07-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहात, तुम्हालाच बाबांकडून ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, आता तुम्ही ईश्वरीय मांडीवर आहात”

प्रश्न:-
अद्वैत राज्य, जिथे दुसरा कोणताच धर्म नाही, त्या राज्याच्या स्थापनेचा आधार काय आहे?

उत्तर:-
योगबल. बाहुबळाने कधीही अद्वैत राज्याची स्थापना होऊ शकत नाही. तसेही ख्रिश्चनांकडे इतकी शक्ती आहे की त्यांनी जर आपसामध्ये एकजूट केली तर साऱ्या विश्वावर राज्य करू शकतात, परंतु कायदा असे सांगत नाही! विश्वावर एका राज्याची स्थापना करणे हे बाबांचेच काम आहे.

गीत:-
छोड़ भी दे आकाश सिंहासन...

ओम शांती।
मुलांना ‘ओम् शांती’चा अर्थ तर खूप वेळा समजावून सांगितला आहे. ‘ओम्’ अर्थात मी कोण? मी आत्मा. हे शरीर म्हणजे आमचे अवयव आहेत. मी आत्मा परमधाम मध्ये राहणारी आहे. भारतवासी बोलावतात की, ‘हे दूर देशामध्ये राहणारे बाबा, तुम्ही या, कारण आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात धर्म ग्लानी झाली आहे, दु:ख वाढले आहे. तुम्ही पुन्हा येऊन गीतेचा उपदेश ऐकवा’. गीतेसाठीच म्हणतात - ‘शिवबाबा या’, कारण तेच सर्वांचे पिता आहेत. म्हणतात - भारतवासीयांवर पुन्हा माया रुपी रावणाची सावली पडली आहे त्यामुळे सर्वजण दुःखी, पतित आहेत. बोलावतात - रूप बदलून या अर्थात मनुष्याच्या रूपामध्ये या. तर मनुष्य-रूपामध्ये येतो. माझे येणे दिव्य अलौकिक आहे. मी गर्भामध्ये येत नाही, मी येतोच मुळी सामान्य वृध्द तनामध्ये.

