07-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही स्वतःला संगमयुगी ब्राह्मण समजा तर सतयुगी झाड समोर दिसू लागेल
आणि अतिशय आनंदात रहाल”
प्रश्न:-
ज्या मुलांना
ज्ञानाची आवड आहे, त्यांची निशाणी काय असेल?
उत्तर:-
ते आपापसात ज्ञानाच्याच गोष्टी करतील. कधीही परचिंतन करणार नाहीत. एकांतामध्ये
विचार सागर मंथन करतील.
प्रश्न:-
या सृष्टी
ड्रामाचे कोणते रहस्य तुम्हा मुलांनाच समजते?
उत्तर:-
या सृष्टीमध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, फक्त एक शिवबाबां व्यतिरिक्त.
जुन्या दुनियेतील आत्म्यांना नवीन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी कोणीतरी हवेच, हे
देखील ड्रामाचे रहस्य तुम्हा मुलांनाच समजते.
ओम शांती।
रुहानी मुलांना पुरुषोत्तम संगमयुगावर येणारे पिता समजावून सांगत आहेत. हे तर
मुलांना समजते - आपण ब्राह्मण आहोत. स्वतःला ब्राह्मण समजता की हे देखील विसरून जाता?
ब्राह्मण आपले कुळ कधी विसरत नाहीत. तुम्ही देखील हे जरूर लक्षात ठेवले पाहिजे की,
आपण ब्राह्मण आहोत. ही गोष्ट लक्षात राहीली तरी देखील बेडा (जीवनरुपी नाव) पार होईल.
संगमयुगावर तुम्ही नवीन-नवीन गोष्टी ऐकता तर त्याचे चिंतन चालायला हवे, ज्याला
विचार सागर मंथन म्हटले जाते. तुम्ही आहात रूप-बसंत (ज्ञानस्वरूप होऊन ज्ञानाची
वर्षा करणारे). तुमच्या आत्म्यामध्ये संपूर्ण ज्ञान भरले जाते तर मग ज्ञान रत्नेच
निघाली पाहिजेत. स्वतःला नेहमी हेच समजायचे आहे की, आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत.
काहीजण तर असे समजत सुद्धा नाहीत. स्वतःला जर संगमयुगी समजाल तर सतयुगातील झाडे दिसू
लागतील आणि अपार आनंद सुद्धा वाटेल. बाबा जे समजावून सांगतात ते बुद्धीमध्ये फिरत
राहिले पाहिजे. आम्ही संगमयुगावर आहोत हे देखील तुमच्याव्यतिरिक्त इतर कोणालाच ठाऊक
नाही आहे. संगमयुगाच्या अभ्यासाला वेळ सुद्धा लागतो. हे एकच शिक्षण नरापासून नारायण,
नरकवासी पासून स्वर्गवासी बनण्यासाठी आहे. हे आठवणीत राहिले तरी सुद्धा आनंद राहील
- आपण सो देवता स्वर्गवासी बनत आहोत. संगमयुगवासी बनाल तेव्हाच तर स्वर्गवासी बनाल.
आधी नरकवासी होता तेव्हा अगदी घाणेरडी अवस्था होती, वाईट कामे करत होता. आता ते
संपवायचे आहे. मनुष्यापासून देवता स्वर्गवासी बनायचे आहे. कोणाची पत्नी मरते, तुम्ही
विचारा - तुमची पत्नी कुठे आहे? तर म्हणतील ती स्वर्गवासी झाली. स्वर्ग काय चीज आहे,
ते जाणत नाहीत. जर स्वर्गवासी झाली तर मग आनंद झाला पाहिजे ना. आता तुम्ही मुले या
गोष्टींना जाणता. मनामध्ये विचार चालायला हवे - आपण आता संगमावर आहोत, पावन बनत
आहोत. स्वर्गाचा वारसा बाबांकडून घेत आहोत. याचे वारंवार चिंतन करायचे आहे, विसरता
कामा नये. परंतु माया विसरायला लावून एकदम कलियुगी बनवून टाकते. कामेच अशी केली
जातात, जणू काही एकदम कलियुगी. तो असीम आनंद राहत नाही. चेहरा जसा मेल्यासारखा असतो.
बाबा देखील म्हणतात - सर्वजण काम चितेवर बसून जळून मरून पडले आहेत. तुम्ही जाणता
आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत तर तसा आनंद झाला पाहिजे ना म्हणूनच गायन देखील
आहे - अतिंद्रीय सुखाची अनुभूती गोप-गोपींना विचारा. तुम्ही आपल्या मनाला विचारा
की, आपण त्या अनुभूतीमध्ये राहतो? तुम्ही ईश्वरीय मिशन (मोहीम) आहात ना. ईश्वरीय
मोहीम कोणते काम करते? पहिले तर शूद्रापासून ब्राह्मण, ब्राह्मणा पासून देवता बनवते.
