07-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही या वेळेस बाबांसोबत सेवेमध्ये मदतगार बनले आहात, म्हणून तुमचे
स्मरण केले जाते, पूजन नाही, कारण शरीर अपवित्र आहे”
प्रश्न:-
तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये निरंतर कोणता नशा राहिला पाहिजे?
उत्तर:-
आपण शिवबाबांची मुले आहोत, त्यांच्याकडून राजयोग शिकून स्वर्गाच्या राजाईचा वारसा
घेत आहोत, हा नशा तुम्हाला निरंतर राहिला पाहिजे. विश्वाचा मालक बनायचे असेल तर
अतिशय काळजीपूर्वक शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. कधीही बाबांची निंदा होऊ द्यायची
नाही. कोणाशीही भांडण-तंटा करायचा नाही. तुम्ही कवडी पासून हिऱ्यासमान बनत आहात, तर
चांगल्या रीतीने धारणा करायची आहे.
गीत:-
जो पिया के
साथ है…
ओम शांती।
मुलांना समजले. जे बाबांसोबत आहेत ते बापदादांसोबत आहेत. आता तर डबल आहेत ना. हे
चांगल्या रीतीने समजावून सांगितले जाते की, ब्रह्मा द्वारा परमपिता परमात्मा शिव कशी
स्थापना करतात? ते (दुनियावाले) तर जाणत नाहीत. तुम्ही मुलेच जाणता की त्यांना आपले
स्वतःचे शरीर नाही आहे. श्रीकृष्णाला तर स्वतःचे शरीर आहे. असे म्हणता येणार नाही
की, परमात्मा श्रीकृष्णाच्या शरीराद्वारे… नाही. कृष्ण तर आहे सतयुगाचा प्रिन्स.
परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करवितात तर जरूर ब्रह्मामध्ये प्रवेश करावा
लागतो. दुसरा कोणताही उपाय नाही. प्रेरणा इत्यादीची गोष्टच नाही. बाबा ब्रह्मा
द्वारे सर्व काही समजावून सांगतात. विजयी माळा, जिला रुद्रमाळा म्हटले जाते, जिची
मनुष्य पूजा करतात, जप करतात. तुम्ही मुले समजता की रुद्र माळा तर फक्त जपली जाते.
मेरू म्हटले जाते ब्रह्मा-सरस्वतीला. बाकीची माळा झाली मुलांची. विष्णूची माळा तर
एकच आहे, जिची पूजा केली जाऊ शकते. या वेळी तुम्ही पुरुषार्थी आहात. तुमचे स्मरण
शेवटी केले जाते. ही आत्म्यांची माळा आहे की जीव आत्म्यांची? असा प्रश्न पडेल ना.
विष्णूची माळा तर चैतन्य जीव आत्म्यांच्या माळेला म्हणणार. लक्ष्मी-नारायणाचे पूजन
केले जाते ना, कारण त्यांची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत. रुद्र माळा तर फक्त
आत्म्यांची आहे, कारण शरीर तर अपवित्र आहेत. त्यामुळे त्यांची काही पूजा केली जाऊ
शकत नाही. आत्मा कशी पुजली जाते? तुम्ही म्हणता - रुद्र माळा पूजली जाते. परंतु नाही,
ती पूजली जात नाही तर तिचा जप केला जातो. कारण तिचे नावच आहे - ‘जपमाळा’. जे काही
मणी आहेत ते तुम्हा मुलांचे आहेत ज्यांचा जप केला जातो, जेव्हा तुम्ही शरीरामध्ये
असता. मणी तर ब्राह्मणांचे आहेत. जप कोणाचा करतात? हे तर कोणालाच ठाऊक नाही आहे. हे
आहेत ब्राह्मण, जे भारताची सेवा करतात. त्यांची आठवण करतात. जगत अंबा, देवी इत्यादी
भरपूर आहेत, त्यांची आठवण केली पाहिजे. पूजन योग्य तर लक्ष्मी-नारायण बनतात. तुम्ही
नाही, कारण तुमची शरीरे पतित आहेत. आत्मा पवित्र आहे परंतु तिची पूजा केली जाऊ शकत
नाही, जप केला जाऊ शकतो. कोणीही तुम्हाला विचारले तर आधी तुम्हाला समजलेले असले
पाहिजे. तुम्ही ब्राह्मणी आहात. तुमचे यादगार देवींच्या रूपामध्ये आहेत. तुम्ही
श्रीमतावर स्वतः पावन बनता, म्हणून ही माळा प्रथम ब्राह्मणांची समजली जाते, नंतर
देवतांची मानली जाते. विचार सागर मंथन केल्याने उत्तर मिळेल. आत्मे जेव्हा
शाळीग्राम रूपामध्ये असतात तेव्हा पुजले जातात. शिवाची पूजा होते तर शाळीग्रामची
देखील होते, कारण आत्मा पवित्र आहे, शरीर नाही. जप फक्त तुमचाच केला जातो, असे का?
