07-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - ज्ञान आणि योगामुळे निश्चय बसतो, साक्षात्काराने नाही. साक्षात्काराची ड्रामामध्ये नोंद आहे, परंतु त्याने काही कोणाचे कल्याण होत नाही”

प्रश्न:-
बाबा कोणती ताकद दाखवत नाहीत परंतु बाबांकडे जादूगिरी अवश्य आहे?

उत्तर:-
मनुष्य समजतात की, भगवान तर ताकदवान आहेत, ते मेलेल्याला सुद्धा जिवंत करू शकतात, परंतु बाबा म्हणतात - मी काही ही ताकद दाखवत नाही, बाकी कोणी नवधा भक्ती करतात तर त्यांना साक्षात्कार घडवतो. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. साक्षात्कार घडविण्याची जादुगिरी बाबांकडे आहे त्यामुळे बऱ्याच मुलांना घर बसल्या देखील ब्रह्माचा किंवा श्रीकृष्णाचा साक्षात्कार होतो.

गीत:-
कौन आया मेरे मन के द्वारे…

ओम शांती।
हे मुलांच्या अनुभवाचे गाणे आहे. सत्संग तर पुष्कळ आहेत, खास भारतामध्ये तर भरपूर सत्संग आहेत, अनेक मतमतांतरे आहेत, वास्तविक ते काही सत्संग नाहीत. सत्संग एकच असतो. बाकी तुम्ही तिथे कोणत्या ना कोणत्या विद्वान, आचार्य, पंडिताचा चेहरा बघणार, बुद्धी तिकडे जाईल. इथे मग आहे अनोखी गोष्ट. हा सत्संग एकदाच या संगमयुगावर होतो. ही तर एकदम नवीनच गोष्ट आहे, त्या बेहदच्या बाबांचे शरीर तर नाही आहे. ते म्हणतात - ‘मी तुमचा निराकार शिवबाबा आहे. तुम्ही इतर सत्संगांमध्ये जाता तर शरीरांनाच बघता. शास्त्र पठण करून मग ऐकवतात, अनेक प्रकारची शास्त्रे आहेत, ती तर तुम्ही जन्म-जन्मांतर ऐकत आला आहात. आता आहे नवीन गोष्ट. बुद्धीने आत्मा जाणते, बाबा म्हणतात - ‘माझ्या सिकीलध्या मुलांनो, माझ्या शाळीग्रामांनो!’ तुम्ही मुले जाणता - बाबांनी ५००० वर्षांपूर्वी या शरीराद्वारे शिकवले होते. तुमची बुद्धी एकदम दूर (गत काळामध्ये) निघून जाते. तर बाबा आलेले आहेत. ‘बाबा’ शब्द किती गोड आहे. ते आहेत माता-पिता. कोणीही ऐकतील तर म्हणतील - ‘माहीत नाही यांचे माता-पिता कोण आहेत?’ बरोबर ते साक्षात्कार घडवतात तर त्यामध्ये देखील ते गोंधळून जातात. कधी ब्रह्माला, कधी श्रीकृष्णाला बघतात. तर विचार करत राहतात की हे आहे तरी काय? ब्रह्माचा देखील खूप जणांना घर बसल्या साक्षात्कार होतो. आता ब्रह्माची तर कधी कोणी पूजा करत नाहीत. श्रीकृष्ण इत्यादीची तर करतात. ब्रह्माला तर कोणी ओळखतही नसतील. प्रजापिता ब्रह्मा तर आता आले आहेत, हे आहेत प्रजापिता. बाबा बसून समजावून सांगतात की सारी दुनिया पतित आहे तर जरूर हे (ब्रह्माबाबा) देखील अनेक जन्मांच्या अंतामध्ये पतित झाले. कोणीही पावन नाहीत म्हणून कुंभमेळ्याला, हरिद्वार गंगासागराच्या मेळ्याला जातात. समजतात की, स्नान केल्याने आपण पावन बनणार. परंतु या नद्या काही पतित-पावनी थोड्याच असू शकतात. नद्या तर उगम पावतातच सागरातून. वास्तविक तुम्ही आहात ज्ञानगंगा, महत्व तुमचे आहे. तुम्ही ज्ञानगंगा जिकडे-तिकडे उगम पावता, ते लोक मग दाखवतात, बाण मारला आणि गंगा प्रकटली. बाण मारण्याची तर गोष्टच नाही. या ज्ञान गंगा देशोदेशी जातात.

