07-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हा अनादि अविनाशी पूर्व नियोजित ड्रामा आहे, यामध्ये जो सीन होऊन गेला, तो मग पुन्हा कल्पा नंतरच रिपीट होईल, त्यामुळे सदैव निश्चिंत रहा”

प्रश्न:-
ही दुनिया तिच्या तमोप्रधान स्टेजवर पोहोचली आहे, त्याची लक्षणे कोणती आहेत?

उत्तर:-
दिवसेंदिवस उपद्रव होत राहतात, किती भांडण-तंटे होत आहेत. चोर कसे मार-झोड करून लुटून घेऊन जातात. ऋतू नसतानाही पाऊस पडत राहतो. किती नुकसान होते. ही सर्व तमोप्रधानतेची चिन्हे आहेत. तमोप्रधान प्रकृती दुःख देत राहते. तुम्ही मुले ड्रामाच्या रहस्याला जाणता म्हणून म्हणता - नथिंग न्यु.

ओम शांती।
आता तुम्हा मुलांवर ज्ञानाची वर्षा होत आहे. तुम्ही आहात संगमयुगी आणि बाकी जे काही मनुष्य आहेत ते सर्व आहेत कलियुगी. यावेळी दुनियेमध्ये अनेक मत-मतांतरे आहेत. तुम्हा मुलांचे तर आहे एक मत. जे एक मत भगवंताचेच मिळते. ते लोक भक्ती मार्गामध्ये जप-तप-तीर्थ इत्यादी जे काही करतात ते समजतात हे सर्व मार्ग भगवंताला भेटण्याचे आहेत. म्हणतात भक्ती नंतरच भगवान भेटतील. परंतु त्यांना हे माहीतच नाहीये की भक्ति केव्हा सुरू होते आणि कधीपर्यंत चालते. फक्त म्हणतात भक्ती केल्याने भगवान भेटेल; म्हणून अनेक प्रकारची भक्ती करत आले आहेत. हे देखील स्वतः समजतात की आपण परंपरेने भक्ती करत आलो आहोत. एक दिवस भगवान जरूर मिळेल. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भगवान मिळेल. मग ते काय करतील? जरूर सद्गती देतील कारण ते आहेतच सर्वांचे सद्गती दाता. भगवान कोण आहेत, कधी येतील, हे देखील जाणत नाहीत. महिमा भले तऱ्हे-तऱ्हेची गातात, म्हणतात भगवान पतित-पावन आहे, ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानानेच सद्गती होते. हे देखील जाणतात की, भगवान निराकार आहेत. ज्याप्रमाणे आपण आत्मा देखील निराकार आहोत, नंतर शरीर घेते. आपण आत्मे देखील बाबांसोबत परमधाम मध्ये राहणारे आहोत. आपण इथले वासी नाही आहोत. कुठले निवासी आहोत, हे देखील यथार्थ रीतीने सांगत नाहीत. कोणी तर समजतात - आपण स्वर्गामध्ये निघून जाणार. आता डायरेक्ट स्वर्गामध्ये तर कोणालाही जायचे नाहीये. कोणी मग म्हणतात ज्योत ज्योतीमध्ये विलीन होणार. हे देखील चुकीचे आहे. आत्म्याला विनाशी बनवतात. मोक्ष सुद्धा मिळत नाही. जेव्हा की म्हणतात - ‘बनी बनाई…, हे चक्र फिरतच राहते, इतिहास-भूगोल रिपीट होतो’. परंतु चक्र कसे फिरते, हे मात्र जाणत नाहीत. ना चक्राला जाणत, ना ईश्वराला जाणत. भक्ति मार्गामध्ये किती भटकत राहतात. भगवान कोण आहेत हे तुम्ही जाणता. भगवंताला फादर देखील म्हणतात तर डोक्यात आले पाहिजे ना. लौकिक फादर सुद्धा आहेत मग आपण त्यांचीसुद्धा आठवण करतो तर दोन फादर झाले - लौकिक आणि पारलौकिक. त्या पारलौकिक पित्याला भेटण्यासाठी इतकी भक्ती करतात. ते परलोक मध्ये राहतात. निराकारी दुनिया देखील आहे नक्की.

