07-04-2025      
प्रभात: मराठी मुरली        
ओम शान्ति
       
बापदादा मधुबन
“गोड 
मुलांनो - सर्वात चांगला दैवी गुण आहे शांत राहणे, जास्त आवाजामध्ये न येणे, गोड 
बोलणे, तुम्ही मुले आता टॉकी मधून मूवी मध्ये (वाणी मधून संकल्पामध्ये) आणि मूवी 
मधून सायलेन्स मध्ये जाता, म्हणून जास्त आवाजामध्ये येऊ नका”
प्रश्न:-
कोणत्या मुख्य 
धारणेच्या आधारे सर्व दैवी गुण आपोआप येत जातील?
उत्तर:-
मुख्य आहे पवित्रतेची धारणा. देवता पवित्र आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये दैवी गुण 
आहेत. या दुनियेमध्ये कोणातही दैवी गुण असू शकत नाहीत. रावण राज्यामध्ये दैवी गुण 
कुठून येतील. तुम्ही रॉयल मुले आता दैवी गुण धारण करत आहात.
गीत:- 
भोलेनाथ से 
निराला…
ओम शांती।
आता मुले समजतात की, बिगडी को बनानेवाला (बिघडलेले ठीक करणारे) एकच आहेत. 
भक्तिमार्गामध्ये पुष्कळजणांकडे जातात. किती तीर्थयात्रा इत्यादी करतात. बिघडलेले 
ठीक करणारे, पतितांना पावन बनविणारे तर एकच आहेत, सद्गती दाता, गाईड, लिबरेटर देखील 
ते एक आहेत. आता गायन आहे परंतु अनेक मनुष्य, अनेक धर्म, मठ, पंथ, शास्त्र असल्या 
कारणाने अनेक मार्ग शोधत राहतात. सुख आणि शांती करिता सत्संगांमध्ये जातात ना. जे 
जात नाहीत ते मायावी धुंदी मध्येच मश्गुल राहतात. हे देखील तुम्ही मुलेच जाणता की 
आता कलियुगाचा अंत आहे. मनुष्य हे जाणत नाहीत की सतयुग कधी असते? आता काय आहे? हे 
तर एखादे मुल देखील समजू शकते. नवीन दुनियेमध्ये सुख, जुन्या दुनियेमध्ये जरूर दुःख 
असते. या जुन्या दुनियेमध्ये अनेक मनुष्य आहेत, अनेक धर्म आहेत. तुम्ही कोणालाही 
समजावून सांगू शकता. हे आहे कलियुग, सतयुग पास्ट झाले आहे. तिथे एकच आदि सनातन 
देवी-देवता धर्म होता, दुसरा कोणताही धर्म नव्हता. बाबांनी अनेकदा समजावून सांगितले 
आहे, तरीही सांगत आहेत, जो येईल त्याला नवीन दुनिया आणि जुन्या दुनियेतील फरक दाखवला 
पाहिजे. भले ते काहीही म्हणतील, कोणी १० हजार वर्षे कालावधी म्हणतात, कोणी ३० हजार 
वर्षे कालावधी म्हणतात. अनेक मते आहेत ना. आता त्यांच्याकडे आहेच शास्त्रांमधील मत. 
अनेक शास्त्रे, अनेक मते. मनुष्यांचे मत आहे ना. शास्त्र देखील लिहितात तर मनुष्यच 
ना. देवता काही शास्त्र इत्यादी लिहीत नाहीत. सतयुगामध्ये देवी-देवता धर्म होता. 
त्यांना मनुष्य देखील म्हटले जाऊ शकत नाही. तर जेव्हा कोणी मित्र-संबंधी इत्यादी 
भेटतात तर त्यांना बसून हे ऐकवले पाहिजे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नवीन 
दुनियेमध्ये किती थोडे मनुष्य असतात. जुन्या दुनियेमध्ये किती वृद्धी होते. 
सतयुगामध्ये केवळ एक देवता धर्म होता. मनुष्य देखील फार थोडे होते. दैवी गुण असतातच 
देवतांमध्ये. मनुष्यांमध्ये नसतात. तेव्हाच तर मनुष्य जाऊन देवतांसमोर नमस्ते करतात 
ना. देवतांची महिमा गातात. जाणतात ते स्वर्गवासी आहेत, आपण नरकवासी, कलियुगवासी 
आहोत. मनुष्यामध्ये दैवी गुण असू शकत नाहीत. जर कोणी म्हणेल की, अमक्यामध्ये खूप 
चांगले दैवी गुण आहेत! तर बोला - नाही, दैवी-गुण असतातच देवतांमध्ये कारण ते पवित्र 
आहेत. इथे पवित्र नसल्याकारणाने कोणामध्ये दैवी गुण असू शकत नाहीत कारण आसुरी रावण 
राज्य आहे ना. नवीन झाडामध्ये दैवी गुण वाले देवता राहतात नंतर मग झाड जुने होते. 
