07-06-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.03.2010  ओम शान्ति   मधुबन


पूर्वज आणि पूज्य या स्वमानामध्ये राहून मनसाद्वारे सर्वांची पालना करा, संपूर्ण वृक्षाला सकाश द्या


आज बापदादा आपल्या चोहोबाजूंच्या पूर्वज आणि पूज्य आत्म्यांना पाहत आहेत. स्वतःला पूर्वज आत्मा समजता ना. पूज्य आत्म्यांचा निवास कुठे आहे? आपल्या झाडाला (कल्पवृक्षाला) समोर आणा, त्यात पहा तुमचे स्थान कुठे आहे? जाणता की तुम्हा पूर्वजांचे स्थान मुळामध्ये आहे. झाडाच्या मुळातही आहे, खोडातही आहे. तर मुळांद्वारेच संपूर्ण वृक्षाला पालना (पोषण) मिळते. तर तुम्ही या संपूर्ण वृक्षाच्या शाखा-उपशाखा अथवा पानांची पालना करणारे, सकाश देणारे पूर्वज आहात. पूर्वज सोबत पूज्य देखील आहात. खोडा द्वारे शेवटच्या पानालाही सकाश मिळते. तर स्वतःला संपूर्ण वृक्षाला सकाश देणारे अनुभव करता का? नशा असतो का की आम्ही पूर्वज सर्व आत्म्यांरूपी शाखा-उपशाखा किंवा पानांना सकाश देत आहोत! जसे ब्रह्मा बाबांना ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हणता तर त्यांची तुम्ही साथीदार मुले देखील मास्टर ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर आहात. संपूर्ण वृक्षाचे आत्मे तुम्हा पूर्वज आत्म्यांकडेच आकर्षित होतात. तुम्ही पूर्वज आत्मे शक्तींद्वारे त्यांची पालना करता. जसे तुम्हा सर्व पूर्वज आत्म्यांची पालना बाबांनी केली, तर बाबांनी कशी केली? शक्तींद्वारे. तसे तुम्ही देखील पूर्वज या नात्याने शक्तींद्वारे त्यांची पालना करणारे आहात. आजकाल बघता आहात की सर्व आत्मे दुःखी आहेत, आपल्या-आपल्या देवी-देवतांना बोलावत आहेत - ‘या आमचे रक्षण करा, आम्हाला शांती द्या, आम्हाला शक्ती द्या. ओ क्षमेचे सागर पूर्वज, आम्हाला पालना द्या’. तर हा आवाज तुम्हा पूर्वज आत्म्यांच्या कानांवर पडत आहे का? अनुभव करता का की, आपण पूर्वज आहोत? संपूर्ण वृक्षामध्ये पहाल तर इतरही धर्मांचे आत्मे आहेत, तर वृक्षामध्ये शाखा-उपशाखा असल्याकारणाने ते देखील तुम्हाला त्याच नजरेने पाहतात. त्यांचे देखील पूर्वज तुम्हीच आहात. कोणत्याही धर्माच्या आत्म्यांना जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा असे समजता का की, हे देखील आमच्याच वृक्षाच्या शाखा-उपशाखा आहेत! ते देखील जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा समजतात की हे आपले आहेत! आपलेपणाचा अनुभव त्या आत्म्यांना देखील होत आहे आणि होणार आहे. तर इतका नशा, इतकी मनातून तुम्हा लोकांना दया येते का? ते ओरडत आहेत की, दया करा... तर आता समयानुसार तुम्हा सर्व पूर्वज आत्म्यांना मनसा द्वारे शक्तींची पालना करायची आहे. त्यांना गरज आहे. तर जितके तुम्ही आपल्या पूर्वजच्या नशेमध्ये राहाल तितकेच तुमच्याद्वारे त्यांची पालना होईल. तसेही पहा लौकिकमध्ये सुद्धा कोणाचीही पालना मोठ्यांकडून होते. तेच त्यांच्या शारीरिक गरजा, खाणे-पिणे, शिक्षण जे सोर्स ऑफ इन्कम आहे, या सर्वांचा प्रबंध करतात. तर जसे बाबांनी तुम्हा सर्व मुलांची वेगवेगळ्या शक्तींद्वारे पालना केली आहे तसे आता तुमचे काम आहे की, संपूर्ण वृक्षाच्या शाखा-उपशाखांची आणि पानांची पालना करणे. असा उमंग तुम्हा पूर्वज आत्म्यांमध्ये येतो का? नशा आहे? पूज्य देखील आहात. पहा, संपूर्ण ड्रामामध्ये जितकी तुम्हा आत्म्यांची नियमाप्रमाणे पूजा होते तितकी पूजा कोणत्याही महात्मा, धर्मपिता यांची होत नाही. तुमची पूजा नियमाप्रमाणे आरती करणे, भोग लागणे, अशी कोणाचीही होत नाही. पहा तुमचे गायन म्हणजे नियमानुसार केलेले कीर्तन आहे. कोणाचेही असे गायन केले जात नाही. तर तुम्ही पूर्वज असण्यासोबतच पूज्य देखील आहात. ड्रामामध्ये तुमच्यासारखी पूजा आणि गायन-कीर्तन इतर कोणाचेच होत नाही.

