकडे जाल की नाही?’ तर गोंधळून जातील. खरोखर आम्ही जे करतो शिकतो, काय करण्यासाठी. उच्च ते उच्च एक अल्लाच आहेत. सांगा, ‘अल्लाची मुले तुम्ही देखील आत्मा आहात’. आत्म्याला वाटते - आपण अल्लाकडे जावे. आत्मा जी आधी पवित्र होती, आता पतित बनली आहे. आता याला स्वर्ग तर म्हणणार नाही. सर्व आत्मे पतित आहेत, पावन कसे बनावे जेणेकरून अल्लाच्या घरी जाता येईल. तिथे विकारी आत्मा असत नाही. व्हाइसलेस (निर्विकारी) असली पाहिजे. आत्मा झटक्यात काही सतोप्रधान बनत नाही. हे सर्व विचार सागर मंथन केले जाते. बाबांचे विचार सागर मंथन चालते तेव्हाच तर समजावून सांगतात ना. कोणाला कसे समजावून सांगायचे, त्या युक्त्या शोधून काढल्या पाहिजेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जसा बाबांना विचार आला की, आपण जाऊन मुलांना दुःखातून सोडवावे, सुखी बनवावे, असे बाबांचे मदतगार बनायचे आहे, घरा-घरात संदेश पोहोचवण्यासाठी युक्त्या शोधून काढायच्या आहेत.

२) सर्वांच्या शुभेच्छा प्राप्त करण्यासाठी विजयीमाळेचा मणी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. पूज्य बनायचे आहे.

वरदान:-
करनहार आणि करावनहारच्या स्मृतीद्वारे लाईटचे मुकुटधारी भव

मी निमित्त कर्मयोगी, करनहार आहे, करावनहार बाबा आहेत - जर ही स्मृती स्वतः राहत असेल तर सदैव लाईटचे मुकुटधारी अथवा निश्चिंत बादशहा बनता. बस्स, बाबा आणि मी, तिसरा कोणीही नाही - ही अनुभूती सहजच निश्चिंत बादशहा बनविते. जे असे बादशहा बनतात, तेच मायाजीत, कर्मेंद्रियजीत आणि प्रकृतीजीत बनतात. परंतु जर कोणी चुकून जरी कोणत्याही व्यर्थ भावाचे ओझे उचलून घेतात तर मुकुटाऐवजी चिंतेच्या अनेक टोपल्या डोक्यावर येतात.

बोधवाक्य:-
सर्व बंधनांमधून मुक्त होण्यासाठी दैहिक नात्यांपासून नष्टोमोहा बना.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

योगामध्ये जेव्हा इतर सर्व संकल्प शांत होतात, एकच संकल्प रहातो ‘बाबा आणि मी’ यालाच पॉवरफुल (शक्तिशाली) योग म्हणतात. बाबांच्या भेटीच्या अनुभूती व्यतिरिक्त इतर सर्व संकल्प लुप्त होतात तेव्हा म्हणणार ज्वाला रूपातील आठवण, ज्याद्वारे परिवर्तन होते.