कारण तुम्ही शरीरासह सेवा करता. तुमची पूजा होऊ शकत नाही. नंतर जेव्हा शरीर सोडता
तेव्हा तुम्ही देखील शिवासोबत (शिवलिंगा सोबत) पूजले जाता. विचार केला जातो ना.
तुम्ही या वेळी ब्राह्मण आहात. शिवबाबा देखील ब्रह्मामध्ये येतात, म्हणजेच ब्रह्मा
देखील साकार मध्ये आहेत. तुम्ही मेहनत करता. ही माळा जणू साकारी आहे -
ब्रह्मा-सरस्वती आणि तुम्ही ज्ञानगंगा. तुम्ही भारताला स्वर्ग बनविले आहे, हा रुद्र
यज्ञ रचला. जेव्हा पूजा करतात तेव्हा त्यामध्ये फक्त शिव आणि शाळीग्राम असतात.
त्यामध्ये ब्रह्मा-सरस्वतीचे किंवा तुम्हा मुलांचे नाव नाहीये. इथे तर सर्वांचे नाव
आहे. तुमचा जप करतात, ज्या ज्ञानगंगा होत्या. ते (शिवबाबा) तर आहेत ज्ञान सागर. हे
(ब्रह्मा बाबा) आहेत ब्रह्मपुत्रा - मोठी नदी. हे ब्रह्मा, माता देखील आहेत. सागर
एकच आहे, बाकी गंगा तर तऱ्हेतऱ्हेच्या अनेक प्रकारच्या असतात. नंबरवार
ज्यांच्यामध्ये चांगले ज्ञान आहे त्यांना सरोवर म्हटले जाते. महिमा देखील आहे.
म्हणतात - मानसरोवरमध्ये स्नान केल्याने परिजादा (परी सारखे) बनतात. तर तुमची माळा
जपली जाते. ‘जपमाळा’ म्हणतात ना. जप करा - ते तर फक्त ‘राम-राम’ म्हणतात. परंतु
तुम्ही जाणता जप कोणाचा केला जाणार? जे जास्त सेवा करतात. सर्व प्रथम तर बाबा आहेत
- फूल, नंतर मेरू, जे खूप मेहनत करतात, आणि नंतर मग रुद्र माळा सो विष्णूची माळा
बनते. तुमची फक्त आत्माच पूजली जाते. तुम्ही आता जप करण्यालायक आहात. जपमाळ तुमची
आहे. बाकी पूजा होऊ शकत नाही कारण आत्मा पवित्र आहे, शरीर अपवित्र आहे. अपवित्र
वस्तू कधीही पूजली जात नाही. जेव्हा रुद्र माळा बनण्यालायक बनता, तेव्हा शेवटी
तुम्ही शुद्ध बनता. तुम्हाला साक्षात्कार होईल की पास विद ऑनर कोण-कोण होतात ते.
सेवा केल्याने नाव खूप प्रसिद्ध होते. हळूहळू समजत जाईल - विजयीमाळेमध्ये नंबरवार
कोण-कोण येणार आहेत! या गोष्टी अतिशय गूढ आहेत.