बापदादा अशा तुम्हा पूज्य आणि पूर्वज आत्म्यांना पाहून किती आनंदित होतात! बाबांच्या हृदयातून सतत हेच गाणे वाजते - ‘वाह माझ्या संपूर्ण वृक्षाच्या पूर्वज आणि पूज्य आत्म्यांनो वाह!’ तर आजकाल बापदादा तुम्हा सर्व मुलांना जो तुमचा स्वमान आहे - ‘पित्या समान संपन्न संपूर्ण बनण्याचा’, तेच रूप पाहू इच्छित आहेत. त्यासाठी एक गोष्ट मुलांनी लक्षात ठेवायची आहे, बापदादांनी पाहिले की सर्व मुले पुरुषार्थ खूप चांगला देखील करतात, परंतु ‘सदा’ शब्द प्रत्येकाने आपल्या पुरुषार्थामध्ये ॲड करायचा आहे. अटेंशन द्यायचे आहे. बापदादा मुलांना विचारत आहेत की, जसे बापदादा तुम्हा सर्व मुलांना श्रेष्ठ स्वमानधारी आत्म्याच्या रूपामध्ये पाहतात, तसे तुम्ही स्वतःला देखील असे स्वमानधारी समजता का?

बापदादांनी पाहिले की मुलांचीही इच्छा आहे की, आपणही आता आपल्या राज्यामध्ये जावे. “अब घर जाना है” - हे गाणे देखील मनात गात असतात; आता घरी जायचे आहे, आता रिटर्न जर्नी करायची आहे. यासाठी बापदादांनी अगोदरच सांगितले आहे की पूर्ण वेळ कोणत्या ना कोणत्या सेवेमध्ये स्वतःला बिझी ठेवा. बापदादांनी पाहिले आहे की सेवेची आवड, सेवेचा उमंग-उत्साह अजूनही मुलांमध्ये आहे. चांगल्या सेवेचे समाचार देखील बापदादा ऐकतात. परंतु बापदादा तीव्र गतीने पुढे जाण्यासाठी मुलांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत की, केवळ वाचा सेवा नाही परंतु सेवा करता, तेव्हा एकाच वेळी तीन सेवा एकत्र करा - मनसाद्वारे सकाश द्या, वाचेद्वारे ज्ञान द्या आणि कर्मणा अर्थात आपल्या संपर्काद्वारे, संबंधाद्वारे, चेहऱ्याद्वारे अशी सेवा करा जेणेकरून त्याचा देखील एकत्र प्रभाव सेवेमध्ये व्हावा. एकाच वेळी तीन सेवा एकत्र करा कारण आता आत्म्यांची सेवेसाठी इच्छा आहे की, काहीतरी बदल हवा. काहीतरी बदलले पाहिजे. तर एकाच वेळी तिन्ही सेवा करू शकता का? करू शकता? चेक करता का की ज्या वेळी वाणीची सेवा करता त्या वेळी मनसा द्वारे आणि कर्मणा अर्थात संपर्क-संबंधाद्वारे देखील सेवा होत आहे! एकत्र होते का? जे समजतात की आम्ही एकाच वेळी तीन सेवा करतो, त्यांनी हात वर करा. एकाच वेळी तीन सेवा. तर आता अटेन्शन प्लीज. कधी-कधी नाही. काय होते? सेवा तर करतात परंतु सेवेसोबतच स्वतःमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये संतुष्टता; कारण सेवेचे फळ आहे संतुष्टता अथवा आनंद. तर चेक करा सेवा तर केली परंतु या अगोदरही सांगितले होते की सेवेचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा स्वतः, सोबती आणि वायुमंडळ सर्व संतुष्टतेच्या व्हायब्रेशन मध्ये असतात. सेवेच्या सफलतेच्या तीन विशेष गोष्टी सांगितल्या होत्या, लक्षात असतील. पहिला नंबर सेवा अर्थात निमित्त भाव. दुसरा - निर्माण भावना. तिसरा - निर्मल वाणी. भाव, भावना आणि स्वभाव. हे सर्व एकत्र सेवेमध्ये असेल तर स्वतः देखील संतुष्ट आणि सोबती देखील संतुष्ट, आणि ज्यांची सेवा केली ते देखील पुढे जात राहतील. निमित्त भाव असलेले बाबांशी संबंध जोडतील. जर निमित्त भाव नसेल, तर ते बाबांच्या इतके जवळ येणार नाहीत. तर जेव्हा पण सेवा करता, तेव्हा हे चेक करा की भाव, भावना आणि स्वभाव ठीक होता का? आणि आजकाल बापदादांनी पाहिले की जी मूळ गोष्ट आहे बापदादांची की प्रत्येकाला आणि स्वतःला, भले मग तुम्ही कुठेही सेवेसाठी जात असाल, तर हे चेक करा की सोबती संतुष्ट झाले? कारण सेवेची सफलता आहे - संतुष्टतेचे फळ प्राप्त होणे. आनंद प्राप्त होणे. त्याच सोबत बापदादा एका गोष्टीचा इशारा देत आहेत की चालता-फिरता, संघटनमध्ये देखील राहता, कोणा ना कोणाची सोबत सेवेमध्ये असतेच, तर एकमेकांना आत्म्याच्या रूपात पहा. आत्म्याच्या रूपात पाहता देखील, अभ्यासही करतात, परंतु जेव्हा आत्मा पाहता तेव्हा आत्म्याच्या ओरिजिनल संस्कारांच्या दृष्टीने पाहता? की जे मिक्स संस्कार आहेत, ते देखील दिसून येतात? आत्मा पहा, यामध्ये तुम्ही पास आहात, परंतु कोणत्या संस्कारानुसार पाहता? काय आत्म्याच्या ओरिजिनल संस्कारानुसार कनेक्शनमध्ये येता? की वर्तमान संस्कार देखील समोर येतात? तर बाबा म्हणतात की आजपासून कोणालाही एक तर आत्म्याच्या रूपामध्ये पहा, परंतु आत्म्याचे जे ओरिजिनल संस्कार आहेत त्या रूपामध्ये पहा. तर कधीही आपापसात ज्या कधी-कधी खटके उडणाऱ्या गोष्टी होतात, त्या होणार नाहीत. आता आत्म्याच्या रूपाने पाहता, परंतु सोबतच वर्तमान संस्कारही समोर येतो. तर आपसामध्ये जी संपूर्ण स्थिती असायला हवी, त्यामध्ये अंतर पडते. तर ओरिजिनल संस्कारवाली आत्मा पहा. तर हे जे आता संघटनमध्ये अडथळे येतात, ते अडथळे दूर होतील.

