06-11-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आता अगदी षडपंथावर (किनाऱ्यावर) उभे आहात, तुम्हाला आता या बाजूने त्या दुसऱ्या बाजूला जायचे आहे, घरी जाण्याची तयारी करायची आहे”

प्रश्न:-
कोणती एक गोष्ट लक्षात ठेवाल तर अवस्था अचल-अडोल बनेल?

उत्तर:-
पास्ट इज पास्ट. झालेल्या गोष्टींचे चिंतन करायचे नाही, पुढे जात रहायचे आहे. नेहमी एकाकडेच पहा तर अवस्था अचल-अडोल होईल. तुम्ही आता कलियुगाची हद्द सोडली आहे, मग आता मागे का पाहता? त्यामध्ये जरा देखील बुद्धी जाऊ नये - हाच आहे सूक्ष्म अभ्यास.

ओम शांती।
दिवस बदलत जातात, वेळ निघून जात राहतो. विचार करा, सतयुगापासून वेळ निघून जाता-जाता आता कलियुगाच्या देखील किनाऱ्यावर येऊन उभे आहात. हे सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुगाचे चक्र देखील जणूकाही मॉडेल आहे. सृष्टी तर प्रचंड मोठी आहे. त्याच्या मॉडेल रूपाला मुलांनी जाणले आहे. अगोदर हे माहीत नव्हते की आता कलियुग पूर्ण होत आहे. आता माहीत झाले आहे - तर मुलांनी देखील बुद्धीद्वारे सतयुगापासून चक्र फिरत कलियुगाच्या अंताला किनाऱ्यावर येऊन थांबायला हवे. समजले पाहिजे टिक-टिक होत राहते, ड्रामा फिरत राहतो. बाकी हिशोब कितीसा राहिला असेल? थोडासा राहिला असेल. अगोदर ठाऊक नव्हते. आता बाबांनी सांगितले आहे - बाकी कोपरा राहिला आहे. या दुनियेमधून त्या दुनियेमध्ये जाण्याकरिता आता थोडासा वेळ शिल्लक आहे. हे ज्ञान देखील आता मिळाले आहे. आपण सतयुगापासून चक्र फिरत-फिरत आता कलियुगाच्या अंतामध्ये येऊन पोहोचलो आहोत. आता पुन्हा माघारी जायचे आहे. येण्याचे आणि जाण्याचे गेट असते ना. हे देखील असेच आहे. मुलांनी समजावून सांगितले पाहिजे - बाकी थोडा किनारा आहे. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे ना. आता आपण किनाऱ्यावर आहोत. खूप कमी वेळ आहे. आता या जुन्या दुनियेतून मोह काढून टाकायचा आहे. आता तर नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. स्पष्टीकरण तर खूप सहज मिळते आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे. बुद्धीमध्ये चक्र फिरले पाहिजे. आता तुम्ही कलियुगामध्ये नाही आहात. तुम्ही ही हद्द सोडली आहे मग त्या बाजूच्यांची आठवण कशाला केली पाहिजे? जर का जुन्या दुनियेला सोडले आहे, आपण पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत तर मग पाठीमागे पाहायचे तरी कशाला? विकारी दुनियेशी बुद्धियोग कशासाठी लावायचा? या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. बाबा जाणतात कोणी-कोणी तर रुपयातून एक आणा सुद्धा समजत नाहीत. ऐकले आणि विसरून जातात. तुम्हाला आता मागच्या दिशेने पहायचे नाहीये. बुद्धीने काम करायचे आहे ना. आपण पार निघून गेलो आहोत - मग पाठीमागे पहायचेच कशाला? पास्ट इज पास्ट. बाबा म्हणतात - किती महीन गोष्टी समजावून सांगतो. तरी देखील मुलांचे डोके पाठीमागे का लटकलेले राहते. बाबा म्हणतात डोके या बाजूला करा. ती जुनी दुनिया तुमच्या काहीही कामाची वस्तू नाही आहे. बाबा जुन्या दुनियेपासून वैराग्य उत्पन्न करतात, नवीन दुनिया समोर उभी आहे, जुन्या दुनियेचे वैराग्य. विचार करा - अशी आपली अवस्था आहे? बाबा म्हणतात पास्ट इज पास्ट. झालेल्या गोष्टीचे चिंतन करू नका. जुन्या दुनियेकडून कोणतीही आशा ठेवू नका. आता तर एकच श्रेष्ठ आशा ठेवायची आहे - आपण चाललो सुखधामला. बुद्धीमध्ये सुखधामच लक्षात राहिले पाहिजे. पाठीमागे कशाला वळायचे. परंतु अनेकांची पाठ मागे वळते. तुम्ही आता आहात पुरुषोत्तम संगमयुगावर. जुन्या दुनियेपासून किनारा केला आहे. ही समजण्यासारखी गोष्ट आहे ना. कुठेही थांबायचे नाहीये, कुठे बघायचे नाहीये. झालेल्या गोष्टीची आठवण करायची नाहीये. बाबा म्हणतात - पुढे जात रहा, मागे पाहू नका. एका बाजूलाच बघत रहा तेव्हाच अचल, स्थिर, अडोल अवस्था राहू शकते. त्या बाजूला बघत रहाल तर जुन्या दुनियेतील मित्र-नातलग इत्यादींची आठवण येत राहील. नंबरवार तर आहेत ना. आता पहाल तर खूप चांगला चालत आहे, उद्या घसरला तर मन एकदम उडून जाते. अशी ग्रहचारी बसते जी मुरली ऐकण्याची देखील इच्छा होत नाही. विचार करा - असे होते ना?