शिवबाबा म्हणतात - मी ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. सर्वांचा पार्ट निश्चित ठरलेला आहे. माझा देखील पार्ट ठरलेला आहे. काहीजण समजतात भगवान तर खूप ताकदवान आहेत, मेलेल्याला देखील जिवंत करू शकतात. या सर्व थापा आहेत. मी येतोच शिकवण्याकरिता. बाकी ताकद काय दाखवणार. साक्षात्काराची देखील जादुगिरी आहे. नवधा भक्ती करतात तर मी त्यांना साक्षात्कार घडवतो. जसे कालीचे रूप दाखवतात, तिच्यावर मग तेल वाहतात. आता अशी काली तर काही नाही आहे, परंतु कालीची नवधा भक्ती खूप करतात. वास्तविक काली तर जगत-अंबा आहे. कालीचे काही असे रूप तर नाहीये, परंतु नवधा भक्ती केल्यामुळे बाबा भावनेचे भाडे देतात. काम-चितेवर बसल्यामुळे काळे बनले, आता ज्ञान-चितेवर बसून गोरे बनतात. जी काली आता जगदंबा बनली आहे ती साक्षात्कार कशी घडवणार. ती तर आता अनेक जन्मांच्या अंताच्याही अंतिम जन्मामध्ये आहे. देवता तर आता नाही आहेत. तर ते कसे काय साक्षात्कार घडवतील. बाबा समजावून सांगतात - ही साक्षात्काराची चावी माझ्या हातामध्ये आहे. अल्पकाळासाठी भावना पूर्ण करण्यासाठी साक्षात्कार घडवतो. परंतु ते काही मला भेटत नाहीत. उदाहरण एका कालीचे देतात. अशा प्रकारचे खूप आहेत - हनुमान, गणेश इत्यादी. भले शिख लोक देखील गुरूनानकाची खूप भक्ती करतील तर त्यांना देखील साक्षात्कार होईल. परंतु ते तर खालीच जातात (पतनच होते). बाबा मुलांना दाखवतात बघा, हे गुरुनानकांची भक्ती करत आहेत. तरी देखील साक्षात्कार मी घडवतो. ते कसे साक्षात्कार घडवतील. त्यांच्याकडे साक्षात्कार घडवण्याची चावी नाही आहे. हे बाबा (ब्रह्मा बाबा) म्हणतात - मला विनाश, स्थापनेचा साक्षात्कार देखील त्या बाबांनी (शिव बाबांनी) घडवला, परंतु साक्षात्काराने कोणाचेही कल्याण होत नाही. असे तर खूप जणांना साक्षात्कार होत होते. ते आज इथे राहिलेले नाहीत. पुष्कळ मुले म्हणतात - आम्हाला जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा आमचा विश्वास बसेल. परंतु विश्वास साक्षात्काराने होऊ शकत नाही. विश्वास बसतो ज्ञान आणि योगाद्वारे. ५००० वर्षांपूर्वी देखील मी म्हटले होते की, हा साक्षात्कार मी घडवतो. मीरेने देखील साक्षात्कार केला परंतु असे नाही की, तिची आत्मा तिथे गेली. नाही, बसल्या-बसल्या साक्षात्कार होतो परंतु मला प्राप्त करू शकत नाहीत.