हा ब्राह्मण परिवार श्रेष्ठ परिवार आहे. परिवाराची खूप महिमा आहे. हा ईश्वरीय परिवार वारंवार मिळत नाही. कल्पामध्ये एकदाच हा ईश्वरीय परिवार मिळाला आहे, इतका मोठा परिवार संपूर्ण कल्पामध्ये कधीही मिळत नाही. परिवाराच्या विशेषतेला देखील जाणून घेणे आणि परिवारामध्ये मिळून-मिसळून चालणे, हा एक खूप मोठा विषय आहे. यापूर्वी देखील सांगितले होते की, या ज्ञानाचे फाउंडेशन आहे निश्चय आणि निश्चयामध्ये चार गोष्टी आहेत. बाबा आणि दादा सोबत आहेतच, आणि नॉलेजवर, ड्रामावर, परिवारावर या सर्वांवर निश्चय असावा. तेव्हाच निश्चय बुद्धी बनून, सहज पुरुषार्थी बनता. जसा बापदादांवर निश्चय आहे, तसाच परिवारावर देखील निश्चय आवश्यक आहे. जसे पहा जेव्हा तुम्ही कोणत्याही वस्तूचे पॅकिंग करता तेव्हा काय करता? चारही बाजूंनी टाईट करता ना, एका बाजूने जरी टाईट केले नाही तरी ती वस्तू हलते. असेच बाबा, नॉलेज, नॉलेजमध्ये देखील विशेष ड्रामा आणि परिवार. जर या चारही गोष्टी मजबूत नसतील तर विघ्न येतात. विघ्नांना पार करण्यासाठी अटेंशन द्यावे लागते त्यामुळे परिवाराची ओळख, परिवारावर प्रेम, एकमेकांना समजून घेणे, हे खूप आवश्यक आहे.

पूर्वज आहात, पूज्य आहात, तर या गोष्टी देखील स्वतःमध्ये किंवा सहकाऱ्यांमध्ये आणायच्या आहेत. कसाही असो, नंबरवार तर आहेत ना! परंतु ब्राह्मण परिवाराचे विशेष कार्य आहे - आशीर्वाद देणे, आशीर्वाद घेणे. बरीच मुले म्हणतात की, दुसरा क्रोध करतो, आता आशीर्वाद घेणार कसा! आशीर्वाद तर घेणार नाही, क्रोध करेल. बापदादा म्हणतात - ठीक आहे, संस्कारवश तो शाप देत असेल, तुम्ही आशीर्वाद देऊ इच्छिता परंतु तो शाप देत आहे; परंतु त्याने शाप दिला, स्वीकारणारा कोण? स्वीकारणारे तुम्ही आहात की तो आहे? तो देणारा आहे, तुम्ही घेणारे आहात. तर तुम्ही त्याचा शाप घेतलाच का? जर आत्म्याला ओरिजिनल संस्काराच्या रूपात बघाल तर तुम्हाला दया येईल. स्वतः ही सेफ राहा, शाप स्वीकारू नका, घेणारे तुम्ही आहात. देऊही नका आणि घेऊही नका.

