07-02-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“
गोड - मुलांनो तुम्हाला चालता-फिरता आठवणीमध्ये रहाण्याचा अभ्यास करायचा आहे. ज्ञान
आणि योग याच दोन मुख्य गोष्टी आहेत, योग अर्थात आठवण”
प्रश्न:-
हुशार मुले
कोणते शब्द मुखावाटे बोलणार नाहीत?
उत्तर:-
‘आम्हाला योग शिकवा’, हे शब्द हुशार मुले बोलणार नाहीत. बाबांची आठवण करायला शिकायचे
असते काय! ही पाठशाळा आहे शिकण्यासाठी आणि शिकविण्यासाठी. असे नाही, आठवण करण्यासाठी
काही खास बसायचे आहे. तुम्हाला कर्म करत असताना बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करायचा
आहे.
ओम शांती।
आता रुहानी बाबा (आत्मिक पिता) बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. मुले
जाणतात रुहानी बाबा या रथाद्वारे आम्हाला समजावून सांगत आहेत. आता जेव्हा की मुले
आहेत तर बाबांना किंवा कोणत्या बहिणीला किंवा भावाला सांगायचे की, मला बाबांची आठवण
करायला शिकवा, हे चुकीचे आहे. तुम्ही काही लहान मुली तर नाही आहात ना. हे तर जाणता
मुख्य आहे रूह (आत्मा). ती तर अविनाशी आहे. शरीर आहे विनाशी. महान तर आत्मा झाली
ना. अज्ञान काळामध्ये कोणालाच हे ज्ञान असत नाही की आपण आत्मा आहोत, शरीराद्वारे
बोलतो. देह-अभिमानामध्ये येऊनच बोलतात की, मी हे करतो. आता तुम्ही देही-अभिमानी बनले
आहात. जाणता आत्मा म्हणते मी या शरीरा द्वारे बोलते, कर्म करते. आत्मा पुरुष आहे.
बाबा समजावून सांगत आहेत - हे बोलणे जास्त करून ऐकण्यात येते, म्हणतात - आम्हाला
योगामध्ये बसवा. समोर एक बसतात या विचाराने की आपणही बाबांच्या आठवणीमध्ये बसावे,
हे देखील बसतील. आता पाठशाळा काही यासाठी नाही आहे. पाठशाळा तर शिकण्याकरिता आहे.
बाकी असे नाही, इथे बसून तुम्हाला फक्त आठवण करायची आहे. बाबांनी तर सांगितले आहे
चालता-फिरता, उठता-बसता, बाबांची आठवण करा, यासाठी खास बसण्याची देखील गरज नाही. जसे
कोणी म्हणतात राम-राम म्हणा, काय राम-राम म्हटल्या शिवाय आठवण करू शकत नाही? आठवण
तर चालता-फिरता करू शकता. तुम्हाला तर कर्म करत असताना बाबांची आठवण करायची आहे.
आशिक-माशुक काही खास बसून एकमेकांची आठवण करत नाहीत. कामकाज, धंदा इत्यादी सर्व
करायचे आहे, सर्व काही करत आपल्या माशुकची आठवण करत रहा. असे नाही की त्यांची आठवण
करण्यासाठी खास कुठे जाऊन बसायचे आहे.
तुम्ही मुले गाणे
किंवा कविता इत्यादी ऐकवता, तर बाबा म्हणतात - ही भक्तिमार्गाची आहेत. म्हणतात
देखील शांती देवा, ते तर परमात्म्याचीच आठवण करतात, ना की श्रीकृष्णाची. ड्रामा
अनुसार आत्मा अशांत होते तेव्हा बाबांना बोलावते कारण शांती, सुख, ज्ञानाचा सागर
तेच आहेत. ज्ञान आणि योग मुख्य दोन गोष्टी आहेत. योग अर्थात आठवण. त्यांचा हठयोग
एकदमच वेगळा आहे. तुमचा आहे राजयोग. फक्त बाबांची आठवण करायची आहे. बाबांद्वारे
तुम्ही बाबांना जाणल्याने सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. तुम्हाला तर
सर्वात मोठा आनंद हाच आहे की आपल्याला भगवान शिकवत आहेत. सर्वप्रथम भगवंताचा देखील
पूर्ण परिचय असायला हवा. हे तर कधीच समजले नाही की जशी आत्मा स्टार आहे, तसेच भगवान
देखील स्टार आहेत. ते देखील आत्मा आहेत. परंतु त्यांना परम आत्मा, सुप्रीम सोल
म्हटले जाते. ते कधी पुनर्जन्म तर घेत नाहीत. असे नाही की ते जन्म-मरणामध्ये येतात.