बाबा म्हणतात - कोणत्याही गोष्टी विषयी शंका असेल तर ज्या ब्राह्मणी (टीचर्स) आहेत, त्यांना विचारा. हे तर जाणता की मुली देखील नंबरवार आहेत, नद्या देखील नंबरवार असतात. कोणी तर डबकी सुद्धा आहेत, अतिशय घाणेरडे, सडलेले पाणी असते. इथे देखील मनुष्य श्रद्धाभावाने जातात. ती आहे भक्तीची अंधश्रद्धा. कधीही कोणाची भक्ती सोडवायची नाही. जेव्हा ज्ञानामध्ये येतील तेव्हा आपणच भक्ती सुटेल. बाबा (ब्रह्मा बाबा) देखील नारायणाचा भक्त होता, चित्रामध्ये पाहिले लक्ष्मी दासी बनून नारायणाचे पाय चेपत आहे तर हे अजिबात आवडले नाही. सतयुगामध्ये असे असत नाही. तर मी (ब्रह्माबाबांनी) एका आर्टिस्टला सांगितले की, ‘लक्ष्मीला या दासीपणातून मुक्त कर’. बाबा (ब्रह्मा बाबा) भक्त तर होता परंतु ज्ञान थोडेच होते. भक्त तर सर्व आहेत. आपण तर बाबांची मुले मालक आहोत. ब्रह्मांडाचा देखील मालक मुलांना बनवतात. म्हणतात - तुम्हाला राज्य-भाग्य देतो. असे बाबा कधी बघितले आहेत का? त्या बाबांची पूर्ण आठवण करायची आहे. त्यांना तुम्ही या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांच्यासोबत योग लावायचा आहे. आठवण आणि ज्ञान देखील अगदी सोपे आहे. बीज आणि झाडाला समजून घ्यायचे आहे. तुम्ही त्या निराकारी झाडामधून साकारी झाडामध्ये आला आहात. बाबांनी साक्षात्काराचे रहस्य देखील समजावून सांगितले आहे. झाडाचे रहस्य देखील समजावून सांगितले आहे. कर्म-अकर्म-विकर्माची गती देखील बाबांनी समजावून सांगितली आहे. पिता, टीचर, गुरु तिघांकडूनही शिकवण मिळते. आता बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला अशी शिकवण देतो, असे कर्म शिकवतो ज्यामुळे तुम्ही २१ जन्म कायम सुखी बनता. टीचर शिकवण देतात ना. गुरु लोक देखील पवित्रतेची शिकवण देतात किंवा कथा ऐकवतात. परंतु धारणा अजिबात होत नाही. इथे तर बाबा म्हणतात - ‘अन्त मति सो गति होईल’. मनुष्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा देखील म्हणतात - ‘राम-राम जपा’ तर बुद्धी तिकडे जाते. आता बाबा म्हणतात - तुमचा साकार सोबत योग सुटलेला आहे. आता मी तुम्हाला खूप चांगली कर्म शिकवतो. श्रीकृष्णाचे चित्र बघा, जुन्या दुनियेला लाथ मारतात आणि नवीन दुनियेमध्ये येतात. तुम्ही देखील जुन्या दुनियेला लाथ मारून नवीन दुनियेमध्ये जाता. तर तुमचे नरकाकडे आहेत पाय आणि स्वर्गाकडे आहे तोंड. स्मशानामध्ये देखील जेव्हा आत जातात तेव्हा प्रेताचे तोंड त्या बाजूने करतात. पाय मागच्या बाजूने करतात. हे श्रीकृष्णाचे चित्र देखील असेच बनवले आहे.

