07-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - कधीही लॉ (कायदा) आपल्या हातामध्ये घेऊ नका, जर कोणाकडून चूक झाली असेल
तर बाबांना रिपोर्ट द्या, बाबा सावधानी देतील”
प्रश्न:-
बाबांनी कोणते
कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे (ठेका घेतला आहे)?
उत्तर:-
मुलांमधील अवगुण काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका बाबांनीच घेतले आहे. मुलांमधील दोष बाबा
ऐकतात तर ते काढण्यासाठी प्रेमाने समजावून सांगतात. जर तुम्हा मुलांना कोणामध्ये
दोष दिसत असला तरी देखील तुम्ही लॉ आपल्या हातामध्ये घेऊ नका. लॉ हातामध्ये घेणे हे
देखील चुकीचे आहे.
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुले येतात बाबांकडे रिफ्रेश होण्यासाठी कारण मुले जाणतात - बेहदच्या
बाबांकडून बेहद विश्वाची बादशाही घ्यायची आहे. हे कधी विसरता कामा नये परंतु
विसरतात. माया विसरायला लावते. जर विसरायला झाले नाही तर खूप आनंदात राहतील. बाबा
समजावून सांगतात - मुलांनो, या बॅजला वारंवार बघत रहा. चित्रांकडे देखील बघत रहा.
हिंडता-फिरताना बॅजला बघत रहा तर माहित होईल, बाबांद्वारे बाबांच्या आठवणीने आपण असे
बनत आहोत. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. हीच वेळ आहे नॉलेज मिळण्याची. बाबा
म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो…’ रात्रंदिवस ‘गोड-गोड’ म्हणत राहतात. मुले म्हणू शकत
नाहीत - ‘गोड-गोड बाबा’. खरे तर या दोघांनाही (शिवबाबा आणि ब्रह्माबाबांना) म्हटले
पाहिजे. दोघेही गोड आहेत ना. बेहदचे बाप-दादा, परंतु कितीतरी देह-अभिमानी असणारे
फक्त बाबांनाच (शिवबाबांनाच) ‘गोड-गोड’ म्हणतात. बरीच मुले तर कधी रागात येऊन मग कधी
बापदादांना देखील काही-काही बोलतात. कधी बाबांना बोलतील तर कधी दादांना देखील
बोलतील, गोष्ट तर एकच होते ना. कधी ब्राह्मणीवर, कधी आपसामध्ये नाराज होतात. तर
बेहदचे बाबा बसून मुलांना शिकवतात. गावोगावची मुले तर पुष्कळ आहेत, सर्वांना लिहीत
राहतात. तुमचा रिपोर्ट येतो की, तुम्ही क्रोध करता. बेहदचे बाबा तर याला देह-अभिमान
म्हणतील. बाबा सर्वांना म्हणतात - मुलांनो, देही-अभिमानी भव. सर्व मुलांची स्थिती
वर-खाली होत राहते, यामध्ये देखील माया एखाद्याला समर्थ पैलवान असल्याचे बघते, तर
त्यांच्याशीच युद्ध करते. महावीर, हनुमान यांच्यासाठी दाखवले आहे की, त्यांना देखील
हलविण्याचा प्रयत्न केला. आता यावेळीच सर्वांची परीक्षा घेते. मायेकडून सर्वांची
हार-जीत होत राहते. युद्धामध्ये स्मृती-विस्मृती सर्व होते. जे जितके आठवणीमध्ये
राहतात, निरंतर बाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करतात ते चांगले पद मिळवू शकतात. बाबा
आले आहेत मुलांना शिकविण्याकरिता, ते तर शिकवत राहतात. श्रीमतावर चालत राहायचे आहे.
श्रीमतावर चालल्यानेच श्रेष्ठ बनाल, यामध्ये कोणावर नाराज होण्याचा प्रश्नच नाही.
नाराज होणे म्हणजे क्रोध करणे. चुका इत्यादी करतात तर बाबांकडे रिपोर्ट करायचा आहे.