आपण ब्राह्मण आहोत - हे विसरता कामा नये. ते (दुनियेतील) ब्राह्मण तर लगेच म्हणतात
- आम्ही ब्राह्मण आहोत. ती तर आहे गर्भातून जन्मणारी संतान. तुम्ही आहात मुख वंशावळी.
तुम्हा ब्राह्मणांना खूप अभिमान वाटला पाहिजे. गायले देखील आहे - ‘ब्रह्मा भोजन…’
तुम्ही कोणाला ब्रह्मा भोजन खाऊ घालता तर किती आनंदीत होतात. समजतात - आम्ही पवित्र
ब्राह्मणांच्या हातचे खातो. मनसा-वाचा-कर्मणा पवित्र असायला हवे. कोणतेही अपवित्र
कर्म करायचे नाही. वेळ तर लागतोच, जन्मत:च काही कोणी बनत नाही. भले गायन आहे -
सेकंदामध्ये जीवनमुक्ती, बाबांची संतान बनला आणि वारसा मिळाला. एकदा जरी यांना
ओळखून म्हटले की, हे प्रजापिता ब्रह्मा आहेत. ब्रह्माचे पिता शिव आहेत. निश्चय
करताच वारसदार बनतो. मग जर कोणते अकर्तव्य (चुकीचे कर्म) कराल तर खूप सजा भोगावी
लागेल. जसे काशी कलवट विषयी समजावून सांगितले आहे. शिक्षा भोगूनच हिशोब चुकते होतात.
मुक्तीकरिताच विहिरीत उडी मारत होते. इथे तर ती गोष्ट नाहीये. शिवबाबा मुलांना
म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. किती सोपे आहे. तरी देखील मायेचा फेरा
येतोच हे तुमचे युद्ध सर्वात जास्त वेळ चालते. बाहूबळाचे युद्ध इतका वेळ चालत नाही.
तुम्ही तर जेव्हापासून आला आहात, युद्ध सुरूच आहे. जुन्यांसोबत किती युद्ध चालते,
नवीन जे येतील त्यांच्याशी देखील चालेल. त्या युद्धामध्ये देखील मृत्यू होत राहतात,
दुसरे येऊन सामील होत राहतात. इथे देखील मरतात (ज्ञानातून निघून जातात), वृद्धिला
देखील प्राप्त होतात. झाड मोठे तर होणारच आहे. बाबा गोड-गोड मुलांना समजावून सांगत
आहेत - हे लक्षात राहिले पाहिजे, ते पिता देखील आहेत, सुप्रीम टीचर सुद्धा आहेत,
सद्गुरु सुद्धा आहेत. श्रीकृष्णाला काही सद्गुरु, पिता, टीचर म्हणणार नाही.
तुम्हाला सर्वांचे
कल्याण करण्याची हौस असायला हवी. महारथी मुले सेवेसाठी तत्पर राहतात. त्यांना तर
खूप आनंद होत असतो. जिथून निमंत्रण मिळते, तिथे लगेच धावतात. प्रदर्शनी सेवा
कमिटीमध्ये देखील चांगली-चांगली मुले निवडली जातात. त्यांना डायरेक्शन मिळतात, सेवा
करत राहतील तर म्हणणार - ही ईश्वरीय मिशनमधील चांगली मुले आहेत. बाबा देखील खुश
होतील हे तर खूप चांगली सेवा करतात. आपल्या मनाला विचारले पाहिजे - मी सेवा करतो
का? म्हणतात - ऑन गॉड फादरली सर्व्हिस (ईश्वरीय सेवाधारी). गॉडफादरची सेवा कोणती आहे?
बस्स, सर्वांना हाच संदेश द्या- मनमनाभव. आदि-मध्य-अंताचे ज्ञान तर बुद्धीमध्ये
आहेच. तुमचे नावच आहे - स्वदर्शन चक्रधारी. तर मग त्याचे चिंतन चालत राहिले पाहिजे.