मम्मा, बाबा आणि तुम्ही मुले, तुम्हाला तर मम्मा-बाबाला फॉलो करावे लागेल, जेणेकरून त्यांच्या गादीवर बसाल. राजाच्या मुलांना प्रिन्स-प्रिन्सेस म्हणतात ना. तुम्ही जाणता आपण भविष्यामध्ये प्रिन्स-प्रिन्सेस बनतो. असा कोणी पिता-टीचर-गुरु असेल जो तुम्हाला असे कर्म शिकवेल! तुम्ही कायमसाठी सुखी बनता. हा शिवबाबांचा वर आहे, ते (दुनियावाले) आशीर्वाद देतात. असे नाही, आपल्यावर त्यांची कृपा आहे. केवळ म्हटल्याने काहीही होत नाही. तुम्हाला शिकायचे आहे. फक्त आशीर्वादाने तुम्ही बनणार नाही. त्यांच्या (शिवबाबांच्या) मतावर चालायचे आहे. ज्ञान आणि योगाची धारणा करायची आहे. बाबा समजावून सांगतात की, मुखावाटे ‘राम-राम’ म्हणणे याने देखील आवाज होतो. तुम्हाला तर वाणी पासून परे जायचे आहे. गप्प (शांत) रहायचे आहे. खेळ देखील खूप चांगले-चांगले शोधून काढतात. अशिक्षित असणाऱ्याला बुद्धू म्हटले जाते. बाबा म्हणतात की, आता सर्वांना विसरून तुम्ही पूर्णपणे बुद्धू बना. मी तुम्हाला जे मत देतो त्यावर चाला. परमधाममध्ये तुम्ही सर्व आत्मे शरीराशिवाय राहता मग इथे येऊन शरीर घेता तेव्हा जीव आत्मा म्हटले जाते. आत्मा म्हणते मी एक शरीर सोडून दुसरे घेते. तर बाबा म्हणतात मी तुम्हाला फर्स्ट क्लास कर्म शिकवतो. शिक्षक शिकवतात, यामध्ये ताकदीची काय गरज आहे. साक्षात्कार घडवतात, याला जादुगिरी म्हटले जाते. मनुष्यापासून देवता बनविणे, अशी जादुगिरी कोणीही करू शकत नाही. बाबा व्यापारी देखील आहेत, जुने घेऊन नवीन देतात. याला (या पतित शरीराला) जुने लोखंडाचे भांडे म्हटले जाते. याला काहीच किंमत नाही. आजकाल तर बघा तांब्याची नाणी सुद्धा बनवली जात नाहीत. तिथे तर सोन्याच्या मोहरा असतात. आश्चर्य आहे ना. काय होते आणि काय झाले आहे!

