07-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जेव्हापण वेळ मिळेल तेव्हा एकांतामध्ये बसून खऱ्या माशुकची आठवण करा, कारण आठवणीनेच स्वर्गाची बादशाही मिळेल”

प्रश्न:-
बाबा मिळाले आहेत तर कोणता निष्काळजीपणा नाहीसा झाला पाहिजे?

उत्तर:-
काही मुले निष्काळजी बनून म्हणतात की, आम्ही तर बाबांचेच आहोत. आठवणीची मेहनत करत नाहीत. वारंवार आठवण विसरायला होते. हाच आहे निष्काळजीपणा. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, जर आठवणीमध्ये रहाल तर आतमध्ये स्थायी आनंद भरून राहील. कोणत्याही प्रकारचा घुटका (आळस) येणार नाही. बंधनात असलेल्या जशा आठवणीमध्ये तळमळतात, रात्रंदिवस आठवण करतात, तशी तुम्हाला देखील निरंतर आठवण राहिली पाहिजे.

गीत:-
तकदीर जगा कर आई हूँ…

ओम शांती।
बाबांनी मुलांना समजावून सांगितले आहे - तुम्ही देखील म्हणता - ओम् शांती. बाबा देखील म्हणतात - ओम् शांती अर्थात तुम्ही आत्मे शांत स्वरूप आहात. बाबा देखील शांत स्वरूप आहेत, आत्म्याचा स्वधर्म शांत आहे. परमात्म्याचा देखील स्वधर्म शांत आहे. तुम्ही देखील शांतीधाम मध्ये राहणारे आहात. बाबा देखील म्हणतात - मी देखील तिथे राहणारा आहे. तुम्ही मुले पुनर्जन्मामध्ये येता, मी येत नाही. मी या रथामध्ये प्रवेश करतो. हा माझा रथ आहे. शंकराला जर विचाराल, विचारू तर शकत नाही परंतु समजा सूक्ष्मवतनमध्ये जाऊन कोणी विचारले तर म्हणतील - हे सूक्ष्म शरीर माझे आहे. शिवबाबा म्हणतात - हे शरीर माझे नाही. हे मी उधार घेतले आहे कारण मला देखील कर्मेंद्रियांचा आधार पाहिजे. सर्वप्रथम मुख्य गोष्ट समजावून सांगायची आहे की पतित-पावन, ज्ञानाचा सागर श्रीकृष्ण नाहीये. श्रीकृष्ण सर्व आत्म्यांना पतितापासून पावन बनवत नाहीत, ते तर येऊन पावन दुनियेमध्ये राज्य करतात. अगोदर प्रिन्स बनतात नंतर मग महाराजा बनतात. त्यांच्यामध्ये देखील हे ज्ञान नाहीये. रचनेचे ज्ञान तर रचयित्यामध्येच असेल ना. श्रीकृष्णाला रचना म्हटले जाते. रचयिता बाबाच येऊन ज्ञान देतात. आता बाबा रचना रचत आहेत, म्हणतात - तुम्ही माझी मुले आहात. तुम्ही देखील म्हणता बाबा आम्ही तुमचे आहोत. म्हटले देखील जाते - ब्रह्माद्वारे ब्राह्मणांची स्थापना. नाहीतर ब्राह्मण कुठून येतील. सूक्ष्मवतनवाले ब्रह्मा आणखी दुसरे कोणी नाहीत. वरचे तेच खालचे आणि तेच मग वरचे. एकच आहेत. अच्छा, विष्णू आणि