बाबा म्हणतात - तुम्ही आता संगमावर उभे आहात तर तोंड समोरच्या दिशेने असले पाहिजे. समोर आहे नवीन दुनिया, तेव्हाच आनंद होईल. आता बाकी षडपंथावर (अगदी किनाऱ्यावर) आहोत. म्हणतात ना - आता तर आपल्या देशातील झाडे दिसत आहेत. आवाज कराल तर लगेच ती ऐकतील. षडपंथ अर्थात बिल्कुल समोर आहेत. तुम्ही आठवण करता आणि देवता येतात. यापूर्वी थोडेच येत होते. सूक्ष्मवतनमध्ये सासरचे येत होते काय? आता तर माहेरचे आणि सासरचे एकत्र भेटत आहेत. तरी देखील मुले चालता-चालता विसरून जातात. बुद्धियोग मागच्या दुनियेमध्ये पळतो. बाबा म्हणतात - तुम्हा सर्वांचा हा अंतिम जन्म आहे. तुम्ही मागे हटू नका, आता पार जायचे आहे. या बाजूने त्या बाजूला जायचे आहे. मृत्यू देखील जवळ येत राहतो. फक्त पाऊल टाकायचे बाकी आहे, नौका किनाऱ्यावर येते तर त्या दिशेने पाऊल उचलावे लागते ना. तुम्हा मुलांना उभे रहायचे आहे किनाऱ्यावर. तुमच्या बुद्धीमध्ये आहे आत्मे जातात आपल्या स्वीट होमला. ही आठवण राहिल्याने देखील तो आनंद तुम्हाला अचल-अडोल बनवेल. हेच विचार सागर मंथन करत रहायचे आहे. ही आहे बुद्धीची गोष्ट. ‘मी आत्मा जात आहे. आता अगदी जवळ किनाऱ्यावर आहे. आता थोडा वेळ बाकी आहे’. यालाच आठवणीची यात्रा म्हटले जाते. हे देखील विसरून जातात. चार्ट लिहायचा देखील विसरून जातात. आपल्या हृदयावर हात ठेवून पहा - बाबा जे सांगतात की स्वतःला असे समजा - आपण जवळ किनाऱ्यावर उभे आहोत, अशी आपली अवस्था आहे का? बुद्धीमध्ये एक बाबाच लक्षात रहावा. बाबा आठवणीची यात्रा भिन्न-भिन्न प्रकारे शिकवत राहतात. या आठवणीच्या यात्रेमध्येच मस्त राहायचे आहे. बस आता आपल्याला जायचे आहे. इथे आहेत सर्व खोटी नाती. खरे आहे सतयुगातील नाते. स्वतःला पहा आपण कुठे उभे आहोत? बुद्धीमध्ये सतयुगापासून या चक्राची आठवण करा. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी आहात ना. सतयुगापासून चक्र फिरून येऊन किनाऱ्यावर उभे आहात. षडपंथ (किनारा) झाला ना. काहीजण तर आपला खूप वेळ वाया घालवत राहतात. ५-१० मिनिट देखील मुश्किलीने आठवणीमध्ये राहत असतील. स्वदर्शन चक्रधारी तर पूर्ण दिवसभर बनून राहिले पाहिजे. असे तर राहत नाहीत. बाबा भिन्न-भिन्न प्रकारे समजावून सांगतात. आत्म्याचीच गोष्ट आहे. तुमच्या बुद्धीमध्ये चक्र फिरत राहते. बुद्धीमध्ये ही आठवण का नाही राहिली पाहिजे. आता आपण किनाऱ्यावर उभे आहोत. हा किनारा बुद्धीमध्ये का लक्षात राहत नाही. जेव्हा की जाणता - आपण पुरुषोत्तम बनत आहोत तर जाऊन किनाऱ्यावर उभे रहा. उवे प्रमाणे चालतच रहा. ही प्रॅक्टिस तुम्ही का करत नाही? का नाही चक्र बुद्धीमध्ये येत? हे स्वदर्शन चक्र आहे ना. बाबा सुरुवातीपासून संपूर्ण चक्र समजावून सांगतात. तुमची बुद्धी पूर्ण चक्र फिरून, येऊन किनाऱ्यावर उभी राहिली पाहिजे, बुद्धीमध्ये बाहेरच्या इतर कोणत्याही वातावरणाचे झंझट राहू नये. दिवसें-दिवस तुम्हाला मुलांना सायलेन्स मध्येच जायचे आहे. वेळ वाया घालवायचा नाही. जुन्या