बाबा म्हणतात - मी तुम्हाला नंबर वन (श्रेष्ठ) कर्म शिकवतो. मनमनाभव व्हा. नंतर आहे अभ्यास ज्यामुळे स्वर्गाचे प्रिन्स बनाल. आता देवता धर्म जो प्रायः लोप झाला आहे, तो परत स्थापन होत आहे. मनुष्याला तुमच्या नवीन गोष्टी ऐकून आश्चर्य वाटते, असे म्हणतात की, पती-पत्नी दोघेही एकत्र राहून पवित्र राहू शकतात - हे कसे होऊ शकते! बाबा तर म्हणतात - भले एकत्र रहा, नाहीतर समजणार कसे! मध्यभागी ज्ञान-तलवार ठेवायची आहे, इतकी बहादुरी दाखवायची आहे. परीक्षा असते. तर लोकांना या गोष्टींच्या बाबतीत आश्चर्य वाटते की, शास्त्रांमध्ये तर अशा काही गोष्टीच नाहीत. इथे तर प्रॅक्टिकलमध्ये मेहनत करावी लागते. गंधर्व विवाहाची गोष्ट इथली आहे. आता तुम्ही पवित्र बनता. तर बाबा म्हणतात बहादुरी दाखवा. संन्याशांना पुरावा द्यायचा आहे. समर्थ बाबाच साऱ्या दुनियेला पावन बनवतात. बाबा म्हणतात भले एकत्र रहा फक्त विवस्त्र होऊ नका. या सर्व आहेत युक्त्या. खूप जबरदस्त प्राप्ती आहे फक्त एक जन्म बाबांच्या डायरेक्शन अनुसार पवित्र रहायचे आहे. योग आणि ज्ञानाने एव्हर हेल्दी बनता २१ जन्मांसाठी, यामध्ये मेहनत आहे ना. तुम्ही आहात शक्ती सेना. मायेवर विजय प्राप्त करून जगतजीत बनता. सर्व थोडेच बनणार. जी मुले पुरुषार्थ करतील तिच उच्च पद प्राप्त करतील. तुम्ही भारतालाच पवित्र बनवून मग भारतावरच राज्य करता. युद्ध करून कधीही सृष्टीची बादशाही मिळू शकत नाही. हे आश्चर्य आहे ना. यावेळी सर्व आपसामध्ये युद्ध करून नष्ट होतात. लोणी भारताला मिळते. देणारी आहे - ‘वंदे मातरम्’. मेजॉरिटी मातांची आहे. आता बाबा म्हणतात - जन्म-जन्मांतर तुम्ही गुरु करत आला आहात, शास्त्र वाचत आला आहात. आता मी तुम्हाला समजावून सांगतो - स्वतः निर्णय घ्या, राईट काय आहे? सतयुग आहे रायटीयस (नीतिमान) दुनिया. माया अनरायटीयस (अनीतिमान) बनवते. आता भारतवासी अधार्मिक बनले आहेत. धर्म नाही म्हणून माईट (शक्ती) राहिलेली नाही. इरिलीजस, अनराइटीयस, अनलॉफुल, इनसॉलवंट (अधार्मिक, अनीतिमान, बेकायदेशीर, दिवाळखोर) बनले आहेत. बेहदचे बाबा आहेत म्हणून बेहदच्या गोष्टी समजावून सांगतात; म्हणतात की, आता पुन्हा तुम्हाला रिलीजस मोस्ट पॉवरफुल बनवतो (धार्मिक, सर्वशक्तिमान बनवतो). स्वर्ग बनविणे तर पॉवरफुलचेच (सर्वशक्तिमानचेच) काम आहे. परंतु आहे गुप्त. इंकॉग्निटो वॉरियर्स (गुप्त योद्धे) आहेत. बाबांचे मुलांवर खूप प्रेम असते. सल्ला देतात. पित्याचे मत, टीचरचे मत, गुरुचे मत, सोनाराचे मत, धोब्याचे मत - यामध्ये सर्व मते येतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या एका अंतिम जन्मामध्ये बाबांच्या डायरेक्शनवर चालून घर गृहस्थीमध्ये राहून पवित्र रहायचे आहे. यामध्ये बहादुरी दाखवायची आहे.

२) श्रीमतावर सदैव श्रेष्ठ कर्म करायची आहेत. वाणी पासून परे जायचे आहे, जे काही वाचले आहे किंवा ऐकले आहे त्याला विसरून बाबांची आठवण करायची आहे.

वरदान:-
परिस्थितींना गुडलक समजून आपल्या निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत बनविणारे अचल-अडोल भव

कोणतीही परिस्थिती येवो परंतु तुम्ही हाय जंप घ्या कारण परिस्थिती येणे हे देखील गुड-लक आहे. हे निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करण्याचे एक साधन आहे. तुम्ही जेव्हा एकदा अंगद सारखे मजबूत व्हाल तर मग हे पेपर देखील नमस्कार करतील. आधी विक्राळ रूपामध्ये येतील आणि मग दासी बनतील. चॅलेंज करा - आम्ही महावीर आहोत. जशी पाण्यावर मारलेली रेष टिकू शकत नाही, तसे मज मास्टर सागरावर कोणतीही परिस्थिती वार करू शकत नाही. स्व-स्थितीमध्ये राहिल्याने अचल-अडोल बनाल.

बोधवाक्य:-
जुन्या वर्षाला निरोप देण्या सोबतच कटुतेला सुद्धा निरोप द्या.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-

वरदाता आणि वरदानी या दोघांमधील नाते जर जवळचे आणि निरंतर प्रेमावर आधारित असेल आणि कायम कंबाइंड रुपामध्ये रहात असाल तर पवित्रतेची छत्रछाया आपोआपच राहील. जिथे सर्वशक्तिमान बाबा आहेत तिथे स्वप्नातही अपवित्रता येऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही एकटे राहता तेव्हा पवित्रतेचे सौभाग्य पुसले जाते.