लक्ष्मी-नारायण देखील एकच गोष्ट आहे. ते कुठले आहेत? ब्रह्मा सो विष्णू बनतात. ब्रह्मा-सरस्वती सो लक्ष्मी-नारायण पुन्हा तेच मग संपूर्ण कल्पामध्ये ८४ जन्मानंतर संगमावर येऊन ब्रह्मा-सरस्वती बनतात. लक्ष्मी-नारायण देखील मनुष्य आहेत, त्यांचा देवी-देवता धर्म आहे. विष्णूला देखील चार भुजा दिल्या आहेत. हा प्रवृत्ती मार्ग दाखविला आहे. भारतामध्ये सुरुवातीपासूनच प्रवृत्ती मार्ग चालत आला आहे म्हणून विष्णूला चार भुजा दिल्या आहेत. इथे आहेत ब्रह्मा-सरस्वती, ती सरस्वती ॲडॉप्टेड (दत्तक) मुलगी आहे. यांचे खरे नाव लखीराज होते, मग यांचे नाव ठेवले - ब्रह्मा. शिवबाबांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आणि राधेला आपले बनविले, नाव ठेवले - सरस्वती. ब्रह्मा काही सरस्वतीचा लौकिक पिता नाहीये. या दोघांचेही लौकिक पिता आपापले वेगळे होते, ते आता नाही आहेत. या
शिवबाबांनी ब्रह्माद्वारे
ॲडॉप्ट केले आहे. तुम्ही आहात ॲडॉप्टेड चिल्ड्रन (दत्तक संतान). ब्रह्मा देखील शिवबाबांचा मुलगा आहे. ब्रह्माच्या मुखकमला द्वारे रचतात म्हणून ब्रह्माला देखील माता म्हटले जाते. ‘तुम मात-पिता हम बालक तेरे, तुम्हरी कृपा से सुख घनेरे…’ असे गातात ना. तुम्ही ब्राह्मण येऊन बालक बनले आहात. यामध्ये समजून घेण्याची बुद्धी खूप चांगली पाहिजे. तुम्ही मुले शिवबाबांकडून वारसा घेता. ब्रह्मा काही स्वर्गाचे रचयिता किंवा ज्ञानाचे सागर नाहीत. ज्ञानाचे सागर एक बाबाच आहेत. आत्म्याचा पिताच ज्ञानाचा सागर आहे. आत्मा देखील ज्ञान-सागर बनते परंतु यांना ज्ञान-सागर म्हणणार नाही कारण सागर एकच आहेत. तुम्ही सर्व नद्या आहात. सागराला स्वतःचे शरीर नाहीये, नद्यांना आहे. तुम्ही आहात ज्ञान नद्या. कलकत्त्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी खूप मोठी आहे कारण तिचे सागराशी कनेक्शन आहे. त्यावर खूप मोठा मेळावा भरतो. इथे देखील मेळावा भरतो. सागर आणि ब्रह्मपुत्रा दोघेही कंबाईंड आहेत. हे आहेत चैतन्य, ते आहेत जड. यागोष्टी बाबाच समजावून सांगतात, या गोष्टी शास्त्रांमध्ये नाहीत. शास्त्रे आहेत भक्तीमार्गाचे डिपार्टमेंट. हा आहे ज्ञानमार्ग, तो आहे भक्तीमार्ग. अर्धा कल्प भक्तीमार्गाचे डिपार्टमेंट चालले आहे. त्यामध्ये ज्ञानसागर नाही आहेत. परमपिता परमात्मा, ज्ञानाचे सागर बाबा संगमावर येऊन ज्ञान स्नानाद्वारे सर्वांची सद्गती करतात.