दुनियेला सोडून नवीन नात्याशी आपला बुद्धीयोग लावा. योग लावला नाहीत तर पापे कशी नष्ट होतील? तुम्ही जाणता ही दुनियाच नष्ट होणार आहे, याचे मॉडेल किती छोटे आहे. ५ हजार वर्षांची दुनिया आहे. अजमेर मध्ये स्वर्गाचे मॉडेल आहे परंतु तो पाहून कोणाला स्वर्ग आठवेल का? त्यांना काय ठाऊक स्वर्गा बद्दल? समजतात स्वर्ग तर ४० हजार वर्षानंतर येईल. बाबा तुम्हा मुलांना बसून समजावून सांगत आहेत की या दुनियेमध्ये कामकाज करत असताना बुद्धीमध्ये हे लक्षात ठेवा की ही दुनिया तर नष्ट होणार आहे. आता जायचे आहे, आपण अंतामध्ये उभे आहोत. प्रत्येक पाऊल उवे प्रमाणे चालत आहे (हळू-हळू चालत आहे). ध्येय किती मोठे आहे. बाबा तर ध्येयाला जाणतात ना. बाबांच्या सोबत दादा देखील एकत्र आहेत. ते (शिवबाबा) समजावून सांगतात तर काय हे (ब्रह्मा बाबा) समजावून सांगू शकणार नाहीत काय. हे (ब्रह्मा बाबा) देखील ऐकतात ना. काय हे अशा प्रकारे विचार सागर मंथन करत नसतील काय? बाबा तुम्हाला विचार सागर मंथन करण्यासाठी पॉईंट्स ऐकवत राहतात. असे नाही की बाबा खूप मागे आहेत. अरे हे तर शेपटा प्रमाणे लटकलेले आहेत मग मागे कसे असतील. या सर्व अति गूढ गोष्टी धारण करायच्या आहेत. चुका करणे सोडून द्यायचे आहे. बाबांकडे दोन-दोन वर्षानंतर येतात. काय त्यांच्या हे लक्षात राहत असेल की आपण किनाऱ्यावर उभे आहोत? अशी अवस्था होईल तर बाकी काय पाहिजे? बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे - डबल मुकुटधारी… हे केवळ नाव आहे, बाकी तिथे काही लाईटचा ताज नसतो. ही तर पवित्रतेची निशाणी आहे. जे पण धर्म स्थापक आहेत, त्यांच्या चित्रांमध्ये लाईट जरूर दाखवतात कारण ते व्हाइसलेस (निर्विकारी) सतोप्रधान आहेत, मग रजो, तमोमध्ये येतात. तुम्हा मुलांना नॉलेज मिळत आहे, त्यामध्येच मस्त राहिले पाहिजे. भले तुम्ही आहात या दुनियेमध्ये परंतु बुद्धीचा योग तिथे (नवीन दुनियेमध्ये) लागलेला असावा. यांच्याशी देखील तोड निभावायची आहे, जे या कुळाचे असतील ते निघून येतील. सैपलिंग (कलम) लागणार आहे. आदि सनातन देवी-देवता धर्माचे जे असतील ते जरूर पुढे-मागे येतील. शेवटी येणारे देखील पुढे असणाऱ्यांपेक्षाही वेगाने पुढे जातील. हे शेवट पर्यंत होत राहील. ते जुने असलेल्यांपेक्षाही वेगाने पावले उचलतील. संपूर्ण परीक्षा आहे आठवणीच्या यात्रेची. भले उशिरा आले आहेत, आठवणीच्या यात्रेमध्ये व्यस्त रहातील, इतर सर्व कामधंदा सोडून याच यात्रेमध्ये बसतील, भोजन तर खायचेच आहे. चांगल्या रीतीने आठवणीमध्ये राहिले तर या आनंदासारखा दुसरा कोणता खुराक नाही. हीच काळजी राहील - आता आम्ही जातो. २१ जन्मांचे राज्यभाग्य मिळते. एखाद्याला लॉटरी लागते तर त्याला आनंदाचा पारा चढतो ना. तुम्हाला खूप मेहनत करायची आहे. यालाच अखेरचे अमूल्य जीवन म्हटले जाते. आठवणीच्या यात्रेमध्ये खूप आनंद आहे. हनुमान देखील पुरुषार्थ करत-करत स्थेरियम (दृढ) बनला ना. भंभोरला आग लागली, रावणाचे राज्य जळून खाक झाले. ही एक