तुम्ही व्यवस्थित जाणता - मनुष्य जे काही करतात तो सर्व आहे भक्तिमार्ग. रावण राज्यामध्ये भक्तीच भक्ती होत आली आहे. ज्ञान असू शकत नाही. भक्ती केल्याने कधी सद्गती होऊ शकत नाही. सद्गती करणारे बाबांची आठवण करतात तर जरूर ते कधीतरी येऊन सद्गती करतील. तुम्ही जाणता ही एकदम तमोप्रधान दुनिया आहे. सतोप्रधान होते, आता तमोप्रधान आहेत, किती उपद्रव होत राहतात. खूप भांडण-तंटे होत आहेत. चोर सुद्धा लूटमार करत असतात. कसे-कसे मारहाण करून चोर पैसे लुटून घेऊन जातात. अशी काही औषधे आहेत ज्याने गुंगी आणून बेशुद्ध करतात. हे आहे रावण राज्य. हा खूप मोठा बेहदचा खेळ आहे. याला फिरण्यामध्ये ५ हजार वर्षे लागतात. खेळ देखील ड्रामा प्रमाणे आहे. नाटक म्हणता येणार नाही. नाटकामध्ये तर समजा कोणी ॲक्टर आजारी पडला तर अदली-बदली करतात. यामध्ये तर असे काही होऊ शकत नाही. हा तर अनादि ड्रामा आहे ना. समजा कोणी आजारी पडले तर म्हणतील असे आजारी पडण्याचा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. हा अनादि पूर्व नियोजित ड्रामा आहे. इतर कोणाला तुम्ही ड्रामा म्हणाल तर गोंधळून जातील. तुम्ही जाणता हा बेहदचा ड्रामा आहे. कल्पा नंतर तरीही हेच ॲक्टर्स असतील. ज्याप्रमाणे आता पाऊस पडत आहे कल्पा नंतर देखील असाच पडणार. आता जसा पाऊस इत्यादी पडतो, कल्पा नंतरसुद्धा असाच पुन्हा पडेल. हेच असेच उपद्रव होतील. तुम्ही मुले जाणता ज्ञानाचा पाऊस तर सर्वांवर पडू शकत नाही परंतु हा आवाज सर्वांच्या कानापर्यंत अवश्य जाईल की, ज्ञानसागर भगवान आलेले आहेत. तुमचा मुख्य आहे योग. ज्ञान देखील तुम्ही ऐकता; बाकी पाऊस तर संपूर्ण दुनियेमध्ये पडतो. तुमच्या योगाद्वारेच स्थाई शांती होते. तुम्ही सर्वांना ऐकवता की, स्वर्गाची स्थापना करणारे भगवान आलेले आहेत, परंतु असे देखील खूप आहेत जे स्वतःला भगवान समजतात, तर तुम्हाला मग कोण मानेल; म्हणून मग बाबा म्हणतात - कोटींमध्ये कोणी निघतील. तुमच्यामध्ये देखील नंबरवार जाणतात की, ईश्वर पिता आलेले आहेत. बाबांकडून वारसा तर घेतला पाहिजे ना. बाबांची कशी आठवण करायची ते देखील समजावून सांगितले आहे. स्वतःला आत्मा समजा. लोक तर देह-अभिमानी बनले आहेत. बाबा म्हणतात - ‘मी येतोच तेव्हा जेव्हा सर्व मनुष्य आत्मे पतित बनतात’. तुम्ही किती तमोप्रधान बनले आहात. आता मी आलो आहे तुम्हाला सतोप्रधान बनविण्यासाठी. कल्पापूर्वी देखील मी तुम्हाला असेच समजावून सांगितले होते. तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान कसे बनाल? फक्त माझी आठवण करा. मी आलो आहे तुम्हाला माझा आणि रचनेचा परिचय देण्यासाठी. त्या पित्याला सर्व आठवण करतातच