06-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबांची दृष्टी हद आणि बेहदच्याही पार पलीकडे जाते, तुम्हाला देखील हद (सतयुग), बेहद (कलियुगापासून) पार पलीकडे जायचे आहे”

प्रश्न:-
उच्च ते उच्च ज्ञान रत्नांची धारणा कोणत्या मुलांमध्ये चांगल्या प्रकारे होते?

उत्तर:-
ज्यांचा बुद्धियोग एका बाबांसोबत आहे, पवित्र बनले आहेत, त्यांना या रत्नांची धारणा चांगली होईल. या ज्ञानासाठी शुद्ध भांडे पाहिजे. उलटे-सुलटे संकल्प देखील बंद झाले पाहिजेत. बाबांसोबत योग लावता-लावता भांडे सोन्याचे बनेल तेव्हा रत्ने टिकू शकतील.

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांना रुहानी बाबा बसून दररोज समजावून सांगतात. हे तर मुलांना समजावून सांगितले आहे - ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचे हे सृष्टी चक्र बनलेले आहे. बुद्धीमध्ये हे ज्ञान राहिले पाहिजे. तुम्हा मुलांना हद आणि बेहद पासून पार जायचे आहे. बाबा तर हद आणि बेहदच्याही पार पलीकडे आहेत. त्याचा देखील अर्थ समजून घेतला पाहिजे ना. रुहानी बाबा बसून समजावून सांगतात. हा टॉपिक देखील समजावून सांगितला पाहिजे की ज्ञान, भक्ती त्यानंतर आहे वैराग्य. ज्ञानाला म्हटले जाते दिवस, जेव्हा नवीन दुनिया आहे. त्यामध्ये या भक्तीचे अज्ञान नाही आहे. ती आहे हदची दुनिया कारण तिथे फार थोडे असतात. नंतर मग हळूहळू वृद्धी होते. अर्ध्या कालावधीनंतर भक्ती सुरु होते. तिथे संन्यास धर्म असतच नाही. संन्यास किंवा त्याग असत नाही. नंतर मग सृष्टीची वृद्धी होते. वरून आत्मे येत राहतात. इथे वृद्धी होत राहते. हद पासून सुरुवात होऊन बेहदमध्ये जाते. बाबांची तर हद आणि बेहदच्याही पलीकडे दृष्टी जाते. जाणतात हदमधे किती थोडी मुले होती आणि मग रावण राज्यामध्ये किती वृद्धी होते. आता तुम्हाला हद आणि बेहदच्याही पार पलीकडे जायचे आहे. सतयुगामध्ये किती छोटी दुनिया असते. तिथे संन्यास अथवा वैराग्य इत्यादी असत नाही. नंतर द्वापरपासून मग इतर धर्मांची सुरुवात होते. संन्यास धर्म देखील असतो ज्यामध्ये घरा-दाराचा संन्यास करतात. सर्वांनी जाणले तर पाहिजे ना. त्याला म्हटले जाते - हठयोग आणि हदचा