तुम्ही मुले जाणता मी कल्प-कल्प आपले निराकारी रूप बदलून येतो. ज्ञान सागर तर परमपिता परमात्माच आहेत. श्रीकृष्णाला असे कधीही म्हणणार नाहीत. बाबा म्हणतात - मी या सामान्य तनामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) येऊन पुन्हा तुम्हाला सहज राजयोग शिकवत आहे. जेव्हा दुनिया पतित बनते तेव्हा मला यावे लागते. कलियुगाला सतयुग बनविण्याकरिता मी येतो. ब्रह्मा, विष्णू, शंकराचे चित्र देखील आहे. ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश आणि विष्णू द्वारे पालना. हे लक्ष्मी-नारायण, विष्णूची दोन रूपे आहेत हे तुम्ही मुले जाणता. बाबा पुन्हा रूप बदलून आले आहेत. ते आमचे सुप्रीम पिता देखील आहेत, सुप्रीम टीचर देखील आहेत, सुप्रीम गुरू देखील आहेत, बाकीच्या गुरू लोकांना ‘सुप्रीम’ म्हटले जात नाही. तर हे पिता, टीचर, गुरू तिन्ही आहेत. लौकिक पिता तर मुलांचे पालन पोषण करून मग त्यांना शाळेमध्ये पाठवून देतात. कोणी विरळेच असतील जे पिता, टीचर देखील असतील. हे कोणी सांगू शकत नाही. सर्व आत्मे मला बोलावतात, गॉडफादर म्हणतात, तर ते आत्म्यांचे फादर झाले. हे गाणे देखील भक्तिमार्गाचे आहे. सतयुगामध्ये तर माया असत नाही, ज्यामुळे बोलवावे लागेल. तिथे तर सुखच सुख आहे. तुम्ही जाणता ५ हजार वर्षांचे चक्र आहे. अर्धा कल्प सतयुग-त्रेता - दिवस, अर्धा कल्प द्वापर-कलियुग - रात्र. तुम्ही ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मण आहात. ब्रह्माचा अथवा तुम्हा ब्राह्मणांचाच रात्र-दिवस गायला जातो. दिवस आणि रात्र या विषयीचे ज्ञान देखील तुम्हा मुलांना आहे. लक्ष्मी-नारायणाला हे ज्ञान नाही. आता तुम्ही संगमावर आहात, जाणता आता भक्तीमार्ग पूर्ण होऊन दिवस उगवत आहे. हे ज्ञान आता तुम्हाला बाबांकडून मिळाले आहे. कलियुग किंवा सतयुगामध्ये हे ज्ञान कोणालाही असत नाही, म्हणून गायले जाते ब्रह्माचा दिवस ब्रह्माची रात्र. तुम्ही आता सूर्यवंशी-चंद्रवंशी राज्य प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करत आहात. मग अर्ध्याकल्पा नंतर तुम्ही राज्य गमावता. हे ज्ञान तुम्हा ब्राह्मणांशिवाय इतर कोणालाही नाही. तुम्ही देवता बनाल मग हे ज्ञान राहणार नाही. आता आहे रात्र. शिवरात्री देखील गायली जाते. श्रीकृष्णाची देखील रात्र म्हणतात परंतु त्याचा अर्थ समजत नाहीत. शिवाची जयंती अर्थात शिवाचे अवतरण होते. अशा बाबांचा दिवस कमीत कमी एक महिना साजरा केला पाहिजे. जे साऱ्या सृष्टीला पतितापासून पावन बनवितात त्यांची सुट्टी देखील साजरी करत नाहीत. बाबा म्हणतात - मी सर्वांचा लिबरेटर आहे, गाईड बनून सर्वांना घेऊन जातो.

आता तुम्ही राजयोग शिकण्याचा पुरुषार्थ करत आहात. बाबा तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देत आहेत. आत्म्याचे रूप काय आहे हे देखील कोणाला ठाऊक नाहीये. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मे ना अंगठ्या प्रमाणे आहात, ना अखंड ज्योती प्रमाणे आहात. तुम्ही तर बिंदू प्रमाणे स्टार आहात. मी देखील आत्मा बिंदू आहे, परंतु मी पुनर्जन्मामध्ये येत नाही. माझी महिमा वेगळी आहे, मी सुप्रीम असल्या कारणाने जन्म-मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. तुम्ही आत्मे शरीरामध्ये येता, तर ८४ जन्म घेता, मी या शरीरामध्ये प्रवेश करतो. हे उधार घेतलेले आहे. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही देखील आत्मा आहात परंतु तुम्हाला याची जाणीव होत नाही की, आपण आत्मा आहोत, आत्माच बाबांची आठवण करते. दुःखामध्ये नेहमी आठवण करतात - हे भगवान, हे दयाळू बाबा दया करा. दया मागतात कारण ते बाबाच नॉलेजफुल, ब्लिसफुल, प्युरिटीफुल (ज्ञानसंपन्न, आनंदाने संपन्न, पवित्रतेने संपन्न) आहेत. ज्ञानामध्ये देखील फुल आहेत. ज्ञानाचा सागर आहेत. मनुष्याला ही उपमा देऊ शकत नाही. सर्व दुनियेवर ब्लिस करणे, हे बाबांचेच काम आहे. ते रचयिता आहेत, बाकी सर्व आहे रचना. क्रियेटर रचनेला क्रिएट करतात. पहिले पत्नीला ॲडॉप्ट करतात मग तिच्याद्वारे रचना रचतात, आणि मग त्यांची पालना (संगोपन) देखील करतात, नाश करत नाहीत. हे बेहदचे बाबा येऊन स्थापना-पालना-विनाश करवून घेतात. आदि सनातन देवी-देवता धर्माची पालना करवून घेतात. सतयुग इत्यादीमध्ये झटक्यात राज्य स्थापन होते. बाकी धर्मवाले तर फक्त आपला-आपला धर्म स्थापन करतात आणि मग जेव्हा लाखो करोडोंमध्ये वृद्धी होते तेव्हा राज्य करणे सुरु होते. आता तुम्ही राज्य स्थापन करत आहात. योगबलाने तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता. बाहुबलाने कधी कोणी विश्वावर राज्य करू शकत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे - ख्रिश्चनांमध्ये एवढी ताकद आहे की, त्यांनी जर आपसामध्ये एकजूट केली तर पूर्ण विश्वावर राज्य करू शकतात. परंतु बाहुबळाने विश्वावर राज्य करता येईल, असे कायदा म्हणत नाही. ड्रामामध्ये हा कायदा नाही, की बाहुबळवाले विश्वाचे मालक बनतील.