स्वदर्शन चक्र कधी थांबते थोडेच. तुम्ही चैतन्य लाईट हाऊस (दीपस्तंभ) आहात. तुमची
महिमा खूप गायली जाते. बेहदच्या बाबांचे गायन देखील तुम्ही समजता. ते ज्ञानाचे सागर
पतित-पावन आहेत, गीतेचे भगवान आहेत. तेच ज्ञान आणि योगबलाने हे कार्य करवून घेतात,
यामध्ये योगबळाचा खूप प्रभाव आहे. भारताचा प्राचीन योग खूप प्रसिद्ध आहे. तो तुम्ही
आता शिकत आहात. संन्यासी तर हठयोगी आहेत, ते काही पतितांना पावन बनवू शकत नाहीत.
ज्ञान आहेच मुळी एका बाबांकडे. ज्ञानाद्वारेच तुम्ही जन्म घेता. गीतेला तर माय-बाप
म्हटले जाते, माता-पिता आहे ना. तुम्ही शिवबाबांची मुले आहात, मग माता-पिता तर
पाहिजेत ना. मनुष्य भले गातात परंतु समजतात थोडेच. बाबा समजावून सांगतात - याचा
अर्थ किती गहन आहे. गॉड फादर म्हटले जाते, मग मात-पिता का म्हटले जाते? बाबांनी
समजावून सांगितले आहे - भले सरस्वती आहे परंतु वास्तविक खरीखुरी माता ब्रह्मपुत्रा
आहे. सागर आणि ब्रह्मपुत्रा आहे, सर्वप्रथम संगम यांचा होतो. बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मातनामध्ये)
प्रवेश करतात. या किती सूक्ष्म गोष्टी आहेत. अनेकांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी राहत
नाहीत की ज्याचे चिंतन करतील. अगदीच कमी बुद्धी आहे, कमी दर्जा प्राप्त करणारे आहेत.
त्यांच्यासाठी तरीही बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजा’. हे तर सोपे आहे ना. आम्हा
आत्म्यांचे पिता आहेत परमात्मा. ते तुम्हा आत्म्यांना म्हणतात - मामेकम् (मज एकाची)
आठवण करा तर विकर्म विनाश होतील. हीच आहे मुख्य गोष्ट. कमी बुद्धीवाले मोठ्या गोष्टी
समजू शकत नाहीत म्हणूनच गीतेमध्ये देखील आहे - मनमनाभव. सर्वजण लिहितात - ‘बाबा,
आठवणीची यात्रा खूप कठीण आहे. घडोघडी विसरून जातो. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर
पराभूत होतो’. हे बॉक्सिंग आहे - माया आणि ईश्वराच्या मुलांचे. या विषयी कोणालाच
माहिती नाही आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - मायेवर विजय प्राप्त करून
कर्मातीत अवस्थेमध्ये जायचे आहे. तुम्ही सर्वात पहिले आला आहात कर्म संबंधामध्ये.
त्यामध्ये येता-येता मग अर्ध्या कल्पानंतर तुम्ही कर्मबंधनामध्ये आला आहात. अगदी
सुरुवातीला तुम्ही पवित्र आत्मा होता. ना सुखाचे कर्मबंधन होते, ना दुःखाचे होते,
मग सुखाच्या संबंधामध्ये आलात. हे देखील आता तुम्हीच समजता - आम्ही संबंधामध्ये होतो,
आता दुःखामध्ये आहोत मग जरूर पुन्हा सुखामध्ये असू. जेव्हा नवीन दुनिया होती तेव्हा
मालक होतो, पवित्र होतो, आता जुन्या दुनियेमध्ये पतित होऊन गेलो आहोत. मग पुन्हा
आम्ही सो देवता बनतो, तर याची आठवण करावी लागेल ना.
बाबा म्हणतात - माझी
आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील, तुम्ही माझ्या घरी (परमधाममध्ये) याल. व्हाया
शांतीधाम सुखधाममध्ये जाल. सर्वात आधी तर घरी जायचे आहे, बाबा म्हणतात - ‘माझी आठवण
करा तर तुम्ही पवित्र बनाल, मी पतित-पावन तुम्हाला घरी परत येण्यासाठी पवित्र बनवत
आहे. अशा प्रकारे आपल्याशीच गोष्टी कराव्या लागतात. खरोखर, आता चक्र पूर्ण होत आहे,
आम्ही इतके जन्म घेतले आहेत. आता बाबा आले आहेत पतितापासून पावन बनविण्यासाठी.
योगबलानेच पावन बनाल. हे योगबळ खूप प्रसिद्ध आहे, जे फक्त बाबाच शिकवू शकतात.