रावण राज्यामध्ये दैवी गुणवाले असू शकत नाहीत. सतयुगामध्ये आदि सनातन देवी-देवतांचा 
प्रवृत्ती मार्ग होता. प्रवृत्ती मार्गवाल्यांची महिमा गायली गेली आहे. सतयुगामध्ये 
आपण पवित्र देवी-देवता होतो, संन्यास मार्ग नव्हता. किती पॉईंट्स मिळतात. परंतु 
सर्व पॉईंट्स कोणाच्या बुद्धीमध्ये राहू शकत नाहीत. पॉईंट्स विसरतात म्हणून नापास 
होतात. दैवी गुण धारण करत नाहीत. एकच दैवी गुण चांगला आहे. जास्त कोणाशी न बोलणे, 
गोड बोलणे, फार थोडे बोलले पाहिजे कारण तुम्हा मुलांना टॉकीमधून मूवी (वाणीमधून 
संकल्पाच्या भाषेमध्ये) आणि मूवी मधून सायलेन्समध्ये (संकल्पाच्या भाषेमधून 
शांतीमध्ये) जायचे आहे. तर टॉकीला (आवाजामध्ये येणे) खूप कमी केले पाहिजे. जे फार 
थोडे आणि हळुवारपणे बोलतात तर समजतात हे रॉयल घरातील आहेत. मुखावाटे सदैव रत्न 
निघावीत.
संन्यासी किंवा कोणीही 
असेल तर त्यांना नवीन दुनिया आणि जुन्या दुनियेमधील विरोधाभास सांगितला पाहिजे. 
सतयुगामध्ये दैवी गुण वाले देवता होते, तो प्रवृत्ती मार्ग होता. तुम्हा संन्याशांचा 
धर्मच वेगळा आहे. तरीही एवढे तर समजता ना की, नवीन सृष्टी सतोप्रधान असते, आता 
तमोप्रधान आहेत. आत्मा तमोप्रधान होते तेव्हा मग शरीर देखील तमोप्रधान मिळते. आता 
आहेच पतित दुनिया. सर्वांना पतितच म्हणणार. ती आहे पावन सतोप्रधान दुनिया. तीच नवीन 
दुनिया सो आता जुनी होते.
यावेळी सर्व मनुष्य 
आत्मे नास्तिक आहेत, म्हणूनच दंगे होतात. धणीला (मालकाला) न जाणल्याकारणाने 
आपसामध्ये भांडण-तंटा करत राहतात. रचयिता आणि रचनेला जाणणाऱ्याला आस्तिक म्हटले जाते. 
संन्यास धर्माचे तर नवीन दुनियेला जाणतच नाहीत, त्यामुळे तिथे येतही नाहीत. बाबांनी 
समजावून सांगितले आहे, आता सर्व आत्मे तमोप्रधान बनले आहेत मग सर्व आत्म्यांना 
सतोप्रधान कोण बनवणार? ते तर बाबाच बनवू शकतात. सतोप्रधान दुनियेमध्ये थोडे मनुष्य 
असतात. बाकी सर्व मुक्तिधाम मध्ये राहतात. ब्रह्म तत्व आहे, जिथे आपण आत्मे निवास 
करतो. त्याला म्हटले जाते ब्रह्मांड. आत्मा तर अविनाशी आहे. हे अविनाशी नाटक आहे, 
ज्यामध्ये सर्व आत्म्यांचा पार्ट आहे. नाटक कधी सुरू झाले? हे कधी कोणी सांगू शकत 
नाही. हा अनादि ड्रामा आहे ना. बाबांना फक्त जुन्या दुनियेला नवीन बनविण्यासाठी यावे 
लागते. असे नाही की बाबा नवीन सृष्टी रचतात. जेव्हा पतित होतात तेव्हाच बोलावतात, 
सतयुगामध्ये कोणी बोलावत नाही. आहेच पावन दुनिया. रावण पतित बनवतात, परमपिता 
परमात्मा येऊन पावन बनवतात. अर्धे-अर्धे जरूर म्हटले जाईल. ब्रह्माचा दिवस आणि 
ब्रह्माची रात्र अर्धे-अर्धे आहे. ज्ञानाद्वारे दिवस होतो, तिथे अज्ञान नसते. 