संन्यास. फक्त घरदार सोडून जंगलामध्ये जातात. द्वापरपासून भक्ती सुरु होते. ज्ञान तर असतच नाही. ज्ञान अर्थात सतयुग-त्रेता - सुख. भक्ती अर्थात अज्ञान आणि दुःख. हे व्यवस्थित समजावून सांगावे लागते आणि मग दुःख आणि सुखाच्या पलीकडे जायचे आहे. हद-बेहदच्या पार. मनुष्य शोध घेतात ना. कुठे पर्यंत समुद्र आहे, आकाश आहे. खूप प्रयत्न करतात परंतु शेवट गाठू शकत नाहीत. विमानामधून जातात, त्यात देखील इतके पेट्रोल पाहिजे ना जे परत देखील येऊ शकतील. खूप दूरपर्यंत जातात परंतु बेहदमध्ये जाऊ शकत नाहीत. हद पर्यंतच जातील. तुम्ही तर हद, बेहदच्याही पार पलीकडे जाता. आता तुम्ही समजू शकता आधी नवीन दुनिया हदमध्ये (मर्यादित) आहे. फार थोडे मनुष्य असतात. त्याला सतयुग म्हटले जाते. तुम्हा मुलांना रचनेच्या आदि, मध्य, अंताचे नॉलेज असले पाहिजे ना. हे नॉलेज इतर कोणालाही नाही. तुम्हाला समजावून सांगणारे बाबा आहेत जे बाबा हद आणि बेहदच्या पार आहेत इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. बाबा रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात आणि म्हणतात याच्याही पार पलीकडे जा. तिथे तर काहीही नाही. कितीही दूर गेलात, आकाशच आकाश आहे. याला म्हटले जाते हद-बेहदच्या पार पलीकडे. शेवट काही गाठू शकत नाहीत. म्हणतील बेअंत. बेअंत म्हणणे तर सोपे आहे परंतु ‘अंत’ याचा अर्थ तर समजला पाहिजे. आता तुम्हाला बाबा समज देतात. बाबा म्हणतात - ‘मी, हदला देखील जाणतो, बेहदला देखील जाणतो. अमके-अमके धर्म अमक्या-अमक्या वेळी स्थापन झाले आहेत!’ दृष्टी जाते सतयुगाच्या हदच्या दिशेने. मग कलियुगाच्या बेहदच्या दिशेने. नंतर आपण पार निघून जाणार. जिथे काहीही नाही. सूर्य-चंद्राच्याही वर आपण जातो, जिथे आपले शांतीधाम, स्वीट होम आहे. तसे तर सतयुग देखील स्वीट होम आहे. तिथे शांती देखील आहे तर राज्य-भाग्य सुख सुद्धा आहे - दोन्ही आहेत. घरी जाल तर तिथे फक्त शांती असेल. सुखाचे नावही घेणार नाही. आता तुम्ही शांती देखील स्थापन करत आहात आणि सुख-शांती देखील स्थापन करत आहात. तिथे तर शांती देखील आहे, सुखाचे राज्य सुद्धा आहे. मूल वतनमध्ये सुखाचा प्रश्नच नाही.