तुम्ही जाणता की आपण बेहदच्या बाबांकडून स्वर्गीय सुखाचे भाग्य बनवत आहोत. खरोखर आम्ही सतयुग, त्रेतामध्ये पूज्य देवी-देवता होतो. आता आम्ही पुजारी मनुष्य आहोत. पुन्हा आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. ब्राह्मण सो देवता धर्मामध्ये आलो नंतर मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो. ८४ जन्म घेत-घेत खाली उतरावे लागले आहे. हे देखील तुम्हाला बाबांनी सांगितले आहे. तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नव्हता. ८४ जन्म देखील तुम्हीच घेता. जे सर्वप्रथम येतात, तेच पूर्ण ८४ जन्म घेतात. योगाद्वारेच खाद (गंज) निघते, योगामध्येच मेहनत आहे. भले काही मुले ज्ञानामध्ये हुशार आहेत, परंतु योगामध्ये कच्ची आहेत. योगामध्ये निर्बंधन असणाऱ्यांपेक्षाही बंधनात असणाऱ्या चांगल्या आहेत. त्या तर शिवबाबांना भेटण्यासाठी रात्रंदिवस तळमळत असतात. तुम्ही भेटले आहात. तुम्हाला सांगितले जाते आठवण करा तर तुम्ही सारखे-सारखे विसरता. तुमच्यासमोर वादळे खूप येतात. त्या, (बंधनात असणाऱ्या) तर आठवणीमध्ये तडफडतात. तुम्ही तडफडत नाही. त्यांचे घरबसल्या उच्चपद होते. तुम्ही मुले जाणता - बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्यामुळे आपल्याला स्वर्गाची बादशाही मिळेल. जसे बाळ गर्भातून बाहेर पडण्यासाठी तडफडते, तशा बंधनात असणाऱ्या तळमळून-तळमळून बोलावत असतात - ‘शिवबाबा, आम्हाला या बंधनातून बाहेर काढा’. दिवस-रात्र आठवण करतात. तुम्हाला बाबा मिळाले आहेत तर तुम्ही निष्काळजी बनले आहात. आपण बाबांची मुले आहोत. आपण हे शरीर सोडून जाऊन प्रिन्स बनणार, ही खुशी आतमध्ये स्थायी राहिली पाहिजे. परंतु माया आठवण करू देत नाही. आठवणीमुळे खूप आनंदात राहाल. आठवण केली नाहीत तर घुसमटत राहाल. अर्धा कल्प तुम्ही रावण राज्यामध्ये दुःख बघितले आहे. अकाली मृत्यू होत आहेत. दुःख तर आहेच. भले कितीही श्रीमंत असू देत, दुःख तर असते. अकाली मृत्यू होतो. सतयुगामध्ये असे अकाली कोणी मरत नाही, कधी आजारी पडणार नाहीत. आपल्या वेळेवर बसल्या-बसल्या आपणहून एक शरीर सोडून दुसरे घेतात. त्याचे नावच आहे सुखधाम. मनुष्य तर स्वर्गाच्या गोष्टींना कल्पना समजतात. म्हणतील, स्वर्ग कुठून आला. तुम्ही जाणता आपण तर स्वर्गामध्ये राहणारे आहोत नंतर मग ८४ जन्म घेतो. हा सारा खेळ भारतावरच बनलेला आहे. तुम्ही जाणता - आपण २१ जन्म पावन देवता होतो नंतर मग आपण क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो. आता पुन्हा ब्राह्मण बनलो आहोत. हे स्वदर्शन चक्र खूप सोपे आहे. हे शिव बाबा बसून समजावून सांगत आहेत.