भक्तिमार्गाला अंधाराचा मार्ग म्हटले जाते. देवता पुनर्जन्म घेत-घेत मग अंधारामध्ये 
येतात म्हणून या शिडीमध्ये दाखवले आहे - मनुष्य कसे सतो, रजो, तमोमध्ये येतात. आता 
सर्वांची जडजडीभूत अवस्था आहे. बाबा येतात ट्रान्सफर करण्यासाठी अर्थात मनुष्याला 
देवता बनविण्याकरिता. जेव्हा देवता होते तेव्हा आसुरी गुणवाले मनुष्य नव्हते. आता 
या आसुरी गुणवाल्यांना पुन्हा दैवी गुणवाले कोण बनविणार? आता तर अनेक धर्म, अनेक 
मनुष्य आहेत. भांडण-तंटे करत राहतात. सतयुगामध्ये एक धर्म आहे तर दुःखाचा काही 
प्रश्नच नाही. शास्त्रांमध्ये तर अनेक दंतकथा आहेत ज्या जन्म-जन्मांतर वाचत आला 
आहात. बाबा म्हणतात - ही सर्व भक्तिमार्गाची शास्त्रे आहेत, त्याच्याद्वारे मला 
प्राप्त करू शकत नाही. मला स्वतः तर एकदाच येऊन सर्वांची सद्गती करायची आहे. असेच 
परत कोणीही जाऊ शकत नाही. बसून अतिशय संयमाने समजावून सांगितले पाहिजे, गोंधळ पण 
होऊ नये. त्या लोकांना आपला अहंकार तर राहतो ना. साधू-संतांच्या सोबत फॉलोअर्स (चेले) 
देखील असतात. लगेच म्हणतील - यांना देखील ब्रह्माकुमारींची जादू लागली आहे. हुशार 
मनुष्य जे असतील ते म्हणतील या विचार करण्यालायक गोष्टी आहेत. यात्रा-प्रदर्शनीमध्ये 
अनेक प्रकारचे येतात ना. प्रदर्शनी इत्यादीमध्ये कोणीही आला तर त्याला अतिशय संयमाने 
समजावून सांगितले पाहिजे. जसे बाबा संयमाने समजावून सांगत आहेत. खूप जोराने बोलता 
कामा नये. प्रदर्शनीमध्ये तर पुष्कळजण एकत्र येतात ना. मग म्हटले पाहिजे - तुम्ही 
थोडा वेळ देऊन एकांतामध्ये समजून घेण्यासाठी याल तर तुम्हाला रचयिता आणि रचनेचे 
रहस्य समजावून सांगू. रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान रचयिता बाबाच समजावून सांगतात. 
बाकी तर सर्व नेती-नेतीच करून जातात. कोणीही मनुष्य परत जाऊ शकत नाही. ज्ञानाद्वारे 
सद्गती होते त्यानंतर मग ज्ञानाची गरजच नसते. हे नॉलेज बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही 
सांगू शकत नाही. समजावून सांगणारा कोणी वृद्ध असेल तर मनुष्य समजतील हे देखील अनुभवी 
आहेत. जरूर सत्संग इत्यादी केला असेल. काही मुले समजावून सांगतील तर म्हणतील - यांना 
काय ठाऊक. तर अशा लोकांवर वृद्ध व्यक्तीचा चांगला प्रभाव पडू शकतो. बाबा एकदाच येऊन 
हे नॉलेज समजावून सांगतात. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनवतात. माता बसून त्यांना हे 
ज्ञान समजावून सांगतील तर खुश होतील. बोला - ज्ञानसागर बाबांनी ज्ञानाचा कलश आम्हा 
मातांना दिला आहे जो मग आम्ही इतरांना देतो. खूप नम्रतेने बोलत रहायचे आहे. शिव हेच 
ज्ञानाचा सागर आहेत जे आम्हाला ज्ञान ऐकवतात. म्हणतात - ‘मी तुम्हा मातांद्वारे 
मुक्ती-जीवनमुक्तीचे गेट उघडतो, दुसरा कोणीही उघडू शकत नाही. आपण आता 
परमात्म्याद्वारे शिकत आहोत. आपल्याला कोणी मनुष्य शिकवत नाहीत. ज्ञानाचा सागर एक 
परमपिता परमात्माच आहेत. तुम्ही सर्व भक्तीचे सागर आहात. भक्तीचे ऑथॉरिटी आहात, ना 
की ज्ञानाचे. ज्ञानाची ऑथॉरिटी एक मीच आहे. महिमा देखील एकाचीच करतात. तेच उच्च ते 