अर्धा कल्प तुमचे राज्य चालते मग अर्ध्या कल्पानंतर रावणाचे राज्य येते. अशांती आहेच मुळी ५ विकारांमुळे. २५०० वर्षे तुम्ही राज्य करता आणि मग २५०० वर्षानंतर रावण राज्य येते. त्यांनी तर लाखो वर्षे लिहिली आहेत. एकदम जसे की मूर्ख बनवले आहे. ५००० वर्षांच्या कल्पाला लाखो वर्षे म्हणणे मूर्खपणाच म्हणणार ना. जरा सुद्धा सभ्यता नाही. देवतांमध्ये किती दैवी सभ्यता होती. तेच आता असभ्य झाले आहेत. काहीच जाणत नाहीत. आसुरी गुण आलेले आहेत. आधी तुम्ही देखील काहीही जाणत नव्हता. काम कटारी चालवून आदि-मध्य-अंत दुःखी बनवतात म्हणूनच त्याला म्हटले जाते - रावण संप्रदाय. दाखवले आहे रामाने वानरसेना घेतली. आता रामचंद्र त्रेतामधला, तिथे मग वानर कुठून आले आणि मग म्हणतात रामाची सीता चोरीला गेली. अशा गोष्टी तर तिथे असतच नाहीत. जीव-जंतू इत्यादी ८४ लाख योन्या जितक्या इथे आहेत तितक्या सतयुग-त्रेतामध्ये थोड्याच असणार. हा सारा बेहदचा ड्रामा बाबा बसून समजावून सांगतात. मुलांना खूप दुरांदेशी (दूरदर्शी) बनायचे आहे. आधी तुम्हाला काहीही माहित नव्हते. मनुष्य असूनही नाटकालाच जाणत नाहीत. आता तुम्ही समजता सर्वात मोठा कोण आहे? उच्च ते उच्च भगवान. श्लोक देखील गातात - ‘ऊंचा तेरा नाम…’ आता हे तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. बाबा हद आणि बेहद दोघांचेही रहस्य समजावून सांगतात. त्याच्या पलीकडे अजून काहीच नाही. ते आहे तुमच्या राहण्याचे ठिकाण, ज्याला ब्रह्मांड देखील म्हणतात. जसे इथे तुम्ही आकाश तत्वामध्ये बसले आहात, यामध्ये काही दिसते का? रेडिओमध्ये म्हणतात - आकाशवाणी. आता हे आकाश तर बेअंत आहे. त्याचा शेवट गाठू शकत नाही. तर आकाशवाणी म्हटल्याने मनुष्य काय समजतील. हे जे मुख आहे, हे आहे पोलार (पोकळ). मुखातून वाणी (आवाज) निघतो. ही तर कॉमन गोष्ट आहे. मुखाने आवाज निघणे ज्याला आकाशवाणी म्हटले जाते. बाबांना देखील आकाशा द्वारे वाणी चालवावी लागते. तुम्हा मुलांना स्वतःचे देखील सर्व रहस्य सांगितले आहे. तुम्हाला निश्चय होतो. आहे खूप सोपे. जसे आपण आत्मा आहोत तसे बाबा देखील परम आत्मा आहेत. सर्वोच्च आत्मा आहेत ना. सर्वांना आपापला पार्ट मिळालेला आहे. सर्वात उच्च ते उच्च भगवान नंतर मग प्रवृत्ती मार्गाचे युगल मेरू. नंतर नंबरवार माळा बघा किती छोटी आहे नंतर सृष्टी वाढत-वाढत किती विशाल होते. किती करोडों मणी अर्थात आत्म्यांची माळा आहे. हे सर्व आहे शिक्षण. बाबा जे समजावून सांगतात त्याला चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करा. झाडाचे डिटेल्स तर तुम्ही ऐकतच असता. बीज वरती आहे. हे व्हरायटी झाड आहे. याचे आयुष्य किती आहे. झाडाची वृद्धी होत राहते तर पूर्ण दिवस बुद्धीमध्ये हेच असावे. या सृष्टी रुपी कल्पवृक्षाचा कालावधी एकदम ॲक्युरेट आहे. ५००० वर्षांपेक्षा एका सेकंदाचा देखील फरक होऊ शकत नाही. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आता किती नॉलेज आहे, जे चांगले मजबूत आहेत. मजबूत तेव्हा होणार जेव्हा पवित्र व्हाल. या नॉलेजला धारण करण्यासाठी सोन्याचे भांडे पाहिजे. मग तर इतके सोपे होईल जितके बाबांसाठी सोपे आहे. मग तुम्हाला देखील म्हणणार - ‘मास्टर नॉलेजफुल’. मग नंबरवार पुरुषार्था नुसार माळेचा मणी बनाल. अशा प्रकारच्या गोष्टी बाबांशिवाय कोणीही समजावून सांगू शकणार नाही. ही आत्मा (ब्रह्मा बाबा) देखील समजावून सांगत आहे. बाबा देखील या तना द्वारेच समजावून सांगतात, देवतांच्या शरीरा द्वारे नाही. बाबा एकदाच येऊन गुरु बनतात तरीही बाबांनाच पार्ट बजावायचा आहे. ५००० वर्षानंतर येऊन पार्ट बजावतील.