बापदादा आज सर्व मुलांना होमवर्क देत आहेत की, कधीही कोणाला आत्म्याच्या रूपामध्ये पहा, वर्तमान संस्कारांच्या रूपात पाहू नका. आत्मा म्हटले तर त्या आत्म्याचे जे निजी (मूळ) संस्कार आहेत, त्या मूळ संस्कारांच्या रूपामध्ये, संपर्कामध्ये देखील या आणि दृष्टीमध्ये सुद्धा त्याच दृष्टीने पहा तर ही जी विघ्न येतात ज्यामुळे पुरुषार्थामध्ये तीव्रता येत नाही; तर आता वृत्ती बदलाल, दृष्टी बदलाल तर गोष्टी समाप्त होतील. कोणाच्याही कोणत्याही गोष्टी पाहता, बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे तर तुम्हा ब्राह्मण परिवारातील प्रत्येकाचे नेहमीच हे कर्तव्य आहे - शुभ भावना, शुभ कामना देणे आणि शुभ भावना, शुभ कामना घेणे. त्या संस्काराने पहा आणि चाला. आणखी एक गोष्ट सांगतात - यापूर्वी देखील सांगितली आहे तर कुठे-कुठे संघटनमध्ये कधी-कधी परदर्शन, परचिंतन आणि परमत याकडे आकर्षित होतात. आता या तीन ‘पर’ ला कापून टाका, एक ‘पर’ ठेवा - तो एक ‘पर’ आहे ‘पर-उपकार’ (परोपकार). पर-उपकार करायचा आहे, पर-उपकारी आहोत. ब्राह्मणांचा स्वभाव आहे पर-उपकारी. परदर्शन नाही, हा ‘पर’ कापून टाका. हे तिन्ही खूप नुकसान करतात. त्यामुळे आपला हाच स्वमान कायम लक्षात ठेवा की, मज ब्राह्मण आत्म्याचा स्वमानच आहे “पर-उपकारी”. तर दुसऱ्या सीझनमध्ये बापदादा प्रत्येक मुलामध्ये असे परिवर्तन पाहू इच्छित आहेत. हे होऊ शकते का? बापदादा मुबारक देत आहेत, एकमेकांना आठवण करून देत राहा. काय करायचे? रोज रात्री झोपण्यापूर्वी बापदादांना गुडनाईट करण्यापूर्वी आपल्या संपूर्ण दिवसाचा पोतामेल (दिवसभराचा हिशोब) द्या. चांगले केले की वाईट केले? जे काही केले तो पोतामेल बाबांना देऊन, आपली बुद्धी रिकामी करून गुड नाईट करा आणि बाबांच्या आठवणीमध्येच झोपी जा, म्हणजे मग तुमची झोप खूप चांगली होईल. आधी स्वतःला रिकामे करा, बुद्धीमधे कोणतीही गोष्ट ठेवू नका, पित्याच्या रूपात सच्च्या मनाने सर्व पोतामेल दिला तर मग तुम्हाला धर्मराजपुरीमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही. सच्च्या दिलावर साहेब राजी होईल. तर होमवर्क मिळाला! एक तर आपल्या पूर्वज आणि पूज्य स्वरूपाची सेवा चालता-फिरता करू शकता. बाबांनी पाहिले या जनक बच्चीने (दादी जानकी यांनी) तब्येत खराब असतानाही, कराचीच्या सेवेमध्ये विशेष मनसा सकाश दिला, भले निमित्त कोणीही असो, परंतु हिने प्रॅक्टिकलमध्ये केले. तिथल्या आत्म्यांना सकाश मिळाली. आणि उमंगामध्ये पुढे-पुढे जात आहेत. तर असे बापदादांनी प्रॅक्टिकल उदाहरण पाहिले. तर तुम्ही देखील सर्वजण करू शकता. दुःखी असणाऱ्यांना, टाहो फोडणाऱ्यांना आनंदाची लहर पोहोचवू शकता. तुमचे भक्त तुम्हालाच बोलावत आहेत - आमची देवी, आमचे देवता कधी एकदा येऊन दया करणार. तुम्हाला हाक ऐकू येत नाही, परंतु बाबांना खूप ऐकू येते. प्रत्येकजण इष्ट देवतांना बोलावत आहेत. तुम्हाला माहीत नाही की आपले भक्त कोणते आहेत परंतु भक्तांना तर माहीत आहे ना. ते तर बोलावत आहेत आणि ते तुम्हा प्रत्येक ब्राह्मण आत्म्याचे भक्त आहेत. भले ढिले (कच्चे) आहात किंवा हुशार आहात, भक्त तुमचे देखील आहेत कारण तुम्ही मुळामध्ये बसला आहात ना, तर तुमचा सकाश देण्याचा पार्ट आहे. तर आता मनसा सेवा वाढवा. आणि जितके बिझी राहाल ना, तितके निर्विघ्न राहाल. करू शकता ना! मन्सा सेवा करणे जाणता ना! अच्छा, नियमितपणे करता की कधी-कधी? जर कधी-कधी करत असाल तर त्याला रेग्युलर करा आणि जर थोडी करत असाल तर त्याला आणखी वाढवा कारण संपूर्ण कल्पाचा आधार आताच्या सेवेचे फळ आहे. भले पुजारी बनाल, अथवा राज्य अधिकारी बनाल दोन्हीचा आधार आताची सेवा, आताची अवस्था, आताचे बोल आणि आताचा संबंध-सम्पर्क आहे, त्यामुळे बापदादांची हीच इच्छा आहे की जेवढी पर्सेंटेज आता आहे, त्यापेक्षा ती वाढली पाहिजे. तसे तर बापदादा आधीपासूनच सांगत आहेत - करायचे असेल तर आत्ता करा, नंतर कधीतरी नाही. बापदादांना ‘कधीतरी’ची गाणी खूप ऐकवतात. खूप छान-छान करून ऐकवतात परंतु बापदादांना ‘कधीतरी’ची गाणी आवडत नाहीत. ‘आत्ताच्या-आत्ता’ ची गाणी आवडतात. तुरंत दान महापुण्य. तर समजले आता काय करायचे आहे? अच्छा.