उच्च आहेत. आपण त्यांनाच मानतो. ते आम्हाला ब्रह्मातनामधून शिकवतात म्हणून 
ब्रह्माकुमार-कुमारी गायले गेले आहेत. बसून अशा खूप गोड पद्धतीने समजावून सांगा. भले 
कितीही शिकलेला असेल. पुष्कळ प्रश्न विचारतात. सर्वप्रथम तर बाबांवरच निश्चय पक्का 
करवून घ्यायचा आहे. आधी तुम्ही हे समजून घ्या की रचता पिता आहेत का नाहीत. सर्वांचे 
रचयिता एकच शिवबाबा आहेत तेच ज्ञानाचे सागर आहेत. पिता, टीचर, सद्गुरु आहेत. पहिले 
तर एवढा तरी निश्चय-बुद्धी व्हावा की रचयिता पिताच रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान 
देतात. तेच आपल्याला समजावून सांगतात, मग ते तर जरूर योग्य तेच सांगतील. मग कोणताही 
प्रश्न उत्पन्न होणार नाही. बाबा येतातच संगमावर. फक्त एवढेच म्हणतात - ‘माझी आठवण 
करा तर पापे भस्म होतील’. आपले कामच आहे पतितांना पावन बनविणे. आता तमोप्रधान दुनिया 
आहे. पतित-पावन बाबा आल्याशिवाय कोणालाही जीवनमुक्ती मिळू शकत नाही. सर्वजण गंगा 
स्नान करण्यासाठी जातात तर पतित झाले ना. मी तर असे म्हणत नाही की, गंगा स्नान करा. 
मी तर म्हणतो - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. मी तुम्हा सर्व आशिकांचा माशुक आहे. 
सर्व एका माशुकची आठवण करतात. रचनेचे क्रियेटर एक बाबाच आहेत. ते म्हणतात - 
देही-अभिमानी बनून माझी आठवण करा तर या योग अग्नीद्वारे विकर्म विनाश होतील. हा योग 
बाबा आताच शिकवतात जेव्हा की जुनी दुनिया बदलत आहे. विनाश समोर उभा आहे. आता आपण 
देवता बनत आहोत. बाबा किती सोपे करून सांगतात. बाबांच्या समोर भले ऐकतात परंतु एकरस 
होऊन ऐकत नाहीत. बुद्धी अजून इतर गोष्टींकडे पळत राहते. भक्तीमध्ये देखील असे होते. 
संपूर्ण दिवस तर वेस्ट जातो बाकी जो टाईम ठरवतात, त्यामध्ये देखील बुद्धी कुठे-कुठे 
निघून जाते. सर्वांचीच अशी हालत होत असेल. माया आहे ना!
काही-काही मुले 
बाबांसमोर बसून ध्यानामध्ये निघून जातात, हा देखील टाईम वेस्ट झाला ना. कमाई तर झाली 
नाही. बाबा तर म्हणतात - आठवणीमध्ये रहा, ज्याद्वारे विकर्म विनाश होतील. 
ध्यानामध्ये गेल्याने बुद्धीमध्ये बाबांची आठवण राहत नाही. या सर्व गोष्टींमध्ये 
खूप घोटाळा आहे. तुम्हाला तर डोळे बंद सुद्धा करायचे नाही आहेत. आठवणीमध्ये बसायचे 
आहे ना. डोळे उघडण्यासाठी घाबरता कामा नये. डोळे उघडे असावेत. बुद्धीमध्ये माशुकच 
लक्षात असावा. डोळे बंद करून बसणे, हा कायदा (नियम) नाही. बाबा म्हणतात आठवणीमध्ये 
बसा. असे थोडेच म्हणतात की, डोळे बंद करा. डोळे बंद करून, मान अशी खाली करून बसाल 
तर बाबा कसे बरे बघतील. डोळे कधीही बंद करायचे नाहीत. डोळे बंद होतात म्हणजे दाल 
में कुछ काला होगा, दुसऱ्या कोणाची तरी आठवण करत असतील. बाबा तर म्हणतात - दुसऱ्या 
कोणत्याही मित्र-नातलग इत्यादींची आठवण करता म्हणजे तुम्ही खरे आशिक नाहीत. खरे 
आशिक बनाल तेव्हाच उच्च पद प्राप्त कराल. सारी मेहनत आठवणीमध्ये आहे. 
देह-अभिमानामध्ये बाबांना विसरतात, मग धक्के खात राहता आणि खूप गोड देखील बनायला हवे. 