मुळी रावण राज्यामध्ये. आत्मा आपल्या पित्याची आठवण करते. बाबा आहेतच अशरीरी, बिंदू आहेत ना. त्यांचे मग नाव ठेवले गेले आहे. तुम्हाला म्हणतात - शाळीग्राम आणि बाबांना म्हणतात - शिव. तुम्हा मुलांचे नाव शरीराला दिले जाते. बाबा तर आहेतच परम-आत्मा. त्यांना शरीर तर घ्यायचे नाहीये. त्यांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. हे ब्रह्माचे शरीर आहे, यांना शिव म्हणता येणार नाही. आत्मा नाव तर तुमचे आहेच मग तुम्ही शरीरामध्ये येता. ते परम-आत्मा आहेत सर्व आत्म्यांचे पिता. तर सर्वांचे दोन पिता झाले ना. एक निराकारी, एक साकारी. यांना (ब्रह्मा बाबांना) मग अलौकिक वंडरफुल पिता म्हटले जाते. किती पुष्कळ मुले आहेत. लोकांना हे समजतही नाही - प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी इतके खूप सारे आहेत, हे आहे तरी काय! कोणत्या प्रकाराचा हा धर्म आहे! समजू शकत नाहीत. तुम्ही जाणता हा कुमार-कुमारी प्रवृत्ती मार्गातील शब्द आहे ना. आई, वडील, कुमार आणि कुमारी. भक्तिमार्गामध्ये तुम्ही आठवण करता - ‘तुम मात-पिता…’ आता तुम्हाला माता-पिता मिळाले आहेत, तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे (दत्तक घेतले आहे). सतयुगामध्ये दत्तक घेतले जात नाही. तिथे ॲडॉप्शनचे नाव सुद्धा नाही. इथे तरीही नाव तर आहे. ते आहेत हदचे पिता, हे आहेत बेहदचे पिता. बेहदचे ॲडॉप्शन आहे. हे अतिशय गूढ रहस्य समजण्या लायक आहे. तुम्ही लोक पूर्णपणे कोणाला समजावून सांगत नाही. सर्वात आधी आतमध्ये कोणी आले आणि म्हणाले की, ‘गुरुचे दर्शन करण्यासाठी आलो आहोत’, तर तुम्ही बोला की, ‘हे काही मंदिर नाही आहे. बोर्डावर पहा काय लिहिलेले आहे!’ ब्रह्माकुमार-कुमारी पुष्कळ आहेत. हे सर्व प्रजापित्याची मुले आहेत. प्रजा तर तुम्ही देखील आहात. भगवान सृष्टी रचतात, ब्रह्मा मुखकमलाद्वारे आम्हाला रचले आहे. आम्ही आहोतच नवीन सृष्टीचे, तुम्ही आहात जुन्या सृष्टीचे. नवीन सृष्टीचे बनायचे असते संगमयुगावर. हे आहे पुरुषोत्तम बनण्याचे युग. तुम्ही संगमयुगावर उभे आहात, ते कलियुगामध्ये उभे आहेत जणूकाही फाळणी झाली आहे. आजकाल तर पहा किती फाळणी झाली आहे. प्रत्येक धर्मवाले समजतात आम्ही आमच्या प्रजेला सांभाळणार, आमच्या धर्माला हमजीन्सना सुखी ठेवणार; म्हणून प्रत्येकजण म्हणतात - आमच्या राज्यामधून ही वस्तू बाहेर जाता कामा नये. पूर्वी तर राजाचा संपूर्ण प्रजेवर हुकूम चालत होता. राजाला मायबाप, अन्नदाता म्हणत होते. आता तर राजा-राणी नाही आहेत. वेगवेगळे तुकडे झाले आहेत. किती उपद्रव होत राहतात. अचानक पूर येतो, भूकंप होत राहतात, हे सर्व आहेत दुःखद मृत्यू.