स्वतः कोणालाही सांगायचे नाही, हे तर मग जसा काही लॉ हातात घेतला. गव्हर्मेंट लॉ (कायदा)
हातामध्ये घेऊ देत नाही. कोणी ठोसा मारला तर त्याला उलट ठोसा मारणार नाहीत. रिपोर्ट
करतील मग त्याच्यावर केस होईल. इथे देखील मुलांना कधीही समोरून काहीही बोलता कामा
नये, बाबांना सांगा. सर्वांना सावधानी देणारे एक बाबा आहेत. बाबा खूप गोड युक्ती
सांगतील. प्रेमाने शिकवण देतील. देह-अभिमानी बनल्यामुळे आपलेच पद कमी करून टाकतात.
तोटा का करून घेतला पाहिजे. जितके शक्य असेल तितके खूप प्रेमाने बाबांची आठवण करत
रहा. जे बाबा विश्वाची बादशाही देतात अशा बेहदच्या बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करत
रहा. फक्त दैवी गुण धारण करायचे आहेत. कोणाचीही निंदा करायची नाही. देवता कोणाची
निंदा करतात का? बरीच मुले तर निंदा केल्याशिवाय रहातच नाहीत. तुम्ही बाबांना सांगा
तर, बाबा खूप प्रेमाने समजावून सांगतील! नाही तर वेळ वाया जातो. निंदा करण्यापेक्षा
मग बाबांची आठवण करा तर खूप-खूप फायदा होईल. कोणाशीही वाद-विवाद न करणे खूप चांगले
आहे.
तुम्ही मुले
अंतःकरणापासून समजता - आपण नवीन दुनियेची बादशाही स्थापन करत आहोत. आतमध्ये केवढा
अभिमान असला पाहिजे. मुख्य आहेच आठवण आणि दैवी गुण. मुले चक्राची आठवण करतातच,
त्याची तर सहजच आठवण येईल. हे ८४ जन्मांचे चक्र आहे ना. तुम्हाला सृष्टीचा
आदि-मध्य-अंत, कालावधी यांच्या विषयी माहिती आहे, आणि मग इतरांना देखील खूप प्रेमाने
परिचय द्यायचा आहे. बेहदचे बाबा आपल्याला विश्वाचा मालक बनवत आहेत. राजयोग शिकवत
आहेत. विनाश देखील समोर उभा आहे. आहे देखील संगमयुग, जेव्हा नवीन दुनियेची स्थापना
होते आणि जुनी दुनिया नष्ट होते. बाबा मुलांना सावध करत राहतात - ‘सिमर-सिमर सुख
पाओ, कलह क्लेश मिटे सब तन के…’ अर्ध्याकल्पासाठी मिटतील. बाबा सुखधामची स्थापना
करतात. माया रावण मग दुःखधाम स्थापन करते. हे देखील तुम्ही मुले जाणता - नंबरवार
पुरुषार्था नुसार. बाबांचे मुलांवर किती प्रेम असते. सुरुवातीपासून बाबांचे प्रेम
आहे. बाबांना माहित आहे, मी जाणतो - मुले जी काम-चितेवर काळी झाली आहेत, त्यांना
गोरे बनविण्यासाठी जात आहे. बाबा तर नॉलेजफूल आहेत, मुले हळू-हळू नॉलेज घेतात. माया
मग विसरायला लावते. आनंद होऊ देत नाही. मुलांना दिवसेंदिवस आनंदाचा पारा चढत राहिला
पाहिजे. सतयुगामध्ये पारा चढलेला होता. आता परत चढवायचा आहे आठवणीच्या यात्रेद्वारे.
