07-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आपसात रूहानी भाऊ-भाऊ आहात, तुमचे एकमेकांवर अतिशय प्रेम असायला हवे, तुम्ही प्रेमाने भरलेली भरपूर गंगा बना, कधीही भांडण-तंटा करू नका”

प्रश्न:-
रूहानी बाबांना कोणती मुले अति प्रिय वाटतात?

उत्तर:-
१) जी श्रीमतावर साऱ्या विश्वाचे कल्याण करत आहेत, २) जे फूल बनले आहेत, कधीही कोणाला काटा लावत नाहीत (दुःख देत नाहीत), आपापसात अतिशय प्रेमाने राहतात, कधीही रुसत नाहीत - अशी मुले बाबांना अतिशय प्रिय वाटतात. जे देह-अभिमानामध्ये येऊन आपसात भांडतात, लून पाणी (खारे पाणी) होतात, ते बाबांची इज्जत घालवतात. ते बाबांची निंदा करणारे निंदक आहेत.

ओम शांती।
जसे रूहानी मुलांना आता रुहानी बाबा प्रिय वाटतात, तसे रूहानी बाबांना देखील रूहानी मुले प्रिय वाटतात कारण श्रीमतावर साऱ्या विश्वाचे कल्याण करत आहेत, कल्याणकारी असलेले सर्वजण प्रिय वाटतात. तुम्ही देखील आपापसात भाऊ-भाऊ आहात, तर तुम्ही देखील जरूर एकमेकांना प्रिय वाटाल. बाहेरच्यांवर इतके प्रेम नसेल, जितके बाबांच्या मुलांचे एकमेकांवर असेल. तुमचे देखील एकमेकांवर खूप प्रेम असायला हवे. जर भाऊ-भाऊ इथेच भांडत असतील किंवा प्रेम करत नाहीत तर ते भाऊ नाहीत. तुमचे एकमेकांवर प्रेम असायला हवे. बाबांचे देखील आत्म्यांवर प्रेम आहे ना. तर आत्म्यांचे देखील आपापसात खूप प्रेम असायला हवे. सतयुगामध्ये सर्व आत्मे एकमेकांना प्रिय वाटतात कारण शरीराचा अभिमान नष्ट झालेला असतो. तुम्ही भाऊ-भाऊ एका बाबांच्या आठवणीने संपूर्ण विश्वाचे कल्याण करता, स्वतःचे देखील कल्याण करता तर भावांचे देखील कल्याण करायला हवे म्हणून बाबा देह-अभिमानीपासून देही-अभिमानी बनवत आहेत. ते लौकिक भाऊ-भाऊ तर आपापसात पैशांसाठी, हिश्श्यासाठी भांडू लागतात. इथे भांडण-तंट्याची गोष्ट नाही, प्रत्येकाला डायरेक्ट कनेक्शन ठेवावे लागते. ही आहे बेहदची गोष्ट. योगबलाने बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. लौकिक पित्याकडून स्थूल वारसा घेतात, हा तर आहे रूहानी बाबांकडून रूहानी मुलांसाठी रूहानी वारसा. प्रत्येकाला डायरेक्ट बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. जितके तुम्ही वैयक्तिकरित्या बाबांची आठवण कराल तितका तुम्हाला वारसा मिळेल. बाबा बघणार, एकमेकांशी जर भांडत असतील तर बाबा विचारतील, तुम्ही निधनके (अनाथ) आहात का? रुहानी भावा-भावांनी भांडता कामा नये. जर भाऊ-भाऊ असून एकमेकांसोबत भांडण-तंटे करतात, प्रेम नसेल, तर जसे काही रावणाचेच बनतात. ती सारी आसुरी संतान झाली. मग दैवी संतान आणि आसुरी संतान यांच्यामध्ये जसा काही फरकच राहत नाही; कारण देह-अभिमानी बनूनच भांडतात. आत्मा, आत्म्याशी भांडत नाही म्हणून बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, आपसात खाऱ्या पाण्याप्रमाणे होऊ नका’. तसे बनतात तेव्हा समजावून सांगितले जाते. मग बाबा म्हणतील, ‘हि तर देह-अभिमानी मुले आहेत, रावणाची मुले आहेत, माझे तर नाही आहेत, कारण आपसात खारट पाण्यासारखे होऊन राहतात’. तुम्ही २१ जन्म क्षिर-खंड होऊन राहता. यावेळी देही-अभिमानी बनून रहायचे आहे. जर एकमेकांचे पटत नसेल तर त्या वेळी त्यांना रावण संप्रदायी समजले पाहिजे. एकमेकांसोबत खाऱ्या पाण्यासारखे राहिलात तर बाबांची इज्जत घालवाल. भले ईश्वरीय संतान म्हणता परंतु आसुरी गुण आहेत तर जसे देह-अभिमानी