मनुष्य तर फक्त
‘राम-राम’ म्हणतात. ख्रिश्चन लोक क्राइस्टची आठवण करतात. माळा कोणाची असणार? गॉड तर
एकच आहे. बाकी जे जवळ बसलेले आहेत त्यांची माळा बनत असेल. या माळेला तुम्ही आता
फक्त समजू शकता. आपल्या आदि सनातन देवी-देवता धर्माचेच समजू शकत नाहीत तर बाकीचे तरी
कसे समजू शकणार? सर्वांना पतितापासून पावन बनविणारे तर एक बाबाच आहेत.
क्राइस्टबद्दल असे म्हणणार नाहीत की, ते पतितांना पावन बनविणारे आहेत. त्यांना
जन्म-मरणामध्ये येऊन खाली उतरायचेच आहे (पतित व्हायचेच आहे). वास्तविक त्यांना गुरु
देखील म्हणणार नाही, कारण सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. ते तर तेव्हा जेव्हा
अंत होतो, झाड जडजडिभूत होते, तेव्हाच बाबा येऊन सर्वांना सद्गती देतात. धर्माची
स्थापना करण्यासाठी आत्मा वरून येते. त्यांना तर जन्म-मरणामध्ये यायचेच आहे. सद्गुरू
एकच आहेत. ते सर्वांचे सद्गती दाता आहेत. खरा सद्गुरू कोणताही मनुष्य असू शकत नाही.
ते तर फक्त धर्म स्थापन करण्यासाठीच येतात, त्यांच्या पाठोपाठ सर्वजण आपापला पार्ट
बजावण्यासाठी येऊ लागतात. जेव्हा सर्व तमोप्रधान अवस्थेला पोहोचतात, तेव्हा मी येऊन
सर्वांची सद्गती करतो. सर्वजण परत जातात आणि मग नव्याने चक्र सुरू होते. तुम्ही
राजयोग शिकत आहात. तीच राजाई मिळेल, मग राजा बना नाहीतर प्रजा बना. प्रजा तर खंडीभर
बनते. मेहनत आहे राजाई पद मिळविण्याची. शेवटी सर्व काही कळेल - विजयीमाळेमध्ये
कोण-कोण गुंफले जातात. अडाणी शिकलेल्यांसमोर ओझे वाहतील. सतयुगामध्ये येतील, परंतु
नोकर-चाकर बनावे लागेल. हे सर्वांना माहीत पडेल. जसे परीक्षेच्या दिवसांमध्ये
सर्वांना समजते की कोण-कोण पास होणार आहेत. अभ्यासाकडे लक्ष नसते त्यामुळे मग फेल
होतात. तुमचे हे आहे बेहदचे शिक्षण. ईश्वरीय विश्व-विद्यालय तर एकच आहे, जिथे
मनुष्यापासून देवता बनायचे आहे; त्यामध्ये नंबरवार पास होतात. राजयोगाचा अभ्यास तर
एकच आहे, मेहनत आहे राजाई पद मिळविण्यामध्ये; आणि सेवा देखील करायची आहे. जे राजा
बनतील त्यांना मग आपली प्रजा देखील बनवावी लागेल. चांगल्या-चांगल्या मुली मोठ-मोठी
सेंटर्स सांभाळतात, भरपूर प्रजा बनवतात. बाबा देखील म्हणतात - मोठी बाग तयार करा तर
बाबा देखील येऊन बघतील. आता तर खूप छोटी बाग आहे. बॉम्बेमध्ये तर लाखोंनी बी. के.
