06-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आता शिकण्यासोबतच टीचर बनून शिकवायचे देखील आहे, हे शिक्षण या अंतिम जन्मा करिताच आहे, म्हणून चांगल्या रीतीने शिका आणि शिकवा”

प्रश्न:-
सतयुगी राजधानी कोणत्या आधारावर स्थापन होते?

उत्तर:-
संगमयुगातील शिक्षणाच्या आधारावर. जे चांगल्या रीतीने शिकतात किंवा ज्यांच्यावर बृहस्पतीची दशा आहे ते सूर्यवंशीमध्ये येतात. जे शिकत नाहीत, सेवा करत नाहीत त्यांच्यावर बुधाची दशा बसते, ते जसेकी बुद्धू आहेत. ते प्रजेमध्ये येतात. उच्च प्रजा, नोकर-चाकर इत्यादी सर्व या वेळच्या शिक्षणाच्या आधारावरच बनतात.

ओम शांती।
रुहानी मुलांप्रती किंवा आत्म्यांप्रती रुहानी बाबा अर्थात परमात्मा बसून समजावून सांगत आहेत. रुहानी बाबांना परमात्मा म्हटले जाते. सर्व आत्म्यांचे पिता एक परमपिता परमात्मा आहेत. ते ब्रह्माच्या तनाद्वारे समजावून सांगत आहेत. भक्तिमार्गामध्ये मनुष्य म्हणतात - त्रिमूर्ती ब्रह्मा. आता तुम्ही ब्राह्मण असे म्हणणार नाही. तुम्ही तर म्हणता त्रिमूर्ती शिव अर्थात ब्रह्मा, विष्णू, शंकर यांचे रचयिता शिव. ‘त्रिमूर्ती ब्रह्मा’ याचा कोणताही अर्थच निघत नाही. या तिन्ही देवतांचे रचयिता शिवच आहेत, म्हणून ‘त्रिमूर्ती शिव’ म्हटले जाते. एक रचयिता आहेत, बाकी सर्व रचना आहे. बेहदचे पिता एकच आहेत. लौकिक पिता तर प्रत्येकाचे आपले-आपले असतात. यावेळी तर सर्वजण शिवबाबांची मुले बनली आहेत. मुलांना ठाऊक आहे की, आपण आत्मे ८४ जन्मांचे चक्र फिरतो. तर हदचे ८४ पिता असतात. सतयुगामध्ये देखील आई-वडील काही बेहदचा वारसा देत नाहीत. सतयुगाकरिता बेहदचा वारसा तुम्हाला आता मिळत आहे. तिथे लक्ष्मी-नारायणाची राजधानी आहे आणि बाकीचे जे राजघराण्यातील असतील त्यांच्या मुलांना त्यांच्या पित्याचा वारसा मिळेल. तरी देखील तिथे खूप सुख आहे. या वेळी बेहदचे बाबा तुम्हाला बेहद विश्वाचे मालक बनवत आहेत. २१ जन्मांकरिता कायम सुखाचा वारसा मिळतो. तिथे दुःखाचे नामोनिशाण नसते. वाममार्ग सुरू झाल्यानेच दुःख सुरू होते. जो कोणी येईल त्याला हे समजावून सांगायचे आहे की, तुम्हाला दोन पिता आहेत. ८४ जन्मांमध्ये ८४ हदचे पिता मिळतात. बेहदचे बाबा तर एकच आहेत.

आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये याची देखील समज आहे की मूलवतन काय आहे! चित्रामध्ये जे मूलवतन दाखवता ते देखील भलेमोठे बनवले पाहिजे, त्यामध्ये छोटे-छोटे आत्मे ताऱ्यांसारखे चमकताना दिसावेत. जसे पूर्वी तुम्ही काजव्यांचा हार बनवत होता, तसा या मूलवतनचा देखील बनवला पाहिजे. प्रोजेक्टर शो दाखवता तेव्हा देखील त्यामध्ये मूलवतनचे चित्र असेच दाखवले पाहिजे. झाड मोठे असेल तर स्पष्ट दिसेल की आपण आत्मे तिथे राहतो. मुलांना समजावून सांगणे देखील सोपे होईल. हे आहेत बेहदचे बाबा, जे ब्रह्मा द्वारे दैवी संप्रदायाची स्थापना करत आहेत. तुम्ही आता ब्राह्मण आहात नंतर दैवी गुणवाले देवता बनाल. आता सर्वांमध्ये आसुरी गुण आहेत, त्यांना ‘आसुरी अवगुण’ म्हटले जाईल. वाममार्गापासून दुःख सुरू होते. असे नाही की रजोप्रधान बनल्यावर लगेच दुःखी होतात. नाही, थोडी-थोडी कला कमी होत जाते. मुख्य चित्रे हीच आहेत - त्रिमूर्ती, गोळा आणि नरक-स्वर्गाचे गोळे. सर्वप्रथम हे समजावून सांगणे खूप आवश्यक आहे. झाडाच्या चित्रामध्ये देखील पूर्ण अर्ध्या-अर्ध्या कल्पाचे माप आहे. अचूक असेल तर पूर्णपणे समजावून सांगता येईल. हे ज्ञान बाबां शिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकत नाही. वारंवार समजावून सांगण्यासाठी त्रिमूर्तीचे चित्र जरूर पाहिजे. हे आहेत निराकार बेहदचे बाबा, ज्यांची सर्वजण आठवण करतात. आत्मा जाणते की, ते आपले बेहदचे बाबा आहेत; दुःखामध्ये सर्वजण त्यांची आठवण करतात. सतयुगामध्ये आठवण करण्याची गरजच नसते. ते तर आहेच सुखधाम. देवताच पुनर्जन्म घेत आले आहेत. हे देखील कोणाला ठाऊक नाहीये.

तुम्ही जाणता सतोप्रधानापासून पुन्हा आपण कसे सतो, रजो, तमोमध्ये येतो. आत्म्यामध्ये अशुद्धता पडत जाते. तुमची आत्मा जाणते की आपल्याला ८४ जन्मांचा पार्ट बजावायचा आहे. तो आपल्या आत्म्यामध्ये ॲक्युरेट नोंदलेला आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये संपूर्ण पार्ट नोंदलेला आहे. या अति गूढ गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. कोणत्याही मनुष्यमात्र संन्यासी, उदासी इत्यादींच्या बुद्धीमध्ये या गोष्टी येऊ शकत नाहीत. भले नाटक म्हणतात, परंतु नाटकाला ड्रामा म्हटले जात नाही. हा ड्रामा आहे. ड्रामा, चित्रपट इत्यादी पूर्वी नव्हते. अगोदर मूकपट होते, आता टॉकी (बोलपट) झाले आहेत. आपण आत्मे देखील सायलेन्समधून टॉकीमध्ये (मूलवतन मधून साकार वतनमध्ये) येतो. टॉकी मधून पुन्हा मूव्हीमध्ये जाऊन नंतर सायलेन्समध्ये जातो म्हणून तुम्हा मुलांना शिकवले जाते की जास्त बोलू नका. रॉयल मनुष्य खूप हळूवारपणे बोलतात. तुम्हाला जायचे आहे - सूक्ष्मवतन मध्ये. सूक्ष्मवतनचे ज्ञान आता बाबांनी समजावून सांगितले आहे. ही आहे टॉकी दुनिया, ती आहे मूव्ही. तिथे ईश्वरासोबत बातचीत चालते. तिथे पांढऱ्या लाइटचे रूप आहे, आवाज नाही. तिथली मूव्ही भाषा (संकल्पाची भाषा) एकमेकांना समजते. तर आता तुम्हाला सायलेन्समध्ये, व्हाया मूव्ही जायचे आहे. बाबा म्हणतात - सर्वप्रथम मला सूक्ष्म सृष्टी रचावी लागते नंतर मग स्थूल सृष्टी. गायले देखील जाते - मूलवतन, सूक्ष्म, स्थूल… लोकांना हे देखील ठाऊक नाही आहे की ब्रह्मा, विष्णू, शंकर सूक्ष्मवतनवासी आहेत. इथे कोणतीही दुनिया नाही. फक्त ब्रह्मा, विष्णू, शंकर दिसण्यात येतात. चार भुजावाला (चतुर्भुज) विष्णू बघता, यावरून हे सिद्ध होते की हा प्रवृत्ती मार्ग आहे. संन्याशांचा आहे निवृत्ती मार्ग. हा देखील ड्रामा आहे, ज्याचे वर्णन करून बाबा समजावून सांगतात. मुख्य गोष्ट तर बाबा म्हणतात - मनमनाभव. बाकी आहे विस्तार. तो समजून घेण्यासाठी वेळ लागतो. नटशेल मध्ये (संक्षिप्तमध्ये) आहे - बीज आणि झाड. बीजाला पाहिल्याने संपूर्ण झाड बुद्धीमध्ये येते. बाबा बीजरूप आहेत, त्यांना या झाडाचे आणि सृष्टीच्या चक्राचे संपूर्ण नॉलेज आहे. समजावून सांगण्यासाठी सृष्टीचक्र वेगळे आहे, झाड वेगळे आहे. झाडाच्या चित्रामध्ये ही सर्व चित्रे दाखवली आहेत. कोणत्याही धर्मवाल्याला दाखवले तरीही ते समजू शकतात. आपण स्वर्गामध्ये काही येऊ शकणार नाही. भारत जेव्हा प्राचीन असतो, तेव्हा फक्त देवी-देवताच असतात. बाकी सर्व शांतीधाम मध्ये असतात.