आहेत. देही-अभिमानी असणाऱ्यांमध्ये ईश्वरीय गुण असतात. इथे तुम्ही ईश्वरीय गुण धारण कराल तेव्हाच बाबा सोबत घेऊन जातील, मग तेच संस्कार सोबत जातील. बाबांना समजते कि मुले, देह-अभिमानामध्ये येऊन आपसामध्ये खाऱ्या पाण्यासारखे राहतात. तर त्यांना ईश्वरीय संतान म्हणू शकत नाही. आपले किती नुकसान करतात. मायेच्या वश होऊन जातात. आपसामध्ये खारे पाणी (मतभेद) होतात. तसे तर सारी दुनियाच खाऱ्या पाण्याप्रमाणे आहे; परंतु जर ईश्वरीय संतान देखील खाऱ्या पाण्यासारखी असेल तर बाकी फरक तो काय राहिला? ते तर जशी बाबांची निंदा करतात. बाबांची निंदा करणारे, खारे पाणी होऊन राहणारे उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत. त्यांना नास्तिक देखील म्हणू शकतो. आस्तिक असणारी मुले कधीही भांडू शकत नाहीत. तुम्हाला आपसामध्ये कधीही भांडायचे नाही आहे. प्रेमाने रहायला इथेच शिकायचे आहे, जे मग २१ जन्म आपसात प्रेम राहील. बाबांची मुले म्हणवून जर भाऊ-भाऊ बनत नसतील तर ते आसुरी संतान झाली. बाबा मुलांना समजावून सांगण्यासाठी मुरली चालवतात. परंतु देह-अभिमानामुळे त्यांना हे देखील कळत नाही की बाबा, आमच्यासाठी बोलत आहेत. माया खूप शक्तिशाली आहे. जसा उंदीर चावतो, तेव्हा कळतही नाही. माया देखील खूप गोड-गोड फुंकर मारून मग चावते. समजत सुद्धा नाही. आपसात रुसणे इत्यादी आसुरी संप्रदायाचे काम आहे. बऱ्याच सेंटर्सवर खाऱ्या पाण्यासारखे होऊन राहतात. अजून कोणी परफेक्ट (संपूर्ण) तर बनलेले नाहीत, माया वार करत राहते. माया असे काही तोंड फिरवते की तुम्हाला कळतसुद्धा नाही. स्वतःच्या मनाला विचारले पाहिजे की आमचे आपसात प्रेम आहे की नाही? प्रेमाच्या सागराची मुले आहात तर प्रेमाने भरपूर गंगा बनायला हवे. भांडण-तंटे करणे, उलट-सुलट बोलणे, यापेक्षा तर न बोललेलेच बरे. ‘हीयर नो ईविल…’ जर कोणामध्ये क्रोधाचा अंश आहे, तर ते प्रेम राहत नाही म्हणून बाबा म्हणतात रोज आपला पोतामेल पहा, आसुरी वर्तन सुधरत नाही तर मग काय निष्कर्ष निघतो? काय पद मिळवतील? बाबा समजावून सांगतात की, कोणती सेवा करत नसाल तर मग काय हालत होईल? पद कमी होईल. साक्षात्कार तर सर्वांना होणारच आहेत, तुम्हाला देखील आपल्या अभ्यासाचा साक्षात्कार होणार. साक्षात्कार झाल्यानंतरच तुम्ही ट्रान्सफर होता, ट्रान्सफर होऊन तुम्ही नव्या दुनियेमध्ये याल. अखेरीला सगळे साक्षात्कार होतील, कोण-कोण किती मार्कांनी पास झाला आहे? मग रडतील, उर बडवतील, सजा सुद्धा खातील, पश्चात्ताप करतील - बाबांचे म्हणणे ऐकले नाही. बाबांनी तर वारंवार समजावून सांगितले आहे - कोणताही आसुरी गुण असता कामा नये. ज्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत त्यांना असे आप समान बनविले पाहिजे. बाबांची आठवण करणे तर खूप सोपे आहे. अल्फ आणि बे. अल्फ म्हणजे बाबा, बे म्हणजे बादशाही. तर मुलांना हा शुद्ध नशा असला पाहिजे. जर आपसात खारट पाणी झालात तर मग तुम्हाला ईश्वरीय संतान कसे समजणार. बाबा समजतील ही आसुरी संतान आहेत, मायेने यांच्या नाकाला पकडले आहे. त्यांना कळतही नाही, अवस्था पूर्णपणे डळमळीत, पदही कमी होते. तुम्हा मुलांनी त्यांना प्रेमाने शिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रेमाची दृष्टी असायला हवी. बाबा प्रेमाचा सागर आहेत तर मुलांना देखील आकर्षित करतात ना. तर तुम्हाला देखील प्रेमाचा सागर बनायचे आहे.