नाही, पुनर्जन्म घेत नाहीत. स्वतः येऊन समजावून सांगतात की, मी कसा येतो?
त्रिमूर्तीचे गायन देखील भारतामध्येच आहे. त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, शंकराचे
चित्र देखील दाखवतात. शिव परमात्माए नमः म्हणतात ना. त्या उच्च ते उच्च बाबांना
विसरले आहेत, फक्त त्रिमूर्तीचे चित्र राहिले आहे. वरती शिव तर जरूर असायला हवा,
ज्याद्वारे हे समजतील की यांचे रचयिता शिव आहेत. रचने कडून कधी वारसा मिळू शकत नाही.
तुम्ही जाणता ब्रह्मा द्वारे काहीच वारसा मिळत नाही. विष्णूला तर हिरे-माणकांचा
मुकुट आहे ना. शिवबाबांद्वारे पुन्हा पेनी पासून पाउंड (कवडी पासून हिरेतुल्य) बनले
आहेत. शिवाचे चित्र नसल्यामुळे सारे खंडन होते. उच्च ते उच्च आहेत परमपिता परमात्मा,
त्यांची ही रचना आहे. आता तुम्हा मुलांना बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळतो, २१
जन्मासाठी. भले तरीही तिथे समजतात की, लौकिक पित्याकडून वारसा मिळाला आहे. तिथे हे
माहीत नसते की, हे तर बेहदच्या बाबांकडून प्राप्त झालेले प्रारब्ध आहे. हे तुम्हाला
आता माहित आहे. आताची कमाई तिथे २१ जन्म चालते. तिथे हे माहीतही नसते, या
ज्ञानाविषयी तर अजिबात माहिती नसते. हे ज्ञान ना देवतांना असते, ना शूद्रांना असते.
हे ज्ञान आहेच तुम्हा ब्राह्मणांना. हे आहे रूहानी ज्ञान, स्पिरिच्युअलचा अर्थ
सुद्धा जाणत नाहीत. डॉक्टर ऑफ फिलासॉफी म्हणतात. डॉक्टर ऑफ स्पिरिच्युअल नॉलेज एक
पिताच आहेत. बाबांना सर्जन देखील म्हटले जाते ना. साधू-संन्यासी इत्यादी काही सर्जन
थोडेच आहेत. वेद-शास्त्र इत्यादी वाचणाऱ्यांना डॉक्टर थोडेच म्हणता येईल. भले उपाधी
सुद्धा देतात परंतु वास्तवामध्ये रूहानी सर्जन एक बाबाच आहेत, जे आत्म्याला
इंजेक्शन देतात. ती आहे भक्ती. त्यांना म्हटले पाहिजे - ‘डॉक्टर ऑफ भक्ती’ किंवा
शास्त्रांचे ज्ञान देतात. त्याद्वारे काहीच फायदा होत नाही, अजूनच खाली घसरतच जातात
(अधोगती होते). तर त्यांना डॉक्टर कसे म्हणता येईल? डॉक्टर तर फायदा करून देतात ना.
हे बाबा तर आहेत अविनाशी ज्ञान सर्जन. योगबळाद्वारे तुम्ही एव्हर हेल्दी बनता. हे
तर तुम्ही मुलेच जाणता, बाहेरचे काय जाणतील. त्यांना अविनाशी सर्जन म्हटले जाते.
आत्म्यामध्ये जी विकारांची भेसळ पडली आहे, त्याला काढणे, पतिताला पावन बनवून सद्गती
देणे - ही ताकद बाबांमध्येच आहे. ऑलमाइटी पतित-पावन एक बाबाच आहेत. ऑलमाइटी ऑथॉरिटी
काही मनुष्याला म्हणू शकत नाही. तर बाबा कोणती शक्ती दाखवतात? सर्वांना आपल्या
शक्तीने सद्गती देतात. त्यांना म्हणणार डॉक्टर ऑफ स्पिरिच्युअल नॉलेज. डॉक्टर ऑफ
फिलॉसॉफी ते तर खंडीभर मनुष्य आहेत. स्पिरिच्युअल डॉक्टर तर एकच आहेत. तर आता बाबा
म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा आणि पवित्र बना. मी आलोच आहे
पवित्र दुनिया स्थापन करण्यासाठी, मग तुम्ही पतित का बनता? पावन बना, पतित बनू नका’.