तो हळू-हळू चढेल. हार-जीत होता-होता मग नंबरवार पुरुषार्थानुसार कल्पापूर्वीप्रमाणे
आपले पद घेतील. बाकी वेळ तर तेवढाच लागतो जेवढा कल्प-कल्प लागतो. पास देखील तेच
होतील जे कल्प-कल्प होत असतील. बापदादा साक्षी होऊन मुलांच्या अवस्थेला बघतात आणि
स्पष्ट करून सांगत राहतात. बाहेर सेंटर्स इत्यादी ठिकाणी राहतात तर इतके रिफ्रेश
राहत नाहीत. सेंटरला जाऊन मग बाहेरच्या वायुमंडळामध्ये जातात, म्हणून इथे मुले
येतातच रिफ्रेश होण्यासाठी. बाबा लिहितात - परिवारासहित सर्वांना प्रेमपूर्वक आठवण
द्या. ते आहेत हदचे पिता, हे आहेत बेहदचे पिता. बाप आणि दादा दोघांचेही खूप प्रेम
आहे कारण कल्प-कल्प सुंदर सेवा करतात आणि खूप प्रेमाने करतात. आतून दया येते. नीट
शिकत नाहीत किंवा वर्तन चांगले नाही, श्रीमतावर चालत नाहीत तर दया येते की, हे कमी
दर्जाचे पद घेतील. बाबा तरी अजून काय करू शकतात! तिथे आणि इथे राहण्यामध्ये खूप फरक
आहे. परंतु सगळेच काही इथे राहू शकत नाहीत. मुलांची वृद्धी होत राहते. प्रबंध देखील
करत राहतात. हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे - हे आबू सर्वात महत्वाचे
श्रेष्ठ तीर्थ आहे. बाबा म्हणतात - मी इथेच येऊन साऱ्या सृष्टीला, पाच तत्वांसहित
सर्वांना पवित्र बनवतो. पुष्कळ सेवा आहे. एक बाबाच आहेत जे येऊन सर्वांची सद्गती
करतात. ती देखील अनेक वेळा केली आहे. हे जाणत असताना देखील पुन्हा विसरून जातात -
म्हणून बाबा म्हणतात - माया खूप शक्तिशाली आहे. अर्धा कल्प तिचे राज्य चालते. माया
पराभूत करते आणि मग बाबा तुम्हाला सावरून उभे करतात. खूप जण लिहितात - बाबा, मी
कोसळलो. अच्छा परत कोसळू नको. तरी देखील कोसळतात. कोसळतात मग वर चढणेच सोडून देतात.
किती मार लागतो. सर्वांना लागतो. सर्व काही आहे अभ्यास करण्यावर अवलंबून.
अभ्यासक्रमामध्ये योग आहेच. अमके मला हे शिकवत आहेत. आता तुम्ही समजता बाबा आम्हाला
शिकवत आहेत. इथे तुम्ही खूप रिफ्रेश होता. गायन देखील आहे - ‘निंदा हमारी जो करे
मित्र हमारा सो’. भगवानुवाच - माझी निंदा खूप करतात. मी येऊन मित्र बनतो. किती निंदा
करतात, मी तर असे समजतो ही तर सर्व माझी मुले आहेत. यांच्यावर केवढे प्रेम आहे.
निंदा करणे चांगले नाही. यावेळी तर खूप काळजी घेतली पाहिजे. भिन्न-भिन्न अवस्था
असणारी मुले आहेत, सगळेजण पुरुषार्थ तर करत राहतात. एखादी चूक जरी झाली तर
पुरुषार्थ करून अभूल (निर्दोष) बनायचे आहे. माया सर्वांना चुका करायला लावते.
बॉक्सिंग आहे ना. काहीवेळा तर असा मार बसतो जो एकदम खालीच पाडतो. बाबा सावधानी
देतात - मुलांनो, असे हरल्याने केलेली कमाई नष्ट होईल. पाचव्या मजल्यावरून कोसळतात.