बाबा समजावून सांगत आहेत - विश्वाची बादशाही माझ्या द्वारे योगबलानेच प्राप्त होऊ शकते. तिथे कोणते पार्टीशन नाहीये (विभाजन नाहीये). धरती, आकाश सर्व तुमचेच असेल. तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. त्याला म्हटले जाते अद्वैत राज्य. इथे आहेत अनेक राज्ये. बाबा समजावून म्हणतात - ५ हजार वर्षा नंतर तुम्हा मुलांना हा राजयोग शिकवत आहे. श्रीकृष्णाची आत्मा देखील आत्ता शिकत आहे. श्रीकृष्ण पहिल्या नंबरचा प्रिन्स होता. तो यावेळी ८४ जन्मांच्या शेवटी येऊन ब्रह्मा बनला आहे. हे मुलांना समजावून सांगितले आहे की, सृष्टीचे चक्र कसे फिरते. बाबा पुन्हा स्वर्गाची स्थापना करत आहेत. अनेक धर्मांचा विनाश नक्की होणार आहे. एका धर्माची स्थापना होईल. भारतच १०० प्रतिशत सॉल्व्हन्ट (पवित्र) होता, श्रेष्ठ धर्म होता. देवतांची कर्मे देखील श्रेष्ठ होती. त्यांचीच महिमा गायलेली आहे - ‘सर्व गुण संपन्न…’ अगदी सुरुवातीला पवित्र होते, आता पतित बनले आहेत; मग बाबा येऊन पती-पत्नी दोघांनाही पवित्र बनवितात. रक्षाबंधनाचा उत्सव इतका का साजरा करतात - हे कोणालाच माहित नाही. बाबांनीच येऊन प्रतिज्ञा करवून घेतली होती की, अंतिम जन्मामध्ये तुम्ही दोघांनीही पवित्र रहा. संन्याशांचा तर धर्मच वेगळा आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य - हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही बघितले असेल - पादरी लोक चालतात तेव्हा दृष्टी एकाग्र केल्याप्रमाणे असते इतर कुठेही बघत नाहीत. नन्स असतात ना. आता ते तर क्राईस्टची आठवण करतात. म्हणतात - क्राईस्ट ईश्वराचा बच्चा होता. तुमचा सफेद कपडे इत्यादीशी काहीही संबंध नाही. तुम्ही तर आत्मा आहात. नन बट वन, (एक शिवाय इतर कोणीही नाही), एकाचीच आठवण करायची आहे. खऱ्या नन्स तर तुम्ही आहात, तुम्हाला वारसा तर त्या बाबांकडून मिळणार आहे, त्यांची आठवण कराल तेव्हाच विकर्म विनाश होतील म्हणून बाबांचा आदेश आहे - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आत्म्या विषयी विश्वास नसल्याकारणाने नन्स मग क्राईस्टची आठवण करतात. गॉड कोण आहे - हेच जाणत नाहीत. भारतवासी जे सर्वात आधी येतात, तेच जाणत नाहीत. लक्ष्मी-नारायणाला हे सृष्टीचे ज्ञान थोडेच आहे, ना ते त्रिकालदर्शी आहेत. त्रिकालदर्शी तुम्ही ब्राह्मण बनता. बाबा तुम्हा कवडी समान असणाऱ्यांना परिवर्तित करून हिऱ्या समान बनवितात. आता तुम्ही ईश्वरीय मांडीवर आहात. तुमचा हा अंतिम जन्म अतिशय अमूल्य आहे. तुम्ही खास भारताची आणि आम दुनियेची रुहानी सेवा करता. बाकी ते तर आहेत देहधारी समाज सेवक, तुम्ही आहात रूहानी. तुम्हाला शिकविणारे सुप्रीम रूह आहेत. प्रत्येक आत्म्याला सांगा - बाबांची आठवण करा. बाबांचेच पतित-पावन म्हणून गायन केले जाते. तुम्हाला खाली घसरण्यामध्ये (पतन होण्यामध्ये) ८४ जन्म लागतात, मग चढायला एक सेकंद लागतो. या मृत्यू लोकातील हा तुमचा शेवटचा जन्म आहे, मृत्यूलोक मुर्दाबाद, अमरलोक जिंदाबाद होणार आहे. याला अमर कथा म्हटले जाते. अमर बाबा येऊन तुम्हा अमर आत्म्यांना