06-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही आत्ता पुरुषोत्तम संगमयुगात आहात, तुम्हाला इथे राहून नव्या
दुनियेची आठवण करायची आहे आणि आत्म्याला पावन बनवायचे आहे”
प्रश्न:-
बाबांनी
तुम्हाला अशी कोणती समज दिली आहे ज्यामुळे तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे?
उत्तर:-
बाबांनी या बेहद अनादि ड्रामा विषयी अशी समज दिली आहे, ज्यामुळे बुद्धीला जे
गोदरेजचे कुलूप लागले होते ते उघडले. पत्थर बुद्धी पासून पारस बुद्धी बनलो. बाबांनी
समज दिली आहे की या ड्रामामध्ये प्रत्येक ॲक्टरचा आपापला अनादि पार्ट आहे, ज्याने
कल्पापूर्वी जेवढा अभ्यास केला आहे, तेवढाच आता देखील करतील. पुरुषार्थ करून आपला
वारसा घेतील.
ओम शांती।
रूहानी मुलांप्रती बाबा बसून शिकवत आहेत. जेव्हापासून पिता बनले आहेत तेव्हापासूनच
टिचर देखील आहेत, आणि तेव्हापासूनच मग सद्गुरूच्या रूपामध्ये शिकवण देत आहेत. हे तर
मुलांना समजतेच आहे की, जर ते पिता, टिचर, सद्गुरू आहेत म्हणजे लहान मूल तर नाही
आहेत ना. सर्वश्रेष्ठ, मोठ्यात मोठे आहेत. बाबा जाणतात ही सर्व माझी मुले आहेत.
ड्रामा प्लॅन अनुसार बोलावले देखील आहे की, येऊन आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन चला.
परंतु समजत काहीच नाहीत. आता तुम्ही समजता पावन दुनिया सतयुगाला, पतित दुनिया
कलियुगाला म्हटले जाते. म्हणतात देखील - येऊन आम्हाला रावणाच्या जेलमधून मुक्त करून
दुःखातून सोडवून आपल्या शांतीधाम-सुखधाम मध्ये घेऊन चला. दोन्ही नावे चांगली आहेत.
मुक्ती-जीवनमुक्ती अथवा शांतीधाम-सुखधाम. तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणाच्याही
बुद्धीमध्ये नाही आहे की, शांतीधाम कुठे, सुखधाम कुठे असते? एकदमच अज्ञानी आहेत.
तुमचे एम ऑब्जेक्टच समजदार (ज्ञानी) बनणे हे आहे. अज्ञानी असणाऱ्यांसाठी एम
ऑब्जेक्ट हेच असते की, असे ज्ञानी बनायचे आहे. सर्वांना शिकवायचे आहे -
मनुष्यापासून देवता बनणे हे आहे एम ऑब्जेक्ट. ही आहेच मनुष्यांची सृष्टी, ती आहे
देवतांची सृष्टी. सतयुगामध्ये आहे देवतांची सृष्टी, तर नक्कीच मनुष्यांची सृष्टी
कलियुगामध्ये असेल. आता मनुष्यापासून देवता बनायचे असेल तर जरूर पुरुषोत्तम
संगमयुगसुद्धा असेल. ते आहेत देवता, हे आहेत मनुष्य. देवता आहेत बुद्धिमान.
बाबांनीच असे बुद्धिवान बनवले आहे. जे बाबा विश्वाचे मालक आहेत, भले ते बनत नाहीत,
परंतु गायन तर होते ना. बेहदचे बाबा, बेहदचे सुख देणारे आहेत. बेहदचे सुख असतेच
नवीन दुनियेमध्ये आणि बेहदचे दुःख असते जुन्या दुनियेमध्ये. देवतांची चित्रेसुद्धा
तुमच्या समोर आहेत. त्यांचे गायन देखील आहे. आजकाल तर ५ भुतांना (पंचमहाभूत तत्वांना)
देखील पूजत राहतात.