सर्व आत्म्यांना बाबांचे डायरेक्शन आहे - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना
कमलपुष्प समान पवित्र रहा. बाल ब्रह्मचारी बना म्हणजे मग पवित्र दुनियेचे मालक बनाल.
इतके जन्म जी पापे केली आहेत, आता माझी आठवण केल्याने पापे भस्म होतील. मूलवतनमध्ये
पवित्र आत्मेच राहतात. पतित कोणीही जाऊ शकत नाही. बुद्धीमध्ये हे तर लक्षात
ठेवायचेच आहे की, आम्हाला बाबा शिकवत आहेत. स्टुडंट असे कधी म्हणतील का की आम्हाला
टीचरची आठवण करायला शिकवा. आठवण करायला शिकवण्याची काय गरज आहे. इथे (संदलीवर)
कोणीही बसले नाही तरी देखील काही हरकत नाही. आपल्या बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही
संपूर्ण दिवस काम-धंदा इत्यादीमध्ये राहता तर विसरून जाता, म्हणून इथे बसवले जाते
की, यांनी निदान १०-१५ मिनिटे तरी आठवण करावी. तुम्हा मुलांना तर कामकाज करत असताना
आठवणीमध्ये राहण्याची सवय लावायची आहे. अर्ध्या कल्पानंतर माशुक भेटतो. आता बाबा
म्हणतात - ‘माझी आठवण कराल तर तुमच्या आत्म्यातून भेसळ निघून जाईल आणि तुम्ही
विश्वाचे मालक बनाल. तर का नाही आठवण करायची. पत्नीची जेव्हा लग्न गाठ बांधतात
तेव्हा तिला म्हणतात - पती तुझा गुरु ईश्वर सर्व काही आहे. परंतु ती तर तरीही मित्र,
नातलग, गुरु इत्यादी अनेकांची आठवण करते. ती तर देहधारीची आठवण झाली ना. हे तर
पतींचेही पती आहेत, त्यांची आठवण करायची आहे. कोणी म्हणतात आम्हाला नेष्ठा मध्ये (योगामध्ये)
बसवा. परंतु त्याने काय होणार. १० मिनिटे इथे बसतात तरी देखील असे समजू नका की कोणी
एकरस होऊन बसतात. भक्तिमार्गामध्ये कोणाची पूजा करण्यासाठी बसतात तर बुद्धी खूप
भटकत राहते. नवधा भक्ती करणाऱ्यांना हाच ध्यास लागून राहिलेला असतो की आपल्याला
साक्षात्कार व्हावा. अशी आशा बाळगून बसून राहतात. एकाच्या प्रेमामध्ये एकरूप होतात,
तेव्हा साक्षात्कार होतो. त्यांना म्हटले जाते नवधा भक्त. ती भक्ती अशी आहे जणूकाही
आशिक-माशुक. खाता-पिता डोक्यात तीच आठवण राहते. त्यांच्यामध्ये विकाराची गोष्ट नसते,
शरीरावर प्रेम होते. एकमेकांना पाहिल्या शिवाय राहू शकत नाहीत.