म्हणतात - ‘बाबा, अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही. आता क्षमा करा’. बाबा काय क्षमा
करतील. बाबा तर म्हणतात - पुरुषार्थ करा. बाबा जाणतात माया खूप प्रबळ आहे. अनेकांना
पराभूत करेल. टीचरचे काम आहे झालेल्या चुकीसाठी शिकवण देऊन निर्दोष बनवणे. असे नाही
की कोणी चूक केली तर त्यांची ती चूक नेहमीच होत राहील. नाही, चांगल्या गुणांचे गायन
केले जाते. चुकांचे गायन केले जात नाही. अविनाशी वैद्य तर एक बाबाच आहेत. ते औषध
देतील. तुम्ही मुले स्वतःच्या हातामध्ये लॉ का घेता. ज्याच्यामध्ये क्रोधाचा अंश
असेल ते निंदाच करत राहतील. त्यांना सुधारणे बाबांचे काम आहे, तुम्ही सुधारणारे
थोडेच आहात. कोणामध्ये क्रोधाचे भूत आहे. स्वतः बसून कोणाची निंदा करतात तर जणू
आपल्या हातामध्ये लॉ घेतला, याने ते सुधारणार नाहीत. आणखीनच वाद होतील. लून-पाणी (खारे-पाणी)
होतील. सर्व मुलांसाठी एक बाबा बसलेले आहेत. लॉ आपल्या हातात घेऊन कोणाची निंदा करणे,
ही सर्वात मोठी चूक आहे. काही ना काही दोष तर सर्वांमध्येच असतो. सर्व संपूर्ण तर
बनले नाही आहेत. कोणामध्ये कोणते अवगुण आहेत, कोणामध्ये कोणते. ते सर्व काढण्याचे
कॉन्ट्रॅक्ट बाबांनी घेतले आहे. हे तुमचे काम नाही. मुलांच्या कमजोरी बाबा ऐकतात तर
त्या काढून टाकण्यासाठी प्रेमाने समजावून सांगितले जाते. अजूनपर्यंत कोणीही संपूर्ण
बनलेला नाहीये. सर्व श्रीमतावर सुधारत आहेत. संपूर्ण तर अंताला बनायचे आहे. यावेळी
सर्वजण पुरुषार्थी आहेत. बाबा सदैव अडोल (निश्चल) राहतात. मुलांना प्रेमाने शिकवण
देत राहतात. शिकवण देणे बाबांचे काम आहे. मग त्यावर चालणे न चालणे, हे झाले त्याचे
भाग्य. किती कमी पद होऊन जाते. श्रीमतावर न चालल्यामुळे काहीही असे केल्याने पद
भ्रष्ट होईल. मन आत खात राहील - आपण ही चूक केली आहे, आता आपल्याला खूप मेहनत करावी
लागेल. कोणाचाही अवगुण असेल तर तो बाबांना सांगायचा आहे. प्रत्येकाला ऐकवणे हा
देह-अभिमान आहे. बाबांची आठवण करत नाहीत. अव्यभिचारी बनले पाहिजे ना. एकाला ऐकवले
तर तो लगेच सुधारेल. सुधारणारे एक बाबाच आहेत.
बाकी तर सर्व आहेत न
सुधारलेले (बिघडलेले). परंतु माया अशी आहे की, तोंडच फिरवून टाकते. बाबा तुमचे तोंड
या एका बाजूला करतात आणि माया मग फिरवून आपल्या दिशेने करते. बाबा आलेच आहेत
सुधारून मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता. बाकी जिथे-तिथे कोणाचे नाव बदनाम करणे
हे नियमबाह्य आहे. तुम्ही शिवबाबांची आठवण करा. जजमेंट (निर्णय) देण्याचा अधिकार
देखील त्यांच्याकडे असतो ना. कर्मांचे फळ देखील बाबा देतात. भले ड्रामामध्ये आहे
परंतु कोणाचे नाव तर घेतले जाते ना. बाबा तर मुलांना सर्व गोष्टी समजावून सांगत
राहतात. तुम्ही किती भाग्यवान आहात किती पाहुणे येतात. ज्यांच्याकडे खूप पाहुणे
येतात, ते आनंदीत होतात ना. ही मुले देखील आहेत, तर पाहुणे देखील आहेत. टीचरच्या
बुद्धीमध्ये तर हेच असते की, आपण मुलांना यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न बनवावे. हे
कॉन्ट्रॅक्ट (ठेका) ड्रामा प्लॅननुसार बाबांनी घेतला आहे. मुलांनी कधीही मुरली
चुकवता कामा नये. मुरलीचेच तर गायन आहे ना - एकही मुरली चुकवली तर जणू काही
शाळेमध्ये गैरहजेरी लागली. ही आहे बेहदच्या बाबांची शाळा, इथे तर एकही दिवस चुकवता
कामा नये. बाबा येऊन शिकवतात, दुनियेमध्ये कोणाला समजते थोडेच आहे. स्वर्गाची
स्थापना कशी होते, हे देखील कोणी जाणत नाही. तुम्ही सर्व काही जाणता. हे शिक्षण
खूप-खूप अथाह कमाई करून देणारे आहे. जन्म-जन्मांतरासाठी या शिक्षणाचे फळ मिळते.