तुम्ही जाणता - शिवबाबा ब्रह्माच्या रथामध्ये आले आहेत, जे ब्रह्मा आहेत तेच सतयुग आदिला श्रीकृष्ण होते. ८४ जन्म घेऊन पतित बनले आहेत, मग यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बाबांनी प्रवेश करून ॲडॉप्ट केले आहे. ते स्वतः सांगतात - ‘मी या तनाचा आधार घेऊन तुम्हाला आपले बनविले आहे. मग तुम्हाला स्वर्गाच्या राजधानी लायक बनवितो, जे लायक बनतील तेच राजाईमध्ये येतील’. यासाठी मॅनर्स चांगले पाहिजेत. मुख्य आहेच पवित्रता. यावरूनच अबलांवर अत्याचार होतात. काही ठिकाणी तर पुरुषांवर देखील अत्याचार होतात. विकारासाठी एकमेकांना त्रास देतात. इथे माता पुष्कळ असल्यामुळे ‘शक्ती-सेना’ नाव गायले गेले आहे, वंदे मातरम्. आता तुम्ही गोरे बनण्यासाठी काम-चितेवरून उतरून ज्ञान-चितेवर बसले आहात. द्वापर पासून काम-चितेवर बसले होता. एकमेकांना विकार देण्यासाठी विकारी ब्राह्मण शेला-पदराची गाठ बांधतात. तुम्ही आहात निर्विकारी ब्राह्मण. तुम्ही ते कॅन्सल करून ज्ञान-चितेवर बसता. काम-चितेमुळे काळे बनला आहात, ज्ञान-चितेमुळे गोरे बनाल. बाबा म्हणतात - भले एकत्र रहा परंतु प्रतिज्ञा करायची आहे की आपण विकारामध्ये जाणार नाही, म्हणून बाबा तुम्हाला अंगठी देखील घालतात. शिवबाबा, पिता देखील आहेत, साजन देखील आहेत. सर्व सीतांचे राम ते एकच आहेत. तेच पतित-पावन आहेत. बाकी रघुपति राघव राजारामची गोष्ट नाहीये . त्याने संगमावरच हे प्रारब्ध मिळविले होते. त्याला हिंसक बाण दाखविणे चुकीचे आहे. चित्रांमध्ये सुद्धा दाखवता कामा नये. फक्त लिहायचे आहे - चंद्रवंशी. मुलांनी हे समजावून सांगितले पाहिजे की, शिवबाबा यांच्याद्वारे आम्हाला हे चक्राचे रहस्य समजावून सांगत आहेत. सत्य-नारायणाची कथा असते ना. ती आहे मनुष्यांनी बनविलेली कथा. परंतु त्याने काही कोणी नरापासून नारायण तर बनत नाहीत. सत्यनारायणाच्या कथेचा अर्थच आहे - नरापासून नारायण बनणे. अमरकथा देखील ऐकवतात परंतु अमरपुरीमध्ये काही कोणी जात नाही. मृत्यूलोक २५०० वर्षे चालतो. तिजरीची कथा माता ऐकतात. वास्तविक ही आहे तिसरा ज्ञानाचा नेत्र देण्याची कथा. आता ज्ञानाचा तिसरा नेत्र आत्म्याला मिळाला आहे तर आत्म-अभिमानी बनायचे आहे. मी आता या शरीराद्वारे देवता बनत आहे. माझ्यामध्येच संस्कार आहेत. मनुष्य सर्व देह-अभिमानी आहेत. बाबा येऊन देही-अभिमानी बनवत आहेत. लोकं मग म्हणतात की, आत्मा परमात्मा एक आहे. परमात्म्याने ही सर्व रूपे धारण केली आहेत. बाबा म्हणतात - हे सर्व चुकीचे आहे, याला मिथ्या अभिमान, मिथ्या ज्ञान म्हटले जाते. बाबा म्हणतात - ‘मी बिंदू प्रमाणे आहे. तुम्ही देखील जाणत नव्हता, हे देखील (ब्रह्मा बाबा) जाणत नव्हते’. आता बाबा समजावून सांगत आहेत तर यामध्ये संशय येता कामा नये. निश्चय झाला पाहिजे. बाबा जरूर सत्यच बोलतात, संशय बुद्धी विनश्यन्ती. ते पूर्ण वारसा प्राप्त करू शकणार नाहीत. आत्म-अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे. जेवण बनविताना बुद्धी बाबांकडे लागलेली असावी. प्रत्येक गोष्टीमध्ये ही प्रॅक्टिस केली पाहिजे. चपाती लाटताना, आपल्या माशुकची आठवण करत राहणे - प्रत्येक गोष्टीमध्ये हा अभ्यास पाहिजे. जितका वेळ मिळेल आठवण करायची आहे. आठवणीनेच तुम्ही सतोप्रधान बनाल. कर्म करण्यासाठी आठ तासांची सुट्टी आहे. मधून-मधून देखील एकांतामध्ये जाऊन बसले पाहिजे, तुम्हालाच सर्वांना बाबांचा परिचय देखील ऐकवायचा आहे. आज ऐकले नाही तर उद्या ऐकतील. बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत, आपण स्वर्गामध्ये होतो आता पुन्हा नरक वासी बनलो आहोत. आता पुन्हा बाबांकडून वारसा मिळाला पाहिजे. भारतवासीयांनाच समजावून सांगतात. बाबा येतातच मुळी भारतामध्ये. बघा, तुमच्याकडे मुसलमान लोक देखील येतात, ते देखील सेंटर सांभाळतात. म्हणतात की, शिवबाबांची आठवण करा. शीख देखील येतात, ख्रिश्चन सुद्धा येतात, पुढे चालून खूप येतील. हे ज्ञान सर्वांसाठी आहे कारण ही आहेच बाबांची सहज आठवण आणि सहज वारसा. परंतु पवित्र तर जरूर बनावे लागेल. दे दान तर सुटे ग्रहण. आता भारतावर राहूचे ग्रहण आहे, नंतर मग २१ जन्मांकरिता बृहस्पतीची दशा सुरू होईल. आधी असते बृहस्पतीची दशा. मग शुक्राची दशा. सूर्यवंशीयांवर बृहस्पतीची दशा, चद्रवंशीयांवर शुक्राची दशा म्हणणार. मग दशा कमी होत जातात. सर्वात वाईट आहे राहूची दशा. बृहस्पती काही गुरू नसतो. ही दशा आहे वृक्षपतीची. वृक्षपती बाबा येतात तर ब्रहस्पती आणि शुक्राची दशा होते. रावण येतो तेव्हा राहूची दशा होते. तुम्हा मुलांवर आता बृहस्पतीची दशा बसते. फक्त वृक्षपतीची आठवण करा, पवित्र बना, बस्स. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) प्रत्येक कार्य करत असताना आत्म-अभिमानी बनण्याची प्रॅक्टिस करायची आहे. देहाचा अहंकार समाप्त व्हावा, यासाठीच मेहनत करायची आहे.