आता तुम्ही ब्राह्मण समजता की आपण सर्व आपसामध्ये भाऊ-भाऊ आहोत. तर आपल्याला आपसामध्ये अतिशय प्रेमाने, क्षीरखंड होऊन रहायचे आहे. आपण एका पित्याची मुले आहोत तर आपसामध्ये खूप प्रेम असायला हवे. राम राज्यामध्ये वाघ-बकरी जे कट्टर शत्रू आहेत, ते देखील एकत्र पाणी पितात. इथे तर पहा घरा-घरामध्ये किती भांडणे आहेत. राष्ट्रा-राष्ट्रा मध्ये भांडण, आपसामध्येच फूट पडते. अनेक मते आहेत. आता तुम्ही जाणता - आपण सर्वांनी अनेकदा बाबांकडून वारसा घेतला आहे आणि मग गमावला आहे अर्थात रावणावर विजय प्राप्त करतो आणि मग हरतो. एका बाबांच्या श्रीमतावर आपण विश्वाचे मालक बनतो, म्हणून त्यांना उच्च ते उच्च भगवान म्हटले जाते. सर्वांचे दु:ख-हर्ता, सुख-कर्ता म्हटले जाते. आता तुम्हाला सुखाचा रस्ता सांगत आहेत. तुम्ही मुले आपसामध्ये क्षीरखंड होऊन राहिले पाहिजे. दुनियेमध्ये आपसामध्ये सर्व आहेत खारट पाणी. एकमेकांना मारून टाकायला वेळ लावत नाहीत. तुम्ही ईश्वरीय औलाद तर क्षीरखंड असायला पाहिजे. तुम्ही ईश्वरीय संतान देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहात. तुम्ही बाबांचे किती मदतगार बनता. पुरुषोत्तम बनविण्यासाठी मदतगार आहात तर हे मनामध्ये आले पाहिजे - आपण पुरुषोत्तम आहोत, तर आपल्यामध्ये ते दैवी गुण आहेत का? आसुरी गुण असतील तर तो मग बाबांचा मुलगा म्हणता येणार नाही; म्हणून म्हटले जाते - ‘सद्गुरु का निंदक ठौर ना पाये’. ते कलियुगी गुरु मग स्वतःसाठी म्हणून लोकांना घाबरवून टाकतात. तर बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - सपूत मुले ती आहेत जी बाबांचे नाव मोठे करतात, क्षीरखंड होऊन राहतात. बाबा नेहमी म्हणतात - क्षीरखंड बना. खारट पाणी होऊन आपसामध्ये भांडण-तंटा करू नका. तुम्हाला येथे क्षीरखंड बनायचे आहे. आपसामध्ये खूप प्रेम पाहिजे कारण तुम्ही ईश्वरीय संतान आहात. ईश्वर मोस्ट लवली (खूप सुखदायी) आहेत तेव्हाच तर सर्वजण त्यांची आठवण करतात. तर तुमचे आपसामध्ये खूप प्रेम असले पाहिजे. नाहीतर बाबांचा आदर गमावून बसता. ईश्वराची मुले आपसामध्ये खारट पाणी कसे होऊ शकतात, मग पद कसे प्राप्त करू शकाल. बाबा समजावून सांगतात आपसामध्ये क्षीरखंड होऊन रहा. खारट पाणी बनाल तर अजिबात धारणा होणार नाही. जर बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चालला नाहीत तर मग उच्च पद कसे प्राप्त कराल. देह-अभिमानामध्ये आल्यानेच मग आपसामध्ये भांडतात. देही-अभिमानी असाल तर अजिबात कलह होणार नाही. ईश्वर बाबा मिळाले आहेत तर मग दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. आत्म्याला बाबांसारखे बनायचे आहे. जसे बाबांमध्ये पवित्रता, सुख, प्रेम इत्यादी सर्व आहे, तुम्हाला देखील बनायचे आहे. नाहीतर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. शिकून बाबांकडून उच्च वारसा घ्यायचा आहे; जे अनेकांचे कल्याण करतात, तेच राजा-राणी बनू शकतात. बाकी जाऊन दास-दासी बनतील. समजू तर शकतात ना - कोण-कोण काय बनतील? शिकणारे स्वतः देखील समजू शकतात - या हिशेबाने आपण बाबांचे नाव काय काढणार. ईश्वराची मुले तर मोस्ट लवली (खूप सुखदायी) असली पाहिजेत, ज्यांना पाहून कोणीही आनंदित होईल. बाबांना देखील गोड तेच वाटतील. पहिले आपल्या घराला तर सुधारा. आधी घराला आणि मग दुसऱ्यांना सुधारायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये कमलपुष्प समान पवित्र आणि क्षीरखंड होऊन रहा. कोणीही बघेल तर म्हणेल - ‘ओहो! इथे तर स्वर्गच वसला आहे’. अज्ञान काळामध्ये देखील बाबांनी स्वतः अशी घरे पाहिली आहेत. ६-७ विवाहित मुले सर्व एकत्र राहतात. सर्व पहाटे उठून भक्ती करतात. घरामध्ये एकदम शांतता पसरलेली असते. हे तर तुमचे ईश्वरीय कुटुंब आहे. हंस आणि बगळा एकत्र राहू शकत नाही. तुम्हाला तर हंस बनायचे आहे. खारट पाणी झालात तर बाबा संतुष्ट होणार नाहीत. बाबा म्हणतील तू किती नाव बदनाम करतोस. जर क्षीरखंड होऊन राहिला नाहीत तर स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्त करू शकणार नाही, खूप सजा खाल. बाबांचे बनून मग जर खारट पाणी होऊन रहाल तर शंभर पटीने सजा खाल. मग तुम्हाला साक्षात्कार देखील होत राहतील की आपण काय पद प्राप्त करणार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नेहमी लक्षात रहावे - आपण ईश्वराची मुले आहोत, आपल्याला मोस्ट लवली (खूप सुखदायी) होऊन रहायचे आहे. आपसामध्ये कधीही खारट पाणी बनायचे नाही. पहिले स्वतःला सुधारायचे आहे मग इतरांनाही हे सुधारण्याचे शिक्षण द्यायचे आहे.