बाबा मुलांना अतिशय प्रेमाने समजावून सांगतात, चांगले मत देतात. ईश्वरीय मत मिळाल्याने तुम्ही फूल बनता. सर्व गुण तुम्हाला देतात. देवतांमध्ये प्रेम आहे ना. तर ती अवस्था तुम्हाला इथे तयार करायची आहे. आता यावेळी तुम्हाला नॉलेज आहे, मग देवता बनल्यावर हे नॉलेज राहणार नाही. तिथे दैवी प्रेमच असते. तर मुलांना आता दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. आता तुम्ही पूज्य बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. आता संगमावर आहात. बाबा देखील भारतामध्येच येतात, शिवजयंती साजरी करतात. परंतु ते कोण आहेत, कसे आणि कधी येतात, काय करतात? हे जाणत नाहीत. तुम्ही मुले देखील आता नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता, जे जाणत नाहीत ते कोणालाही समजावून सांगू देखील शकत नाहीत आणि मग पद कमी होते. शाळेमध्ये शिकणाऱ्यांमध्ये कोणाचे वर्तन खराब असते तर कोणाचे वर्तन नेहमीच चांगले असते. कोणी हजर राहतात, कोणी गैरहजर. इथे प्रेझेंट (हजर) ते आहेत जे सदैव बाबांची आठवण करतात, स्वदर्शन चक्र फिरवत राहतात. बाबा म्हणतात - ‘उठता-बसता तुम्ही स्वतःला स्वदर्शन चक्रधारी समजा’. विसरता तर गैरहजर होता, जेव्हा कायम हजर रहाल तेव्हाच उच्च पद प्राप्त कराल, विसरून जाल तर कमी पद मिळवाल. बाबा जाणतात अजून वेळ बाकी आहे. उच्च पद प्राप्त करणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये हे चक्र फिरत असेल. म्हटले जाते, ‘शिवबाबांची आठवण असावी, मुखामध्ये ज्ञान अमृत असावे तेव्हा प्राण शरीरातून निघावा’. जर एखादी गोष्ट आवडत असेल तर अंतसमयी तीच आठवत राहणार. खाण्याचा लोभ असेल तर मरताना तीच गोष्ट आठवत राहील, ते खावेसे वाटेल. मग पद भ्रष्ट होईल. बाबा तर म्हणतात स्वदर्शन चक्रधारी होऊन मरा, बाकी काहीही आठवू नये. आत्मा जशी कोणत्याही नात्याशिवाय आली आहे, तसेच जायचे आहे. लोभ देखील काही कमी नाहीये. लोभ असेल तर अंतिम समयी तेच आठवत राहील, नाही मिळाले तर त्याच आशेने मराल; म्हणून तुम्हा मुलांना कोणत्याही गोष्टीचा लोभ इत्यादी देखील असता कामा नये. बाबा समजावून तर खूप सांगतात परंतु समजणारे कोणी समजतील. बाबांची आठवण अगदी उराशी बाळगा - ‘बाबा, ओहो बाबा’. ‘बाबा-बाबा’ असे मुखावाटे म्हणायचे देखील नाहीये. अजपाजाप चालत रहावा. बाबांच्या आठवणीमध्ये, कर्मातीत अवस्थेमध्ये शरीर सुटावे तेव्हाच उच्च पद प्राप्त करू शकता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