यामध्ये कोणतीही शारीरिक कृती करण्याची आवश्यकता नाही. तर संपूर्ण दिवस याच
गोष्टींचे मंथन चालले पाहिजे. एकांतामध्ये कुठेही बसा किंवा जा, बुद्धीमध्ये हेच
फिरत राहिले पाहिजे. एकांत तर खूप आहे, छतावर तर घाबरण्याचा प्रश्नच नाही. पूर्वी
तुम्ही सकाळी मुरली ऐकल्यानंतर टेकड्यांवर जात होता. जे ऐकले त्याचे चिंतन
करण्यासाठी टेकड्यांवर जाऊन बसत होता. ज्यांना ज्ञानाची आवड असेल, ते तर आपसात
ज्ञानाच्या गोष्टीच करतील. ज्ञान नसेल तर मग परचिंतन करीत राहणार. प्रदर्शनीमध्ये
तुम्ही किती जणांना हा मार्ग सांगता. समजता आपला धर्म खूप सुख देणारा आहे. बाकीच्या
धर्मवाल्यांना फक्त इतकेच समजावून सांगायचे आहे की, बाबांची आठवण करा. असे समजायचे
नाही की हा मुसलमान आहे, मी अमका आहे. नाही, आत्म्याला पहायचे आहे, आत्म्याला
समजावून सांगायचे आहे. प्रदर्शनीमध्ये समजून सांगत असाल तर ही प्रॅक्टिस असावी -
आम्ही आत्मा भावाला समजून सांगत आहोत. आता आम्हाला बाबांकडून वारसा मिळत आहे.
स्वतःला आत्मा समजून भावांना ज्ञान देतो - आता चला बाबांकडे, खूप काळापासून
दुरावलेले आहात. ते आहे शांतीधाम, इथे तर किती दुःख, अशांती इत्यादी आहे. आता बाबा
म्हणतात - स्वतःला आत्मा समजण्याची सवय लावा तर नाव, रूप, देह सर्व विसरून जाल. अमका
मुसलमान आहे, असे का समजता? आत्मा समजून समजावून सांगा. तुम्ही समजू शकता की आत्मा
चांगली आहे की वाईट आहे. आत्म्याकरिताच म्हटले जाते - वाईट पासून दूर रहायला हवे.
आता तुम्ही बेहदच्या बाबांची मुले आहात. इथे पार्ट बजावलात आता परत जायचे आहे, पावन
बनायचे आहे. जरूर बाबांची आठवण करावी लागेल. पावन बनाल तर पावन दुनियेचे मालक बनाल.
तोंडी प्रतिज्ञा करायची असते. बाबा देखील म्हणतात प्रतिज्ञा करा. बाबा युक्ती देखील
सांगतात की, तुम्ही आत्मा भाऊ-भाऊ आहात मग शरीरामध्ये येता तेव्हा भाऊ-बहीण आहात.
भाऊ-बहीण कधीही विकारात जाऊ शकत नाहीत. पवित्र बनून आणि बाबांची आठवण केल्याने
तुम्ही विश्वाचे मालक बनाल. समजावून सांगितले आहे - मायेकडून हार खाल्ली तरी उठून
पुन्हा उभे रहा. जितके स्वतःला सावराल तितकी प्राप्ती होईल. नफा आणि तोटा तर असतो
ना. अर्धा कल्प नफा आणि मग रावण राज्यामध्ये तोटा होतो. हिशोब आहे ना. जीत म्हणजे
नफा, हार म्हणजे तोटा. तर स्वतःचे संपूर्ण निरीक्षण केले पाहिजे. बाबांची आठवण
केल्याने तुम्हा मुलांना आनंद होईल. ते (दुनियावाले) तर फक्त गायन करतात, समजत
काहीच नाहीत. सर्व काही अडाण्या प्रमाणे करतात. तुम्ही तर पूजा इत्यादी करत नाही.
बाकी गायन तर कराल ना. त्या एका बाबांचे अव्यभिचारी म्हणून गायन आहे. बाबा येऊन
तुम्हा मुलांना स्वतःच शिकवतात. तुम्हाला कोणते प्रश्न विचारण्याची गरजच नाही. फक्त
चक्र लक्षात राहिले पाहिजे. समजून घेतले पाहिजे की, कसे आपण मायेवर विजय प्राप्त
करतो आणि मग पुन्हा हरतो. बाबा समजावून सांगतात की, हार खाल्ल्याने १०० पटीने दंड
मिळेल. बाबा म्हणतात - सद्गुरूंची निंदा करू नका, नाहीतर ठौर (उच्च पद) मिळणार नाही.
ही सत्यनारायणाची कथा आहे, याला कोणीही जाणत नाहीत. गीता वेगळी, सत्यनारायणाची कथा
वेगळी केली आहे. नरा पासून नारायण बनण्यासाठी गीता आहे.