तुम्ही बीज आणि झाड दोन्हीला जाणता. बीज वर आहे, ज्याला वृक्षपती म्हणतात. आता तुम्ही बाबांचे बनला आहात तर तुमच्यावर बृहस्पतीची दशा बसली आहे. जे बाबांचे बनतात त्यांच्यावर बृहस्पतीची दशा म्हणणार. त्यानंतर आहे शुक्राची दशा, बुधाची दशा. बृहस्पतीची दशा असणारे सूर्यवंशी बनतात. बुधाची दशा असणारे प्रजेमध्ये निघून जातात, ते सेवा करू शकत नाहीत. बाबांची आठवण करू शकत नाहीत तर बुद्धू झाले ना, यामध्ये देखील नंबरवार बुद्धू बनतात. कोणी उच्च दर्जाची प्रजा तर कोणी कमी दर्जाची प्रजा बनते. कुठे श्रीमंत प्रजा आणि कुठे मग त्यांचे देखील नोकर-चाकर. सर्व काही अभ्यासावर अवलंबून आहे. अभ्यास देखील सतोगुणी, रजोगुणी, तमोगुणी असतो. राजधानी स्थापन होत आहे. जे हुशार आहेत ते बाबांच्या आठवणीमध्ये देखील राहतात. सारे झाड बुद्धीमध्ये राहते. शिक्षणाद्वारेच टीचर, बॅरिस्टर बनतात. टीचर मग दुसऱ्यांना देखील शिकवतात. शिकतात तर सर्वच. एकच शिक्षण आहे, परंतु काहीजण मग शिकून पुढे वरच्या पातळीवर निघून जातात आणि कोणी मग तिथेच टीचर बनतात. जे शिकले आहेत तेच शिकवतात. आता तुम्ही देखील शिकत आहात. कोणी तर शिकता-शिकता टीचर बनतात. स्वतः म्हणतात टीचरचे काम आहे आपसमान टीचर बनविणे. तुम्ही जर टीचर बनला नाहीत तर इतरांचे कल्याण कसे कराल. वेळ फार थोडा आहे, जोपर्यंत विनाश होईल तोपर्यंत शिकत राहतील. त्यानंतर मग शिकणे बंद होईल. मग पुन्हा बाबा ५ हजार वर्षानंतर येऊन शिकवतील. हे शिक्षण काही शेकडो वर्षे चालणार नाहीये. हे तर आहेच या एका अंतिम जन्माकरिता शिक्षण. शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. सगळेच काही टीचर बनू शकत नाहीत. सगळेच जर टीचर बनले तर मग खूप जण उच्चपद प्राप्त करतील. नंबरवार तर असतातच. सर्वप्रथम कोणालाही दोन पित्यांचा परिचय द्या. चित्र असेल तर व्यवस्थित समजू शकतील. त्रिमूर्तीचे चित्र तर जरूर सोबत पाहिजे. हे शिवबाबा, हे प्रजापिता ब्रह्मा. सर्वांचे ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. तर जरूर ते पहिले आले असतील ना. सर्वात पुढे ब्रह्मा आहेत. आता रचना रचत आहेत. आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात आणि मग ब्राह्मणच देवता बनतील. ब्राह्मणांचे झाड खूप छोटे आहे. देवता फार थोडे असतात, नंतर मग वृद्धी होत जाते. हे तुमचे नवीन झाड स्थापन होत आहे. ते इतर धर्मांचे आत्मे तर पार्ट बजावण्यासाठी वरून येतात, त्यांच्याबाबतीत घसरण्याचा प्रश्नच नाही. इथे तुमचे नवीन झाड स्थापन होत आहे. माया देखील समोरच आहे. तुम्हालाच तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचेच आहे. ट्रान्सफर व्हायचे आहे कारण दुनिया परिवर्तित होत आहे, त्यामुळे मेहनत करावी लागते. देवी-देवता धर्माची स्थापना इथे संगमयुगावर होते. तुम्ही या गोष्टी सांगू शकता की, सतयुग किती वर्षांचे आहे, सतयुगापासून मग कलियुग कसे बनते. कलियुगामध्ये तर तमोप्रधान बनायचेच आहे. तमोप्रधान आहात तेव्हाच तर पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही सतोप्रधान होता, नंतर मग अशुद्धी पडत गेली. आता भले एखादी नवीन आत्मा २-३ जन्म घेईल, तरी देखील लगेचच अशुद्धी पडते. त्या २-३ जन्मातच सुख आणि त्यातच दुःख भोगते. कोणाचा तर एक जन्म सुद्धा असतो. जेव्हा येणे बंद होईल तेव्हा विनाश होईल. आणि मग सर्व आत्म्यांना परत जावे लागेल. पाप-आत्मे आणि पुण्य-आत्मे सगळे एकत्र जातात. नंतर मग पुण्य-आत्मे खाली उतरतात. संगमावर हे सारे परिवर्तन होते. तर मुलांनी हा संपूर्ण ड्रामा बुद्धीमध्ये ठेवला पाहिजे. हे सारे नॉलेज बाबांकडे आहे ना. म्हणतात - मी येऊन सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताचे संपूर्ण रहस्य समजावून सांगतो. भक्तिमार्गामध्ये थोडेच हे ज्ञान ऐकवतो. भक्त आठवण करतात तर त्यांना साक्षात्कार घडवतो. जेव्हा भक्तिमार्ग सुरू होतो तेव्हा माझा देखील पार्ट सुरू होतो. सतयुग-त्रेतामध्ये मी वानप्रस्थमध्ये राहतो. मुलांना सुखामध्ये पाठवून दिले, बाकी काय राहिले! मी वानप्रस्थ घेतो. ही वानप्रस्थमध्ये जाण्याची प्रथा भारतामध्येच आहे. बाबा म्हणतात - मी वानप्रस्थमध्ये जाऊन बसतो. बेहदचे बाबाच येऊन गुरूच्या रूपामध्ये वानप्रस्थमध्ये घेऊन जातात. मनुष्य भगवंताला भेटण्यासाठी गुरूंच्या सहवासात राहतात. शास्त्रे वाचतील, तीर्थक्षेत्रांवर जातील, गंगा स्नान करतील; परंतु मिळत तर काहीच नाही. आता तुम्हाला बेहदचे बाबा भेटले आहेत. दुःखातून सोडवून, रावण राज्यामधून बाहेर काढून रामराज्यामध्ये घेऊन जातात. बेहदचे बाबा एकदाच येऊन रावणाच्या दुःखातून सोडवतात, म्हणून त्यांना लिबरेटर म्हटले जाते. सतयुगामध्ये आहेच मुळी रामराज्य. बाकीचे सर्व आत्मे शांतीधाम मध्ये निघून जातात. हे देखील कोणी जाणत नाही. मज आत्म्याचा स्वधर्मच आहे - शांत. इथे पार्टमध्ये आल्यामुळे अशांत बनलो आहोत, मग शांतीची आठवण येते. वास्तविक आपण शांतीधामचे रहिवासी आहोत. आता म्हणतात - ‘मला शांती पाहिजे. मनाला शांती पाहिजे’. सांगितले जाते - आत्मा, मन-बुद्धी सहित आहे. आत्मा आहेच शांत स्वरूप, आणि मग इथे कर्मामध्ये येते. इथे शांती कशी मिळेल. हे तर आहेच अशांतीधाम. सतयुगामध्ये सुख आणि शांती दोन्ही आहेत. पवित्रता देखील आहे, धन-दौलत देखील आहे.