२) सतयुगी राजाईच्या लायक बनण्यासाठी आपले मॅनर्स रॉयल बनवायचे आहेत. पवित्रताच सर्वात श्रेष्ठ वर्तन आहे. पवित्र बनल्यामुळेच पवित्र दुनियेचे मालक बनाल.

वरदान:-
करन-करावनहार च्या स्मृतिद्वारे सहज योगाचा अनुभव करणारे सफलता मूर्त भव

कोणतेही कार्य करत असताना ही स्मृती रहावी की या कार्यासाठी निमित्त बनविणारे बॅकबोन कोण आहेत. बॅकबोन शिवाय कोणत्याही कर्मामध्ये सफलता मिळू शकत नाही, म्हणून कोणतेही कार्य करत असताना फक्त हाच विचार करा की, मी निमित्त आहे, करविणारे स्वयं समर्थ बाबा आहेत. ही स्मृती ठेवून कर्म करा तर सहज योगाची अनुभूती होत राहील. मग हा सहजयोग तिथे सहज राज्य करवून घेईल. इथले संस्कार तिथे घेऊन जाल.

बोधवाक्य:-
इच्छा सावलीप्रमाणे असतात, तुम्ही पाठ कराल तर तुमच्या मागे-मागे येतील.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

मधुरता ही एक अशी विशेष धारणा आहे जी कडवट धरणीला देखील मधुर बनविते. तुम्हा सर्वांना बदलण्याचा आधार बाबांचे दोन मधुर बोल आहेत. गोड मुलांनो, तुम्ही गोड शुद्ध आत्मा आहात. या दोन मधुर शब्दांनीच तुम्हाला बदलले आहे. गोड दृष्टीने तुम्हाला बदलले आहे. असेच मधुरते द्वारे इतरांना देखील मधुर बनवा. याने तोंड गोड करा. नेहमी या मधुरतेच्या सौगातला सोबत ठेवा. यानेच सदैव गोड रहाल आणि इतरांना गोड बनवाल.