बापदादा चोहोबाजूंच्या मुलांना पाहून आनंदीतही होत आहेत कारण बापदादा मुलांशिवाय एकट्याने काहीही करू इच्छित नाहीत, म्हणून दररोज मुलांचे आवाहन करत राहतात. तीव्र पुरुषार्थी मुलांनो, गोड मुलांनो, लाडक्या मुलांनो आता चला. अच्छा.

चोहोबाजूंच्या मुलांना बापदादा पाहून, भले सन्मुख बसलेले आहेत किंवा इतर कुठेही बसलेले आहेत परंतु सर्वांना बाबांची आठवण आहे. आणि बाबांना देखील कोणाची आठवण आहे? चोहोबाजूंची मुले आठवणीत आहेत कारण बाबा प्रत्येक मुलाकडून हीच आशा ठेवतात की, प्रत्येक मुलाला पित्या समान बनायचेच आहे. बाबांच्या प्रत्येक मुलाकडून ज्या अपेक्षा आहेत, बाबा जाणतात की नंबरवार आहेत परंतु तरी देखील आपल्या क्रमांकानुसारही संपन्न तर बनायचे आहे ना. प्रत्येकाच्या पुरुषार्थाला देखील पाहतात काय-काय करत आहेत, बाबांना खूप प्रेम वाटते, मुले जेव्हा मेहनत करतात ना, तेव्हा खूप प्रेम वाटते की, मुलांनी मेहनतीपासून मुक्त व्हावे, प्रेमामध्ये हरवून जावे. प्रेमामध्ये मेजॉरिटी पास आहेत परंतु गोष्टींमध्ये येतात तेव्हा बाबांना विसरून जातात.

चोहोबाजूंच्या मुलांना बापदादांचे पद्म-पद्मपटीने प्रेम आणि अंतःकरणापासून प्रेम स्वीकार असो. सर्वांना, मालक मुलांना बाबा लाख-लाख शुभेच्छा देत आहेत. उडत रहा, उडवत रहा. अच्छा.

वरदान:-
स्व-स्थितीद्वारे सर्व परिस्थितींना पार करणारे निराकारी, अलंकारी भव

जे अलंकारी आहेत ते कधीही देह-अहंकारी बनू शकत नाहीत. निराकारी आणि अलंकारी राहणे - हेच आहे मनमनाभव, मध्याजीभव. जेव्हा अशा स्व-स्थितीमध्ये सदैव स्थित राहता, तेव्हा सर्व परिस्थितींना सहजच पार करता, यामुळे अनेक जुने स्वभाव नष्ट होतात. स्व मध्ये आत्म्याचा भाव पाहिल्याने भाव-स्वभावाच्या गोष्टी संपून जातात आणि सामना करण्याच्या सर्व शक्ती स्वतःमध्ये येतात.

सुविचार:-
संकल्पाचे एक पाऊल तुमचे तर सहयोगाची हजार पावले बाबांची.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

जे आपल्या अथवा दुसऱ्यांच्या घडून गेलेल्या गोष्टींकडे पाहत नाहीत, सेकंदात फुलस्टॉप लावतात, ते सरलचित्त असतात; आणि जे सरलचित्त असतात त्यांच्या डोळ्यांमधून, चेहऱ्यावरून आणि वर्तनामधून मधुरता व हर्षितमुखता प्रत्यक्ष रूपात दिसून येते. अशी सरलचित्त स्थिती असणारे दुसऱ्यांनाही सरलचित्त बनवितात. सरलचित्त अर्थात जी गोष्ट ऐकली, पाहिली, केली, ती सार-युक्त असावी आणि त्यातून केवळ सारच ग्रहण व्हावे.