कथा तयार केली आहे. बाबा बसून यथार्थ गोष्ट सांगतात. रावण राज्य नष्ट होईल. स्थेरियम-बुद्धी (दृढ-बुद्धी) यालाच म्हटले जाते. बस्स, आता षडपंथ आहे (अगदी किनारा), आम्ही जात आहोत. या आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करा तेव्हा आनंदाचा पारा चढेल, आयुष्य देखील योगबलाने वाढते. तुम्ही आता दैवी गुण धारण करता मग ती धारणा अर्धाकल्प चालते. या एका जन्मामध्ये तुम्ही इतका पुरुषार्थ करता, ज्यामुळे तुम्ही जाऊन हे लक्ष्मी-नारायण बनता. तर किती पुरुषार्थ केला पाहिजे. यामध्ये चूक करायची नाही किंवा वेळ वाया घालवता कामा नये, जो करेल तो मिळवेल. बाबा शिकवण देत राहतात. तुम्ही समजता - कल्प-कल्प आपण विश्वाचे मालक बनतो, इतक्या कमी वेळामध्ये कमाल करतात. साऱ्या दुनियेला चेंज करतात. बाबांसाठी काही मोठी गोष्ट नाहीये. बाबा कल्प-कल्प करतात. बाबा समजावून सांगतात - चालता-फिरता, खाता-पिता आपला बुद्धियोग बाबांसोबत लावा. या गुप्त गोष्टी बाबाच मुलांना बसून समजावून सांगतात. आपल्या अवस्थेला चांगल्या रीतीने मजबूत करत राहा. नाही तर उच्च पद मिळणार नाही. तुम्ही मुले नंबरवार पुरुषार्था नुसार मेहनत करता. समजता आता तर आपण किनाऱ्यावर उभे आहोत. तर मग मागे आपण कशाला पहायचे? पावले पुढेच चालत राहतात. यामध्ये अंतर्मुखता जास्त पाहिजे. म्हणून कासवाचे देखील उदाहरण आहे. ही उदाहरणे इत्यादी सर्व तुमच्यासाठी आहेत. संन्यासी तर आहेतच हठयोगी. ते काही राजयोग शिकवू शकणार नाहीत. ते लोक हे ज्ञान ऐकतात तर त्यांना वाटते की हे लोक आमचा अपमान करतात; त्यामुळे हे देखील युक्तीने लिहिले पाहिजे. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही राजयोग शिकवू शकत नाही. इनडायरेक्ट सांगितले आहे - त्यामुळे काळजी करू नका. युक्तीने चालावे लागते ना, जेणेकरून सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. कुटुंब-परिवार इत्यादींवर प्रेम करा परंतु बुद्धीचा योग बाबांसोबत लावायचा आहे. तुम्ही जाणता आता आपण एकाच्या मतावर आहोत. हे आहे देवता बनण्याचे मत, यालाच अद्वैत मत म्हटले जाते. मुलांना देवता बनायचे आहे. तुम्ही किती वेळा बनला आहात? अनेकदा. आता तुम्ही संगमयुगावर उभे आहात. हा शेवटचा जन्म आहे. आता तर घरी जायचे आहे. मागे वळून कशाला बघायचे. बघत असताना तरीही आपल्या अडोल अवस्थेमध्ये तुम्ही उभे रहा. ध्येयाला विसरायचे नाहीये. तुम्हीच महावीर आहात जे मायेवर विजय प्राप्त करता. आता तुम्ही समजता - हार आणि जीतचे हे चक्र फिरत राहते. बाबांचे किती वंडरफुल ज्ञान आहे. हे आधी ठाऊक होते का की स्वतःला बिंदू समजायचे आहे, इतक्या छोट्याशा बिंदू मध्ये सगळा पार्ट नोंदलेला आहे जे चक्र फिरतच राहते. अतिशय वंडरफुल आहे. वंडर असे म्हणून सोडून द्यावेच लागते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मागे वळून पहायचे नाही. कोणत्याही गोष्टी मध्ये अडकून राहू नका. एका बाबांकडे पाहून आपली अवस्था एकरस (स्थिर) ठेवायची आहे.