बाबा समजावून सांगतात - उच्च ते उच्च मी आहे. मग आहे मेरु. जे आदिला (सुरुवातीला) महाराजा-महाराणी आहेत, तेच शेवटी जाऊन अंतामध्ये आदि देव, आदि देवी बनणार. हे सर्व ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही कुठेही जाऊन समजावून सांगाल तर आश्चर्य वाटेल. हे तर बरोबर सांगतात. मनुष्य सृष्टीचे बीजरूपच नॉलेजफुल आहेत. त्यांच्याशिवाय आणखी कोणीही ज्ञान देऊ शकत नाही. या सर्व गोष्टी धारण करायच्या आहेत परंतु मुलांमध्ये धारणा होत नाही. आहे खूप सोपे, कोणतीच अडचण नाही. पहिली तर यामध्ये आठवणीची यात्रा पाहिजे, जेणेकरून पवित्र भांड्यामध्ये रत्न टिकू शकतील. ही उच्च ते उच्च रत्ने आहेत. बाबा (ब्रह्मा बाबा) तर सोनार होते. खूप चांगले हिरे-माणके इत्यादी येत होते तर चांदीच्या डबीत कापसामध्ये अगदी व्यवस्थित ठेवत होते. ज्यामुळे कोणीही बघितले तर म्हणतील, ही तर एकदम फर्स्ट क्लास चीज आहे. हे ज्ञान देखील असेच आहे. चांगली वस्तू चांगल्या भांड्यामध्ये शोभून दिसते. तुमचे कान ऐकतात. त्यामध्ये धारणा होते. पवित्र असेल, बुद्धियोग बाबांसोबत असेल तर धारणा चांगली होईल. नाहीतर सर्व निघून जाईल. आत्मा आहे देखील किती छोटी. तिच्यामध्ये किती ज्ञान भरलेले आहे. किती चांगले शुद्ध भांडे पाहिजे. कसलेही संकल्प सुद्धा येऊ नयेत. उलटे-सुलटे संकल्प सर्व बंद झाले पाहिजेत. सर्व बाजूंनी बुद्धियोग काढून टाकायचा आहे. माझ्यासोबत योग लावत-लावत भांडे सोन्याचे बनवा ज्यामुळे रत्ने टिकू शकतील; म्हणजे मग दुसऱ्यांना दान देत रहाल. भारताला महादानी मानले जाते, ते धन दान तर खूप करतात. परंतु हे आहे अविनाशी ज्ञान रत्नांचे दान. देहासहित जे काही आहे ते सर्व सोडून एका सोबत बुद्धीचा योग असावा. आपण तर बाबांचे आहोत, यासाठीच मेहनत घ्यावी लागते. एम ऑब्जेक्ट तर बाबा सांगतात. पुरुषार्थ करणे मुलांचे काम आहे. आत्ताच इतके उच्च पद प्राप्त करू शकता. कोणतेही उलटे-सुलटे संकल्प अथवा विकल्प येऊ नयेत. बाबाच ज्ञानाचा सागर, हद-बेहद पासून पार पलीकडे आहेत. सर्व काही बसून समजावून सांगतात. तुम्ही समजता - बाबा आपल्याला बघतात, परंतु मी तर हद-बेहदच्या पार वर निघून जातो. मी राहणारा देखील तिथलाच आहे. तुम्ही देखील हद-बेहदच्या पलीकडे निघून जा. संकल्प-विकल्प काहीही येऊ नयेत. यासाठी मेहनत घेतली पाहिजे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमल पुष्प समान बनायचे आहे. ‘हथ कार डे दिल यार डे’. गृहस्थी तर पुष्कळ आहेत. गृहस्थी जितके ज्ञान घेतात तितके घरामध्ये राहणारी मुले घेत नाहीत. सेंटर चालविणारी, मुरली चालवणारे देखील नापास होतात आणि शिकणारे पुढे निघून जातात. पुढे चालून तुम्हाला सर्वकाही समजत जाईल. बाबा एकदम बरोबर सांगतात. आम्हाला जे शिकवत होते त्यांना मायेने खाऊन टाकले. महारथीला मायेने एकदम गिळंकृत करून टाकले. आता राहिले नाहीत. मायावी ट्रेटर (मायावी विद्रोही) बनतात. परदेशात देखील ट्रेटर बनतात ना. कुठे-कुठे जाऊन शरण घेतात. जे शक्तिशाली असतात त्यांच्याकडे निघून जातात. यावेळी, तर मृत्यू समोर उभा आहे ना तर खूप शक्तिशाली असतील त्यांच्याकडे जातील. आता तुम्ही समजता बाबाच शक्तिशाली आहेत. बाबा आहेत - सर्वशक्तिमान. आपल्याला शिकवत-शिकवत साऱ्या विश्वाचा मालक बनवतात. तिथे (स्वर्गामध्ये) सर्व काही मिळते. कोणतीही वस्तू अप्राप्त नसते, जिच्या प्राप्तीसाठी आपल्याला पुरुषार्थ करावा