आता तुम्हा मुलांना
बाबांनी समजावून सांगितले आहे - माझी आठवण केल्याने तुमची विकर्मे विनाश होतील. कसे
तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत. बीजाची आठवण केल्याने संपूर्ण झाडाची आठवण होते. हे
व्हरायटी धर्मांचे झाड आहे ना. हे फक्त तुमच्याच बुद्धीमध्ये आहे की, भारत गोल्डन
एजमध्ये होता, आता आयरन एजमध्ये आहे. हे इंग्रजी शब्द चांगले आहेत, यांचा अर्थ
चांगला आहे. आत्मा सच्चे सोने बनते आणि नंतर मग त्यामध्ये भेसळ पडते. आता आत्मा
एकदम खोटी बनली आहे, याला म्हटले जाते आयरन एजेड. आत्मे आयरन एजेड झाल्याने दागिना
(शरीर) देखील असाच झाला आहे. आता बाबा म्हणतात मी पतित-पावन आहे. मामेकम् (मज एकाची
आठवण करा. तुम्ही मला बोलावता की, ‘हे पतित-पावन या’. मी कल्प-कल्प येऊन तुम्हाला
ही युक्ती सांगतो. मनमनाभव, मध्याजी भव अर्थात स्वर्गाचे मालक बना. कोणी म्हणतात
आम्हाला योगामध्ये खूप मजा येते, ज्ञानामध्ये इतकी मजा येत नाही. बस्स, योग करून असे
पळून जातील. योगच आवडतो, म्हणतात - आम्हाला तर शांती पाहिजे. ठीक आहे, बाबांची तर
कुठेही बसून आठवण करा. आठवण करता-करता तुम्ही शांतीधाम मध्ये निघून जाल. यामध्ये
योग शिकवण्याचा प्रश्नच नाही. बाबांची आठवण करायची आहे. असे बरेच आहेत जे सेंटरवर
जाऊन अर्धा-पाऊण तास बसतात, म्हणतात आम्हाला नेष्ठा करवा (आमच्याकडून योग करून घ्या);
नाही तर म्हणतील - बाबांनी योग करण्याचा प्रोग्राम दिला आहे. इथे बाबा म्हणतात
चालता-फिरता आठवणीमध्ये रहा. काहीच नसण्यापेक्षा तर बसणे चांगले आहे. बाबा मनाई करत
नाहीत, भले रात्रभर बसा, परंतु अशी सवय थोडीच लावायची आहे की बस्स फक्त रात्रीचीच
आठवण करायची आहे. अशी सवय लावायची आहे की, काम-काज करत असताना आठवण करायची आहे.
यामध्ये खूप मेहनत आहे. बुद्धी वारंवार दुसरीकडेच पळते. भक्ती मार्गामध्ये देखील
बुद्धी पळते आणि मग स्वतःला चिमटा काढतात. खरे भक्त जे असतात त्यांच्या विषयी
बोलतात. तर इथे देखील स्वतःशी अशा प्रकारे गोष्टी केल्या पाहिजेत. बाबांची का नाही
आठवण केली? आठवण केली नाहीत तर विश्वाचे मालक कसे बनाल? आशिक-माशुक तर
नावा-रूपामध्ये अडकून राहतात. इथे तर तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करता.
मी आत्मा या शरीरा पासून वेगळी आहे. शरीरामध्ये आल्याने कर्म करावे लागते. बरेचजण
असे देखील आहेत जे म्हणतात आम्हाला साक्षात्कार घडावा. आता साक्षात्कार कसला करणार.
ते तर बिंदू आहेत ना. अच्छा, कोणी म्हणतात श्रीकृष्णाचा साक्षात्कार व्हावा.
श्रीकृष्णाचे तर चित्र देखील आहे ना. जो जड आहे त्याला मग चैतन्य मध्ये बघतील याने
काही फायदा झाला? साक्षात्काराने थोडाच फायदा होईल. तुम्ही बाबांची आठवण करा तर
आत्मा पवित्र होईल. नारायणाचा साक्षात्कार झाल्याने नारायण थोडेच बनाल.
तुम्ही जाणता आपले एम
ऑब्जेक्ट आहेच लक्ष्मी-नारायण बनण्याचे, परंतु शिकल्याशिवाय थोडेच बनणार. शिकून
हुशार बना, प्रजा देखील बनवा तेव्हाच लक्ष्मी-नारायण बनाल. मेहनत आहे. पास विथ ऑनर
झाले पाहिजे जेणेकरून धर्मराजाकडून सजा होऊ नये. हा मुरब्बी बच्चा (ब्रह्मा) देखील
सोबत आहे, हे देखील म्हणतात तुम्ही वेगाने पुढे जाऊ शकता. बाबांवर (ब्रह्मा बाबांवर)
किती जबाबदाऱ्यांचे ओझे आहे. संपूर्ण दिवस किती विचार करावे लागतात. मी इतकी आठवण
करू शकत नाही. भोजन करत असताना थोडी आठवण राहते मग विसरून जातो. समजतो, बाबा आणि मी
दोघे फिरायला जात आहोत. फेरी मारता-मारता बाबांना विसरून जातो. निसटणारी वस्तू आहे
ना. वेळो-वेळी आठवण निसटून जाते. यामध्ये खूप मेहनत आहे. आठवणीनेच आत्मा पवित्र
होणार आहे. अनेकांना शिकवाल तर उच्च पद प्राप्त कराल. ज्यांना चांगले समजते ते
चांगले पद प्राप्त करतात. प्रदर्शनीमध्ये किती प्रजा बनते. तुम्ही एक-एक जण लाखोंची
सेवा कराल आणि मग स्वतःची देखील अवस्था अशी पाहिजे. कर्मातीत अवस्था होईल मग तर
शरीर राहणार नाही. पुढे चालून तुम्हाला समजेल आता जोरदार युद्ध सुरू होईल, मग
पुष्कळजण तुमच्याकडे येत राहतील. महिमा वाढत जाईल. शेवटी संन्यासी देखील येतील.