बाबा समजावून सांगत आहेत - तुमच्याकडे किती सुख-शांती, धन-दौलत इत्यादी सर्व काही होते. आता पुन्हा तुम्हाला हे इतरांना देखील समजावून सांगायचे आहे. ज्यांनी कल्पापूर्वी वारसा घेतला होता तेच चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतील. भले उशिरा येतात परंतु जुने असणाऱ्यांपेक्षाही लगेच पुढे निघून जातात. उशिरा येणाऱ्यांना अजूनच चांगले पॉइंट्स मिळतात. दिवसेंदिवस सोपे होत जाते. हे देखील समजतील की, आता आपल्याला सर्व काही समजले तर आहे, मग तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्याची मेहनत देखील करायची आहे. त्यासाठी तीव्र पुरुषार्थ करू लागतील कारण समजतात की वेळ फार थोडा आहे, जितके शक्य होईल तितके पुरुषार्थाला लागावे. मृत्यूपूर्वी आपण पुरुषार्थ करून घ्यावा. ते आपला चार्ट ठेवत असतील. अभ्यास तर सोपा आहे. बाकी आहे आठवणीची गोष्ट. गायले देखील आहे - ‘राम सुमिर प्रभात मोरे मन…’ आत्मा म्हणते - ‘हे माझ्या मना, रामाचे स्मरण कर’. भक्तिमार्गामध्ये तर हे देखील कोणाला माहीत नाहीये की राम कोण आहे. ते ‘रघुपती राघव राजाराम’ असे म्हणतात. किती गडबड करून ठेवली आहे. सर्वांचे भगवान ते राम कोण आहेत, हे मनुष्य काहीच समजत नाहीत. वेळ आणि पैसा दोन्ही व्यर्थ घालवत राहतात. तुम्हा मुलांना मी विश्वाचे राज्य-भाग्य दिले होते, मग ते कुठे गेले? ५ हजार वर्षांपूर्वी तुम्हाला स्वर्गाची राजाई दिली होती, ती मग कशी गमावलीत? आता तुम्ही समजता - आपली अधोगती कशी होत गेली आहे. आता पुन्हा वर चढायचे आहे. चढती कला एका सेकंदामध्ये होते, उतरती कला ५ हजार वर्षांमध्ये होते. ब्रह्मा सो विष्णू बनण्यासाठी एक सेकंद, विष्णू पासून ब्रह्मा बनण्यासाठी ५ हजार वर्षे लागतात. किती पॉइंट्स समजावून सांगतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता टॉकी मधून मूव्ही, मूव्ही मधून सायलेन्समध्ये जायचे आहे, म्हणून टॉकी अर्थात बोलणे खूप कमी करायचे आहे. रॉयल्टीने अतिशय हळूवारपणे बोलायचे आहे.