आता बाबा तुम्हाला
समजावून सांगतात - तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमयुगावर. तुमच्यामध्ये देखील नंबरवार
पुरुषार्थानुसार जाणतात - आमचा एक पाय स्वर्गामध्ये, एक पाय नरकामध्ये आहे. राहतो
तर इथेच आहोत परंतु बुद्धी नवीन दुनियेमध्ये आहे आणि जे नव्या दुनियेमध्ये घेऊन
जातात त्यांची आठवण करायची आहे. बाबांच्या आठवणीनेच तुम्ही पवित्र बनता. हे शिवबाबा
बसून समजावून सांगतात. शिवजयंती साजरी तर जरूर करतात, परंतु शिवबाबा केव्हा आले,
येऊन काय केले, हे काहीच माहित नाही आहे. शिवरात्री साजरी करतात आणि श्रीकृष्णाची
जयंती साजरी करतात, जे काही श्रीकृष्णासाठी म्हणतात ते शिवबाबांसाठी तर म्हणणार नाही
म्हणून मग त्यांची शिवरात्री म्हणतात. अर्थ काहीच समजत नाहीत. तुम्हा मुलांना तर
अर्थ समजावून सांगितला जातो. अथाह दुःख आहे कलियुगाच्या अंताला, मग अथाह सुख असते
सतयुगामध्ये. हे ज्ञान तुम्हा मुलांना आत्ता मिळाले आहे. तुम्ही आदि-मध्य-अंताला
जाणता. जे कल्पापूर्वी शिकले आहेत तेच आता शिकतील, ज्यांनी जो पुरुषार्थ केला असेल
तोच करु लागतील आणि तसेच पदही प्राप्त करतील. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र आहे.
तुम्हीच सर्वश्रेष्ठ पद प्राप्त करता आणि मग तुम्ही उतरता देखील तसेच. बाबांनी
समजावून सांगितले आहे - हे जे काही मनुष्यांचे आत्मे आहेत, माळा आहे ना, ती सर्व
नंबरवार येते. प्रत्येक ॲक्टरला आपापला पार्ट मिळालेला आहे - कोणत्या वेळी कोणाला
कोणता पार्ट बजावायचा आहे. हा अनादि पूर्व नियोजित ड्रामा आहे, जो बाबा बसून
समजावून सांगतात. आता बाबा जे तुम्हाला समजावून सांगतात ते आपल्या भावांना समजावून
सांगायचे आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की दर ५ हजार वर्षांनंतर बाबा येऊन आपल्याला
समजावून सांगतात, आम्ही मग भावांना समजावून सांगतो. भाऊ-भाऊ हे नाते आत्म्याशी
संबंधित आहे. बाबा म्हणतात या वेळी तुम्ही स्वतःला अशरीरी आत्मा समजा. आत्म्यालाच
आपल्या बाबांची आठवण करायची आहे - पावन बनण्याकरिता. आत्मा पवित्र बनते तर मग शरीर
देखील पवित्र मिळते. आत्मा अपवित्र तर दागिना देखील अपवित्र. नंबरवार तर असतातच.
एकाची फीचर्स, ॲक्टिव्हीटी दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाहीत. नंबरवार सर्वजण आपापला
पार्ट बजावतात, फरक पडू शकत नाही. नाटकामध्ये तीच दृश्ये बघाल जी काल (आधी) बघितली
होती. तीच रिपीट होतील ना. हे मग बेहदचे अजूनच मोठे काम आहे. काल तुम्हाला समजावून
सांगितले होते. तुम्ही राज्य घेतले आणि मग राज्य गमावले. आज पुन्हा राज्य
मिळविण्यासाठी समजून घेत आहात. आज भारत जुना नरक आहे, उद्या नवा स्वर्ग होईल.