बाबांची आठवण करू लागतील. त्यांचा पार्टच आहे मुक्तिधाम मध्ये जाण्याचा. नॉलेज तर
काही घेणार नाहीत. तुमचा मेसेज सर्व आत्म्यापर्यंत पोहोचणार आहे,
वर्तमानपत्रांद्वारे खूप लोक ऐकतील. किती गावे आहेत, सर्वांना संदेश द्यायचा आहे.
मेसेंजर पैगंबर तुम्हीच आहात. पतिता पासून पावन बनविणारे बाबांव्यतिरिक्त दुसरे
कोणीही नाही. असे नाही की धर्म स्थापक कोणाला पावन बनवतात. त्यांचा धर्म तर वृद्धीला
प्राप्त होणारच आहे, मग ते परत जाण्याचा रस्ता कसा सांगतील? सर्वांचा सद्गती दाता
तर एकच आहे. तुम्हा मुलांना आता पवित्र जरूर बनायचे आहे. असे खूप आहेत जे पवित्र
राहत नाहीत. काम महाशत्रू आहे ना. चांगली-चांगली मुले घसरतात (अधोगती होते), कु-दृष्टी
असणे हा देखील काम विकाराचा अंश आहे. हे खूप मोठे भूत आहे. बाबा म्हणतात - यावर
विजय प्राप्त करा तर जगतजीत बनाल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कामकाज करत
असताना आठवणीमध्ये राहण्याची सवय लावायची आहे. बाबांसोबत जाण्यासाठी आणि पावन नवीन
दुनियेचा मालक बनण्याकरिता पवित्र जरूर बनायचे आहे.
२) उच्च पद प्राप्त
करण्यासाठी अनेकांची सेवा करायची आहे. अनेकांना शिकवायचे आहे. मेसेंजर बनून हा
मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे.
वरदान:-
स्नेहाच्या
कुशीमध्ये आंतरिक सुख आणि सर्व शक्तींचा अनुभव करणारे यथार्थ पुरुषार्थी भव
जे यथार्थ पुरुषार्थी
आहेत त्यांना कधीही मेहनत केल्याची अथवा थकवा आल्याची जाणीव होत नाही, कायम
प्रेमामध्ये मश्गूल असतात. ते संकल्पाने देखील सरेंडर असल्या कारणाने असेच अनुभव
करतात की, आम्हाला बापदादा चालवत आहेत, मेहनतीच्या पावलाने नाही परंतु स्नेहाच्या
कुशीमध्ये चालत आहोत, स्नेहाच्या कुशीमध्ये सर्व प्राप्तींची अनुभूती झाल्या कारणाने
ते चालत नाहीत परंतु नेहमी आनंदामध्ये, आंतरिक सुखामध्ये, सर्व शक्तींच्या
अनुभवामध्ये उडत राहतात.
बोधवाक्य:-
निश्चय रूपी
फाउंडेशन पक्के असेल तर श्रेष्ठ जीवनाचा अनुभव आपोआप होतो.
अव्यक्त इशारे -
एकांत प्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-
‘अनेकतेमध्ये एकता’
आणि इथे प्रॅक्टिकल मध्ये अनेक देश, अनेक भाषा, अनेक रूप-रंग आहेत परंतु अनेकतेमध्ये
देखील सर्वांच्या हृदयामध्ये एकता आहे ना! कारण हृदयामध्ये एक बाबा आहेत. एका
श्रीमतावर चालणारे आहात. अनेक भाषांचे असताना देखील मनाचे गीत, मनाची भाषा एक आहे.