अमरयुगामध्ये घेऊन जाण्यासाठी अमर कथा ऐकवतात. बाबा म्हणतात - ठीक आहे, सर्व गोष्टी विसरून जाता तर फक्त स्वतःला आत्मा निश्चय करून मज एक पित्याची आठवण करा. बुद्धीचा योग माझ्याशी लावा तर तुमची पापे भस्म होतील आणि तुम्ही पुण्य-आत्मा बनाल. तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात, ही नवी गोष्ट नाहीये. ५ हजार वर्षानंतर बाबा येऊन तुम्हाला वारसा देतात, मग रावण पुन्हा शाप देतो - हा खेळ आहे. भारताचीच कहाणी आहे. या गोष्टी बाबाच समजावून सांगतात, हे कोणत्याही वेद-शास्त्र इत्यादीमध्ये नाहीत; म्हणून गॉडफादरलाच नॉलेजफुल, पीसफुल, ब्लिसफुल म्हटले जाते. तुम्हाला देखील आप समान बनवतात. तुम्ही देखील पूज्य होता नंतर मग पुजारी बनता. आपेही पूज्य आपेही पुजारी. हे ईश्वरासाठी नाहीये, ही तुम्हा भारतवासीयांची गोष्ट आहे. तुम्ही आधी फक्त एका शिवाची भक्ती करत होतात. अव्यभिचारी भक्ती केली मग देवतांची भक्ती सुरू केली, नंतर खाली उतरत आलात. आता पुन्हा तुम्ही देवी-देवता बनत आहात. जे थोडे शिकतात ते प्रजेमध्ये जातील. जे चांगल्या प्रकारे शिकतात आणि शिकवितात ते राजाईमध्ये येतील. प्रजा तर भरपूर बनते. एका महाराजाची लाखो करोडोच्या आसपास प्रजा असेल. तुम्ही पुरुषार्थ करताच मुळी कल्पापूर्वीप्रमाणे. पुरुषार्थावरून समजते की माळेमध्ये येणारे कोण-कोण आहेत. प्रजेमध्ये देखील कोणी गरीब, कोणी श्रीमंत बनतात. भक्तीमार्गामध्ये ईश्वर अर्थ दान करतात. का, ईश्वराकडे नाहीये का? नाहीतर मग म्हणतात - श्रीकृष्ण अर्पणम्. परंतु प्रत्यक्षामध्ये असते ईश्वर अर्पणम्, मनुष्य जे काही करतात त्याचे फळ दुसऱ्या जन्मामध्ये मिळते. फक्त एका जन्मासाठी मिळते. आता बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हाला २१ जन्मांचा वारसा देण्याकरिता. माझ्यासाठी डायरेक्ट (प्रत्यक्ष) काहीही करता तर त्याची प्राप्ती तुम्हाला २१ जन्मांसाठी होते. इनडायरेक्ट (अप्रत्यक्ष) करता तर एका जन्मा साठी अल्पकाळाचे सुख मिळते. बाबा समजावून सांगत आहेत - तुमचे हे सर्वकाही मातीमध्ये मिसळून जाणार आहे, म्हणून याला सफल करा. तुम्ही ह्या रूहानी हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी उघडत जा, जिथून सर्व एव्हरहेल्दी एव्हरवेल्दी बनतील, याच्याद्वारे खूप कमाई होते. योगामुळे हेल्थ (आरोग्य) आणि चक्राला जाणल्यामुळे वेल्थ (समृद्धी) मिळते. तर घराघरामध्ये अशी युनिव्हर्सिटी कम हॉस्पिटल उघडत जा. मोठा माणूस असेल तो मोठे उघडेल, जिथे भरपूरजण येऊ शकतील. बोर्डावर लिहून ठेवा, जसे नेचर-क्युअरवाले लिहितात. बाबा सर्व दुनियेचे नेचर बदलून प्युअर बनवितात. यावेळी सर्व इम्प्युअर (अपवित्र) आहेत. साऱ्या दुनियेला एव्हरहेल्दी, एव्हरवेल्दी बनविणारे एक बाबा आहेत, जे आता तुम्हा मुलांना शिकवत आहेत. तुम्ही आहात - मोस्ट स्वीट चिल्ड्रेन (सर्वात जास्त गोड मुले). अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपल्या या अमूल्य जीवनाला रूहानी सेवेमध्ये लावायचे आहे. खास भारताची आणि आम सर्व दुनियेची सेवा करायची आहे.