बनतील. सूर्यवंशी तर संपूर्ण डिनायस्टी असते, त्यामुळे पुष्कळ बनतील. जे मेहनत
करतात ते राजा बनतात, बाकी तर प्रजा बनत जाईल. गायन देखील आहे - ‘हे प्रभू, तुझी
सद्गतीची लीला’. तुम्ही म्हणता - ‘वाह बाबा! तुमची गति मत…’ सर्वांची सद्गती
करण्याचे श्रीमत हे सर्वात न्यारे आहे. बाबा सोबत घेऊन जातात, सोडत नाहीत. निराकारी,
आकारी, साकारी लोक कोणालाच जाणत नाहीत. फक्त सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणणे हे
देखील काही कंप्लिट नॉलेज नाहीये. पहिले तर मूलवतनला जाणून घ्यावे लागेल, जिथे आपण
आत्मे राहतो. या संपूर्ण सृष्टीचक्राला जाणल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. या
सर्व किती समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ते तर म्हणतात - शिव नावा-रूपापासून न्यारे
आहेत. चित्रे देखील आहेत, तरीही म्हणतात - नावा-रूपापासून न्यारे. आणि मग म्हणतात
सर्वव्यापी आहेत. एका एम.पी. ने म्हटले होते की, ‘मी हे मानत नाही की ईश्वर
सर्वव्यापी आहे’. मनुष्य एकमेकांना मारतात, हे काय ईश्वराचे काम आहे? पुढे जाऊन या
गोष्टींना समजतील, जेव्हा तुमची देखील वृद्धी होईल. बाबांनी रात्री देखील समजावून
सांगितले की, जे स्वतःला हुशार समजतात त्यांनी असे-असे पत्र लिहावे. हे संपूर्ण
नॉलेज काय आहे, ते त्यांना समजावून सांगितले पाहिजे. तुम्ही लिहू शकता - आम्ही
तुम्हाला संपूर्ण नॉलेज देऊ शकतो. मूलवतन विषयीचे नॉलेज देऊ शकतो. निराकार बाबांचा
परिचय देखील देऊ शकतो, मग प्रजापिता ब्रह्मा आणि त्यांच्या ब्राह्मण धर्माबद्दलही
समजावून सांगू शकतो. लक्ष्मी-नारायण, मग राम-सीता - त्यांची डिनायस्टी कशी चालते,
मग त्यांच्याकडून राजाई कोण हिसकावून घेतात, तो स्वर्ग कुठे गेला? जसे म्हणतात ना -
नरक कुठे गेला? नष्ट झाला. स्वर्ग देखील नष्ट होईल. त्यावेळी देखील भूकंप इत्यादी
होतात. ते हिरे-माणकांचे महाल इत्यादी असे काही धरणीमध्ये गडप झाले जे कोणीही बाहेर
काढू शकत नाही. सोने, हिऱ्या-माणकांचे महाल कधीही धरणीतून बाहेर आलेले नाहीत.
सोमनाथ इत्यादीची मंदिरे तर नंतर बनली आहेत, त्यापेक्षा तर त्यांची घरे किती
भव्य-दिव्य असतील! लक्ष्मी-नारायणाचे घर कसे असेल? ती सर्व मालमत्ता कुठे गेली? अशा
प्रकारच्या गोष्टी जेव्हा विद्वान ऐकतील तर आश्चर्यचकित होतील की, यांचे नॉलेज किती
जबरदस्त आहे! मनुष्य तर काहीच जाणत नाहीत, फक्त ‘सर्वव्यापी’ म्हणत राहतात. या सर्व
गोष्टी समजून घेण्याच्या आणि समजावून सांगण्याच्या आहेत.
तुम्हाला ज्ञान धन
मिळत आहे, तर मग दान देखील करायचे आहे. बाबा तुम्हाला देत जातात, तुम्ही देखील देत
जा. हा अखूट खजिना आहे, सर्व आधार धारणेवर अवलंबून आहे. जितकी धारणा कराल तितके
उच्च पद मिळवाल. विचार करा - कुठे कवडी, कुठे हिरा! हिऱ्याची किंमत सर्वात जास्त.
कवडीची किंमत सर्वात कमी. आता तुम्ही कवडी पासून हिरा बनत आहात. या गोष्टी तर कधी
कोणाच्या स्वप्नातही येणार नाहीत. फक्त इतकेच समजतील की, खरोखर लक्ष्मी-नारायणाचे
राज्य होते, ते होऊन गेले आहेत. परंतु हे राज्य कधी आणि कोणी दिले - हे काहीच जाणत
नाहीत. राजाई कोणी दिली? इथे तर काहीच नाही आहे. राजयोगाद्वारे स्वर्गाची राजाई
मिळते. हे वंडर आहे ना. चांगल्या रीतीने मुलांच्या बुद्धीमध्ये हा नशा राहिला पाहिजे.