तुमच्या बुद्धीमध्ये आहे - आता आपण नवीन दुनियेमध्ये जात आहोत. श्रीमताचे पालन करून
श्रेष्ठ बनत आहोत. श्रेष्ठ जरूर श्रेष्ठ सृष्टीवर राहतील. हे लक्ष्मी-नारायण
श्रेष्ठ आहेत तर श्रेष्ठ स्वर्गामध्ये राहतात. जे भ्रष्ट आहेत ते नरकामध्ये राहतात.
हे रहस्य तुम्हाला आता समजते आहे. जेव्हा या बेहदच्या ड्रामाला कोणी व्यवस्थित
समजून घेईल तेव्हा बुद्धीत बसेल. शिवरात्री देखील साजरी करतात परंतु जाणत काहीच
नाहीत. तर तुम्हा मुलांना आता रिफ्रेश (ताजेतवाने) करावे लागते. तुम्ही मग इतरांना
देखील ताजेतवाने करता. आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे मग सद्गती मिळेल. बाबा म्हणतात
- ‘मी स्वर्गामध्ये येत नाही, माझा पार्टच पतित दुनियेला पावन बनवण्याचा आहे. तिथे
तर तुमच्याकडे कुबेराचा खजिना असतो. इथे तर गरीब आहात म्हणून बाबांना बोलवता - येऊन
बेहदचा वारसा द्या. कल्प-कल्प बेहदचा वारसा मिळतो आणि मग गरीब सुद्धा होता.
चित्रांवरून समजावून सांगा तेव्हा समजू शकतील. पहिल्या नंबरचे लक्ष्मी-नारायण मग ८४
जन्म घेत मनुष्य बनले. हे ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळाले आहे. तुम्ही जाणता
आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी आदि सनातन देवी-देवता धर्म होता, ज्याला वैकुंठ,
स्वर्ग, दैवी दुनिया देखील म्हणतात. आत्ता तर म्हणणार नाही. आता तर आसुरी दुनिया आहे.
आसुरी दुनियेचा अंत, दैवी दुनियेची सुरुवात यांचा आत्ता संगम आहे. या गोष्टी आता
तुम्हाला समजतात, बाकी कोणाच्या तोंडून ऐकू शकणार नाही. बाबा येऊन यांचे मुख (ब्रह्मा
मुख) घेतात. कोणाचे मुख घेणार, समजतच नाहीत. बाबांचे आरोहण कोणावर होईल? जशी तुमची
आत्मा या शरीरावर आरूढ आहे ना! शिवबाबांना आपले स्वतःचे वाहन तर नाही आहे, पण
त्यांना मुख तर जरूर पाहिजे. नाहीतर मग राजयोग शिकवणार कसे? प्रेरणेद्वारे तर
शिकणार नाहीत. तर या सर्व गोष्टी हृदयामध्ये टिपून ठेवायच्या आहेत. परमात्म्याच्या
बुद्धीमध्ये देखील सर्व नॉलेज आहे ना. तुमच्याही बुद्धीमध्ये हे पक्के झाले पाहिजे.
हे नॉलेज बुद्धीने धारण करायचे आहे. म्हटले देखील जाते - तुमची बुद्धी ठीक आहे ना?
बुद्धी आत्म्यामध्ये असते. आत्माच बुद्धीने समजत आहे. तुमची पत्थर बुद्धी कोणी बनवली?
आता समजता रावणाने आमच्या बुद्धीची काय अवस्था केली आहे! काल तुम्ही ड्रामाला जाणत
नव्हता, बुद्धीला एकदम गॉडरेजचे (गोदरेजचे) कुलूप लागले होते. ‘गॉड’ शब्द तर येतो
ना. बाबा जी बुद्धी देतात ती बदलून पत्थर बुद्धी बनते. मग बाबा येऊन कुलूप उघडतात.
सतयुगामध्ये आहेच पारस बुद्धी. बाबा येऊन सर्वांचे कल्याण करतात. नंबरवार सर्वांच्या
बुद्धीची कवाडे उघडतात. मग एकामागोमाग एक येत राहतात. वरती तर कोणी राहू शकत नाही.