२) जसे बाबांमध्ये पवित्रता, सुख, प्रेम इत्यादी सर्व गुण आहेत, असे बाबांसारखे बनायचे आहे. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे सद्गुरुचा निंदक बनाल. आपल्या वर्तनाने बाबांचे नाव मोठे करायचे आहे.

वरदान:-
बाबांच्या आणि प्राप्तीच्या स्मृतीद्वारे सदैव हिंमत-उल्हासामध्ये राहणारे एकरस, अचल भव

बाबांकडून जन्मत:च ज्या प्राप्ती झालेल्या आहेत त्याची लिस्ट नेहमी समोर ठेवा. जेव्हा प्राप्ती अटळ, अचल (निश्चित आणि स्थिर) आहे तर हिम्मत आणि उल्हास देखील अचल असला पाहिजे, अचल असण्या ऐवजी मन जर कधी चंचल होत असेल किंवा स्थितीमध्ये चंचलता येत असेल तर त्याचे कारण आहे बाबांना आणि प्राप्तीला सदैव समोर ठेवत नाही. सर्व प्राप्तींचा अनुभव सदैव तुमच्या समोर किंवा स्मृतीमध्ये असेल तर सर्व विघ्न नष्ट होतील, कायम नवीन उमंग, नवीन उल्हास राहील. स्थिती एकरस आणि अचल राहील.

बोधवाक्य:-
कोणत्याही प्रकारच्या सेवेमध्ये नेहमी संतुष्ट राहणे म्हणजेच चांगले मार्क्स घेणे आहे.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

तुम्ही ब्राह्मण मुले खूप-खूप रॉयल आहात. तुमचा चेहरा आणि वर्तन दोन्ही सत्यतेची सभ्यता अनुभव करणारे असावे. तसेही रॉयल आत्म्यांना सभ्यतेची देवी म्हटले जाते. त्यांचे बोलणे, पाहणे, चालणे, खाणे-पिणे, उठणे-बसणे, प्रत्येक कर्मामध्ये सभ्यता, सत्यता स्वतःच दिसून येते. असे नाही की मी तर सत्याला सिद्ध करत आहे आणि सभ्यताच नसेल. तर हे बरोबर नाही.