वरदान:-
जुना देह आणि दुनियेच्या सर्व आकर्षणांपासून सहज आणि सदैव दूर राहणारे राजऋषी भव राजऋषी अर्थात एकीकडे सर्व प्राप्तीच्या अधिकाराचा नशा आणि दुसरीकडे बेहदच्या वैराग्याचा अलौकिक नशा. वर्तमान समयी या दोन्ही अभ्यासाला वाढवत चला. वैराग्य म्हणजे दूर जाणे नाही परंतु सर्व प्राप्ती असताना देखील हदचे आकर्षण मन-बुद्धीला आकर्षित करू नये. संकल्प मात्र देखील अधीनता असू नये, याला म्हणतात राजऋषी अर्थात बेहदचे वैरागी. हा जुना देह आणि देहाची जुनी दुनिया, व्यक्त भाव, वैभवाचा भाव या सर्व आकर्षणांपासून सदैव आणि सहजच दूर राहणारे.

बोधवाक्य:-
सायन्सच्या साधनांचा वापर करा परंतु आपल्या जीवनाचा आधार बनवू नका.

मातेश्वरीजींची मधुर महावाक्ये:-
बघा, मनुष्य म्हणतात कौरव आणि पांडवांचे आपसात कुरुक्षेत्रावर युद्ध चालू आहे आणि मग दाखवतात पांडवांचा सोबती डायरेक्शन देणारा, श्री कृष्ण होता; तर ज्या बाजूने स्वयं प्रकृतीपती आहेत त्यांचा तर विजय निश्चित होणार. बघा, सर्व गोष्टी एकत्र केल्या आहेत. आता आधी या गोष्टीला तर समजून घ्या कि प्रकृतीपती तर ‘परम आत्मा’ आहेत, श्रीकृष्ण तर सतयुगातील पहिला देवता आहे. पांडवांचा सारथी तर परमात्मा होता. आता परमात्मा आम्हा मुलांना कधीही हिंसा शिकवू शकत नाही, ना पांडवांनी हिंसक युद्ध करून स्वराज्य घेतले. हि दुनिया कर्मक्षेत्र आहे, ज्यामध्ये मनुष्य जसे-जसे कर्म करून बीज पेरतो त्याप्रमाणे चांगले अथवा वाईट फळ भोगतो. ज्या कर्मक्षेत्रावर पांडव अर्थात भारत माता शक्ती अवतार देखील हजर आहेत. परमात्मा भारत खंडामध्येच येतात म्हणून भारत खंडाला अविनाशी म्हटले जाते. परमात्म्याचे अवतरण खास भारत खंडामध्ये झाले आहे कारण अधर्माची वृद्धी देखील भारत खंडापासून सुरु झाली आहे. तिथेच परमात्म्याने योगबलाद्वारे कौरवांचे राज्य नष्ट करून पांडवांचे राज्य स्थापन केले. तर परमात्म्याने एक आदि सनातन धर्म स्थापन केला परंतु भारतवासी आपल्या महान पवित्र धर्म आणि श्रेष्ठ कर्माला विसरून स्वतःला हिंदू म्हणवतात. बिचारे आपल्या धर्माला न जाणल्या मुळे इतर धर्मांशी जोडले गेले आहेत. तर हे बेहदचे ज्ञान, बेहदचे मालिक स्वतःच सांगतात. इथे तर आपल्या स्वधर्माला विसरून हदमध्ये अडकले आहेत ज्याला म्हटले जाते - ‘अति धर्म ग्लानी’; कारण हे सारे प्रकृतीचे धर्म आहेत परंतु आधी हवा स्वधर्म, तर प्रत्येकाचा स्वधर्म आहे कि, ‘मी आत्मा शांत-स्वरूप आहे’, त्यानंतर आपल्या प्रकृतीचा धर्म आहे - ‘देवता धर्म’, ते ३३ करोड भारतवासी देवता आहेत. तेव्हाच तर परमात्मा म्हणतात - अनेक देहाच्या धर्मांचा त्याग करा, ‘सर्व धर्मानि परित्यज्…’ या हदच्या धर्मांमध्ये इतका गदारोळ माजला आहे. तर आता या हदच्या धर्मांमधून निघून बेहदमध्ये जायचे आहे. त्या बेहदच्या बाबांसोबत, सर्वशक्तीवान परमात्म्या सोबत योग लावायचा आहे, तर सर्वशक्तीवान प्रकृतीपती परमात्मा आहेत, ना कि श्रीकृष्ण. तर कल्पापूर्वी देखील ज्या बाजूला साक्षात प्रकृतिपती परमात्मा होते त्यांचा विजय गायला गेला आहे. अच्छा. ओम् शांती.