पतित तिथे राहू शकत नाहीत. बाबा पावन बनवून पावन दुनियेमध्ये घेऊन जातात. तिथे सर्व
पावन आत्मे राहतात. ती आहे निराकारी सृष्टी.
तुम्हा मुलांना आता
सर्व कळले आहे म्हणून आपले घर देखील जणू खूप जवळ आलेले दिसते. तुमचे घरावर खूप
प्रेम आहे. तुमच्यासारखे प्रेम तर कोणाचेच नाही. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत,
ज्यांचे बाबांवर प्रेम आहे, त्यांचे घरावर देखील प्रेम आहे. अतिप्रिय मुले असतात
ना. तुम्ही समजता इथे जे चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून अतिप्रिय बनतील तेच उच्च
पद प्राप्त करतील. हे काही लहान किंवा मोठ्या शरीरावर अवलंबून नाही आहे. ज्ञान आणि
योगामध्ये जे मस्त (हरवलेले) असतात, ते मोठे आहेत. कित्येक छोटी-छोटी मुले देखील
ज्ञान-योगामध्ये हुषार असतात तर मग मोठ्यांना शिकवतात. अन्यथा नियम तर आहे की, मोठे
छोट्यांना शिकवतात. आजकाल तर (मिडगेड) खूप छोटे देखील शिक्षक बनतात. तसे तर सर्व
आत्मे खूप छोटे आहेत. आत्मा बिंदू आहे, त्याचे काय वजन करणार? तारा आहे. मनुष्य लोक
तारा नाव ऐकल्यावर वरती बघतील. तुम्ही तारा नाव ऐकून स्वतःला बघता. धरतीवरचे तारे
तुम्ही आहात. ते आकाशातले जे जड (स्थूल) आहेत, तुम्ही चैतन्य आहात. त्यांच्यामध्ये
तर काहीच फेरबदल होत नाही, तुम्ही ८४ जन्म घेता, किती मोठा पार्ट बजावता. पार्ट
बजावता-बजावता तेज कमी होते, बॅटरी डिस्चार्ज होते. मग बाबा येऊन वेगवेगळ्या प्रकारे
समजावून सांगतात कारण तुमची आत्मा विझलेली आहे. जी शक्ती भरलेली होती ती संपली आहे.
आता पुन्हा बाबांकडून तुम्ही शक्ती भरता. तुम्ही आपली बॅटरी चार्ज करत आहात. यामध्ये
माया खूप विघ्ने आणते बॅटरी चार्ज करू देत नाही. तुम्ही चैतन्य बॅटऱ्या आहात. जाणता
बाबांसोबत योग लावल्याने आपण सतोप्रधान बनणार. आता तमोप्रधान बनलो आहोत. त्या हदच्या
शिक्षणामध्ये आणि या बेहदच्या शिक्षणामध्ये खूप फरक आहे. कसे नंबरवार सर्व आत्मे
वरती जातात आणि मग आपापल्या वेळी पार्ट बजावण्यासाठी यायचे आहे. सर्वांना आपापला
अविनाशी पार्ट मिळालेला आहे. तुम्ही हा ८४ चा पार्ट किती वेळा बजावला असेल! तुमची
बॅटरी किती वेळा चार्ज आणि डिस्चार्ज झाली आहे! जर जाणता की आपली बॅटरी डिस्चार्ज
आहे तर मग चार्ज करण्यासाठी उशीर का करायचा? परंतु माया बॅटरी चार्ज करू देत नाही.