बाबा म्हणतात - मी
तुम्हाला नरा पासून नारायण बनण्याची कथा ऐकवतो, याला गीता देखील म्हणतात, अमरनाथची
कथा सुद्धा म्हणतात. तिसरा नेत्र बाबाच देतात. हे देखील जाणता आपण आता देवता बनत
आहोत तर गुण सुद्धा जरूर असायला हवेत. या सृष्टीमध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी
नाही आहे. सदा कायमस्वरूपी तर एक शिवबाबाच आहेत, बाकी सर्वांना तर खाली यायचेच आहे.
परंतु बाबा तर संगमावर येतात, सर्वांना परत घेऊन जातात. जुन्या दुनियेतील आत्म्यांना
नवीन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी कोणीतरी हवेच ना. तर ड्रामामध्ये ही सर्व रहस्ये
आहेत. बाबा येऊन पवित्र बनवतात, कुठल्याही देहधारीला ईश्वर म्हटले जाऊ शकत नाही.
बाबा समजावून सांगतात - या वेळी आत्म्याचे पंख तुटलेले आहेत त्यामुळे उडू शकत नाही.
बाबा येऊन ज्ञान आणि योगाचे पंख देतात. योगबलाने तुमची पापे भस्म होतील, पुण्य आत्मा
बनाल. सर्वात अगोदर तर मेहनत देखील केली पाहिजे, म्हणूनच बाबा म्हणतात - मामेकम् (मज
एकाची) आठवण करा, चार्ट ठेवा. ज्यांचा चार्ट चांगला असेल, ते लिहितील आणि त्यांना
आनंद सुद्धा होईल. आता सर्वजण मेहनत करतात, परंतु चार्ट लिहित नाही तर योगाची शक्ती
भरत नाही. चार्ट लिहिण्यामध्ये खूप फायदा आहे. चार्ट सोबतच पॉईंट्स देखील पाहिजेत.
चार्टमध्ये तर दोन्ही गोष्टी लिहाल - सेवा किती केली आणि आठवण किती केली? पुरुषार्थ
असा करायचा आहे की अंत समयी कोणतीही चीज आठवू नये. स्वतःला आत्मा समजून पुण्य आत्मा
बनायचे - हीच मेहनत करायची आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) कोणालाही
ज्ञान ऐकवताना बुद्धीमध्ये रहावे की, मी आत्मा भावाला ज्ञान देत आहे. नाव, रूप, देह
सर्व विसरून जा. पावन बनण्याची प्रतिज्ञा करून, पावन बनून, पावन दुनियेचा मालक
बनायचे आहे.
वरदान:-
स्वयंप्रति
इच्छा मात्रम् अविद्या बनून बाप समान अखंड दानी, परोपकारी भव जसे ब्रह्मा बाबांनी
स्वतःचा वेळ देखील सेवेसाठी दिला, स्वतः निर्मान बनून मुलांना मान दिला, कामाच्या
नावाच्या प्राप्तीचा देखील त्याग केला. नाम, मान, शान या सर्व गोष्टींमध्ये परोपकारी
बनले, स्वतः त्याग करून दुसऱ्यांचे नाव केले, स्वतः सदैव सेवाधारी म्हणून राहिले,
मुलांना मालक बनविले. स्वतःचे सुख मुलांच्या सुखामध्ये पाहिले. असे बाप समान इच्छा
मात्रम् अविद्या अर्थात मस्त फकीर बनून अखंड दानी परोपकारी बना तेव्हाच विश्व
कल्याणाच्या कार्याला तीव्र गती मिळेल. केस आणि किस्से (समस्या आणि परिस्थिती)
समाप्त होतील.
बोधवाक्य:-
ज्ञान गुण आणि
धारणा यामध्ये सिंधू (सागर) बना, स्मृतीमध्ये बिंदू बना.
आपल्या शक्तिशाली
मन्साद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
आता तुम्ही मुले
आपल्या श्रेष्ठ शक्तिशाली संकल्पा द्वारे सकाश द्या. कमजोर असणाऱ्यांना बळ द्या.
आपल्या पुरुषार्थाचा वेळ दुसऱ्यांना सहयोग देण्यासाठी सार्थकी लावा. दुसऱ्यांना
सहयोग देणे अर्थातच आपले जमा करणे. आता अशी लाट पसरवा - सुविधा घ्यायच्या नाहीत,
सुविधा द्यायच्या आहेत. देण्यामध्येच घेणे सामावलेले आहे.