लागेल. तिथे अशी कोणतीही वस्तू असत नाही जी तुमच्याकडे नसेल. ते देखील नंबरवार पुरुषार्था नुसार पद प्राप्त करतात. अशा गोष्टी बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाहीत. सर्व आहेत पुजारी. भले मोठ-मोठे शंकराचार्य इत्यादी आहेत, बाबा त्यांची देखील महिमा ऐकवतात. सुरुवातीला पवित्रतेच्या ताकदीने भारताला खूप चांगल्या रीतीने थोपवून धरण्याच्या निमित्त बनतात. ते देखील जेव्हा सतोप्रधान असतात तेव्हा. आता तर तमोप्रधान आहेत तर त्यांच्यामध्ये आता कसली ताकद राहिली आहे! आता तुम्ही जे पुजारी होता ते परत पूज्य बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. बुद्धीमध्ये धारणा असावी आणि तुम्ही समजावून सांगत रहा. बाबांची देखील आठवण करा. बाबाच साऱ्या झाडाचे रहस्य समजावून सांगतात. मुलांना देखील असे गोड बनायचे आहे. युद्ध आहे ना. मायेची वादळे देखील खूप येतात. सर्व सहन करावे लागते. बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने सर्व वादळे दूर होतील. ‘हातमताई’च्या खेळाविषयी बोलतात ना. तोंडात मोहर घालत होते, माया निघून जात होती. मोहर काढल्यावर माया पुन्हा येत होती. लाजाळूचे झाड असते ना. हात लावला तर कोमेजून जाते. माया खूप शक्तिशाली आहे, इतके उच्च शिक्षण शिकता-शिकता बसल्याजागी खाली पाडते म्हणून बाबा समजावून सांगत राहतात - स्वतःला भाऊ-भाऊ समजा तर मग हद-बेहद पासून पार पलीकडे निघून जाल. शरीरच नाही तर मग दृष्टी कुठे जाईल. इतकी मेहनत करायची आहे, ऐकून हताश व्हायचे नाही. कल्प-कल्प तुमचा पुरुषार्थ चालतो आणि तुम्ही आपले भाग्य मिळवता. बाबा म्हणतात - शिकलेले सर्व काही विसरा. बाकी जे कधी शिकला नाहीत ते ऐका आणि आठवण करा. त्याला म्हटले जाते भक्तिमार्ग. तुम्ही राजऋषी आहात ना. जटा मोकळ्या असाव्यात आणि मुरली चालवा. साधु-संत इत्यादी जे ऐकवतात ती सर्व आहे मनुष्यांची मुरली. ही आहे बेहदच्या बाबांची मुरली. सतयुग-त्रेतामध्ये तर ज्ञानाच्या मुरलीची आवश्यकताच नाही. तिथे ना ज्ञानाची, ना भक्तीची आवश्यकता आहे. हे ज्ञान तुम्हाला मिळते या संगमयुगावर आणि बाबाच देणारे आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बुध्दीमध्ये ज्ञान-रत्नांना धारण करून दान करायचे आहे. हद-बेहद पासून पार अशा स्थितीमध्ये रहायचे आहे जेणेकरून कधीही उलटे-सुलटे संकल्प अथवा विकल्प येऊ नयेत. आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत, हीच स्मृती रहावी.

२) मायेच्या वादळांपासून वाचण्याकरिता मुखामध्ये बाबांच्या आठवणीची मोहर घालायची आहे. सर्व काही सहन करायचे आहे. लाजाळूचे झाड बनायचे नाही (हताश व्हायचे नाही). माये समोर हार पत्करायची नाही.

वरदान:-
सदैव एकाच्याच स्नेहामध्ये सामावून एका बाबांनाच सहारा बनविणारे सर्व आकर्षण मुक्त भव

जी मुले एका बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेली आहेत ती सर्व प्राप्तींनी संपन्न आणि संतुष्ट असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार आकर्षित करू शकत नाही. त्यांना सहजच - ‘एक बाप दूसरा न कोई’ - ही अनुभूती होते. त्यांचा एक बाबाच संसार आहे, एका बाबांद्वारेच सर्व नात्यांच्या रसाचा अनुभव होतो. त्यांच्यासाठी सर्व प्राप्तींचा आधार एक बाबा आहेत, ना की वैभव अथवा साधन त्यामुळे ते सहज आकर्षण मुक्त होतात.

बोधवाक्य:-
प्रकृतीला पावन बनवायचे असेल तर संपूर्ण लगाव मुक्त बना.