तुम्हाला माया बॅटरी चार्ज करण्याचे विसरायला लावते. वारंवार बॅटरी डिस्चार्ज करून
टाकते. बाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करता परंतु करू शकत नाही. तुमच्यापैकी जे
बॅटरी चार्ज करून सतोप्रधान अवस्थेच्या जवळ येतात, त्यांच्याकडून देखील माया चूक
घडवून बॅटरी डिस्चार्ज करून टाकते. हे शेवटपर्यंत होत राहील. मग जेव्हा युद्धाचा
शेवट होईल तेव्हा सर्व नष्ट होतात, मग ज्यांची जितकी बॅटरी चार्ज झालेली असेल
त्यानुसार पद प्राप्त करतील. सर्व आत्मे बाबांची संतान आहेत, बाबाच येऊन सर्वांची
बॅटरी चार्ज करवतात. कसा अद्भुत खेळ बनलेला आहे. बाबांसोबत योग लावण्यापासून घडोघडी
दूर होतात तर किती नुकसान होते. असा योग तुटू नये यासाठी पुरुषार्थ करून घेतला जातो.
पुरुषार्थ करता-करता जेव्हा समाप्ती होते तेव्हा मग नंबरवार पुरुषार्थानुसार तुमचा
पार्ट पूर्ण होतो. जसा कल्प-कल्प होतो. आत्म्यांची माळा बनत राहते. तुम्ही मुले
जाणता रुद्राक्षाची माळा आहे, विष्णूची देखील माळा आहे. पहिल्या क्रमांकावर तर
त्यांचीच माळा ठेवणार ना, बाबा दैवी दुनिया रचतात ना. जशी रुद्र माळा आहे, तशी रूंड
माळा आहे. ब्राह्मणांची माळा आत्ता बनू शकणार नाही, अदली-बदली होत राहील. जेव्हा
रूद्र माळा बनेल तेव्हा फायनल होतील. या ब्राह्मणांची देखील माळा आहे परंतु या वेळी
बनू शकत नाही. वास्तविक सर्व प्रजापिता ब्रह्माची मुले आहेत. शिवबाबांच्या मुलांची
देखील माळा आहे, विष्णूची देखील माळा म्हणू. तुम्ही ब्राह्मण बनता तर मग ब्रह्माची
आणि शिवची देखील माळा पाहिजे. हे सर्व ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये नंबरवार आहे.
ऐकतात तर सगळे परंतु त्या वेळी कोणाच्या कानातून निघून जाते, ऐकतच नाहीत. कोणी तर
अभ्यासच करत नाहीत, त्यांना माहीतच नाही - भगवान शिकविण्यासाठी आलेले आहेत. शिकतच
नाहीत, हे शिक्षण तर किती आनंदाने शिकले पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आठवणीच्या
यात्रेद्वारे आत्मारूपी बॅटरी चार्ज करून सतोप्रधान अवस्थेपर्यंत पोहोचायचे आहे. अशी
कोणतीही चूक करायची नाही, ज्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होईल.
२) मुरब्बी (अतिप्रिय)
मुलगा बनण्याकरिता बाबांसोबतच घरावर सुद्धा प्रेम करायचे आहे. ज्ञान आणि योगामध्ये
मस्त बनायचे आहे. बाबा जे समजावून सांगतात ते आपल्या भावांना देखील समजावून सांगायचे
आहे.
वरदान:-
एका बाबांनाच
आपला संसार बनवून सदैव एकाच्याच आकर्षणामध्ये राहणारे कर्मबंधन मुक्त भव
सदैव याच अनुभवामध्ये
रहा की, ‘एक बाबा दुसरा न कोई’, बस्स, एक बाबाच संसार आहेत इतर कोणतेही आकर्षण नाही,
कोणतेही कर्मबंधन नाही. स्वतःच्या कोणत्या कमजोर संस्काराचे देखील बंधन नसावे. जे
कोणावर ‘माझे’पणाचा अधिकार बाळगतात त्यांना राग अथवा अभिमान येतो - हे देखील
कर्मबंधन आहे, परंतु जेव्हा बाबाच माझा संसार आहेत, ही आठवण राहते तेव्हा सर्व
‘माझे-माझे’ एका बाबांमध्ये सामावून जाते आणि कर्मबंधनांमधून सहजपणे मुक्त होतात.
बोधवाक्य:-
महान आत्मा ती
आहे, जिची दृष्टी आणि वृत्ती बेहदची आहे.