वातावरण देखील मधुर असावे, काहीच आवाज नसावा. कोणीही येईल तर पाहतील - किती गोड 
बोलतात. खूप सायलेन्स असला पाहिजे, काहीच भांडण-तंटा नाही. नाहीतर जसे पिता, टीचर, 
गुरु तिघांची निंदा करतात. ते मग पद सुद्धा खूप कमी दर्जाचे प्राप्त करतील. मुलांना 
आता समज तर मिळाली आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला उच्च पदावर जाण्यासाठी शिकवतो’. 
शिकून मग इतरांनाही शिकवायचे आहे. स्वतः देखील समजू शकतात, आपण तर काही कोणाला 
ज्ञान ऐकवत नाही तर काय पद प्राप्त करणार! प्रजा बनवली नाहीत तर काय बनणार! योग नाही, 
ज्ञान नाही तर मग जरूर पढे हुए के आगे भरी ढोनी पडेगी (शिकलेल्यांसमोर चाकरी करावी 
लागेल). स्वतःला बघायचे आहे - यावेळी जर मी नापास झालो, कमी पद मिळाले तर 
कल्प-कल्पांतर पद कमी होईल. बाबांचे काम आहे समजावून सांगणे; समजून घेणार नसाल तर 
आपलेच पद भ्रष्ट कराल. कसे कोणाला समजावून सांगितले पाहिजे - ते देखील बाबा सांगत 
असतात. जितके कमी आणि हळुवारपणे बोलाल तितके चांगले आहे. बाबा सेवा करणाऱ्यांची 
महिमा देखील करतात ना. खूप चांगली सेवा करतात तर बाबांच्या हृदयामध्ये स्थान 
मिळवतात. सेवेद्वारेच तर हृदयामध्ये स्थान मिळवतील ना. आठवणीची यात्रा देखील जरूर 
पाहिजे तेव्हाच सतोप्रधान बनाल. जास्त सजा खाल तर पद कमी होईल. पापे भस्म होत नाहीत 
तर सजा खूप खावी लागते, पद सुद्धा कमी होते. त्यालाच घाटा म्हटले जाते. हा देखील 
व्यापार आहे ना. घाट्यामध्ये जाता कामा नये. दैवी गुण धारण करा. श्रेष्ठ बनले पाहिजे. 
बाबा उन्नतीसाठी विविध प्रकारच्या गोष्टी ऐकवतात, आता जे कराल ते प्राप्त कराल. 
तुम्हाला परिस्तानी बनायचे आहे, गुण देखील असे धारण करायचे आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप 
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. 
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य 
सारांश:-
१) कोणाशीही 
खूप नम्रतेने आणि धीम्या आवाजामध्ये बोलायचे आहे. बोलणे-चालणे खूप गोड असावे. 
सायलेन्सचे वातावरण असावे. कोणताही आवाज नसावा तेव्हाच सेवेची सफलता होईल.
२) खरा-खरा आशिक बनून 
एका माशुकची आठवण करायची आहे. आठवणीमध्ये कधीही डोळे बंद करून, खांदे पाडून बसायचे 
नाही. देही-अभिमानी होऊन रहायचे आहे.
वरदान:-
सर्व 
खजिन्यांना स्वयं प्रति आणि इतरांप्रती युज करणारे अखंड महादानी भव
ज्याप्रमाणे बाबांचा 
भंडारा सदैव चालत राहतो, रोज देतात तसाच तुमचा देखील अखंड लंगर चालत रहावा कारण 
तुमच्याकडे ज्ञानाचा, शक्तींचा, खुशीचा भरपूर भंडारा आहे. याला सोबत ठेवण्यामध्ये 
किंवा युज करण्यामध्ये काहीच धोका नाही. हा भंडारा उघडा असला तर चोर येणार नाही. 
बंद ठेवाल तर चोर येतील. म्हणून रोज आपल्या मिळालेल्या खजिन्यांना पहा आणि स्वयं 
प्रति आणि इतरांप्रती युज करा तर अखंड महादानी बनाल.
बोधवाक्य:-
जे ऐकले आहे 
त्याचे मनन करा, मनन केल्यानेच शक्तिशाली बनाल.
अव्यक्त इशारे - 
“कंबाइंड रूपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना” सेवा आणि स्थिती, बाबा आणि तुम्ही, 
ही कंबाइंड स्थिती, कंबाइंड सेवा करा तर नेहमी फरिश्ते स्वरूपाचा अनुभव कराल. सदैव 
बाबांच्यासोबतही आहे आणि जोडीदारही आहे - हा डबल अनुभव व्हावा. स्वतःमधील निष्ठेने 
नेहमी सोबत असल्याचा अनुभव करा आणि सेवेमध्ये नेहमी जोडीदाराचा अनुभव करा.