२) आपले सर्व काही सफल करण्यासाठी डायरेक्ट ईश्वर अर्थ अर्पण करायचे आहे. रूहानी हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी उघडायची आहे.

वरदान:-
एकरस स्थिती द्वारे अतींद्रिय सुखाची अनुभूती करणारे सर्व आकर्षणांपासून मुक्त भव

जेव्हा सर्व इंद्रियांच्या आकर्षणापासून आणि नात्यांच्या आकर्षणापासून मुक्त बनाल तेव्हाच अतींद्रिय सुखाची अनुभूती करू शकाल. कोणत्याही कर्मेंद्रियाच्या वश (अधीन) झाल्याने जी वेगवेगळी आकर्षणे असतात, ती अतींद्रिय सुख अथवा आनंद देण्यावर बंधन घालतात. परंतु जेव्हा बुध्दी सर्व आकर्षणांपासून मुक्त होऊन एका ठिकाणी स्थिर होते, अशांतता समाप्त होते, तेव्हा एकरस अवस्था बनल्यामुळे अतींद्रिय सुखाची अनुभूती होते.

बोधवाक्य:-
आपल्या बुध्दीची लाइन सदैव क्लिअर ठेवा तेव्हाच एकमेकांच्या मनातील भावनांना ओळखू शकाल.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

कोणत्याही प्रकारच्या अशांतीमध्ये अचल राहणे, हीच श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांची खूण आहे. दुनिया अशांतीमध्ये असेल परंतु तुम्ही श्रेष्ठ आत्मे अशांतीमध्ये येऊ शकत नाही. असे का? कारण, तुम्ही ड्रामाच्या प्रत्येक सीनला जाणता. नॉलेजफुल आत्मे, पॉवरफुल आत्मे सदैव स्वतःच अचल राहतात. तर कधीही वायुमंडळाला घाबरु नका, नेहमी निर्भय रहा.