२) बुद्धीमध्ये स्मृती रहावी की आता आपण किनाऱ्यावर उभे आहोत. घरी जायचे आहे, चुका करणे सोडून द्यायचे आहे. आपली अवस्था मजबूत करण्यासाठी गुप्त मेहनत करायची आहे.

वरदान:-
सर्वांचे हृदयापासूनचे प्रेम प्राप्त करणारे न्यारे, प्यारे, निरसंकल्प भव

ज्या मुलांमध्ये न्यारे आणि प्यारे राहण्याचा गुण किंवा निरसंकल्प राहण्याची विशेषता आहे अर्थात ज्यांना हे वरदान प्राप्त आहे ते सर्वांचे आवडते बनतात कारण न्यारे पणामुळे सर्वांचे हृदयापासूनचे प्रेम स्वतः प्राप्त होते. ते आपली शक्तिशाली निरसंकल्प स्थिती अथवा श्रेष्ठ कर्माद्वारे अनेकांच्या सेवेचे निमित्त बनतात म्हणून स्वतः देखील संतुष्ट राहतात आणि इतरांचे देखील कल्याण करतात. त्यांना प्रत्येक कार्यामध्ये सफलता स्वतः प्राप्त होते.

बोधवाक्य:-
एक “बाबा” शब्दच सर्व खजिन्यांची चावी आहे - या चावीला नेहमी सांभाळून ठेवा.

अव्यक्त इशारे:- अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.

एका सेकंदामध्ये शरीरातून वेगळे तेव्हाच होऊ शकाल जेव्हा कोणत्याही संस्कारांचा टाईटनेस नसेल. ज्याप्रमाणे कोणतीही वस्तू जर चिकटलेली असेल तर त्याला उघडणे अवघड असते परंतु सैल असेल तर सहजच वेगळ्या होतात. तसेच जर आपल्या संस्कारांमध्ये जरा सुद्धा इझीपणा (हलकेपणा) नसेल तर अशरीरीपणाचा अनुभव करू शकणार नाही म्हणून इजी आणि अलर्ट रहा (हलके आणि सतर्क रहा).