विनाशाचा सर्व संबंध तुमच्या या शिक्षणाशी आहे. तुमचे शिक्षण पूर्ण होईल आणि हे
युद्ध सुरू होईल. शिकता-शिकता बाबांची आठवण करता-करता जेव्हा सर्व मार्क्स मिळतात,
परीक्षा होते तेव्हा युद्ध सुरू होते. तुमचे शिक्षण पूर्ण झाले की मग युद्ध सुरू
होईल. हे नवीन दुनियेसाठी एकदम नवीन ज्ञान आहे म्हणून बिचारी माणसे गोंधळून जातात.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणाचाही
अवगुण पाहून त्याची निंदा करायची नाही. जिथे-तिथे त्याचे अवगुण सांगत फिरायचे नाही.
आपला गोडवा सोडायचा नाही. चिडून कोणाशीही सामना (विरोध) करायचा नाही.
२) सर्वांना सुधारणारे
एक बाबा आहेत, त्यामुळे एका बाबांनाच सर्व सांगायचे आहे, अव्यभिचारी बनायचे आहे.
मुरली कधीही चुकवायची नाही.
वरदान:-
सदैव सोबत
असल्याची स्मृती आणि साक्षी स्टेजचा अनुभव करणारे शिवमयी शक्ती स्वरूप कंबाइंड भव
जसे आत्मा आणि शरीर
दोन्ही एकत्र सोबत आहेत, जोपर्यंत या सृष्टीवर पार्ट आहे तोपर्यंत वेगळे होऊ शकत
नाहीत, अगदी असेच शिव आणि शक्ती दोघांचाही इतका गहिरा संबंध आहे. जे सदैव शिवमयी
शक्ती स्वरूपामध्ये स्थित होऊन चालतात तर त्याच्या लगनमध्ये (निष्ठेमध्ये) माया
विघ्न आणू शकत नाही. ते सदैव सोबत असल्याचा आणि साक्षी स्टेजचा अनुभव करतात. असा
अनुभव होतो जणू काही कोणी साकारमध्ये सोबत आहे.
बोधवाक्य:-
निर्विध्न आणि
एकरस स्थितीचा अनुभव करण्यासाठी एकाग्रतेचा अभ्यास करा.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. अव्यक्त
वर्तमान समयी - ‘मी टीचर आहे’, ‘मी स्टुडंट आहे’, ‘मी सेवाभावी आहे’ असे समजण्याऐवजी
अमृतवेलेपासून हा अभ्यास करा की, ‘मी श्रेष्ठ आत्मा, या जुन्या दुनियेमध्ये, जुन्या
शरीरामध्ये सेवा करण्याकरिता वरून आले आहे. ‘मी आत्मा आहे’, हा पाठ आता अजून पक्का
करा. ‘मी सेवाधारी आहे’, हा पाठ पक्का आहे परंतु ‘मी आत्मा सेवाधारी आहे’ हा पाठ
पक्का करा तर जीवनमुक्त बनाल.