परंतु माया काही तो नशा स्थायी राहू देत नाही. आपण शिवबाबांची मुले आहोत. हे नॉलेज
शिकून आपण विश्वाचे मालक बनणार आहोत. हे कधी कोणाच्या बुद्धीमध्ये येत तरी असेल का!
म्हणून तर बाबा मुलांना समजावून सांगतात - किती मेहनत केली पाहिजे. ‘गुरू के निंदक
ठौर ना पायें’ (गुरुची निंदा करणारे उच्च पद मिळवू शकत नाही). ही इथली गोष्ट आहे.
त्यांना (हठयोगींना) तर काही एम-ऑब्जेक्टच नाही आहे. तुम्हाला तर एम-ऑब्जेक्ट आहे.
पिता, टीचर आणि गुरु तिघेही आहेत. तुम्ही जाणता या शिक्षणाद्वारे आम्ही विश्वाचे
मालक बनतो. किती लक्षपूर्वक शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. अशी कोणतीही गोष्ट होऊ
नये की ज्यामुळे निंदा होईल. कोणाशीही भांडण-तंटा करायचा नाही. सर्वांशी गोड बोलायचे
आहे. बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबा म्हणतात - ‘दे दान तर सुटेल ग्रहण’. नंबरवन
दान आहे देह-अभिमानाचे. या वेळी तर तुम्ही आत्म-अभिमानी आहात आणि परमात्म-अभिमानी
बनत आहात. हे अमूल्य जीवन आहे. बाबा म्हणतात - कल्प-कल्प मी तुम्हाला असे शिक्षण
शिकवण्यासाठी येतो, आणि मग तुम्ही विसरून जाता. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या, ज्ञानरत्ने धारण करणाऱ्या आणि सेवा करणाऱ्या मुलांप्रती
मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना
नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सर्वांशी
गोड बोलायचे आहे, अशी कोणतीही गोष्ट करायची नाही ज्यामुळे बाबांची निंदा होईल.
देह-अभिमानाचे दान देऊन आत्म-अभिमानी आणि परमात्म-अभिमानी बनायचे आहे.
२) जे ज्ञान-धन मिळते
त्याचे दान करायचे आहे. अभ्यासाने राजाई मिळते - कायम या नशेमध्ये राहायचे आहे.
लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे.
वरदान:-
साक्षीपणाच्या
सीट द्वारे ‘परेशानी’ शब्दाला समाप्त करणारे मास्टर त्रिकालदर्शी भव
या ड्रामामध्ये जे
काही घडते त्यामध्ये कल्याण भरलेले आहे. ‘का, काय’ असे प्रश्न बुद्धिमान
असणाऱ्यांच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकत नाहीत. नुकसानामध्ये देखील कल्याण दडलेले
आहे, बाबांचा हात हातात असेल आणि बाबांची सोबत असेल तर अकल्याण होऊ शकत नाही. अशा
शानमध्ये (थाटामध्ये) सीटवर राहा तर कधीही निराश होणार नाही. साक्षीपणाची सीट
‘परेशानी’ (निराशा) या शब्दाला नाहीसे करते, म्हणून त्रिकालदर्शी बनून प्रतिज्ञा करा
की ना स्वतः दुःखी होणार, ना कोणाला दुःखी करणार.
बोधवाक्य:-
आपल्या सर्व
कर्मेंद्रियांना ऑर्डर प्रमाणे चालवणे म्हणजेच स्वराज्य-अधिकारी बनणे आहे.
हे अव्यक्त इशारे:-
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा” निश्चयबुद्धीचा
अर्थच आहे निश्चिंत बादशहा, तेच बाप समान आहेत. विनाशी धनवाले जितके कमावतात तितके
काळानुसार चिंतेमध्ये असतात. परंतु ज्यांना विश्वास आहे की, आम्ही ईश्वरीय
खजिन्यांचे मालक आणि परमात्मा-बालक आहोत, ते नेहमीच स्वप्नातही निश्चिंत बादशहा
असतात. कारण त्यांना विश्वास आहे की, हे ईश्वरीय खजिने या जन्मातच काय, परंतु अनेक
जन्म सोबत आहेत आणि सोबत राहतील; म्हणूनच ते निश्चयबुद्धी, निश्चिंत राहतात.