२) नॉलेज समजल्या नंतर तीव्र पुरुषार्थ करून सतोप्रधान बनायचे आहे. आठवणीचा चार्ट ठेवायचा आहे.

वरदान:-
या लोकच्या (दुनियेच्या) आकर्षणापासून मुक्त बनून अव्यक्तवतनमध्ये विहार करणारे उडता पंछी भव

बुद्धी रूपी विमानाद्वारे अव्यक्त वतन आणि मूलवतनचा विहार करण्यासाठी उडता पंछी बना. बुद्धी द्वारे जेव्हा पाहिजे, जिथे पाहिजे तिथे पोहोचा. हे तेव्हाच घडू शकेल जेव्हा या लोकच्या आकर्षणापासून पूर्णतः दूर राहाल. हा असार संसार आहे, जेव्हा की या असार संसाराशी कोणतेही काम नाही, कोणतीही प्राप्ती नाही, तर बुद्धीने जाणे देखील बंद करा. हा रौरव नरक आहे यामध्ये जाण्याचा संकल्प किंवा स्वप्न देखील येऊ नये.

बोधवाक्य:-
आपल्या चेहऱ्याद्वारे आणि वर्तनाद्वारे सत्यतेची सभ्यता (सत्यावर आधारित शालीनता) अनुभव करविणे हीच श्रेष्ठता आहे.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

जो परोपकाराच्या भावनेने संपन्न असतो, तो सदैव संतुष्टमणी प्रमाणे स्वतःही संतुष्ट असेल आणि इतरांना देखील संतुष्ट करणारा असेल. आश्चर्य तर हे आहे की, तो होपलेसमध्ये देखील होप निर्माण करेल, ज्याच्याप्रती सर्वजण निराशा व्यक्त करतात, अशा व्यक्तीमध्ये अथवा अशा परिस्थितीमध्ये तो कायमचा आशेचा दीपक जागृत करेल. आपल्या उपकाराच्या शुभ भावनेद्वारे, स्नेहा द्वारे, शक्ती द्वारे, गोड शब्दांद्वारे आणि उमंग-उत्साहाच्या सहयोगाद्वारे दिलशिकस्त असणाऱ्याला शक्तिशाली बनवेल अर्थात भिकाऱ्याला बादशहा बनवेल.